Home Blog Page 517

महिला दिनाचे औचित्य साधून साखरखेर्डा प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये लसीकरणाची सुरुवात ‘ …सरपंच दाऊद शेठ कुरेशी यांच्या हस्ते लशीकरण केंद्राचे उद्घाटन ….

0

 

..लसीकरणाचा पहिला डोस महिलांना ‘

सिंदखेड राजा (सचिन खंडारे )

सिंदखेडराजा तालुक्यातील साखरखेर्डा येथील ८ मार्च रोजी महिला दिनाचे औचित्य साधून कोविड लसीकरणाची सुरुवात करण्यात आली आहे,ज्येष्ठ नागरिकांना पहिली लसीकरणाची सुरुवात साखरखेर्डा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये करण्यात आली आहे,सुरुवातीला साखरखेर्डा नोकरीची सरपंच दाऊद शेठ कुरेशी तसेच साखरखेर्डा पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री जितेंद्र आडोळे,यांच्या हस्ते लसीकरण केंद्राचे फित कापून उद्घाटन करण्यात आले,त्यानंतर लसीकरण केंद्रामध्ये कोविड लसीकरण चा पहिला डोज ‘महिला दिनी,मंदाकिनी भागवत सुरुशे यांना देण्यात आला,आरोग्य सेविका मीनाक्षी गवई यांनी पहिला डोस दिला,त्यानंतर जेष्ठ पत्रकार दीपक नागरे सर,माजी उपसरपंच रामदास सिंग राजपूत,यांनीही ची लस घेतली,यावेळी साखरखेर्डा प्राथमिक आरोग्य केंद्र मध्ये कोविड ची लस उपलब्ध झाल्यामुळे अनेक लोकांना दिलासा मिळाला आहे, सिंदखेडराजा आहे आर्थिक दृष्ट्या सर्वसामान्य माणसाला परवडणारी नव्हते,या लसीकरणाचे वेळी,साखरखेर्डा ग्रामपंचायतचे सरपंच दाऊद शेट कुरेशी,साखरखेर्डा पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री जितेंद्र आडोळे,साखरखेर्डा आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉक्टर संदीप कुमार सुरूशे,अमित जाधव,उपसरपंच प्रवीण पाझडे,डॉक्टर गोपाल मानवतकर,अंकुर देशपांडे,ज्येष्ठ पत्रकार दीपक नागरे माजी उपसरपंच रामदास सिंग राजपूत,इब्राहिम शाहा,केंद्रप्रमुख दिलीप खंडारे,शुभम राजपूत,संग्रामसिंग ठाकूर,दैनिक देशोन्नती चे पत्रकार मनोज पऱ्हाड, सचिन खंडारे,
तर आरोग्य विभागाच्या वतीने .तेजस्वी इंगळे ‘मीनाक्षी गवई, ज्योती चांगाडे, mpw श्री गव्हाळे, HA – श्री बि.टी . गिर्हे,शिंदी आरोग्य समुदाय डॉक्टर प्रशांत वायाळ,आशा स्वयंसेविका सर्व आरोग्य कर्मचारी हजर होते,लवकरात लवकर ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रामध्ये सुद्धा लसीकरण देण्यात येईल आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले,

१७ वर्ष देश सेवा करून परतलेल्या साखरखेर्डा येथील सैनिक सुपुत्र श्री राम अवचार यांचे गावकऱ्यांच्या वतीने स्वागत !

