Home Blog Page 53

सहामास कार्यक्रमात वडिलांना लेकाची वैचारिक आदरांजली(Lonarnews)

0

 

बिबी प्रतिनिधी :-सय्यद जहीर

Lonarnews:लोणार तालुक्यातील चिखला काकड येथील सामाजिक कार्यकर्ते विनायक काकड यांच्या वडिलांचे निधन १७ ऑगस्ट २०२४ रोजी झाले.
त्यांच्या वडिलांची वारकरी संप्रदायावर प्रचंड निष्ठा होती आणि ते तत्वनिष्ठ होते.

जिवंतपणी कधीच कुणाचे वाईट केले नाही मग त्यांच्या मरणानंतर पर्यावरणाला देखील कुठलाचं त्रास नको.
माणूस गेल्यानंतर आपण रक्षा आणि अस्ति व इतर वस्तू नदीमध्ये विसर्जित करतो पण त्याचे विघटन होण्यासाठी बराच काळ लागतो व त्याचा जलचरास त्रास देखील होतो. तोच त्रास टाळण्यासाठी व पर्यावरणाला हानी करणाऱ्या रुढींना थांबवण्यासाठी मुलगा विनायक यांनी एक क्रांतिकारी निर्णय घेतला.

शुभ लाभ नागरी सहकारी पतसंस्था हिंगणघाट हळदीकुंकु कार्यक्रम(Hingnghat)

वडिलांची रक्षा नदीमध्ये विसर्जित न करता आपल्या शेतामध्ये नेऊन त्यावर वृक्षारोपण केले.
जेणेकरून वडिलांची आठवण कायम राहील व हे वृक्ष पर्यावरणास पूरक ठरेल.त्यानंतर वडीलांच्या सहा मास विधी व नैवद्य कार्यक्रमात देखील विनायकने अनोख्या आदर्श पद्धतीने राबविला. स्व.जगन्नाथ काकड हे उत्तम वाचक होते व ते पर्यावरणवादी, पर्यावरणप्रेमी देखील होते त्यांना वृक्षारोपणाची प्रचंड आवड होती.

आज दिवसेंदिवस वाचन चळवळ ही लोप पावत चालली आहे आणि निसर्गाचा देखील ऱ्हास होत चालला आहे.
वाचन चळवळ वृंद्धिगत व्हावी व पर्यावरण रक्षणाचा छोटासा संदेश देण्याचा विनायकने प्रयत्न केला आहे.
वडीलांच्या सहा मास नैवद्य कार्यक्रमात विनायकने कुठलाही अपव्यय खर्च न करता कार्यक्रमासाठी उपस्थित प्रत्येक पाहुणेमंडळी, मित्रपरिवार, आप्तेष्टांना विनायकने पुस्तकं व दुर्मिळ रोपांच्या बिया देऊन वाचनाचे व वृक्षरोपणाचे आवाहन करून वडिलांना अनोखी आदरांजली दिली आहे.
आपली वाचनाची व पर्यावरण संवर्धनाची प्रेरणा हीच माझ्या वडिलांना खरी आदरांजली असेल असेल विनायक काकड यांनी उपस्थितांना संबोधित केले आहे.

विनायक काकड हे उत्तम वक्ता व सामाजिक कार्यकर्ते देखील आहेत. अनेक सामाजिक चळवळीत ते सक्रिय सहभागी असतात.ते सध्या निर्मला निकेतन समाजकार्य महाविद्यालय मुंबई येथे पदवीचे शिक्षण घेत आहेत. विनायकच्या या अनोख्या विचाराने त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Lonarnews:वाचन व पर्यावरण चळवळ ही प्रत्येक व्यक्तीच्या मरणोत्तर राबवावी यासाठी विनायकने समाजामध्ये प्रबोधन करण्याचा निर्धार वडिलांच्या सहामास कार्यक्रमात केला आहे.

शिधापत्रिका धारकांनी ई-केवायसी व मोबाईल सिडींग करावी अन्यथा धान्य होईल बंद.. दिपक बाजड तहसिलदार शेगांव यांचे आवाहन तालुक्यात केले ई-केवायसी कॅम्पचे आयोजन(tahsilnews)

0

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

tahsilnews:शेगांव तालुक्यातील शिधापत्रिका धारक ग्राहकांनी ई-केवायसी करुन घेण्याबाबत चे आव्हाण तहसिलदार दिपक बाजड यांचे माध्यमातून निरीक्षण अधिकारी पुरवठा संतोष बावणे यांनी केले आहे.

अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाअंतर्गत राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजने अंतर्गत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब योजना अंतर्गत पात्र शिधापत्रिकाधारकांना शासकीय धान्याचा लाभ सुरु ठेवण्यासाठी लाभार्थ्यांनी ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

शुभ लाभ नागरी सहकारी पतसंस्था हिंगणघाट हळदीकुंकु कार्यक्रम(Hingnghat)

त्यासाठी दिनांक 06/02/2025 पासून 28/02/2025 पर्यंत विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. कुटुंबातील रेशनकार्ड मध्ये नोंदणी केलेल्या सर्व पात्र लाभार्थ्यांनी स्वतःचे आधारकार्ड व रेशनकार्ड सोबत नेवून आपल्या गावातील स्व् स्त् धान्य दुकानदारांशी संपर्क करुन तात्काळ आपले ई- केवायसी पुर्ण करुन घ्यावे.

केवायसी करण्यासंबधीत लाभार्थी यांनी रास्तभाव दुकानात समक्ष उपस्थित राहून पॉस् मशीनवर बायोमॅट्रीक करावे. ई-केवायसी पुर्ण न केल्यास अन्न धान्याचा लाभ बंद होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

tahsilnews:ई-केवायसी पुर्ण न केल्यामुळे अन्न धान्याचा लाभ बंद झाल्यास त्याची जबाबदारी ही संबधीत लाभाथ्यांची राहील असे आवाहन तहसिलदार शेगांव दिपक बाजड यांचे माध्यमातून निरीक्षण अधिकारी संतोष बावने व पुरवठा निरीक्षक किसन केणे यांनी केले आहे.

बसमध्ये दिव्यांगसाठी सीट आरक्षितच ठेवा विराट मल्टीपर्पज फाउंडेशन ची मागणी(busnews)

0

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

खामगाव () आज दिनांक ०६ फेब्रुवारी रोजी जिल्हा वाहतूक नियंत्रक (ST) जिल्हा बुलढाणा बुलढाणा यांना
मार्फत खामगाव आगार व्यवस्थापक सई तांबटकर खामगाव यांना विराट मल्टिपर्पज फाउंडेशन खामगाव च्यावतीने अध्यक्ष मनोज नगरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली निवेदन देण्यात आले.

जिल्ह्यातील चालक व वाहक विशेषता वाहकच यांना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने दिव्यांग प्रवाशांच्या सोयीसाठी बसमधील दरवाजाजवळील चार आसने क्रमांक तीन, चार, पाच व सहा (इतर बस मध्ये वेगळी आसन) कायमस्वरूपी दिव्यांगांसाठी राखीव ठेवली आहेत.
५ डिसेंबर २०२४ रोजी जाहीर झालेला हा अध्यादेश राज्यभर लागू करण्यात आला आहे.

शुभ लाभ नागरी सहकारी पतसंस्था हिंगणघाट हळदीकुंकु कार्यक्रम(Hingnghat)

दिव्यांगांना त्यांचा प्रवास अधिक सोयीस्कर आणि सन्मानजनक होण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. यावर योग्य ते सहकार्य करीत नसल्याचे तक्रारी आहेत तसेच हा नियम कोणी मोडल्यास पाच हजारांच दंड आणि दंड न भरल्यास तुरूगांत पाठवून त्या मजुरीतून दंड वसूल करण्याची तरदूत नियमात आहे.

दिव्यांग प्रवासी यांना सहकार्य करण्यासाठी

1) आपल्या कार्य क्षेत्रातील आगार मध्ये कंट्रोल रूमच्या माध्यमातून ध्वनी प्रेक्षकावर याविषयी जनजागृती करावी

2) बस मधील असलेली आरक्षित सीट ही विशिष्ट रंगाने आरक्षित दिसणारी करावी 3) तसेच बसच्या दर्शनी भागावर तसेच प्रत्येक प्लॅटफॉर्म वर या विषयी फलक लावत जनजागृती करण्याचे सहकार्य करावे.

