Home Blog Page 540

किनगाव येथे एका कांदा उत्पादक शेतकऱ्याची कांदा खरेदी करून व्यापाऱ्याकडुन लाखो रूपयात फसवणुक पोलीसात गुन्हा दाखल

0

 

(प्रतिनिधी )विकी वानखेडे

यावल तालुक्यातील किनगाव बु येथील एका कांदा खरेदी करून खोटे धनादेश देवुन उत्पादक शेतकऱ्याची लाखो रुपयात फसवणुक करून जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी यावल पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे . या संदर्भात पोलीस सुत्रांकडुन मिळालेल्या माहीतीनुसार छगन प्रमोद चौधरी वय५२ वर्ष शेतकरी ,राहणार किनगाव बु यांच्याकडुन किनगाव खुर्द येथील जय मातादी ट्रेडर्स किनगावचे संचालक संदीप सुधाकर कोळी , आणी घनःश्याम सुधाकर कोळी यांनी सन् २०२०च्या फेब्रुवारी ते मार्च २०२०या कालावधीत चौधरी यांच्या शेतात उत्पादीत केलेले ३६टन कांदे किमत६ लाख११ हजार२५९चे विकत घेवुन त्यापैक्की २लाख५२ हजार रुपये रोख देवुन उर्वरीत रक्कम ३ लाख६३ हजार२३९ रूपये त्याचे पैसे न देता तिन धनादेश स्वरूपात स्टेट बँक ऑफ इंडीया चे दिले मात्र संबधीतांच्या खात्यात रक्कम नसल्याने तिघ धनादेश बाऊंस झालेत , धनादेश अनादर झाल्याबाबत संशयीत आरोपींना विचारणा केली असता त्यांनी आपणास जिवे ठार मारण्याची धमकी दिली असल्याची फिर्याद छगन प्रमोद चौधरी यांनी दाखल केल्याने त्यांच्या विरुद्ध भाग ५ गु .र .न.५२ / २०२१ भादवी कलम४२०, ५०६ , ३४प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार विजय पाचपोळे व पोलीस कर्मचारी करीत आहे .

डोंगर कठोरा ग्रामपंचायत अंतर्गत झालेल्या सर्व निकृष्ठ विकास कामांची चौकशी नव्या कारभाऱ्यांनी करावी ग्रामस्थांची अपेक्षा

0

 

 

( प्रतिनिधी )विकी वानखेडे . यावल तालुक्यातील डोंगर कठोरा गावात झालेल्या लाखो रुपयांच्या विविध कामांचा खेळखंडोबा निविदा अटीशर्ती नियम धाब्यावर ठेवुन बांधण्यात आलेल्या कामांची वरीष्ठ पातळीवर चौकशी करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांकडुन होत आहे . यावल तालुक्यातील डोंगर कठोरा या गावात मागील वर्षी २०२०मध्ये १४ व्या वित्त आयोग , दलीत वस्ती सुधार योजना, रोजगार हमी योजना असो अशा विविध शासन पातळीवरील योजनांच्या माध्यमातुन लाखो रुपयांचे निधी जिल्हा परिषद आणी पंचायत समितीच्या माध्यमातुन उपलब्ध झाला होता . दरम्यान या योजनांच्या कामांना ग्रामपंचायत पातळीवर करण्यात आले असुन गावातील झालेली सर्व विकासकामे ही गुणवत्ता नसलेली व अत्यंत निकृष्ठ प्रतिची झालेली आहे .डोंगर कठोरा ग्रामपंचायतीच्या तत्कालीन सरपंच वगळता सर्व सदस्यांची झालेली अपात्रता त्यावर प्रशासकाची नेमणुक अशा गोंधळलेल्या कारभारात संधीसाधु ठेकेदार व आर्थिक स्वार्थाला बळी पडणारे पंचायत समितीचे भ्रष्ठ अधिकारी यांच्या संगमताने झालेल्या या विकास कामांची पुर्ण वाट लावण्यात आली असुन गावात नुकत्याच संपलेल्या निवडणुकीत सर्व नवख्यांना संधी मिळाली असुन या विजयी झालेल्या नव र्निवाचित ग्रामपंचायत कारभाऱ्यांनी झालेल्या या कामांची गुणवत्ता तपासावी व शासनाचे नियम धाब्याव ठेवुन निकृष्ठ कामे करणाऱ्या संबधीत ठेकेदारावर कारवाई करावी अशी अपेक्षाकृत मागणी ग्रामस्थांकडुन करण्यात येत आहे .

