Home Blog Page 558

साखरखेर्डा येथील दीपक नागरे यांना दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर मराठी पत्रकारिता राज्य पुरस्कार जाहीर !

0

 

सिंदखेड राजा (सचिन खंडारे )

साखरखेर्डा येथील पत्रकार तथा सामाजिक शैक्षणिक कार्यात अग्रेसर असणारे दिव्य मराठी राज्याचे तालुका प्रतिनिधी दीपक सत्यभान नागरे यांना अतिशय प्रतिष्ठेचा दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर मराठी पत्रकारिता राज्य पुरस्कार जाहीर झाला आहे ‘ऑल जनरल लिस्ट अँड फ्रेंड्स सर्कलह्या राष्ट्रव्यापी पत्रकार संघटनेच्या वतीने हा मानाचा पुरस्कार दिला जातो ‘या पुरस्काराची घोषणा संस्थापक अध्यक्ष यासीन पटेल व प्रदेशाध्यक्ष अजिंक्य गोवेकर यांनी दिनांक 24 डिसेंबर रोजी केली आहेहा पुरस्कार जानेवारी महिन्यात अचलपूर येथे प्रदान केला जाणार असल्याचे समजते त्यामुळे सिंदखेड राजा व साखरखेर्डा परिसरातील लोकांनी आनंद व्यक्त केला आहे तसेच नागरी सर यांना शुभेच्छा सुद्धा दिले आहेत ।गेल्या पंचवीस वर्षापासून श्री नागरे सर हे पत्रकारीता करत आहेत शिवाय पेशाने शिक्षक असून सुद्धा सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत ।

अप्पू पॉईंट जवळ गिट्टी खदान व्यवसायिकाची गोळी झाडून हत्या.

0

 

अकोला : शहरातील एमआयडीसी परिसरात असलेल्या अप्पू टी पॉईंट जवळ गोपाल अग्रवाल नामक गिट्टी खदान व्यवसायिकाची गोळी झाडून हत्या झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली.

घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. हत्या आरोपी फरार झाले असून,हत्ये मागचे कारण सध्या अस्पष्ट आहे. व्यवसायातील स्पर्धेमुळे हत्या करण्यात आली असावी,असा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. घटनेचा पुढील तपास सुरू आहे. नारायण अग्रवाल यांच्याकडे मृतक कॅशीअर असल्याचे समजते.

तिहेरी तलाक चा पहिला गुन्हा.तीन तलाक कायद्याअंतर्गत 6 जणांविरुद्ध गुन्हे दाखल…

0

 

