Home Blog Page 528

अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांच्या चित्रपटांच शूटींग होऊ देणार नाही-नाना पटोले यांचा इशारा

0

 

गोंदिया-शैलेश राजनकर

भंडारा,दि.18ः “अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांचे चित्रपट महाराष्ट्रात चालू देणार नाही, असं वक्तव्य महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे. भंडारा येथे काँग्रेसच्या मोर्च्यात सहभागी झाल्यानंतर बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. नरेंद्र मोदी सरकारनं आलेल्या नवीन शेती कायद्यांविरोधात भंडारा येथे काँग्रेसच्या वतीने काढलेल्या आंदोलनात पटोले सहभागी झाले होते.पुढे बोलताना ते म्हणाले, मनमोहन सिंग सरकारच्या काळात टिवटिव करत होते. तसंच त्यांनी आता मोदी सरकारच्या काळातील अन्याय अत्याचाराविरोधात आपली भूमिका मांडावी आणि नाही मांडली तर त्यांचे सिनेमा महाराष्ट्रात बंद पाडू.

सुनगाव येथे गोराळा धरणाजवळ ट्रॅक्टर ट्रॉली पलटी

0

 

गजानन सोनटक्के जळगाव जा

जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव येथून जवळ असलेल्या गोराळा धरणा नजीक गारपेट येथून लग्नसमारंभ आटोपून येत असताना आदिवासी समाजातील लोकांनी भरलेली ट्रॅक्टर ट्रॉली ने गोरक्षनाथ येथे जात होते धरण परिसरातील नाल्याजवळ ट्रॅक्टर ट्रॉली पलटी होऊन अनेक जणांना गंभीर दुखापत झालेली आहे ही वार्ता समजतात परिसरातील व गावातील लोक घटनास्थळी धावून गेले व जखमींना मदत केली व काही समाजसेवकांनी 108 या नंबरवर कॉल करून त्वरित अँबुलन्स बोलावल्या व जखमींना शासकीय रुग्णालय जळगाव येथे हलविण्यात आले आहे व नंतर जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे आडे साहेब व पोलीस कर्मचारी व सुनगाव येथील पोलीस पाटील तडवी यांनी गावकर्यांच्यायां मदतीने ट्रॅक्टरची ट्रॉली पूर्ववत सरळ करण्यात आली या घटनेनेत सुदैवाने मोठी हानी झालेले नाही दहा ते पंधरा जण या घटनेमध्ये जखमी झालेले आहेत त्यांना शासकीय रुग्णालय जळगाव जामोद येथे उपचार चालू आहे

कोवीड- १९ च्या प्रतिबंधासाठी मार्गदर्शक सूचनांची यशस्वी अंमलबजावणी करण्याचे जिल्हाधिकारी यांचे निर्देश

0

 

