Home Blog Page 549

बिरसी_विमानतळ_कंत्राटी_सुरक्षा_रक्षकांची_फिर्याद मा_राजसाहेब_ठाकरे_पर्यंत_पोहचणार_-मनसे 

1

 

गोंदिया तालुक्यातील बिरसी या ठिकाणी २००७ ला विमानतळ प्रकल्पाचा विस्तारीकरण करण्याला सुरवात झाले असता इथल्या जनतेच्या आशा पल्लवित झाल्या होत्या,कि या विमानतळ प्रकल्पा मध्ये आपल्या जमिनी गेल्या मुळे आपण प्रकल्प ग्रस्त असल्या मुळे आपल्या मुलांना या ठिकाणी रोजगार, नोकरी मिळेल व ४४ इथल्या लोकांना सुरक्षा गार्ड म्हणून त्यांना कंत्राटी पद्धतीत ठेवण्यात आले, व त्यांनी सुरक्षा गार्ड हि सेवा निरंतर १३ वर्ष पर्यंत केली असता, अचानक ०१ जानेवारी २०२१ ला या प्रकल्प ग्रस्त कंत्राटी सुरक्षा गार्ड यांना विमानतळ प्राधिकरण मधून काढण्यात आले, पण आता यांनी आपली सेवा विमान प्राधिकरणात १३ वर्ष घालविली असता अचानक त्यांना कामा वरून कमी केल्यामुळे त्यांच्या समोर आपल्या कुटूंबाची उपजीविका कशी चालवीणार हा त्यांच्या समोर मोठा प्रश्न पडला असता त्यांनी आपल्या कुटूंबा बरोबर आंदोलन करून आपल्या हक्का करीता लढू व विमान प्राधिकरणाला आंदोलनाच्या माध्यमातून आम्हाला पुन्हा सुरक्षा गार्ड सेवेत समाहून घेण्याची मागणी करू अशी भूमिका घेऊन व आम्हाला आपल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पाठींबा हवा म्हणून त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा अध्यक्ष मनीष चौरागडे याच्याशी दिनांक १६/०१/२०२१ ला भेट घेऊन चर्चा केली व आम्ही सर्व सुरक्षा गार्ड आपल्या कुटूंबा सोबत दिनांक १९/०१/२०१ ला बिरसी विमानतळ या ठिकाणी आंदोलन करणार असे पत्र दिले असता, दिनांक २१/०१/२०२१ ला मनसेचा शिष्ट मंडळ जिल्हा अध्यक्ष हेमन्त लिल्हारे,मनीष चौरागडे,जिल्हा उपाध्यक्ष मुकेश मिश्रा, गोंदिया तालुका अध्यक्ष सुरेश ठाकरे,शहर अध्यक्ष राजेश नागोसे,शहर उपाध्यक्ष क्षितिज वैद्य, तिरोडा शहर अध्यक्ष प्रकाश फंटीग,खेमा ठाकरे, रोहित उईके व सर्व मनसे पदाधिकारी बिरसी विमानतळाचा मुख्य गेट समोर आपल्या मागण्या मान्य करण्याकरिता आंदोलन करीत असल्या सुरक्षा गार्ड याच्या पेंडाल मध्ये जाऊन त्यांच्या व त्यांच्या कुटूंबियांसी सविस्तर चर्चा करून दोन्ही जिल्हा अध्यक्ष यांनी त्यांना पत्र देऊन आश्वासन दिलेकी आम्ही सर्व मनसे कार्यकर्ते आपल्या आंदोलना सोबत आहोत, व आपल्यावर झालेल्या अन्याय हा मा.राज साहेब ठाकरे व मनसे कामगार नेते राणे साहेब यांच्या माध्यमातून सोडविण्याचा प्रयत्न करू असी चर्चा करण्यात येईल अशी चर्चा करण्यात आली..

वडशिंगीच्या जि.प.केंद्रीय मराठी प्राथमिक शाळेने मिळविला तालुक्यात पहिला आय.एस.ओ.मानांंकन प्राप्त शाळा होण्याचा बहुमान….

1

 

गजानन सोनटक्के
जळगांव जा.प्रतिनिधी

जळगाव जामोद तालुक्यात सातत्याने नवनवीन उपक्रमात अग्रेसर असलेली ग्राम वडशिंगी येथील जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा आहे.

