Home Blog Page 526

किनगाव येथे अवैद्य वाळुची वाहतुक करणारे डंपर पकडण्यास गेलेल्या पथकास धक्काबुक्की व मोटर वाहनाने ठार मारण्याचा प्रयत्न

0

 

,यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे ,

तालुक्यातील किनगाव गावाजवळ अवैद्य गौण खनिज वाहतुक करणाऱ्या डंपर व एका कारद्वारे कारवाई करणाऱ्या महसुल पथकास जिवे ठार मारण्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडली असुन , तालुक्यात महसुल वरील पथकावर हल्ला करण्याची ही दुसरी घटना असुन , या घटनेमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे . दरम्यान या घटने बाबत पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . या संदर्भात पोलीस सुत्रांकडुन मिळालेली माहीती अशी की दिनांक २८ फेब्रुवारी रोजी रात्री ९ , ४० वाजेच्या सुमारास किनगाव येथे कार्यरत असलेले मंडळ अधिकारी सचिन तुळाशीराम जगताप किनगाव तलाठी टेमरसिंग छतरसिंग बारेला , विलास भिकाजी नागरे , राजु काशीनाथ घोरटे, गणेश रमेश वऱ्हाडे , विजय साळवे , निखील वैजनाथ मिसाळ या पथकासह तहसीलदार महेश पवार यांच्या आदेशान्वये आपले कर्तव्य बजावत असतांना जळगाव हुन किनगावच्या दिशेने येणारे डंपर वाहन क्रमांक एमएच १२ एफ झेड८४ २५या वाहनास चौकशी कामी थांबविण्याचे प्रयत्न केले असता सदर डंपर चालकाने वाहन न थांबवा सरळ वाहन हे किनगाव गावात नेले आम्ही आमच्याकडील वाहनाने त्यांचा पाठलाग केला असता सदरचे डंपर हे गावातील मस्जिद जवळ गर्दीच्या ठिकाणी थांबले असता आम्ही डंपर चालकास त्याचे नांव विचारले असता त्यांने आपले नाव गपेश संजय कोळी रा . कोळन्हावी ता यावल असे सांगीतले , याच वेळी त्या ठीकाणी टाटा इंडीका ही मोटर वाहनक्रमांक एमएच १९ एपी४१२८ही आली व यातील गोपाळ प्रल्हाद सोळुंखे, संदीप आधार सोळुंखे , छगन कोळी व गोपाळ कोळी हे त्यात बसले होते यातील गोपाळ कोळी हा गाडीतुन उतरल्यावर त्यांने मंडळ अधिकारी सचिन जगताप यांच्याशी हुज्जत घातुन तुम्हाला डंपर पकडण्याचा अधिकारी नाही असे बोलुन वाद घातला व शासकीय कामात अडथळा निर्माण करून मंडळ अधिकारी यांना धक्काबुकी करून छातीवर बुक्का मारला यानंतर गावातील मंडळीची वाढती संख्या पाहुन टाटा कार घेवुन त्यांनी पळ काढला , त्यानंतर पंचनामा करून सदरचे डंपर यावल कडे आणत असतांना पुन्हा डंपर चालकाने वाहन साकळी जवळच्या भोनक नदीच्या दिशेने पळविण्याचा प्रयत्न केला असता सदर कारही चालक गोपाळ प्रल्हाद सोळुंखे यांने महसुल पथक हे कारवाई करीत असतांना कार त्या पथकाच्या दिशेने वेगाने आणुन अधिकारी यांनी जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला . या बाबत यावल पोलीसात संशयीत आरोपीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन, अवैद्य गौण खनिज विनापरवाना वाहतुक करणारे डंपर व टाटा कार यांना जप्त करण्यात आले आहे .

