Home Blog Page 555

मलकापूर पांग्रा जवळ कंटेनरचा अपघात सुदैवाने जीवित हानी टळली !

0

सिंदखेडराजा ( सचिन खंडारे )

एका भरधाव वेगाने जाणाऱ्या कंटेनर ड्रायव्हरचा नियंत्रण सुटून वळण रस्त्यावर कंटेनर बाजूला असलेल्या डोंगराच्या कडेला धडकल्यामुळे कंटेनर चे समोरील बाजूचे मोठ्या प्रमाणामध्ये नुसकान झाले ‘ एम एच 12 एच डी -1862नेहा क्रमांकाचा कंटेनर 31 डिसेंबरला मलकापूर प्रांगा च्या दिशेने येत होता ।येताना रस्त्यावर वळण असल्यामुळे तसेच कंटेनर हे मोठी असल्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटले व बाजूला असलेल्या डोंगराच्या कडेला कंटेनर धडकले !यामध्ये चालक किरकोळ जखमी असून त्यावर उपचार सुरू आहे सुदैवाने यामध्ये कुठल्याही प्रकारची जीवीत हानी झाली नाही !

कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाला सर्वांनी अभिवादन का करावे?

0

 

अजहर शाह मोताळा तालुका प्रतिनिधी

मोताळा:- छत्रपती शिवाजी राजांनी सुरू केलेला शिवशक पेशव्यांनी बंद पाडला आणि मुघलांचा फसली शक सुरु केला. पेशव्यांनी छत्रपती संभाजीराजांना तीन वेळा मारण्याचा कट केला आणि शेवटी संस्कृतवरती प्रभुत्व मिळविल्यामुळे औरंगजेबाच्या ताब्यात देऊन ब्राह्मणीधर्मानुसार त्यांना हाल हाल करून ठार मारले !

पहिल्या बाजीराव पेशवेव्याने गुजरात जिंकणाऱ्या मराठा सरसेनापती उमाबाई दाभाडे यांना तह करण्यासाठी आळंदीजवळ बोलावून कैदेत टाकले आणि त्यांना कैदेत मारले. त्यांच्या मुलाला द्वेषापोटी दगाबाजीने मारले !

तिसऱ्या पानिपताच्या वेळेस अब्दाली युद्धाचे नियोजन करत होता, तर पेशवे यज्ञ, याग, होम हवन, भेदाभेद, व्रतवैकल्ये करण्यात दंग होते. भोजनाचे वेळी पेशवे हे जाधवराव, निंबाळकर, घोरपडे, शिंदे, होळकर, भोसले, पवार, जगदाळे इत्यादी मराठा सरदारांनादेखील पंक्तीला घेत नसत, शिवाजीराजानी कधीही भेदभाव केला नाही. पेशव्यानी अनैतिकतेचा कळस गाठला होता. अब्दाली युद्धाचे नियोजन करत होता, तेंव्हा पेशवे जप तप आणि भोजनाचे नियोजन करत होते. म्हणजे सदाशिव पेशव्याने एक लाख मराठयांना अब्दालीच्या समोर नेवून बळी दिले, तेंव्हा महाराणी ताराराणी म्हणाल्या “बरं झालं पेशवाई बुडाली”. पानिपतात पेशव्यांच्या पराभवाचा महाराणी ताराराणीला आनंद झाला, इतका पेशव्याबद्धल महाराष्ट्रात रोष निर्माण झाला होता !

छत्रपती शिवाजी महाराजांचे सातारा गादीचे वंशज पहिले छत्रपती प्रतापसिंह महाराज हे लहान वयात गादीवरती आले, तेव्हा दुसऱ्या बाजीराव पेशव्याने त्यांच्या शिक्षणावर बंदी घातली, कारण हा बाल छत्रपती शिकला तर शहाणा होईल आणि शहाणा झाला तर तो आपल्या अंकित राहणार नाही, म्हणून त्यांच्या शिक्षणावर बंदी घातली !

