Home Blog Page 54

उल्का नगरी ला सीसीटीव्ही चा अभाव प्रशासनाला सी सी टी व्ही नसल्याने अनेक घटना उघडकीस आणण्यात अडचणी चोरटे मोकाट…. पुरावे मिळत नसल्याने घटनांमध्ये वाढ(Lonarnews)

0

 

प्रतिनिधि सय्यद जहीर

शहरात सीसीटीव्ही कॅमेर्यांची नितांत आवश्यकता असल्याचे काही महिन्यात घडलेल्या घटनांवरून स्पष्ट होत आहे. अनेक मोठमोठ्या घटना घडल्यानंतर सीसीटीव्ही कॅमेरयांचा अभाव असल्याने पुरावे नसल्याची माहिती समोर येत आहे.
लोणार हे जागतिक पर्यटन स्थळ आहे. पंरतु हे अनेक मुलभूत सोयी सुविधा पासून कोसो दूर असल्याचे चित्र आहे. लोणार शहरात देश-विदेशातून पर्यटक येत असतात. मात्र या ठिकाणी त्यांच्या सुरक्षेचा दृष्टीने कोणतीही उपाययोजना पहावयास मिळत नाही.

लोणार शहरात वाढत्या चोऱ्या, वाढते पशुधन चोरी, अपघात, मनुष्य हरवल्याच्या अनेक तक्रारी पोलिस स्टेशनला प्राप्त होत आहेत. पंरतु लोणार शहरात असलेला सीसीटीव्ही कॅमेराचा अभावामुळे हया अनेक गुन्ह्यांना उघडकीस आणण्यात दिरंगाई होत असून तपासात अपयश येत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे लोणार शहराचा सुरक्षेचा प्रश्न असून जनमाणसात “असंतोष” निर्माण होत असल्याचे चित्र आहे.

एसटी भाडेवाडीच्या विरोधात शिवसेना किसान सेनेच्या वतीने वरवट बकाल येथे चक्काजाम आंदोलन(andolannews)

लोणार शहरात अनेक शाळकरी मुली हया लोणार ला बाहेर गावावरून शिकण्यासाठी येत असतात. त्यांना सुद्धा चीडीमारीचा बसस्थानक परिसर मुख्य चौकात सामना करावा लागत आहे तसेच लहान मुल शाळेतून येत असतांना दुचाकीस्वार हे तुला घ्यायला तुझ्या घरच्यांनी आम्हाला पाठवल आहे.

असे सांगून अपहरण करण्याच्या बेतात असल्याच्या घटना घडत असल्याची माहिती समोर येत आहे. तरी या सर्व घटनेंचे गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक प्रशासनाने पर्यटक, विद्यार्थीनी, लहान शाळकरी मुले-मुली यांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावे अशी मागणी होत आहे.

लोणार बसस्थानक परिसरात व लोणार शहरातील मुख्य ठिकाणी त्वरित सीसीटीव्ही कॅमेरे बसवल्यास घटनांचा तपास करण्यास तपासयंत्रणाना सोयीचे होईल. गुन्हा घडण्यावर ही आळा बसू शकतो.
भूषण मापारी पाटील, मा.नगराध्यक्ष,न.प. लोणार.

मेहकर येथे तत्कालीन उपविभागीय पोलिस अधिकारी म्हणून सोहेल शर्मा हे कार्यरत असतांना त्यांनी लोणार शहरात सीसीटीव्ही कॅमेरयांचा डेमो घेतला होता.

त्यावेळेस सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र नागरिक व पर्यटक यांच्या सुरक्षेची चिंता प्रशासनाला नसल्याचे दिसून येत आहे. किमान आतातरी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावे.
गजानन मोरे, सामाजिक कार्यकर्ते, लोणार.

लोणार शहरे ऐतिहासिक शहर आहे या शहरांमध्ये इतिहासा साठी इतिहासकार , सहली तसेच देश विदेशातून पर्यटक येत.