औरंगाबाद दि.१७- राज्यातील कोविड-19 रुग्णामध्ये पुनश्चः वाढ होऊन मृत्युदरात देखील भर पडत आहे.या पार्श्वभूमीवर कोविड-19 नियंत्रणाची कार्यवाही जनतेच्या सहभागातून आवश्यक आहे.यासाठी राज्य शासनाच्‍या सुचनेनुसार औरंगाबाद जिल्ह्यात कोवीड-१९ नियंत्रण व प्रतिबंधक उपाययोजना गांभीर्यपूर्वक व काटेकोरपणे राबविणे करीता आवश्यक सर्व विभागस्तरावरून एकात्मिक पणे कार्यवाही करणे अपेक्षित आहे.
याबाबत सर्व खबरदारी व प्रतिबंधक उपाययोजनासाठी शासन स्तरावरून आवश्यक ती उपाययोजना राबविण्याचे आदेश शासनस्‍तरावरुन देण्‍यात आले आहेत. तसेच विभागीय आयुक्त औरंगाबाद यांनी जिल्‍हयात याबाबत विशेष दक्षता घेऊन सतर्कपणे कार्यवाही करण्याच्या सक्त सूचना दिल्या आहेत.
सदर कार्यवाही आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 व साथरोग अधिनियम 1897 कायदा अंतर्गत असल्याने जिल्ह्यात शासनाच्या मार्गदर्शक सूचनांची यशस्वी अंमलबजावणी करण्यासाठी खालील प्रमाणे तात्काळ कार्यवाही करावी असे जिल्हाधिकारी यांनी परिपत्रकाद्वारे निर्देशित केले आहे.
1) महानगरपालिका आयुक्त,उपविभागिय अधिकारी,तहसिलदार,मुख्य अधिकारी(न.प)यांनी त्यांच्या अधिकार क्षेत्रातील सर्व मंगल कार्यालये,कोचिंग क्लासेस,सर्व शाळा विद्यालये,महाविद्यालये ,बँक्वेट हॉल,हॉटेल्स,रेस्टॉरंट,नाट्यगृहे,चित्रपटगृहे,व्यायामशाळा,शॉपिंग मॉल्स,धार्मिकस्थळे,उद्याने,व इतर गर्दी होणारी ठिकाणी यास वेळोवेळी अचानक भेट देऊन तपासणी करावी. जास्त संख्येत लोक उपस्थित असतील,उपस्थित लोकांनी मास्क लावले नसतील, सॅनिटायझरची उचित व्यवस्था नसेल तर त्यांना प्रथम वेळी नोटीस देऊन उचित दंड आकारावा. याबाबत नोटीस देऊनही सुधारणा झाली नाही तर गुन्हा दाखल करण्यात येईल.असा स्पष्ट उल्लेख नोटीस मध्ये करावा. सूचना देऊनही अशीच परिस्थिती राहिली तर संबंधित आस्‍थापनांवर गुन्हा दाखल करणे किंवा 15 दिवसाची सील करण्याची कार्यवाही करावी.
2) भाजी मंडई,सर्व दुकानदार,अशा लोकांच्या ठराविक अंतराने नियामित कोरोना चाचण्या करण्यात याव्यात.
3) सर्व राजकीय पक्षांना राजकीय कार्यक्रम मेळावे घेताना शासनाने ठरवून दिलेल्या (SOP)प्रमाणेच कार्यवाही करणे बंधनकारक असेल.
4) सार्वजनिक ठिकाणी मास्क न लावल्यास त्याव्यक्तीस रु.500/-(रुपये पाचशे) दंड आकारावा. ज्या परिसरात कोरोनाचा रुग्ण सापडला असेल त्या ठिकाणी मायक्रोसिलिंग करावे. रुग्णाच्या कुटूंबातील रहिवास असलेल्‍या सर्वांची कोविड-19 तपासणी करण्याबाबत अनिवार्य करावे.
5) आपत्ती व्यवस्थापन,मदत व पुनर्वसन, मंत्रालय मुंबई, जागतिक आरोग्य संघटना(WHO) केंद्र व राज्‍य शासनाच्या आरोग्य विभागा मार्फत वेळोवेळी निर्गमित होणा-या मार्गदर्शक सूचनाचे पालन करावे.
6) जिल्ह्यातील जिल्हा शल्य चिकित्सक,जिल्हा आरोग्य अधिकारी,आरोग्य अधिकारी म.न.पा.यांनी अध्यक्ष इंडियन मेडिकल असोसिएशन यांचे समवेत सर्व खाजगी प्रॅक्टीस करणाऱ्या डॉक्टरांची बैठक आयोजित करून ज्या रुग्णांना सर्दी, ताप, खोकला अशी कोविड सदृष्य लक्षणे असतील व त्यांना असे वाटत असेल की रुग्णाला कोविड-19 रोगाची प्राथमिक लक्षणे दिसत असतील तर त्यांनी अशा रुग्णांना कोविड-19 ची टेस्ट करून घेण्यासंबंधीच्या सूचना द्याव्यात. तसेच जिल्ह्यात उपलब्ध असलेले सर्व व्हेंटीलेटर्स सुस्थितीत आहेत किंवा कसे याची खात्री करून घ्यावी. कोव्हीड -19 बाबत रुग्ण संख्या वाढीचा धोका लक्षात घेता RTPCR चाचणी करून घेणे रुग्ण संख्येच्या प्रमाणात वाढवण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी.
तसेच जिल्ह्यात सर्वत्र कोवीड-19चा फैलाव होणार नाही याची दक्षता घेण्यासाठी सोशलडिस्टन्सीग, सॅनिटायझरचा वापर, मास्कचा वापर, अनावश्यक गर्दी टाळणे, इत्यादी नियमांचे कटाक्षाने पालन करावे.सर्व इन्सीडंट कमांडर यांनी त्यांचे अधिनस्थ असलेल्या DCH,DCHC,CCC सेंटर मधील कोविड-19च्या अनुषंगाने उपलब्ध झालेली साधन सामुग्री व व्हेंटीलेटर्स सुस्थितीत असल्याची खात्री करावी. उपरोक्त सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे,असे जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष , जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण औरंगाबाद यांनी परिपत्रकाद्वारे निर्देशित केले आहे.