गजानन सोनटक्के जळगांव जा.प्रतिनिधी:-

जळगाव जामोद येथे तिहेरी तलाक चा प्रथम गुन्हा दाखल तर बुलढाणा जिल्ह्यातील तिहेरी तलाक ची ही चौथी घटना जळगांव जा.शहरातील सुलतानपुरा येथे घडली आहे .
सविस्तर असे की फिर्यादीचे लग्न आरोपी सलमान शेख रा.निभोरा रावेर यांच्यासोबत 25 एप्रिल 2014 ला वडोदा येथे झाले होते फिर्यादीस तीन अपत्य असून आरोपी एक ते सहा यांनी लग्न झाल्यापासूनच फिर्यादीस दोन ते तीन वर्षे चांगले वागविले व त्यानंतर आरोपींनी फिर्यादीस माहेरून पैसे आण असा नेहमी तगादा लावला. फिर्यादीने माहेरून पैसे न आणल्याने या सर्व आरोपींनी फिर्यादीस मारहाण करून अश्लील शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली
दिनांक 26 डिसेंबर रोजी सकाळी 10 ते 11 वाजेच्या दरम्यान जळगाव जामोद येथील सुलतानपुरा येथे फिर्यादीचे पती शेख सलमान याने शेख शाहरुख शेख कयूम व शेख भुरा शेख कयुम या दोघांना सोबत घेऊन सुलतानपूर येथे फिर्यादीच्या घरी दाखल झाले व फिर्यादीस म्हणाले मुझे 80 हजार रुपये अभी के अभी दो नही तो मै आपको तलाक दे दूंगा अशी धमकी दिली त्यानंतर सलमान शेख याने त्याच्या आईला फोन करून स्पीकर ऑन करून फिर्यादी सोबत बोलायला लावले फिर्यादी सोबत बोलत असता 80 हजार रुपये नाही दिले तर तू फिर्यादी सोबत तिथेच तलाक देऊन टाक असे म्हणाली त्यानंतर सलमान शेख यांनी फिर्यादीस त्या दोघांसमोर तलाक तलाक तलाक असे म्हणून तुझा व माझा पती-पत्नी म्हणून असलेला संबंध संपला असे म्हणून फिर्यादीस शिवीगाळ करून तिथून निघून गेला अशी लेखी तक्रार फिर्यादीने जळगाव जामोद पोलीस स्टेशनला दिली त्यावरून जळगाव जामोद पोलीस स्टेशनने आरोपीविरुद्ध अपराध नंबर 993/ 2020 कलम 498,294,323,504 506,34 भारतीय दंड विधान स ह कलम 4 मुस्लिम महिला विवाह संरक्षण कायदा सन दोन हजार एकोणवीस नुसार आरोपी शेख सलमान शेख कयुम वय 30 वर्ष, जमीला शेख कयुम फिर्यादी ची सासू, शेख कयुम शेख गणी फिर्यादी चा सासरा, शेख शाहरुख शेख कयूम, शेख भुरा शेख कयूम, शेख कुब्रा शेख गणी फिर्यादीची आत्या सासू, या सर्वांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री सुनील जाधव यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास हेडकॉन्स्टेबल दयाराम कुसुम्बे, योगेश निंबाळकर ,कॉस्टेबल अनिल भुले पाटील हे करीत आहे.तसेच जळगाव जामोद येथे तीन तलाक चे हे पहिलेच प्रकरण आहे.

दौंड तालुक्यातील प्रकल्पग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याकरिता शिवसेना उपजिल्हाप्रमुख महेश पासलकर यांचा पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांचेकडे पाठपुरावा !!

0

 

दौंड : दौंड तालुक्यातील पानशेत, वरसगाव, उजनी, नाझरे, वीर धरण प्रकल्पग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावणेकामी शिवसेना उपजिल्हाप्रमुख महेश पासलकर यांनी शिवसैनिक व पदाधिकाऱ्यांचे शिष्टमंडळासह दि.२५ रोजी पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांचे पुणे येथे भेट घेतली. यावेळी पासलकर यांनी प्रकल्पग्रस्तांचे शासन दरबारी प्रलंबित असलेल्या विविध प्रश्न मार्गी लावणेबाबत मंत्री महोदयांचे बैठकीत चर्चा केली.

यावेळी पानशेत धरण व वरसगाव धरण प्रकल्पग्रस्तांना शासन परिपत्रक क्र.आरपीए १०७१/४१/५८३/र-१ दि.०९/०५/१९७३ परिपत्रकामधील तरतुदीनुसार प्रकल्पग्रस्तांस जमीन वाटप करण्याचे निर्देशाची प्रशासनाकडून अंमल बजावणी होत नसलेबाबत. पानशेत व वरसगाव धरण प्रकल्पामुळे विस्थापित प्रकल्पग्रस्तांना दौंड तालुक्यात वाटप जमिनी व भूखंडाचे ७/१२ वरील इतर हक्कातील नवीन शर्त शेरे कमी करणेबाबत. पुनर्वसित गावठाणात वाटप रहीवासी भुखंडामध्ये पायाभुत सुविधा उपलब्ध करुन देणेबाबत. दौंड तालुक्यातील मा. जिल्हाधिकारी तथा उपसंचालक पुनर्वसन (जमीन) पुणे यांचे नावे असलेल्या जमिनीवरील अतिक्रमण काढणेबाबत.

