Home Blog Page 543

बर्ड फ्लू च्या धास्तीने चिकन ऐवजी ग्राहकाची मासे व बोकडाला पसंदी !

0

 

सिंदखेड राजा (सचिन खंडारे )

बुलढाणा जिल्ह्यामध्ये चिखली तालुक्यातील भानखेड येथील वीस कोंबड्यांचा मृत्यू झाला होता व त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता त्या नंबर बर्ड फ्ल्यूमुळे त्या मृत्युमुखी पडलेल्या होत्या !त्यामुळे चिकन खाणाऱ्या मंडळीचा पुरता हिरमोड झाला आहे :चिकन खाणारे ग्राहक हे आता मासे व बोकडाच्या मटणाच्या कडे वळले आहे .हे चित्र सध्या दिसत आहे ! सिंदखेडराजा तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या साखरखेर्डा येथील मटन बाजारामध्ये मंगळवारी बोकड्याचे मटन व मासोळी घेण्यासाठी ग्राहकांची एकच गर्दी झाली होती !व चिकन घेणाऱ्यांची संख्या ही तुरळक होती !त्यामुळे बर्ड फ्लू च्या धास्तीने चिकन खाणारे खवय्ये दुसरीकडे वळण्याची दिसते !त्यातच करून मुळे वर्षभर सर्वच दुकाने बंद असल्यामुळे अनेक लोकांचा हिरमोड झाला होता!काही का असेना खवय्ये बोकड व मासोळी घेण्यासाठी मटण मार्केटमध्ये गर्दी करताना दिसत आहे हे मात्र खरे !

साखरखेर्डा पोलीस स्टेशन चे कर्तव्यदक्ष ठाणेदार जितेंद्र आडोळे न्यायाधीशाच्या भूमिकेत ! अनेक घरगुती तंटे जागच्याजागी मिटवले !

0

 

सिंदखेड राजा (सचिन खंडारे )

सिंदखेड राजा तालुक्यातील अतिशय संवेदनशील समजल्या जाणाऱ्या साखरखेर्डा येथे मागील ठाणेदार संग्राम पाटील यांच्या जागी बुलढाणा येथून आलेले श्री जितेंद्र आडोळे ‘यांना जेमतेम दोन महिने झाले असतील ‘या दोन महिन्याच्या अल्पशा कारकिर्दीमध्ये त्यांनी आपल्या बुद्धिमत्तेची चुणूक दाखवून अनेक अशक्य गोष्टी शक्य करून दाखवल्या !त्यामध्ये नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत च्या निवडणुकी होय !ग्रामपंचायत म्हटलं तर शुल्लक कारणांवरून भांडणे होतात अनेक ग्रामपंचायत चे वाद साखरखेर्डा पोलीस स्टेशनमध्ये आले होते ‘ वाद म्हटल्यावर एकमेकाची पोलिसात तक्रार केल्यानंतर दाखल होणारे गुन्हे आणि त्यानंतर हे प्रकरण न्यायालयामध्ये जाते ‘परंतु या सर्व गोष्टींचा विचार करताना ठाणेदार श्री या आडोळे यांनी दोन्ही फिर्यादीने अगदी बारीक गोष्टी समजून समजून पुढे भांडणाचे कशाप्रकारे रूपांतर होते !या सर्व गोष्टी ती पोलीस स्टेशन मध्ये आलेल्या प्रत्येक तक्रार करत्याला ते सांगत असतात ‘आणि त्याचाच परिणाम म्हणून मोठमोठ्या वादात होऊ घातलेले भांडणाचे रुपांतर क्षणातच त्यांनी मिटवले ।दारू पिऊन नवरा बायकोचे होणारे वाद त्यांनी सहज मिटवले !एवढेच नव्हे तर अतिशय गाजलेले प्रकरण अंडे का फंडा होय ।मुलाला दोन बॉयलर अंडे पत्नीने दिले म्हणून नवऱ्याने पत्नीला मारले व पत्नी ने थेट पोलिस स्टेशनच गाठले ।या ठिकाणी ठाणेदार श्री आडोळे यांनी फिर्यादी महिलेच्या भावाची भूमिका तर मुलाच्या मामाची भूमिका चातुर्याने निभावून ।महिलेच्या नवऱ्याला बॉयलर अंडे आणून दिले व प्रकरण मिटवले !असे अनेक घरगुती प्रकरण मोठमोठाले संवेदनशील प्रकरण ठाणेदार श्री आडोळे पोलीस स्टेशन मध्ये मिटवून ‘इतर पोलिस स्टेशनला एक आदर्श घालून देत आहेत :या ठिकाणी ते न्यायाधीशाची भूमिका पार पाडत आहे !यामुळे श्री आडोळे यांचे संपूर्ण परिसरामध्ये कौतुक होत आहे 1 – – – — — — — — — !प्रत्येक फिर्यादी हा न्याय मिळेल या आशेने पोलीस स्टेशन मध्ये येत असतो त्या प्रत्येकाचे तक्रारीचा निपटारा करणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे प्रकरण समस्या मिटली पाहिजे यासाठी मी प्रयत्न करत आहे !निश्चितच यामुळे लोकांचा पोलीस स्टेशन कडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल – – – – –श्री जितेंद्र आडोळे ठाणेदार (साखरखेर्डा पोलीस स्टेशन )