*****

जिल्ह्यात संचारबंदीचे आदेश पारीत; पाचपेक्षा जास्त लोकांनी एकत्र जमू नये • सोशल डिस्टसिंग व मास्कचा वापर बंधनकारक • जिल्हाधिकारी एस रामामूर्ती यांनी स्वत: केली कारवाई

0

 

लग्न समारंभासाठी 50
व्यक्तींनाच परवानगी

अजहर शाह मोताळा प्रतिनिधी

बुलडाणा:-दि. 17 : जिल्ह्यात 1 ते 15 फेब्रुवारी कालावधीत कोविडचे 971 रूग्ण आढळून आले असून आज सर्वाधिक म्हणजे 199 कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहे. यावरून जिल्ह्यात कोविड आजारामुळे बाधीत रूग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाय योजना लागू करणे गरजेचे आहे. जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात संचारबंदीचा आदेश जारी केला आहे. संचारबंदीचे आदेश पारीत होताच जिल्हाधिकारी एस रामामूर्ती यांनी स्वत: रस्त्यावर येत कारवाई केली.
आदेशानुसार शहर व जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागाकरिता संचारबंदी असणार आहे. आदेशान्वये शहरी व ग्रामीण भागामध्ये पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोकांनी, जमावाने एकत्र येण्यास बंदी करण्यात आली आहे. सर्व प्रकारच्या वेळोवेळी आयोजित करण्यात येणाऱ्या धार्मिक स्वरुपाच्या यात्रा, उत्सव, समारंभ, महोत्सव, स्नेहसंमेलने कार्यक्रम, सभा, बैठका यासाठी केवळ 50 व्यक्तिंनाच परवानगी असेल. मिरवणूक व रॅली काढण्यासही प्रतिबंध करण्यात आला आहे. या बाबत स्थानिक प्रशासन व पोलीस विभागामार्फत आवश्यक कार्यवाही करण्यात येणार आहे.
लग्नसमारंभाकरिता केवळ 50 व्यक्तींनाच उपस्थिरत राहता येणार आहे. या समारंभामध्ये सर्वांनी मास्क वापरणे बंधनकारक आहे. लग्नसमारंभाकरिता रात्री दहा वाजेपर्यंतच परवानगी अनुज्ञेय असेल. या बाबत स्थानिक प्रशासन व पोलीस विभाग आवश्यक ती कार्यवाही करणार आहे. मर्यादेपेक्षा जास्त व्यक्ती दिसून आल्यास आयोजक व मंगल कार्यालय, बॅंक्वेट हॉल, लॉन मालक यांचेवर योग्य कारवाई करण्यात येणार आहे.
लग्न समारंभाच्या नियोजित स्थळाव्यतिरिक्त इतर ठिकाणी गर्दी होणार नाही याची खबरदारी घेण्यात यावी. हॉटेल, पानटपरी, चहाची टपरी, चौपाटी सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर व सोशल डिस्टसिंगचे नियम पाळणे बंधनकारक राहील. या ठिकाणी नागरीकांची गर्दी होत असल्याचे आढळुन आल्यास स्थानिक प्रशासनाकडून नियंत्रणासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येणार आहे. त्याच प्रमाणे नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळुन आल्यास संबंधित व्यावसायिक, दुकानदार यांचेवर कारवाई करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व धार्मिक संस्था, स्थळे यांनी त्यांच्या धार्मिक संस्थानामध्ये, कार्यक्रमांमध्ये गर्दी होणार नाही, या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. तसेच सोशल डिस्टसिंग व मास्कचा वापर बंधनकारक राहील, याची खबरदारी घ्यावी. जिल्ह्यातील सर्व बाजारपेठांमध्ये नागरीकांची गर्दी होणार नाही या बाबत स्थानिक प्रशासन (नगरपरिषद/नगर पंचायत /ग्राम पंचायत) यांनी दक्षता घेवून व आवश्यक पथकाचे गठन करुन प्रतिबंधात्मक उपाययोजना करणार आहे. जिल्ह्यामधील इयत्ता 5 वी ते 9 वी पर्यंत असलेल्या सर्व शाळा तसेच सर्व महाविद्यालये, सर्व प्रकारची खाजगी शैक्षणिक प्रशिक्षण केन्द्र, खाजगी शिकवणी वर्ग, कोचिंग क्लासेस दि. 28 फेब्रुवारी पर्यंत बंद ठेवण्यात आले आहेत.
या कालावधीत ऑनलाईन/ दुरस्थ शिक्षण यांना परवानगी राहील. खाजगी आस्थापना, दुकाने या ठिकाणी मास्क , फेस कव्हर असलेल्या व्यक्तींनाच प्रवेश देण्यात यावा. तसेच हॉटेलमध्ये सुद्धा मास्कचा वापर करणे बंधनकारक राहील. या बाबत दर्शनी भागात बॅनर / फलक लावणे बंधनकारक असेल. नियमांचे उल्लंघन केले असल्याचे आढळुन आल्यास स्थानिक प्रशासन दंडात्मक कार्यवाही करेल. हॉटलमध्ये तसेच बाहेरील आवारात पार्किंगसाठी गर्दी होणार नाही या बाबत योग्य व्यवस्थापन सुनिश्चित करण्यात यावे. रांगा व्यवस्थापित करण्यासाठी व सामाजिक अंतर सुनिश्चित करण्यासाठी विशिष्ट खुणा करण्यात याव्यात. तसेच दर्शनी भागात फलक लावण्यात यावा. अतिथी, ग्राहकांनी वापरलेले फेस कव्हर्स, मास्क, हातमोजे यांची संबंधीतांनी योग्य प्रकारे विल्हेवाट लावण्यात यावी.
यापूर्वी कोविड-19 चा प्रादुर्भाव फैलाव होवू नये, या करिता वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेले आदेशांचे उल्लंघन होणार नाही या बाबत आवश्यक दक्षता घेण्यात यावी. जिल्ह्या तील सर्व आठवडी बाजार दुपारी 4 वाजेनंतर बंद ठेवण्यात येणार आहे. सदर आदेशाचे उल्लंघन केल्यास ही बाब साथरोग प्रतिबंधात्मक कायदा, भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188, आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 51 ते 60 तरतुदीनुसार शिक्षेस पात्र असणार आहे. सदर आदेश 28 फेब्रुवारी 2021 पर्यंत लागू असणार आहे, असे जिल्हादंडाधिकारी एस रामामूर्ती यांनी कळविले आहे.

