Home Blog Page 560

नागपूर मेट्रोच्या रायडरशिप ग्राफ मध्ये होत आहे वाढ एकाच दिवशी तब्ब्ल 17562 नागरिकांनी केला मेट्रोने प्रवास

0

 

नागपूर : कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे मेट्रोचे संचालन पूर्व पदावर आले असून लॉकडाऊनच्या काळात महा मेट्रोने कार्याचा वेग कायम ठेवत स्टेशन निर्माण कार्य पूर्ण केले.ज्यामध्ये रहाटे कॉलोनी, अजनी चौक, बंसी नगर,एलएडी चौक, शंकर नगर आणि रचना रिंग रोड जंकशन मेट्रो स्टेशन अनलॉक झाले व या स्टेशन मधून प्रवासी सेवा सुरु झाली आहे व नागरिकांना या मेट्रो स्टेशनचा मोठ्या प्रमाणात फायदा होत आहे. इथेच न थांबता जास्तीत जास्ती नागरिकांनी मेट्रो व सार्वजनिक वाहतुकीचा उपयोग करावा याकरिता घोड दौड सुरु आहे याच पार्श्वभूमीवर काल दिनांक 20 डिसेंबर 2020 रोजी महा मेट्रोच्या ऑरेंज आणि ऍक्वा लाईन मार्गिकेवर तब्ब्ल 17562 नागरिकांनी मेट्रोने प्रवास केला.

महा मेट्रो तर्फे प्रवाश्यान करिता विविध सोई सुविधा मल्टी मॉडेल इंट्रिग्रेशन अंतर्गत उपलब्ध करण्यात येत असून मेट्रो प्रवास सोबत आता आपली स्वतःची किंवा फिडर सर्विस येथील उपलब्ध सायकल देखील एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणापर्यंत जाण्याकरिता सायकल मेट्रो ट्रेन मध्ये घेऊन जाण्यासंबंधी सेवा महा मेट्रोने सुरु केली असून नागरिकांना याची पसंती मिळत आहे. तसेच शहरातील प्रतिष्टीत व्यक्ती, अधिकारी तसेच सामाजिक क्षेत्रातील नागरिक मेट्रोने प्रवास करून नागरिकांनी जास्तीत जास्ती मेट्रोचा उपयोग करावा या करिता नागरिकांना प्रेरित करीत आहेत तसेच महा मेट्रोने शहरातील व स्टेशन परिसरातील प्रतिष्टीत व्यक्तीना महा मेट्रोच्या स्टेशनचे अॅेम्बेसेडर म्हणून महा मेट्रोशी जोडले आहे.

काल वाढलेली रायडरशीप संख्या ही कोविड नंतर सुरू झालेल्या मेट्रो सेवेमधील सर्वात जास्त होती व कोविडच्या पूर्वीच्या तुलनेत सर्वात जास्त होती.

कोविड पूर्वी (रविवार रायडरशीप)
26-01-2020 :- 21258,
09-02-2020 :- 17968,
02-02-2020 :- 17749,
16-02-2020 :- 16579,
23-02-2020 :- 13726.

कोविड नंतर (रविवार रायडरशीप)
20/12/2020:- 17562,
13/12/2020:- 15404,
06/12/2020:- 13187,
29/11/2020:- 11488.

नागपूर मेट्रो रेल प्रकल्पाची रायडरशीप मध्ये झालेली वृद्धी ही जयपूर,नोएडा व अहमदाबाद मेट्रो रेल प्रकल्पाच्या तुलनेत सर्वात जास्त आहे. तसेच महा कार्ड धारक, सायकल सोबत नेत मेट्रोचा प्रवास करणारे प्रवासी संख्ये मध्ये देखील वाढ होत आहे तसेच नियमित प्रवास करणारे नागरिक यांचा देखील समावेश आहे. याव्यतिरिक्त शनिवार व रविवार वगळता दररोज प्रवास करणारे नागरिक सरासरी प्रतिदिन 10 हजार पेक्षा जास्ती आहे.

