Home Blog Page 561

शहीद जवान प्रदीप मांदळे यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार साश्रु नयनांनी दिला निरोप

0

 

अजहर शाह मोताळा प्रतिनिधी

बुलडाणा:-दि. 20 : जम्मू काश्मिर मधील द्रास भागात लाईन ऑफ मेटेनन्सचे करीत असताना हिम वादळामुळे हिमकडा अंगावर कोसळून जिल्ह्यातील पळसखेडा चक्का ता. सिं. राजा येथील जवान प्रदीप साहेबराव मांदळे 15 डिसेंबर रोजी शहीद झाले होते. त्यांचे पार्थिव लेह, दिल्ली, मुंबई हवाई मार्गे औरंगाबाद येथे काल 19 डिसेंबर रोजी सायंकाळी आणण्यात आले. औरंगाबाद येथे विमानतळावर लष्कराकडून त्यांना मानवंदना देण्यात आली. त्यानंतर आज सकाळी औरंगाबाद येथून रस्ता मार्गे पळसखेड चक्का ता. सिं. राजा येथे त्यांच्या मूळ गावी आणण्यात आले. शहीद जवान प्रदीप मांदळे यांच्या पार्थिवावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहली.
याप्रसंगी लष्कर, पोलीस यांनी बंदुकीच्या फैरी झाडून शहीद जवान प्रदीप मांडळे यांना मानवंदना दिली. मानवंदनेसाठी 100 आजी – माजी सैनिक उपस्थित होते. काही वेळासाठी पार्थिव शहीद जवान यांच्या घरी अंत्यदर्शनसाठी ठेवण्यात आले. त्यानंतर अंत्ययात्रेला घरापासून सुरूवात करण्यात आली. संपूर्ण गावात रस्त्या रस्त्यावर रांगोळी काढण्यात आल्या, तर मोठ्या प्रमाणावर शहीद जवानच्या श्रद्धांजलीचे बॅनर्स लावण्यात आले. यावेळी संपूर्ण गावात भावनिक वातारवण होते. शहीद जवान प्रदीप मांदळे अमर रहे.. च्या निनादात अंत्ययात्रा गावातून काढण्यात आली. अंत्यसंस्कारवेळी पंचक्रोशीतील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या भावपूर्ण वातावरणात भारत मातेच्या वीर सपुताला सर्वांनी साश्रु नयनांनी शेवटचा निरोप देण्यात आला. प्रदीप मांदळे भारतीय लष्कारात 10 महार रेजींमेंटमध्ये कार्यरत होते. त्यांचा जन्म 1 जुलै 1989 रोजी पळसखेड चक्का येथे झाला. औरंगाबाद येथे सैन्यामध्ये शहीद जवान प्रदीप भरती झाले. त्यानंतर 27 ऑक्टोंबर 2009 ला महार रेजीमेंट सागर मध्यप्रदेश येथे एका वर्षाचे प्रशिक्षण पूर्ण करून 10 महार रेजीमेंट (सिग्नल प्लाटून) मध्ये त्यांची नियुक्ती करण्यात आली. जवळपास महार रेजीमेंट मध्ये त्यांची 10 वर्ष 2 महिने सेवा झाली आहे.
त्यांच्या पश्चात आई, पत्नी, पाच वर्षाचा मुलगा जयदीप व अडीच वर्षाचा मुलगा सार्थक, दोन भाऊ असा आपत्‍ परीवार आहे. पार्थिवावर भारतीय लष्कारातील उच्च पदस्थ अधिकारी, माजी आमदार डॉ शशिकांत खेडेकर, माजी आमदार राहुल बोंद्रे, जिल्हाधिकारी एस रामामूर्ती, जिल्हा पोलीस अधिक्षक अरविंद चावरीया, वस्त्रोद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष रविकांत तुपकर, उपविभागीय अधिकारी सुभाष दळवी, तहसिलदार सुनील सावंत, माजी सैनिक कल्याण अधिकारी श्रीमती फिरदौस, नगराध्यक्ष सतिष तायडे,माधवराव जाधव, ॲड नाझेर काझी आदींनी पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली वाहली. अत्यंत शोकाकूल वातावरणात शहीद जवान प्रदीप मांदळे यांना त्यांच्या मुलाने मुखाग्नी दिला. यावेळी वातावरण धीरगंभीर झाले होते.
**************

बुलडाणा शहरात मोफत एकदिवसीय उद्योग कार्यशाळा संपन्न….