शेतकऱ्याने मानले प्रहार शेतकरी संघटनेचे आभार

0

 

प्रतिनिधी – सचिन पगारे
नांदगांव नाशिक

नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथील विलास लाठे यांच्या शेतातील डी.पी.गेल्या तिन महीन्यापासुन जळालेली होती.त्यांच्या शेतातील कांदे व बाजरी पीकाचे मोठे नुसकान झाले शेतकरी विलास लाठे यांनी संबंधीत वायरमन,सबस्टेशन येथील कर्मचाऱ्यांना कळवले देखील परंतु कोनीही दखल घेतली नाही.शेवटी शेतकऱ्याने शेवटचा पर्याय म्हणुन प्रहार शेतकरी संघटनेकडे धाव घेतली.प्रहार शेतकरी संघटनेने प्रत्यक्ष शेतात जाऊन पहानी करुन महावितन अधिकाऱ्यांशी व संबंधीत ठेकेदारांशी फोनवर चर्चा केली व सांगीतले की शेतकऱ्याचे फार मोठे नुसकान झाले आहे.तरी पुढील नुसकान होऊ नये म्हणुन शेतकऱ्यास त्वरीत डी.पी.देन्यात यावी.
परंतु महावितरणाच्या आधीकाऱ्यांनी व ठेकेदारांनी ऊडवा ऊडविचे ऊत्तरे दीली.
परंतु प्रहार शेतकरी संघटना ही वंदनीय राज्यमंत्री बच्चु भाऊ कडु यांच्या विचारांनी प्रेरीत होऊन चालवलेली संघटना आहे.प्रहार संघटनेने सडेतोड भाषेत सांगीतले की दोन दीवसात शेतकऱ्याला न्याय नाही मिळाल्यास,शेतकऱ्याच्या शेतात डी.पी.नाही बसवल्यास प्रहार शेतकरी संघटना महावितरनाच्या कार्यलयापुढे अर्धनग्न आंदोलन करेल. तरी देखील डी.पी.दिली नाही.
शेवटी आज प्रहार शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष संदीप भाऊ सुर्यवंशी.चंद्रभान झोडगे,रविकांत भागवत,नवनाथ वरपे,शेतकरी विलास लाठे.हे आंदोलनासाठी गेले असता महावितरणाचे संबंधीत अधीकारी वाटपाडे साहेब यांनी सांगीतले की.आंदोलन करु नका तुम्हाला एक तासात डी.पी.देतो.आणि तासाभरात विलास लाठे यांची डी.पी.व ढेकु येथील गावठानची डी.पी.पोहच करन्यात आली.
त्यामुळे आता शेतकऱ्याचे होनारे नुसकान टळले.म्हणुन शेतकऱ्याने मोठ्या मनाने प्रहार शेतकरी संघटनेचे आभार मानले.

 

 

खुमगाव ते दहिगाव शिवरस्ता तसेच शिवारातील इतर शिवरस्ते मोकळे करून मिळण्यासाठी सरपंचाचे तहसीलदार यांना निवेदन

0

 

नांदुरा (प्रफुल्ल बिचारे पाटिल )

खूमगाव( ता.नांदुरा )येथील नवनिर्वाचित ग्रामपंचायत कार्यकारणीच्या वतीने आज दिनांक १ मार्च २०२१ रोजी तहसील कार्यालय येथे निवेदन देण्यात आले. खुमगाव ते दाहिगाव शिवरस्ता तसेच खुमगावं शिवारातील इतर शिव रस्त्यावर शेतकर्यांनी अतिक्रमण केले असल्यामुळे शेतकऱ्याना तसेच गावातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सदर शिवरस्ते मोकळे झाल्यास शेतकर्यांच्या शेतात वाहने गेल्यास शेतकर्याना आर्थिक जीवनमान उंचावण्यास मदत होईल तरी आपण या विषयावर जातीने लक्ष देऊन योग्य ती कार्यवाही करून रस्ते मोकळे करावे ही विनंती या आहायचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले. या निवेदनावर सरपंच रोहित सोनोने,उपसरपंच महेंद्र गोळे,सदस्य गजानन सातव,गजानन वावगे,निवृत्ती इंगळे उपस्थित होते.