लय भारी साहित्य समूह आयोजित प्रजासत्ताक दिनानिमित्त पहिले राज्यस्तरीय ऑनलाईन लेखी कवी संमेलन यशस्वीरित्या संपन्न

0

 

प्रजासत्ताक दिनानिमित्त पहिले ऑनलाइन राज्यस्तरीय कवी संमेलन घेण्यात आले होते.

कोरोणाच्या पार्श्वभूमीवर कवींनी लिहिलेल्या कवितांचे सादरीकरण करण्यासाठी टेज कार्यक्रम बंद असल्यामुळे ऑनलाइन पद्धतीने काव्यसंमेलन घेण्यात येतात त्याच पद्धतीने लय भारी साहित्य समूह यांच्यावतीने ही प्रजासत्ताक दिनानिमित्त पहिली राज्यस्तरीय ऑनलाइन लेखी कवी संमेलन व्यवस्थित रित्या ऑनलाइन पद्धतीने पार पडले.

 

 

या पहिल्याच राज्यस्तरीय कवीसंमेलनाला सर्व कवी मित्रांकडुन उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. व स्वरचित लिहिलेल्या कविता या प्रसिद्धी करण्यासाठी त्यांना संधी मिळाली त्यामुळे आनंदाई पद्धतीने हे ऑनलाईन लेखी काव्यसंमेलन संपन्न झाले.

 

या काव्य संमेलनाचे संचालक , अनिल शामराव केंगार सांगोला , संचालक प्रमोद सूर्यवंशी मुंबई , संचालिका सौ , किरणताई मोरे चव्हाण गोंदिया यांनी खूप नियोजनबद्द कार्यक्रमाचे आयोजन केले होते. , व या कवीसंमेलनाला श्री. संतोष बाजीराव रायबान मंगळवेढा , यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले . व सर्व कवींच्या कवितांना दाद देत त्यांच्या कवितांचे परीक्षण करून सहभागी कवींचे नंबर काढून त्यांना ऑनलाइन पद्धतीने प्रमाणपत्र देऊन सर्वांचे अभिनंदन केले.

 

 

शब्दांचे धारदार वार
थेट काळजात भिडले
गोडी लागली कवितेची
आणि मन कवितात रमले

सर्व क्रमांक पुढील प्रमाणे काढले आहेत. सर्वोत्कृष्ट – सौ , वैभवी मराठे , उत्कृष्ट – प्रा . सौ , कल्पना निंबोकार अंबुलकर , प्रथम – शुभांगी देशमुख , द्वितीय – हरिदास गौतम , तृतीय – चित्तरंजन महादेव भगत , उत्तेजनार्थ – पी . जी . ठाकूर , राकेश प्रभावती बुधाजी डाफळे , संगीता महाजन ,

सहभागी – वसंत गवळी , सुमित राठोड , पंकज रा कासार काटकर , संजय बुऱ्हाडे , बबिता तोरणे , गणेश मगर , अमीर पटेल , रत्ना मनवरे , संध्या देशपांडे , बालाजी नाईकवाडी , सुरेश वडर , विद्या शरद श्रॉफ , मधुकर गायकवाड , रुकसाना मुल्ला , उषा चौधरी सातपुते , अमित अनंत कडव , मीनाक्षी परशुराम काळेले , अथर्वा मनचेकर , अस्मिता सावंत , रेखा बावा , मंदाताई वाघमारे , शशिकला गुंजाळ ह्या सर्व कवी / कवयित्री यांनी कार्यक्रमाची आपल्या काव्यातून शोभा वाढवली.

१३ जानेवारी ते २३ जानेवारी पर्यन्त चालनारी ही काव्यमय श्रखंला आनंदमय प्रेमाने आणि शांततापणे पार पडली. आणि
सगळ्या कविता बहरदार असल्याने आनंद गगनात मावत नव्हता .