0

 

सिदखेडराजा ( सचिन खंडारे )”

बुलडाणा शहरात मोफत एकदिवसीय उद्योग कार्यशाळा संपन्न झाली.आज दिनांक 20 डिसेंबर रोजी राजश्री मल्टीपर्पज फाउंडेशन द्वारा या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.यामध्ये जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यातील नवउद्योजकाना स्थानिक युनियन बँकेचे ब्रांच मॅनेजर श्री.विनोद मगरे यांच्या हस्ते सहभागी प्रमाणपत्र देण्यात आले.या दरम्यान शासनाच्या उद्योगा संबंधी असणाऱ्या विविध योजना,सरकारी औद्योगिक धोरण, भविष्यातील उद्योग संधी आदी बाबत मोफत मार्गदर्शन करण्यात आले.यासाठी मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र बुलडाणा चे प्रा.अविनाश खिल्लारे आणि प्रा.उमेश खरडे उपस्थित होते.

साखरखेर्डा येथे रक्तदान शिबिर संपन्न !

0

 

सिदखेडराजा । ( सचिन खंडारे )

सिंदखेड राजा तालुक्यातील साखरखेर्डा येथे आज दिनांक 20 डिसेंबर रोजी सकाळी 12 वाजता .पलसिद्ध संस्थानच्या सभागृहांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते ।यावेळी पन्नास जणांनी रक्तदान केले ।महाराष्ट्र शासनाने तसेच पालकमंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी केलेल्या आव्हानाला प्रतिसाद देत अनेक युवकांनी रक्तदान केले ‘यावेळी पालकमंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी रक्तदात्याची भेट घेतली ‘यावेळी त्यांच्या सोबत जिप सदस्य रामभाऊ जाधव ‘माजी सभापती दिनकर बापू देशमुख ‘माझी पंचायत समिती सभापती राजू ठोके पत्रकार सय्यद रफिक ‘दाऊद सेठ कुरेशी माजी सरपंच कमलाकर गवई इब्राहीम शहा ‘जमुना प्रसाद तिवारी अमित जाधव ‘प्रवीण पासडे .रामदास सिंग राजपूत ‘प्रवीण ठोसरे ‘प्रमोद तुपकर अनिल तुपकर ‘आदी कार्यकर्ते यावेळी हजर होते !

मातृतीर्थ सिंदखेडराजा तालुक्यातील वीरपुत्र नायक प्रदीप मांदळे यांना हजारो लोकांच्या उपस्थितीत अखेरचा निरोप !चिमुकल्या जयदीप ने दिला पित्याच्या चितेला अग्नी !शहीद प्रदिप मांदळे अमर रहे’च्या घोषणेने परिसर दणाणला !अंत्यविधीला तरुणांची उपस्थिती लक्षणीय

0

 

सिंदखेड राजा (सचिन खंडारे )