छत्रपती घराणे त्यांना चोरून शिकवेल म्हणून पेशव्यांनी सातारच्या राजवाड्या भोवती गुप्तहेर नेमले, तेव्हा छत्रपती प्रतापसिंह महाराजांची आई रात्री अडीच वाजता चोरून शिकवायची. छत्रपतींची ही अवस्था तर सामान्य रयतेचे पेशव्यांनी काय हाल केले असतील…?
याची कल्पना करा !

पेशव्यांना धडा शिकवण्यासाठी सातारा येथून पुण्याकडे सैन्य घेऊन निघालेल्या छत्रपती चतुरसिंग भोसले यांना दगाबाजीने पकडून दुसऱ्या बाजीरावाने कोकणातील कांगोरी किल्ल्यात डांबून छत्रपती चतुरसिंगांना हाल-हाल करून ठार मारले !

अमृतराव पेशवेव्याने खंडणी न देणाऱ्या शेतकऱ्यांना तापलेल्या तव्यावर उभे करून छळले, तर शेतकऱ्यांच्या लहान मुलांच्या बेंबीत आणि कानात तोफेची दारू भरून त्याला अग्नी द्यायचा, त्यामुळे मुलांचे डोके आणि पोट फुटायचे, इसिस, तालिबानी, नक्षली, सनातनी जसे निरपराध लोकांना निर्दयपाने मारतात, तसेच पेशवेदेखील निरपराध प्रजेला निर्दयपणे मारत असत !

इंदूरच्या विठोजी होळकर यांना पुण्यात हत्तीच्या पायाला बांधून पेशव्यांनी हालहाल करून ठार मारले. पेशवेकाळात अस्पृश्यांना तर माणूस म्हणून जगायचा अधिकार नव्हता. त्यांचा प्रचंड छळ झाला. कंबरेला केरसुणी आणि गळ्यात मडके अशी अस्पृश्याची अवस्था होती !

युद्ध-वास्तव

पेशव्यांनी सर्वाधिक छळ ब्राह्मण महिलांचा केला, महिलांचा जन्म जणू कांही उपभोग घेण्यासाठीच आहे, अशी महिलांची स्थिती पेशवाईत होती. त्या छळाचे या ठिकाणी वर्णन करणे देखील उचित ठरणार नाही !

छत्रपती शिवाजीराजे, छत्रपती संभाजीराजे यांच्या समतावादी, बुद्धीप्रामाण्यवादी, लोककल्याणकारी, महिलांचा सन्मान करणाऱ्या शासन व्यवस्थेला मूठमाती देण्याचे काम पेशव्यांनी केले, त्यामुळेच 500 शूरवीर मावळ्यांनी 300 ब्रिटिशांच्या मदतीने 28 हजार पेशव्यांचा पराभव केला. त्या 500 शूरवीरामध्ये मराठा, महार, मुस्लिम, राजपूत, मातंग धनगर, इत्यादी मावळे होते !

मराठा-महार-मुस्लिम खांद्याला खांदा लावून भावाप्रमाणे पेशवाई विरोधात लढले. त्यांची यादी पेरणे कोरेगाव – भीमा येथील विजयस्तंभावरती आहे. त्या 500 सैनिकांपैकी खंडोजी माळवदकर हे एक शूर मराठा वीर होते. त्यांना ब्रिटिशांनी बक्षीस म्हणून जमीन इनाम दिली, त्यांच्या शेतालगतच हा विजयस्तंभ आहे !

500 मावळ्यांनी 300 ब्रिटीशांची मदत घेतली किंबहुना ब्रिटिश आणि पाचशे मावळे एकत्र येऊन पेशव्याविरुद्ध लढले, म्हणून त्यांना देशद्रोही ठरवता येणार नाही, कारण 1818 साली देश, राष्ट्र ही संकल्पना नव्हती, त्या काळात विविध संस्थाने होती. देश, राष्ट्र ही संकल्पना 1947- 1950 नंतर आली !

500 मावळ्यांना देशद्रोही ठरविणार्‍यांनी टिपू सुलतानविरुद्ध इंग्रजांना मदत करणाऱ्या पेशव्याबद्दल आपले मत स्पष्ट करावे, तसेच पेशव्यांनी 1802 साली इंग्रजाबरोबर वसईचा तह केला होता व इंग्रजांची तैनाती फौज पदरी बाळगली होती !