आडगावराजा ग्रामपंचायतला तालुका स्तरीय सुंदर गांव पुरस्कार प्रदाण स्व. आर आर पाटील आबा यांच्या पुण्यतीथी दिनी पुरस्कारांचे सिईओ च्या हस्ते वितरण ।

0

 

 

सिंदखेडराजा ( सचिन खंडारे )

सिंदखेडराजा / दिनांक १७/२/२०२१
मातृतीर्थ सिंदखेडराजा तालुक्यात असलेल्या राजे लखुजीराव जाधव यांचे पुञ अचलोजी राजे जाधव यांचे गांव आडगावराजा या गावाला स्व.आर.आर.पाटील आबा तालुकास्तरीय सुंदर गाव पुरस्कार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते यांच्या हस्ते सरपंच सौ.कासाबाई मानसिंग कहाळे व ग्रामसेवक अशोक ठाकरे यांना देण्यात आला.
राज्य शासनाने स्व आर.आर.पाटील यांच्या नावाने सुंदर गाव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.यानुसार या स्पर्धेत भाग घेतलेल्या गावाची तपासणी करण्यात आली .यामधे आडगावराजा गावाला तालुक्यात प्रथम क्रमांक प्राप्त झाला होता. आडगावराजा हे गाव चुलमुक्त, हगणदरीमुक्त, पर्यावरणमुक्त , स्वच्छ सुंदर गाव यासह अनेक ऊपक्रम गावकरी मंडळी व ग्रामपंचायतच्या सहकार्याने राबवीले आहेत .या ऊपक्रमामधे गावातील बचत गट व गावस्तरावरील सर्व च तलाठी ,आरोग्य सेवक , कृषी सहाय्यक, पोलिस पाटील , तंटामुक्त समिती अध्यक्ष तथा सर्व पदाधिकारी.जिल्हा परिषद शाळा. आशा सेवीका अंगणवाडी सेवीका मदतनीस ,वायरमन , रोजगारसेवक आँपरेटर , ग्रामपंचायत कर्मचारी व गावातील सर्व तरुण युवक गावकरी मंडळी यांना सोबत घेत सरपंच सौ.कासाबाई मानसिंग कहाळे, ऊपसरपंच सरस्वती भगवान चव्हाण , तर ग्रामपंचायत सदस्य प्रकाश सोनुने , सुभाष राजे जाधव , गजानन राजे जाधव, अलका मिलींद कहाळे, संगिता सुखदेव काळे , सरिता प्रकाश सोनुने , लक्ष्मीबाई भागाजी डोंगरे , सुमन मधुकर चव्हाण आदी च्या मार्गदर्शनात ग्रमपंचायतीने स्मार्ट गाव होण्यासाठी प्रयत्न केले आणी याच अनुषंगाने आडगावराजाला स्व आर.आर.पाटील आबा सुंदर गाव पुरस्कार जिल्हा परीषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते यांच्या हस्ते सरपंच सौ.कासाबाई मानसिंग कहाळे व ग्रामसेवक अशोक ठाकरे यांनी पुरस्कार स्विकारला.यावेळी जिल्हाधिकारी ए.राममुर्ती , जि.प.अध्यक्षा मनिषाताई पवार, जि.प.ऊपाध्याक्षा कमलताई बुधवत अर्थ व बांधकाम सभापती रियाजखाँ पठाण तर ऊपमुख्यकार्यकारी अधिकारी राजेश लोखंडे आदी मान्यवरांच्या ऊपस्थीतीत पुरस्काराचे वितरण जिल्हा परीषदेच्या शिवाजी सभागृहात दिनांक १६/२/२०२१ रोजी करण्यात आले