आय.एस.ओ.मानांकन प्राप्त करणारी ही तालुक्यातील पहिली शाळा असून शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत पदाधिकारी, गावकरी, पालक, मुख्याध्यापक व त्यांचे सहयोगी शिक्षक यांच्या परिश्रमामुळेच शाळेला आय.एस.ओ.मानांकन प्राप्त झाल्यामुळे गावकऱ्यांमध्ये आनंद व उत्साहाचे वातावरण आहे.

 ही बातमी पण पहा सोबतच

https://www.suryamarathinews.com/post/8209

 

 

आय.एस.ओ. मानांकनाशी संबंधित अधिकारी पी.एन.पाटील यांनी ५जानेवारी रोजी शाळेला प्रत्यक्ष भेट देऊन आय.एस.ओ. करण्यासाठी शाळेची पाहणी केली.

आणि त्यांच्या सकारात्मक अहवालानंतर दि.२४ जानेवारी रोजी शाळेला आय.एस.ओ. मानांकन प्राप्त झाल्याचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष वकीलखान मेहबूबखान यांनी सांगितले.संपूर्ण तालुक्यात नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणारी वडशिंगी शाळा आज ISO शाळा देखील झाली.शाळेला ISO मानांकन मिळविण्यासाठी अनमोल मार्गदर्शन करणारे गटविकास अधिकारी शिवशंकर भारसाकळे , गटशिक्षणाधिकारी फाळके ,शिक्षण विस्तार अधिकारी राजेंद्र तायडे ,केंद्रप्रमुख वाघ,शाळा व्यस्थापन समिती अध्यक्ष वकिलखां व त्यांचे सहकारी

सदस्य,मुख्याधिपिका सौ.शोभाताई सारंगधर गोमासे आणि त्यांचे सहयोगी शिक्षक यांनी गेल्या वर्षभरात ह्यासाठी विशेष परिश्रम घेतले.

 

शाळेला शाळा ISO करण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करणारे शाळा व्यवस्थापन समिती चे पदाधिकारी, ग्रामपंचायत वडशिंगी चे सरपंच, सचिव आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य,तलाठी, मुख्याध्यापिका सौ.एस.एस. गोमासे ,व शिक्षक वृंद श्रीकृष्ण भटकर ,सोळंके,येणकर मॅडम,कपले मॅडम, शृंगारे सर, बशिरे सर,या सर्वांचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष वकीलखां यांनी अभिनंदन करून आभार मानले.

व भविष्यातही शाळेच्या उत्कर्षासाठी ह्या सर्वांचे सहकार्य राहील ,अशी अपेक्षा व्यक्त केली. ही शाळा वर्षभर प्रत्येक उपक्रमात, राष्ट्रीय उत्सवात सातत्याने अग्रेसर असते .

ह्या शाळेला आयएसओ मानांकन प्राप्त झाल्यामुळे शिक्षण क्षेत्रात आनंदाचे वातावरण असून गटविकास अधिकारी शिवशंकर भारसाकडे यांनी सुद्धा या ग्रामस्थ,पालक, शाळेच्या व्यवस्थापन समिती व शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.

तसेच या शाळेचा आदर्श तालुक्यातील इतर शाळांनी सुद्धा घ्यावा अशी अपेक्षा सुद्धा त्यांनी व्यक्त केली आहे.

नांदुरा नगरीच्या सर्वांगीन विकासा साठी सदैव तत्पर-आ.राजेश एकडे

0

 

नांदुरा(प्रफुल्ल बिचारे पाटिल ):-

आज नांदुरा नगर परिषद अंतर्गत प्रभाग क २ मधील चोपडे प्लॉट, राखोंडे पुरा व आठवडी बाजार परिसरात पिण्याच्या पाण्याची पाईप लाईन,नावाबपूरा तसेच सिंधी कॉलनी मध्ये पेव्हर ब्लॉक रस्ता अश्या विविध विकास कामाचे भूमिपूजन *मलकापूर विधानसभा मतदार संघाचे आ.राजेश एकडे* यांच्या हस्ते व नांदुरा नगर परिषदेचे उपाध्यक्ष मा. लालाभाऊ इंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.नांदुरा नगरीच्या सर्वांगीन विकासा साठी सदैव तत्पर व कटिबद्ध असल्याचे मत या वेळी आ.राजेश एकडे यांनी व्यक्त केले.या भूमीपूजन समारंभास
राष्ट्रवादी काँगेस चे जिल्हा सरचिटणीस डॉ.अमीन,नगरसेवक सर्वश्री.अँड.मोहतशाम रजा,मो.साजीद शेख, अजय भिडे, अनंता भारंबे, पिंटू कोलते,संदीप फाटे, ईल्यास सर, मो.तौसीफ, राजुसेठ मोहनानी, पत्रकार भाऊसाहेब बावणे, तुळशीराम राखोंडे, नवाब जिया, डॉक्टर नईम, बाळीराम चोपडे, हाजी हुसैन, बब्बुसेठ,इश्वर सेठ जानवानी, आसीफ खान, मजहर खान, मनोज रामचंदानी, सुरेश खानचंदानी, अमुल जैन,जावेद खान, तेजपाल जानवानी, गणेश म्हात्रे, शेख.गफ्फार, सै. साबीर, सुरज राखोंडे व प्रभाग क्र.२ मधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नेहरु युवा केंद्र नांदुरा च्या माध्यमातून सच्छता अभियान व नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती साजरी

