Home Blog Page 541

शेतीच्या वादात खुलेआम दिराने साडी ओढली म्हणून , गुन्हा दाखल ,

0

 

कोण्ही ओडली साडी ,

अंढेरा : सतत शेतीच्या कारणावरून वाद होऊन त्रस्त झालेला दिराने चक्क खुलेआम वहिनी ची साडी ओढली व वहिनी न चक्क पोलीस स्टेशन जायुन विनयभंग केल्याची तक्रार अंढेरा पोलिसांत दाखल करण्यात आली आहे . सादर पीडित 33 वर्षीय महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गणेश पुंजाजी सिरसाट ( 40 ) , भारत राजू सिरसाट ( 28 ) , अर्चना गणेश सिरसाट ( 35 , सर्व रा . भरोसा , ता . चिखली ) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे . 25 जानेवारी रोजी दुपारी 2 वाजता पीडित 33 वर्षीय महिलेला या तिन्ही जणांनी शेतीच्या कागदपत्रांच्या कारणावरून लोटपोट केली व शिवीगाळ करून अंगावरील साडी लोकांसमक्ष सोडून विवस्त्र करून अपमानित केल्याची तक्रार महिलेने दिली आहे . याप्रकरणी 26 जानेवारी रोजी पोलिसात गुन्हा दाखल केला आहे .पोलीस पुढील तपास करीत आहे ,

बसचे ब्रेक फेल घाटातील घटना, चालकाच्या सतर्कतेने ४० प्रवाशांचे वाचले प्राण

0

 

अनिलसिंग चव्हाण
मुख्य संपादक

खामगाव – बुलडाणा आगारातून परतवाड्याकडे निघालेल्या बसचे अचानक बोथा घाटात ब्रेक फेल झाल्याची घटना आज दि.२७ जानेवारी रोजी दुपारी घडली.

 

येथे क्लिक करून पहा

https://www.suryamarathinews.com/post/8498

यावेळी चालकाने दाखविलेल्या समयसुचकतेमुळे मोठा अनर्थ टळला व बसमधील ४० प्रवाशांचे थोडक्यात प्राण बचावले. चालकाच्या या सतर्कतेमुळे बसमधील सर्व प्रवाशांनी त्यांचे कौतुक करत त्यांचे आभार व्यक्त केले.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, बुलडाणा परिवहन मंडळाची बस क्रमांक एमएच ०६ – ८२३३ ही बस प्रवाशांना घेवून बोथा घाटमार्गे परतवाड्याकडे दुपारी निघाली होती.

दरम्यान घाटात पोहचताच बसचे ब्रेक अचानक फेल झाल्यामुळे प्रवाशी आणि चालकाची धांदली उडाली.

यावेळी बसमध्ये बसलेल्या ४० प्रवाशांचे प्राण वाचविण्याकरीता बसचालक एस.एस.खिल्लारे यांनी समयसुचकता दाखवत बसला दरी मध्ये जाण्यापासून वाचवत सरळ बस रस्त्याच्या कडेला असलेल्या दरडला घासत बसला थांबविले.

बस थांबताच प्रवाशांनी तातडीने बाहेर पडत आपला जीव वाचविला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे प्रवाशी आणि चालक वाहक घाबरून गेले होते.

बस थांबताच प्रवाशांचा जीव भांड्यात पडला. या प्रकारामुळे मोठी जीवित हानी होता होता टळली. तर पुन्हा एकदा परिवहन मंडळाच्या भंगार बसेसचा प्रश्न एवी अशी मागणी प्रवाशांकडून यावेळी करण्यात आली.

मानवता प्रतिष्ठान संघटनेचा वंचित आघाडीच्या दिल्ली येथील शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ जाहीर समर्थन

0

 

बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज दिनांक 27/ 1 /2021रोजी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने दिल्ली येथे सुरू असलेल्या किसान आंदोलनाच्या समर्थनार्थ एक दिवशीय आंदोलन उभारून त्यांना बळ देण्यासाठी सदर आंदोलन करण्यात आले .या दरम्यान त्यांचेकडून दिवसभरामध्य शेतकऱ्यांच्या हितासाठी असलेल्या मागण्यांसंदर्भात वंचित बहुजन आघाडीच्या विविध उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यानंतर अंदाजे 5 वाजेच्या दरम्यान त्यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन दिल्ली येथील किसान आंदोलनाला जाहीर पाठिंबा देत असल्याचे पत्र सादर केले. बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकर्‍यांच्या किसान आंदोलनास मानवता प्रतिष्ठान या सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन त्यांना जाहीर पाठिंबा व्यक्त केला व सदर पत्रामध्ये नमूद केले की .शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास आमची संघटना शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ कोणत्याही क्षणी रस्त्यावर उतरेल असा इशारा त्यांना प्रशासना सुद्धा दिला. त्यामुळे दिल्ली येथे सुरू असलेल्या किसान बागेच्या आंदोलनास सुध्दा मानवता प्रतिष्ठान महाराष्ट्र या सामाजिक संघटनेचा पाठिंबा मिळाला आहे. मानवता प्रतिष्ठानच्या वतीने दिलेल्या समर्थनपत्रावर महाराष्ट्र राज्य संपर्कप्रमुख अमिन शेख बुलढाणा .जिल्हा उपाध्यक्ष विशाल गवई. सलीम मोहम्मद शहा अध्यक्ष सुरत जिल्हा गुजरात,‌ .सलीम पठाण बुलढाणा जिल्हा संघटक इत्यादी स्वाक्षरी देऊनऊन आपले जाहीर समर्थन व्यक्त केले आहे.

आडगावराजा येथे १ फेब्रुवारी पासुन श्रामणेर शिबीराचे आयोजन

0

 

सिंदखेड राजा (सचिन खंडारे )

अखिल भारतीय भिक्खु संघव तक्षशिला बुद्धविहार स्मारक समितीच्या वतीने आडगावराजा येथे दिनांक १ फेब्रुवारी ते ७ फेब्रुवारी या दरम्यान भव्य श्रामणेर शिबीर व बौद्ध धम्म परीषदेच्या आयोजन करण्यात आले आहे.
तुझा वारसा पुढे न्यावया , करु जिवाचे रान भिम बा आम्ही तुझी संतान या प्रमाणे
परीसरातील सर्व श्रद्धा शिल शिल संपन्न सदाचारी बौद्ध ऊपासक उपासीका यांना आवाहन करण्यात येते की, प.पु.बोधीसत्व डाँ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेल्या धम्माचा प्रचार आणी प्रसार व्हावा दृष्टिकोन समोर ठेऊन व मातोश्री रमाबाई आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने पुज्य भदन्त गुणरत्नजी महाथेरो जेतवन महाबुद्ध विहार नंदुरबार
यांच्या मार्गदर्शनाखाली अखिल भारतीय भिक्खु संघ व तक्षशिला बुद्ध विहार स्मारक समिती आडगावराजा जि.बुलढाणा यांचे विद्यमाने भव्य श्रामणेर शिबीर व बौद्ध धम्म परीषद रामभाऊ कहाळे नगर आडगावराजा सोनोषी रोड – आडगावराजा येथे आयोजित करण्यात आली आहे तरी
श्रामणेर शिबीर वेळापञक
दिनांक १-०२-२०२१
ते ७–०२-२०२१ पर्यत
श्रामणेर शिबीरात सहभागी होण्यासाठी ५०० री फी राहिल या शिबीरात जास्तीत जास्त संख्येने हजर राहुन सहभागी होण्याचे आवाहन
एकनाथ कहाळे
902439524 -7798208837,
रमेश शिंदे -8766986113 बुद्धभुषण कहाळे
7822819455 यांनी तथा श्रामणेर संघ आडगावराजा यांनी केले आहे

साखरखेर्डा गावचे आरक्षण कायम !सिंदखेडराजा तालुक्यातील ८० ग्रामपंचायतचे आरक्षण जाहीर ! ८ गावचे आरक्षण बदलले ! ३९ सर्वसाधारण ‘ 1 अ . जमाती ‘ २२ नामप्र . तर १८ अ . जाती .

0

 

सिंदखेड राजा (सचिन खंडारे )

सिंदखेडराजा तालुक्यातील ८० ग्रामपंचायत चे आरक्षण अगोदर जाहीर करण्यात आले होते परंतु नंतर सरकारने ते रद्द करून निवडणुकीच्या नंतर आरक्षण जाहीर करण्यात येईल असे सांगितले त्यानंतर २७ तारखेला सिंदखेड राजा येथे ‘आज आरक्षण जाहीर करण्यात आले.