0

 

सिंदखेडराजा (सचिन खंडारे )

सतत 17 वर्ष ऊन वारा पाऊस बर्फ या नैसर्गिक संकटाशी सामना करून प्रसंगी आपले आई-वडील पत्नी यांच्याशी दूर राहून देशसेवेसाठी गेली १७ वर्षे देश सेवा करून आपल्या माय भूमी असलेल्या मूळगावी साखरखेर्डा येथील सैनिक राम गणपत अवचार ‘हे दिनांक 4 मार्च रोजी साखरखेर्डा येथे देशसेवा करून परतले आहे,राम गणपत अवचार हे आपल्या मूळ गावी साखरखेर्डा येथे आल्यानंतर साखरखेर्डा येथील समाज बांधवांच्या वतीने शासनाच्या नियम अटी पाळून ‘स्वागत करण्यात आले,मराठा रेजिमेंट १५या तुकडीत ऊन ते जम्मू काश्मीर येथील सेक्टर मधून सेवानिवृत्त झाली आहे .साखरखेर्डा येथील समाज बांधवांनी व त्यांच्या मित्रमंडळींनी कोरोना चे नियम पाळून छोटेखानी सत्कार समारंभ आयोजित केला होता .यावेळी विविध मान्यवरांच्या हस्ते देश सेवा करून परतलेले सैनिक राम अवचार यांचा सत्कार करण्यात आला,कठीण प्रसंगी शत्रूवर आपण लढावू वृत्तीने मात केल्याचे यावेळी राम अवचार यांनी सांगितले,यावेळी साखरखेर्डा नगरीचे सरपंच दाऊत शेठ कुरेशी ‘माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रामभाऊ जाधव,माजी उपसभापती पंचायत समिती सि. राजा .सुनील जगताप,माझी पंचायत समिती सभापती राजू भाऊ ठोके,उपसरपंच प्रवीण पाझडे,दैनिक लोकमतचे पत्रकार अशोक इंगळे आदर्श शिक्षक सुधाकर पऱ्हाड विदर्भ न्याय संपादक संतोष गाडेकर ,कमलाकर गवई,हे उपस्थित होते,शेवटी सैनिक गीत व राष्ट्रगीत देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली ‘

निमगाव येथे प्राथमिक आरोग्य तपासणी करण्यात आली

0

 

सुनील पवार. नांदुरा. ता.प्रतिनिधि

दि.६/३/२०२१ला.निमगाव. ता.नांदुरा येथे प्राथमिक. आरोग्य केंद्र यांचे वतीने कोविड नाईटिन आर. टि.फि.शि.आर लस निमगाव बस स्थानक येथे गावातील भाजी विक्री करनारे हाँटेल मालक व गावातील ईतर धंदे वाईक नागरिक याना लस देण्यात आली यावेळी सरपंच. व.पोलीस. पाटिल.अनिल वानखडे. सरपंच पति. दिनकर कुवारे.प्रमोद अवचार. सुनील पवार..प्त्रकार.गनेश.भोपळे. योगेश धोटे. पत्रकार. यानि परीसर्म. घेतले

महाराष्ट्र लढा पत्रकार संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी मोहन मेढे तर जिल्हा सचिव पदी शब्बीर भाई यांची निवड

0

 

