Home Blog Page 543

निराधार महिलांच्या पाठीशी महाविकास आघाडी सरकार खंबीरपणे उभे आहे-आमदार राजेश एकडे

0

 

नांदुरा (प्रफुल्ल बिचारे पाटिल ):-

राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजने अंतर्गत मलकापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा.श्री.राजेश एकडे यांच्या हस्ते १८ निराधार महिलांना प्रत्येकी २०,००० रु.चा धनादेश वाटप करण्यात आले.निराधार महिलांच्या पाठीशी महाविकास आघाडी सरकार खंबीरपणे उभे आहे असे मनोगत आमदार राजेश काकडे यांनी व्यक्त केले.या कार्यक्रमास जेष्ठ काँग्रेस नेते श्री.पदमभाऊ गावंडे(पाटील), जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस श्री.निलेश पाऊलझगडे,नांदुरा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री .भगवानभाऊ धांडे,नांदुरा शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री.गौरव पाटील,नांदुरा तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष श्री. ज्ञानेश्वर डांमरे,नांदुरा चे तहसीलदार श्री.राहुल तायडे, नांदुरा नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री आशिष बोबडे, नांदुरा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री. नाईकनवरे,नांदुरा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री.समाधान वाघ, तालुका भूमिअभिलेख चे श्री.सैतवाल,नायब तहसीलदार श्री,संजय मार्कंड यासह पात्र महिला लाभार्थी उपस्थित होत्या.

श्रीमती शैलजाताई प्रकाशराव भोंगळ” यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले

0

 

आज 26 जानेवारी भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्य ग्रामपंचायत कार्यालय पातुर्डा बु येथे गावचे प्रथम नागरिक “लोकनियुक्त सरपंच श्रीमती शैलजाताई प्रकाशराव भोंगळ” यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले राष्ट्रगीत होऊन संविधान प्रस्तावनेचे वाचन करण्यात आले
कार्यक्रमास उपस्थित सौ संगीताताई गाडे, सौ निर्मलाताई पुंडे,श्रीमती भिमाबाई वानखडे,अन्सार पठाण दिनकर इंगळे,रमेश डीखोलकर, निलेश चांडक,विनायक चोपडे,सौ शारदाताई वानखडे,सौ गोकुळाताई बोपले,सौ प्रमिलाताई वानखडे,सौ मीराताई कुरवाळे,सौ वैशालीताई इंगळे,सौ पुनमताई मांडवगडे,भास्कर आढाव, साजिद शहा,कपिल गवई हे सर्व ग्रा प सदस्य. ग्राम विकास अधिकारी मेहेंगे साहेब,मंडल अधिकारी उकर्डे साहेब,तलाठी कस्तूरे साहेब,तांबट साहेब,कोतवाल साहेब,पोलीस पाटील गणेश सुराडकर,विलास इंगळे,संजय सातव,सै लियाकत, ज्ञानेश्वर पवार,विठ्ठल इंगळे,चंद्रकांत येनकर दीपक तेजवाल, अशोक देशमुख,डी आर परघरमोर,श्रीकृष्ण आमझरे, नंदाताई धनडोरिया,कमलताई वाघ,हे सर्व ग्रामपंचायत कर्मचारी
रामकृष्ण करांगडे,सुभाष देशमुख,अमित पाटील पत्रकार श्याम इंगळे, किशोर दसोरे व गावकरी प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी उपस्थित होते.

प्रजासत्ताक दिनी बैलगाडी मार्च भव्य बैलगाडी मार्च

0

 

दिल्ली येथे कृषी कायद्यांचा विरोधात सुरू असलेल्या आंदोलनाच्या समर्थनार्थ देशात अनेक ठिकाणी येत्या २६ जानेवारी ला ट्रॅक्टर मार्च काढण्यात येणार आहे.
शेतकरी विरोधी कायदे रद्द व्हावेत म्हणून संग्रामपूर तालुक्यातील समस्त शेतकरी बांधवांच्या वतीने २६ जानेवारीला शेतकऱ्याचं पारंपारिक वाहन बैलगाडी चा मार्च काढून माननीय तहसीलदार, संग्रामपूर यांना निवेदन द्यायचे आहे.
तरी संग्रामपूर तालुक्यातील समस्त शेतकरी बांधवांनी बैलगाडी मार्च मध्ये सहभागी होऊन सहकार्य करावे ही आग्रहाची विनंती.

सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सूचना –

१) बैलगाडी मार्चमध्ये येतांना आपण शेतकरी म्हणूनच सहभागी व्हावे कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता किंवा पदाधिकारी म्हणून नाही.

२)आपल्या बैलगाडी मार्च मुळे इतर कोणालाही काहीच बाधा निर्माण होणार नाही याची जाणीव असावी.

३)बैलगाडी मार्च मुळे प्रशासनाला कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ देऊ नये उलट त्यांच्या सोबत सहकार्य वृत्तीनेच वागावे.

४)शेतकऱ्यांनी बैलगाडी मार्च मध्ये येतांना सोबत आपली न्याहरी/जेवण आणावे निवेदन दिल्यानंतर आपण सर्व सोबत न्याहरीचा लाभ घेऊ.

सर्व शेतकऱ्यांनी बैलगाडी घेऊन सकाळी ०८:०० वाजता संग्रामपूर बसस्टॉपवर एकत्र येऊन तेथून तहसील कार्यालयाकडे अत्यंत शिस्तीत व शांततेत जायचे आहे.

वेळ:-०८ :०० वाजता
स्थळ:- बसस्टॉप संग्रामपूर

संपर्क-

9423761908
9657154425
7588846544
8788710071

विनीत:- समस्त शेतकरी बांधव संग्रामपूर तालुका.

युवासेना मलकापूर – नांदुरा विधानसभेच्या वतीने आज तहसीलदार साहेब नांदुरा यांना निवेदन देण्यात आले

0

 

सुनिल पवार नांदुरा

गेले 10 महिन्या पासून कोरोनाच्या महामारी मध्ये सर्व जग विस्कळीत झाले होते त्याच महामारी मध्ये आपल्या महाराष्ट्रातील शाळा/कॉलेज सुद्धा बंद पडले होते आणि ST महामंडळ च्या कारभार सुद्धा विस्कळीत झालेला होता परंतु आता शाळा कॉलेज क्लासेस इतर शैक्षणिक संस्था ह्या पूर्वरत चालू झाल्या आहे व काही चालू होत आहे म्हणून नांदुरा तालुक्यातील 110 खेडे गावातील अंदाजे 5000 विद्यार्थी विद्यार्थिनी संख्या असून त्याचा शैक्षणिक विचार करून नांदुरा तालुक्यातील ST बस सेवा पूर्वरत चालू करून विद्यार्थाना व नागरिकांना सहकार्य करावे जेणे करून त्याच्या नांदुरा शहरात शिक्षण आणि इतर कामा साठी येण्याचा मार्ग सुकर होईल असे निवेदन देण्यात आले ह्यावेळी युवासेना उपजिल्हाप्रमुख रविंद्र वसंतराव भोजने विद्यार्थीसेना जि.प्रमुख मुन्नाभाऊ पांड,शिवसेना शहर संघटक संजय गुजर उपजिल्हाप्रमुख विद्यार्थी सेना ईश्वर पांडव युवासेना उपशहर प्रमुख *सोनू चोपडे,अक्षय सुल्ताने,पुरुषोत्तम सोनवणे,धनंजय वातपाळ,सागर वावटळीकर,शुभम वानखडे,पंचम तायडे,बबलू ताठे,दीपक अंबेकर,मोहन अडाळकर,दैवेंद्र जयस्वाल,शिवा एखंडे,वैभव गावंडे,योगेश इंगळे व शिवसैनिक उपस्थित होते.

