Home Blog Page 540

शेतकरीपुत्र अभ्यासिकेची जनक रजेशभाऊ गावंडे यांच्या कार्याची शासनाचे दखल घ्यावी – विद्यार्थ्यांची मागणी

0

 

नांदुरा :- (प्रफुल्ल बिचारे पाटिल )

महाराष्ट्रातील आर्थिक,सामाजिक, शैक्षणिक दृष्ट्या आणि सततच्या दुष्काळाने पीडित असलेल्या विदर्भातील बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यात गेल्या ५ वर्षांपासून राजुभाऊ गावंडे या सर्वसामान्य शेतकरी पुत्राने कुठल्याही प्रकारचा स्वार्थ न बाळगता गरिबांचे शेतकर्यांचे मुले मुली शिकाव्या यासाठी शेतकरी पुत्र अभ्यासिका नांदुरा येथे सुरू केली.या अभ्यासिकेत विविध स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना पुस्तके उपलब्ध करून दिली.जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थी सरकारी सेवेत रुजू व्हावी.आणि याच तळागाळातील मुलांना सरकारी सेवेत रूजू करून त्यांचे अठराविश्व दारिद्र्य दूर व्हावे.याचे प्रामाणिक प्रयत्नांनी अभ्यासिकेतील ८३ विद्यार्थ्यांची शासकीय सेवेत निवड झाली ते राजुभाऊ यांनी स्थापन केलेल्या शेतकरीपुत्र अभ्यासिकेमुळे. त्यामुळे या महान व्यक्तीची शासनाने दखल घेऊन त्यांना पुरस्काराने गौरविण्यात यावे. यामुळे अनेक लोक यातून प्रेरणा घेऊन गावागावात शेतकरी पुत्र अभ्यासिका सुरू होतील आणि प्रत्येक गावातून MPSC /UPSC मधून शासकीय सेवेत रुजू होतील. अशी मागणी शेतकरी पुत्र अभ्यासिकेमधील शेकडो विद्यार्थिनी निवेदनाच्या माध्यमांतून तहसीलदार यांच्याकडे केली.

फ्रन्टलाइनमध्ये पत्रकारांनाही कोरोनाची लस द्या व कोरोनाने मृत्युमुखी पडलेल्या पत्रकारांच्या कुटुंबीयांना विम्याची रक्कम द्या… टिव्ही जर्नलिस्ट असोसिएशनच्यावतीने मुख्यमंत्र्यांकडे मागणी…

0

 

बुलडाणा :- कोरोना काळामध्ये कर्मचारी सोबत काम करणाऱ्या पत्रकारांनाही फ्रंट लाईट मध्ये समावेश करून त्यांनाही कोरोना लसी देण्यात यावी व कोरोना काळामध्ये कोरोनाने मृत्युमुखी पडलेल्या पत्रकारांच्या कुटुंबीयांना तात्काळ विम्याची पन्नास लक्ष रुपयांची रक्कम देण्यात यावी या मागणीसाठी टीव्ही जर्नालिस्ट असोशियनच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव  ठाकरे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.यावेळी असोशियन चे अध्यक्ष वसीम शेख, सचिव युवराज वाघ, समन्वयक कासिम शेख,कोषाध्यक्ष दीपक मोरे, प्रवक्ता संदीप शुक्ला, गणेश सोळंकी,संजय जाधव, प्रसिद्धीप्रमुख नितीन कानडजे पाटील, बुलडाणा समन्वयक निलेश राऊत तालुका हे उपस्थित होते. तर जिल्हा पत्रकार संघाकडूनही पत्रकारांना कोरोना लस देण्या विषशी मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे राज्य उपाध्यक्ष राजेंद्र काळे हे उपस्थीत होते.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शुक्रवारी 5 फेब्रुवारीला बुलडाण्याच्या लोणार येथे दौऱ्यावर आले होते.

कोरोना काळामध्ये ज्याप्रमाणे आरोग्य कर्मचारी, पोलीस विभागाचे कर्मचारी, अधिकारी समाज सेवा करण्यासाठी कार्यरत होते,यांच्या खांद्याला खांदा लावून लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेले पत्रकार सुद्धा कोरोना काळात समाजामध्ये जनजागृतीचे काम करत होते, त्यांचा समावेश सुद्धा कोरोना लसीकरण करताना फ्रन्टलाइन कर्मचारी म्हणून करण्यात यावा व सर्व पत्रकार बांधवांना ही लस देण्यात यावी. सोबतच कोरोना काळामध्ये कर्तव्य बजावत असताना कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या पत्रकार बांधवांच्या कुटुंबीयांना विमा निधीतून पन्नास लाख रुपये तात्काळ देण्यात यावी अशी मागणी टिव्ही जर्नलिस्ट असोसिएशनच्यावतीने मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे आज लोणार येथे करण्यात आली.