मोताळा:- मुक्ताईनगर येथे आज दिनांक 7 मार्च 2021 ला शासकीय विश्रामगृह येथे महाराष्ट्र लढा पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय लुकमान शाह यांचे अध्यक्षतेखाली पत्रकारांची बैठक आयोजित करून सदरचे बैठकीत विविध विषयावर चर्चा करून सर्वानुमते जळगाव जिल्हा अध्यक्ष पदी मोहन मेढे तर जिल्हा सचिव पदी शब्बीर भाई यांचे निवड करून नियुक्तीपत्र देण्यात आले त्याबद्दल सविस्तर वृत्त असे की.
महाराष्ट्र लढा पत्रकार संघटनेच्या माध्यमातून पत्रकार बांधवांचे संघटन करून अन्याय-अत्याचार झाल्यास सदैव पत्रकारांचे पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना न्याय मिळवून देण्याचे काम हे संघटना काळजीपूर्वक प्रत्येक जिल्ह्यात आज तगायत करीत आहे बातमी संकलन करीत असताना येणारे वेगवेगळे अनुभव अधिकारी देत असलेली वागणूक पत्रकारांवर होणारे हल्ले असे एक ना अनेक विषयावरती चर्चा करून संस्थापक अध्यक्ष माननीय लुकमान शाह यांनी संघटनेचे महत्त्व व ध्येयधोरण पटवून सांगितले जळगाव जिल्हा अध्यक्षपदीमोहन मेढे मुक्ताईनगर यांची तर शब्बीर भाई हिंगोणा यांची जिल्हा सचिव पदी आणि शेख आतिक व मुबारक तडवी यांची जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड करून नियुक्तीपत्र देण्यात आले .व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तसेच मुक्ताईनगर तालुक्याची तालुका कार्यकारिणी देखील उपस्थित पत्रकार बांधव यांचेतुनच घोषित करण्यात आली .
मुक्ताईनगर तालुका कार्यकारिणी:-
तालुकाध्यक्ष श्री सतीश गायकवाड तालुका सचिव श्री अमोल वैद्य शहराध्यक्ष श्री रिजवान भाई शहर उपाध्यक्ष श्री अजगर शेख तालुका संघटक श्री दिनकर भालेराव तालुका संघटक मुक्ताररब्बानी तालुका संघटक श्री कैलास कोळी तालुका संघटक वसीम कुरेशी तर आधी पत्रकार बांधवांचे सदस्यपदी सर्वानुमते निवड करण्यात आली सर्वांचा पुष्पगुच्छ देऊन संस्थापक अध्यक्ष माननीय लुकमानशाह यांनी सत्कार करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाची सांगता झाली सूत्रसंचालन व आभार अजगर भाई यांनी मानले.

आरोग्य विभाग झोपेत धक्कादायक प्रकार ,कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाला दिल्या मुदत बाह्य औषध गोळ्या .

0

 

अनिलसिंग चव्हाण (मुख्य संपादक)

कोरोना बांधित रुग्णाला मुद्दतबाह्य औषध

बुलढाणा जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार चक्क कोरोना रुग्णाला मुद्दतबाह्य औषध दिल्याचा प्रकार उघडकीस आल्याने रुग्णांमध्ये भिती निर्माण झाली आहे, संग्रामपुर तालुक्यातील कोलद येथील एका कोरोना रुग्णाचा आहवाल पाॕझिटिव्ह आल्या नंतर त्या रुग्णाला वा-यावर सोडून दिले .व पाॕझिटिह रुग्णालाच गोळ्या आणण्यासाठी साठी बाहेर पाठवण्यात आले प्रा.आ.केंद्र मधून त्या कोरोना रुग्णाला गोळ्या तर देण्यात आल्या परंतु त्या पण मुद्दतबाह्य गोळ्या देवून पाठवण्यातआले .त्या रुग्णाचे नंतर लक्षात आले की दिलेल्या गोळ्या मुद्दतबाह्य आहेत.त्यामुळे कोरोना व इतर रुग्णामध्येही भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
जणु काही आरोग्य विभाग रुग्णांचे जीवन मरणाशी खेळ तर नाही ना? ,शासन कोरोना रोखण्यासाठी व रुग्ण बरे होण्यासाठी प्रचार,प्रसार करण्यासाठी व कोरोनाचे आणी इतर आजार बरे होण्यासाठी आटोकाट प्रयत्न करीत आहे.तर एकीकडे कोरोना सारख्या आजाराकरीता मुदत बाह्य औषध गोळ्या त्याही सरकारी दवाखान्यातून आरोग्य विभागाकडून दिल्या जातात.ह्या गंभीर बाबीला जबाबदार कोण? वरील बाब उघडकीस आल्याने आता लोकांचा मनात मरणाची भिती निर्माण झाली आहे.झालेल्या प्रकाराची चौकशी होवुन संबधितावर कार्यवाही व्हावी अशी जनतेत चर्चा सुरु आहे,

महसूल पथकाची धडक मोहीम कारवाईत येथील नदीपात्रातील अवैधरित्य वाळूची वाहतुक करतांना ट्रॅक्टर पकडून कारवाई

0

 