 

कामात सगळे व्यस्त होऊन सुद्धा ही काव्य स्पर्धा पार पडली.
मला माझ्या लयभारी साहित्य समूहाचा अभिमान आहे. असे सांगत कार्यक्रमाच्या मान्यवरांनी सर्व कवींना
पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा .

नारी शक्ती पुरस्कारासाठी अर्ज सादर करावे 30 जानेवारी 2021 अंतिम मुदत

0

 

अजहर शाह मोताळा

बुलडाणा:-दि. 28 : केंद्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागाद्वारे समाजात महिला सशक्तीकरण, समाज व राष्ट्र निर्माण करण्याचे कामात उत्कृष्ट योगदान देणारी व्यक्ती , संस्था यांना दरवर्षी नारी शक्ती राष्ट्रीय पुरस्कार देण्यात येतो. जागतिक महिला दिनी 8 मार्च रोजी सदर पुरस्काराचे वितरण करण्यात येते. या पुरस्काराकरीता ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे.
या पुरस्कासाठी दि. 1 जुलै 2020 रोजी ज्या व्यक्तींचे वय किमान 25 वर्ष पुर्ण केलेले आहे आणि ज्यांना यापुर्वी नारी शक्ती पुरस्कार, स्त्री शक्ती पुरस्कार मिळालेला नाही. तसेच ज्या संस्था, गट, संघटना यांनी किमान 5 वर्षे संबंधीत क्षेत्रात काम केलेले आहे आणि ज्यांना यापुर्वी नारी शक्ती पुरस्कार , स्त्री शक्ती पुरस्कार मिळालेला नाही, असे व्यक्ती किंवा संस्था, गट, संघटना हे नारी शक्ती पुरस्कारासाठी पात्र आहेत.
कौशल्य विकासासाठी महिलांना प्रोत्साहित करणे, ग्रामीण महिलांसाठी मुलभुत सुविधा सुकर करणे, विज्ञान व तंत्रज्ञान, क्रिडा, कला, संस्कृती आदी क्षेत्रांमध्ये ठोसपणे व सार्थपणे बचाव व सुरक्षा, आरोय, शिक्षण, कौशल्य विकास, जीवन कौशल्य महिला सक्षमीकरणाचा व्यक्ती किंवा संस्था, गट, संघटना यांना अनुभव असावा. राज्य अथवा केंद्रशासी प्रदेशात बाल लैंगिक गुणोत्तर अचुकपणे सुधारणा करण्याचे काम करणाऱ्यांचा या पुरस्कारासाठी प्रथम प्राधान्याने विचार करण्यात येणार आहे.
अर्जदाराने नारी शक्ती पुरस्कारासाठी अर्ज, नामनिर्देशन केवळ ऑनलाईनव्दारे केंद्र शासनाचे www.narishakti puraskar.wcd.gov.in या वेबसाईटवर भरायचे आहेत. सदर वेबसाईटची लिंक महिला व बाल विकास मंत्रालयाच्या www.wcd.nic.in या कार्यालयीन वेबसाईटवर देखील उपलब्ध आहे. ऑनलाईन अर्जात नमुद केलेल्या कागदपत्रांसह नामांकने सादर करावे. नामांकने सादर करावयाची अंतिम तारीख ही 30 जानेवारी 2021 आहे. नारी शक्ती पुरस्कारासाठी पात्र इच्छुक व्यक्ती किंवा संस्था / गट / संघटना यांना उपरोक्त वेबसाईटवर ऑनलाईन पध्दतीने प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी अरविंद रामरामे यांनी केले आहे.

