Home Blog Page 558

स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा ची कार्यवाही अवैध शस्त्र विक्री करीता बागडणाऱ्या इसमास केले जेरबंद 3 पिस्टल 12 जिवंत काडतुसे जप्त..

0

 

ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने पूर्वतयारी म्हणून अरविंद चावरिया पोलीस अधीक्षक बुलढाणा यांनी अवैध शस्त्रांवर कारवाई करणे कामी बळीराम गीते पोलीस निरीक्षक यांना आदेशित केले होते. त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेतील एक पथक तयार करण्यात आले होते दिनांक सहा जानेवारी रोजी सदरच्या पथकास गोपनीय बातमीदाराने माहिती दिली की पचोरी बुऱ्हानपूर मध्य प्रदेश राज्यातील एक इसम जळगाव जामोद येथे येणार आहे अशी गुप्त माहिती दिली अशा प्राप्त माहितीवरून सदर पथकाने जळगाव जामोद परिसरातील बस स्थानक परिसरात सापळा लावला असता नमूद वर्णनाचा इसम बसस्थानक परिसरात मिळून आल्याने त्या इसमाला शिताफीने ताब्यात घेऊन पंचांसमक्ष त्यांची अंगझडती घेतली असता त्याचे ताब्यात तीन देशी बनावटीचे पिस्टल सहा मॅग्झीन बारा जिवंत काडतुसे व एक मोबाईल विवो कंपनीचा फोन असा एकूण एक लाख 69 हजार रुपयांचा मुद्देमाल पंचांसमक्ष जप्त करण्यात आला सदर इसम हा स्वतःच्या राहत्या घरी गावठी पिस्टल बनवून विक्री करत असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले असून पुढील अधिकच्या तपासकामी जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुनील जाधव यांच्या मार्गदर्शनात जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे पीएसआय सचिन वाकडे यांच्या ताब्यात दिले आहे विशेष बाब म्हणजे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मागील दोन महिन्यात शस्त्र अधिनियमाखाली सात कारवाया करून आठ तलवारी अकरा पिस्टल जप्त करून आठ आरोपींना जेरबंद करण्यात आले आहे सदरची कारवाई ही अरविंद चावरिया पोलीस अधीक्षक बुलढाणा श्री हेमराज सिंग राजपूत अप्पर पोलीस अधीक्षक खामगाव व बजरंग बनसोडे अप्पर पोलिस अधीक्षक बुलढाणा बळीराम गीते पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा यांचे मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक निलेश शेळके पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत जिंदमवार, पोलीस अंमलदार गजानन आहेर संजय नागवे युवराज शिंदे सतीश जाधव संजय मिसाळ यांनी ही कारवाई पार पाडली आहे.

सिंदखेड राजा तालुक्यातील चार ग्रामपंचायती बिनविरोध !साखरखेर्डा येथे काट्याची लढत !

0

 

सिंदखेड राजा ( सचिन खंडारे )

सिंदखेडराजा तालुक्यातील 43 ग्रामपंचायत निवडणुकीचे चित्र 4 जानेवारीला अर्ज मागे घेण्याच्या दिवशी स्पष्ट झाले असून ।शिनखेड राज्या तालुक्यातील ४ ग्रामपंचायती ह्या बिनविरोध निवडून आल्या आहेत ।यामध्ये कोनाटी ग्रामपंचायत ‘ हिवरा गलडिंग ‘ आंबेवाडी ‘कंडारी ‘ या ग्रामपंचायतीचा समावेश असून ‘एकूण 43 ग्रामपंचायत पैकी 85 सदस्य हे बिनविरोध निवडून आले आहेत ‘शेवटच्या अर्ज मागे घेण्याच्या दिवशी तब्बल276 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतली आहे ।आता एकूण 357 ग्रामपंचायत सदस्य साठी603 उमेदवार हे आमने – सामने उभे ठाकणार आहेत ‘यामध्ये सिनखेडराजा तालुक्यातील अति संवेदनशील समजल्या जाणाऱ्या साखरखेर्डा ग्रामपंचायत साठी एकूण 35 जणांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केलेली आहेत ।दोन्ही बाजूने तगडे उमेदवार असल्यामुळे ही लढत अतिशय रोमांचकारी होण्याची शक्यता आहे ‘यामध्ये एकमेव ट्रॅक्टर मेकॅनिकल ने अपक्ष अर्ज दाखल केला असून ‘त्यांची निशाणीनट बोल्ट खोलण्याचा । पान्हा ‘आहे ।त्यामुळे अपक्ष उमेदवार आता वार्ड क्रमांक 6 मध्ये कोणाचा नट काढणार हे पाहणे औचित्याचे ठरेल ।