विकि वानखड़े यावल

यावल येथील महसूल पथकाची धडक मोहीम कारवाईत येथील नदीपात्रातील अवैधरित्य वाळूची वाहतुक करतांना ट्रॅक्टर पकडून कारवाई केली असून या कारवाईमुळे, गौण खनिजची वाहतूक करणाऱ्याचि चांगलीच खळबळ उडाली आहे या ,संदर्भात महसूल सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की यावल तालुक्यातील सर्वत्र अवैधरित वाळूची सर्रासरपणे विविध वाहनातुन वाहतूक करण्यात येत आहे यावर वचक बसावा म्हणून यावलचे धडाकेबाज तहसीलदार महेश पवार, निवास तहसीलदार आर के पवार, यांच्या मार्गदर्शनाखाली धडक मोहीम पथक गठित केली आहे या पथकात माध्यमातून आज दिनांक 7 मार्च 2021 रोजी सकाळी सुमारास यावल शहरालगत असलेल्या हाडकाई खडकाई नदीच्या पात्रात विना क्रमांकाचा ट्रॅक्टर मध्ये ट्रॉली क्रमांक एम एच डब्लयु ९०७६मध्ये बेकायद्याशीररित्या गौण खानिजची वाहतूक करतांना यावल विभागाचे मंडळ अधिकारी ,शेखर तडवी परसाडे येथील तलाठी, समीर तडवी कोरपावली, तलाठी मुकेश तायडे तहसीलदाराचे, वाहन चालक हिरामण सावळे ,यांच्या पथकाने कारवाई करत वाळूच्या वाहतूक करणारे ट्रॅक्टर ताब्यात घेतले आहे या दरम्यान अशा प्रकारे महसूल प्रशासनाच्या वतीने अवैध मार्गाने वाळू वाहतूक करणाऱ्या माफिया वर झालेल्या कारवाईत सातत्य असणे गरजे असुन तरच या चोरीला आळा बसण्यास मदत होणार असल्याची नागरिकांमध्ये बोलले जात आहे

8 ते 16 मार्च पर्यंत जिल्ह्यात टाळेबंदी कायम सर्व दुकाने सकाळी 9 ते सायं 5 वाजेपर्यंत सुरू राहतील

0

 

अजहर शाह मोताळा प्रतिनिधी

· सायंकाळी 6 वाजे नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजेपर्यंत संचारबंदी

बुलडाणा:-जिल्ह्यातील कोविड 19 चा प्रादुर्भाव बघता 16 मार्चपर्यंत टाळेबंदी कायम ठेवण्यात आली आहे. मात्र या कालावधीत सर्व दुकाने, आस्थापना यांना सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत उघडण्याची मुभा देण्यात आली आहे. जिल्ह्यासाठी 8 मार्च रोजी सकाळी 8 वाजेपासून ते 16 मार्च चे सकाळी 8 वाजेपर्यंत निर्बंध लागू करण्यात आले आहे, असा आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी एस रामामूर्ती यांनी आज काढला आहे.

या आदेशान्वये जिल्ह्यात सर्व दुकाने, आस्थापना सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. दुध विक्रेते, दुध वितरण केंद्र सकाळी 6 ते दुपारी 3 व सायंकाळी 6 ते रात्री 9.30 वाजेपर्यंत सुरू राहतील. जिल्ह्यात सायंकाळी 6 ते दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजेपर्यंत संचारबंदी लागू असणार आहे. या क्षेत्रात ज्या उद्योगांना सुरू ठेवण्याकरीता यापूर्वी परवानगी देण्यात आलेली आहे. ते सर्व उद्योग सुरू ठेवण्याकरीता परवानगी राहणार आहे. सर्व प्रकारच्या शासकीय कार्यालये, बँका अत्यावश्यक सेवा वगळून 50 टक्के संख्या ग्राह्य धरून सुरू राहतील. सर्व बँका नियमितपणे सुरू राहतील. सर्व प्रकारची उपहारगृहे, हॉटेल्स सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत 50 टक्के क्षमतेसह सुरू राहतील. सायंकाळी 5 ते रात्री 9 पर्यंत केवळ पार्सल सुविधेस परवानगी असणार आहे. लग्न समारंभाकरीता 50 व्यक्तींना तहसिलदारांकडून परवानगी अनुज्ञेय असणार आहे. लग्न समारंभासाठी उपस्थित असलेल्या 50 व्यक्तींमध्ये बँड पथकातील सदस्यांचा समावेश असेल. अंत्यविधी करिता 20 व्यक्तींना परवानगी असेल.