निमगाव यथे भर स्टॅन्ड वर अवैध धंद्यांना ऊत..

0

 

सुनिल पवार. नांदुरा. ता प्रतिनिधि

गेल्या कित्येक दिवसांपासून निमगाव येथे भर स्टॅंडवर दारूविक्री, वरली मटका, फुल तिथली, गांजा विक्री, अशा कित्येक प्रकारच्या अवैध धंद्यांना चांगलाच उत आला असून धंदे जोमात सुरू आहेत. यामुळे रस्त्यावरून जाताना सामान्य जनतेस व महिलांना त्रास तर होतोच, परंतु शाळेच्या विद्यार्थ्यांना सुद्धा खूप त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे शाळकरी विद्यार्थ्यांनवर सुद्धा या बाबींचा परिणाम होणार असल्याचे नाकारता येत नाही,.
अशा घटनांकडे पोलिसांचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे त्यामुळे सामान्य नागरिक चांगलेच वेठीस धरले जात आहेत. अवैध दारू विक्री मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यामुळे अनेकांचे संसार उध्वस्त होत आहेत. तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जात आहे. अशातच संचारबंदी लागू असताना बस स्टैंड वर अवैध धंद्यांवर लोकांचे समुह पाहायला मिळत आहे त्यामुळे कोरूना च्या आजारांमध्ये वाढ होण्याचे नाकारता येत नाही. एखाद्यावेळेस नांदुरा पोलिस येऊनही कोणतीही कार्यवाही झालेली दिसत नाही.
तरी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन सदरचे चालू असलेले अवैद्य धंदे बंद करावे अशी अपेक्षा जनतेतून होत आहे..

अवैध वाळू उत्खनन जोरात, शासनाच्या नियमाची पायमल्ली.

0

 

(सूर्या मराठी न्यूज ब्यूरो)

वर्धा जिल्हा देवळी तालुक्यातील हिवरा कावरे येथे असलेल्या वाळू घाटात शासनाच्या नियमाची पायमल्ली होन्याचे चित्र दिसुन येत आहे. या वाळू माफियांना काहि राजकीय पक्षाच्या व्यक्तीचा पाठभार असल्याचे चर्चेला उदान आले आहे.

या वाळू घाटावर सर्रास पणे सेक्शन बोर्ड व मोठ मोठ्या जे. सी. बी आणी पोकलँन्ड मशिनिच्या सहाय्याने वाळू उपसा सुरु असुन शासनाच्या नियमाची पायमल्ली करन्यात येत आहे आणि नदिला थड्याचे स्वरुपात बदलवन्यात येत असल्याचे चित्र या छायाचित्राद्वारे समजते. वाळु माफियांकडून सर्रास वाळूचा उपसा सुरु असून दिवसरात्र वाळूचे उत्खनन सुरु आहे. मात्र, याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत असून वाळू माफिया आणि अधिकार्यांचे साटेलोट असल्याची ओरड नागरिकांतून होत आहे.

नदी सुखल्याने पोकलेन, जेसीबी तसेच ईलेक्ट्रिक बोटीच्या सहाय्याने वाळूचा उपसा करू नये, असे स्पष्ट आदेश न्यायालयाचे असतानासुध्दा या मशिनीद्वारे
वाळूचा अवैध उपसा केल्या जात आहे. यावर जिल्हा खनीकर्म विभागातील अधिकारी, कर्मचार्यांनी कारवाई करणे गरजेचे आहे पण ते सध्या कुंभकर्णी झोपेत
असल्याचे दिसून येत आहे. देवळी तालुक्यातील वर्धा नदीपात्रातून दिवसरात्र अवैध वाळू उपसा सुरू आहे. मात्र याकडे संबंधीत विभागाचे सपशेल दुर्लक्ष असल्याचे चित्र दिसून येत आहे.