busnews:तसेच यावर काय कारवाई केली याबद्दल आम्हाला पंधरा दिवसाच्या आत कळावे अश्या मागणीचे निवेदन आज सई तांबटकर यांना देण्यात आले निवेदन देतेवेळी अध्यक्ष मनोज नगरनाईक शत्रुघन इंगळे
मंगेश अंभोरे शेखर तायडे ,सरदार,मधुकर पाटील आदी हजर होते

शुभ लाभ नागरी सहकारी पतसंस्था हिंगणघाट हळदीकुंकु कार्यक्रम(Hingnghat)

0

 

प्रतिनिधी सचिन वाघे हिंगणघाट :-

दि. 4/02/2025 रोजी शुभ लाभ नागरी सहकारी पतसंस्था हिंगणघाट येथे रथसप्तमी निमित्य हळदीकुंकु कार्यक्रम पार पडला कार्यकमाचे प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. प्रणाली सायंकार , डॉ. नेहा भेंडे , शुभ लाभ नागरी सहकारी पतसंस्थेचे सदस्य, नयना आशिष सायंकार ,

मोनिका सतिष कापसे, किर्ती सतिश सायंकार,या कार्यक्रमाचे आयोज‌न शुभ लाभ नागरी सहकारी पतसंस्था मनिषा गायकवाड , अंकिता उंबरकर ,अमृता चावरे यांनी संचालन केले. वैष्णवी शेन्डे, ,मेधा चंदनखेडे , दिपाली ढगे यांनी सहकार्य केले.

जिजाऊ ज्ञान मंदिरात बोधकथा स्पर्धा संपन्न.(Buldhananews)

0

 

दि.05 फेब्रुवारी राजर्षी शाहू चॅरिटेबल ट्रस्ट सुंदर गड बुलढाणा द्वारा संचालित जिजाऊ ज्ञान मंदिर स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज पळसखेड भट येथे स्टोरी टेलिंग कॉम्पिटिशन बोधकथा स्पर्धा संपन्न झाली. यावेळी विष्णू सिरसाट, तुळशिराम म्हस्के, प्रल्हाद सिरसाट, शकिल सौदागर व शाळेचे प्राचार्य किशोर सिरसाट यांची उपस्थिती होती.

सविस्तर वृत्त असे की, विद्यार्थ्यांच्या अंगभूत कलागुणांना वाव देण्यासाठी जिजाऊ ज्ञान मंदिरात विविध स्पर्धा घेतल्या जातात. याचाच एक भाग म्हणून वैचारिक प्रगल्भता वाढविण्यासाठी बोधकथा स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत वर्ग एक ते नऊच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

Buldhananews :यात इंग्रजी भाषेची मर्यादा होती. यामध्ये शाळेतील बहुसंख्या विद्यार्थ्यांनी सहभागी होत स्पर्धा यशस्वी केली या स्पर्धेत प्रथम क्रमांक इयत्ता 9 वी तील विद्यार्थी तन्मय काळे याने पटकावला तर द्वितीय क्रमांक सातवी तील विद्यार्थीनी देवयानी सिरसाट हिने मिळवला तर तृतीय क्रमांक आयुष घोलप याने पटकावला. विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.
या स्पर्धेसाठी संस्था अध्यक्ष मा संदीप दादा शेळके यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच शाळेतील शिक्षकांचे सहकार्य लाभले.

तहसील कार्यालयातील खासगी ऑपरेटर बंद करण्याची मागणी ( sangrampurnews)

0

 

“बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तहसील कार्यालय संबंधित पुरवठा विभागात खासगी ऑपरेटर कार्यरत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.

यासंदर्भात राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अल्पसंख्यक तालुका अध्यक्ष यांनी तहसीलदारांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.”

प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना अंतर्गत विविध स्पर्धा संपन्न(Lonar)

“या तक्रारीत शेख कलीम राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी संग्रामपुर तालुका अध्यक्ष यांनी म्हटले आहे की, पुरवठा विभागात सरकारी कर्मचारी उपलब्ध असतानाही खासगी ऑपरेटरकडून महत्त्वाची सरकारी कामे केली जात आहेत. हे केवळ नियमबाह्य नाही, तर माहिती सुरक्षेच्या दृष्टीनेही धोकादायक आहे.”