भारतरत्न ए.पी.जे.अब्दुल कलाम फाउंडेशन चा उपक्रम स्वामी विवेकानंद राष्ट्रीय ज्ञानपीठाचे विद्यार्थी रोवणार जागतिक स्तरावर झेंडा…

0

 

गजानन सोनटक्के
जळगाव जामोद प्रतिनिधी:-

दि.२४ रामेश्वरम येथील भारतरत्न ए.पी.जे.अब्दुल कलाम फाउंडेशन च्या सौजन्याने येत्या ७ फेब्रुवारी रोजी अत्यंत कमी वजनाचे शंभर उपग्रह अवकाशात झेपावणाऱ असून यातील दोन उपग्रह हे स्थानिक स्वामी विवेकानंद राष्ट्रीय ज्ञानपीठाच्या विद्यार्थ्यांनी निर्माण केले आहेत. देशातील एकूण एक हजार विद्यार्थ्यांचा “स्पेस रिसर्च २०२१” या वैज्ञानिक उपक्रमात सहभाग असून ह्या उपक्रमाची जागतिक पातळीवर नोंद होणार असल्याने स्वामी विवेकानंद राष्ट्रीय ज्ञानपीठ चे विद्यार्थी जागतिक स्तरावर आपला झेंडा रोवणार असून विविध प्रकारचे पाच उपक्रमांमध्ये त्यांच्या नोंदी होणार आहेत. ह्या प्रकल्पाविषयी माहिती देण्यासाठी दिनांक २४ डिसेंबर रोजी स्वामी विवेकानंद राष्ट्रीय ज्ञानपीठ मध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी प्रमुख संयोजक मिलिंद चौधरी यांनी उपस्थितांशी ऑनलाइन चर्चा केली. यावेळी संस्थाध्यक्ष ऍड.गिरीश माळपांडे, संचालक नंदकिशोर काथोटे,प्राचार्य, विद्यार्थी व पालकांची तसेच संस्थेच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.संस्थेचे अध्यक्ष ऍड. गिरीश माळपांडे आणि या प्रकल्पाचे प्रमुख समन्वयक मिलिंद चौधरी यांच्या समन्वयातून स्वामी विवेकानंद राष्ट्रीय ज्ञानपीठाचे दहा विद्यार्थ्यांच्या एका गटाची या प्रकल्पासाठी निवड करण्यात आलेली आहे. ह्या प्रकल्पात दहा विद्यार्थ्यांचा एक गट असून हे बालवैज्ञानिक २५ ते ८० ग्रॅम वजनाच्या लहानात लहान असे शंभर उपग्रह तयार करणार आहेत. इतर शाळांमधील विद्यार्थी हे एक उपग्रह तयार करीत असून स्वामी विवेकानंद शाळेमधील विद्यार्थ्यांना दोन उपग्रह तयार करण्याची संधी प्राप्त झाली आहे. त्यांनी बी.एम.पी.आणि डी. टी.एच.-11 असे दोन उपग्रह तयार केले असून बी एम पी हा उंची ,हवेचा दाब याविषयीचा अभ्यास करेल तर दुसरा डी.एच.टी.-11 हा हवेतील आद्रता विषयीचा अभ्यास करेल. हे सर्व उपग्रह एका किटमध्ये फिट करून सात फेब्रुवारी रोजी हे शंभर उपग्रह सकाळी १०.३० वाजता रामेश्वरम येथील केंद्रांमधून मधून अवकाशात झेपावणाऱ आहेत.ह्या किट सोबत पॅरॅशूट(लाइट हेलिएम बलून), जी.पी.एस. ट्रॅकिंग सिस्टम सह लाईव्ह कॅमेरा जोडलेला असेल. सुमारे दहा किमी अंतर गेल्यानंतर या उपग्रहाचा केंद्राशी संपर्क तुटेल नंतर परत पंचवीस किलोमीटर पर्यंत ओझोन कक्षा पार करत पस्तीस किलोमीटर पर्यंत हे उपग्रह पोहोचणार असून नंतर परत पृथ्वीच्या दिशेने झेपावणार असून रामेश्वरम लगतच्या १२७ किलोमीटर परिसरात ते खाली कोसळतील.अशी माहिती या प्रकल्पाचे प्रमुख मिलिंद चौधरी यांनी दि.२४डिसेंबर रोजी ऑनलाईन चर्चेदरम्यान दिली.