पशुवैद्यकीय दवाखान्याच्या कामकाजाच्या वेळा बदलल्या ।शासनाची मान्यतेला मंजुरी

0

 

सिंदखेड राजा (सचिन खंडारे )

अतिशय महत्त्वाच्या अशा पशू जनावरावर वर उपचार करणारे महाराष्ट्रातील तमाम डॉक्टर ने महाराष्ट्र शासनाने दिलासा दिला आहे ।
पशुवैद्यकीय दवाखान्याच्या कामकाजाच्या वेळा बदलण्यात आले असून नवीन वेळापत्रक शासनाने जारी केली आहे ।महाराष्ट्र पशुसंवर्धन कार्यासन अधिकारी यांचे पत्र क्रमांक 1 क्र पसंप्र-२०१० / प्र.क २५५ / पदूम १ ।यानुसार मान्यता चे पत्र सिंदखेड राजा तालुका पशुधन विस्तार अधिकारी श्री उदार व सर्व पशुधन विस्तार अधिकारी यांना आले आहे ‘या प्रमाणे खालील कामकाजाच्या वेळा बदलण्यात आले असून ।सोमवार ते शुक्रवार -सकाळी ९ ते ४.30 वाजेपर्यंत जेवणाची सुट्टी 1 ते 1.30 वाजेपर्यंत .लागू असलेले कार्यालय पशुवैद्यकीय दवाखाने श्रेणी 1 व 2 ‘शनिवार सकाळी ८ ते १ वाजेपर्यंत ‘ जिपसची सर्व ) ४फिरता पशुवैद्यकिय दवाखाने ‘पशुपालकांना आकस्मिक 24 तास सेवा उपलब्ध राहणार आहे असेही या पत्रात नमूद केले आहे !

पत्रकार दिनानिमित्त साखरखेर्डा पोलीस स्टेशनच्या वतीने पत्रकाराचा सन्मान !

0

 

सिंदखेड राजा ( सचिन खंडारे )

6 जानेवारी हा मराठी पत्रकार दिन म्हणून संपूर्ण भारत देशांमध्ये साजरा होत असतो !सत्याची बाजू निर्भीड आणि नि:पक्षपाती पणाने मांडण्याचे काम हा पत्रकार करत असतो तसेच घडणाऱ्या घडामोडी ह्या पोलीस च्या मदतीने पोलीस मित्र म्हणून काम करत असतो ।म्हणून आज ६ जानेवारी रोजी साखरखेर्डा पोलीस स्टेशनच्या वतीने साखरखेर्डा पोलीस स्टेशनचे ठाणेदार माननीय जितेंद्र आडोळे साहेब तसेच दुय्यम ठाणेदार दीपक राणे यांच्या वतीने आज पोलीस स्टेशनमध्ये पत्रकार बांधवांचा सन्मान करण्यात आला ‘यावेळी ठाणेदार जितेंद्र आडोळे तसेच दुय्यम ठाणेदार दीपक राणे यांनी सर्व उपस्थित पत्रकारांना नोटबुक पेन व पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला ‘येळी पुण्यनगरीचे तालुका प्रतिनिधी भगवानराव साळवे ।लोकमतचे तालुका प्रतिनिधी अशोक इंगळे दिव्य मराठीचे संतोष गाडेकर ‘ज्येष्ठ पत्रकार लोकमत समाचार चे अमिन शहा .दैनिक देशोन्नती चे तालुका प्रतिनिधी मनोज पऱ्हाड ‘ ‘दैनिक पुण्यनगरी ‘ दैनिक लोकमंथन ‘ तसेच भारत संग्रामचे तालुका प्रतिनिधी सचिन खंडारे ‘बुलढाणा लाईव्ह चे अमोल साळवे ।दैनिक मातृभूमी दैनिक सामना चे प्रतिनिधी दर्शन गवई ‘दिव्य मराठीचे वसीम शेख ‘साखरखेडा पुण्यनगरीचे गजानन इंगळे ।आदी पत्रकाराचा यावेळी सन्मान करण्यात आला ‘यावेळी पुण्यनगरीचे तालुका प्रतिनिधी भगवान साळवे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून पत्रकाराला मदत मिळणे गरजेचे असून पत्रकार हा अडीअडचणी मध्ये बातमीचे वार्तांकन करत असतो ।यावेळी ठाणेदार जीतेंद्र आडोळे यांनी सुद्धा मार्गदर्शन करताना सांगितले की पत्रकार हा पोलीस मित्र म्हणून काम करत असतो ‘अनेक एक दुर्लक्षित घटना ह्या पत्रकार मुळे उजेडात येत असतात ‘यावेळी अनेक गावचे पोलीस पाटील सुद्धा उपस्थित होते !शेवटी चहा व नाष्टा देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली ‘यावेळी दुय्यम ठाणेदार दीपक राणे पोलिस स्टेशनचे पोलिस अरविंद चव्हाण श्री मापारी सर्व पोलीस कर्मचारी व पोलीस पाटील उपस्थित होते ।

अखेर हर्षल फदाट(बापू) यांच्या प्रयत्नाला यश.. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव..!!