मातंग समाजातील अनाथ आणि मुकबधिर मुलीवर तिच्या असहाय्यतेचा फायदा घेत केलेला बलात्कार करून हत्या केल्या प्रकरणी दोषींला फाशीची शिक्षा द्या- युवा लहू भीम सेना

0

 

ऋषी जुंधारे
जिल्हा प्रतिनिधी
औरंगाबाद

वैजापूर:- नांदेड जिल्यातील बिलोली येथिल मातंग समाजातील मुकबधिर मुलीवर बलात्कार करून अमानवीय निघृणपणे हत्या केल्याप्रकरणी दोषींवर लवकरात लवकर योग्य ती कार्यवाही करुन फाशीची शिक्षा देण्यात यावी ,दि.०९/१२/२०२० रोजी नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुका झोपडपट्टी बिलोली येथिल मातंग समाजातील अनाथ आणि मुकबधिर मुलीवर तिच्या असहाय्यतेचा फायदा घेत केलेला बलात्कार अत्याचार आणि हत्या केल्या प्रकरणी दोषींवर लवकरात लवकर योग्य ती कार्यवाही करून फाशीची शिक्षा करा असे निवेदन युवा लहुजी भीम सेना च्या वतीने उप विभागीय अधिकारी यांना देण्यात आले.नांदेड जिल्ह्यातील बिलोली येथील झोपडपट्टी मध्ये राहणाऱ्या सुनीता कुडगे (२७) वर्षीय अनाथ आणि मुकबधीर मुलीवर तिच्या असहाय्यतेचा फायदा घेत केलेला बलात्कार, अत्याचार आणि हत्या प्रकरणी युवा लहुजी भिम सेना महा.राज्य च्या वतीने तिव्र अशा शब्दात जाहिर निषेध नोंदवण्यात येत आहे .या अत्याचार व दगडाने ठेचुन हत्या करणाऱ्यानराधामाला त्या घटनेत सोबतीला आणखी कोणी वाईट प्रवृत्तीचे लोक आहेत का? याची सखोल चौकशी व्हावी.तसेच या आरोपींना महा.शासनाच्या विचारधीन असलेल्या *महिला अन्याय अत्याचार विरोधी कायदा म्हणजे दिशा किंवा शक्ती कायद्याअंतर्गत 21 दिवसाच्या आत हा खटला फास्टट्रँक कोर्टात चालवून लवकरात लवकर दोषींना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी या निवेदणाद्वारे करण्यात येत आहे…
निवेदनावर लहुजी शक्ती सेना वैजापुर तालुका अध्यक्ष सागर गंगाधर मोटे
युवा लहुजी भीम सेनेचे संस्थापक अध्यक्ष
शिवा थोरात,रूद्रा शेजवळ ,दिपक पवार, किरण पवार, विकास सोळसे, बाळा पवार,शुभम म्हस्के आदीं स्वाक्षऱ्या आहे….,

राज्यात उद्यापासून रात्रीची संचारबंदी, उद्धव ठाकरेंची घोषणा

0

 

मुंबई- ब्रिटनमध्ये (New strain of virus in UK)सापडलेल्या coronavirus च्या नव्या प्रकारामुळे खबरदारीचा उपाय म्हणून राज्यात 15 दिवस अधिक सतर्कता पाळण्यात येणार आहे.
मुंबई, 21 डिसेंबर : ख्रिसमस आणि नवीन वर्ष सेलिब्रेशनसाठी नागरिकांना संयम पाळावा लागणार आहे. कारण रात्री 11 नंतर नागरिकांना रस्त्यावर फिरता येणार नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रात्रीची संचारबंदी जाहीर केली आहे.ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खबरदारीच्या उपाययोजनांसाठी बैठक घेतली. राज्यात उद्यापासून महानगरपालिका क्षेत्रात रात्री ११ ते पहाटे सहा पर्यंत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून ५ जानेवारीपर्यंत ते लागू राहील. त्याचबरोबर संपूर्ण युरोप आणि मध्य-पूर्व देशांतून येणाऱ्या सर्व प्रवाशांना ते विमानतळावर उतरल्यापासून १४ दिवस संस्थात्मक क्वारंटाईन करण्याचा तसेच अन्य देशांमधून येणाऱ्या प्रवाशांना होम क्वारंटाईन करण्याचा निर्णय घेण्यात आला. कोरोनाच्या या नव्या विषाणूमुळे राज्यात अधिकची खबरदारी घेण्यात येत असून पुढील १५ दिवस अधिक सतर्क रहावे लागेल, असे मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीस मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, मुंबई महापालिका आयुक्त आय. एस. चहल, मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंह, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरव विजय, राज्य टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. संजय ओक, सदस्य डॉ. शशांक जोशी, डॉ. अविनाश सुपे, डॉ. राहूल पंडीत, मुख्यमंत्र्यांचे पुणे विभागाचे सल्लागार दीपक म्हैसेकर आदी यावेळी उपस्थित होते.