मातृतीर्थ सिंदखेडराजा तालुक्यातील पळसखेड चक्का या गावचे वीर पुत्र शहीद नायक प्रदीप मांदळेयांचे 15 डिसेंबर रोजी जम्मू काश्मीर येथील द्रास टायगर हिल मध्ये अंगावरती बर्फाची लादी पडल्यामुळे ड्युटीवर असताना प्रदीप मांदळे हे शहीद झाले होते !त्या ठिकाणी हवामान खराब असल्यामुळे शहीद प्रदीप मांदळे यांचे पार्थिव मूळगावी येण्याकरता विलंब झाला होता !परंतु आज 20 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता त्यांच्यावर त्यांच्या मूळगावी पळसखेड चक्का येथे हजारो लोकांच्या उपस्थितीमध्ये अंतिम संस्कार करण्यात आले शहीद प्रदीप मांदळे यांचे पार्थिव आज सकाळी दहा वाजता त्यांचे मूळ गावी पळसखेड चक्का येथे आणण्यात आले होते फुलांनी सजलेल्या ट्रॅक्टर मधून त्यांचे पार्थिव अंत्यविधीच्या कार्यक्रमापर्यंत नेण्यात आले!मन हेलावून टाकणाऱ्या या घटनेमुळे उपस्थित असणाऱ्या सर्व लोकांच्या डोळ्यांमध्ये अश्रू तरले होते ‘शहीद प्रदिप मांदळे अमर रहे’ ‘भारत माता की जय ‘या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता या अंत्यविधीच्या ठिकाणी ठिकाणी दुरून मोठ्या प्रमाणामध्ये तरुण आले होते ।यावेळी तरुणांची संख्या लक्षणीय होती ! शहीद नायक प्रदीप मांदळे यांचे संपूर्ण कुटुंब व त्यांची देशाप्रती असलेली भावना आजही कायम आहे शहीद नायक प्रदीप मांदळे यांचा मोठा भाऊ हा कृषी सहाय्यक असून त्यांचा दुसरा भाऊ विशाल साहेबराव मांदळे हा सुद्धा सध्या सैन्यदलामध्ये कार्यरत आहे । ‘यावेळी शहीद प्रदीप मांदळे यांचे तीन मुले चिरंजीव ‘सार्थक ‘ जयदीप ‘ वीरपत्नी कांचन प्रदीप मांदळे ‘आई शिवनंदा साहेबराव मांदळे वडील साहेबराव मांदळे ।सासू-सासरे यावेळी सर्व नातेवाईक उपस्थित होते ‘यावेळी भारतीय सैन्य दलातील जवान ‘बुलढाणा पोलीस यांच्या वतीने हवेत तीन गोळ्यांच्या फैरी झाडून मानवंदना देण्यात आली ‘यावेळी वीरपत्नी कांचन मांदळे ‘त्यांच्या आई सुनंदा मांदळे पालकमंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे .जिल्हाधिकारी एस. राममूर्ती ‘जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया ‘लेफ्टनंट कर्नल मनीष तिवारी ‘उपविभागीय अधिकारी सुभाष दळवी ‘तहसीलदार सुनील सावंत ‘खासदार प्रतिनिधी माधवराव जाधव ‘माजी आमदार डॉक्टर शशिकांत खेडेकर ‘स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर ‘राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष एडवोकेट नाझेर काझी ‘जि . प . सदस्य मनोज कायंदे वंचितच्या सविताताई मुंडे ‘राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शिवाजी राजे जाधव ‘भाजपचे नेते विनोद वाघ ‘डॉक्टर सुनील कांयंदे ‘एस. डी .पी .ओ . सुनील सोनवणे ‘ बिडिओ .श्री कांबळे .जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी भास्करराव पडघान ।पळसखेड चक्का येथील ग्रामसेवक ‘भास्कर घुगे ‘यांच्यासह सिंदखेड राजा देऊळगाव राजा जालना येथील माजी सैनिक संघटनेच्या वतीने पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली !
यानंतर परमपूज्य भन्ते यांनी धम्माच्या रितीरिवाजानुसार त्रिसरण पंचशील ग्रहण करण्यात आली
यावेळी शहीद नायक प्रदीप मांदळे यांचा पाच वर्षे चा मुलगा जयदीप याने पित्याच्या चितेला अग्नी दिली आणि हा प्रसंग मन हेलावून टाकणारा प्रसंग होता !तीन लहान मुले पत्नी व आई या सर्वांना सोडून मातृतिर्थ सिंदखेड राजा तालुक्यातील पळसखेड चक्का येथील वीर पुत्र शहीद नायक प्रदीप मांदळे हे अनंतात विलीन झाले यावेळी

वीरपत्नी कांचन प्रदीप मांदळे

 

समता सैनिक दल ‘ लक्ष्य अकडमी ‘राजे छत्रपती शिवाजी महाराजांचे अकॅडमी ‘व इतर भरती पूर्व प्रशिक्षण चालवणार्‍या संस्थेचे सर्व विद्यार्थी यावेळी उपस्थित होते !यावेळी सर्व वृत्तवाहिन्यांचे प्रिंट मीडियाचे पत्रकार देखील उपस्थित होते !