यामध्ये अगोदर 80 ग्रामपंचायतच्या आरक्षण जाहीर करण्यात आले होते त्यापैकी फक्त आठ ग्रामपंचायतीच्या आरक्षणामध्ये बदल करण्यात आला.

यामध्ये राजेगाव ‘चे अगोदर आरक्षण सर्वसाधारण होते ते आता ना .मा. प्र. आहे .कोनाटी पहिले नामाप्र होते आता सर्वसाधारण आहे .

सोबतच मोठी बातमी पण पहा

https://www.suryamarathinews.com/post/8516

 

 

लिंगा (पांगरी काटे )सर्वसाधारण होते आता ना . मा .प्र. आहे रताळी अगोदर सर्वसाधारण होते आता ना मा . प्र. आहे ।सवडद अगोदर ना मा . प्र. आता सर्वसाधारण ‘राहेरी बुद्रुक . अगोदर सर्व साधारण ‘ आता ना . मा . प्र.बाळ समुद्र .

अगोदर नामप्र . आता .सर्वसाधारण ‘देवखेड.अगोदर सर्वसाधारण ‘आता नामाप्र .खालील प्रकारे आरक्षण दिलेले आहे उमनगाव सर्वसाधारण ‘गोरेगाव सर्वसाधारण .

मोहाडी सर्वसाधारण सोय देव सर्वसाधारण वाघोरा सर्वसाधारण .वरुडी नामाप्र .आडगावराजा ना मा प्र -तांदुळवाडी सर्वसाधारण – तांदुळवाडी सर्वसाधारण ‘जळगाव सर्वसाधारण ‘पिंपळगाव सोनारा सर्वसाधारण ‘ जवळका सर्वसाधारण ‘ वाघजाई सर्वसाधारण ‘पिंपळगाव लेंडी सर्वसाधारण ‘ चांगेफळ सर्वसाधारण .

सिंदी सर्वसाधारण ‘वडाळी सर्वसाधारण ‘ निमगाव वायाळ सर्वसाधारण ‘चिंचोली जहागीर सर्वसाधारण ‘पिंपळगाव कुडा सर्वसाधारण ‘ताडशिवणी नामाप्र ‘ अंचली सर्वसाधारण ‘तर रूमणा हे गाव अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे .

डावरगाव सर्वसाधारण ‘गुंज सर्वसाधारण ‘सोनोशी सर्वसाधारण ‘ खैरव नामप्र ‘महारखेड नामाप्र । मलकापूर पांग्रा -ना मा. प्र. ‘विझोरा सर्वसाधारण -तडेगाव नामाप्र । ‘देऊळगाव कोळ सर्वसाधारण ।दरेगाव नामाप्र ‘सुजलगाव नामाप्र .सावरगाव माळ सर्वसाधारण ‘भोसा – नामाप्र ‘जांभोरा सर्वसाधारण ‘ नशिराबाद सर्वसाधारण ‘.

केशव शिवणी नामाप्र ‘ ‘सायाळा नामाप्र ‘दुसरबीड नामाप्र ‘साठेगाव अनुसूचित जाती ।जागदरी सर्वसाधारण ‘ वाघाळा नामाप्र ‘ झोटिंगा नामाप्र ‘हनवतखेड ( सिंदखेड राजा )सर्व साधारण ।शेंदुर्जन नामाप्र ‘ हिवरा गडलिंग सर्वसाधारण ।किनगावराजा सर्वसाधारण ‘धानोरा -अनुसूचित जाती .

.सावखेड तेजन अनुसूचित जाती ‘साखरखेर्डा सर्वसाधारण ‘भंडारी सर्वसाधारण ।खामगाव अनुसूचित जाती । कंडारी अनुसूचित जाती ‘ पांगरी उगले अनुसूचित जाती ।हिवरखेड अनुसूचित जाती । पिंपळखुटा अनुसूचित जाती । शिवनी टाका अनुसूचित जाती .