 

BREAKING NEWS  सौन्दड ग्राम पंचायत कडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंबना 

0

 

छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती कचर्याच्या ढिगार्यात फेकलेल्या अवस्थेत.

गोंदिया, ता. 20 -जिल्ह्यातील सडक/अर्जुनी तालुका अंतर्गत येणाऱ्या ग्राम पंचायत सौन्दड येथे, चक्क महापुरुषांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आल्याचे प्रकार समोर आले आहे. प्रकरण असे आहे की – ग्राम पंचायत सौन्दड यांनी जुनी जीर्ण झालेली इमारत पाडून त्याचे नाविनिकरन करण्याचे काम काही दिवसांपूर्वी चालू केले आहे.

त्यातच दुसरीकडे नवीन इमारतीत कार्यालय चालू केले आहे, तर जुन्या इमारती मध्ये असलेले साहित्य हलवले, मात्र छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना नवीन ठिकणी न करता त्या मूर्तीला फेकून दिले आहे, सध्याच्या स्थितीत मूर्ती कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकलेल्या अवस्थेचे चित्र आहे, समोरच्या बाजूला दुकान गाडे आहेत.

अश्यात नागरिक मूत्र विसर्जन करण्यासाठी मागच्या बाजूला पडलेल्या इमारतीकडे जातात, अश्यात फेकलेल्या अवस्थेत मूर्ती पाहून काही नागरीकांनी अमच्यासी संपर्क केला, व वृता बाबद माहिती दिली आहे, ग्राम पंचायत चे पदाधिकारी व कॉन्ट्रॅक्टर यांनी मूर्तीची दखल न घेता फेकून दिली असल्याचे चित्र आहे, एकंदरीत ग्राम पंचायत सौन्दड तर्फे महा पुरुषांच्या मूर्तीची विटंबना करण्यात आल्याची चर्चा परिसरात वार्या सारखी पसरली आहे, यावर सत्तेत असलेली शिवसेना पक्ष काय भूमिका घेणार याकडे नागरिकांचे लक्ष्य लागले आहे.

मोहाडी येथील सात विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश !अमरावती येथील विद्यालयात मिळणार प्रवेश !

0

 

सिंदखेड राजा (सचिन खंडारे )

सिंदखेड राजा तालुक्यातील मोहाडी या गावातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी यांनी मुख्याध्यापक मा.प्रकाश रिंढे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक इंगोले सर व मोरे सर यांच्या अथक परिश्रमाने जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना वर्ग ५ च्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश प्राप्त करून शाळेचं नाव कमावले आहे.शिष्यवृत्ती परीक्षा मध्ये वर्ग पाचवा एकूण अठरा विद्यार्थी पैकी सात विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे ! त्यांना पुढिल शिक्षणासाठी शिष्यवृत्ती व पुढील सर्व शिक्षण मोफत मध्ये विद्यानिकेतन विद्यालय अमरावती येथे या परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांची निवड झाली यशस्वी विद्यार्थी खालील प्रमाणे यश राजेंद्र इंगळे,प्रज्वल जगाराव इंगळे, संघर्ष अमोल इंगळे, ऋषिकेश सुनील शिराळे, प्रशांत संजय रिंढे,अजय संतोष झीने,कुणाल विजय जाधव यां मुलांनी ग्रामीण भागातील असलेल्या मोहाडी येथील जिल्हा परिषद शाळेचे नाव उच्च पातळीवर नेले आहे ।या यशामुळे उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संपूर्ण परिसरातून कौतुक होत आहे !

उंद्री येथे सरपंच प्रदीप अंभोरे यांच्या हस्ते संत गाडगेबाबा यांच्या मूर्तीचे अनावरण !

0

 

सिंदखेडराजा (सचिन खंडारे )

चिखली तालुक्यातील उंद्री येथेकाल दिनांक 20 डिसेंबर रोजी ज् समाजसेवक आधुनिक संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त

तसेच सुभेदार एकनाथ रोडुजी अंभोरे स्मृती निमित्त भाई प्रदीप अंभोरे सरपंच यांनी परीट समाज बांधवांना समाजिक नेते उत्तमराव तरळकर यांचे निवास स्थानी मूर्तीदान करून भाई प्रदीप अंभोरे हस्ते अनावरण करण्यात आले प्रसंगी संजय महाले माजी प स सदस्य अशोक लाहुडकार माजी उपसरपंच बंडूभाऊ बिडवे माजी सरपंच पती,उत्तमराव तरळकर यांचे हस्ते दीप प्रज्वलन करून माल्यार्पण करण्यात आले आपलं गांव संतांचे पदस्पर्श व विचाराने पुनीत भूमी आहे राष्ट्रसंत गाडगे बाबा,तुकडोजी महाराज विचार ग्रामविकासा साठी आम्हाला प्रेरणा देतील असे वक्तव्य भाई प्रदीप अंभोरे यांनी केले यावेळी विष्णू गाडेकर,मिलिंद वानखडे गजानन तरळकर,संजय राऊत,रामदास काळे,समाजातील प्रमुख नेत्यांसह महिला युवक समाज बांधवांनी बाबांना पुष्प अर्पण केले अभिवादन करून पुण्यतिथी साजरी केली !

साखरखेर्डा शिंदीच्या रस्त्याची अवस्था आणखी बिकट !रस्ता कामाला प्रत्यक्ष सुरुवात कधी होणार लोकांना प्रश्न ?

0

 

सिंदखेडराजा ( सचिन खंडारे )

सिंदखेडराजा तालुक्यातील शिंदी ते साखरखेर्डा या रस्त्याची अवस्था दिवसेंदिवस आणखी बिकट होत चालली आहे !शिंदी ते साखरखेर्डा हा महत्त्वाचा रस्ता असून साखरखेर्डा आहे मोठी बाजारपेठ आहे त्यानिमित्त मेरा खुर्द मेरा बुद्रुक चिखली बुलढाणा येथून व्यापारी वर्ग मोठ्या प्रमाणामध्ये ये .जा करत असतात ।परंतु शिंदी ते साखरखेर्डा या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून रस्त्याची अक्षरश : चाळणी झाली आहे या मार्गावरून मोठी टिप्पर सुद्धा धावत असून त्यामुळे रस्ता आणखीनच खराब झाला आहे ।शिंदी ते साखरखेर्डा हा अवघ्या दहा मिनिटाचा रस्ता आता अर्ध्या तासाचा झाला आहे ‘पालकमंत्री डॉक्टर राजेंद्रजी शिंगणे साहेब हे शिंदी येथे संत्वन भेटी करता आले असता त्यांना रस्त्याबाबत विचारले असता त्यांनी हा रस्ता चा प्रस्ताव मंजूर झाला असून लवकरच काम मार्गी लागेल असे सांगितले !लवकरच काम मार्गी लावावे अशी अपेक्षा वाहनधारकांनी व्यक्त केली असून प्रत्यक्षात कामाला केव्हा सुरुवात होईल हा प्रश्न निर्माण झाला आहे !

सिमेंट रस्त्याचे अनियोजित बांधकामामुळे रस्त्यावर धुळीचे साम्राज्य

0

 

गोंदिया-शैलेश राजनकर

देवरी ते आमगांव सिमेंट रस्त्याच्या चौपदरीकरणाचे बांधकाम सध्या स्थितीत सुरू आहे. वडेगांव गावाजवळ जुना रस्ता पूर्णता उकडून गेल्याने या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात धुळीचे प्रमाण वाढले आहे. मात्र या रस्त्यावर पाण्याची फवारणी केली जात नाही‌‌. यामुळे येणाऱ्या-जाणाऱ्या च्या नाकातोंडात दूर जात आहे. रोडालगतच्या घरातील लोकांना धुळीच्या सामना करावा लागत आहे. मात्र याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष झालेले आहे.
या रस्त्यावर मोठ्या वाहनांची रहदारी अधिक प्रमाणात आहे. यामुळे रस्त्यावर धुळीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले. दुचाकी तसेच चारचाकी वाहनांना समोरून मागून येणारे वाहन दिसत नाही. त्यामुळे एखादे मोठे अपघात घडू शकते या अपघाताला जबाबदार कोण ? असा प्रश्न नागरिकांसमोर उपस्थित होत आहे. या रस्त्यावर पाण्याची फवारणी केली जात नाही. या कारणाने रस्त्यावर धुळीचे साम्राज्य मोठ्या प्रमाणात पसरले आहे. या रस्त्यावर दिवस रात्र प्रचंड वाहतूक असते. या उखडलेल्या रस्त्यांची काळजी घेणे संबंधित विभागाचे कर्तव्य आहे. मात्र तसे दिसत नाही. याकडे लक्ष देण्याची गरज आहे‌‌. रोडा लगतच्या घरातील लोकांना या समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यांच्या श्वसनाच्या आजारात वाढ होत आहे.
वडेगांव येथे असे धुळीचे चित्र पाहायला मिळत आहे. या रस्त्याचे बांधकाम मंदगतीने सुरू असून याकडे संबंधित विभागाने जातीने लक्ष घालून मोठ्या प्रमाणात धुळी मुळे निर्माण झालेल्या समस्यांचे निराकरण होणार की नाही याकडे सर्व वडेगांव ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

तरुणांनी पंचवटी अमृततुल्य च्या माध्यमातून कुटुंब आर्थिक सक्षम करावे

0

 

आत्माराम पाटील गायकवाड
तालुका प्रतिनिधी जालना

छत्रपती युवा सेना तरुणांच्या पाठीशी

गणेश कदम
संस्थापक अध्यक्ष छत्रपती युवा सेना

औरंगाबाद, करमाड येथे तरुणांना आर्थिक सक्षम करण्यासाठी छत्रपती युवा सेनेच्या माध्यमातून पंचवटी अमृततुल्य शाखा ना नफा ना तोटा या तत्त्वावर राज्यभर देण्यात येणार असून युवकांनी आर्थिक सक्षम होण्यासाठी पुढे यावे असे आवाहन छत्रपती युवा सेना संस्थापक अध्यक्ष गणेश कदम यांनी केले ते करमाड येथे पंचवटी अमृततुल्य शाखेच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते

पंचवटी अमृततुल्य शाखेचे उद्घाटन संस्थापक अध्यक्ष गणेश कदम. यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी प्रदेश सरचिटणीस ज्ञानेश्वर भोसले. राज्य समन्वयक पुष्पाताई जगताप. मराठवाडा अध्यक्ष कृष्णा पराड. मराठवाडा कार्याध्यक्ष दादाराव गावंडे. संभाजीनगर जिल्हाप्रमुख दिगंबर पवार. शहर प्रमुख सुनील पाटील जालना जिल्हा प्रमुख संतोष भुतेकर. जालना जिल्हा कार्याध्यक्ष आत्माराम गायकवाड. जालना जिल्हा शेतकरी आघाडीचे जिल्हाप्रमुख भाऊसाहेब जाधव, उपजिल्हाप्रमुख दगडु अण्णा नाटकर. अंबड तालुकाप्रमुख राधाकिसन ढोकळे. कैलास उकरडे. पंचायत समिती सभापती औरंगाबाद सुरेश लहाने, माजी सरपंच गेवराई बाजार. मंगेश लंगडे गुत्तेदार चितेपिंपळगाव. गणेश लहाने ज्ञानेश्वर लहाने. रवी काजळे. आदी मान्यवर उपस्थित होते

पालिवाल सेवा समिती ची पहिली आमसभा संपन्न

0

 

 

 

पालिवाल सेवा समिती रजि न ई 864 बुलढाणा ची पहली आमसभा दि 20 डिसेंबर रोजी शेगाव येथील श्री परशुराम भवन येथे संपन्न झाली
आमसभा सुरू होण्या पूर्वी सर्वप्रथम मान्यवरांनी श्री गजानन महाराज व धोला चौथरा(पालिवाल समाज चा शाहिद प्रतीक फोटो) या दोनि फोटो ला सभेचे अध्यक्ष श्री मदनलाल पालिवाल वानखेड,प्रमुख अतिथी श्री लक्ष्मीनारायण पालिवाल संग्रामपूर, कोषाध्यक्ष श्री नारायण पालिवाल वानखेड, सचिव श्री तुलसीदास पालिवाल वानखेड,श्री रतनलाल पालिवाल तेल्हारा,श्री ऍड जयंत पालिवाल शेगाव, श्री भोजराज पालिवाल खामगाव, श्री बाबूलाल पालिवाल दानापूर,यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून प्रतिमेला कुंकूम लावून हार अर्पण करण्यात आले या नतर प्रमुख पाहुण्यांनी आप आपली आसने ग्रहण केली या नंतर शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला सभेचे अध्यक्ष श्री मदनलाल पालिवाल यांचा श्री शिवदयाल पालिवाल शेगाव, प्रमुख अतिथी श्री लक्ष्मीनारायण पालिवाल यांचा श्री ऍड जयंत पालिवाल शेगाव, श्री नारायण पालिवाल यांचा श्री आशिष पालिवाल,श्री तुलसीदास पालिवाल यांचा श्री राजेंश पालिवाल यांनी. केला या नंतर श्री तुलसीदास पालिवाल यांनी मागील सभेची कार्यवाही, वार्षिक विवरण, आय व्यय विवरण, अंदाजे पत्रक,चे वाचन केले,या नंतर सभेत 21 व्यक्तीची उपसमिती करण्यात आली या मध्ये पं श्री राजेश पालिवाल शेगाव,श्री आकाश पालिवाल पातुर्डा, श्री नागेश पालिवाल शेगाव, श्री मुरलीधर पालिवाल संग्रामपूर, श्री गणेश पालिवाल तेल्हारा,श्री सत्यनारायण पालिवाल कवठल,श्री रितेश पालिवाल वानखेड, श्री पुरुषोत्तम पालिवाल सगोडा,श्री ओमप्रकाश पालिवाल अकोट,श्री श्यामसुंदर पालिवाल एदलापूर,श्री भागवाणदास पालिवाल तळेगांव, श्री भोजराज पालिवाल तेल्हारा,श्री सतीश पालिवाल दानापूर,श्री गिरीश पालिवाल वानखेड याची सर्वानुमते निवड करण्यात आली तर भवन निर्मान समिती मध्ये श्री ऍड जयंत पालिवाल शेगाव, श्री अनील पालिवाल खामगाव, श्री अशोक पालिवाल खांडवी,श्री रतनलाल पालिवाल दानापूर,श्री डोंगरदास पालिवाल शेगाव,श्री भोजराज पालिवाल खामगाव, श्री ओमप्रकाश पालिवाल संग्रामपूर, श्री आकाश पालिवाल पातुर्डा, श्री लीलाधर पालिवाल सावरगाव,या नंतर उत्सव समिती मध्ये पं श्री राजेश पालिवाल, पं श्री चांम्पालाल पालिवाल,पं श्री गोपालालजी पालिवाल,पं श्री रामू पालिवाल, पं श्री आशुतोष पालिवाल यांची निवड करण्यात आली तर महिला समिती सौ पुष्पा पालिवाल, सौ चद्रकला पालिवाल, सौ नीता पालिवाल, सौ रेखा पालिवाल, सौ मालती पालिवाल, सौ हर्षा पालिवाल यांची निवड करण्यात आली या नंतर श्री मदनलाल पालिवाल व श्री प्रकाश पालिवाल यांनी आप आपली मते मांडली या नतर भवन निर्मिती व विधायक कार्यसाठी निधी देणाऱ्याचा समिती च्या अध्यक्ष व अतिथी कडून पुष्प गुच्छ देऊन सत्कार करम्यात आला या सभेचे चे प्रास्ताविक श्री डी एन पालिवाल व श्री तुलसीदास पालिवाल यांनी केले तर अनुमोदन म्हणून श्री पवन पालिवाल व आभार प्रदर्शन श्री राजेश पालिवाल यांनी केले सभेला यशस्वी करण्या करिता सर्व समाज बांधवांनी सहभाग घेतला