छत्रपती प्रतापसिंह महाराजांना कैद करण्यासाठी इंग्रजांना मदत करणाऱ्या व शनिवारवाड्यावरचा जरीपटका खाली उतरवून इंग्रजांचा युनियन जॅक फडकविनाऱ्यानी राष्ट्रवादाच्या व देशप्रेमाच्या वल्गना करणे हास्यास्पद आहे !

ज्यावेळेस कोरेगाव भीमा येथे युद्ध सुरू होते, तेंव्हा शिवाजीराजांचे अत्यंत तरुण वंशज छत्रपती प्रतापसिंह महाराज व राजपरिवाराला दुसऱ्या बाजीराव पेशव्याने वासोटा किल्यावर नजरकैदेत अर्थात कैदेत ठेवले होते. छत्रपतींना कैदेत टाकणाऱ्या पेशव्याना पराभूत करून त्या पाचशे शुरावीरांनी खरे तर छत्रपतींच्या अपमानाचा बदलाच घेतला. पेशव्यांचा पराभव झाल्यानंतरच प्रतापसिंह महाराजांची सुटका झाली !

एवढे मात्र नक्की की शिवरायांचे पाचशे मावळे जुलमी पेशवाई विरुद्ध खांद्याला खांदा लावून 1 जानेवारी 1818 रोजी लढले व शिवस्वराज्याची वाताहात लावणाऱ्या पेशव्यांना धडा शिकवला, त्यांचा तमाम मराठा, बौद्ध,ओबीसी,एससी,मुस्लिम यांना अभिमान वाटायला हवा !

जुलमी पेशव्याविरुद्ध त्यांनी गाजवलेल्या शौर्यामुळे इंग्रजानी पेरणे येथे विजयस्तंभ उभारला. त्यामुळे तमाम बहुजन समाजाला त्या विजय स्तंभा बद्धल अभिमान वाटायला हवा !

त्यामुळे आम्ही 1 जानेवारी रोजी कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी येत आहोत !

आपल्या पूर्वजानी एकोपा जपला, आपणही एकोपा जपूया !

संदर्भग्रंथ-

1)छत्रपती शिवाजी महाराज-वा सी बेंद्रे
2)छत्रपती संभाजी महाराज-वा सी बेंद्रे
3)नामांतर औरंगाबाद आणि पुण्याचे-शरद पाटील
4)पानिपत 1761-त्र्यंबक शेजवलकर
5)सातारच्या राज्यक्रान्तिचा इतिहास-प्रबोधनकार ठाकरे
6)दाभाडे घराण्याचा इतिहास-परांडकर
7)महात्मा फुले -धनंजय कीर

उपविभागीय अधिकाऱ्यांना वरली मटका सुरू करण्याची केली मागणी

0

 

 

जळगांव  जामोद शहरातील सुशिक्षित बेरोजगार मंगेश हरिभाऊ तेलंगडे यांनी आज दिनांक १/१/२०२१रोजी उपविभागीय अधिकारी जळगाव व पोलीस निरीक्षक यांना विनंती अर्ज बुलढाणा जिल्हा पालक मंत्री शिंगणे साहेब, गृहराज्यमंत्री, जिल्हाधिकारी साहेब बुलढाणा यांनासुद्धा विनंती अर्जाच्या प्रती पाठवल्या या अर्जामध्ये जळगाव शहरातील बेरोजगार तरुणाने उपविभागीय अधिकारी व पोलीस निरीक्षक यांना अशी मागणी केली आहे की जळगाव शहरामध्ये मला माझे व माझ्या परिवाराचे उदरनिर्वाह करण्यासाठी वरली मटका तितली बोर्ड सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात यावी माझ्या अर्जाचा विचार न झाल्यास मी संबंध संबंधित कार्यालयासमोर आत्मदहन करण्याची परवानगी तरी द्यावी अशी विनंती अर्जात म्हटले आहे त्याचे कारण असे की जळगाव शहर व तालुक्यामध्ये अवैध रेती, अवैध नकली दारू गुटखा, वरली मटका तीतली बोर्ड,अशा विविध प्रकारचे अवैध धंदे, येथिल राजकिय पुढार्यांचे नातेवाईक, मित्र यांचे चालु आहेत मी सुद्धा बेरोजगार युवक आहे मला माझ्या परिवाराचे चरितार्थ चालवण्यासाठी जे काही फी असेल ते देण्यास तयार आहे व या चालु असलेल्या अवैध धंद्याचे पुरावे मि देण्यास तयार आहे त्याकरिता मला सुद्धा वरिल प्रमाणे व्यवसाय करण्यासाठी परवानगी देण्यात यावी न दिल्यास आत्मदहनाची तरी परवानगी द्यावी असे दिलेल्या अर्जात नमूद आहे