गजानन महाराज मंदिराच्या प्रथम प्राणप्रतिष्ठा वर्धापनदिन निमित्त महाप्रसादाचे वाटप

0

 

अजहर शाह मोताळा

मोताळा :- स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समिती जवळ उभारण्यात आलेल्या श्री संत गजानन महाराज मंदिराच्या प्रथम प्राणप्रतिष्ठा वर्धापनदिना निमित्त मंदिर समितीच्या वतीने श्री च्या भक्तांसाठी भव्य महाप्रसादाचे वाटप करण्यात आले होते यावेळी पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी मोठ्या प्रमाणात महाप्रसादाचा लाभ घेतला जागतिक महामारी असलेल्या कोरोना आजाराने भक्तांना देवा पासुन प्रदीर्घ अश्या लॉकडाउन काळात मंदिर बंद असल्याने दूर ठेवले होते परंतु आता हळूहळू परिस्थिती पूर्व पदावर येत असताना लॉकडाउन काळात भक्त आणि देवा मध्ये झालेला दुरावा कमी करण्यासाठी स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समिती जवळ उभारलेल्या श्री च्या भव्य मंदिरात गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात भक्ती पूर्ण वातावरणात भव्य शोभायात्रा काढून श्रीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली होती
याचं श्री गजानन महाराज यांच्या प्रथम मंदिर प्राणप्रतिष्ठा वर्धापनदिन निमित्त भक्तांची भगवंताची भेट व्हावी व लॉकडाउन काळात झालेला दुरावा दूर करण्यासाठी मंदिर समितीच्या वतीने पंचक्रोशीतील भाविक-भक्तांसाठी भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मोठ्या प्रमाणात भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला यावेळी मंदिर समितीचे पदाधिकारी सदस्य यांनी कोरोना आजाराचे गांभीर्य लक्षात घेता मंदिर परिसरात विविध उपाययोजना केल्या होत्या

शेतातून ४५,००० रुपयाचे बैल चोरीला, पांग्री काटे येथील घटना !

0

 

सिंदखेडराजा (सचिन खंडारे )

