Home Blog Page 531

महात्मा गांधी रोजगार हमी योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करा-आमदार राजेश एकडे

0

 

सुनील पवार, नांदुरा, प्रतिनिधि

महात्मा गांधी रोजगार हमी योजने अंतर्गत ग्राम पंचायत हद्दीत करावयाच्या कामाच्या अनुषंगाने मलकापूर मलकापूर विधानसभा मतदार संघाचे आमदार श्री. राजेश एकडे यांनी संबधीत सर्व विभागाची आढावा बैठक आयोजित केली होती.सदर योजनेअंतर्गत ग्रामीण भागात सिंचन विहिरी,शेत रस्ते पांदण रस्ते,खडीकरण,पक्के रस्ते करणे, गाई-म्हशीचे पक्के गोठे बांधणे,
कुकुटपालन शेड बांधणे,फलबाग लागवड,वृक्षरोपण,
रोपीकरण, शेततळे,ढाळीचे बांध,वनतळे,
अंगणवाडी बांधकाम, शौचालय बांधकाम या सह करावयाचे इतर कामाची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्याच्या सूचना आमदार राजेश एकडे यांनी या बैठकीस उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांना केल्या. महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या या आढावा बैठकीस नांदुरा येथील तहसीलदार श्री.राहुल तायडे,नांदुरा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री. समाधान वाघ, तालुका कृषी अधिकारी श्री. पुरुषोत्तम अंगाईत, वनविभागाच्या जळगाव जामोद च्या वनपरिक्षेत्र अधिकारी स्मिताताई राजहंस,मलकापुर जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे शाखा अभियंता श्री.सोळंके यांच्या सह संबंधित विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

सेलू तालुका भा. ज. यु. मोर्चाच्या वतीने आघाडी सरकारचा निषेध करीत शिव जयंती उत्साहात साजरी करण्यात येणार असल्याचे निवेदन

0

अजहर पठाण
सेलू/परभणी

राज्यातील आघाडी सरकारने शिव जयंती उत्साहात साजरी करण्याचे नाकारलेले असल्याने भाj. ज. यू. मोर्चाच्या वतीने आघाडी सरकारचा निषेध करीत शिवजयंती उत्साहात साजरी करण्याचे ठरविले आसून याबाबत चे निवेदन येथील भा. ज. यू. मोर्चाचे तालुका अध्यक्ष श्री. शिवहरी शेवाळे, भागवत दळवे , महादेव गायके , नागेश ठाकूर, जीवन ढवळे, प्रदीप झिंबरे, अभिजित रोडगे आदींनी सेलू पोलिस स्टेशन सेलू येथील पो. निरिक्षक यांना देऊन छ्त्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्याचे ठरविले असून शिव प्रेमींनी यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे

शिवजयंतीच्या बाबतीत मुख्यमंत्र्यांचा दूजाभाव – अमर पाटील यांचा आरोप

0

 