येथील काहि रेत घाट सार्वजनीक बांधकाम विभाग वर्धा याच्या साठी राखिव करन्यात आलेले आहे परंतु त्या राखीव घाटाच्या नावांर हे वाळू माफिया चोरट्या मार्गाने रात्रदिवस शासनाचे महसुल बुडवन्यात मग्न आहे. शासनाने सबंधितांवर योग्य कारवाई करन्याचि मागनी होत आहे.

येथील संबधित घाटावंर शासनाकडून सि. सि. टि. व्हि कँमेरे लावन्यात व्यावे

संत शिरोमणी रोहिदास महाराज जयंती जातेगांव येथे उत्साहात साजरी

0

 

प्रतिनिधी ,सचिन पगारे
नांदगांव नाशिक

दि. २७ रोजी नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथे चर्मकार समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी रोहिदास महाराज यांचा ६४४ वा जयंती उत्सव साजरी करण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतर ठेवून हा जयंती उत्सव साजरी करण्यात आला.
समाजातील जाती-पाती,गरीब -श्रीमंती सारखे भेदभाव दूर करून समाजाला मानवतेची शिकवण देणारे महान संत शिरोमणी रोहिदास आहेत.या महान संतास उत्तर भारतात संत रविदास तर आपल्या महाराष्ट्रात त्यांना संत रोहिदास म्हणून ओळखले जाते. शिखांच्या गुरूग्रंथसाहेब या पवित्रग्रंथात संत रोहिदासांचे एकूण ४० पदे आहेत.तसेच या मानवतावादी संताचे विचार अनेक समकालीन संतांनी समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहचविले.अशा महान संत शिरोमणी रोहिदास महाराज यांचे मानवतावादी विचार समाजातील प्रत्येक नागरिकांनी आत्मसात करणे काळाची खरी गरज आहे.दि.२७ रोजी तालूक्यातील घाटमाथ्यावरील जातेगांव येथे संत शिरोमणी रोहिदास महाराज यांची ६४४ वी जयंती कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतर ठेवून आनंदमयी वातावरणात साजरी करण्यात आली. चर्मकार समाजासह तमाम ग्रामस्थांनी संत शिरोमणी रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले.यावेळी नवनियुक्त ग्रामपंचायत उपसरपंच पंढरीनाथ वर्पे,ग्रामपंचायत सदस्या पूजा सोमनाथ जाधव ,माजी सरपंच अशोक जाधव,चर्मकार समाजाचे तालूका सचिव राजेंद्र जोनवाल,उत्सव समितीचे अध्यक्ष विलास जोनवाल,उपाध्यक्ष सोमनाथ जाधव, यांनी प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून प्रतिमेचे पूजन केले.सदर जयंती उत्सवासाठी शंकर जोनवाल,दिपक जोनवाल, भागीनाथ पवार, प्रकाश जोनवाल, मोहन जोनवाल, कैलास जोनवाल, शिवलाल रमणे, रतन साळुंके,सुनिल जाधव,अनिल जाधव,सोनू जोनवाल, विजय जोनवाल,संतोष जाधव, ज्ञानेश्वर जाधव, किशोर जाधव,बाबूलाल जोनवाल आदींसह तमाम समाज बांधवांनी विशेष परिश्रम घेतले.

कोरपावलीत दोन वर्षांपासून बंद असलेल्या कृपानलिकेचे काम वेगाने

0

 