सॉटसर्कीट मुळे घराला लागली आग थोडक्यात बचावला घरातील लोकांचा जिव,१,५२,२०० रुपयांचे नुकसान…….

0

 

गोंदिया शैलेश राजनकार

गोोंदिया तालुक्यातील शिरपुर बांध ग्रामपंचायत हद्दीत येत असलेल्या कुंभारटोला गावातील फिरगीं मंगलु कुवरडेलीया यांच्या घराला दि.४ जानेवारी ला सांयकाळी ७.३० वाजता आग लागल्याची घटना घडली. या घटनेत घर मालकाचा सुमारे १,५२,२०० रुपयाचा नुकसान झाला आहे.

सविस्तर असे की, कुंभारटोला गावात वास्तव्यास असनारे फिरंगी मंगलु कुवरडेलीया हे गावाच्या पलिकडे आपल्या नविन घराच्या बांधकामाकरीतां सांयकाळ दरम्यान घरातील सगळे लोकांसह गेले असता ,सांयकाळीच सुमारे ७.३० वाजता त्यांच्या घराला आग लागली असल्याचे समजुन आल्याने गावातील लोकानीं ती माहीती त्यांच्या पर्यंत पोहचवन्यात आली व घराला लागलेल्या आगीवर गावातील लोकांच्या सहकार्याने ताबा मीळविण्यात आनण्यात आला .

पंरतु आग आटोक्यात येई पर्यंत घर मालक फिरंगी कुवरडेलीया यांचा घरात असलेली रोख रक्कम रु ९०,००० हजार , कवेलु – यसिमेटं सीट ११,२००, बास-बल्ली ३०००, कपडे-भाडें-ईत्यादी २०,०००, खाण्याचे सामान व ईतर साहीत्य १०,००० दिवान- फ्यान १८,००० अशा येकुन १,५२,२०० रुपयांचा नुकसान झाला असुन या घटनेचा पंचनामा स्थानीक पटवाळी यानीं केला व घराला लागलेली आग ही सॉट सर्कीट मुळे लागली असल्याचेही सागंण्यात आले आहे. नुक्सान ग्रस्त घरमालकनी जास्तीत जास्त मुआवजा मिळावा हीच मागनी शासन व प्रशासनाला केली आहे.

सिंदखेड राजा येथे अखेर लसीकरणाचा शुभारंभ !आरोग्य कर्मचाऱ्यांनी घेतली कोविड ची लस !कोविड ची लस न घाबरता घ्यावी तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर महेंद्र साळवे यांचे आव्हान

0

 

सिंदखेडराजा (सचिन खंडारे )