नांदुरा (प्रफुल्ल बिचारे पाटिल ):-

दिनांक १२ फेब्रुवारी २०२१ रोजी संभाजी ब्रिगेड नांदुरा च्या वतीने तहसील मार्फत मुख्यमंत्री यांना पत्र पाठविण्यात आले. मुख्यमंत्र्यांकडून लग्न कार्यास परवानगी आहे,शाळा महाविद्यालय सुरू आहेत,सर्व धार्मिक स्थळे सुरू आहे,बाजारपेठ खुल्या आहेत,आता कोरोनाची भीती सुद्धा राहिली नाही.जर कोरोनाला आळाच घालायचा होता तर तुम्ही स्वतः स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीला २३ जानेवारीला लाखोंच्या संख्येने जमा होऊन पुतळ्याचे अनावरण कसे केले? ,जयंत पाटील यांचे हजारोंच्या संख्येनं दौरे कसे सुरू आहेत? ,वडेट्टीवार च्या सभेला परवानगी कशी? मग एवढं सर्व सुरू असताना आपण नेमकी शिवजयंतीला च परवानगी का नाकारली?,यामागे आपण केलेला दूजाभाव व पर्यायाने तिथीचा अट्टाहास तर नाही ना?.संपूर्ण जग तारखेनुसार चालते.आपण स्वतः मुख्यमंत्री महोदय सर्व कामकाज तारखेनुसार पार पाडता.तसेच दैनंदिन जीवन जगताना सुद्धा तारखेचाच वापर करता.तुम्ही स्व.प्रबोधनकारजी ठाकरे साहेब यांचे नातू आहात हे विसरू नका ही जात जोडून विनंती. हे सर्व काही सुरू असताना फक्त शिवजयंतीलाच बंधन का? आणि हा माझ्या एक्याचाच प्रश्न नसून तमाम शिवप्रेमींचा प्रश्न आहे.जर आपण हा निर्णय रद्द केला नाही तर शिवप्रेमींच्या भावनेचा उद्रेक होईल. आणि आपल्याला महाराष्ट्राच्या रोषाला सामोरे जावे लागेल. यामुळे आम्ही तुम्हाला नांदुरा मधे पाय टाकुु देणार नाही. तसेच शिवप्रेमी तुम्हाला महाराष्ट्रामध्ये फिरू देणार नाही. म्हणून मी आपणास विनंती करतो की आपण काढलेला शासकीय जी.आर.तात्काळ मागे घेऊन शिवजयंतीला खुली सुट द्यावी ही विनंती या आशयाचे पत्र तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना देण्यात आले. यावेळी संभाजी ब्रिगेड जिल्हा कार्याध्यक्ष मंगेश सोळंके,नांदुरा तालुकाध्यक्ष अमर रमेश पाटील,तालुका उपाध्यक्ष अमोल भगवान पाटील,तालुका प्रसिद्धी प्रमुख हरिभाऊ जुमळे,उपाध्यक्ष सचिन बाठे,ऋषिकेश कोळस्कर,विठ्ठल भगत,शहरउपाध्यक्ष कुलदीप डंबेलकर,रघुनाथ गावंडे, माटोळा शाखाध्यक्ष सहदेव खराटे,सागर पाटील,तेजस पाटील,गजानन मुंढे,संतोष देवकर,गणेश बकाल,सुपेश सोळंके,अजय खराटे,पवन चरखे,पत्रकार प्रफुल्ल बिचारे,संतोष तायडे,राहुल खंडेराव,अरुण सुरवाडे, व इतर बहुसंख्य शिवभक्त उपस्थित होते.

पैशांवर निवडणुका जिंकता आल्या असत्यातर टाटा बिर्ला हे देशाचे पंतप्रधान झाले असते : ना . जयंत पाटील

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे “पैशांवर निवडणुका जिंकता आल्या असत्या तर टाटा-बिर्ला पंतप्रधान झाले असते. अंबानी असो की गरीब माणूस, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे प्रत्येक व्यक्तीला एकाच मताचा अधिकार मिळाला. पैशांपेक्षाही जनतेशी असलेल्या थेट संपर्कामुळेच निवडणुकीत विजय होत असतो, हे सत्य आहे. त्यामुळे बुथ कमिट्या पुर्ण कराव्यात. नेते आणि कार्यकर्ते यांच्यात समन्वय असावा.”, असे वक्तव्य प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेनिमित्त पाचोरा विधानसभा मतदारसंघात संपन्न झालेल्या आढावा बैठकी दरम्यान केले.

कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, “भाजपने शेतकरी आणि कामगार वर्गाला नाराज केले आहे. २०२४ च्या निवडणुकीत भाजपला मतदान मिळणे अवघड होईल. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आतापासूनच कामाला लागावे. पक्ष वाढवावा.” यावेळी त्यांनी स्वतःच्या मतदारसंघाचे उदाहरण देताना सांगितले की, मी माझ्या मतदारसंघात फार प्रचार करत नाही. माझ्या कार्यकर्त्यांच्या सहकार्यामुळे निवडणूक सोपी होते.

यावेळी ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपवर जोरदार टीका केली. मागच्या काळातील सरकारने सत्तेचा माज आणि मस्ती दाखवली. त्यामुळेच जनतेने त्यांचा अहंकार बुडवला. देवेंद्र फडणवीस कितीही पुन्हा येईन म्हणाले तरी ते पुन्हा येणार नाहीत. त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सतत कार्यरत राहावे. संघटना वाढवावी, असे मत खडसे यांनी व्यक्त केले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी आमदार दिलीप वाघ, माजी आमदार मनिष जैन, रविंद्र भैय्या पाटील, माजी खासदार मोरे काका, उमेश पाटील, अर्जुन टिळे, युवक जिल्हाध्यक्ष रविंद्र पाटील, युवती जिल्हाध्यक्ष कल्पीता पाटील, महिला जिल्हाध्यक्ष कल्पना पाटील, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष रोहन सोनवणे, वंदना चौधरी, रिता बाविस्कर, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रूपालीताई चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, युवक कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, युवक कार्याध्यक्ष सुरज चव्हाण, युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनिल गव्हाणे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.