आहे परंतु या शहरांमध्ये प्रशासन कोणत्याही प्रकारचे गांभीर घेत नसून लोणारच्या चारी बाजूने अशी वैभवशाली स्वागत गेट उभारण्याचे व शहरांमध्ये विविध ठिकाणी कॅमेरे लावण्याची गरज आहे जेणेकरून शहरात येणारे जाणारे व्हानावर आणि चुकी ने घडणारी घटणा सुद्धा लक्ष देता येईल.

Lonarnews :तसेच लोणार शहरांमध्ये चालू असलेले अवैध धंदे ज्या च्यावर कुठेतरी आळा बसेल त्या मुळे प्रशासनाने तातडीनेया यावर्ती कार्य करावे मा.नगर सेवक तथा मा.संजय गाधी निराधार योजना तालुका अध्यक्ष शेख करामत शेख गुलाब

विदर्भस्तरीय आमदार चषक कब्बडी स्पर्धा मैदान चे भूमिपूजन(Hingnghat)

0

 

प्रतिनिधी सचिन वाघे   हिंगणघाट

Hingnghat::- दि. २८ जानेवारी, २०२५ ला स्थानिक मोहता विद्यालयाचे पटांगणात भव्य “आमदार चषक” पुरुष व महिलांचे कबड्डी सामने ७, ८,व ९ फेब्रुवारी २०२५ ला होणार असुन त्याच अनुषगाणे सुभाष बोस व्यायाम शाळेचे जेष्ठ क्रिडा प्रशिक्षक महादेव मडावी (पहेलवान) तसेच श्रेष्ठ खेळाडू विजय महाबुधे यांच्या शुभहस्ते भुमीपुजन कार्यक्रम पार पडला

ग्रामपंचायत घरपट्टी पाणीपट्टी वसुलीसाठी धडक मोहीम सुरू(Yavalnews)

उपरोक्त प्रसंगी मा. आ.समिर कुनावार हे प्रमुख उपस्थिती म्हणून हजर होते. आमदार स्वतः उत्कृष्ठ कबड्डी पटू असल्याने मंडळाचे आयोजनात प्रत्येक कार्यक्रमात हिरीरीने हजेरी लावतात हे उल्लेखनीय आहे.

Hingnghat:भुमीपुजनाचे प्रसंगी मंडळाचे समस्त सान, थोर, सदस्य,खेळाडू, प्रशिक्षक, आयोजन समितीचे सदस्य, पद‌सिद्ध पदाधिकारी हजर होते. उपरोक्त क्रिडा महाकुंभात हिंगणघाट शहरातील समस्त क्रिडाप्रेमीनी हजेरी लावावी असे आवाहान आयोजन समितीचे अध्यक्ष रितेश गांवडे व सचिव धनंजय बकाने व कार्याध्यक्ष रवि आस्कर यांनी केले.

अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या जळगांव जामोद तालुका अध्यक्ष पदी किशोर दाताळकर तर तालुका सचिव पदी नागेश भटकर (buldhananews)

0

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

buldhananews:जळगाव जामोद आसलगाव येथे २९ जानेवारी रोजी अहिल्यादेवी होळकर हॉलमध्ये अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाची महत्वपूर्ण बैठक पार पडली.

प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना अंतर्गत विविध स्पर्धा संपन्न(Lonar)

या बैठकीत जळगाव जामोद तालुका अध्यक्षपदी किशोर दाताळकर तर तालुका सचिव नागेश भटकर , तालुका कार्याध्यक्ष संतोष मांजरे , तालुका उपाध्यक्ष सुरेश मानकर , तालुका सल्लागार श्रीधर ओव्हेकर , यांची नावे बैठकी जाहीर करण्यात आली प्रदेशाध्यक्ष कैलासबापू देशमुख यांच्या मार्गदर्शनात तर अभिमन्यू भगत केंद्रीय सदस्य, दत्तु दांडगे जिल्हा उपाध्यक्ष ह्यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रम स्थळी नवनिर्वाचित तालुका अध्यक्ष, जिल्हा उपाध्यक्ष यांना शुभेच्छा देण्यासाठी असलगांवती सरपंच विष्णू इंगळे सामाजिक कार्यकर्ते प्रकाशसेठ ढोकणे , उल्हास माहोदे होते तर बैठकीत जिल्हाध्यक्ष प्रताप मोरे , जिल्हाध्यक्ष विजय जोशी , सचिन खंडारे , राजेंद्र मोरे , डॉक्टर उमाळे , प्रल्हाद देशमुख जिल्हासचिव ,अजय टप प्रदेश संघटक ,श्रीकृष्ण भगत