प्रतिनिधी यावल ,विकी वानखेडे

गावात सुरवातीलाच सार्वजनिक पाणी पुरवठा सुरळीत होणार असून पिण्याचा पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मोठया वेगाने काम सुरू करण्यात आले आहे येथील ग्रामपंचयेत कार्यालयाला शतसांच्या वतीने गावाच्या सर्वांगीण विकासासाठी 15 वित्त आयोगाकडून 2020 ते 2021 या कालावधीत एकूण त्रेपन्न लाख अठ्यांन्नू हजार सातशे तेहत्तीस रुपये मंजूर झालेले आहेत,
गावातील रस्त्यांवर फेव्हर ब्लॉक बसविणे, प्राथमिक शाळेतील नवीन गेट बसविणे, कब्रस्तान शेड तयार करणे, तडवी समाजासाठी सार्वजनिक उवयोगासाठी भांडी वस्तू खरेदी करणे, ग्राम पंचायत कार्यालयात सायचालय बंधने,, सबमर्सिबल पम्प सार्वजनिक पाणी पुरवठा साठी साहीत्य खरेदी करणे, घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प राबविणे,, यासारखी अनेक मंजूर करण्यात आलेल्या कामांची रक्कम म्हणजे 2970500 रुपये रक्कम ग्राम पंचायतिकडे वर्ग झालेली असून पुढील विकास कामांना सुरुवात करण्यात आलेली आहे, यात सरपंच यांच्या सह सम्पूर्ण सदस्य चे सहकार्य लाभत असल्याची माहिती देण्यात आली आहे,

शेतात जखमी असलेल्या माकडाला सत्यजित थिगळे या युवकांनी दिले जीवनदान ।

0

 

सिंदखेडराजा ( सचिन खंडारे )

माणूस माणसाला ओळखत नाही अशी अवस्था सध्या निर्माण झालेली असताना ,प्रेम, भूतदया ,माया ,ममता हे शब्द दुर्मिळ झालेली असतानाकाही ठिकाणी मात्र आजही मुक्या प्राण्यांना जनावरांना त्याला पाणी पाजले जाते त्याला खाऊ घातले जाते .व अजूनही माणुसकी जिवंत आहे हे पांगरी काटे येथील युवकांनी दाखवून दिली आहे ‘
सिंदखेडराजा तालुक्यातील पांग्री काटे येथील युवक सत्यजित थिंगळे हा शेतामध्ये फेरफटका मारायला रस्त्याने जात असताना .एक माकड जखमी अवस्थेमध्ये रस्त्यावर बसलेले दिसले ‘ एरव्ही माणसे दिसली तर माकडे झाडावर पटकन चढतात किंवा पळून जातात ।परंतु जवळ गेल्यानंतर ही माकड जागचे हलले नाही तेव्हा सत्यजित थिगळे याने क्षणाचाही विलंब न करता विहिरीतून पाणी आणून त्या माकडाला पाजले व जीवनदान दिले ‘व भूतदया याचा प्रत्यय आणून दिला ।मुक्या प्राण्यांना जीवनदान देणारे युवक अजूनही आहेत हेच सत्यजित यांनी दाखवून दिली आहे सत्यजित याने माकडाला जिवनदान दिल्या ने त्याचे कौतुक होत आहे ‘

‎विवेकानंद आश्रमाचा वटवृक्ष सर्वघटकांच्या उन्नतीचा – राज्याचे मा. मुख्य सचिव श्री. जे.पी. डांगे साहेब

0

 