वैजापूर येथे आमदार प्रा रमेश पा बोरनारे सर यांच्या प्रमुख उपस्थीतीत पाणी फाऊंडेशन गाव समृद्ध स्पर्धा 2020-21आढावा बैठक संपन्न झाली.

0

 

ऋषी जुंधारे,वैजापूर

आज वैजापुर पंचायत समिती येथे आमदार प्रा रमेश पा बोरनारे सर यांच्या प्रमुख उपस्थीतीत पाणी फाऊंडेशन गाव समृद्ध स्पर्धा 2020-21आढावा बैठक संपन्न झाली.
.पाणी फाऊंडेशन आयोजीत समृद्ध गाव स्पर्धा 2020- 21 या आढावा बैठकीचा शुभारंभ आमदार_प्रा_रमेश_पा_बोरनारे_सर यांनी दीपप्रज्वलनाने केले. या बैठकीस मार्गदर्शन करतांना विधानसभा मतदार संघातील मंजुर करून आणलेल्या जलसंधारण अंतर्गत केटीवेअर, कोल्हापुरी, सिमेंट बंधारे, माती बंधारे असे विविध मंजुर केलेली काम व प्रस्तावित कामाची माहिती दिली. या स्पर्धेत तालुक्यातील 16 गावानी सहभाग घेतलेला असुन सर्व शेतकर्यांनी गावागावातील गटतट सोडत एकत्र येऊन गाव चांगल्या प्रकारे पाणी फाऊंडेशन स्पर्धे अंतर्गत सुजलाम सुफलाम करा असे शेतकर्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी पाणी फाऊंडेशन अंतर्गत पहिल्या टप्प्यांत काही झालेल्या गावाना भेटी दिल्या होत्या त्यावेळचे सुत्र व आताचे पाणी फाऊंडेशनचे सुत्र यात खुप मोठा बदल झाला असुन त्याचे नियोजन वेगवगळ्या पध्दतीने करण्यात येत असुन पाऊस गावात किती पडला, रेनगेज बसविणे, पाऊस नोंदी ठेवणे, विहीरीचे पाणी मोजणे, पाण्याची पातळी वर्षातून 4 वेळा मोजणे अशा विविध मुद्द्यांचा समावेश केला आहे. व सर्व शेतकर्यांनी एकत्र येऊन सहकार्य करावे अशा सुचना दिल्या.
.
यावेळी उपजिल्हाधिकारी रोहयो वैद्य साहेब, डॉ पोळ साहेब, उपविभागीय अधिकारी आहेर साहेब, तहसीलदार गायकवाड साहेब, उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब पा जगताप, गटविकास अधिकारी मोकाटे साहेब, उपसभापती राजेंद्र पा मगर, तालुका कृषी अधिकारी कुलकर्णी साहेब, नायब तहसीलदार निखिल धुळधर साहेब, सुरेश राऊत, दिपक तंगे,प्रल्हाद अडसूळ सर्व कृषी सहायक, ग्रामसेवक, पोलीस पाटील, आशा सेविका,मंडळ अधिकारी, तलाठी, सरपंच शेतकरी उपस्थित होते.

खेर्डा बु ग्रामपंचायत वर महाविकास आघाडीचा झेंडा

0

 