“शासनाने सरकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना ओळखपत्र बंधनकारक केले आहे. मात्र, पुरवठा विभागात काम करणारे कर्मचारी ओळखपत्राशिवायच काम करत आहेत. यामुळे नागरिकांची फसवणूक होण्याची शक्यता आहे.”राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी संग्रामपुर तालुका अध्यक्ष यांनी आणखी एक गंभीर बाब निदर्शनास आणली आहे. पुरवठा विभागात दाखल होणाऱ्या अर्जांची रितसर नोंद ठेवली जात नाही. त्यामुळे अर्जदारांना योग्य वेळी पुरेसा प्रतिसाद मिळत नाही.”

“आम्ही अर्ज करतो, पण त्याचा काहीच पत्ता लागत नाही. तहसील कार्यालयात पारदर्शकता हवी.”

“या संपूर्ण प्रकरणावर आता तहसीलदार काय कारवाई करतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडेही तक्रार करण्यात येणार असल्याचे समजते.”

sangrampurnews:”सरकारी कार्यालयांमध्ये खासगी हस्तक्षेप थांबवला जाईल का? प्रशासन काय पाऊल उचलणार? याकडे सर्वांचे लक्ष राहील.”

शहर स्वच्छ करा नसता शहरातील घाण कचरा नगरपरिषदेत टाकू डॉ. गोपाल बछीरे (Lonarnews)

0

 

प्रतिनिधि सय्यद जहीर

Lonarnews:लोणार शहरातील घाण कचरा त्वरित उचलून स्वच्छ करा नसता नगर परिषदेमध्ये शहरातील कचरा आणून टाकू असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा संघटक डॉ. गोपाल बछीरे यांनी नगरपरिषद मुख्य अधिकारी यांना निवेदनाद्वारे दिला.

प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना अंतर्गत विविध स्पर्धा संपन्न(Lonar)

लोणार शहरात गत एक महिन्या पासून घाण कचरा उचलला जात नाही त्याचे व्यवस्थापन होत नाही नगरपालिकेचे कर्मचारी कुठल्याही प्रकारचे कचऱ्याचे नियोजन करत नाही आणि त्यामुळे संपूर्ण शहरात दुर्गंधीचे वातावरण निर्माण झाले आहे त्या कारणाने कित्येक सामान्य नागरिक यांचे आरोग्य धोक्यात आले आहे यास सर्वस्व नगरपरिषद जबाबदार आहे.

म्हणून त्वरित कचऱ्याचे व्यवस्थापन करा शहरातील कचरा उचला शहर स्वच्छ करा अन्यथा शहरातील संपूर्ण घाण कचरा आपल्या कार्यालयासमोर आणून टाकण्यात येईल

Lonarnews:असा इशारा, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा संघटक डॉ. गोपाल बछिरे यांनी लोणार नगरपरिषदचे मुख्यअधिकारी यांना दिला, याप्रसंगी तालुकाप्रमुख एड. दीपक मापारी, शहर प्रमुख गजानन जाधाव, शहर संघटक तानाजी मापारी, सुदन अंभोरे, अल्पसंख्यांक सेनेचे तालुकाप्रमुख ऊमर सय्यद, गणेश सोलंकी, तालुका संघटक कैलास अंभोरे, शहर उपप्रमुख लूकमान कुरेशी, युवा सेना शहर प्रमुख श्रीकांत मादनकर, , यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते

घरकुल योजनेतील भ्रष्टाचारामुळे सामान्य माणूस मेटाकुटीला…(gharkulyojna)

0

 

संबंधित अधिकारी कर्मचारी यांची सरपंच व ग्रामसेवक यांची पाठ राखण….

प्रतिनिधि सय्यद जहीर

gharkulyojna:लोणार तालुक्यातील ग्रामीण भागातील गावांमध्ये ग्रामपंचायत सरपंच, ग्रामसेवक व इतर पदाधिकाऱ्यांकडून मनमानी कारभार चालला असून भ्रष्ट कारभाराला ऊत आला आहे.
घरकुल योजनेत तर ५ हजार ते २५ हजार रुपये घेऊन खोट्या कागदपत्रांची पूर्तता करून लाभार्थ्यांची निवड करण्यात येत आहे. या भ्रष्ट कारभाराला वेळीच थांबविले नाही तर गरजू व पात्र नागरिकांना घरकुले कशी मिळणार? असा प्रश्न सर्वसामान्यांतून विचारला जात आहे.