बहु प्रतिक्षेत असलेल्या कोविड लसीकरणाचा शुभारंभ अखेर सिंदखेडराजा तालुक्यामध्ये ४ फेब्रुवारीपासून सुरू झाला ‘ज्या ठिकाणी लस ठेवलेले आहे अशा ठिकाणी सुसज्ज कक्षामध्ये सिंदखेडराजा नगरीचे नगराध्यक्ष श्री सतीश भाऊ तायडे यांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आले यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ऍड. नाझेर काझी इतर मान्यवर तसेच पत्रकार बंधु यांची प्रामुख्याने उपस्थिती होती ‘यावेळी लसीकरणाची सुरुवातग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ . एस एम बिराजदार यांना कोविड ची लस देऊन लसीकरणाची सुरुवात या वेळी करण्यात आली .यानंतर सिंदखेड राजा तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर महेंद्र कुमार साळवे यांनी सुद्धा ची लस देऊन कोविड ची लस पूर्णतः सुरक्षित आहे लोकांनी कोविड ची लस घ्यावी असे आवाहन यावेळी करण्यात आले ।किरकोळ हाता पायाला कणकण वाटणे अशी लक्षणे दिसून आली असल्यास ‘आशा स्वयंसेविका आरोग्य सेविका ‘आरोग्य सेवक यांच्याशी संपर्क करावा असे आवाहनही करण्यासाठी .घाबरण्याचे कुठलेही कारण नाही ‘कोविड लस घेणाऱ्या मध्ये प्रामुख्याने ‘तालुका आरोग्य अधिकारी डॉ .महिंद्र कुमार साळवे ‘तालुका आरोग्य सहाय्यक श्री ए बी तिडके ‘श्री नितीन इंगळे ‘ग्रामीण रुग्णालय सिंदखेड राजा चे ‘डॉक्टर गाणार ,डॉक्टर बुधवत डॉक्टर दराडे डॉक्टर मेहेत्रे ,डॉक्टर मस्के ,डॉक्टर शामली, डॉक्टर मनीषा ,डॉक्टर पवार,श्री दिलीप म्हहेत्रे ,श्री राठोड ‘श्रीमती डोंगरदिवे श्रीमती संगीता ब्राह्मणे श्रीमती छाया सपकाळ श्रीमती गायकवाड श्री नागरे श्री मवाळ श्री मानवतकर श्रीमती वर्षा राठोड श्रीमती सीमा जाधव श्रीमती मायावती मस्के श्री श्री वसीम शेख सह इतर कर्मचाऱ्यांनी कोविड ची लस यावेळी घेतली ‘, कोविंड ची लस पूर्णतः सुरक्षित असून इतरांनी न घाबरता ची लस घ्यावी असे आवाहन यावेळी तालुका आरोग्य अधिकारी महेंद्र साळवे यांनी केले आहे ‘

६ फेब्रुवारी ला गायीका आशा चरवे यांचा आडगावराजा येथे भिम गितांचा संगितमय कार्यक्रम ।

0

सिंदखेड राजा (सचिन खंडारे )

आडगावराजा येथे दरवर्षी प्रमाणे याहिवर्षी १ फेब्रुवारी ते ७ फेब्रुवारी या दरम्यान श्रामणेर शिबीराचे आयोजन मातोश्री रमाबाई आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने भदन्त गुणरत्नजी महाथेरो यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला आहे . या दरम्यान ६ फेब्रुवारी २०२१ शनिवारी महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध गायीका आशा चरवे
यांचा भिम गितांचा संगितमय कार्यक्रम राञी ८ ते ११ वाजता आयोजित करण्यात आला आहे त्याचबरोबर !! सुप्रसिद्ध गायीका आशा चरवे यांनी कुटुंबासह धम्म दिक्षा घेतल्या मुळे त्यांचा बौद्ध बांधवाच्या वतिने जाहिर सत्कार करण्यात येणार आहे !! तरी या कार्यक्रमासाठी परीसरातील ऊपासाक उपासीकांनी हजर रहावे असे आवाहन आडगावराजा येथील माजी श्रामणेर संघ व बौद्ध ऊपासक ऊपासीकांनी केले आहे !

विधवा महिलांना आर्थिक सहाय्य योजनेअंतर्गत चेक चे आ.डॉ. संजय कुटे यांच्याहस्ते करण्यात आले वाटप…

0

 

गजानन सोनटक्के
जळगांव जा.प्रतिनिधी

जळगांव जामोद तहसील कार्यालयात आज दिनांक 5 फेब्रुवारी रोजी दारिद्रय रेषेखालील आर्थिक दुरबल कुटुंबातील विधवा महिलांना आर्थिक सहाय्य म्हणून 20 हजाराचे चेक जळगांव जामोद तहसील मधील हॉटेलमध्ये वाटप करण्यात आले.राष्ट्रीय कुटुंब लाभ योजने अंतर्गत कुटुंब प्रमुखाचा नैसर्गिक मृत्यू झालेल्या विधवा महिलांना आमदार डॉ. संजय कुटे यांचे हस्ते 20 हजाराचे चेक वाटप करण्यात आले. जळगांव जामोद तालुक्यातील 21 दुर्बल घटक तसेच दारिद्रय रेषेखालील विधवां महिलांना प्रत्येकी वीस हजार या प्रमाणे मदत शासनातर्फे देण्यात आली.यावेळी माजी कामगार मंत्री आ. डॉ. संजय कुटे, उपविभागीय अधिकारी सौ. वैशाली देवकर, तहसीलदार शिवाजीराव मगर, नि. नायब तहसीलदार खाडे,सौ. बंगाले, वडोदे, भारंबे, यांचे सह तहसील चे अधिकारी व कर्मचारी आणि नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