उमरद अनुसूचित जाती ।वरदडी बुद्रुक अनुसूचित जाती । ढोरवीअनुसूचित जाती ।हनवतखेड (मलकापूर पांग्रा ) अनुसूचित जाती ।आंबेवाडी अनुसूचित जाती ।पोफळ शिवणी अनुसूचित जाती ।कुंबेफळ अनुसूचित जाती । गारखेड अनुसूचित जाती ‘ पिंपरखेड बुद्रुक अनुसूचित जाती ‘नाईक नगर सर्वसाधारण ‘वसंतनगर सर्वसाधारण ‘दत्तापूर सर्वसाधारण .

यातील सुटलेली आरक्षण हे महिलासाठी की पुढच्या साठी हे 29 तारखेला समजणार आहे !यावेळी तहसीलदार तसेच सिंदखेड राजा सर्व कर्मचारी उपस्थित होते :

हिवरखेड पोलीस ठाण्यात युवकाने केले विष प्राशन अल्पवयीन मुलीसोबत विवाह करण्याचा होता युवकाचा हट्ट

1

 

हिवरखेड प्रतिनिधी:- दिपक रेळे

तळेगाव बाजार येथील युवकाने हिवरखेड पोलीस स्टेशन च्या प्रांगणातच विष प्राशन केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

हिवरखेड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील तळेगाव बाजार येथील विकास बाळकृष्ण घनबहादुर या 21 वर्षीय तरुणाचे गावातीलच एका अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबंध मागील काही वर्षांपासून सुरू होते.

 

ही बातमी आवर्जून पहा

https://www.suryamarathinews.com/post/8498

 

दोघांचा प्रेम विवाह करण्याचा मानस असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. परंतु मुलगी अल्पवयीन असल्याने मुलीच्या पालकांचा यास विरोध होता.

परंतु सदर युवक अल्पवयीन मुलीसोबत विवाह करण्याचा हट्ट करीत होता. त्यामुळे सदर प्रकरण पोलीस स्टेशन पर्यंत पोहोचले. मुलगा मुलगी आणि दोघांचे पालक पोलीस स्टेशनला हजर झाले होते.

मुलगी अल्पवयीन असल्याने मुलगी सज्ञान होईपर्यंत कायद्यानुसार विवाह करता येत नाही असे पोलिसांनी युवकाला समजावून सांगितले. परंतु प्रेमात आंधळा झालेला युवक कुणाचीही गोष्ट समजण्याच्या मनस्थितीत नव्हता आणि त्याने शेवटी टोकाचे पाऊल उचलत पोलीस स्टेशनच्या प्रांगणातच विष प्राशन केले.

सदर घटनेने एकच खळबळ उडाली होती. हिवरखेड पोलिसांनी तात्काळ सदर युवकाला प्राथमिक आरोग्य केंद्र हिवरखेड येथे नेले असता डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून पुढील उपचारार्थ अकोला सर्वोपचार रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला.

याप्रकरणी हिवरखेड पोलीस चौकशी करीत असून कायदेशीर प्रक्रिया सुरू होती.

सर्वात धक्कादायक गोष्ट अशी की सदर प्रेमीयुगुलाने काही महिन्यांपूर्वी सुद्धा विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता.

परंतु दैव बलवत्तर म्हणून ते बचावले अशी माहितीसुद्धा अल्पवयीन मुलीच्या पालकांनी दिली आहे.

“अर्जुन देशपांडेंच्या जेनरिक आधार च्या माध्यमातून अमरावती मध्ये स्वस्तात औषधं उपलब्ध होणार “

1

 

अनिलसिंग चव्हाण
मुख्य संपादक

अमरावती – जेनरिक आधार ही एक औषधांची विक्री करणारी कंपनी आहे. अर्जुन देशपांडेने ही कंपनी वयाच्या १६व्या वर्षी स्थापन केली. ही कंपनी उत्पादकांकडून थेट औषधांची खरेदी करते आणि ग्राहकांना विकते. यात २०-८० टक्के अधिक फायदा मिळतो.

मा. पंतप्रधान मंत्री नरेंद्र मोदींच्या आत्मनिर्भर भारत vocal for local अभियान व श्री रतन टाटांच्या स्वप्नं जेनरिक आधार चे तरुण उद्योजक अर्जुन देशपांडे हे साकारणार आहेत व त्यांनी हे उपक्रम वयाच्या १६व्या वर्ष पासून सुरू ही केले आहे…..