घरफोड्या करणार्‍या चोरांना तात्काळ पकडा : तिरोडा तालुका पत्रकार संघाचे पोलीस निरीक्षकांना निवेदन

0

 

गोंदिया-शैलेश राजनकर

तिरोडा, दि.20 : शहरात चोर्‍या व घरफोड्यांचे प्रमाण वाढत आहे. 7 ते 15 दिवसांच्या दरम्यान चोर्‍या-घरफोड्या होत आहेत. त्यामुळे नागरिकांना सुरक्षाविषयक चिंता भेळसावत आहे. पोलीस प्रशासनाने आपली तपासचक्रे गतीने फिरवून रात्रीदरम्यान कुलूप तोडून घरफोडी करणार्‍या चोरांच्या टोळीला तात्काळ पकडावे व नागरिकांना भीतीमुक्त करावे, अशा मागणीचे निवेदन तिरोडा तालुका नोंदणीकृत पत्रकार संघाने पोलीस निरीक्षक योगेश पारधी यांना दि. 19 डिसेंबर रोजी दिले आहे.
निवेदनानुसार, पत्रकार संघाचे सदस्य देवानंद शिवचरण शहारे रा. सैनिक कॉलनी, नेहरू वॉर्ड, तिरोडा यांच्या येथे 22 ते 23 नोव्हेंबर 2020 दरम्यान अज्ञात चोरांनी घरफोडी करून लाखो रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व रोख रकमेवर हात साफ केले. या प्रकरणाला आता जवळपास महिनाभराचा कालावधी होत असून चोरटे अद्याप मोकळे आहेत. पोलिसांनी तपासकार्यात गती आणून चोरांना अटक करावे. तसेच पोलीस ठाण्यात मागील काही घरफोड्यांचे तपासकार्य सुद्धा ‘जैसे थे’ स्थितीमध्ये आहे. चोरांना अद्याप पकडण्यात न आल्याने तथा चोरांची टोळी मोकाट असल्यामुळे शहरात दहशतीचे वातावरण आहे.

देवानंद शहारे यांच्या घरी झालेली घरफोडी व इतर घरफोड्यांचा तपास तात्काळ लावण्यात यावा तथा नागरिकांना भीतीमुक्त जीवन जगण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून यथायोग्य सहकार्य व्हावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

यावेळी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष हुपराज जमईवर, उपाध्यक्ष राधेश्याम नागपुरे, सचिव विजय खोब्रागडे, लक्ष्मीनारायण दुबे, नितिन आगाशे, मुकेश अग्रवाल, मुरलीदास गोंडाणे, सुरेन्द्र भांडारकर, स्वप्नील शहारे, नीलकंठ साकुरे, कमल कापसे, अतित डोंगरे, मनोहर नंदनवार, पंकज देहलीवाल, हितेंद्र जांभूळकर, हितेशकुमार रहांगडाले, सचिन ढबाले, अमरदीप बडगे, डॉ.संजय जगणे, मनीष नंदरधने, राजू चामट, अजय नंदागवळी, नरेशकुमार असाटी, प्रदीप शहारे आदि उपस्थित होते.