 

खाद्यतेल व गॅस सिलेंडरचे भाव वाढल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला फटका 

0

 

सिंदखेडराजा ( सचिन खंडारे )

गॅस व खाद्यतेलाचे भाव वाढल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या व मजूर वर्गाच्या खिशाला मोठा फटका बसला आहे ‘खाद्यतेलाचे भाव सध्या 120 रुपये 124 रुपये किलो दराप्रमाणे असून ‘घरगुती गॅस सिलेंडर चे भाव सुद्धा 50 रुपयांना महागल्यामुळे संसारांमध्ये आवश्यक असणाऱ्या खाद्यतेल व गॅस सिलेंडर ह्या दोन्ही गोष्टी जीवनाश्यक असून यामुळे मजूर वर्ग व सर्वसामान्य नागरिक भाववाढीमुळे त्रस्त झाली आहे ‘तिकडे बाजारपेठेमध्ये सोयाबीन पिकाची आवक वाढली आहे व एकीकडे खाद्यतेलाचे भाव गगनाला भिडले आहे त्यामुळे 95 ते 100 रुपये किलो दराप्रमाणे मिळणारे खाद्यतेल आता 124 रुपये किलो दराप्रमाणे मिळत आहे ‘त्यामुळे गरीब व मजूर वर्ग आता खाद्य तेल व गॅस सिलेंडरचे भाव कमी करावी अशी मागणी करत आहे ‘

मेरा खुर्द येथील अधिग्रहित केलेल्या जमिनी ऐवजी शेत रस्ता व नाली चा वापर केला कालव्यासाठी !शेतकऱ्यांचे पाटबंधारे विभागाला निवेदन !

0

 

सिंदखेड राजा ( सचिन खंडारे )

