Home Blog Page 562

आता ऑफलाईन स्विकारणार उमेदवारी अर्ज.तसेच जात पडताळणी प्रमाणपत्रातही सूट…

0

 

गजानन सोनटक्के
जळगाव जा

 

 

इंटरनेट चा स्पीड कमी, सर्व्हड डाऊन यासह इतर तांत्रिक अडचणींमुळे इच्छुक उमेदवार नामनिर्देशनापासून वंचित राहत आहेत. असे उमेदवार वंचित राहू नये आणि त्यांना निवडणूक लढविण्याची संधी मिळावी म्हणून निवडणूक आयोगाने उमेदवारी अर्ज पारंपारिक पद्धतीने अर्थात ऑफलाईन स्वीकारणाचा निर्णय घेतला आहे. शिवाय उद्या, 29 डिसेंम्बर रोजी नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची वेळही वाढवून सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत करण्यात आली आहेत. प्राप्त माहितीनुसार इंटरनेटमुळे अनेकांच्या अर्जाचा घोळ होत होता. वरील निर्णयाच्या अनुषंगाने आता इच्छूकांना अर्ज करणे सोपे झाले आहे. नामनिर्देशनपत्रे आणि कोरे नमुने तत्काळ उपलब्ध करावे, असेही आदेश निवडणूक आयोगाने सर्व जिल्हाधिकार्‍यांना दिले आहेत. सदर आदेशावर राज्याचे निवडणूक आयोग सचिव किरण कुरुंदकर यांची स्वाक्षरी आहे.

जात पडताळणी प्रमाणपत्रातही सूट

_ऑनलाईन प्रणालीचा मंदावलेला वेग लक्षात घेता आता २९ डिसेंबर आणि ३० डिसेंबर २०२० या दोनही दिवशी ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने जात पडताळणी प्रमाणपत्राचा अर्ज स्विकारण्याच्या सूचना डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी, पुणे यांनी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितींना दिले आहेत. ज्या अर्जदारांचे ऑफलाईन पद्धतीने अर्ज दिले आहेत, त्यांची माहिती विहीत नमुन्यात पाठविण्याचेही नमूद करण्यात आले आहे. उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्राची किंवा जात वैधता प्रमाणपत्र प्रस्ताव दाखल केलेल्या पावतीची आवश्यकता असल्याने अर्जदारांची गैरसोय होवू नये म्हणून ऑफलाईनची व्यवस्था करण्यात आली आहे.

जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, ७ अटक ५ फरार साडेतीन लाखाचा मुद्देमाल जप्त, lcb ची कारवाही

0

देऊळगाव राजा सिंदखेड राजा रोड वरील पिंपळनेर शिवारामध्ये स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा केलेल्या कारवाईमध्ये तीन लाख ६३ हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार असे की देऊळगाव राजा सिंदखेड राजा रोड वरील पिंपळनेर शिवारामध्ये जुगाराचा डाव चालू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखा तसेच देऊळगाव राजा पोलिसांना लागताच पोलिसांनी सापळा रचून सदर जुगाराच्या अड्ड्यावर छापा मारून बारा जणांविरुद्ध मुंबई जुगार कायदा कलम १२ अ प्रमाणे कारवाई केली आहे या कारवाईमध्ये आरोपी विनोद गणेश मेहेत्रे राहणार सिंदखेड राजा कोंडीबा रामभाऊ भोजने राहणार सिंदखेड राजा गुलाम नबी शेख नजीर राहणार जालना सय्यद मोसिन सय्यद कट्टू राहणार सिंदखेड राजा दिलीप गणपत ढोबळे राहणार सावखेड भोई सय्यद युसूफ सय्यद उस्मान राहणार देऊळगाव राजा सिद्धांत आनंदराव खांडेभराड राहणार देउळगाव राजा यांच्यासह अधिक सात आरोपी वर कायदेशीर कारवाई केली असून यातील पाच जण फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे सदर कारवाईमध्ये नगदी एक लाख १७ हजार पाचशे रुपये ७ मोबाईल सहा मोटर सायकल असा एकूण ३ लाख ६३ हजार ५०० रुपयांचा lcb पथकाने हस्तगत केला. या कारवाही साठी बुलढाणा जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद चवरिया, अप्पर पोलीस अधीक्षक बुलडाणा आणि खामगाव यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक गीते यांच्या आदेशाने पीएसआय शेळके, जिंदमवार, आढाव, पोलीस हेडकॉन्स्टेबल काळे, पोलीस कॉन्स्टेबल नदीम शेख, गोरले, भुजबळ, भिसे यांनी केली आहे. याबाबत अधिक तपास देऊळगाव राजा पोलिस स्टेशनचे ठाणेदार संभाजी पाटील व श्रीकृष्ण गवई करीत आहेत.