0

 

नांदुरा (प्रफुल्ल बिचारे पाटिल ):-

 

नेहरु युवा केंद्र युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालयात भारत सरकार तालुका नांदुरा च्या वतीने नांदुरा शहरातील रेल्वे स्टेशन चौकातील सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा जो घाणीच्या साम्राज्यात विळख्यात पडला होता तेथील सर्व गवत तसेच गुटख्याच्या पुड्या व घाण साफ करून पाण्याने स्वच्छ धुवून खरी 125 वी जयंती राष्ट्रीय चेतना दिवस म्हणून साजरा करून त्यांना अभिवादन करण्यात आले. तसेच नेहरू युवा केंद्र नांदुरा स्वयंसेवक अमर रमेश पाटील यांनी नेताजीच्या आयुष्यावर प्रकाश टाकत पुतळ्याची असलेली अवस्था पाहून हळहळ व्यक्त केली पुतळा यावेळी पत्रकर संतोष तायडे सामाजिक कार्यकर्ते कुलदीप डंबेलकर,भागवत पेठकर,अमोल पाटील,गणेश वाकोळे, व इतर एनसीसी जवान उपस्थित होते. त्यांनी राष्ट्रगीत म्हणून कार्यक्रमाची सांगता केली

महाराष्ट्र पत्रकार संघाच्या नाशिक जिल्हासंघटक पदी अरुण हिंगमीरे ,नांदगाव तालुका कार्याध्यक्षपदी निलेश दायमा तर सचिवपदी ईश्वर जाधव

0

 

प्रतिनिधी-सचिन पगारे
नांदगांव नाशिक

महाराष्ट्र पत्रकार संघ नाशिक जिल्हा कार्यकारीणी व नांदगाव तालूका संघ कार्यकारीणी नुकतीच जाहीर करण्यात आली. महाराष्ट्र पत्रकार संघाच्या नाशिक जिल्हा कार्यकारीणीमध्ये सचिन बैरागी यांची जिल्हाध्यक्षपदी , किरण काळे यांची जिल्हासचिव पदी तर अरुण हिंगमीरे यांची जिल्हा संघटक पदी निवड करण्यात आली.सर्वांना भावी वाटचालीच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
नांदगाव येथील शासकीय विश्रामगृह येथे महाराष्ट्र पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष सचिन बैरागी व तालुका अध्यक्ष महेंद्र पगार यांच्या मार्गदर्शनाखाली संघाच्या विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी २७ जानेवारी रोजी होणाऱ्या संघाच्या नाशिक जिल्हा पत्रकार गुणगौरव समारंभाबाबत सविस्तर चर्चा करून कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले. तसेच यावेळी महाराष्ट्र पत्रकार संघाच्या नांदगाव तालुका कार्याध्यक्ष पदी निलेश दायमा यांची निवड करण्यात आली. ईश्वर जाधव यांची तालुका संघाच्या सचिवपदी निवड करण्यात आली तर सिताराम पिंगळे यांची सहसचिव म्हणून सर्वानुमते निवड जाहीर करण्यात आली. यावेळी नांदगाव तालुका महाराष्ट्र पत्रकार संघाचे अध्यक्ष महेंद्र पगार,उपाध्यक्ष हेमराज वाघ ,जिल्हाध्यक्ष सचिन बैरागी,जिल्हासचिव किरण काळे,भरत पारख,जिल्हा संघटक अरुण हिंगमीरे, तूषार वाघ,नरहरी उंबरे आदी सदस्य उपस्थित होते.