0

 

कोरोना संसर्गामुळे सगळीकडे लॉकडाऊन प्रक्रिया संपून आता अनलॉक प्रक्रिया सुरू आहे,अश्यात आता टप्याटप्याने शाळा कॉलेज सुरू झालेत पण अश्यात ग्रामीण भागामध्ये बस फेऱ्या कमी आहे आणि अश्याने विद्यार्थ्यांना मोठी पायपीट करत शाळा महाविद्यालयांमध्ये जावे लागत होते परंतु विद्यार्थ्यांची ही स्थिती भयंकर आहे हे लक्षात घेऊन बोरगाव बु!! येथील विद्यार्थी प्रतिनिधी हर्षल फदाट यांनी बस आगार प्रमुख जाफराबाद यांना निवेदन देऊन बस फेऱ्या वाढवण्याची विनंती केली मात्र ती विनंती अपयशी ठरली परंतु हर्षल फदाट व सहकारी विद्यार्थ्यांनी याचा सतत पाठलाग करून बस फेऱ्या वाढून घेतल्या. आता बोरगाव बू!! येथे बस फेऱ्या वाढल्याने विद्यार्थी नियमित शाळा व महाविद्यालयांमध्ये जात आहे आणि याच समाधान विद्यार्थी व्यक्त करत आहेत.

संग्रामपूर तालुक्यात अवैध्य. रेती तस्करी जोमात , तर महसुल प्रशासन कोमात,,

0

 

बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील काकणवाडा,,परिसरातील नदीपात्रात मोठ्या प्रमाणात खुले आम अवैद्य रेती वाहतूक सुरू असून महसूल.विभागाचे याकडे साफ दुर्लक्ष्य असल्याचे चित्र दिसुन येत आहे. त्यामुळे रेती तस्करी जोमात तर महसुल विभाग कोमात असे म्हणावयास काही हरकत नाही .
काकनवाडा परिसरातील नदीपात्रात दररोज तेल्हारा व संग्रामपूर तालुक्यातील किमान पंधरा ते वीस वाहने
बिनधास्त दिवसा ढवळ्या रेतीचे उत्खनन करून वाहतूक सुरू असून महसूल विभागाचा लाखोंचा महसूल बुडत असून महसुलचे काही संबंधित अधिकारी ,कर्मचारी मुद्दाम डोळेझाक करीत असुन स्वतःचे भलं तर करुन घेत नाही ना?. रेती तस्करांची ही एवढी फिल्डींग लागलेली असते की,एखादे वेळी अधिकारीला कोठून जर निरोप आला की,रेती वाहने नदीपात्रात वाहने आली .तर लगेच धाड टाकनाऱ्याचे अगोदरच सर्व वाहने पसार होतात.त्यामुळे पथक नियुक्त करुनही कुचकामी ठरले आहेत. बरेच वेळा तहसील कार्यालयात वाहन जमा करण्यासाठी आणतांना तेही पसार होते. तरी याकडे वरिष्ठ अधिकारी यांनी लक्ष देणे गरजेचे आहे,. सूर्या मराठी न्युज साठी अनिलसिंग चव्हाण सह निलेश चिपडे संग्रामपूर, बुलढाणा

ठाकरे सरकार शेतकऱ्यां कडे लक्ष द्या.- बाळराजे जाधव.

0

 