प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना अंतर्गत विविध स्पर्धा संपन्न(Lonar)

याबाबत माहिती अशी, शासनाकडून ज्यांना घरे नाहीत अशा गरीब, कष्टकरी, हातावर पोट भरणाऱ्या नागरिकांसाठी घरकुल योजना राबविली जात आहे. या योजनेचा हेतू जरी चांगला असला तरी सध्या ग्रामपंचायतीतील पदाधिकारी व ग्रामसेवकांनी संगनमताने या योजनेत भ्रष्टाचार करून योजनेचा हेतूच संपविण्याचे धोरण आखले आहे.

ग्रामपंचायतीतील सरपंच,उपसरपंच, सदस्य व ग्रामसेवक संगनमताने ५ हजार ते २५ हजार रुपये घेऊन लाभार्थ्यांची निवड करत आहेत. यासाठी लाभार्थ्याच्या नावावर जागेची अट असताना त्यासाठी खोट्या माहितीची पूर्तता करून घरे मंजूर केली जात आहेत. तसेच जागा व्यापून आपल्या नावावर नोंदणी करून घेत आहेत.

एक रेशनिंग कार्ड, नावावर गाड्या दोन,जागा पूर्ण नसताना मंजुरी, त्याचप्रमाणे घरे पूर्ण नसताना उतारे नोंदणी, घर पूर्ण झाल्याचा दाखला, तसेच दारे, खिडक्या, प्लास्टर, शौचालय नसतानाही तीन महिने आधीच खोट्या नोंदणी करून घरकुलांची बिले काढली जात आहेत.बांधलेल्या घरावर सुद्धा घरकुलाच्या नावे पैसे काढून दिल्या जात आहेत.
घरकुल योजनेतील या मनमानी कारभारावर कारवाई झालीच पाहिजे अन्यथा गरजूंना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.

आत्तापर्यंत या योजनेचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांची जर चौकशी केली तर त्यातील निम्म्यापेक्षा अधिक लाभार्थी योजनेसाठी पात्र नसल्याचेच आढळून येईल.
घरकुल योजनेतील भ्रष्ट कारभाराची सर्व ग्रामपंचायतीतील कर्मचारी, पोलीस पाटील, सत्ताधारी तसेच विरोधक यांनाही याची माहिती असूनही ते गप्प का बसतात? हे कळायला मार्ग नाही.

gharkulyojna:गटविकास अधिकाऱ्यांना याची माहिती नसावी, असे वाटत नाही. निश्चितच तेही या कारभाराला पाठीशी घालतात, अशी नागरिकांचा समज झालेला आहे. त्यामुळे घरकुल योजनेचा खऱ्या गरजू व पात्र लाभार्थ्यांना यापुढे लाभ मिळण्यासाठी या भ्रष्ट कारभाराची चौकशी होऊन दोषींवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी सामान्य जनतेतून होत आहे.

■ घरकुल मंजूर करणे, घरकुलाचा हप्ता देण्यासाठी कर्मचारी, अधिकाऱ्यांना पैसे देण्याची गरज नाही. पंचायत समिती, जिल्हा परिषदेत कोणी नागरिकांना मंजुरीसाठी किंवा हप्ता देण्यासाठी पैसे मागत असेल तर याद राखा. कोणीही पैसे मागितले तर त्याला सोडणार नाही,भ्रष्टाचाराला पायबंद घालण्यासाठी कार्यालयाबाहेर माझा मोबाईल क्रमांक लिहिण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
– जयकुमार गोरे, ग्रामविकासमंत्री

20 लाख नवीन घरकुलांचे उद्दिष्ट…

प्रत्येकालाच वाटते कि आपल्याला हक्काचे स्वताचे घर असावे. हे स्वप्न आता लवकरच पूर्णत्वास येणार आहे कारण महाराष्ट्र राज्यासाठी नवीन 20 लाख घरकुलांचे उद्दिष्ट मिळालेले आहेत.या सर्व घरकुलांना तत्काळ मंजुरी देण्यात येणार आहे.

बऱ्याच वेळेस होते असे कि लाभार्थीला घरकुल मिळाल्यानंतर निकृष्ठ दर्जाचे काम केले जाते. मात्र यापुढे आता घरकुल योजनेचे काम चांगल्या दर्जाचे झाले आहे किंवा नाही हे पाहण्याच्या सूचना देखील संबधित अधिकारी यांना मंत्री महोदयांनी दिलेल्या आहेत.