8 दारू अड्ड्यांवर धाड घालून 9.52 लाख

0

 

गोंदिया-शैलेश राजनकर

दि. 20शहरातील अवैध व्यवसायांवर आळा बसावा या उद्देशाने अवैध दारू अड्ड्यांवर धाड घालण्याचे सत्र तिरोडा पोलिसांनी सुरू केले आहे. शहरातील संत रविदास वॉर्डातील 8 अवैध दारू अड्ड्यांवर धाड घालून तब्बल 9 लाख 52 हजार 450 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई आज शनिवारी, 19 डिसेंबर रोजी करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील संत रविदास वॉर्ड येथे काही लोक अवैध दारू बाळगून, दारू गाळण्यासाठी सडवा रसायन भिजत घातलेला असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्या माहितीवरुन पोलिसांनी सकाळी 10 वाजताच्या सुमारास पोलिसांचे वेगवेगळे 8 पथक तयार केले व त्यानंतर 8 दारू अड्ड्यांवर धाड घातली. या कारवाईत मोहफुलापासून दारू गाळण्याच्या दोन भट्ट्या व साहित्य असा एकूण 9 लाख 52 हजार 450 रूपयांचा मुद्देमाल जप्त करून घटनास्थळी नष्ट केला. यात 2 हजार 450 रुपयांचे साहित्य, 10 हजार रुपये किमतीची मोहफुलांची 100 लिटर दारू, 1175 प्लास्टीक पोतींमध्ये प्रत्येकी 10 किलो याप्रमाणे 9 लाख 40 हजार रुपये किमतीचा 11 हजार 750 किलो दारू गाळण्याकरिता भिजत घातलेला रसायनयुक्त सडवा मोहफूल यांचा समावेश आहे.
आरोपींमध्ये मिलन कुवरदास , मनिषा धीरज बरियेकर, वनमाला भीमराव झाडे, कविता सेवकराम तांडेकर, माया शामराव झाडे, सूरज प्रकाश बरियेकर, रूपवंता ईश्वर बरियेकर, आशा राजेंद्र भोंडेकर सर्व रा. संत रविदास वॉर्ड तिरोडा यांचा समावेश आहे. या सर्व आरोपींवर दारूबंदी कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
कारवाई करणारे पथक
ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन यादव यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक योगेश पारधी, सहायक पोलीस निरीक्षक हनुवते, पोलीस उपनिरीक्षक अशोक केंद्रे, पोलीस हवालदार दामले, साठवणे, पोलीस नायक थेर, सव्वालाखे, बरवैया, बर्वे, श्रीरामे, बांते, मडावी, पोलीस शिपाई बिसेन, अंबादे, भांडारकर, लोंढे, महिला पोलीस नायक मडावी, तिरीले यांनी केली.

व्हॉट्सॲप पेमेंट्स आता उपलब्ध : UPI मार्फत व्हॉट्सॲपवरूनच पाठवा पैसे!

0

 

प्रथम ज्याला पैसे पाठवायचे आहेत त्याच्या चॅटवर जा.
आता आपण नेहमी फोटो पाठवत असताना जे अटॅच बटन (📎) टच करतो त्यावर स्पर्श करा.
आता तुम्हाला कॅमेरा, गॅलरी, ऑडिओ, डॉक्युमेंट, लोकेशन, कॉनटॅक्ट सोबत नवा Payment पर्याय आलेला दिसेल. (जर दिसत नसेल तर व्हॉट्सॲप प्ले स्टोअरवरून अपडेट करून घ्या)
त्यावर क्लिक करून ACCEPT AND CONTINUE वर स्पर्श करा.
आता तुमची बँक निवडा.
आता तुमचं बँक अकाऊंट आणि क्रमांक तपासण्यासाठी Verification SMS येईल. ही प्रक्रिया आपोआप पूर्ण होईल.
हे तुम्हाला तुम्ही पैसे पाठवत असणाऱ्या व्यक्तीला एकदाच करावं लागेल. हा सेटप तुम्ही दोघांनी केला असेल तरच ही सोय वापरता येईल.
जर समोरच्या व्यक्तीने सेटप केला नसेल तर Notify पर्याय दिसेल त्याद्वारे त्यांना सेटप करण्यास सांगू शकता.
आता तुम्ही Send Payment पर्याय वापरुन फोनपे गूगल पे प्रमाणेच रक्कम टाकून UPI पिन टाइप करून पैसे पाठवू शकता .
याद्वारे केलेले व्यवहार मेसेजेसमध्ये व एका यादीद्वारेही पाहू शकाल.