गेवराई प्रतिनिधी- नवनाथ आडे

गेवराई तालुक्यात या वर्षी झालेल्या समाधानकारक पावसामुळे कापसाचे चांगले उत्पादक आले आहे. परतीच्या पावसाने घातलेल्या धुमाकूळामुळे शेतातला कापूस घरात आणला. दमदार पावसामुळे कापूस ही जोमात आला होता. यामुळे शेतकरी राजाने वेळोवेळी औषध फवारणी करत मशागत केली होती. परतीच्या झालेल्या पावसामुळे आलेले कापसाचे बोंड शेतातच सडत होते. तर फुटलेल्या कापसाच्या जागेवरच वाती होत होत्या . अशा परिस्थितीतही शेतकर्यांनी कसे बसे कापूस वेचून घरात आणला आहे. बहुतांश लोकांच्या घरात कापूस आहे. त्यांनी आता जिनिगंला कापूस नेत आहेत. परंतु तिथे चार ते पाच दिवस काडकडीच्या थंडीत मुक्काम करावा लागत आहे. शेतकर्यांचे अजून असे किती दिवस चालणार या वर ठाकरे सरकार कधी लक्ष केंद्रित करणार असा प्रश्न शेतकरी राजा ला निर्माण होत आहे.
मुख्यमंत्री साहेब आपल्या सि.सि.आय वर आमचे शेतकरी राजा कापुस आणतात तर शेतकऱ्यांना सि.सि.आय वर चार.पाच दिवस मुंकामाला थंडीत थांबावे लागतात त्यांना जेवन वेळेवर भेटत नाही . एक तर दोन ते तीन जिनिंगाना सि.सि.आय ची परवांगी द्या नसता त्याना दोन टाईमाचा जेवण द्या.आसा ईशारा गेवराईचे तालुका प्रमुख रयत शेतकरी संघटना बाळराजे जाधव यांनी प्रतिनिधीशी बोलतांना सागितले

ग्रामपंचायत निवडणूकीचे चित्र स्पष्ट; 9664 उमेदवार रिंगणात

0

 

अजहर शाह मोताळा प्रतिनिधी

27 ग्रामपंचायतीमध्ये 95 सदस्यांची अविरोध निवड

बुलडाणा दि. 5 जानेवारी ग्रामपंचायत निवडणूकीसाठी काल 4 जानेवारी रोजी अर्ज माघार घेण्याची शेवटची तारीख होती. त्यानुसार जिल्ह्यामध्ये काल 4 जानेवारी रोजी 3007 उमेदवारांकडून 3104 उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आले. या माघारीनंतर जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणूकीचे चित्र स्पष्ट झाले असून ग्राममपंचायतीसाठी 9664 उमेदवार निवडणूकींच्या रिंगणात आहेत. मात्र जिल्ह्यात निवडणूकीला फाटा देत 27 ग्रामपंचायतींमध्ये अविरोध सदस्यांची निवड करण्यात आली आहे. या 27 ग्रामपंचायतींमध्ये 95 सदस्य अविरोध निवडून आले आहेत.
जिल्ह्यात अर्ज स्वीकारण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत 527 ग्रामपंचायतींसाठी 13 हजार 320 उमेदवारांकडून 13 हजार 609 अर्ज दाखल करण्यात आले आहे. त्यानंतर 31 डिसेंबर रोजी झालेल्या छाननीमध्ये 179 उमेदवारांचे 210 अर्ज नांमजूर करण्यात आले. छाननीअंती बाद झालेल्या अर्जानंतर 13 हजार 141 उमेदवारांचे 13 हजार 399 अर्ज शिल्लक आहेत. सध्या माघारीनंतर 9 हजार 664 उमेदवार निवडणूक आखाड्यात आहेत. सर्वात जास्त 1387 उमेदवार खामगांव तालुक्यात असून अर्ज 1405 आहेत. बुलडाणा तालुक्यात 1171 उमेदवार, चिखलीमध्ये 1110, दे. राजा तालुक्यात 262, सिं. राजामध्ये 610, मेहकरमध्ये 795, लोणार तालुक्यात 301, शेगांव तालुक्यात 635, जळगांव जामोदमध्ये 456, संग्रामपूर तालुक्यात 574, मलकापूरमध्ये 581, नांदुरा तालुक्यात 776 व मोताळा तालुक्यात 1006 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

अपमानास्पद वागणूक दिल्याप्रकरणी प्रहार संघटनेचे प्राचार्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन

0

 

 

आयुषी दुबे शेगाव

शेगांव : बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिकणाऱ्या अम्रपाल भिलंगे नामक विद्यार्थ्याला त्याची संस्थेत असलेली मुळ कागड़पत्र हवी होती. तो ती मागण्यांसाठी प्राचर्याकडे गेला असता तेथील महिला प्राचार्या राजश्री पाटिल यांनी त्याला , ” आताच माझ्यासमोर जीव दे , पुन्हा तोंड दाखवू नको व जाउन मुख्यमंत्र्याना सांग ही बाई मला शिव्या देते…! ” अस म्हणून अपमानित केल होत . परवा या घटनेचा व्हिडिओ समाज मध्यमात व्हायरल झाला होता. आज प्रहार संघटनेने शेगाव येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्रवेश द्वारासमोर प्राचार्या च्या प्रतीकात्मक पुतल्याची तिरडी बनवून प्रवेशद्वारा समोरा प्राचार्याच्या प्रतिमेच दहन करण्यात आल. यावेळी प्राचार्य राजश्री पाटिल यांच्या विरोधात मोठी घोषणाबाजी करण्यात आली.