सिंदखेड राजा तालुक्यातील पांग्री काटे या गावांमध्ये दोन बैला चोरीला गेल्याची घटना दिनांक 31 जानेवारीच्या मध्यरात्री घडली .
त्यामुळे पशु मालकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे ‘अगोदरच शेतकरी अतिवृष्टीमुळे तसेच नापिकीमुळे आर्थिक अडचणीत सापडलेला आहे बळीराजा शेतीची मशागत करण्याकरता गाय ‘बैलांचे संगोपन करतो ‘ काळजी घेतो ‘परंतु याकडे सुद्धा चोरट्यांची लक्ष आहे ‘ जनावराची सुद्धा चोरी केले जातेही दुर्दैव आहे ‘पांग्री काटे येथील विश्वास तुळशीराम बोरे ‘यांचा गावाजवळच जनावराचा गोठा आहे तुळशीराम बोरे ‘ हे नेहमीप्रमाणे आपली जनावरे गोठ्यामध्ये बांधले असतांना ’31 जानेवारीच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी त्यांचे लाल रंग असलेले पंचेचाळीस हजार रुपयाचे दोन बैल ‘चोरून नेले सकाळी ‘नेहमीप्रमाणे चारा पाणी करण्यासाठी विश्वास तुळशीराम बोरे हे गोठ्यामध्ये गेली असताना त्यांना बैल आढळून आले नाही .त्यांनी चोहीकडे शोधाशोध केली असताना कुठेही बैलाचा थांगपत्ता लागला नाही ‘

वडाळी येथील युवक बेपत्ता; जुहीकडे शोधाशोध करूनही लागला नाही थांगपत्ता!

0

 

सिंदखेड राजा (सचिन खंडारे )

सिंदखेडराजा तालुक्यातील वडाळी येथील युवक बेपत्ता झाला आहे. 28 जानेवारीपासून तो गायब असून, त्याचा सगळीकडे शोध घेऊन अखेर पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे.
भगवान हरिचंद काकड (31, रा. वडळी ता. सिंदखेड राजा) 28 जानेवारीच्या सकाळी ट्रॅक्टरमध्ये कापूस घेऊन तो देऊळगाव राजा येथे आला होता. कापूस विक्री करून तो सिंदखेड राजा येथे आला. तिथे प्रताप उत्तम जाधव यांच्या ट्रॅक्टरमध्ये सिमेंट भरून दुचाकीने घरी निघाला होता. मात्र रात्री उशिरापर्यंत घरी आला नाही. त्याच्या नातेवाईकांनी शोध घेतला. मात्र त्याचा पत्ता लगला नाही. त्यामुळे नंदकिशोर प्रल्हाद घोंगे (36, रा. बामखेड ता. सिंदखेड राजा) यांनी सिंदखेड राजा पोलीस ठाण्यात तो हरवल्याची तक्रार दिली आहे. रंग गोरा, उंची 5.5 फूट, नाक सरळ, अंगात लाल- काळे पट्टे असलेले टी शर्ट, काळी पँट, पायात काळी चप्पल असे युवकाचे वर्णन आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक सुनिल सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पो.काँ. श्री. नागरे करत आहेत. हा युवक कोठे आढळल्यास पो. काँ. नागरे यांच्याशी मो. नं. 7020370018 वर संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

शिंदी येथील अपंग समाधान ने मिळवला बुलढाणा जिल्ह्याचा नावलौकिक !महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाईवर अपंग समाधानने फडकवला तिरंगा ।

0

 

सिंदखेडराजा (सचिन खंडारे )

सिंदखेड राजा तालुक्यातील शिंदी येथील एका पायाने अपंग असलेला समाधान रमेश बंगाळे या 24 वर्षीय तरुणाने महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर असलेल्या कळसुबाई हे शिखर सहजरित्या पार करीत 26 जानेवारीला शिखरावर तिरंगा फडकवला !यामुळे संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यातून अपंग समाधान चे भरभरून कौतुक होत आहे !शिवूर्जा प्रतिष्ठान औरंगाबाद संस्थेच्यावतीने व संस्थेचे अध्यक्ष शिवाजी गाडे यांनी अपंगासाठी ही मोहीम आयोजित केली होती आणि त्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव समाधान बंगाळे हा अपंग तरून सहभागी होता !26 जानेवारी ला संपूर्ण भारत देशामध्ये प्रजासत्ताक दिनाचं ध्वजारोहण सुरू असताना इकडे अपंग समाधान सकाळी ५३० वाजता शिखर चढण्यास सुरुवात केली आणि सकाळी 10.30 वाजता तो शिखराच्या माथ्यावर पोहोचला ! ६ तासाचा खडतर प्रवास करत समाधान व त्यांच्या अपंग सहकाऱ्यांनी महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर त्यांची उंची १६४६ मीटर आहेहे सर करुन माथ्यावरती भारत देशाचा तिरंगा डौलाने फडकला !यामुळे समाधान बंगाळे यांना प्रशस्तीपत्र व गोल्ड मेडल देऊन संस्थेच्या वतीने त्याचा सन्मान करण्यात आला ‘शिंदी सारख्या खेडेगावातून येऊन बुलढाणा जिल्ह्याचा नावलौकिक मिळाल्यामुळे समाधान वर संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यातून कौतुकाचा वर्षाव होत आहे ‘