स्व. गोविंदभाऊ शेंडे इनकी स्मृति में पप्पल क्रिकेट क्लब मरारटोली द्वारा जिल्हा स्तरीय क्रिकेट टू्र्नामेंट का उद्घाटन आज जिला क्रीड़ा संकुल में किया।

0

 

स्थानीय स्तर पर ऐसे खेल आयोजनों से ही प्रतिभावंत खिलाडियों को नए अवसर प्राप्त होते है। हम सभी को अपने व्यस्त दिनचर्या में से कुछ समय निकालकर ऐसे खेलो के माध्यम से उत्साही और निरोगी रहने का प्रयास करना चाहिए।

जिसमे प्रमुख रूप से पूर्व विधायक श्री राजेंद्र जी जैन, जिला क्रीड़ा अधिकारी श्री राठौड़, आयोजक श्री सचिन शेंडे (पार्षद) श्री बबनराव जी शेंडे, बाराई सर, सहारे सर, मेश्राम सर, वहाब सर, तूरकर सर, ठाकुर सर उपस्थित थे।
[28/01, 5:57 pm] Gondiya Sailesh Rajnkar: स्व गोविंदभाऊ शेंडे यांच्या स्मरणार्थ, पप्पल क्रिकेट क्लब मराराटोली यांच्या हस्ते आज जिल्हा क्रीडा संकुलात जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन झाले.

स्थानिक पातळीवर अशा खेळाच्या स्पर्धांमुळे केवळ प्रतिभावान खेळाडूंना नवीन संधी मिळतात. आपण सर्वांनी आपल्या व्यस्त नित्यक्रमामधून थोडा वेळ काढून अशा खेळांद्वारे उत्साही व निरोगी राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

ज्येष्ठ आमदार श्री. राजेंद्र जी जैन, जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. राठौर, आयोजक श्री. सचिन शेंडे (नगरसेवक) श्री बबनराव जी. शेंडे, बरई सर, सहारे सर, मेश्राम सर, वहाब सर, तुरकर सर, ठाकूर सर हे उपस्थित होते. उपस्थित.

पाचवी ते आठवी पर्यंत शाळा सुरू . साखरखेर्डा प्राथमिक आरोग्य केंद्रात २५० शिक्षकांची कोरोना स्टेस , सर्व निगेटिव्ह

0

सिंदखेड राजा (सचिन खंडारे )
जिल्हा परिषद आणि माध्यमीक शाळा मधील पाचवी ते आठवी पर्यंत चे वर्ग सुरु करण्याचे आदेश शिक्षण मंत्र्यांनी दिल्यानंतर प्रत्येक शिक्षकांची कोरोना स्टेस सुरु आहे . साखरखेर्डा प्राथमिक आरोग्य केंद्रात २५० शिक्षकांची कोरोना स्टेस करण्यात आली असता सर्व शिक्षकांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत . अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ संदिप सुरुशे यांनी दिली .
महाराष्ट्र शासनाने दिवाळी नंतर ९ वी ते १२ वीचे वर्ग सुरु केले होते . ते वर्ग सुरु करतांना पालकांची सहमती आवश्यक ठेवण्यात आली होती . त्यावेळी प्रथम दोन टप्प्यांत वर्ग भरविण्यात आले होते . परंतू सुरवातीला विद्यार्थ्यांनी प्रतिसाद दिला नाही . केवळ १० टक्के उपस्थिती होती . त्यानंतर मात्र उपस्थिती वाढली .आणि विद्यार्थांचा चांगला प्रतिसाद मिळाला . कोरोना संक्रमणाची भिती दुर सारत सोशल डिस्टनचे अंतर राखून आणि तोंडाला रुमाल किंवा मास्क लावून विद्यार्थी आले . शाळांमध्ये सेनिटाझरचा वापर करण्यात आला . दररोज तपासणी करण्यात आली . त्यामूळे साखरखेर्डा , शेंदुर्जन मलकापूर पांग्रा येथील शाळेत एकही विद्यार्थी कोरोना पाॅझिटीव्ह आढळून आला नाही . शिक्षक आणि संस्था चालक यांनी घेतलेली खबरदारी उपयोगी आली . तोच धागा धरुन पाचवी ते आठवी पर्यंतच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून प्रथम पाचवी ते आठवी पर्यंत शिकवीणीचे कार्य करणाऱ्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा आणि माध्यमिक शाळा मधील साखरखेर्डा प्राथमिक आरोग्य केंद्रात अंतर्गत असलेल्या साखरखेर्डा , सवडद , मोहाडी , राताळी , तांदूळवाडी , दरेगाव , शेंदुर्जन , शिंदी , पिंपळगाव सोनारा , सावंगी भगत , गुंज , वरोडी , राजेगाव , सायाळा , लिंगा , जागदरी , जनुना तांडा , बाळसमुद्र , गोरेगाव , उमनगाव , पांग्रीकाटे ,राताळी या २२ गावातील २५० शिक्षकांची कोरोना स्टेस करण्यात आली . या स्पेस मध्ये सर्व शिक्षक निगेटिव्ह आले आहेत .
——————————————————–
सर्व शिक्षक निगेटिव्ह आले असले तरी पालकांनी आपल्या मुलांना शाळेत पाठवितांना तोंडाला रुमाल किंवा मास्क लावून शाळेत पाठवावे . कोरोना संसर्गजन्य आजार कमी झाला असला तरी भिती कायम आहे .
डॉ संदिप सुरुशे
वैद्यकीय अधिकारी , प्राथमिक आरोग्य केंद्र साखरखेर्डा