मा. बाळासाहेब ठाकरे यांची जयंती घरा घरात साजरी करा :- विलासराव देशमुख आज अखंड हिंदुस्थाचे कवच कुंडल हिंदूहृद्यय सम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमीत्य कोरोणा च्या प्रादुर्भावामुळे मोठा कार्यक्रम न करता दरवर्षी प्रमाणे मातोश्री भवन गजानन नगर,वार्ड क्र.५ संग्रामपुर येथे त्यांच्या फोटोला हार घालुन श्रद्धांजली वाहण्यात आली…. यावेळी शिवसेना विद्यार्थीसेना जळगाव-जामोद विधानसभा मतदारसंघाचे माजी विधानसभा संपर्कप्रमुख विलासराव देशमुख,साक्षी कोचींग क्लासेस संग्रामपुर च्या संचालीका अनिताताई देशमुख,श्रीजीत देशमुख,रितेश देशमुख,सार्थक इंगळे,वैष्णवी मानकर,श्रद्धा देशमुख,तंनमय चोपडे,कौवल्य बन्नतकार,क्षृती राऊत,अरुराधा उंबरकार व साक्षी कोचींग क्लासेस चे सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

0

 

आज अखंड हिंदुस्थाचे कवच कुंडल हिंदूहृद्यय सम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमीत्य कोरोणा च्या प्रादुर्भावामुळे मोठा कार्यक्रम न करता दरवर्षी प्रमाणे मातोश्री भवन गजानन नगर,वार्ड क्र.५ संग्रामपुर येथे त्यांच्या फोटोला हार घालुन श्रद्धांजली वाहण्यात आली….
यावेळी शिवसेना विद्यार्थीसेना जळगाव-जामोद विधानसभा मतदारसंघाचे माजी विधानसभा संपर्कप्रमुख विलासराव देशमुख,साक्षी कोचींग क्लासेस संग्रामपुर च्या संचालीका अनिताताई देशमुख,श्रीजीत देशमुख,रितेश देशमुख,सार्थक इंगळे,वैष्णवी मानकर,श्रद्धा देशमुख,तंनमय चोपडे,कौवल्य बन्नतकार,क्षृती राऊत,अरुराधा उंबरकार व साक्षी कोचींग क्लासेस चे सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

मा. बाळासाहेब ठाकरे यांची जयंती घरा घरात साजरी करा :- विलासराव देशमुख

0

 

आज अखंड हिंदुस्थाचे कवच कुंडल हिंदूहृद्यय सम्राट*स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमीत्य कोरोणा च्या प्रादुर्भावामुळे मोठा कार्यक्रम न करता दरवर्षी प्रमाणे मातोश्री भवन गजानन नगर,वार्ड क्र.५ संग्रामपुर येथे त्यांच्या फोटोला हार घालुन श्रद्धांजली वाहण्यात आली….
यावेळी शिवसेना विद्यार्थीसेना जळगाव-जामोद विधानसभा मतदारसंघाचे माजी विधानसभा संपर्कप्रमुख विलासराव देशमुख,साक्षी कोचींग क्लासेस संग्रामपुर च्या संचालीका अनिताताई देशमुख,श्रीजीत देशमुख,रितेश देशमुख,सार्थक इंगळे,वैष्णवी मानकर,श्रद्धा देशमुख,तंनमय चोपडे,कौवल्य बन्नतकार,क्षृती राऊत,अरुराधा उंबरकार व साक्षी कोचींग क्लासेस चे सर्व विद्यार्थी उपस्थित

नांदुरा येथे महत्वपूर्ण रेल्वे गाड्यांना थांबा व इतर सुविधा मिळण्याबाबत निवेदन

0

 

नांदुरा (प्रफुल्ल बिचारे पाटिल )

नांदुरा हे पश्चिम विदर्भातील एक महत्वाचे शहर असून या शहराला अनेक लहान मोठी गावे व बाजारपेठा जोडल्या गेलेल्या आहेत. या अनुषंगाने नांदुरा शहरात आझाद हिंद एक्सप्रेस व जयपूर हैद्राबाद या महत्वपूर्ण गाड्यांना थांबा मिळावा यासाठी केंद्रीय रेल्वे सल्लागार समिती सदस्य डॉ. राजेंद्रजी फडके यांना आज गुरुवार, दि. २१/०१/२०२१ रोजी निवेदन देण्यात आले.
नांदुरा शहरामध्ये आझाद हिंद एक्सप्रेस व जयपूर हैद्राबाद एक्सप्रेस यांना थांबा मिळावा तसेच नांदुरा रेल्वे स्टेशन येथे प्रवाशांच्या सोयीसाठी कोच इंडिकेटर डिजिटल डिस्प्ले सेवा लवकरात लवकर पुरविण्यात यावी असेही या निवेदनात नमूद करण्यात आलेले आहे.
यावेळी नांदुरा अर्बन बँकेचे अध्यक्ष तथा रेल्वे सल्लागार समिती सदस्य श्री अरुणभाऊ पांडव, नांदुरा शहर भाजपा महिला आघाडी अध्यक्षा तथा रेल्वे सल्लागार समिती सदस्या सौ. सारिका राजेशजी डागा तसेच नांदुरा शहर रेल्वे सल्लागार समिती सदस्य श्री स्वप्नील झांबड व श्री आतिक सर आदी उपस्थित होते.