राज्यातील संगणक परिचालकांना शासकीय सेवेचा दर्जा मिळावा यासाठी २ २ फेब्रुवारीस संघटनेचे मुंबई आझाद मैदानावर आंदोलन

0

 

यावल ( प्रतिनिधी ),विकी वानखेडे

आपले सरकार सेवा केन्द्र प्रकल्पातील संगणकपरिचालकाना महाराष्ट्र आय टी महामंडळाकडुन कर्मचारी दर्जा देवुन किमान वेतन मिळण्यासाठी महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनाच्या वतीने २२ फेब्रुवारी २o२१ रोजी पासुन मुंबई येथील आझाद मैदानावर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती एका निवेदनाद्वारे यावलचे गटविकास अधिकारी डॉ . निलेश एस . पाटील यांना देण्यात आली आहे . या संदर्भात महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनाच्या माध्यमातुन दिलेल्या म्हटले आहे की , महाराष्ट्र राज्यातील सुमारे २९ हजार ग्रामपंचायती तसेच ३५१ पंचायत समिती व ३४ जिल्हा परिषदच्या कार्यालयामध्ये संग्राम व आपले सरकार सेवा केन्द्राच्या माध्यमातुन राज्यातील तरूण , तरूणी असलेले संगणक परिचालक मागील १oवर्षापासुन काम करत आहेत . राज्यातील सुमारे ६ कोटी ग्रामीण जनतेला शासनाच्या योजना पोहचवुन खऱ्या अर्थाने डिजीटल महाराष्ट्र साकार करण्याचे काम संगणक परिचालकांनी केलेले आहे . शासन प्रशासन यांच्यातील दुवा म्हणुन संगणकपरिचालक काम करीत आहे . त्यामुळे आमच्या कामाची राज्य शासनाने प्रमाणीकपणे दखल घेवुन महाराष्ट्र आयटी महामंडळाकडुन | नियुक्ती देवुन किमान वेतन देण्याची मागणी केली असुन , २९ नोव्हेंबर २०१८ रोजी राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री ना. उद्धव ठाकरे यांनी व राज्याचे उपमुख्यमंत्री ना . अजीतदादा पवार यांनी संगणकपरिचालकांचे प्रश्न सोडविण्याचे आश्वासन मुबंईच्या आझाद मैदानावर दिले होते . या मागील संग्राम प्रकल्पात तर भ्रष्ठाचार झालाच परन्तु दिल्लीच्या सिएससि व एसपीव्ही या कंपनीच्या माध्यमातुन मागील ४ वर्षात सुमारे एकुण३९२ कोटीचा भ्रष्ठाचार व गैरकारभार आणी अनियमियता केली असुन , या सर्व प्रकारा बाबतची तक्रार राज्याचे मुख्यमंत्री ना . उद्धव ठाकरे यांच्याकडे करण्यात आली आहे . दरम्यान शासनाकडुन कंपनीवर कारवाई करण्याऐवजी ३१ मार्च २०२० रोजी या सिएसपी , एसपीवी कंपनीचा करार संपलेला असतांना या कंपनीला नव्याने काम देण्यासाठी कोरोनाचे कारण पुढे करून सिएससि, एसपीवी या कंपनीला नियमबाह्य पद्धतीने मुदतवाढ दिली .ज्या भ्रष्ठ कंपनीलाच पुढील काम द्यायचे असल्याने माननियमंत्री महोदयांनी सिएसपी , एसपीवी याच कंपनीला आपले सरकार सेवा केन्द्र प्रकल्पाचे पुढील काम देण्याचा निर्णय घेतला व संगणक परिचालकांना फक्त १oooहजार रूपये मानधन वाढदिली. म्हणजे आता त्यांना ७००० हजार रुपयेच असेल यात राज्यातील संगणक परिचालकांनी आपल्या कुटुंब कसे चालवयाचे ? असा प्रश्न आहे . तरी राज्य शासनाने आमच्या निवेदनाची गंभीर दखल घेवुन संगणक परिचालकांनांवर अन्याय करणारे ग्राम विकासविभागाने १४ जानेवारी २०२१ रोजी नियमित केलेले आपले सरकार सेवा केन्द्र प्रकल्पासंदर्भातील शासनाने घेतलेले दोन्ही निर्णय रद्द करून राज्यातील सर्व संगणक परिचालकांना शासन कर्मचारीचा दर्जा देवुन राज्यातील अर्थसंकल्पातुन किमान वेतन द्यावे या मागणीसाठी आझाद मैदान मुंबई येथे २२ फेब्रुवारी रोजी संघटनेच्या आंदोलन करण्यात येणार असल्याचे म्हटले असुन , या निवेदनावर जिल्हा अध्यक्ष हर्षल सोनवणे , यावल तालुका अध्यक्ष संजय अरूण तायडे , सचिव सुधाकर धुडकु कोळी , रोनक तडवी , प्रविण तायडे, जावेद तडवी , तनुजा तडवी , पंकज पाटील , अमिन तडवी, कविता पाटील , राजेन्द्र संकोपाळ,कल्पेश कोल्हे यांच्या स्वाक्षरी आहेत .