दौंड तालुक्यातील राजेगाव, मलठण, लोणारवाडी, दौंड, लिंगाळी, गोपाळवाडी, या महसुली गावात उजनी प्रकल्पग्रस्तांना पूर्वी पर्यायी जमीन व भूखंड वाटप केलेले असताना तालुक्यातील उजनी प्रकल्पग्रस्तांना संपादित जमिनीचे बदल्यात सोलापूर येथे पर्यायी जमीन व भूखंड मागणी करणेस कळविले जात असल्याची बाब यावेळी पुनर्वसन मंत्री यांचे निदर्शनास आणून दिली. तालुक्यातील उजनी प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन दौंड तालुक्यातच प्राधान्याने करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात यावे अशी मागणी ही पासलकर यांनी यावेळी केली.

********************

यावेळी शिवसेना युवा सेना प्रमुख समिर भोईटे ,उपतालुका प्रमुख विजयसिंह चव्हाण ,शाखा प्रमुख दिपक भंडलकर आदि उपस्थित होते.

खोपटा ते कोप्रोली चौक रस्त्याच्या निकृष्ट कामाची चौकशी करण्याची मागणी !!

0

 

मनसेचे सत्यवान भगत यांची सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रार !!!

उरण – रायगड जिल्हा: उरण तालुक्यातील खोपटे ते कोप्रोली गावांदरम्यान असलेल्या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे करण्यात आले शिवाय रस्त्यात खूप मोठे खड्डे पडले असून हे खड्डे डांबरीकरण करण्याऐवजी खड्डे मातीने भरून बुजविले जात आहेत. त्यामुळे या गैरकारभारा विषयी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालूका उपाध्यक्ष सत्यवान भगत यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी सार्वजनिक बांधकाम विभाग पनवेल यांच्याकडे तक्रार केली असून या कामाचे बिल थांबविण्यात यावे अशी मागणी केली आहे.

खोपटे गाव ते कोप्रोली गाव रस्त्यावर खड्यांच्या संदर्भात गेली 2 वर्षे त्या रस्त्याची देखभाल दुरुस्ती निकृष्ट दर्जाची झाली आहे. ह्याच रस्त्याच्या दुरुस्तीसाठी NHAI ने अंदाजे 30 ते 40 लाखाचा निधी पावसाळी पडलेले खड्डे आणि दुरुस्तीसाठी मंजूर करून ते सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात आले आहे. परंतु सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी जे. ई. बांगर हे ठेकेदाराला पाठीशी घालून निकृष्ट दर्जाच्या कामांना सहकार्य करून जनतेच्या आणि शासनाच्या पैश्याची लूट करण्याचे काम करत आहेत. सदर रस्त्याचे नव्याने डांबरीकरण झाले तरी रस्त्यावर मोठे मोठे खड्डे पडणार आहेत. कारण ह्या रस्त्यात पडलेल्या खड्यात मातीचा भराव टाकून खड्डे बुजविण्यात आले आहेत. खड्ड्यात डांबर न टाकता केवळ खडी पसरवून नंतर माती वरवर डांबर टाकली जात आहे. त्यामुळे ह्या रस्त्यावर पुन्हा खड्डे पडू लागले आहेत. सदर विषयाचे गांभीर्य लक्षात घेता निकृष्ट दर्जाच्या रस्त्याच्या कामाची चौकशी करून अधिकारी जे.ई.बांगर आणि ठेकेदार यांच्यावर कारवाई करून कामाचे बिल त्वरित थांबविण्यात यावे अशी मागणी पत्रव्यवहारा द्वारे मनसेचे तालूका उपाध्यक्ष सत्यवान भगत यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे.