माननीय श्री रतन टाटांसारख्या मोठ्या व्यक्तीने जेनेरिक आधार मध्ये आर्थिक तसेच नैतिक समर्थन केले. देशात सध्या करोना व्हायरस विरुद्धची लढाई सुरू आहे.

जेनरिक कंपनीच्या माध्यमातून अर्जुनने एक मिशन हाती घेतले आहे. ४ महिन्यात ठाण्यातून सुरू झालेली फार्मा कंपनी जे स्वस्तदरात औषध १०० हून जास्त शहरात देशभरात उपलब्ध करून दाखवली आहे. ४ महिन्याच्या लॉक्डाऊन काळात लोकांना रोजगार संधी मिळाली….

ज्येष्ठ नागरिक आणि पेशनवर जगणाऱ्या लोकांना औषधे कमीत कमी किमतीत मिळावी. भारतातील ६०% लोकांना आज औषधं परवडत नसल्यामुळे विकत घेता येत नाही पण ८५ ते ९०% औषधें ही भारतातच बनतात ज्यांना जेनरिक म्ह्टले जाते.

त्यामुळे जेनरिक औषधे किमत कमी दरात उपलब्ध करण्याचा अर्जुन देशपांडेंचा प्रयत्न आहे.

येत्या काही महिन्यात जेनरिक आधार चे केंद्र फक्त मुंबईच नाही तर अमरावती व नागपूर, वर्धा, बुलढाणा, जळगाव, भंडारा, यवतमाळ, अकोला आणि नाशिक, महाराष्ट्राच्या व देशाच्या ग्रामीण शहरात ही सुरू करण्याचा ध्यास मी आपल्या हाती घेतला आहे…- अर्जुन देशपांडे

अनेक पुरस्काराने ही १८ वर्ष अर्जुन देशपांडेंना सन्मानित करण्यात आले आहे..

भारतातल्या टॉप १० कंपन्यांनी ही अर्जुन सोबत व्यवसाय करण्याची इच्छा व्यक्त केली आहे व दिल्लीतून थेट ठाण्यात येऊन अर्जुन ची भेट घेतली

कृषी कायद्याच्या विरोधात संग्रामपुर तहसिल कार्यालयावर शेतकऱ्यांचा बैलगाडी मार्च धडकला…!

0

संग्रामपूर ः- दिल्ली येथे कृषी कायद्यांच्या, विरोधात सुरू असलेल्या आंदोलनाच्या समर्थनार्थ आज २६ जानेवरी गणतंत्र दिनी संग्रामपुर तहसिल कार्यालयावर बैलगाडी मार्च काढण्यात आला. . संग्रामपुर बस स्टॅंड ते तहसिल कार्यालयापर्यंत बैलगाडीने हा मोर्चा काढण्यात आला . शेतकरी विरोधी कायदे रद्द व्हावेत .याकरीता संग्रामपूर तालुक्यातील शेतकरी बांधवांच्या वतीने आज २६ जानेवारी रोजी शेतकऱ्यांचे पारंपारिक वाहन बैलगाडीचा मार्च काढून तहसीलदार मार्फत मा.राष्ट्रपती यांना निवेदन देण्यात आले . निवेदनात असे नमुद केले की, देशात तीन कृषी विधेयक लागू करण्यात आले असून हे तिन्ही कृषी विधेयक शेतकऱ्यांच्या विरोधात आहेत. तिन्ही कृषी विधेयकात एकही मुद्दा शेतकरी हिताचा नाही उलट हि संपुर्ण विधेयक शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारी आहेत. आम्ही संग्रामपुर तालुक्यातील शेतकरी आहेात आज आमची शेतीची कामे सोडुन आम्ही आमच्या बैलगाडया घेऊन हे निवदेन द्यायला आलो आहोत.तिन्ही कृषी विधेयक कायदे तात्काळ रद्द करावेत अशा स्वरुपाचे निवेदन सादर केले. हे कायदे रद्द झाले नाही तर आम्ही सुध्दा तालुक्यात तीव्र आंदोलन करुन अशा इशाराही या निवेदनातुन देण्यात आला आहे.हयावेळी भारत माता की जय, जय जवान जय किसान, वंदे मातरम अश्या घोषणा देत, बैलगाडी सह तिरंगा घेऊन मोर्चा शांततेत काढण्यात आला. हया आंदोलनात बहुसंख्य़ शेतकरी सहभागी होते.