——————————————————

“प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दिसतो.”– ऍड गिरीश माळपांडे

भारतरत्न डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचे कुटुंबीयांनी सुरू केलेल्या या उपक्रमासाठी या प्रकल्पाचे मुख्य समन्वयक मिलिंद चौधरी यांच्या सोबत संपर्क करून स्वामी विवेकानंद राष्ट्रीय ज्ञानपीठ मधील विज्ञानाविषयी प्रगती, रुची आणि अभिरुची असलेल्या दहा विद्यार्थ्यांचे एका गटाची त्यांनी निवड केली.इंजिनिअर, डॉक्टर होणे फार चांगली गोष्ट आहे ,पण त्याहून अधिक चांगली बाब म्हणजे शास्त्रज्ञ होणे. मला माझ्या शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दिसतो असे मत ह्यावेळी संस्थेचे अध्यक्षऍड.गिरीश माळपांडे यांनी व्यक्त केले. येत्या ७ फेब्रुवारीला हे उपग्रह अवकाशात झेपावणाऱ असून ह्या सर्व कार्यक्रमाचे लाइव्ह प्रक्षेपण विद्यार्थ्यांना त्यांचे मोबाईलवर दिसणार आहेच परंतु मोठ्या स्क्रीन व ते प्रक्षेपण शाळेतील सर्व विद्यार्थी, शिक्षक व पालकांना व इतरांना दाखविण्याची व्यवस्था केली असल्याचेही यावेळी ऍड. माळपांडे यांनी सांगितले. कोरोना च्या पार्श्वभूमीवर पालकांनी आपल्या मुलांना ह्या प्रोजेक्ट मध्ये सहभाग नोंदवून शाळेवर विश्वास टाकला त्याबद्दल त्यांनी पालकांचे आभार पण मानले. आपल्या शाळेमधून निवड झालेल्या दहा विद्यार्थ्यांच्या गटाचा प्रमुख कोण विद्यार्थी आहे? असे विचारले असता ऍड.माळपांडे यांनी सांगितले की प्रत्येक विद्यार्थी हा या गटाचा प्रमुख आहे. आणि त्या विद्यार्थ्यांशी संवाद साधल्यानंतर सर्व उपस्थितांना त्याचा प्रत्यय व अनुभव देखील आला.

——————————————————-

रिसर्च पेलोड क्यूब्ज चॅलेंज २०२१ प्रकल्पात सहभागी विद्यार्थी :–

१)प्रणित विलास हागे २) देवयानी रवींद्र इंगळे ३) राज रामेश्वर पारस्कर ४)भूषण संतोष देशमाने ५)सृष्टी रवींद्र गावंडे ६)प्रांजल वासुदेव दुकाने ७)तेजस्विनी मधुकर ताठे ८)ओम सोनाजी हागे ९)वेदांत अरविंद आगरकर १०)आर्या दिलीप राठी

——————————————————

हे सर्व शंभर उपग्रह एकाच वेळी अवकाशात प्रक्षेपित केले जाणार असून हा एक जागतिक आशिया खंडातील आणि भारतीय स्तरावरचा विक्रम ठरणार असल्याने या उपक्रमाची ग्रीनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये सुद्धा नोंद होणार आहे. या प्रकल्पातील सहभागी विद्यार्थ्यांच्या समूहाला कलाम कुटुंबीयांतर्फे सन्मानपत्र दिले जाईल, शिवाय प्रत्येक विद्यार्थ्यांना देखील व्यक्तिगत

राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात तिन ठार;तर नऊ जखमी..

0

 

नांदुरा : – ( प्रफुल्ल बिचारे पाटिल )

भरधाव कंटेनरने काळी पिवळी ला धडक देवून झालेल्या भिषण अपघातात पती – पत्नीसह तिघेजण ठार तर 9 प्रवासी जखमी झाल्याची घटना.

आज दि .24 जानेवारी रोजी सायंकाळी 7 वाजता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर नांदुरा – वडनेर मार्गावरील वडी फाट्यानजीक घडली.

 

एका क्लिक वर  बातमी पहा

https://www.suryamarathinews.com/post/8254

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार,काळी पिवळी क्रमांक एमएच 26 बी 9329 नांदुरा कडून मलकापूरकडे प्रवासी घेवून जात असताना वडनेर कडून नांदुराकडे भरधाव वेगाने येत असलेल्या कंटेनर क्रमांक आर जे 10 जीए 7599 च्या चालकाने वडनेर नजीक काळी पिवळीला जोरदार धडक दिली.