घरगुती गँस,पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीविरोधात जळगाव जामोद शिवसेनेच्यावतीने निवेदन देत केला केंद्र शासनाचा निषेध…

0

 

गजानन सोनटक्के
जळगांव जा.प्रतिनिधी:-

सतत होत असलेल्या घरगुती गॅस सिलेंडर पेट्रोल डिझेल च्या किमतीच्या वाढीमुळे सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आली आहे असे असताना सुद्धा केंद्र सरकार इंधनाचे दर दररोज वाढतच आहे त्यातच आतापर्यंत लॉकडाऊन मुळे सर्वसामान्य जनतेच्या हातचा रोजगार गेलेला असताना केंद्र शासन काही केल्या ह्या दररोज गगनाला भिडत असलेल्या किमती काही केल्या कमी करत नाही. आंतर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये कच्च्या तेलाचे दर कमी असताना सुद्धा देशासह महाराष्ट्रात दररोज डिझेल पेट्रोल व घरगुती गॅसचे दर वाढत आहे त्यामुळे गरीब लोकांना केंद्र सरकार तर्फे उज्वला योजने अंतर्गत मोफत गॅस सिलेंडर दिले आहे या दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांकडे सिलेंडर भरण्याकरिता पैसे नाहीत त्यामुळे त्यांना शेतातील लाकडे आणून त्यावर उदरनिर्वाह करावा लागत आहे परिणामी पर्यावरणाचा समतोल बिघडत आहे डिझेल पेट्रोलचे दर वाढल्यामुळे महागाई सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढत आहे त्यामुळे अन्नधान्य जीवनावश्यक वस्तूंचे दर मोठ्या प्रमाणात वाढत आहेत तरी शासनाने ह्या वाढत असलेल्या इंधनाच्या किमती ताबडतोब कमी करण्याबाबत उपाय योजना कराव्यात सर्वसामान्य नागरिकांना या दरवाढीतून मुक्त करावे अशा आशयाचे निवेदन दिनांक 5 फेब्रुवारी रोजी जळगाव जामोद तालुका शिवसेनेच्यावतीने उपविभागीय अधिकाऱ्यांच्या मार्फत देशाचे पंतप्रधान नरेंद्र जी मोदी यांना निवेदन देण्यात आले आहे निवेदनावर तुकाराम काळपांडे शिवसेना जिल्हा उपप्रमुख, गजानन वाघ शिवसेना तालुका प्रमुख,पुंडलिक पाटील, उपतालुका प्रमुख सुनील मोरखडे उपतालुकाप्रमुख,देविदास घोपे उपतालुका प्रमुख, रमेश ताडे नगरसेवक तथा शिक्षण सभापती जळगाव जामोद,संजय भुजबळ, शांताराम धोटे,अशोक टावरी,गजानन दातीर,मुस्ताक भाईजान, दिलीप आकोटकार, संतोष बोरसे, शिवाजी मेहसरे,अक्षय भालतडक,भगवान बाजारे,राजेश पांधी,पंडित माटे,कैलास राजपुत, विशाल पाटील, वैभव जाणे,वसंता रोजतकर,अंबादास चौधरी,गुड्डू काजी,युवराज देशमुख, रमेश हागे, यांच्यासह भाऊ सांगे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.

नगरपंचायत निवडणूकी पुर्वी मतदार यादीतील स्थलांतरीत ,व मयत मतदारांची वगळणी करावी, रामेश्वर गायकी