 

यावल बुरूज चौक ते शासकीय गोदाम पर्यंतच्या रस्त्याचे काम सात महीन्यांपासुन प्रलंबीत

0

 

 

सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष द्यावेयावल येथील बुरूज चौक ते सातोद मार्गावरील शासकीय गोदाम पर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरणाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे मागील सात महीन्यांपासुन प्रलंबीत असल्याने वाहनधारका व पादचाऱ्यांना मोठा त्रास सोसावा लागत आहे . यावल शहरातील बुरूज चौक ते सातोद कोळवद या मार्गावरील रस्त्यावरील पोलीस स्टेशन , ग्रामीण रुग्णालय , स्टेट बॅकेचे मुख्य कार्यालय , तहसील कार्यालय , विविध शाळा आदी मुख्य कार्यालय असुन या मार्गावर कार्यालयाशी निगडीत कामा करीता येणाऱ्या नागरीकांची नियमीत मोठी वर्दळ असते हा विषय लक्षात घेत शासनाच्या वतीने सुमारे ५०० मिटर पर्यंतचा रस्त्यासाठी निधी मंजुर झाला असुन या कामास सर्वमान्यता मिळाली असतांना सार्वजनिक बांधकाम विभाग यावल च्या अक्षमय: दुर्लक्षामुळे मागील सात महीन्यांपासुन सुरू न झाल्याने या मार्गावरून जाणाऱ्या वाहनधारका पासुन तर पादचाऱ्यांना रस्त्यावर मोठमोठे खड्डे निर्माण झाल्याने व त्यात रस्त्याच्या दोन्ही बाजुस कामाची खड्डीअनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे यावलच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ या प्रलंबीत कामास सुरूवात करून त्वरीत पुर्णत्वास घेवुन जावे अशी मागणी नागरिक करीत आहे .

चंद्रपुर भाजपचे डिजिटल सदस्य नोंदणी पर्व सुरू !!

0

 

भारतरत्न अटलबिहारी वाजपेयींच्या जयंतीचे औचित्य !!!

आ सुधीर मुनगंटीवार यांचे हस्ते शुभारंभ !!!!

भारतरत्न पंतप्रधान स्व अटलबिहारी बाजपेयी यांच्या ९५, व्या जयंतीचे औचित्य साधून चंद्रपुर भारतीय जनता पार्टीच्या वतीने डिजिटल सदस्य नोंदणी पर्वाला शुक्रवार (२५डिसेंम्बर) ला सुरवात करण्यात आली. या अभियानाचा शुभारंभ आ सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते बाबूपेठस्थित श्रद्धेय माजी पंतप्रधान अटलबिहारी स्टेडियम येथील अटलजींच्या पुतळ्याला आदरांजली स्वरूप माल्यार्पण करून करण्यात आला.

या प्रसंगी भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष डॉ मंगेश गुलवाडे, महापौर राखी कांचर्लावार, महामंत्री राजेंद्र गांधी, सुभाष कासंगोट्टूवार, ब्रिजभूषण पाझारे, रवींद्र गुरनुले, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष अंजली घोटेकर, मंडल अध्यक्ष संदीप आगलावे, नगरसेवक संजय कांचर्लावार, रवी आसवानी, प्रदीप किरमे, कल्पना बगुलकर, प्रज्ञा बोरगमवार, मंजुश्री कासंगोट्टूवार, शिला चव्हाण, प्रशांत विघ्नेश्वर, रामकुमार अकापेल्लीवार, गणेश गेडाम आदींची उपस्थिती होती.

यावेळी आ मुनगंटीवार म्हणाले, महाराष्ट्रात पहिल्यांदाच डिजिटल सदस्य नोंदणीपर्वाला सुरवात होत आहे. या डिजिटल माध्यमातून संघटना व जनतेचे प्रश्न सहजपणे मांडता येईल व सोडविता येईल. संघटनेला योग्य व्यासपीठ मिळेल. जनतेची सेवा करण्यासाठी हा ऍप काम करेल. श्रद्धेय अटलजी म्हणायचे, कदम मिलाकर चालना होगा….आपल्यालाही एकमेकाला सहकार्याच्या भावनेतून जनसेवा करायची आहे, असा संदेश त्यांनी यावेळी दिला. अटलजींनी संपूर्ण आयुष्य देशसेवेत अर्पण केले. त्यांच्या जनसेवेचा मूलमंत्र सर्वांनी अंगिकारावा असे आवाहन त्यांनी केले. २५ डिसेंम्बर ते २५ जानेवारी अटल डिजिटल भाजप सदस्य नोंदणी अभियान राबविले जाणार आहे. अशी माहिती कासंगोट्टूवार यांनी दिली.