यावेळी झालेल्या भीषण अपघातात काळी पिवळी मध्ये बसलेले प्रवासी सुनिल सुभाष तायडे सौ.अर्चना सुनिल तायडे रा.वडनेर हे दोघे पती-पत्नी व भगीरथाबाई विठ्ठल दळवी रा.वडनेर या तिघांचा गंभीर मार लागल्याने मृत्यु झाला.

तर सौ.आशा पुंडलीक जंगले रा.काटी , सौ.जय अनंतराव जंगले रा .काटी,रामचंद नथ्थू सातव रा.वडनेर , सौ.पुष्पा गजानन इंगळे रा.वडनेर , कु.श्रेया सुनिल तायडे , कु.तनिष्का रमेश होनाडे , रियांश सुनिल तायडे , सौ.कमल दिनकर पांडे,सौ.बेबाबाई राजाराम सातव दोन्ही रा.वडनेर हे 9 प्रवासी जखमी झाले आहेत .

_घटनेची माहिती मिळताच आदिंनी घटनास्थळी धाव घेवून जखमींना येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविले.पुढील उपचाराकरीता खामगाव येथील सामान्य रूग्णालयात हलविण्यात आले.

दरम्यान अपघातस्थळावरून कंटेनर चालकाने कंटेनर घेवून पळ काढला होता .त्याला नागरिक व पोलिसांच्या सतर्कतेमुळे नांदुरा शहरात पकडण्यात आले .

याप्रकणी कंटेनर चालक जिवन नलबतसिंग मालवी वय 32 वर्ष रा.निपानी खुर्द जि.साजापूर राज्य मध्यप्रदेश याला नांदरा पोलिसांनी अटक केली आहे.

बिरसी_विमानतळ_कंत्राटी_सुरक्षा_रक्षकांची_फिर्याद मा_राजसाहेब_ठाकरे_पर्यंत_पोहचणार_-मनसे 

1

 

गोंदिया तालुक्यातील बिरसी या ठिकाणी २००७ ला विमानतळ प्रकल्पाचा विस्तारीकरण करण्याला सुरवात झाले असता इथल्या जनतेच्या आशा पल्लवित झाल्या होत्या,कि या विमानतळ प्रकल्पा मध्ये आपल्या जमिनी गेल्या मुळे आपण प्रकल्प ग्रस्त असल्या मुळे आपल्या मुलांना या ठिकाणी रोजगार, नोकरी मिळेल व ४४ इथल्या लोकांना सुरक्षा गार्ड म्हणून त्यांना कंत्राटी पद्धतीत ठेवण्यात आले, व त्यांनी सुरक्षा गार्ड हि सेवा निरंतर १३ वर्ष पर्यंत केली असता, अचानक ०१ जानेवारी २०२१ ला या प्रकल्प ग्रस्त कंत्राटी सुरक्षा गार्ड यांना विमानतळ प्राधिकरण मधून काढण्यात आले, पण आता यांनी आपली सेवा विमान प्राधिकरणात १३ वर्ष घालविली असता अचानक त्यांना कामा वरून कमी केल्यामुळे त्यांच्या समोर आपल्या कुटूंबाची उपजीविका कशी चालवीणार हा त्यांच्या समोर मोठा प्रश्न पडला असता त्यांनी आपल्या कुटूंबा बरोबर आंदोलन करून आपल्या हक्का करीता लढू व विमान प्राधिकरणाला आंदोलनाच्या माध्यमातून आम्हाला पुन्हा सुरक्षा गार्ड सेवेत समाहून घेण्याची मागणी करू अशी भूमिका घेऊन व आम्हाला आपल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पाठींबा हवा म्हणून त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा अध्यक्ष मनीष चौरागडे याच्याशी दिनांक १६/०१/२०२१ ला भेट घेऊन चर्चा केली व आम्ही सर्व सुरक्षा गार्ड आपल्या कुटूंबा सोबत दिनांक १९/०१/२०१ ला बिरसी विमानतळ या ठिकाणी आंदोलन करणार असे पत्र दिले असता, दिनांक २१/०१/२०२१ ला मनसेचा शिष्ट मंडळ जिल्हा अध्यक्ष हेमन्त लिल्हारे,मनीष चौरागडे,जिल्हा उपाध्यक्ष मुकेश मिश्रा, गोंदिया तालुका अध्यक्ष सुरेश ठाकरे,शहर अध्यक्ष राजेश नागोसे,शहर उपाध्यक्ष क्षितिज वैद्य, तिरोडा शहर अध्यक्ष प्रकाश फंटीग,खेमा ठाकरे, रोहित उईके व सर्व मनसे पदाधिकारी बिरसी विमानतळाचा मुख्य गेट समोर आपल्या मागण्या मान्य करण्याकरिता आंदोलन करीत असल्या सुरक्षा गार्ड याच्या पेंडाल मध्ये जाऊन त्यांच्या व त्यांच्या कुटूंबियांसी सविस्तर चर्चा करून दोन्ही जिल्हा अध्यक्ष यांनी त्यांना पत्र देऊन आश्वासन दिलेकी आम्ही सर्व मनसे कार्यकर्ते आपल्या आंदोलना सोबत आहोत, व आपल्यावर झालेल्या अन्याय हा मा.राज साहेब ठाकरे व मनसे कामगार नेते राणे साहेब यांच्या माध्यमातून सोडविण्याचा प्रयत्न करू असी चर्चा करण्यात येईल अशी चर्चा करण्यात आली..