किनगाव बस स्थानकावर बसथांबत नसल्याने विद्यार्थीनी केला एसटी बसचा घेराव आगार प्रमुखांच्या आश्वसनाने घडवुन आला समेट

0

 

यावल( प्रतिनीधी),विकी वानखेडे

।कोरोना विषाणुसंसर्ग माहामारीच्या पार्श्वभुमीवर संपुर्ण देशभरात लाँकडाऊन सुरू होते खबरदारीचा उपाय म्हणुन राज्यातील शाळा व महाविद्यालय या पुर्णपणे बंद ठेवण्यात आल्या होत्या , मात्र देशात अनलाँकची प्रक्रीया सुरू झाली असून, जनजीवन पुर्वपदावर येत असुन , टप्प्या-टप्प्याने व्यवसाय शासकीय कार्यालय निमशासकीय कार्यालय तसेच बस सेवा सुरू होत आहे . यातच सुमारे आठ महिन्यांच्या कालावधीनंतर बंद असलेल्या शाळा- महाविद्यालय देखील सुरुवात झाली असून पूर्वपदावर येण्याची प्रयत्न करीत आहेत .विद्यार्थ्यांनी शैक्षणीक भविष्याच्या दुष्टीने शाळेत जाण्याच्या तळमळीला आहेत , मात्र यावल आगारातील बस सेवा देणारे काही वाहक आणि चालक पाहिजे त्या प्रमाणात प्रतिसाद देत नसल्यामुळे विद्यार्थ्यांना विनाकारण त्रास होत आहे. यावलआगाराच्या बसेस बऱ्यापैकी रस्त्यावर सुरू झालेल्या असून किनगावहुन साकळी येथे अंजुमन इस्लाम उर्दू हायस्कूल व ज्युनियर कॉलेज या विद्यालयात इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंतच्या ३० मुली व १५ मुले विद्यार्थी हे किनगावहून साकळीला शिक्षणासाठी ये जा करीत असतात या सर्व विद्यार्थ्यांनी किनगाव ते साकळी अश्या पासेस देखील काढल्या असून, दररोज सकाळी ९:३० वाजता हे सर्व विद्यार्थी बस स्थानकावर येतात मात्र यावल आगाराचे काही वाहक व चालक हे किनगाव बस स्थानकावर बस न थांबवता मागे किंवी पुढे बसेस थांबवतात यामुळे विद्यार्थ्यांना पळत जावे लागते तसेच काही बसेस विद्यार्थ्यांना बसवत नाहीत व यामुळे शाळेची वेळही होते कधीकधीतर शाळाच सापळत नाही तसेच दोन दिवसांनपुर्वी एका बसच्या चालकाला विद्यार्थ्यीनींनी विचारले आज बस उशीराने आली त्यावर त्या चालकाने सांगीतले बसची एव्हळावेळ वाट पाहण्यापेक्षा तुम्हाला पायीच शाळेत जाता येत नव्हते का याचाही विद्यार्थीनींना राग होता व म्हणून पालकही मोठ्यासंख्येने आक्रमक होते एकुणच यावल आगाराच्या काही वाहक व चालकांनमुळे आगार प्रमुख शांताराम भालेराव व बस स्थानक प्रमुख संदीप जगन्नांथ अडकमोल हे काही वेळातच किनगावला आले आणी पालक व विद्यार्थी यांच्या तक्रारी समजुन घेत बसेस थांबण्याबाबत व सदर अर्वाच्च उत्तरे देणारा चालक यावर कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले यावेळी सरपंचपती संजय सयाजीराव पाटील किनगाव खु! चे सरपंच भुषण नंदन पाटील उपसरपंच लुकुमान कलंदर तडवी,सचिन नायदे,खलील शे.सुपडू,रविंद्र ठाकूर यांनी यांनीही पालकांना व विद्यार्थ्यांना समज देत आगार प्रमुखांना विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्या बाबत सांगीतले.यावेळी किरण सोनवणे मेहमूद हाजी रूस्तम,अश्पाक
शहा,राजेंन्द्र पाटील,यासीन तडवी,मुक्तार मन्यार,जाहाबीर तडवी,मेहबुब पिंजारी,सबदर तडवी हानिफसर प्राचार्य साकळी व असलम ताहेर मन्यारसर इ.सह विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थीत होते.
अन् संजय पाटील झाले आक्रमक.
यावल आगाराच्या काही वाहक व चालकांनमुळे किनगाव अपडाउन करणाऱ्या विद्यार्थी व विद्यार्थिनींना जो असह्य त्रास सहन करावा लागतो त्यामुळे पालकांचा व नागरिकांचा आमच्यावर रोष आहे व लोकप्रतिनिधी या नात्याने आम्ही आपणाकडे नेहमी ही कैफियत मांडत असतो मात्र आपण याकडे अजिबात लक्ष देत नाही तरी आपण लवकर विद्यार्थ्यांचा अपडाऊन करण्याचा मार्ग सुरळीत करावा अन्यथा आम्ही आंदोलन करू असे सरपंचपती संजय सयाजीराव पाटील यांनी यावेळी आक्रमक होवुन यावल आगाराच्या कारभाऱ्यांना सुनावले .