(दि.26 फेब्रुवारी 2021) विवेकानंद आश्रम ही प.पू.शुकदास महाराजांनी बिजारोपण केलेल्या सेवेचा वटवृक्ष असून हा वटवृक्ष समाजाच्या सर्व घटकांचे प्रतिनिधीत्व करतो. संस्थेव्दारा सुरू असलेल्या कार्याचे अवलोकन केले असता समाजातील सर्व घटकांच्या उन्नतीचे व न्याय देण्याचे कार्य या ठिकाणी सुरू असल्याचे उदगार महाराष्ट्राचे माजी मुख्य सचिव व राज्याच्या प्रवेश नियामक मंडळाचे अध्यक्ष जे.पी. डांगे यांनी विवेकानंद आश्रमाच्या कृषि महाविद्यालय व कृषि व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाच्या भेटी प्रसंगी काढले.
महाविद्यालयात आगमन होताच प्राचार्यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. विविध विषयांच्या प्रयोगशाळा, ग्रंथालय व विद्यार्थी प्रवेशांसंबंधीची सर्व माहिती त्यांनी जाणून घेतली. महाविद्यालयाकडून दिले जाणारे दर्जेदार शिक्षण व कौशल्यप्राप्त विद्यार्थी निर्माण होण्यासाठी केले जात असलेले प्रयत्न अधिक गतीने सुरू ठेवण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. आश्रमाच्या हरिहरतीर्थावरील गोशाळा, गांडुळखत निर्मिती प्रकल्प, शिवउद्यान तसेच कोराडी जलाशयातील विवेकानंद स्मारकाला सुध्दा त्यांनी भेट दिली. ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थ्याला शहरीभागात व विद्यापीठ स्तरावर दिल्या जाणाऱ्या शिक्षणाच्या सर्व सोयी प्रत्येक महाविद्यालयाने आपल्या पातळीवर दिल्यास जास्तीत जास्त विद्यार्थी स्पर्धेत टिकू शकतील अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. संस्थेव्दारे निर्माण केलेले मुलींचे वसतिगृह ही दुर्गम भागातील व गरीब कुटुंबातील मुलींसाठी मिळालेली मोठी संधी आहे. मुलींच्या शिक्षणासाठी महापुरूषांनी अतोनात प्रयत्न केलेत. आजही ग्रामीण भागातील मुलींना केवळ सोय नसल्यामुळे शिक्षणापासून वंचीत राहावे लागत आहे. मुलींच्या शिक्षणासाठी सर्वदूर प्रयत्न व्हावेत असेही मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. विवेकानंद आश्रमासारख्या धर्मदाय संस्था या प्रकारच्या शिक्षणविषयक सुविधा निर्माण करून मुलींना न्याय देण्याचे काम करीत आहेत. यावेळी त्यांनी प.पू.महाराजश्रींसोबतच्या जुन्या आठवणींनाही उजाळा दिला.
याप्रसंगी विवेकानंद आश्रमाचे अध्यक्ष आर.बी.मालपाणी, उपाध्यक्ष अशोक थोरहाते, सचिव संतोष गोरे, सहसचिव आत्मानंद थोरहाते, सेवानिवृत्त कमिशनर बी.बी.धांडे, विश्‍वस्त दादासाहेब मानघाले, पुरूषोत्तम आकोटकर, प्राचार्य डॉ.सुभाष कालवे, प्राचार्य डॉ.सुधाकर चांगाडे तसेच दोन्ही महाविद्यालयाचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.

समाधान काकड यांना समाजभूषण पुरस्कार प्रदान !

0

 

सिंदखेड राजा (सचिन खंडारे )

सिंदखेडराजा तालुक्यातील दरेगाव येथील नेहमी समाज कार्यामध्ये अग्रेसर असणारे युवा सामाजिक
कार्यकर्ते ‘समाधान काकड,यांना औरंगाबाद येथे झालेल्या वंजारी समाज मेळाव्यामध्ये सामाजिक कार्य केल्याबद्दल समाज भूषण .पुरस्कार प्रदान करण्यात आला ‘श्री संत भगवान बाबा महाशक्ती सेवा संस्था ‘व श्री संत वामनभाऊ महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त ‘दिनांक 19 फेब्रुवारी रोजी औरंगाबाद येथे आयोजित वंजारी समाज मेळाव्यामध्ये .संस्थापक अध्यक्ष अंकुशराव सानप भगवान बाबा महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष ‘व महिला अध्यक्ष विद्याताई घुगे .या मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला ‘पुरस्कार मिळाल्यानंतर आपण सर्व वंजारी समाजाला शैक्षणिक व आर्थिक दृष्ट्या प्रबळ व सक्षम करू तसेच जोमाने कामाला लागू अशी भावना यावेळी समाज भूषण समाधान काकडे यांनी व्यक्त केली आहे ‘