जिल्हा कार्याध्यक्ष, मंगेश राजनकार कार्यलय प्रमुख, सुरेश यादव , प्रदीप शर्मा, संतोष कुलथे , संतोष जांभे , जाधव , प्रभुदास पारस्कर , अशोक इंगळे शिवाजी चिमकर , विवेक पाऊल झगडे व तसेच निमंत्रित मंडळी अनिल पाटील , जयदेव वानखडे, प्रीतम ठाकुर , गुलाबराव इंगळे , विनोद चिपडे , अश्विन राजपूत किसान एकता संघ दिल्ली

महासचिव पवन ठाकूर , गणेश गिरे , संजय दांडगे , भगवान टापरे ,अमोल भगत, सुरेश कलंत्री, अनिल भगत, विजय वानखेडे , विनोद वानखेडे , गजानन सोनटक्के तालुक्यातील सर्व पत्रकार मंडळी बहुसंख्येने कार्यक्रमास उपस्थित होते
तालुका अध्यक्ष व जिल्हा उपाध्यक्ष ह्याचे असलगांव व जळगांव तालुक्यातील मित्रमंडळी व गावकरी शुभेच्छा वर्षाव करत आहेत.

ग्रामपंचायत घरपट्टी पाणीपट्टी वसुलीसाठी धडक मोहीम सुरू(Yavalnews)

0

 

यावल प्रतिनिधी विकी वानखेडे

यावल तालुक्यातील ग्रामपंचायत हद्दीतील मालमत्ता कराची थकीत वसुली करण्यासाठी

गट विकास अधिकारी डॉक्टर मंजुश्री गायकवाड, विस्ताराधिकारी, ग्रामविकास अधिकारी
सरपंच , उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी यांनी थकीत मालमत्ता कर धारकांवर वसुलीसाठी जप्ती कारवाईस सुरुवात केलेली आहे.

प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना अंतर्गत विविध स्पर्धा संपन्न(Lonar)

या कारवाईचा धसका घेऊन मागील

दोन दिवसात चार लाख 40 हजार रुपयांची थकीत कराची वसुली करण्यात या चार ग्रामपंचायती यशस्वी ठरली आहे.

शिरसाळ 155000 , आडगाव 90000, अठरावल 20000, न्हावी प्र या,175000 ,तालुक्यातील ग्रामपंचायत मध्ये मालमत्ता कर थकीत आहे.थकीत कराची वसूली होत नसल्यामुळे त्याचा परिणाम ग्रामपंचायतीच्या विकास कामांवर होऊन ती कामे ठप्प होत आहेत.ही बाब गांभीर्याने घेत , यांनी सर्व ग्रामपंचयाय लोकप्रतिनिधी, कर्मचारी यांना विश्वासात घेत मागील दोन दिवसांपासून मालमत्ता कर वसुलीसाठी धडक मोहीम सुरू केली आहे.

ग्रामपंचायत प्रशासनाने सुरू केलेल्या या कारवाईचा धसका घेऊन मागील दोन दिवसात 4 लाख चाळीस हजार रुपयांची थकीत कराची वसुली करण्यात ग्रामपंचायत यशस्वी झाली आहे.

Yavalnews:ग्रामपंचायत हद्दीत मोठ्या प्रमाणावर अनधिकृत मालमत्ता असून त्या मालमत्तांना अजूनही मालमत्ता कर आकारणी केलेली नसल्याने अशा मालमत्तांचा शोध घेऊन त्यांना लवकरात लवकर दंडासह मालमत्ता कर आकारणी करून ग्रामपंचायतीचे उत्पन्न वाढ केली जाईल अशी माहिती गट विकास अधिकारी डॉक्टर मंजुश्री गायकवाड यांनी दिली आहे.