सर्व प्रकारची शैक्षणिक संस्थांमध्ये अशैक्षणिक कर्मचारी, संशोधन कर्मचारी, वैज्ञानिक यांना ई माहिती, उत्तर पत्रिका तपासणे, निकाल घोषीत करणे आदी कामांकरीता परवानगी असणार आहे. मालवाहतूक ही नेहमीप्रमाणे सुरू राहणार आहे. आंतर जिल्हा बस वाहतूक एकूण प्रवाशी क्षमतेच्या 50 टक्के क्षमतेसह सोशल डिस्टन्स व निर्जंतुकीकरण करून प्रवासी वाहतुकीस परवानगी राहील. चार चाकी वाहनात चालक व्यतिरिक्त तीन प्रवाशी, तीनचाकी वाहनात चालक व्यतिरिक्त दोन प्रवाशी व दुचाकीवर हेल्मेट व मास्क लावून दोन व्यक्तींना परवानगी असेल. ठोक भाजी मंडई सकाळी 3 ते 6 या कालावधीत सुरू असणार आहे. मात्र सदर मंडईत किरकोळ विक्रेते यांनाच प्रवेश राहील. मॉर्निंग वॉक ला परवानगी असेल. सर्व प्रकारची सिनेमागृहे, व्ययामशाळा, जलतरण तलाव, मनोरंजन उद्याने, नाट्यगृहे, प्रेक्षक गृहे व इतर संबंधीत ठिकाणे ही बंद राहणार आहेत. तसेच सर्व प्रकारची सामाजिक, राजकीय, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम व स्नेहसंमेलन या कालावधीत बंद असतील. सर्व धार्मिक स्थळे प्रतिबंधित क्षेत्रात नागरिकांसाठी पुर्णपणे बंद राहतील. तसेच प्रतिबंधित क्षेत्र वगळता अन्य ठिकाणी सर्व धार्मिक ठिकाणी 10 व्यक्तींच्या उपस्थितीत सुरू राहतील. सर्व आठवडी बाजार बंद राहतील. जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संस्था, शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस, खाजगी शिकवणी केंद्र बंद राहतील. मात्र ऑनलाईन शिक्षणास परवानगी असेल.

सर्व खाजगी वैद्यकीय सेवा, पशुचिकित्सा सेवा त्यांचे नियमित वेळेनुसार सुरू राहतील. कोणतेही रूग्णालय बंदचा आधार घेवून रूग्णांना आवश्यक सेवा नाकारणार नाही. जिल्ह्यातील ॲम्बुलन्स सेवा 24 तास सुरू राहतील. पेट्रोल, डिझेल, एलपीजी गॅस यांची वाहतुक, वितरण, विक्री व साठवण सुरू राहील. या कालावधीत संपन्न होणाऱ्या पुर्वनियोजित परीक्षा त्यांचे वेळापत्रकानुसार घेण्यात येतील. तसेच परीक्षार्थी यांना सदर कालावधीमध्ये परीक्षेचे ओळखपत्र व पालकांना त्यांचे ओळखपत्र सोबत ठेवणे अनिवार्य असेल. आगामी होणाऱ्या महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षा व इतर स्पर्धा परीक्षेच्या अनुषंगाने अभ्यासिका एकूण आसन क्षमतेच्या केवळ 50 टक्के क्षमतेने सोशल डिस्टसिंग, सॅनीटायझर, मास्कचा वापर आदी नियमांचे पालन करून सुरू राहतील. सर्व प्रकारच्या खाजगी आस्थापनांनी त्यांच्या आस्थापनेवरील सर्व कर्मचाऱ्यांची वेळोवेळी तपासणी करावी. संसर्ग सुरक्षा नियमांचे पालन करावे. कोविडची लक्षणे दिसून येताच संबधित कर्मचाऱ्याची आरटीपीसीआर चाचणी करून घ्यावी. कृषि उत्पन्न बाजार समितीच्या ठिकाणी होणारी गर्दी लक्षात घेता गर्दी नियंत्रण करून हात धुण्याची व्यवस्था करण्यात यावी. कोरोना संसर्ग सुरक्षा नियमांचे पालन याठिकाणी होणे आवश्यक आहे. गर्दी जमवून करण्यात येणारी निर्दशने, मोर्चे, रॅली, आंदोलने यांना बंदी राहील. मात्र केवळ 5 व्यक्तींच्या उपस्थितीत स्थानिक पोलीस विभागाची परवानगी घेऊन संबंधीत शासकीय विभागास निवेदन देता येणार आहे.