बाबुल की दुवाँये लेती जा…. गृहमंत्री करणार मानस कन्येचे कन्यादान

0

 

रविवारी नागपुरात लग्नसोहळा

 

नागपूर, दि.१८ : बाबुल की दुवाँये लेती जा…. जा तुझको सुखी संसार मिले… असा आशीर्वाद एका मानस कन्येला गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कडून मिळत असेल तर..आणखी काय पाहिजे.!

हे काही चित्रपटाचे कथानक नसून वास्तव आहे. मतीमंद व मुकबधीर अनाथ मुलांच्या संगोपनासोबतच पुनर्वसनासाठी कार्य करणारे ज्येष्ठ समाजसेवी शंकरबाबा पापडकर यांची मानस कन्या कु. वर्षा शंकरबाबा पापडकर व अनाथालय बालगृहातील समीर यांचा विवाह संपन्न होत आहे. या विवाहात कु. वर्षा हिचे कन्यादान वधुपिता-माता म्हणून गृहमंत्री अनिल देशमुख व सौ. आरती देशमुख करणार आहेत.
अमरावती जिल्ह्यातील वझ्झर येथे स्व. अंबादासपंत वैद्य मतीमंद, मुकबधीर अनाथालय येथे 23 वर्षापूर्वी नागपूर रेल्वे स्टेशनवर बेवारस अवस्थेत पोलीसांना सापडलेल्या मुलीचे संगोपन करुन चिमुकलीचा तिचा आईवडीलाप्रमाणे सांभाळ करुन तिला वडीलाचे नाव दिले. ती सहा वर्षाची झाल्यानंतर शिक्षणाकरीता संत गाडगेबाबा निवासी मुकबधीर विद्यालय येथे चौथीपर्यंत शिक्षण देवून स्वत:च्या पायावर उभे केले. तर डोंबिवली येथे बेवारस स्थितीत सापडलेल्या दोन वर्षाच्या समीरचे सुध्दा वझ्झर येथील अनाथालयात शंकरबाबा पापडकरांनी स्वत:चे नाव देवून सांभाळ केला. सातव्या वर्गापर्यंत शिक्षण पूर्ण केल्यानंतर स्वावलंबी जीवन जगता यावे यासाठी नोकरी मिळवून दिली.
श्री. देशमुख यांच्या नागपूर निवासस्थानी त्यांच्या सुनबाई सौ. रिध्दी देशमुख यांनी नव वधु वरांचे स्वागत व औक्षण करुन लग्नसोहळयाच्या पूर्व विधींची सुरुवात केली.
जिल्हाधिकारी वरपिता
मुकबधीर असलेल्या समीर याच्या वरपित्याची जबाबदारी जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे व सौ. ज्योत्स्ना ठाकरे यांनी स्वीकारली आहे. रविंद्र ठाकरे व सौ. ज्योत्सना ठाकरे यांनी आज समीर व वर्षा यांना विशेष निमंत्रित केले.

बालगृहातील कु. वर्षा सोबत लग्न करण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर शंकरबाबांनी स्वतंत्र घर तसेच पुढील पुनर्वसनाच्या दृष्टीनेसुध्दा स्वावलंबी केले. त्यानंतरच दोघांच्या विवाहाला समंती दिली. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी बालगृहाला भेट दिली असता दोघांच्या विवाहाचा प्रस्ताव ठेवून संमती मिळाल्यानंतर कन्यादान करण्याचे त्यांनी मान्य केले. हा विवाह ‘सदभावना लॉन’ सीआयडी ऑफिस समोर पोलिस लाइन टाकळी नागपूर येथे दि. 20 डिसेंबर 2020 रोजी सायंकाळी 5.00 वाजता संपन्न होणार आहे. कोरोना संदर्भात राज्य सरकारने ज्या अटी घालून दिलेल्या आहेत त्या अटींना पाळून या विवाह सोहळ्यात नागरिकांनी उपस्थित राहून वधूवरांना शुभ आशीर्वाद द्यावेत असे आवाहन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले आहे. जर या मूकबधिर दांपत्यास संसारोपयोगी साहित्य दिले तर मला आनंदच होईल असे मत सुद्धा यावेळी अनिल देशमुख यांनी व्यक्त केले.