चिखली तालुक्यातील मेरा खुर्द येथील शेतकऱ्यांच्या वापरासाठी असलेल्या शेत रस्ता व नाली वरच पाटबंधारे विभागाने त्याचा वापर कालव्यासाठी केला आहे अशी संतापजनक घटना मेरा खुर्द येथे घडली आहे ‘सविस्तर वृत्त अशी की मेरा खुर्द येथे पाटबंधारे विभाग बुलढाणा यांनी अधिग्रहित केलेल्या जमिनीवर शेत रस्ता व नाली चा वापर कालव्यासाठी 0. 27 आर .जमीन घेऊनलघु पाटबंधारे विभागाने यावर पाट ‘कालवा टाकला नाही .तर अगोदरच असलेल्या नाली व शेत रस्त्यावरच कालव्याचा पाट टाकला गेला आहे .व बांधकाम केली आहे ‘त्यामुळे शेत रस्ता व नाली पूर्णपणे बजून गेली असून त्या नालीच्या शेजारील आसपासच्या 30 ते ४० शेतामध्ये पाऊस पडल्यानंतर पाणी तसेच साचून राहते ‘त्यामुळे शेतीच्या पिकांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुस्कान होत आहे ‘व शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी कुठल्याही प्रकारचा रस्ता राहत नाही व शेत रस्ता हा पूर्णपणे बंद झाला आहे ‘याला पूर्णपणे लघु पाटबंधारे विभाग बुलढाणा जबाबदार आहे असा आरोपही शेतकऱ्यांनी निवेदनात केला आहे ‘मेरा खुर्द येथील बँक ऑफ महाराष्ट्रा च्या जवळील शेत रस्त्यावरच लघु पाटबंधारे विभागाने कालवा बांधला आहे त्यामुळे लघु पाटबंधारे विभागाने अधिग्रहित केलेल्या जमिनीवर पाट न बांधता रस्त्यावरच पाट बांधल्यामुळे शेतकरी आक्रमक झाली आहे ‘याबाबत त्यांनी या आशयाचे निवेदन दिनांक 30 डिसेंबर रोजी लघु पाटबंधारे विभाग उपविभागीय अधिकारी खडकपूर्णा प्रकल्प दे . राजा यांना निवेदन दिले आहे ‘या निवेदनावर ज्ञानेश्वर शंकर भुसारी, प्रकाश नामदेव भुसारी, भास्कर नामदेव भुसारी, बाजीराव नामदेव भुसारी, तेजराव नामदेव भुसारी, सुधाकर नारायण भुसारी, परमेश्वर नारायण भुसारी, प्रकाश रावसाहेब भुसारी ,उमेश रावसाहेब भुसारी ‘ निलेश बाजीराव भुसारी, गजानन तेजराव भुसारी, नंदकिशोर प्रकाश भुसारी, दिनकर विठोबा शेळके ,शंकर विठोबा शेळके ,संदीप प्रल्हाद शेवाळे, रईस देशमुख ‘जावेद देशमुख ‘नंदू आत्माराम वराडे ‘रमेश आत्‍माराम वराडे .शशिकांत रामकृष्ण वराडे ‘आधी शेतकऱ्यांच्या या निवेदनावर सही आहेत,

अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी तुफान गर्दी साखरखेर्डा ग्राम पचांयत साठी तब्बल65 जणांचे उमेदवारी अर्ज दाखल । तालुक्यातून एकुन 992उमेदवाराचे अर्ज दाखल

0

 

सिंदखेडराजा ( सचिन खंडारे )

सिंदखेड राजा तालुक्यातील ४३ ग्रामपंचायत साठी सिंदखेडराजा तालुक्यातून एकूण 992 उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले असून यामध्ये सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या साखरखेर्डा या गावातून एकूण 65 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केली आहे ‘यामध्ये34 महिलांचे अर्ज दाखल झाली आहे उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी 30 डिसेंबर रोजी सिनखेडराजा मध्ये तुफान गर्दी बघायला मिळाली ‘यामध्ये पालक मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांचे मूळ गाव असलेल्या शेंदुर्जन गावांमध्ये एकूण 39 उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केली आहे ‘आंबेवाडी ‘कंडारी ‘भंडारी ‘ या गावामध्ये ‘निवडणूक ह्या बिनविरोध होण्याच्या मार्गावर असून या गावांमध्ये प्रत्येकी सात सात जणांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केली आहे ‘या पाठोपाठ दुसर बीड ग्रामपंचायत साठी एकूण 76 जणांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केली आहे .अनेक उमेदवार कागदपत्रे अभावी आपला उमेदवारी अर्ज दाखल करू शकले नाही ‘तर काही उमेदवार हे शिक्षण घेतलेले नसल्यामुळे ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करु शकले नाही ‘शेवटच्या दिवशी मुद्रांक विक्रेते । टंक लेखन या ठिकाणी प्रमुख्याने गर्दी जाणवली ,यामध्ये अनेकांनी दुकानदारांनी अव्वाच्या सव्वा पैसे उकळून आपले हात धुऊन घेतली आहे ।शेवटी सर्वांना 4जानेवारी याची उत्सुकता लागली असून आता किती उमेदवारी आपली अर्ज माघार घेतील याकडे लक्ष लागून राहिले आहे ‘

डॉ . ज्योत्स्ना जमधाडे पालकमंत्र्यांच्या हस्ते ‘ कोविड योद्धा ‘ ने सन्मानित ‘

0

 

सिंदखेड राजा (सचिन खंडारे )