वडशिंगीच्या जि.प.केंद्रीय मराठी प्राथमिक शाळेने मिळविला तालुक्यात पहिला आय.एस.ओ.मानांंकन प्राप्त शाळा होण्याचा बहुमान….

1

 

गजानन सोनटक्के
जळगांव जा.प्रतिनिधी

जळगाव जामोद तालुक्यात सातत्याने नवनवीन उपक्रमात अग्रेसर असलेली ग्राम वडशिंगी येथील जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा आहे.

आय.एस.ओ.मानांकन प्राप्त करणारी ही तालुक्यातील पहिली शाळा असून शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत पदाधिकारी, गावकरी, पालक, मुख्याध्यापक व त्यांचे सहयोगी शिक्षक यांच्या परिश्रमामुळेच शाळेला आय.एस.ओ.मानांकन प्राप्त झाल्यामुळे गावकऱ्यांमध्ये आनंद व उत्साहाचे वातावरण आहे.

 ही बातमी पण पहा सोबतच

https://www.suryamarathinews.com/post/8209

 

 

आय.एस.ओ. मानांकनाशी संबंधित अधिकारी पी.एन.पाटील यांनी ५जानेवारी रोजी शाळेला प्रत्यक्ष भेट देऊन आय.एस.ओ. करण्यासाठी शाळेची पाहणी केली.

आणि त्यांच्या सकारात्मक अहवालानंतर दि.२४ जानेवारी रोजी शाळेला आय.एस.ओ. मानांकन प्राप्त झाल्याचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष वकीलखान मेहबूबखान यांनी सांगितले.संपूर्ण तालुक्यात नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणारी वडशिंगी शाळा आज ISO शाळा देखील झाली.शाळेला ISO मानांकन मिळविण्यासाठी अनमोल मार्गदर्शन करणारे गटविकास अधिकारी शिवशंकर भारसाकळे , गटशिक्षणाधिकारी फाळके ,शिक्षण विस्तार अधिकारी राजेंद्र तायडे ,केंद्रप्रमुख वाघ,शाळा व्यस्थापन समिती अध्यक्ष वकिलखां व त्यांचे सहकारी

सदस्य,मुख्याधिपिका सौ.शोभाताई सारंगधर गोमासे आणि त्यांचे सहयोगी शिक्षक यांनी गेल्या वर्षभरात ह्यासाठी विशेष परिश्रम घेतले.

 

शाळेला शाळा ISO करण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करणारे शाळा व्यवस्थापन समिती चे पदाधिकारी, ग्रामपंचायत वडशिंगी चे सरपंच, सचिव आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य,तलाठी, मुख्याध्यापिका सौ.एस.एस. गोमासे ,व शिक्षक वृंद श्रीकृष्ण भटकर ,सोळंके,येणकर मॅडम,कपले मॅडम, शृंगारे सर, बशिरे सर,या सर्वांचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष वकीलखां यांनी अभिनंदन करून आभार मानले.