किनगाव पपई ट्रक पलटी भिषण अपघातातील व्यापारी आणी वाहन चालकास तिन दिवसाची पोलीस कोठडी

0

 

यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे

तालुक्यातील किनगाव येथे काल मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या पपई वाहकतुक करणारा आयशर वाहन पलटी होवुन झालेल्या मन हेलावणाऱ्या अशा भिषण अपघातात १३ मजुरांसह दोन बालकांचा दुदैवी मृत्यु झाल्याची घटना घडली होती , दरम्यान पोलीसांनी या अपघातास कारणीभुत म्हणुन वाहनचालक शेख जहीरोद्दीन शेख बदरूद्दीन राहणार रावेर आणी पपई खरेदी व्यापारी अमीन शाह रज्जाक शाह रा. केऱ्हाळा ता . रावेर यांना आरोपी केले असुन त्यांच्या विरूद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन , आज या दोघांआरोपींना यावल न्यायलयात हजर केले असता त्यांना दिनांक १८ फेब्रुवारीपर्यंत तिन दिवसाची ची पोलीस कोठडी देण्यात आली आहे . या संदर्भात यावल पोलीसांनी पोलीस निरिक्षक सुधीर पाटील यांनी घडलेल्या अपघाता विषयी विविध विभागाकडुन चौकशी अहवाल मागविले असुन , याकामी त्यांना पोलीस कर्मचारी संजय तायडे व त्यांच्या पोलीस सहकारी कर्मचारी कार्य करीत आहे . पोलीसांनी मागविलेल्या तपासकामी अहवाल पुढीलप्रमाणे असुन ,यात वाहनचालक हा वाहनचालवितांना दारूच्या नशेत होता का ? याबाबतचा वैद्यकीय तपासणी अहवाल, वाहनाची कालमर्यादा तपासणी अहवाल , एका मालवाहु वाहनात मजुर बसविण्याची संख्याही किती असावी, सार्वजनिक बांधकाम विभागाकडुन रस्ताच्या संदर्भात अहवाल , जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या कोरोनासंदर्भात नियमांचे क्षमतेपेक्षा अधिक मजुर वाहतुक करून नियमांचे उल्लघन करणे, वाहनात क्षमतेपेक्षा अधिक मालाची वाहतुक करणे , अशा विविध कारणांचा शोध घेण्यासाठी पोलीसांनी उपप्रादेशिक परिवहन विभाग , सार्वजनिक बांधकाम विभाग यावल , आरोग्य तपासणी विभाग , रस्ते सुरक्षा विभाग जळगाव अशा विभागाकडे अहवाल मागविला आहे . या सर्व पार्श्वभुमीवर वाहनाची कालमर्यादा संपली असुन सदरचा वाहन परमीट आणी वाहनचालकाचा परवाना रद्द करण्यासाठी प्रस्ताव संबधीत विभागाकडे सादर करण्यात येणार असल्याचे वृत्त मिळाले आहे . दरम्यान अशा प्रकारच्या वाहनांच्या वाहतुकीची तपासणी करण्याचा अधिकारी हे जिल्हा रस्ता सुरक्षा पथकाची जबाबदारी आहे .अशा प्रकारच्या वाहनांवर या पथका कडून आजपर्यंत किती वाहनांवर कारवाई झाली किंवा काय या पथकाची जबाबदारी काय व कशी याची माहीती अद्याप आजपर्यंत कळालेली नाही . या सर्व गोंधळलेल्या कारभारत जिल्हा रस्ता सुरक्षापथकाची भुमिकाही पारदर्शक दिसुन येत नाही अशी संत्पत प्रतिक्रीया व्यक्त होत आहे . यावल रावेर आणी चोपडा या परिसरात शेकडो कालमर्यादा संपलेली विविध वाहनप्रवासी वाहतुक करीत असुनही बाब रस्ता सुरक्षापथकाच्या निदर्शनाश येत नाही म्हणजे हे नवल म्हणावे लागेल .