एसटी भाडेवाडीच्या विरोधात शिवसेना किसान सेनेच्या वतीने वरवट बकाल येथे चक्काजाम आंदोलन(andolannews)

0

 

संग्रामपुर /  सूर्या मराठी न्यूज ब्युरो चीफ

andolannews:राज्य परिवहन महामंडळाने केलेल्या एसटी भाडेवाढीच्या विरोधात शिवसेना (उबाठा) किसान सेनेच्या वतीने २९ जानेवारी रोजी वरवट बकाल बस स्टॉप वर चक्का जाम आंदोलन करण्यात आले.

प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना अंतर्गत विविध स्पर्धा संपन्न(Lonar)

महाराष्ट्रात महायुती सरकारने अव्वाच्या सव्वा एसटी भाडे वाढ केली असून या भाढेवाडीने शेतकरी, गोरगरीब लोकांचे कंबर्डे मोडले आहे ही भाडेवाढ तात्काळ रद्द व्हावी या मागणीसाठी हे चक्काजाम आंदोलन करण्यात आले यावेळी.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

“जय भवानी जय शिवाजी”हा आवाज कुणाचा शिवसेनेचा , एसटी भाडेवाढ रद्द झालीच पाहिजे अशी कशी होत नाही झाल्याशिवाय राहत नाही अशा गगनभेदी घोषणा देण्यात आल्या यावेळी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी वरवट बकाल बस स्टॉप वर एसटी थांबवून झालेली जुलमी भाडेवाढ रद्द करण्याची मागणी केली. यावेळी पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवला होता.

andolannews:आंदोलकांमध्ये अमोल ठाकरे शिवसेना किसान सेना तालुकाप्रमुख,अजय घिवे युवा सेना विधानसभा संघटक, धनंजय अवचार, भगवान पवार, सुनील मुकुंद, शिवाजी अढाव माजी युवा सेना तालुकाप्रमुख, रामदास मोहे उपताप्रमुख किसान सेना , विशाल बकाल, नंदू अढाव, गजानन वानखडे,अतुल बांगर,संजय ठाकुर, गजानन गोल्हर,मनोज आवारे,आदी शिवसेना पदाधिकारी तथा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पत्रकार इस्माईल शेख यांनी सापडलेला मोबाईल केला शेगांव पो.स्टे. ठाणेदार नितिन पाटील यांच्याकडे सुपूर्द..(mobaile)

0

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

mobaile:शेगांव येथील निर्भिड पत्रकार इस्माईल शेख हे २८ जानेवारीच्या रात्रीअतिक्रमणाची बातमी घेण्यासाठी गेले असता त्यांना शेगांव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे रस्त्यावर एक विवो कंपनीचा अँड्रॉइड मोबाईल किमंत अंदाजे १८००० रुपयांचा आढळून आला.

प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना अंतर्गत विविध स्पर्धा संपन्न(Lonar)

पत्रकार इस्माईल शेख यांनी पत्रकारितेची माणूस दाखवत लगेच शेगांव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितिन पाटील यांना मोबाईल सापडल्याचा रात्री २:३६ मिनिटांनी व्हॉट्सॲपला मॅसेज टाकला व दुसऱ्या दिवशी शहर पोलीस स्टेशन गाठत पत्रकार इस्माईल शेख यांनी तो सापडलेला मोबाईल हा ठाणेदार नितीन पाटील यांच्याकडे सुपूर्द केला.

लाईव्ह बातमी पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

यावेळेस नितिन पाटील यांनी पत्रकार इस्माईल शेख यांच्या पाठीवर शाबासकीची थाप मारत त्यांचे कौतुक केले.

mobaile:इस्माईल शेख यांच्या सोबत पोलीस स्टेशनला मोबाईल जमा करतेवेळी पत्रकार अनिल उंबरकर, राजकुमार व्यास, विवेक शेगांवकर, गजानन ददगाळ, महेंद्र मिश्रा, ललित देवपूजारी हे उपस्थित होते.