शिंदी ते साखरखेर्डा खड्डे बुजवण्याचे काम निकृष्ट दर्जाचे !अवघ्या दोन तासात निघाली गिट्टी !डांबराचे प्रमाण अतिशय कमी !पुढे पाठ मागे सपाट !

0

 

सिंदखेडराजा ( सचिन खंडारे )

शिंदी ते साखरखेर्डा हा रोड पूर्णपणे खराब झालेला आहे अनेक ठिकाणी मोठ मोठाले खड्डे सुद्धा पडलेली आहे परंतु खड्डे बुजवण्याचे काम गेल्या आठवडाभरापासून सुरू आहे परंतु हे काम करत असताना सार्वजनिक बांधकाम विभागाने पुढे पाठ मागे सपाट या म्हणीप्रमाणे काम सुरू केली आहे कारण हे काम करत असताना खड्डे बुजवताना डांबराचे प्रमाण अतिशय कमी असून घाईगडबडीने हे खड्डे बुजवण्याचे काम उरकले आहे !
त्यामुळे साखरखेर्डा ते शिंदी गावापासून दीड किलोमीटर अंतरावरील रस्त्यावरील बुजवलेल्या खड्ड्यातून गिट्टी बाहेर आली आहे ‘डांबर चे प्रमाण कमी असल्यामुळे संपूर्ण रस्ता परत जसाच्या तसा होत आहे ‘त्यामुळे पुढे पाठ मागे सपाट अशीच अवस्था खड्डे बुजवताना झालेली दिसते .खड्डे बुजवताना निकृष्ट दर्जाचे काम झाल्यामुळे या कामाची चौकशी करण्याची मागणी स्थानिक नागरिक करीत आहे !

साखरखेर्डा येथे नाफेड तुर खरेदीचा पालकमंत्री ना . डॉ . राजेंद्र शिंगणे यांच्या हस्ते शुभारंभ !

0

 

सिंदखेड राजा (सचिन खंडारे )

येथे नाफेड तुर खरेदीचा शुभारंभ पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांच्या हस्ते १ फेब्रुवारी रोजी करण्यात आला . मोहाडी येथील शेतकरी श्रीधर काळे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला .
शेतकऱ्यांच्या शेत मालाला योग्य भाव मिळावा यासाठी महाराष्ट्र शासनाने तुर , हरबरा , मका या भरड धान्याची खरेदी करुन शेतकऱ्यांना भाव दिला . महाराष्ट्र मार्केटिंग फेडरेशन असो , की नाफेडची खरेदी असो , खरेदीदारांनी शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करणे आणि त्यांना मालाचे चुकारे व्यवस्थीत देणे महत्वाचे आहे . मागील काळात तालुका खरेदी-विक्री संघाने तुर खरेदी केली होती. आजही काही शेतकऱ्यांना तुरीचे पैसे मिळाले नाही . या गैरकारभारामुळे शेतकरीच नागावल्या गेला . तो प्रकार होवू नये यासाठी सोन पाऊल अॅग्रो कंपणीने नाफेड मार्फत भरड धान्य खरेदी करतांना विश्वास संपादन केला आहे . चुकारे व्यवस्थीत दीले आहेत . त्यामुळे आज तुर खरेदीचा शुभारंभ करण्यासाठी आलो . येथेही काही गैर प्रकार झाले तर माफी नाही . असे उद्गारही त्यांनी साखरखेर्डा येथील तुर खरेदीचा शुभारंभ करतांना काढले .
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्य राम जाधव हे होते . तर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तेजराव देशमुख ,सय्यद रफिक ‘दाऊद सेट कुरेशी ‘ पंचायत समितीचे माजी सभापती राजू ठोके , नाथाभाऊ दराडे , बाळासाहेब बेंदाडे , कांता पाटील वायाळ , मोहाडीचे सरपंच अशोक रिंढे , भानुदास लव्हाळे , श्रीधर काळे सुधीर बेंदाडे , पिंपळगाव सोनारा सरपंच तोताराम ठोसरे , रामदाससींग राजपूत यासह असंख्य शेतकरी उपस्थित होते . कार्यक्रमाचे संचालन डी एन पंचाळ यांनी केले.