व भविष्यातही शाळेच्या उत्कर्षासाठी ह्या सर्वांचे सहकार्य राहील ,अशी अपेक्षा व्यक्त केली. ही शाळा वर्षभर प्रत्येक उपक्रमात, राष्ट्रीय उत्सवात सातत्याने अग्रेसर असते .

ह्या शाळेला आयएसओ मानांकन प्राप्त झाल्यामुळे शिक्षण क्षेत्रात आनंदाचे वातावरण असून गटविकास अधिकारी शिवशंकर भारसाकडे यांनी सुद्धा या ग्रामस्थ,पालक, शाळेच्या व्यवस्थापन समिती व शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.

तसेच या शाळेचा आदर्श तालुक्यातील इतर शाळांनी सुद्धा घ्यावा अशी अपेक्षा सुद्धा त्यांनी व्यक्त केली आहे.

नांदुरा नगरीच्या सर्वांगीन विकासा साठी सदैव तत्पर-आ.राजेश एकडे

0

 

नांदुरा(प्रफुल्ल बिचारे पाटिल ):-

आज नांदुरा नगर परिषद अंतर्गत प्रभाग क २ मधील चोपडे प्लॉट, राखोंडे पुरा व आठवडी बाजार परिसरात पिण्याच्या पाण्याची पाईप लाईन,नावाबपूरा तसेच सिंधी कॉलनी मध्ये पेव्हर ब्लॉक रस्ता अश्या विविध विकास कामाचे भूमिपूजन *मलकापूर विधानसभा मतदार संघाचे आ.राजेश एकडे* यांच्या हस्ते व नांदुरा नगर परिषदेचे उपाध्यक्ष मा. लालाभाऊ इंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.नांदुरा नगरीच्या सर्वांगीन विकासा साठी सदैव तत्पर व कटिबद्ध असल्याचे मत या वेळी आ.राजेश एकडे यांनी व्यक्त केले.या भूमीपूजन समारंभास
राष्ट्रवादी काँगेस चे जिल्हा सरचिटणीस डॉ.अमीन,नगरसेवक सर्वश्री.अँड.मोहतशाम रजा,मो.साजीद शेख, अजय भिडे, अनंता भारंबे, पिंटू कोलते,संदीप फाटे, ईल्यास सर, मो.तौसीफ, राजुसेठ मोहनानी, पत्रकार भाऊसाहेब बावणे, तुळशीराम राखोंडे, नवाब जिया, डॉक्टर नईम, बाळीराम चोपडे, हाजी हुसैन, बब्बुसेठ,इश्वर सेठ जानवानी, आसीफ खान, मजहर खान, मनोज रामचंदानी, सुरेश खानचंदानी, अमुल जैन,जावेद खान, तेजपाल जानवानी, गणेश म्हात्रे, शेख.गफ्फार, सै. साबीर, सुरज राखोंडे व प्रभाग क्र.२ मधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नेहरु युवा केंद्र नांदुरा च्या माध्यमातून सच्छता अभियान व नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती साजरी

0

 

नांदुरा (प्रफुल्ल बिचारे पाटिल ):-

 

नेहरु युवा केंद्र युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालयात भारत सरकार तालुका नांदुरा च्या वतीने नांदुरा शहरातील रेल्वे स्टेशन चौकातील सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा जो घाणीच्या साम्राज्यात विळख्यात पडला होता तेथील सर्व गवत तसेच गुटख्याच्या पुड्या व घाण साफ करून पाण्याने स्वच्छ धुवून खरी 125 वी जयंती राष्ट्रीय चेतना दिवस म्हणून साजरा करून त्यांना अभिवादन करण्यात आले. तसेच नेहरू युवा केंद्र नांदुरा स्वयंसेवक अमर रमेश पाटील यांनी नेताजीच्या आयुष्यावर प्रकाश टाकत पुतळ्याची असलेली अवस्था पाहून हळहळ व्यक्त केली पुतळा यावेळी पत्रकर संतोष तायडे सामाजिक कार्यकर्ते कुलदीप डंबेलकर,भागवत पेठकर,अमोल पाटील,गणेश वाकोळे, व इतर एनसीसी जवान उपस्थित होते. त्यांनी राष्ट्रगीत म्हणून कार्यक्रमाची सांगता केली