किनगाव येथील त्या महीलेवर चाकुहल्ला करणाऱ्यानी व्यक्तिने त्याच शेतातील विहीरीत केली आत्महत्या

0

 

 

यावल तालुक्यातील किनगाव येथे एका व्याक्तिने शेतात काम करणाऱ्या महीलेवर चाकुहल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली असता आज त्या घटनेतील चाकुहल्ला करणाऱ्याने विहीरीत आत्महत्या च्या घटनेमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे . या संदर्भात मिळालेली माहीती अशी की काल दिनांक २५ जानेवारी रोजी सायंकाळच्या सुमारास आडगाव शिवारातील विनय पाटील यांच्या शेतात काम करणाऱ्या एका २८ वर्षीय महीलेवर चाकुनेवार करून गंभीर जख्मी करून घटनास्थळावरून निघुन गेल्याची घटना घडती होती .आज मात्र या संपुर्ण घटनेला वेगळे स्वरूप प्राप्त झाले असुन, यात महीलेवर हल्ला करणारा चंद्रकांत वसंत खलसे वय४५ वर्ष या शेतमजुरी करणाऱ्याने त्याच हनुमागडी आडगाव शिवारातील विनय पाटील यांच्या शेतातील विहीर उडी घेवुन पाण्यात बुडुन आत्महत्या केल्याची घटना घडली असुन , याबाबत हल्ला केल्यानंतर सदर चंद्रकांत खलसे हा आपण आता आत्महत्या करणार असुन माझ्या मजुरीचे तिनहजार रुपये हे माझ्या वयोवृद्ध आईला द्यावे असे तो सांगुन घटनास्थळावरून निघुन गेला ज्यांनी त्याचे बोलणे ऐकले त्यांनी त्याच्या बोलण्यास गांर्भीयाने घेतले नाहीत . दरम्यान आज सकाळी दिनांक २६ जानेवारी रोजी मजुर शेतात कामास गेले असता सदरच्या चाकु हल्यातील चंद्रकांत खलसे यांचा मृतदेह हे विहीरीत आढळुन आले असुन , पोलीस या घटनेच्या स्थळी पंचनामा करण्यासाठी रवाना झाले असल्याचे वृत्त आहे . चंद्रकांत खलसे हा४५ वर्षीय व्यक्ति आपल्या वयोवृद्ध आई बरोबर किनगाव गावात राहात होता .

यावल शहरातील स्वस्त धान्य दुकानात केली अज्ञात चोरटयांनी धान्याची चोरी पोलीसात गुन्हा दाखल

0

 

 

यावल येथील एका स्वस्त धान्य दुकानात अज्ञात चोरटयांनी दुकानातील धान्य चोरून नेल्याची घटना घडली असुन याबाबत दुकानदारांने पोलीसात तक्रार दाखल केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे . या संदर्भात मिळालेली माहीती अशी की यावल शहरातील म्हसोबा परिसरातील मेन रोडला असलेली यावल सहकारी ग्राहक भंडार दुकान क्रमांक१o८ यांच्याव्दारे संचलीत स्वस्त धान्य दुकानात दिनांक २५ जानेवारीच्या मध्यरात्रीच्या सुमारास काही अज्ञात चोरटयांनी दुकानाचे कुलुप तोडुन आत प्रवेश करून सर्वसामान्य लाभार्थी नागरीकांच्या वितरणासाठी ठेवलेल्या धान्यातील पाच क्विटंल गहु अडीच क्विटंल मका असे भरडधान्य शासकीय किमत सुमारे चार हजार रुपये तर बाजार भाव किमत अंदाजीत१०हजार रुपये किमतीचे गहु तर सुमारे ३ हजार रुपये किमतीचा मका असे साहीत्य चोरीस गेले असुन , याबाबत दुकान संचालक केशव प्रल्हाद बढे यांनी यावल पोलीस तक्रार दाखल केल्याने अज्ञात चोरटयांच्या विरूद्ध चोरीचा गुन्हा नोदंविण्यात आला असुन , तपास पोलीस निरिक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शना खाली पोलीस करीत आहे .