या आदेशांचे उल्लंघन केल्यास भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188, आपत्ती व्यवस्थापन कायदा व साथरोग प्रतिबंधात्मक कायद्याअन्वये कार्यवाही करण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. नागरीकांनी आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडू नये. कोरोना संसर्ग नियमांचे पालन करावे, असे आवाहनही जिल्हा प्रशासनाने केले आहे.

१० वी व १२ वी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवू नये. -शिवसेना विद्यार्थी सेनेची मागणी.,,

0

 

सिंदखेड राजा (सचिन खंडारे )

=कोरोना महामारी मुळे राज्यातील असंख्य शाळा सुरू होऊ शकल्या नाहीत.त्यामुळे दहावी आणि बारावीचा अभ्यासक्रम अजूनही अपूर्ण आहे.त्यामुळे विद्यार्थी आणि शिक्षकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले.
सरकारने या दोन्ही परीक्षांचा 50% अभ्यासक्रम कमी करून त्या आधारित 50 मूल्यमापन पद्धतीने परीक्षा घ्याव्यात, राज्यात 2020-21 या शैक्षणिक वर्षात मोठ्या प्रमाणावर अभ्यासक्रम अर्धवट राहिला आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना अंतर्गत गुण सरसकट द्यावेत आणि प्रात्यक्षिक परीक्षा न घेता त्यासाठी ऑनलाइन अथवा ऑफलाइन पद्धतीने काही लिखित परीक्षा घ्याव्यात अथवा ते रद्द करावेत, अशी मागणी शिवसेना विद्यार्थीसेना जिल्हाप्रमुख सागर समुद्रवार व शुभम शेलगेनवार विद्यार्थीसेना उपतालुकाप्रमुख मेहकर व परसराम दांडेकर सो.मी.ता. प्र.लोणार यांनी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड व राज्यमंत्री बच्चू कडू यांच्याकडे केली आहे.
कोरोना सारखं महाभयंकर संकट महाराष्ट्रात व संपूर्ण जगात आलेला आहे. या संकट काळात शैक्षणिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांना नुकसान झालेल आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणापासून मुकावे लागत इंटरनेट मुळे विद्यार्थ्यांना ग्रामीण भागात शिक्षण मिळू शकलेलं नाही. अवघ्या एक महिना शाळा ग्रामीण भागात सुरू झाली होती पण तो सुद्धा कोरोणामुळे पुन्हा बंद झालेला आहे. अशा परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांना त्यांच्या करियर संदर्भात महत्त्वपूर्ण असलेली परीक्षा म्हणजे दहावी व बारावी ची परीक्षा,अपूर्ण अभ्यास असताना कशी द्यावी हा मोठा प्रश्न विद्यार्थ्यांच्या समोर आहे.महाराष्ट्र सरकारने जरी विविध माध्यमातून शिक्षण पोचवण्याचं काम केलं असलं तरी ती शिक्षण ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलेलं नाही.20 ते 30 टक्के अभ्यास असताना हा पेपर कसा सोडवायचा हा खूप मोठा प्रश्न आहे.सरकारने सर्व बाबींचा विचार कर काही बदल करण्याची मागणी शिवसेना विद्यार्थीसेना जिल्हाप्रमुख सागर समुद्रवार व शुभम शेलगेनवार विद्यार्थीसेना उपतालुकाप्रमुख मेहकर व परसराम दांडेकर सो.मी ता प्र. लोणार यांनी केली आहे .