गजानन सोनटक्के जळगाव जा

ग्रामपंचायत खेर्डा बु मध्ये आज दिनांक 11/02/2021 पार पडलेल्या सरपंच व उपसरपंच निवडणूक मध्ये प्रवीण भाऊ भोपळे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे श्री नरेश वानखडे यांची सरपंच पदी व दुर्गाबाई म्हसाळ यांची उपसरपंचपदी निवड करण्यात आली.यावेळी संजय म्हसाळ, संतोष बंड,योगिता भोपळे, पिंपळकर बाई सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच प्रविण भाऊ भोपळे, पुर्णाजी वानखडे, उमेश राठी, प्रभूदास बंबटकार,दत्तू जाधव,पांडुरंग भोपळे,वासुदेव गिन्हे,कैलास गायकी,प्रकाश वानखडे . ज्ञानदेव राजनकार ,निशिकांत देशमुख, राजू तायडे,भुषण जाधव,विवेक भोपळे,भारत घाटे, मंगेश बंबटकार ,दीपक बंबटकारकैलास पिंपळ कार , गजानन इंगळे,शिवा टाकसाळ,सुभाष वासनकर,सदाशिव तायडे, बाबन अंजणकर,वसंता आसलकार, विश्वनाथ जाधव तसेच निवडणूक अधिकारी संदीप मोरे साहेब, सावंग साहेब, तीवाले साहेब, पोलीस अधिकारी वानखडे साहेब ग्रामपंचायत कर्मचारी अनंता वानखडे, श्याम बंबटकार, गणेश वानखडे उपस्थित होते.तसेच महाविकास आघाडीचे कार्यकर्ते यांनी गावात मिरवणूक काढून ,फटाके फोडून आणि गुलाल उधळून जल्लोष साजरा करण्यात आला.

गोंदियात घराबाहेर असलेल्या चारचाकी वाहनांना अज्ञातांनी लावली आग

0

 

गोंदिया-शैलेश राजनकर

गोंदिया,- राज्यातील इतर मोठ्या महानगरामध्ये रात्रीच्या सुमारास वाहनांना आग लावून जाळण्याच्या घटना एैकावयासय नव्हे तर बघावयास मिळाल्या असताना आज गुरुवारच्या मध्यरात्रीला अज्ञातांनी गोंदियातील श्रीनगर भागात वाहनांनी आग लावल्याची घटना उघडकीस आली आहे. येथील श्रीनगर परिसरात काही अज्ञातांनी दोन ते तीन चारचाकी गाड्या पेटवल्या आहेत. यामुळे वाहनमालकांचं लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे.
श्रीनगर परिसरात असलेल्या नागरी वस्तीत काही अज्ञात समाजकंटकांनी घराबाहेर पार्क केलेली चारचाकी वाहनं जाळल्या.गुरुवारच्या मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली आहे.चंद्रशेखर वार्ड निवासी लाचलुचपत प्रतिबंधक विभागात कार्यरत पोलीस कर्मचारी विजय खोब्रागडे यांची हुडंई कंपनीची सुमारे 10 लाख रुपये किमतीची कार पुर्णत जळून खाक झाली.त्याचप्रमाणे भीमनगर निवासी सुधीर कोल्हटकर यांची मिनी मेटाडोर ही सुध्दा जाळली.तर चंद्रशेखर वार्डातीलच माता मंदीरात रात्री 1 वाजेच्या सुमारास मंदिराचा ताला तोडून आत शिरण्याचा प्रयत्न करणारा एक युवक शेजारील एक व्यक्ती बाहेर आल्याने पसार झाला.त्यातच या जाळपोळीमुळे विजेचे तार खाली पडल्याने मोठी हानी होण्याची शक्यता होती मात्र अग्निशमनदल वेळेवर पोचल्याने मोठी घटना घडली.याप्रकरणा खोब्रागडे यांनी गोंदिया शहर पोलीसात तक्रार नोंदवली असून शहर पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

नवनियुक्त ग्रामसेवक अर्जुन गवई व सरपंच सौ अर्चना विनोद खरात यांनी शिंदी येथे मार्गी लावले विविध विकास कामे !

0

 

सिंदखेडराजा l ( सचिन खंडारे )