बकरी चोरांच्या टोळीचा पर्दाफाश

0

 

गोंदिया-शैलेश राजनकर

गोंदिया जिल्ह्यातील पशु मालकांकडून रात्री बरीच बकरे चोरी केली जात होती, त्याची तपासणी करण्याची जबाबदारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकावर सोपविण्यात आली होती.

छत्तीसगडच्या दुर्ग जिल्ह्यातील भिलाई येथून या बकरी चोर टोळीचे सदस्य चारचाकी गाडीवर येत असत व 8-10 बक of्यांचा एक कळप वाटेजवळच्या खांबाला बांधलेला दिसला आणि त्याने तो उचलला व ठेवले. ती चार चाकी गाडीत होती. आणि बकरी ओरडत नव्हती, म्हणून त्याने आपला घसा खेचून हे दाबून घेत असे,

खरं तर बकरी चोरांची ही टोळी मटण विकण्याचा आणि शेतकर्‍यांच्या मांसाची चोरी करून चोरी केलेल्या जनावरांचे पैसे विकून नफा कमावण्याचा व्यवसाय करते आणि पशुधन कापल्यानंतर सर्व पुरावे नष्ट करण्यात आले.
जिल्हा पोलिस अधीक्षक विश्वास पानसरे यांनी आयोजित पत्रपरिषदेत माहिती दिली- ज्या शेतकर्‍यांच्या शेळ्या डेली जंगलात चरतात व त्यांची बकरी ओळखत असत अशा 8 बक identif्यांची ओळख पटवून देताना त्यांचे पशुधन त्यांच्याकडे देण्यात आले. उर्वरित 40 बक्या नुकत्याच चारा-पाणी प्रणालीसह अर्जुनी मोरगावच्या कांजी हाऊसमध्ये ठेवल्या आहेत.

या टोळीतील काही सदस्य अद्याप फरार आहेत आणि कोठडीतील आरोपींनी 8 वेळा कबूल केले आहे, पोलिसांनी घटनेत वापरलेली दोन चार चाकी वाहनेही ताब्यात घेतली असून पुढील तपास सुरू आहे.

महाविकास आघाडी सरकार हे गोरगरीब, कष्टकरी शेतकऱ्यांचे सरकार-आमदार राजेश एकडे

0

 

नांदुरा(प्रफुल्ल बिचारे पाटिल):-

मलकापूर विधानसभा मतदार संघाचे आमदार श्री.राजेश एकडे यांच्या हस्ते मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तूर खरेदीचा शुभारंभ शेतकऱ्यांचा सन्मान करून आज संपन्न झाला.यावेळी
महाविकास आघाडी सरकार हे गोरगरीब, कष्टकरी शेतकऱ्यांचे सरकार असल्याचे मत आमदार राजेश एकडे यांनी व्यक्त केले. या तूर खरेदी शुभारंभ कार्यक्रमास मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा मलकापुर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री.बंडूभाऊ चौधरी, श्री. गजानन सोनवणे,श्री.बाळू भिसे,मलकापूर खरेदी-विक्री संघाचे श्री.कृष्णाभाऊ खोपोटे,श्री,सूर्यभान कवळे, दुय्यम निबंधक श्री.महेश कृपलानी,श्री.
म्हैसागर, सचिव श्री.जगताप व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.