घरकुलच्या लाभार्थ्यांना लुटण्याचा ग्रामसेवकाचा नवा प्रयोगएजेंट मार्फत एक फाईल तयार करण्याचे आठशे रुपये?ग्रामसेवक म्हणतो याच एजंट कडून काम करून घ्या!(Gharkulyojna)

0

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक नागरिकाला प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल योजना चालू केली असून या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना स्वतःचे घराचे स्वप्न पूर्ण करता येते परंतु या योजनेला पंचायत समिती मधील ग्रामसेवक आणि त्यांनी नियुक्त केलेल्या दलालांमुळे घरकुल चे स्वप्न रंगवणाऱ्या लाभार्थ्यांना आर्थिक भुर्दंदंडाला सामोरे जावे लागत आहे.

सिंदखेड राजा पंचायत समिती मध्ये पत्रकार सुरेश हुसे यांच्या नावावर निमगाव या ठिकाणी घरकुल मंजूर झाले आहे. त्या घरकुलाचे करारनामे 100 रुपयाच्या बॉण्डवर करण्यासाठी व संपूर्ण कागदपत्र फाईल भरून देण्यासाठी ग्रामसेवकांनी स्वतः एजंटला भेटण्याचे सांगून त्यांच्याकडून काम करून घ्या असे बजावले.

प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना अंतर्गत विविध स्पर्धा संपन्न(Lonar)

सदर प्रकरण हे घरकुल लाभार्थ्यांचे आर्थिक लुटमारीचे असल्याचे पत्रकारांच्या लक्षात आल्यावर पत्रकार यांनी सदर घटनेची माहिती गटविकास अधिकारी सिंदखेड राजा आणि ग्रामसेवक यांना दिली बिडिओ पंचायत समिती सिंदखेड राजा यांनी ग्रामसेवक तसेच एजंट यांच्या नावे तक्रार द्या मी कारवाई करतो असे म्हटले आहे.

गटविकास अधिकारी पंचायत समिती यांना देण्यात आलेल्या तक्रारी मध्ये पत्रकार सुरेश हुसे यांनी असे म्हटले आहे की, घरकुल ची फाईल बनवण्यासाठी ग्रामसेवक संतोष भुतेकर यांनी त्यांचा एजंट प्रवीण खांडेभराड यांच्याकडे मला पाठविले. सदर एजंटने घरकुल फाईल तयार करण्यासाठी माझ्याकडून नगदी 800 रुपये घेतले आहे.

सदर फाईल करण्यासाठी आशा एजंटची आवश्यकता नसतांना फक्त ग्रामसेवकांनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी एजेंट ची नेमणूक केली असून त्या एजंट मार्फत घर धारकाकडून प्रतिपश लाभार्थी आहेत आठशे रुपये घेऊन मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट सुरू असून संबंधित एजंट व त्याला नियुक्त केलेल्या ग्रामसेवकावर तात्काळ गुन्हा दाखल करावा. असे या निवेदनात म्हटले आहे.

 लाईव्ह बातमी सविस्तर पहा 

तक्रार अर्ज हातात येणार नाही, तो पर्यंत कारवाई करणार नाही – गटविकास अधिकारी पत्रकार सुरेश हुसे यांनी केलेल्या घरकुलाच्या फाईल मध्ये त्यांची आर्थिक लूट झाली असून, याची माहिती गटविकास अधिकारी यांना भ्रमणध्वनी वरून दिली असता तुम्ही तक्रार अर्ज दाखल करा मी त्वरित कारवाई करतो. असे गटविकास अधिकारी म्हणाले होते मात्र आता जोपर्यंत तक्रार अर्ज आवक-जावक मधून गटविकास अधिकारी यांच्याकडे येणार नाही तोपर्यंत त्यांना यावर कारवाई करता येणार नाही.

Gharkulyojna :असे स्वत: गटविकास अधिकारी हे माध्यमांशी बोलत असताना म्हणाले आहे. जर आठ दिवस अर्ज आवक-जावक मधून गटविकास अधिकारी यांच्या कडे जाण्यासाठी वेळ लागला तर आठ दिवसांमध्ये किती नागरिकांची आर्थिक लूट होईल असा प्रश्न आता सगळ्यांना पडू लागला आहे. व या आर्थिक लुटेला जबाबदार कोण राहील? हा सवाल आता सर्वत्र उपस्थित होत आहे.