सिंदखेडराजा तालुक्यातील शिंदी येथे नवनियुक्त ग्रामसेवक व धडाडीचे निर्णय घेण्यात माहीर असलेले ग्रामसेवक श्री अर्जुन गवई वसरपंच सौ अर्चना विनोद खरात यांनी अल्पावधीतच शिंदी या गावी विविध विकास कामे मार्गी लावलेली आहे तर काही विकास काम अजूनही सुरू आहे ‘यामध्ये जिल्हा उच्च माध्यमिक शाळेतील सुशोभिकरण स्वच्छालय व गेट ‘अंगणवाडी ला निधी ‘गावातील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र मध्ये सुशोभीकरण ‘अगोदर मिळणारे 17 दिवसांनी पिण्याचे पाणी आता चार दिवसांनी मिळते ।तसेच गावातील सांडपाणी जाण्यासाठी नाल्या नव्हत्या अनेक ठिकाणी गटारे साचून लोक आजारी पडले होते .अशा ठिकाणी उतार काढून त्यामध्ये पाईप टाकून सांडपाणी जाण्यासाठी नाल्याचे काम प्रगतिपथावर आहे !सांगायचे तात्पर्य एवढेच की सरपंच व सचिव यांनी समन्वय साधून गावच्या विकासासाठी चांगले काम सध्या करीत आहेत याचं समाधान लोकांना मिळत आहे !

साखरखेर्डा सरपंचपदी दाऊद सेठ कुरेशी तर उपसरपंचपदी सौ. शारदा पाझडे यांची बिनविरोध निवड !

0

 

सिंदखेड राजा ( सचिन खंडारे )

सिंदखेडराजा तालुक्यातील ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच पदाच्या दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकी ह्या पार पडल्या आहेत मिनी म्हणून ग्रामपंचायतची ओळख असते सिदखेडराजा तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या व सर्वांची उत्सुकता लागून असलेल्या साखरखेर्डा ग्रामपंचायत सरपंच व उपसरपंच पदाची निवडणूक 11 फेब्रुवारी रोजी दुपारी 2 वाजता पार पडली ‘यामध्ये सरपंच पदासाठी दाऊत सेठ कुरेशी तर उपसरपंच पदासाठी शारदा प्रवीण पाझडे यांचेच एकमेव अर्ज दाखल झाले होते ।तरीही निवडणूक अधिकारी श्री कुलकर्णी यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी दहा मिनिटांचा अवधी दिला ‘यानंतर निवडणूक अधिकारी श्री कुलकर्णी यांनी सरपंच पदासाठी एकमेव अर्ज दाखल झाल्यामुळे दाऊद सेठ कुरेशी यांची सरपंच पदी घोषणा केली तर उपसरपंच पदी सौ शारदा प्रवीण पाझडे यांच्या नावाची घोषणा केली ‘नवनियुक्त सरपंच दाऊत सेठ कुरेशी हे दानशूर व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाते त्यांनी अनेक गोरगरिबांना मदतीचा हात दिला तर लोक डाऊन मध्ये त्यांनी अनेक ठिकाणी अन्नधान्याचे वाटप सुद्धा केलेआहे सरपंच व उपसरपंच पदाच्या नावाची घोषणा होताच सर्व सदस्यांनी टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत केले व बाहेर जमलेल्या समर्थकांनी फटाके च्या अतिषबाजी करून आनंद साजरा केला !एकूण 17 सदस्य पैकी 16 सदस्य हे हजर होते तर एकमेव सदस्य हे गैरहजर राहिले यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून मंडळ अधिकारी श्री कुलकर्णी तलाठी श्री शिंगणे ग्राम विकास अधिकारी श्री आढाव साहेब यांनी काम पाहिले .तर कुठल्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये म्हणून साखरखेडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री आडोळे यांनी . चोख पोलिस बंदोबस्त लावला होता ‘यावेळी माजी सभापती राजू ठोके माजी उपसभापती सुनील जगताप राष्ट्रवादीचे दिग्गज नेते माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रामभाऊ जाधव ।दिलीप इंगळे हे ही यावेळी हजर होते !तालुक्यातील इतर एकूण 23 ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच पुढील प्रमाणे !कोनाटी -सरपंच .श्रीमती सविता परमेश्वर खंदारे .उपसरपंच श्रीमती रंजना अंबादास खंदारे, -पळसखेड चक्का -सरपंच शिवानंद नारायण मुंढे -उपसरपंच उत्तम रामभाऊ खजुरे ‘महारखेड -सरपंच शोभा गजानन जायभाये – उपसरपंच श्री निलेश घुले,खामगाव – सरपंच सौ ज्योती माणिकराव जाधव ‘उपसरपंच श्री अनिल पवार ।पिंपरखेड बुद्रुक – रिक्त -उपसरपंच प्रवीण पवार ।कुंबेफळ – सरपंच श्रीमती सुमन दगडोबा डोंगरे .उपसरपंच सौ शशिकला पवार,धांदरवाडी सरपंच श्रीमती उषा शेळके ‘उपसरपंच श्री सुधाकर हिवाळे ‘पांगरी काटे .सरपंच शिवानंद थिगळे .उपसरपंच श्री नितीन भालेराव .हनवतखेड ( म.पांग्रा )सरपंच श्रीमती संगीता मोरे . -उपसरपंच -योगेश चव्हाण ,पिंपळखुटा सरपंच श्री अनिल काकडे – उपसरपंच श्री गणेश घुगे,पोफळ शिवणी सरपंच – सौ.गीता घाडगे,उपसरपंच -श्रीमती विमल आडे .आंबेवाडी सरपंच सौ सुनिता शिंनगारे ‘उपसरपंच श्री जगदीश राठोड,विझोरा – सरपंच सौ सीमा भानुसे,उपसरपंच सौ शकुंतला झगरे,वडाळी – सरपंच सौ कुशीवर्ता साबळे -उपसरपंच श्री राजू साबळे,जगदरी -सरपंच सौ अश्विनी जायभाये उपसरपंच सौ अनिता सानप, भोसा -सरपंच किंगर मंदा गणेश .उपसरपंच – कुशीवर्ता एखंडे ‘राजेगाव . सरपंच श्री उमेश शेजुळ ‘उपसरपंच .श्री संजय भालेराव,सुलजगाव -सरपंच .गणेश किंगरे – उपसरपंच सौ मंदा किंगरे ‘ हनवतखेड(न.प. सिंदखेडराजा ) सरपंच -सौ आशा जायभाये, उपसरपंच – वर्षा जायभाये, दत्तापूर – सरपंच . संतोष राठोड . उपसरपंच – राजू पवार ‘साखरखेर्डा सरपंच दाऊद सेठ कुरेशी -उपसरपंच सौ शारदा पाझडे ‘देऊळगाव कोळ सौ शालू गायकवाड ‘उपसरपंच – दिलीप मोरे – गारखेड . सरपंच पिराशिला भालमोडे उपसरपंच रिक्त- ‘सर्व नवीन सरपंच उपसरपंच यांना शुभेच्छा देऊन गावच्या विकासासाठी त्यांनी हातभार लावावा हीच अपेक्षा !