यावल तालुक्यातील ४७ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रीक निवडणुकीच्या उमेदवारी दाखलच्या तिसऱ्या दिवसी७४ अर्ज दाखल

0

 

 

यावल तालुक्यातील ग्राम पंचायतच्या सार्वत्रिक निवडणुक रणधुमाळीला वेग आला असुन आज उमेदवारी अर्ज भरण्याच्या तिसऱ्या दिवसी एकुण ७४ ईच्छुक उमेदवारांनी आपले उमेदवारी दाखल केले आहे . दरम्यान मागील तिन दिवसाच्या शासकीय सुटीच्या विश्रांतीनंतर दिनांक २८ डिसेंबर पासून पुनश्च ग्रामपंचायत निवडणुकीत आपले नशिब आजमावणाऱ्यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या तिसऱ्या दिवसी ईच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज भरण्यासाठी तहसील कार्यालयावर एकच गर्दी केली होती . यावल तालुक्यात एकूण ४७ ग्राम पंचायतीच्या सार्वत्रीक पंचवार्षिक निवडणुक दिनांक १५ जानेवारीस पार पडणार असुन , उमेदवारी अर्ज दाखल करण्याची वेळ दिनांक ३० डिसेंबरपर्यंत असुन ४ जानेवारी २०२१ रोजी उमेदवाराच्या अर्जांची छाणणी व त्याच दिवसी चिन्ह वाटप करण्यात येणार आहे . आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या तिसऱ्या दिवसी तालुक्यातील विविध ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी एकुण ७४जणांचे अर्ज प्राप्त झाले असुन , यात सर्वाधीक उमेदवारी अर्ज १ १हे वड्री ग्रामपंचायत व१० अर्ज कोरपावली ग्रामपंचायती करीता दाखल झाले असून , बामणोद व बामणोदसाठी प्रत्येकी ९ उमेदवारी अर्ज , मोहराळे गृप , पिंपरूड , ग्रामपंचायती करीता ६ अर्ज , हिंगोणे , सांगवी बु॥ , प्रत्येकी ५ उमेदवारांचे अर्ज दाखल झाले आहे . यात अंजाळे गृप , महेलखेडी , अट्रावल , मारूळ गृप , डोंगर कठोरा ,विरोदे , विरावली , डोणगाव या ग्रामपंचायतीकरिता प्रत्येकी १ उमेदवाराने आपले अर्ज दाखल केले आहे .कोळवद , पिपंरूड प्रत्येकी दोन उमेदवारांचे अर्ज दाखल असुन , किनगाव बु॥साठी ३ आणी नायगावकरीता ४ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहे .

जळगाव जामोद तालुक्यातील शासकीय तूर नोंदणी प्रक्रिया ऑनलाइन होणार – प्रसेनजीत पाटिल

0

 

गजानन सोनटक्के
जळगाव जा

जळगाव जामोद तालुक्यातील नाफेड मार्फत होणाऱ्या शासकीय खरेदी साठी नाव नोंदणी प्रक्रिया दिनांक २८/१२/२०२० पासून सुरु होणार होती. नोंदणी करिता शेतकर्यांनी रात्रीपासून रांगा लावल्या परंतु सकाळी हजारो लोक नोंदणीसाठी आले आणि झुंबड़ उडाली.मका खरेदी साठी १७०० शेतकर्यांनी नोंदणी केली असतांना जागेअभावी अद्याप फक्त ३०० शेतकर्यांचा मका खरेदी केल्या गेला त्यामुळे तूर खरेदी वेळी सुद्धा हेच होईल या भितीमुळे लवकर नंबर लागावा या उद्देशाने शेतकर्यांन्नी पहिल्याच दिवशी तूफान गर्दी केली होती. त्यातही एका व्यक्तिकडे एका पेक्षा जास्त सातबारे असल्यामुळे व काही नेतेमंडळी व व्यापारी यांनी वशील्याने आपले नंबर लावून घेतलेव जवळपास एकाच दिवशी 2600ते 2700 नोंदणी झाल्याचे आढळून आले जळगाव जामोद खरेदी विक्री संघाच्या संचालक मंडळाने प्रसेनजीत पाटिल यांच्याशी चर्चा करून झालेली नोंदणी प्रक्रिया रद्द करून नव्याने ऑनलाइन प्रक्रियेद्वारे नोंदणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. ऑनलाइन नोंदणी प्रक्रियेसाठी नवीन ऍप निर्माण करण्याचा निर्णय सुद्धा यावेळी घेण्यात आला.