महिला शिक्षण दिन “साविञी जयंती ऊत्सव ” पांगरी येथे मोठ्या ऊत्साहात साजरा.

0

 

सिंदखेडराजा ( सचिन खंडारे )

3 डिसेंबर रोजी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून तसेच महिला शिक्षक दिन हा बुलढाणा जिल्ह्यातील पांगरी येथे साजरा करण्यात आला
*कोरोना काळात ज्या अंगणवाडी महीला सेविका, तसेच आशा वर्कर महिलांनी, आपल्या जिवाची पर्वा न करता,*
*घरोघरी जावुन लोकांच्या आरोग्याची माहिती जमा केली.*
*अश्या महिलांचा,* *आणि* *डॉ.राजेश्वर उबरहंडे सर,*
*यांनी मेडीकल कॉलेज कोरोना रुग्नांसाठी दिले.*
*त्याबद्दल त्यांचा सुद्धा “कोविड योद्धा” म्हणुन,*
*महात्मा फुले जंयति ऊत्सव समिति पांगरीच्या वतिने मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.*

*तसेच शैक्षणिक क्षेत्रात विषेश गुण मिळवलेल्या विद्यार्थाचा ,शाल,पुष्प व आर्थिक मदत देऊन सत्कार करण्यात आला.*

*नवजात मुलिच्या जन्माचे स्वागत करण्यात आले.*

*संगित खुर्चीमध्ये विजेत्या* *महिलांना महिला आर्थिक* *विकास महामंडळ बुलढाणा* *अंतर्गत लोक संचालीत केंद्र* *धाडच्या वतीने प्रमाणपत्र देण्यात आले.*

*कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान*
*अनिताबाई प्रताप पवार (कोविड योद्धा)*
*यांनी स्विकारले.*

*सर्वप्रथम डॉ.राजेश्वर उबरहंडे* *सर व प्रमुख वक्ते* *प्रा.सचिन खरे सर यांनी माता* *सावित्रींच्या प्रतिमेसमोर* *दिपप्रज्वलन करुन अभिवादन केले.*

*कु.शिवानी विष्णु पवार व कु.कोमल विष्णु पवार यांनी सुंदर आवाजात स्वागतगीत म्हटले तर ताराबाई विष्णु पवार यांच्या सावित्री वंदन गीताने कार्यक्रमाला सुरुवात झाली.*

*सावित्रीच्या वेशामध्ये आलेल्या लहान मुली व महिलांचा सत्कार करण्यात आला.*

*प्रा.सचिन खरे सरांनी*
*माता सावित्रींचा संपुर्ण इतिहास* *आपल्या प्रबोधनातुन सांगितला.*
*तसेच,*

*डॉ.राजेश्वर उबरहंडे सर,*
*छायाताई जाधव,*
*डॉ.अशोक* *पवार,*
*शाहीर रुस्तुम गवई,*
*यांनी* *सुद्धा आपले विचार व्यक्त केले.*

*उपस्थित महिलांनी व लहान मुलींनी सुद्धा माता सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल* *विचार व्यक्त केले.*

*कार्यक्रमाचे प्रास्ताविक,*
*विष्णु पवार यांनी केले.*

*कार्यक्रमाचे सुञसंचालन* *रत्नदिप हिवाळे* *यांनी केले.*
*तर*
*आभार प्रदर्शन सचिन सरकटे यांनि केले.*

*सदर कार्यक्रमासाठी डॉ.राजेश्वर उबरहंडे यांनी २५००रु.,तर बबन सावंत यांनी ११०० शे रु.देणगी दिली.*

*सदर कार्यक्रम संपुर्ण दिवसभर*
*भरपुर महिलांच्या तसेच* *गावातील,*
*सिद्धार्थ* *हिवाळे,*
*विनोद* *गवई,*
*शेषराव गवई,*
*कैलास* *पवार,*
*परमानंद गवई,*
*बुद्धेश्वर* *गवई,*
*नारायण पवार,*
*रविकांत* *पवार,*
*शरदचंद्र पवार,*
गणेश पवार,
उद्धव पवार,इत्यादिंच्या उपस्थितीत अत्यंत**हर्षोउल्हासात अगदि आनंदात ,”महिला शिक्षण* *दिन”,”महीला मुक्ती दिन”* *सावित्रीजयंती**उत्सव दिवस म्हणुन साजरा झाला.