पलढग धरणाच्या जलाशयात दोन इंजिन बोटींचे उद्घाटन

0

 

अजहर शाह मोताळा

बुलडाणा दि. 27 : प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर 26 जानेवारी रोजी ज्ञानगंगा अभयारण्यातील पलढग धरणाच्या जलाशयामध्ये दोन इंजिन बोटींचे केंद्रीय ग्रामविकास समितीचे अध्यक्ष तथा खासदार प्रतापराव जाधव व आमदार संजय गायकवाड यांच्याहस्ते उद्घाटन करण्यात आले. पर्यटन विकास योजने अंतर्गत ज्ञानगंगा अभयारण्याच्या सर्वागीण विकासासाठी 10 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामधून मौजे तारापूर जवळील पलढग धरणाच्या क्षेत्रामध्ये वनपर्यटकांसाठी 52 लक्ष रु.च्या दोन इंजिन बोटीचे उदघाटन करण्यात आले. तसेच वन-पर्यटकांसाठी महिला बचत गट अंतर्गत उपहारगृहाचेसुध्दा उदघाटन करण्यात आले.
याप्रसंगी खासदार प्रतापराव जाधव व आमदार संजय गायकवाड यांनी उपस्थित ज्ञानगंगा अभयारण्य क्षेत्रातील बांधवांशी संवादही साधला. कार्यक्रमासाठी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक माधवराव जाधव, मेळघाट व्याघ्र प्रकल्प अमरावती चे मुख्य वनसंरक्षक एम एस रेड्डी, ज्ञानगंगा अभयारण्य प्रकल्पाचे डि.सी.एफ. श्री. खैरनार, उपवनसंरक्षक अक्षय गजभिये, तारापूर चे संरपच प्रविण जाधव, योगेश जाधव, डॉ. गोपाल डिके, राहूल सोळंके, प्रविण निमकरडे, बाळु जाधव आदींसह वनपरिक्षेत्र अभयारण्यचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

बुलढाणा विभागामध्ये उत्कृष्ट कार्याबद्दल प्रजासत्ताक दिनी शिवशंकर भांड यांचा सन्मान !

0

 

सिंदखेड राजा ( सचिन खंडारे )

सिंदखेड राजा तालुक्यातील वाघाळा येथे पोस्टमास्टर पदावर कार्यरत असलेले व नुकतीच नागपूर येथे पदोन्नतीत बडती झालेले तालुक्यातील शिंदी येथील शिवशंकर भांडयांचा २६जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी बुलढाणा डाकघर कार्यालयामध्ये आयोजित कार्यक्रमांमध्ये बुलढाणा विभागांमध्ये उत्कृष्ट कार्याबद्दल सन्मानपत्र व बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला .यावेळी श्री तायडे साहेब ए पी एस बुलढाणा ।श्री गोसावी (पोस्ट मास्टर )श्री सोनुने सर (बी एम )आय पी पी बी श्री दुबे सर व पोस्ट ऑफिस मधील सर्व कर्मचारी यावेळी उपस्थित होते ।प्रतिकूल परिस्थितीतून आलेल्या शिवशंकर भांड यांनी नेत्रदीपक काम केले आहे यावेळी शिवशंकर भांड यांना मिळालेल्या सन्मानाबद्दल परिसरांमधून त्यांचे कौतुक होत आहे ‘ !