 

सायळा गावच्या सरपंचपदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या रूपालीताई लंबे तर उपसरपंच पदी प्रविण सरकटे यांची निवड !

0

 

सिंदखेड राजा (सचिन खंडारे )

सिंदखेडराजा तालुक्यातील पहिल्या टप्प्यात 10 फेब्रुवारी रोजी पार पडलेल्या सरपंच उपसरपंच या निवडणुकीमध्ये ग्रामपंचायत सायाळा येथे सरपंच व उपसरपंच पदी करिता एकही अर्ज न दाखल झाल्या मुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या रूपाली ताई संदीप लंबे यांची अविरोध निवड करण्यात तर उपसरपंच पदी प्रविण शालीकराम सरकटे यांची निवड करण्यात आली यावेळी ग्रामपंचायत सदस्य म्हणून संदीप भिमराव लंबे मथुरा सुभाष लंबे
दिपक पुरूषोत्तम आव्हाळे गंगुबाई श्रीकिसन जाधव यांच्या उपस्थितीत सरपंच व उपसरपंच यांची अविरोध निवड करण्यात आली यावेळी ग्रामसेवक निवडणूक अधिकारी यांनी या निवडणुकीचे काम पाहिले
सायळा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एकहाती सत्ता आल्यामुळे गावकऱ्यांच्या आशा फल्लवित झाल्या आहे नवनिर्वाचित सरपंच रूपाली संदीप लंबे यांनी असे सांगितले की आपण गावाच्या सार्वगिंण विकासाकरिता कटीबद्ध आहे जिल्हाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते व पालकमंत्री नामदार डॉ राजेंद्र शिंगणे साहेब यांच्या माध्यमातून गाव विकासाला चालना देणार असल्याचे सांगितले
यावेळी सायळा गावातील नागरिकांच्या रूपाली संदीप लंबे व संदीप भिमराव लंबे यांनी आभार मानले आपण टाकलेल्या विश्वासाला कदापिही तडा जावु देणार नाही याची ग्वाही देखील दिली