साखरखेर्डा येथील सून व सध्या देऊळगाव राजा येथे ग्रामीण रुग्णालयामध्ये विभागांमध्ये कार्यरत असलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर ज्योस्त्ना जमधाडे यांना20 डिसेंबर रोजी देऊळगाव राजा येथे आयोजित कार्यक्रमांमध्ये बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांच्या हस्ते20 डिसेंबर रोजी कोविड योद्धा प्रमाणपत्र देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले ।गेल्या मार्च महिन्यापासून संपूर्ण जगामध्ये कोरोनाने थैमान घातले आहे परंतु या परिस्थिती सुद्धा त्यांनी देऊळगावराजा शहरामध्येअनेक भागांमध्ये होता कुठल्याही प्रकारची सुट्टी न घेता कोरोना च्या काळात लोकांची सेवा केली लोकांवर उपचार केले ‘याच कार्याची पावती म्हणून त्यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते कोविड योध्दा ने सन्मानित करण्यात आले ‘यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अँड नाझेर काझी ‘गजानन पवार ‘दिलीप कुमार झोटे ‘ देऊळगाव राजा पंचायत समिती सभापती रेणुका बुरकुल ‘ तुकाराम खांडेभराड – संतोष खांडेभराड ‘ राजीव क्षिरसागर आदी उपस्थित होते .

तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीला पळविले

0

गजानन सोनटक्के जळगाव जा

जळगाव जामोद येथील येथील रहिवासी विलास प्रकाश काळे यांनी जळगाव जामोद पोलीसस्टेशनला 31 डिसेंबर रोजी तक्रार दिली की जळगाव जामोद येथील वाडी येथील रहिवासी मोहन भाऊराव तायडे यांनी माझ्या 13 वर्षीय मुलीला माझ्या रखवालीतून फूस लावून पळविले या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन वाकडे करीत आहे करीत आहेत

सुनगाव ग्रामपंचायत साठी उमेदवारांनी केली हाफ सेंचुरी(50) पूर्ण

0

 

गजानन सोनटक्के जळगाव जा

जामोद तालुक्यातील सूनगाव ग्रामपंचायत17 सदस्य असणारी ग्रामपंचायत आहे 15 जानेवारी रोजी होऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये सुनगाव ग्रामपंचायत निवडणुकीसाठी एकूण सहा वॉर्डसाठी येथील पन्नास उमेदवारांनी अर्ज दाखल केलेले होते व आज त्यांची छाननी करून 50 चे 50 हीअर्ज निवडणूक अधिकाऱ्यांनी पात्र केलेले आहेत व येत्या चार तारखेला या उमेदवारांमधून किती उमेदवार अर्ज मागे घेतात व किती उमेदवार 15 जानेवारी रोजी होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी रिंगणात असणार याचे चित्र स्पष्ट होणार आहे रिंगणात असलेल्या उमेदवारांना 4 जानेवारी रोजी चिन्ह वाटप होणार आहे

अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांसाठी तात्काळ बस सेवा सुरू करा.

0

 

आज युवा नेते तथा अमरावती जिल्हा अध्यक्ष कुणाल भाऊ यांचा वतीने विभागीय नियंत्रक म.रा.परिवहन मंडळ अमरावती यांना निवेदन देण्यात आले.

कोरोना लॉकडाउन मोठ्या कालावधीनंतर शासकीय नियमांचे पालन करत राज्य शासनाने शाळा सुरू करण्याची परवानगी दिली आहे. या अनुषंगाने खेड्या-पाड्यातील विद्यार्थ्यांची तालुक्याच्या व जिल्ह्याच्या ठिकाणी शाळेत येण्यास सुरुवात झाली आहे. मात्र ग्रामीण भागातील बस सेवा सुरु नसल्याने विद्यार्थ्यांना खुप मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.ग्रामीण भागातील बस सेवा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे. विद्यार्थ्यांना खाजगी वाहनाने प्रवास करावा लागत आहे. खाजगी वाहनधारक विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात पिळवणूक करत आहेत. त्यामुळे आपण लवकरात लवकर अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण भागातील बस सेवा सुरु कराव्यात अशी मागणी कुणाल भाऊ ढेपे यांनी केली