प्रतिक्रिया —
घरकुल मंजुरी,घरकुलाचा हप्ता,नावे कमी जास्त,खाली वर ,खोट्या कागदपत्रांची पूर्तता,बांधलेल्या घरावर पैसे काढून देतो अशा प्रकारच्या कुठल्याही कामासाठी कोणीही आर्थिक व्यवहार करू नये.यासाठी सरपंच,सचिव,कर्मचाऱी,अधिकारी यांना कुठल्याच प्रकारचे पैसे देण्याची गरज नाही.कारण घरकुलाची कामेही नियमानुसार करण्यात येणार आहेत.
काही ठिकाणी अनेकदा घरकुल योजनेचा अनुदानाचा हप्ता मिळवण्यासाठी लाभार्थ्याकडून लाज मागण्याची शक्यता असते अशावेळी कोणतेही अधिकारी किंवा कर्मचाऱ्यास पैसे न देता लोणार पंचायत समिती कार्यालयात तक्रार करावी.
— श्री उमेश देशमुख,गटविकास अधिकारी पंचायत समिती,लोणार

जिजाऊ ज्ञान मंदिरात निरोप समारंभ संपन्न(buldhananews)

0

 

जावेद शहा बुलढाणा

दि. 01 फेब्रुवारीराजर्षी शाहू चॅरिटेबल ट्रस्ट सुंदरखेड बुलढाणा द्वारा संचालित जिजाऊ ज्ञान मंदिर स्कूल अँड ज्यु. सायन्स व क्रॉप सायन्स कॉलेज पळसखेड भट मध्ये दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेचे अध्यक्ष मा.संदीपदादा शेळके होते तर प्रमुख उपस्थितीमध्ये शाळेचे प्राचार्य किशोर सिरसाट तसेच कॉलेजचे सर्व प्राध्यापक मंडळी होती. सर्वप्रथम सर्व मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. यावेळी विविध शाखेच्या विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली. अतिशय भावपूर्ण वातावरणात हा निरोप समारंभ संपन्न झाला.

प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना अंतर्गत विविध स्पर्धा संपन्न(Lonar)

यावेळी शाळेच्या प्राध्यापकां बद्दल विद्यार्थ्यांनी स्तुती सुमने गायली तसेच सर्व सोयी सुविधा युक्त डिजिटल माध्यमातून ग्रामीण भागामध्ये आम्हाला कुठल्याही प्रकारचे क्लासेस न लावता चांगल्या प्रकारचे शिक्षण या संस्थेतर्फे पुरविण्यात येतं याबद्दल आभाराचा सुर विद्यार्थ्यांमधून उमटला.
प्रसंगी कॉलेजच्या प्रा. सुनिल सुसर यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी बोलतांना संदीपदादा शेळके म्हणाले की, आदरणीय भाऊसाहेब शेळके यांनी लावलेला शिक्षणरूपी वटवृक्ष उत्तरोत्तर वाढत आहे.

आजच्या निरोप समारंभ कार्यक्रमात बोलताना खूप आनंद होतोय आपण या शाळेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार व उच्च प्रतीचे शिक्षण देण्याचा प्रयत्न करत आहोत. त्या साठी मागील वर्षापासून संपूर्ण शाळा डिजिटल करण्यामध्ये आपण यशस्वी झालेला आहोत.

त्याचप्रमाणे डिजिटल सिलॅबस सुद्धा आपण त्यातून देत आहोत. येणारे दिवस हे परीक्षेचे असून या परीक्षेच्या काळामध्ये आपण टेन्शन मुक्त परीक्षा द्यावी मनावरील मानसिक ताण घालवण्यासाठी नियमित दहा मिनिटे मेडिटेशन, योग, प्राणायाम करावा, चांगल्या वातावरणामध्ये पेपर सोडवावा. आपले ध्येय एकच असले पाहिजेत. ध्येयपूर्तीसाठी नियमित कष्ट घेणे काळाची गरज आहे. आताच्या युगामध्ये एक नवीन क्षेत्र उदयास आलेले ते म्हणजे सायबर क्षेत्र, या क्षेत्राच्या माध्यमातून नवीन नोकऱ्या तयार होत आहे. भविष्य काळामध्ये चांगला नागरिक बनण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजेत.