शिंदी येथे अंदाजे 340 कोटीची विविध विकास कामे सुरू ‘ तर काही कामाचे भूमिपूजन !

0

 

सिंदखेड राजा ( सचिन खंडारे )

सिंदखेडराजा तालुक्यातील शिंदी येथे दिनांक ६मार्च रोजी शासनाच्या अटी व नियमाच्या अधीन राहून विविध विकास कामाचे भूमिपूजन व प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आली आहे ‘यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा विद्यमान जिल्हा परिषद सदस्य राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष माननीय रामभाऊ जी जाधवव माझी कृषी सभापती तथा विद्यमान जि प सदस्य दिनकर बापू देशमुख .साखरखेडा चे माजी सरपंच कमळाकर गवई यांच्या हस्ते टिकास मारून व नारळ फोडून विविध विकास कामे सुरू करण्यात आली ‘या कामांमध्ये,स्मशानभूमी वॉल कंपाऊंड ‘दलित वस्ती मधील सिमेंट रस्ते,शाळा दुरुस्तीचे काम,पालकमंत्री पांदन रस्ते,भोगावती नदीवरील सिमेंट बंधारे,पाण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असलेले पेयजल योजना,प्राथमिक आरोग्य उपकेंद्र दुरुस्ती व सुशोभीकरण,,एकूण अंदाजे रक्कम 3 कोटी 40 लाख रुपयांचे विविध कामे प्रत्यक्षपणे सुरुवात करण्यात आली,यावेळी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रामभाऊ जाधव ,माजी कृषी सभापती दिनकर बापू देशमुख, साखरखेडा चे माजी सरपंच कमळाकर गवई,ग्राम सचिव अर्जुन गवई,सरपंच विनोद खरात,पत्रकार सचिन खंडारे,पोलीस पाटील मदन हाडे,रमेश पागोरे केशव बंगाळे,भगवान बंगाळे पाटील,बद्री वायाळ, गजानन खरात ग्रा. प . सदस्य,प्रल्हाद मोरे,सखाराम खरात, अशोक खंडागळे, पंढरी आटोळे,मधुकर गावडे, खरात,सोपान खरात, पंजाबराव हाडे,शिवदास खरात,यशवंतराव खंडारे ‘ भगवान गवई,अच्यूतराव खरात मास्तर हे मान्यवर यावेळी सुरक्षित अंतरावर उभे होते ‘विविध कामे सुरू असल्यामुळे शिंदी गावाची वाटचाल एका आदर्श गावाकडे सुरू झाली आहे ।

ग्रामीण भागात कोरोना चा विळखा शिंदी येथे चार रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह !

0

 

सिंदखेड राजा ( सचिन खंडारे )

दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहेत ग्रामीण भागातही कोरोनाचा विळखा घट्ट बनत चालला असून ‘सिनखेडराजा तालुक्यातील शिंदी येथे चार रुग्ण कोरूना पॉझिटिव्ह आढळून आले आहे .चार दिवसा अगोदर शिंदी येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र मध्ये १०९ नऊ जणांनी कोरोना चाचणी केली होती त्यापैकी चार जणांचे रिपोर्ट हे पॉझिटिव्ह आली आहे ‘त्यामुळे हिंदी येथील जनतेमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून आरोग्य विभागाने तातडीने ज्या व्यक्तीचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत त्यांच्या घरी जाऊन त्या घरच्यांचे स्वॉब तपासणीसाठी न्यावे !जेणेकरून हा संसर्ग आणखी वाढणार नाही ‘लोकांनी तोंडाला माक्स व सॅनिटायझर चा वापर करावा असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर महेंद्रकुमार साळवे यांनी केले आहे ।