नऊ वर्षीय चिमुकल्याला सावत्र आईने गरम तव्यावर उभे करून चटके दिल्याची धक्कादायक घटना

0

 

सुनील पवार नांदुरा

बुलढाणा : नऊ वर्षीय चिमुकल्याला सावत्र आईने गरम तव्यावर उभे करून चटके दिल्याची धक्कादायक घटना नांदुरा तालुक्यातील जवळा बाजार येथे समोर आली आहे. आर्यन सचिन शिंगोटे असे चिमुकल्याचे नाव आहे त्याला उपचारासाठी अकोला हलवण्यात आले आहे.

आर्यन सचिन शिंगोटे याच्या आईने आत्महत्या केल्याने मुलांचा सांभाळ करण्यासाठी सचिन शिंगोटे ह्याने दुसरे लग्न केले होते.पंरतु मुलांचा सांभाळ करण्याऐवजी सावत्र मुलाचा छळ करण्यात येत होता. चार दिवसांपूर्वी आर्यनची सावत्र आई शारदा हिने आर्यनचे हातपाय पकडून त्याला गरम तव्यावर उभे देऊन चटके दिले. त्याने आरडाओरड करू नये म्हणून त्यांचे तोंडही दाबून ठेवण्यात आले होते. तीन दिवसांपासून आर्यन घराच्या बाहेर येत नाही असे दिसल्याने शेजाऱ्यांनी घरात जाऊन बघितल्यावर हा धक्कादायक प्रकार शेजारच्यांच्या लक्षात आला.

शेजारच्यांनी त्याला त्वरित खामगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. परंतु प्रकुती चिंताजनक असल्याने त्याला अकोला येथे दाखल करण्यात आले आहे. विशेष म्हणजे आर्यनचे वडील सचिन शिंगोटे हा प्रकार डोळ्याने बघत असूनही त्याने मध्यस्थी केली नाही. याप्रकरणी बोरोखेडी पोलिसांनी नोंद घेतली असून पुढील करवाईसाठी पोलिस पथक अकोला येथे गेले आहे.

विद्यार्थ्यांना लवकरात लवकर मार्कशीट उपलब्ध करून घा _ कुणाल ढेपे

0

 

नुकत्याच ऑनलाईन पद्धतीने संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षा पार पडल्या ऑनलाईन पद्धतीने झालेल्या परीक्षांचे निकाल लागले असून समोरील अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्याकरता विद्यार्थ्यांना मार्कशीट मिळवण्यासाठी मात्र विद्यापीठात पायपीट करावी लागत आहे, बहुतांश विद्यार्थ्यांचे निकाल रोखल्या गेले असून मार्कशीट मध्ये चुकांचे प्रमाण सुद्धा प्रचंड आहे मार्कशीट मधील चुका दुरुस्त करण्यासाठी विद्यापीठांतर्गत येणाऱ्या पाचही जिल्ह्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना कोरोनाच्या काळात विद्यापीठत चकरा माराव्या लागत आहेत त्यामुळे जत्रेचे स्वरूप विद्यापिठात आले असून विद्यार्थ्यांना प्रचंड आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहेत, विद्यार्थ्यांना होत असलेल्या त्रासाबदल आज अमरावती जिल्हा अध्यक्ष कुणाल भाऊ ढेपे यांनी हेमंत सर देशमुख संचालक , परीक्षा मंडळ ,परीक्षा मुल्यमापन संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ यांना निवेदन सादर करत विद्यार्थ्यांना होत असलेल्या त्रासाची जाणीव करून दिली, सोमोरील अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यावाचून कुढलही विद्यार्थी वंचित राहू नये याकरिता विद्यार्थ्यांच्या मार्कशीट शक्य होते लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यात याव्यात अशी नम्र विनंती