प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना अंतर्गत विविध स्पर्धा संपन्न(Lonar)

0

 

प्रतिनिधी सय्यद जहीर

तालुक्यातील बिबि येथे पंतप्रधान कृषी सिंचन योजना pmksy 2.0 अंतर्गत विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी प्रामुख्याने वसंतराव नाईक कनिष्ठ महाविद्यालय बीबी येथील शाळेमध्ये निबंध स्पर्धा व चित्रकला स्पर्धा घेण्यात आले.

तर दिनांक 27 जानेवारी रोजी येथील संतोषी माता मंदिराच्या प्रांगणामध्ये रांगोळी स्पर्धा व वृक्षारोपण चा कार्यक्रम घेण्यात आला यावेळी गावातील महिलावर्ग मुलींनी मोठा सहभाग घेतला होता.

Lonar:या विविध स्पर्धेच्या वेळी विद्यार्थी व गावातील महिला पुरुष वर्गांना पंतप्रधान कृषी सिंचन योजनेची माहिती कृषी मंडळ अधिकारी अनिल सांगळे कृषी पर्यवेक्षक विलास जाधव साहेब यांनी मार्गदर्शन केले यावेळेस प्रामुख्याने सरपंच चंदाबाई गुलमोहर, रामराव इंगळे ,समूह संघटक रामेश्वर सोनकांबळे, सिविल इंजिनिअर श्रीकांत भुमरे, कृषी सहाय्यक कविता साखरे, सचिव प्रामुख्याने उपस्थित होते.

समाजाच्या दफन भूमी मधील अनधिकृत अतिक्रमण हटविण्यासाठी सुलतानपूर येथे आमरण उपोषण(Lonarnews )

0

 

प्रतिनिधि सय्यद जहीर

अज्ञात व्यक्तीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा बसविला…..

 

Lonarnews:दिनांक ४ जानेवारी २०२५ रोजी रात्रीच्या वेळेला सुलतानपूर येथील नाथबाबा(गार पगारी) समाजाच्या दफनभूमीमध्ये अज्ञात लोकांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा बसवून अतिक्रमण केले आहे. पुतळ्याला पर्यायी जागा देऊन अतिक्रमण हटविण्यासाठी नाथ बाबा (गारपगारी) समाज बांधवांच्या वतीने आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आलेली आहे.

सविस्तर वृत्त असे की, दिनांक ४ जानेवारी २०२५ रोजी रात्रीच्या वेळेला सुलतानपूर या ठिकाणी लोणार रोडला लागून असलेल्या नाथबाबा ( गारपगारी) समाजाच्या दफनभूमी मध्ये अज्ञात व्यक्तीने लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचा पुतळा बसवून अतिक्रमण केले आहे.

या विषयाची चाहूल नाथ बाबा (गारपगारी )समाजाचे व्यक्ती आणि अनिल ठाकरे यांना आल्यामुळे त्यांनी ३ जानेवारी २०२५ लोणार तहसिलदार यांना या विषयी निवेदन सादर केले होते. तसेच संबंधित पोलीस प्रशासन व महसुल विभाग वरिष्ठ अधिकारी यांना सुद्धा निवेदन देऊन हे अनधिकृत अतिक्रमण काढण्याच्या संदर्भात अनिल ठाकरे यांनी विनंती केलेली आहे. परंतु संबंधित अधिकारी यांनी निष्काळजी व हलगर्जीपणा केल्यामुळे या समाजाला नाईलाजास्तव दिनांक २० जानेवारीपासून आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागला आहे.