आर .आर .आबा पाटील सुंदर गाव स्पर्धेत जळगाव जा तालुक्यातील सुनगाव ने पटकाविला सुंदरगाव होण्याचा पुरस्कार

0

 

गजानन सोनटक्के जळगाव जा

आर आर आबा पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्ताने आज 16 फेब्रुवारी रोजी तालुका सुंदर व जिल्हा सुंदर गाव पुरस्कार योजनेचे बक्षीस वितरण करण्यात आले स्पर्धेच्या पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम जिल्हा परिषदेच्या श्री छत्रपती शिवाजी सभागृह येथे घेण्यात आला यात जिल्ह्यातून पहिला पुरस्कार मोताळा तालुक्यातील माकोडी गावाला मिळाला व जळगाव जामोद तालुक्यातील पहिला पुरस्कार सुनगाव या गावाने पटकाविला या वेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ मनिषा ताई पवार उपाध्यक्ष सौ कमल ताई बुधवत सभापती रियाज खान पठाण जिल्हाधिकारी एस राममूर्ती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती भाग्यश्री विसपुते पंचायत समिती मोताळा सभापती प्रकाश बसी आदी उपस्थित होते जिल्हा परिषद अध्यक्ष मनिषा ताई पवार म्हणाल्या की या स्पर्धेत सहभाग नोंदवत पारितोषिक मिळालेल्या ग्रामपंचायतीपासून अन्य ग्रामपंचायतीने प्रेरणा घ्यावी व पुढील वर्षी आपल्या ग्रामपंचायतला कसे पारितोषिक मिळेल या दृष्टीने काम करावे सन 2019 20 चे उत्कृष्ट कामगिरी केलेले तालुका सुंदर गाव म्हणून जळगाव जा तालुक्यातून सूनगाव या गावाचे प्रथम विजेते म्हणून घोषित करण्यात आले या पुरस्काराचे स्वरूप दहा लाख रुपये असे आहे यावेळी हा पुरस्कार सूनगाव चे सरपंच रामेश्वरभाऊ अंबडकार व गग्रामविकास अधिकारी चौधरीसाहेब यांनी एस राम मूर्ती जिल्हाधिकारी यांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारला सन 2019 20 च्या स्पर्धे मध्ये गावाला जो पुरस्कार मिळाला तो तत्कालीन सरपंच यांच्या कार्यकाळातील कामगिरीबद्दल मिळाला आहे याचे श्रेय येथील माजी सरपंच विजयाताई पुंडलीक पाटील व उपसरपंच व सदस्य गावकरी यांचे आहे यावेळी हा पुरस्कार स्वीकारतांना सूनगाव चे सरपंच रामेश्वर भाऊ अंबडकार ग्रामविकास अधिकारी टी जी चौधरी व पंचायत समिती जळगाव जामोद चे गट विकास अधिकारी भारसाकडे साहेब उपस्थित होते

 

ट्रोल, ड‌िझेल दरवाढीविरोधात महिला राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन

0

 

आयुषी दुबे शेगाँव

शेगावच्या चौकात चूल मांडून तयार केले जेवण

राज्यात पेट्रोल आण‌ि डिझेल दरवाढीविरोधात शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी व इतर पक्षांकडून आंदोलन करण्यात येत आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला आघाडी कडून आज बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव शहरामध्ये भरचौकात चूल मांडून जेवण तयार करून केंद्र सरकारचा दरवाढीविरोधात निषेध व्यक्त करण्यात आला.

राज्यात पेट्रोल आण‌ि डिझेल दरवाढीविरोधात आंदोलन करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला आघाडीच्या वतीने मंगळवारी शेगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये फुल मांडून जेवण तयार करून वितरित करण्यात आले. तर यावेळी गॅस सिलेंडर ला हारार्पण करून त्याला श्रद्धांजलीपर निषेध व्यक्त करण्यात आला. महिला आघाडीच्या राज्य सरचिटणीस सौ नंदाताई पाऊलझगडे यांच्या नेतृत्वात पार पडलेल्या या आंदोलनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते