Home Blog Page 561

अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी तुफान गर्दी साखरखेर्डा ग्राम पचांयत साठी तब्बल65 जणांचे उमेदवारी अर्ज दाखल । तालुक्यातून एकुन 992उमेदवाराचे अर्ज दाखल

0

 

सिंदखेडराजा ( सचिन खंडारे )

सिंदखेड राजा तालुक्यातील ४३ ग्रामपंचायत साठी सिंदखेडराजा तालुक्यातून एकूण 992 उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले असून यामध्ये सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या साखरखेर्डा या गावातून एकूण 65 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केली आहे ‘यामध्ये34 महिलांचे अर्ज दाखल झाली आहे उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी 30 डिसेंबर रोजी सिनखेडराजा मध्ये तुफान गर्दी बघायला मिळाली ‘यामध्ये पालक मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांचे मूळ गाव असलेल्या शेंदुर्जन गावांमध्ये एकूण 39 उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केली आहे ‘आंबेवाडी ‘कंडारी ‘भंडारी ‘ या गावामध्ये ‘निवडणूक ह्या बिनविरोध होण्याच्या मार्गावर असून या गावांमध्ये प्रत्येकी सात सात जणांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केली आहे ‘या पाठोपाठ दुसर बीड ग्रामपंचायत साठी एकूण 76 जणांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केली आहे .अनेक उमेदवार कागदपत्रे अभावी आपला उमेदवारी अर्ज दाखल करू शकले नाही ‘तर काही उमेदवार हे शिक्षण घेतलेले नसल्यामुळे ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करु शकले नाही ‘शेवटच्या दिवशी मुद्रांक विक्रेते । टंक लेखन या ठिकाणी प्रमुख्याने गर्दी जाणवली ,यामध्ये अनेकांनी दुकानदारांनी अव्वाच्या सव्वा पैसे उकळून आपले हात धुऊन घेतली आहे ।शेवटी सर्वांना 4जानेवारी याची उत्सुकता लागली असून आता किती उमेदवारी आपली अर्ज माघार घेतील याकडे लक्ष लागून राहिले आहे ‘

डॉ . ज्योत्स्ना जमधाडे पालकमंत्र्यांच्या हस्ते ‘ कोविड योद्धा ‘ ने सन्मानित ‘

0

 

सिंदखेड राजा (सचिन खंडारे )

साखरखेर्डा येथील सून व सध्या देऊळगाव राजा येथे ग्रामीण रुग्णालयामध्ये विभागांमध्ये कार्यरत असलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर ज्योस्त्ना जमधाडे यांना20 डिसेंबर रोजी देऊळगाव राजा येथे आयोजित कार्यक्रमांमध्ये बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांच्या हस्ते20 डिसेंबर रोजी कोविड योद्धा प्रमाणपत्र देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले ।गेल्या मार्च महिन्यापासून संपूर्ण जगामध्ये कोरोनाने थैमान घातले आहे परंतु या परिस्थिती सुद्धा त्यांनी देऊळगावराजा शहरामध्येअनेक भागांमध्ये होता कुठल्याही प्रकारची सुट्टी न घेता कोरोना च्या काळात लोकांची सेवा केली लोकांवर उपचार केले ‘याच कार्याची पावती म्हणून त्यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते कोविड योध्दा ने सन्मानित करण्यात आले ‘यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अँड नाझेर काझी ‘गजानन पवार ‘दिलीप कुमार झोटे ‘ देऊळगाव राजा पंचायत समिती सभापती रेणुका बुरकुल ‘ तुकाराम खांडेभराड – संतोष खांडेभराड ‘ राजीव क्षिरसागर आदी उपस्थित होते .

तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीला पळविले

0

गजानन सोनटक्के जळगाव जा

जळगाव जामोद येथील येथील रहिवासी विलास प्रकाश काळे यांनी जळगाव जामोद पोलीसस्टेशनला 31 डिसेंबर रोजी तक्रार दिली की जळगाव जामोद येथील वाडी येथील रहिवासी मोहन भाऊराव तायडे यांनी माझ्या 13 वर्षीय मुलीला माझ्या रखवालीतून फूस लावून पळविले या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन वाकडे करीत आहे करीत आहेत

सुनगाव ग्रामपंचायत साठी उमेदवारांनी केली हाफ सेंचुरी(50) पूर्ण

0

 

गजानन सोनटक्के जळगाव जा

जामोद तालुक्यातील सूनगाव ग्रामपंचायत17 सदस्य असणारी ग्रामपंचायत आहे 15 जानेवारी रोजी होऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये सुनगाव ग्रामपंचायत निवडणुकीसाठी एकूण सहा वॉर्डसाठी येथील पन्नास उमेदवारांनी अर्ज दाखल केलेले होते व आज त्यांची छाननी करून 50 चे 50 हीअर्ज निवडणूक अधिकाऱ्यांनी पात्र केलेले आहेत व येत्या चार तारखेला या उमेदवारांमधून किती उमेदवार अर्ज मागे घेतात व किती उमेदवार 15 जानेवारी रोजी होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी रिंगणात असणार याचे चित्र स्पष्ट होणार आहे रिंगणात असलेल्या उमेदवारांना 4 जानेवारी रोजी चिन्ह वाटप होणार आहे

अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांसाठी तात्काळ बस सेवा सुरू करा.

0

 

आज युवा नेते तथा अमरावती जिल्हा अध्यक्ष कुणाल भाऊ यांचा वतीने विभागीय नियंत्रक म.रा.परिवहन मंडळ अमरावती यांना निवेदन देण्यात आले.

कोरोना लॉकडाउन मोठ्या कालावधीनंतर शासकीय नियमांचे पालन करत राज्य शासनाने शाळा सुरू करण्याची परवानगी दिली आहे. या अनुषंगाने खेड्या-पाड्यातील विद्यार्थ्यांची तालुक्याच्या व जिल्ह्याच्या ठिकाणी शाळेत येण्यास सुरुवात झाली आहे. मात्र ग्रामीण भागातील बस सेवा सुरु नसल्याने विद्यार्थ्यांना खुप मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.ग्रामीण भागातील बस सेवा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे. विद्यार्थ्यांना खाजगी वाहनाने प्रवास करावा लागत आहे. खाजगी वाहनधारक विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात पिळवणूक करत आहेत. त्यामुळे आपण लवकरात लवकर अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण भागातील बस सेवा सुरु कराव्यात अशी मागणी कुणाल भाऊ ढेपे यांनी केली

पारंपारिक पद्धतीने अर्ज दाखल करत उमेदवारांत समाधानाचे वातावरण

0

 

सचिन पगारे
नांदगाव (नाशिक)

नांदगांव तालुक्यातील ५९ ग्रामपंचायतींच्या सार्वजनिक निवडणुकीसाठी दि. २३ डिसेंबर पासून इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल करण्यास सुरुवात केली परंतु आॅनलाईन अर्ज दाखल करताना उमेदवारांना येणाऱ्या तांत्रिक अडचणी लक्षात घेऊन आयोगाने अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे दि. ३० डिसेंबर रोजी आॅफलाईन पध्दतीने उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांना संधी दिली. यामुळे काही उमेदवारांनी आॅनलाईन तर काही उमेदवारांंनी आॅफलाइन अर्ज दाखल करुन संधीचे सोने करत आपला उमेदवारी अर्ज सादर केला. तहसील आवारात बहुसंख्य उमेदवार आपला अर्ज दाखल करण्यासाठी उपस्थित होते. नांदगांव तहसील इमारतीत निवडणूक आयोगाने ही प्रक्रिया सूत्रबद्धपणे पार पाडली. यासाठी निवडणूक विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच पोलिस प्रशासनाने विशेष भूमिका बजावली.

अनुसूचित जाती, ओ बी सी प्रवर्ग,अनुसूचित जमाती व सर्वसाधारण (ओपन) यांसाठी चार वेगवेगळ्या रंगाच्या मतपत्रिका

0

 

गजानन सोनटक्के जळगाव जा

ग्रामीण मिनी मंत्रालय अशी ओळख असलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला अनेक रंग असतात, ढंग असतात. यात मतदानात वापरण्यात येणार्‍या रंगबेरंगी मतपत्रिकांचीही भर पडली आहे! येत्या 15 जानेवारीला होऊ घातलेल्या 527 ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदानात 4 रंगांच्या पत्रिकांचा वापर करण्यात येणार आहे.

विधान परिषद वगळता बहुतेक निवडणुकांत इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनचा वापर सामान्य बाब ठरली आहे. याला ग्राम पंचायतच्या लढती देखील अपवाद नाहीत. शहरी मतदारांच्या तुलनेत ग्रामीण मतदार उत्साहाने मतदान करतात. कार्यकारी सोसायटी, बाजार समित्यांसारख्या लढतीत पॅनल टू पॅनल किंवा सहजपणे दोन्ही पॅनलमधील उमेदवारांना योग्यतेनुसार मतदान करतात. याउप्परही त्यांच्या सुविधांसाठी खास निर्णय घेण्यात आला आहे. आताच्या ग्रामपंचायत निवडणुकीत त्यांना महिला उमेदवार किंवा विविध प्रवर्गातील उमेदवार सहज ओळखता यावा यासाठी 4 रंगांच्या मतपत्रिकांचा वापर करण्यात येणार आहे.

आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार अनुसूचित जातींच्या जागेसाठी फिक्या गुलाबी रंगाची, अनुसूचित जमातीच्या जागेसाठी फिक्या हिरव्या रंगाची, ओबीसी प्रवर्गाच्या जागेसाठी फिक्या पिवळ्या रंगाची तर सर्वसाधारण (ओपन) जागेसाठी पांढर्‍या रंगांची मतपत्रिका वापरण्यात येणार आहे. ही पत्रिका मतदान यंत्रावर चिटकविण्यात येते. मतदान यंत्रांची तपासणी झाल्यावर कार्यकर्त्यांच्या हजेरीत ही प्रक्रिया पार पाडली जाते. यामुळे यंदाची निवडणूक ही प्रचारात व मतदानात रंगीबेरंगी ठरणार आहे.

यावल तालुक्यातील ४७ ग्राम पंचायतीच्या सार्वत्रीक निवडणुकीसाठी चौथ्या दिवसी४०३ उमेदवारी अर्ज दाखल

0

 

 

यावल ( प्रतिनिधी ) तालुक्यातील ग्राम पंचायत च्या सार्वत्रिक निवडणुकीला वेग आले असुन उमेदवारांचे नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या चौथ्या दिवसी४०३ उमेदवारांनी आपली उमेदवारी दाखल केली आहे . यावल तालुक्यातील ४७ ग्रामपंचायतीचा सार्वत्रीक निवडणुक कार्यक्रम जाहीर झाला असुन दिनांक १५ जानेवारी २०२१ रोजी यासाठी १ लाख४० हजाराहुन अधिक मतदार हे ४६९ नवनिंवाचित उमेदवारांना निवडुन देण्यासाठी आपल्या मतदानाचा हक्क बजावतील याकरीता यावल येथील तहसील कार्यालयात आज सकाळ पासुनच आपले उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आलेल्या ग्रामस्थांच्या गर्दीमुळे यावल तहसीलची जुने कार्यालयापासुन नवीन प्रशासकीय इमारतीवरील मार्गाला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते . दरम्यान आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा चौथ्या दिवसी किनगाव ग्राम पंचायत साठी २३ जणांनी आपले उमेदवारी अर्ज अट्रावल ग्रामपंचायती करिता२o अर्ज , हिंगोणे ग्रामपंचायतीसाठी २१ अर्ज , मोहराळे करीता २२ अर्ज , भालोद करीता २० उमेदवारी अर्ज , डोंगर कठोरा ग्रामपंचायतीसाठी २१ अर्ज , कोरपावली साठी १८ उमेदवारी अर्ज , महेलखेडी ग्रामपंचायतसाठी १५ अर्ज , सावखेडा सिम ग्रामपंचायत साठी १४ अर्ज आणी शिरसाड १४ उमेदवारी अर्ज दाखल झाले असुन , या ग्रामपंचायतीसाठी सर्वाधिक उमेदवारी अर्ज दाखल झाले असुन , दरम्यान बोरावल ग्राम पंचायतीसह भालशिव ग्राम पंचायत वढोदे प्र . यावल , वढोदे प्रगणे सावदा , आडगाव आणी चिंचोली या६ गावातुन एकही उमेदवारी अर्ज दाखल झालेले नाहीत उद्या दिनांक ३० डिसेंबर हे उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे शेवटचे दिवस असुन , दिनांक ३१ डिसेंबर रोजी छाननी व दिनांक ४ जानेवारी २०२१ ला उमेदवारांचे अर्ज माघार व चिन्ह वाटप होणार आहे .

शिवसेना खासदार भावना गवळी यांच्यासह 9 जणाविरुद्ध गुन्हा दाखल

0

 

(सूर्या मराठी न्यूज ब्यूरो)

यवतमाळ – यवतमाळ येथे आज विमा कंपनीच्या व्यवस्थापकाला मारहाण केल्याप्रकरणी शिवसेनेच्या खासदार भावना गवळी, माजी आमदार बाळासाहेब मुनगीनवार, विधानसभा प्रमुख संतोष ढवळे, महेश पवार यांच्यासह 9 जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बेमोसमी पावसामुळे यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. मात्र, विमा कंपनीने अत्यल्प भरपाई दिली. लाखो शेतकरी मदतीपासून वंचित राहिले. त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी यासाठी शिवसेना खासदार भावना गवळी यांसह शिवसैनिकांनी स्टेट बॅंक चौकातील इफको टोकियो पीकविमा कंपनीवर मोर्चा काढला होता.

उर्वरित शेतकऱ्यांना मिळणाऱ्या विम्याविषयी बातचीत करताना मॅनेजरने समाधानकारक उत्तर दिले नाही.
त्याचा राग आल्याने संतप्त झालेल्या संतोष ढवळे यांनी अतिवृष्टीमुळे खराब झालेले सोयाबीन कंपनीचे व्यवस्थापक सचिन सुरोशे यांच्या अंगावर फेकून त्यांना मारहाण केली. भावना गवळी यांच्यासमोरच हा प्रकार घडल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली.

त्याच प्रकरणावरून भावना गवळी यांच्यासह नऊ जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गैरकायद्याची मंडळी जमवणे, अंगावर जाणे, मारहाण करणे असे आरोप करण्यात आले आहेत. या मारहार मधे 9 जना विरुद्ध गुन्हा दाखल कण्यात आले आहे

कोविड लसीकरणासाठी यंत्रणांनी सज्ज रहावे – जिल्हाधिकारी कोरोना लसीकरण तयारीसाठी जिल्हास्तरीय बैठक

0

 

सर्व खाजगी डॉक्टर, स्टाफ यांची नोंदणीक करावी
निवडणूकीच्या धर्तीवर

अजहर शाह मोताळा प्रतिनिधी

राहणार लसीकरण कार्यक्रम
बुलडाणा दि.29 : कोविड या साथरोगाच्या नियंत्रणासाठी लवकरच लसीकरण देशात सुरू होणार आहे. याबाबत राष्ट्रीय व राज्य पातळीवर नियमित तयारीचा आढावा घेण्यात येत आहे. ही आतापर्यंतची सर्वात मोठी लसीकरण मोहीम राहणार आहे. तरी या लसीकरणासाठी यंत्रणांनी सज्ज रहावे, अशा सूचना प्रभारी जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे यांनी आज दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात कोविड लसीकरणाबाबत जिल्हास्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर जागतिक आरोग्य संघटनेचे प्रतिनिधी डॉ. सय्यद मुजील, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ नितीन तडस, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश लोखंडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कांबळे, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. बनसोडे, निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते आदी उपस्थित होते.
या बैठकीत जागतिक आरोग्य संघटनेचे प्रतिनिधी डॉ. सय्यद यांनी सादरीकरण केले. सादरीकरणावेळी ते म्हणाले, लसीकरण टप्पेनिहाय करण्यात येणार आहे. सर्वात प्रथम हेल्थ वर्करमध्ये डॉक्टर, नर्सेस, सर्व खाजगी डॉक्टर्स, त्यांचा स्टाफ, दुसऱ्या टप्प्यात फ्रंट लाईन वर्कर यामध्ये कोविड कालावधीत काम केलेले पोलीस अधिकारी – कर्मचारी, महसूल यंत्रणेतील अधिकारी व कर्मचारी, नगर पालिका, स्थानिक स्वराज्य संस्था व अन्य विभागातील अधिकारी व कर्मचारी, तिसऱ्या टप्प्यात 50 वर्षावरील सर्व लोक, त्यानंतर चौथ्या टप्प्यात 50 वर्षाच्या आतील दुर्धर आजार असलेले नागरिक यांना लस देण्यात येणार आहे. मात्र लसीकरणासाठी को विन ॲपवर नोंदणी आवश्यक आहे. सर्व खाजगी डॉक्टर, नर्सेस त्यांचा स्टाफ, यंत्रणेतील हेल्थ वर्कर, पोलीस, एएनएम, आशा वर्कर, अंगणवाडी कार्यकर्ता यांची नोंदणी करावी. नोंदणीसाठी महसूल यंत्रणेने पुढाकार घ्यावा. आपआपल्या तालुक्यातील सर्व खाजगी डॉक्टरची नोंदणी होईल, याची काळजी घ्यावी.
तसेच लसीकरण स्थळ हे तीन भागात असावे. यामध्ये पहिल्या भागात प्रतीक्षा खोली, दुसऱ्या भागात प्रत्यक्ष लसीकरण खोली, तर तिसऱ्या भागात निरीक्षण खोली असणार आहे. निरीक्षण खोलीमध्ये 30 मिनीटापर्यंत लसीकरण केलेल्या व्यकतीला ठेवण्यात येणार आहे. नोंदणी केलेल्या व्यक्तीच्या मोबाईलवर तारिख, स्थळ व वेळेचा एसएमएस पाठविण्यात येणार आहे. एसएमएस दाखविल्यानंतर लसीकरण बुथमध्ये प्रवेश देण्यात येणार आहे. याठिकाणी ओळखपत्र तपासण्यात आल्यानंतर लसीकरणासाठी एकावेळी एकाच व्यक्तीला पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर दुसऱ्या डोससाठी एसएमस पाठविण्यात येणार आहे. लसीकरणानंतर एसएमएसमध्ये एक लिंक येणार असून त्यामधून प्रमाणपत्र जनरेट होणार आहे. प्रत्येक लसीकरण स्थळ लसीकरणापूर्वी व लसीकरणानंतर सॅनीटाईज करण्यात येणार आहे. लसीकरण स्थळ हे समाज मंदीर, शाळा, मंगल कार्यालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रूग्णालय, एखादी खाजगी जागा असणार आहे. याबाबत जिल्हा प्रशासनाने निर्णय घ्यावा. लस ही इंजेक्टीबल असून डिस्पोजेबल सिरींजची असणार आहे. ही सिरींज एकावेळी एकाच व्यक्तीला देण्यात येणार आहे. तसेच लसीकरण स्थळामध्ये कोविड संसर्ग सुरक्षा नियमांचे पालन करण्यात येणार आहे. सोशल डिस्टसिंगचे कडक पालन करण्यासाठी त्यापद्धतीने बैठक व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच लसीकरणानंतर वेस्ट मॅनेजमेंटचीही व्यवस्था असणार आहे. बैठकीला उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी , वैद्यकीय अधिक्षक, संबंधीत यंत्रणांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.