यावेळी जेष्ठ  भाजप नेते रामेशजी बागला, दिवाकर पुद्दटवार, चंद्रशेखर गन्नूरवार, प्रिया पेंदाम व भगिनी यांचा आ मुनगंटीवार यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन व प्रास्तविक सुभाष कासंगोट्टूवार यांनी केले, तर संदीप आगलावे यांनी आभार मानले.

 

शेतकरी प्रबोधिनीच्या उपाध्यक्षपदी रामदास पाटील !!

0

 

उरण – रायगड जिल्हा: मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, नवी मुंबई परिसरातील मूळ भूमीपुत्र असलेल्या आगरी कोळी कराडी, भंडारी, ईस्ट इंडियन आदिवासी समाजाचे अस्तित्व सध्या विविध कारणांनी धोक्यात आले आहे. त्यामुळे कोळी बांधव, कामगार, शेतकरी वर्गांच्या न्याय हक्कासाठी शेतकरी प्रबोधिनी ही संस्था शेतकऱ्यांना, कोळी बांधवांना, कामगारांना विविध माध्यमातून न्याय देण्याचा प्रयत्न करत आहे. अश्या या संस्थेच्या उपाध्यक्ष पदी नुकतीच रामदास हरिश्चंद्र पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मु – नितळस तालुका पनवेल येथील रहिवाशी असलेले रामदास हरिश्चंद्र पाटील यांचे आजपर्यंतचे कार्य व गोरगरिबांविषयी, कामगार, कोळी, शेतकरी बांधवांविषयी असलेली तळमळ पाहता कामगार, कोळी बांधव, शेतकऱ्यांना न्याय व त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी शेतकरी प्रबोधन या संस्थेच्या उपाध्यक्षपदी रामदास हरिश्चंद्र पाटील यांची निवड करण्यात आल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष राजाराम पाटील यांनी दिली. रामदास पाटील यांची निवड संस्थेच्या उपाध्यक्ष पदी झाल्याने सर्वच क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

 

गोवठणे गावात दिवसा ढवळ्या झाली चोरी. चोर अद्यापही फरार !!

0

 

घरात कोणीही नसल्याचे पाहून चोरांनी केले घर साफ !!!

उरण – रायगड जिल्हा: उरण तालुक्यातील गोवठणे गावातील रहिवाशी मनपसंत चंद्रकांत पाटील वय 32 वर्षे, धंदा -नोकरी, गोवठणे यांच्या घरी दिवसा ढवळ्या घरात कोणीही नसल्याचे पाहून चोरांनी घर साफ केले आहे. घरात असलेले सोने व रक्कम असे एकूण 6, 30, 500 रुपयाची मालमत्ता चोरीस गेल्याने गोवठणे गाव परिसरात एकच खळबळ माजली आहे. चोरी करणाऱ्या अनोळखी व्यक्ति विरोधात भारतीय दंड संहिता 1860 कलम 454, 380 अंतर्गत उरण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे कि मनपसंत चंद्रकांत पाटील राहणार गोवठणे, तालुका उरण हे CHA ची नोकरी करत असून त्यांची पत्नी संगीता ही गर्भवती असल्याने तिच्या उपचाराकरिता पत्नी उरण येथे गेले होते. मनपसंत यांचे वडील वडील कामानिमित्त आवरे येथे गेले होते. मनपसंत यांची आई राधा चंद्रकांत पाटील मनपसंत यांचा मुलगा स्मित पाटील हे घरात होते. मुलगा रडत असल्याने राधा यांनी मुलाला दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास बाहेर फिरण्यास घेऊन गेले. मात्र दुपारी 1:45 वाजण्याच्या सुमारास घरी परत आल्यावर कपाटातील सर्व सामान, कपडे व इतर सामान जवळच असलेल्या बेडवर पडलेले दिसले. किचनचा दरवाजा सुद्धा उघडा होता सदरचे घर दुमजली असून चोरांनी जिन्याद्वारे तळमजल्यात प्रवेश करून चोरी केल्याचा संशय आहे. 3, 20,000/- रुपयाचे 8 तोळे वजनाचे सोन्याचे गंठण, 1, 40, 000/- रूपयाचे जेन्टस चैन, 60, 000/- रुपयाचे सोन्याचे मंगळसूत्र, 48,000/- रुपयाचे 12 ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातील झुमके, 12,000/- रुपयाचे कानातील टॉप्स, 12,000/- रुपयाचे गळ्यातील चैन, 12,000/- रुपयाचे सोन्याचे 5 अंगठ्या, 4,000/- रुपयाची लेडीज अंगठी, 4,000/- रुपयाची कानाची बाळी, 18,500/- रुपयाचे रोख रक्कम त्यात 500 रुपयाचे 37 चलनी नोटा असे एकूण 6,30,500/- रुपयाची मालमत्ता चोरीस गेली आहे.

चोराने घरात वरच्या मजल्यावरून घरात प्रवेश करून बेडरूम मधील लोखंडी कपाटाचे लॉकर व ड्रॉवर कशाने तरी तोडून त्यातील वरील वर्णनाचे व किंमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरी केली आहे. चोरी करणाऱ्या या अनोळखी व्यक्ति विरोधात मनपसंत पाटील यांनी उरण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला आहे. उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदीश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरु आहे. चोरांचा त्वरित शोध लावून सदर घटनेस न्याय मिळवून द्यावा अशी मागणी मनपसंत पाटील यांनी पोलीस प्रशासनाकडे केली आहे.

 

वैजापुर गंगापूर मतदार संघातील ग्रामपंचायत निवडणूकाच्या अनुषंगाने ( महसुल व ग्रामविकास राज्यमंत्री ) मा ना अब्दुलजी सत्तार साहेब, यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक..

0

 

ऋषी जुंधारे
प्रतिनिधी

वैजापूर- वैजापुर-गंगापूर मतदार संघातील ग्रामपंचायत निवडणूकाच्या अनुषंगाने वैजापूर आमदार जनसंपर्क कार्यालय येथे ( महसुल व ग्रामविकास राज्यमंत्री ) मा ना अब्दुलजी सत्तार साहेब, आमदार अंबादास दादा दानवे व आमदार प्रा रमेश पा बोरनारे सर यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न झाली.
यावेळी आमदार साहेबांनी मार्गदर्शन करत सर्कल निहाय ग्रामपंचायत आढावा घेऊन उपतालुकाप्रमुख, विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख, पं. स. सदस्य, कृ.ऊ.बा.स.संचालक यांच्या वर जबाबदार्या विभागून दिल्याचे सांगितले.

या आढावा बैठकी प्रसंगी उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब पा जगताप, शिक्षण व आरोग्य सभापती अविनाश पा गलांडे, मा जि.प.सदस्य मनाजी पा मिसाळ, मा.सभापती रामहरी बापू जाधव, शहर प्रमुख राजेंद्र पा साळुंके, कृ ऊ.बा.स.उपसभापती विष्णू भाऊ जेजुरकर, गटनेते प्रकाश चव्हाण, यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी उपतालुका प्रमुख कल्याण पा जगताप, गोरख पा आहेर, डॉ प्रकाश शेळके, पी एस कदम, गोरखनाथ शिंदे, महेश पा बुनगे, मोहन पा साळुंके, नगरसेवक, पारस घाटे, ज्ञानेश्वर टेके, स्वप्नील जेजुरकर, इम्रान कुरैशी, रियास शेख़, सखाहरी बर्डे, वसंत त्रिभुवन, प स सदस्य भाऊसाहेब पा गलांडे, भानुदास पा पवार, बद्रीभाऊ चव्हाण, विभाग प्रमुख नानासाहेब थोरात, उपविभाग प्रमुख हरिदास साळुंके, बंडूभाऊ जगताप, विठ्ठल पगार, मल्हारी पठाड़े, राजुभाऊ राजपूत,अरूण शेलार, दिपक भोसले, अमोल पा मलिक, राजू गलांडे, शिवसैनिक व शाखा प्रमुख उपस्थित होते.