राष्ट्रीय बालिका दिनानिमित्त अंगणवाडी क्रमांक 3 मध्ये चित्रकला व निबंध स्पर्धा !

0

 

सिंदखेड राजा (सचिन खंडारे )

मेहकर तालुक्यातील हिवरा आश्रम येथील अंगणवाडी केंद्र क्रमांक 3 मध्ये राष्ट्रीय बालिका दिनानिमित्त चित्रकला स्पर्धा व निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते ! येथील प्रवेशिका सौ. लोंढे मॅडम च्या आदेशाचे पालन करण्यात आले त्यावेळी अंगणवाडी सेविका सौ. संगीता मोरे केंद्र क्र 3
व मदतनीस सुरेखा पारधे इतर गावकरी आणि स्पर्धक उपस्थित होते.त्यांना राष्ट्रीय दिना निमित्त अंगणवाडी सेविका यांनी थोडक्यात माहिती सांगुण पुढील कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली त्या वेळेस प्रोसाहन म्हणून चित्र कलेचे नंबर काढण्यात आले पहिला क्रमांक जगदीश गजानन पारधे यांनी प्रथम क्रमांक मिळवला सर्वानी त्याचे कौतुक केले

26 जानेवारीला शिक्षण उपसंचालक अमरावती कार्यालयासमोर अन्यायग्रस्त शिक्षक गजानन खंडारे यांचे अमरण उपोषण !

0

 

सिंदखेड राजा ( सचिन खंडारे )

सिंदखेड राजा तालुक्यातील राजेगाव येथील यशवंतराव चव्हाण माध्यमिक व स्वर्गीय भास्करराव शिंगणे उच्च माध्यमिक विद्यालयातील घोटाळ्याची चौकशी करावी या मागणीसाठी राजेगाव येथील शिक्षक गजानन खंडारे यांनी अमरावतीच्या शिक्षण उपसंचालक यांच्याकडे रीतसर तक्रार अर्ज दिला होता ‘तशी ते 30 डिसेंबरपासून उपोषण सुद्धा करणार होते परंतु कोरोना च्या पार्श्वभूमीवर शिक्षण उपसंचालक अमरावती यांनी त्यांना पत्र पाठवतो असे सांगून उपोषणाला बसू नका असे सांगितले !त्यावर श्री गजानन खंडारे यांनी विश्वास ठेवला व उपोषण मागे घेतले परंतु !शिक्षण उपसंचालक अमरावती यांनी पत्र क्र . एचएस सी / ६१६७ / २० २० त्या पत्रामध्ये शाळेतील कुठल्याही प्रकारची गैरव्यवहाराची चौकशी अथवा समिती नेमून कारवाई करू असे आश्वासन देण्यात आले नाही !त्यामुळे निराश होऊन परत शिक्षक गजानन खंडारे यांनी अमरावती शिक्षण उपसंचालक यांच्या कार्यालयासमोर 26 जानेवारीपासून बेमुदत आमरण उपोषणाला बसणार आहेततेरा वर्ष न्यायालयीन लढा व न्यायालयाच्या समजू त्यानंतरही संस्थाचालक आपल्याला शाळेवर घेत नाही तसेच अमरावती शिक्षण विभागातील तसेच कार्यालयातील कारकून सुद्धा दिशाभूल करून आपल्याला न्यायापासून प्रवृत्त करत आहे असेही श्री गजानन खंडारे यांनी म्हटले आहे !26 जानेवारी पासून अपल शिक्षण उपसंचालक अमरावती यांच्या कार्यालयासमोर उपोषण सुरू करणार आहे मरण पत्करेल पण आता माघार घेणार नाही असा निर्धार यावेळी श्री खंडारे यांनी व्यक्त केला आहे !