आपण या शिक्षण संकुलात शिकलात लहानाचे मोठे झालात पुढील भविष्यामध्ये आपण उद्योग क्षेत्रात जाल शिक्षणासाठी देश-विदेशात जाल अशा वेळेस कोणत्याही समस्या आपल्याला येत असेल, तर नक्कीच मला किंवा या संस्थेला आपण एक आवाज द्या. त्यावेळेस आपल्याला नक्कीच मदत मिळेल. भविष्यकाळासाठी जिजाऊ ज्ञान मंदिराचे दरवाजे आपल्यासाठी नेहमीच खुले असेल.

buldhananews:“मंजिले उन्ही को मिलती है जिनके सपनों में जान होती है। पंखों से कुछ नहीं होता हौसलों से उड़ान होती है।
“कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती”
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे प्राचार्य किशोर सिरसाट यांनी केले. सुत्रसंचलन पायल चिकटे व आदिती सरकटे यांनी तर आभार प्रदर्शन शिवानी खंडागळे हिले केले.

सिंदी रेल्वे येथे लोकाभिमुख पारदर्शक व गतिमान प्रशासन शिबिर..(Hingnghat)

0

 

प्रतिनिधी गुड्डू कुरेशी

सिंदी रेल्वे..लोकांची कामे जलद गतीने व्हावी यासाठी महसूल विभागाच्या वतीने सिंदी येथे नायब तहसील कार्यालयात लोकाभिमुख पारदर्शक व गतिमान प्रशासन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

परिविक्षाधीन तहसीलदार डोगरे रेवैया यांचे हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. शिबिरात नायब तहसीलदार मधुकर ठाकरे, मंडळ अधिकारी सचिन पिसूद्दे, यांचे हस्ते महसूली प्रकरणातील आदेश संजय गांधी योजनेतील तसेच पुरवठा विभागातील विविध प्रमाणपत्रे शेतकरी व नागरिकांना वाटप करण्यात आले.

प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना अंतर्गत विविध स्पर्धा संपन्न(Lonar)

या शिबिरात वहीवाटीचा रस्ता मोकळा करण्याबाबत चार आदेश पारित करण्यात आले, वाटणीपत्रचे ६ आदेश, कलम १५५ अंतर्गत दुरुस्तीचे पाच आदेश, ऍग्री स्टॅक बाबत नोंदणी ३२ अर्ज प्राप्त, संजय गांधी निराधार योजना अंतर्गत ७ प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले,

सिंदी रेल्वे मंडळ अंतर्गत २२ फेरफार प्रकरणाचा निपटारा करण्यात आला, ३७ प्रत सातबाराचे वाटप करण्यात आले, उत्पन्न अहवाल २२ प्रति वाटप करण्यात आले, शिधापत्रिका मधून १७ नावे कमी करण्याच्या प्रकरणाचा निपटारा करण्यात आला, ३ लोकांची नवीन शिधापत्रिका तयार करण्यात आली, श्रावण बाळ निराधार योजना मध्ये ४ नवीन अर्ज प्राप्त करण्यात आले, १७ लोकांना हयातीचे प्रमाणपत्र वाटप करण्यात आले,

संजय गांधी निराधार डीबीटी अंतर्गत २२ लोकांचे कागदपत्रे घेण्यात आली व इतर विविध प्रकरणाचे प्रमाणपत्र वाटप करण्यात आली तसेच शिबिरामध्ये अनेक लोकांनी भेट दिली.

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संकल्पनेतून सेलू तालुक्यात गावागावात शिबिर घेऊन जनतेची कामे निकाली काढण्याची योजना म्हणजेच लोकाभिमुख पारदर्शक व गतिमान प्रशासन शिबीर होय..

Hingnghat:शिबिरात सिंदीचे पटवारी तिलक चंदनखेडे, हेलोडीच्या पटवारी रोशनी कोळमकर, पळसगावचे पटवारी धम्मदीप थुल, चाणकी कोपऱ्याच्या पटवारी संगीता थोटे, महसूल सहाय्यक कुसुम वाघ, दिलीप पाटील, कविता उरकुडे पुरवठा निरीक्षक सेलू आदींनी विविध प्रमाणपत्राचे नागरिकांना व शेतकऱ्यांना वाटप केले…