0

संग्रामपूर येथे नगरपंचायत असून सध्या शहरात कित्येक वर्षापासून रहिविशी नसलेल्या व मयत मतदारांचे नावे मतदार यादीत असल्यामुळे मतदानाची टक्केवारी कमी होते त्याकरीता स्थलांतरीत व मयत मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यात यावे अश्या प्रकारचे निवेदन पत्रकार रामेश्वर गायकी यांनी संग्रामपूर तहसील कार्यालयात निवडणूक विभागाचे ना.तहसीलदार विजय चव्हाण यांना दिले आहे.
निवेदनात असे नमुद केले आहे की,संग्रामपूर येथील ग्रामपंचायत रद्द होवून सन २०१५मध्ये नगरपंचायत होवून पहिली निवडणूकही पार पडली.संग्रामपूर शहरात १७वार्ड असून सर्व प्रकारची शासकीय ,निमशासकीय कार्यालये,शाळि ,महाविद्यालये ,बॕंका,पतसंस्था, सहकारी संस्था व इतर कार्यालये आहेत .यामध्ये नोकरी करणाऱ्यांची संख्या भरपूर प्रमाणात असल्याने तसेच नव्याने नोंदणी करणाऱ्यांचीही संख्या वाढत आहे.परंतु गेल्या १०ता १५वर्षापासून संग्रामपूर येथून अनेक अधिकारी ,कर्मचारी बदलून गेलेत तरी त्यांची व त्यांच्या कुटुबातील नावे,तसेच शहरातील अनेक मुलींचे लग्न होवून सासरी गेल्यात,अनेक मतदार मयत झालेत तरी त्यांची नावे अजुनही मतदार यादीत आहेत.ती कमी झालीच नाहीत तसेच मतदानाचे वेळी स्थलांतरीत मतदारांना आणण्यासाठी स्पेशल गाडी देवून आर्थिक व्यवहार सुद्धा होत असतात.काही मतदार येत सुद्धा नाहीत त्यामुळे मतदानाची टक्केवारी कमी होते तरी स्थलांतरीत झालेल्या सर्व मतदारांची व मयत मतदारांची नावे नगरपंचायत निवडणूकी पुर्वी मतदार यादीतुन वगळण्यात यावीत सदर निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी बुलडाणा,व उपविभागीय अधिकारी जळगाव जामोद यांना पाठविल्या आहेत.सदर निवेदनावर पत्रकार रामेश्वर गायकी यांची सही आहे.

आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी महावितरण कार्यालयाला ठोकले कुलूप कर्मचारी झाले बंदिस्त

0

 

गजानन सोनटक्के
प्रतिनिधी जळगाव जामोद

दिनांक 5 फेब्रुवारी रोजी डॉक्टर आमदार संजय कुटे यांच्या नेतृत्वात शेकडो भाजपा कार्यकर्त्यांनी रास्तारोको करीत महावितरणच्या कार्यालयावर धडक मोर्चा दिला व महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली सरकार द्वारे लॉक डाऊन च्या काळात वीज देयके कमी करण्यात येतील व 100 युनिट पर्यंतचे वीज देयके माफ करण्यात येतील अशी घोषणा करण्यात आली होती परंतु आता वीज देयके माफ तर केलीच नाहीत उलट वीज देयके भरावे लागतील असे ऊर्जा मंत्र्यांनी जाहीर केले व राज्यातील 78 लाख वीज कनेक्शन कापण्याचे काम सुरू झाले आहे याविरोधात आज 5 फेब्रुवारी रोजी महावितरण कार्यालयाला माजी मंत्री व आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी कुलूप ठोकले व कर्मचाऱ्यांना बंदिस्त केले तसेच आमदार कुटे म्हणाले आमचे लढाई सरकारच्या विरोधात आहे परंतु कर्मचाऱ्यांनी सरकारच्या दबावाखाली न येता नागरिकांना सहकार्य करावे व वीज कनेक्शन कापण्यास जाऊ नये तसे केल्यास गाठ भारतीय जनता पार्टी सोबत आहे व त्या ठिकाणी कायदा व सुव्यवस्था बिघडल्यास त्याला सर्वस्वी महावितरण व शासन जबाबदार राहील असा इशारा सुद्धा यावेळी संजय कुटे यांनी दिला डॉक्टर कुटे म्हणाले या लॉक डाउन च्या काळात सर्वसामान्य गोरगरीब जनतेला चार महिने काम नव्हते कोणतीही आवक नसताना तरुणांच्या नोकऱ्या गेल्या अशा काळात विज बिल वाढवून एक प्रकारे कहरच केला व विविध प्रकारचे त्यावर करवाढ केली ऊर्जा मंत्र्यांनी कुठल्याही प्रकारची जनतेने कुठल्याही प्रकारची मागणी केले नसताना ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी करोणा च्या काळातील वीज बिल माफ करू अशी घोषणा केली त्यांनीच दिलेले आश्वासन, घोषणा ते पूर्ण करत नाहीत म्हणून त्यांचा निषेध करावा तेवढा कमी आहे ही घोषणा फक्त मोठेपणा दाखवण्यासाठी केली असा आरोप सुद्धा यावेळी संजय कुटे यांनी केला तसेच पुढे म्हणाले अन्य प्रदेशात आलेला विज बिलांवर पन्नास टक्के सूट देण्यात आलेली आहे आणि यामुळे जनता सरकार विरोधात वेगळ्या स्वरूपात रोष व्यक्त करत आहे यावेळी नगराध्यक्ष, पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषद सदस्य, नगर परिषद सदस्य, , तसेच शेकडो वीज ग्राहक भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते

येथील शासनाने लाखो रुपये खर्च करून बांधण्यात आलेले पशुवैद्यकिय चिकित्सालय शोभेची वस्तु

0

 

( प्रतिनिधी )विकी वानखेडे.

यावल तालुक्यातील पश्चिम भागातील सर्वात मोठ्या बाजारपेठेचे गाव म्हणजे ब-हाणपूर अंकलेश्वर माहामार्गा लगत असलेले किनगाव हे गाव आहे तर किनगावला लागुण असलेल्या आदीवासी१७ गावांचा संपर्क या गावांशी असुन , या दृष्टीकोणातुन जिल्हा परीषदेने येथे भव्य असे प्रथमश्रेणी पशुवैद्यकिय दावाखाना उभारला आहे मात्र या दवाखाण्यात गेल्या २ महीण्यांपासून येथे गुरांना आरोग्यसेवा देण्यासाठी पशुधनअधिकारी नसल्यामुळे परीसरातील गुरांना उपचार मिळत नाही म्हणून परीसरातील शेतकरी कमालीचे हैराण झाले आहेत किनगाव येथे प्रथमश्रेणी पशुवैद्यकिय दवाखाना असल्यामुळे किनगावला लागुन असलेले चिंचोली,आडगाव, मालोद , नायगाव ,कासारखेडे,मनापुरी,गिरडगाव,डोणगाव आणी वाघोदा या गावांच्या गुरांना आरोग्य सेवा देण्यासाठी हा प्रथमश्रेणी दवाखाना सुरू करण्यात आला आहे मात्र येथे पशुवैद्यकिय अधीकारीच नसल्याने परीसरातील शेतकरी बांधवांकडुन प्रशासनाच्या कारभाराविषयी तिव्र स्वरूपाची नाराजी व्यक्त करीत आहेत.किनगाव येथे असलेल्या पशुवैद्यकिय दवाखाण्यात वैद्यकिय अधीकारी नाही हे तर सोडा परंतु या दवाखाण्यात घाणीचे साम्राज्य इतके वाढले आहे की गुरांचे आरोग्य सुधारणेतर लांबच उलट जर येथे उपचारासाठी गुर आली तर गुरांनसह मानसांच्या आरोग्यालाही धोका होऊ शकतो इतकी वाईट परीस्थीती या पशुवैद्यकिय दवाखाण्याची झाली आहे शासनाने येथे कायमस्वरूपी पशुवैद्यकिय अधीकारी दिले नाहीत म्हणून येथे प्रभारी पशुवैद्यकिय अधीकारी आहेत व त्यांना किनगावच्या पशुवैद्यकिय दवाखाण्यात पुर्णवेळ देता येत नाही व परीसरातील गुरांचे आरोग्य धोक्यात आले आहे तर परीसरातील गुरांनवर लाळखुरगटीचा आजार आहे मात्र उपचारा अभावी गुरांचा जिव धोक्यात आला आहे तसेच शासनाच्या वेळापत्रकानुसार हा दवाखाना फेब्रूवारी ते सप्टेबर या कालावधीत सकाळी ७ ते १२ व दुपारी ४ ते ६ अशी वेळ आहे तर आँटोबर ते जानेवारी या कालावधीत दवाखाण्याची वेळ सकाळी ८ ते १२ व सायंकाळी ३ ते ५ वाजेपर्यंत अशी वेळ असतांना मात्र हा दवाखाना नेहमी बंदच असतो म्हणून गुरांचे आरोग्य अधीक धोक्यात आले आहे तरी वरीष्ठ आधीकारी यांनी या विषयाची गंभीर दखल घेऊन किनगाव पशुवैद्यकिय दावाखाण्यात तात्काळ कायमस्वरूपी पशुवैद्यकिय आधीकारी नियुक्त करावा व परीसरातील गुरांच्या आरोग्याशी होत असलेला हा खेड थांबवावा अशी मागणी परीसरातील शेतकरी करीत आहेत.