४ जानेवारी २०२५ ला ही बाब उघडकीस येताच सुलतानपूर ग्रामपंचायत विस्तार अधिकारी श्री गजानन कावरके यांनी मेहकर पोलीस स्टेशन यांना लेखी स्वरूपात माहिती दिली. या ठिकाणी नाथबाबा (गारपगारी) समाजाची पूर्वापारपासून दफन भूमी (स्मशानभूमी) असल्याबद्दलचे रेकॉर्ड महसूल विभागात उपलब्ध आहे. या विषयीचा असलेल्या सातबारावर ४०×७०ची नोंद आहे. परंतु गावात आणि समाजात कलह निर्माण होऊ नये म्हणून लोणार नायब तहसीलदार ईप्पर साहेब, मंडळ अधिकारी, तलाठी संतोष पनाड, हेडकॉन्स्टेबल केदार साहेब, ग्रामपंचायत विस्तार अधिकारी गजानन कावरके, हेड कॉन्स्टेबल राजेश जाधव, तसेच गावकरी संगपाल नागवंशी पनाड, शिवप्रसाद जोगदंड यांनी उपोषण करत्या सोबत चर्चा करून तडजोड करण्याचा प्रयत्न केला.

Lonarnews:परंतु अनिल ठाकरे उपोषण करते यांनी त्यांच्या निर्णयाला मान्य न करता आमची दफनभूमी (स्मशानभूमी) लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचा पुतळयाचे अतिक्रमण काढून आम्हाला जागा मोकळी करून वालकंपाऊंड करून देण्यात यावे असा निर्णय घेतल्यामुळे सर्वच हतबल होऊन परत गेले. दिनांक १६/०१/२०२५ रोजी सुलतानपूर ग्रामपंचायत विस्तार अधिकारी यांना लोणार तहसिलदार यांनी कोणतीही व्यक्ती ,संघटना, संस्था, शासकीय व निमशासकीय संस्थेच्या तसेच खाजगी मालकीच्या जागेवर मा. जिल्हाधिकारी यांच्या परवानगीशिवाय पुतळा बसविता येत नसताना सुद्धा सुलतानपूर येथे हा प्रकार घडत आहे आपण पुतळा धोरण व दिनांक ३ मे २०१७ चे शासन निर्णयानुसार कार्यवाही करत नसल्याचे दिसून येत आहे तरी सदर प्रकरणी कार्यवाही करून कार्यालयास कळवावे अशी सूचना दिली होती.आता प्रशासन लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचा पुतळा हविटणार की, वाटाघाटी करण्याची तडजोड करणार, कोणता निर्णय घेणार याकडे सर्व गावकऱ्यांचे लक्ष लागून आहे. गावकऱ्यांमध्ये उलट सुलट चर्चेला उधान आलेले आहे एवढे मात्र खरे

अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग ,तहसील कार्यालय शेगाव अंतर्गत 100 दिवसाचा कृती आराखडा राबविण्यात येत आहे. त्यामध्ये माननीय तहसीलदार दिपक बाजड साहेब यांच्या संकल्पनेतून(shegaonnews)

0

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

shegaonnews:आज 26 जानेवारी 2025 रोजी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून शेगाव तालुक्यातील रास्त भाव दुकानदार यांनी सन 2024 मध्ये Aepds प्रणाली अंतर्गत इ पॉस मशीन द्वारे लाभार्थ्यांना धान्य वाटपामध्ये जे उल्लेखनीय कार्य केले त्याबद्दल 28 रास्तभाव दुकानदार यांना शेगाव तहसीलचे कर्तव्यदक्ष माननीय तहसीलदार आदरणीय श्री दिपक बाजड साहेब यांच्या शुभहस्ते प्रशस्तीपत्र देवून गौरवण्यात आले.

सदर वेळी निवासी नायब तहसीलदार खेडकर साहेब, नायब तहसीलदार सातव साहेब, नायब तहसीलदार पारखे मॅडम, निरीक्षण अधिकारी शेगाव संतोष बावणे साहेब, पुरवठा निरीक्षक किसन केणे , गोदाम व्यवस्थापक श्रेणी -२ विष्णू अंभोरे , पी जी पवार साहेब, मिरगे साहेब, महातो साहेब, व इतर सर्व तहसील कार्यालयातील अधिकारी कर्मचारी व रास्त भाव दुकानदार तालुका शेगाव उपस्थित होते*.