हिवरा आश्रम येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा !

0

 

सिंदखेडराजा (सचिन खंडारे )

72 व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्त मेहकर तालुक्यातील हिवरा आश्रम येथे 26 जानेवारी रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते,यावेळी राष्ट्रगीताने कार्यक्रम सुरू झाला व नंतर संविधानाच्या प्रस्ताविकाचे वाचन करण्यात आले ,संविधान पुस्तिका चे पूजन करून कार्यक्रम सुरू झाला यावेळी शिवाजी घोगडे, बी.टी. सरकते साहेब, वसंतराव हिवाळे, मधुकर वानखडे,माजी सैनिक प्रताप इंगळे,प्रकाश इंगळे,किसन इंगळे माजी उपसरपंच तथा नवनिर्वाचित ग्रा.प.सदस्य सौ.प्राजक्ता नितीन इंगळे, समाधान बनसोडे,अभिषेक आकोटकर,शाहीर विक्रांतसिंग राजपूत ,गौतम सरकते,सौ.उषा इंगळे ,आदेश कंकाळ, सुमित मोरे ,जय कुमार उचित, सागर इंगळे,बबन इंगळे,सुभाष बनसोडे,राजेश कं काळ, रमेश कंकाळ ,मनोज पाखरे कार्यक्रमाचे संचालन जयकुमार उचित यांनी केले ,बी.टी. सरकते साहेब यांनी या निमित्त मार्ग दर्शन केले व छान कविता सादर केली,शिवाजी घोगडे सर यांनी मार्गदर्शन केले आपली कविता सादर केली,कार्यक्रमाचे आयोजण अंगणवाडी सेविका सौ.संगीता मोरे व सम्राट मित्र मंडळ हिवरा आश्रम यांनी केले

सावखेडा सिम येथे आदीवासी भुमीपुत्राची देशाच्या रक्षणासाठी बिएसएफ मध्ये निवड ग्रामस्थांनी केले त्याचे कुटुंबासह सत्कार

0

 

 

यावल तालुक्यातील सावखेडा सिम येथे देशाच्या रक्षणासाठी बीएसएफ सेवे मध्ये रुजु होण्यासाठी जाणाऱ्या गावातील आदीवासी जवानांचा स्वागत सत्काराचा कार्यक्रम संपन्न झाला .आज सकाळी ११ वाजता सावखेडा सिम ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारात नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांच्या प्रमुख उपस्थित आशीर्वाद फाउंडेशन तर्फे नुकताच बी एस एफ मध्ये रुजू होत असलेल्या जवानाचा सत्कार करण्यात आले गावातील राहणारे असलम अमिन तडवी हा एकमेव तरुण बीएसएफ च्या सेवेच्या भरतीत रुजू होत आहे त्या आनंदाने आशीर्वाद फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष अजय पाटील सर व त्यांच्या सहकाऱ्यांनी ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सदस्य यांच्या उपस्थित हा सत्कार सोहळा पार पडला याप्रसंगी जवानाचे मोठे वडील शावखा तडवी वडील अमिन तडवी यांचाही ही सत्कार करण्यात आला, या प्रसंगी आशीर्वाद फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अजय पाटील सर यांनी आपले मनोगत व्यक्त करून देशाच्या रक्षणासाठी जाणाऱ्या आपल्या मातीतला आदीवासी भुमीपुत्राबाबत आपणास अभीमान वाटत असल्याचे बोलुन त्यांच्या कुटुंबाचे विशेष कौतुक केले. यावेळी उस्मान तडवी, लक्ष्मण बडगुजर ,मुस्तफा तडवी, बेबाबाई पाटील, सिकंदर तडवी, साधना तडवी ,नबाब तडवी, नसीमा तडवी, रजिया तडवी, मुबारक तडवी , अभिजीत साळवे, वर्षा पाटील, फातमा तडवी, अलिशान तडवी यांचेसह अनेक तरुण व सावखेडा सिम गावाचे ग्रामस्थ समाज बांधव मोठया संख्येने उपस्थित होते