एल्गार संघटनेच्या चळवळीला यश आणेवारी 37 पैसे काढली

0

 

गजानन सोनटक्के
जळगांव जा.ता.प्रतिनिधी:-

यावर्षी सर्व पिकांचे खुप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले १०% पिक सुद्धा हाती लागले नाही. या सर्व परिस्थितीत शेतकरी हवालदिल झालेला आहे. शेतकऱ्यांना झालेल्या नुक़सानीचे अध्यापही कुठलाच मोबदला मिळाला नाही सोबतच नजरअंदाज व सुधारित आनेवारी ५० पैश्यांच्या वर काढून प्रशासनाने शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळुन शेतकऱ्यांना पिकवीम्या पासून वंचित ठेवन्याचा प्रयत्न केला जात आहे.. या संदर्भात दोन वेळा मोर्चा व निवेदनाच्या स्वरुपात प्रशासनाला जाब विचारण्याच काम मा.प्रसेनजीतदादा पाटिल यांच्या नेतृत्वात व हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत केल्या गेल. त्यावेळी स्थानिक प्रशासनाने अंतिम आनेवारीत जळगाव जामोद तालुका ५० पैश्यांच्या आत बसवन्याच आश्वासन देण्यात आलेले आहे.. तरी या निगरघट्ट प्रशासनाला त्या आश्वासनाची आठवण करून देण्यासाठी एल्गार संघटनेच्या वतीने मा.प्रसेनजीतदादा पाटिल यांच्या नेतृत्वात दिनांक २८/१२/२०२० पासून बेमुदत साखळी उपोषण करण्याची हाक एल्गार संघटनेने दिली होती . त्याला प्रतिसाद देत हजारो शेतकर्यांनी साखळी उपोषणात सहभागी होत आनेवारी ५० पैश्यांच्या आत यावी ही मागणी प्रशासनाकडे रेटून धरली.प्रसेनजीत पाटिल यांनी यावेळी आक्रमक भूमिका घेत जो पर्यंत चालू आर्थिक हंगामाची आनेवारी ५० पैष्याच्या आत आल्याचे घोषित होत नाही तो पर्यंत आंदोलन मागे घेणार नाही अशी भूमिका घेतली. शेवटी प्रशासनाने मागणी मान्य करत जळगाव जामोद तालुक्याची आनेवारी ३७ पैशे काढल्याचे पत्र एल्गार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रसेनजीत पाटिल यांना दिले. यावेळी विजय पोहनकार,प्रशांत डिक्कर,बंडू पाटिल वाघ, बाळु पाटिल डिवरे,अजहर देशमुख,विजय तायड़े, ईमरान खान, गणेश मानखैर, सुरेश पाचपोर, राजू पाटिल,आशिष वायझोड़े, संतोष भारसाकळे,अरुण दाभाड़े, समिर आर्यन, निजाम राज, सिद्धार्थ हेलोडे यांच्यासह हजारो शेतकरी उपस्थित होते. हा शेतकरी एकजुटीचा विजय असल्याच्या भावना यावेळी प्रसेनजीत पाटिल यांनी व्यक्त केल्या.

 

संग्रामपुर मित्र परिवाराची सामाजीक बांधीलकीमुळे ३० रुग्णांना मिळाली दुष्टी , २११ नेत्र रुग्णांना मोफत चष्मे वाटप ; स्तृत्य उपक्रम

0

 

संग्रामपुर : येथील संग्रामपुर मित्र परिवार सामाजिक कार्यात अग्रेसर असुन शेवटच्या घटकाचा आधारवड असलेले संंग्रामपुर मित्र परिवाराचे संस्थापक अध्यक्ष शंकरभाऊ पुरोहित यांच्या संकल्पनेतुन संग्रामपुरात नुकतेच नेत्र गरजु रुग्णांसाठी नेत्र तपासणी व मोफत शस्त्रक्रिया , चष्मे वाटप शिबीर संपन्न झाले. सर्व प्रथम घटनेचे शिल्पकार महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर व क्रांतिसूर्य महात्मा ज्योतीबा फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करुन मोहनराव नारायणराव नेत्र रुग्णालयाचे नेत्रतज्ञ वैधकिय अधिकारी व आरोग्य कर्मचारी यांनी नेत्र रुग्णांची तपासणी केली यात मोतिबिंदु शस्त्रक्रियेसाठी १०० रुग्ण पात्र ठरले त्यात पहिल्या टप्प्यात १०० पैकी ३० गरजु नेत्र मोतिबिंदु रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया मोहनराव नारायणराव नेत्र रुग्णालयात करण्यात आली तर दुसऱ्या टप्प्यात उर्वरित ७० नेत्र रुग्णांची शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार आहे संग्रामपुर मित्र परिवाराच्या सामाजीक बांधीलकीमुळे १०० व्यक्तीना दुष्टी मिळणार असल्याने संबंधीत नेत्र रुग्णांनी व नातेवाईकांकडून आभार मानले जात आहे. संग्रामपुर मित्र परिवाराच्या वतीने स्वखर्चाने रुग्णांचा शस्त्रक्रिया खर्च,वाहनाची जेवणाची ऊत्तम व्यवस्था करण्यात आली होती तसेच या शिबीरात शस्त्रक्रियाची आवश्यकता नसल्याने चष्मे हवे असलेल्या नेत्र रुग्णांना २११ मोफत चष्मे वाटप करण्यात आले. सामाजीक कार्यात अग्रेसर असलेला स्तृत्य उपक्रमाची संग्रामपुर मित्र परिवाराचे नेत्र रुग्ण व नातेवाईकांनी आभार मानले व कौतुकही केले.आणि सर्वकडे संग्रामपूर मित्र परिवाराच्या उपक्रमाची वाह वाह होत आहे.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संग्रामपूर मित्र परिवाराच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.

सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक,धार्मिक संस्कृती लक्षात घेऊन दहिसरचा विकास हेच ध्येय,चारशे वर्षे पुरातन विहिर झाली पुनर्जीवित !!

0

 

सामाजिक,शैक्षणिक सांस्कृतिक व धार्मिक संस्कृती लक्षात घेऊन दहिसरचा विकास हेच आपले ध्येय असल्याची माहिती शिवसेना उपनेते, म्हाडा सभापती विनोद घोसाळकर यांनी दिली. दहिसर पश्चिमेकडील आय.सी. कॉलनी येथे चारशे वर्षांपूर्वीची दगडी बांधणीची आखीव-रेखीव पुरातन विहीर पूर्णतः बुझून गेली होती. तिच्यावर फुटपाथ बनविण्यात आले होते.या पुरातन विहिरीचा लोकार्पण सोहळा काल मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी बोलतांना घोसाळकर यांनी आज आपणांस गावाची आठवण आल्याचे सांगत या उपक्रमाबद्दल शिवसेना नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांचे कौतुक केले. यावेळी ईस्ट इंडियन समाजाच्या नागरिकांनी वाजत-गाजत पारंपारिक पद्धतीने या विहिरीची पूजा केली. स्थानिक शिवसेना नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी या विहिरीचे पुनरुज्जीवन केले आहे. आय. सी.चर्चचे रेव्ह फादर हॅरी वाझ यांच्या हस्ते या विहिरीचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी बोलताना फादर वाझ यांनी पाण्याचे महत्त्व लक्षात घेता करण्यात आलेल्या या उपक्रमाचे स्वागत केले. यावेळी स्थानिक नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. शहरात पिण्याच्या पाण्याची टंचाई होत असतांना आपल्या प्रभागातील हा प्रयोग आदर्श ठरणार असल्याचे तेजस्वी घोसाळकर यांनी सांगितले. तर ह्या आगळ्यावेगळ्या उपक्रमाने आपला वाढदिवस साजरा करण्यात आल्याने त्यांनी सर्व नागरिक व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले. चारशे वर्षांपूर्वी इस्ट इंडियन नागरिक विवाह सोहळ्यासाठी उंबराचं पाणी या विधीसाठी तिचा वापर करीत असत.या सोहळ्यात विहीरीची पूजा करून तेथे पापड भाजून त्याचा प्रसाद सर्वांना वाटत असत व विहीरीचे पाणी घरी नेऊन आंघोळ करीत असत. कालांतराने मुंबापुरीत नळ आल्यावर विहिरींचे महत्व कमी होत गेले अशी माहिती या उपक्रमाचे शिल्पकार, मुंबै बँकेचे संचालक अभिषेक घोसाळकर यांनी प्रास्ताविक भाषणात दिली. ही पुरातन विहीर दुर्लक्षित होऊन बुझली. तिच्यावर पालिकेचे गटारही आल्याने त्याचे पाणी विहिरीत गडप होऊ लागले होते. दरम्यान गटाराचे पाणी जाते कोठे याचा शोध घेतला असता ही पुरातन बारा फूट लांब रुंद विहीर आढळून आली. तिच्या दगडी भिंती, पायऱ्या या सर्व जुन्या गोष्टी सुस्थितीत असल्याचे आढळले. त्यामुळे या विहिरीच्या पुनरुज्जीवनाचा आगळावेगळा प्रयोग करायचे ठरवले, असेही अभिषेक घोसाळकर यांनी सांगितले. त्यासाठी तिच्यावरील गटार वळवण्यात आले. नागरीकरणाच्या रेट्यात शेजारच्या जमिनीची उंची वाढल्याने ही विहीर दोन फूट खाली गेली होती.त् यामुळे तिला दगडी लुकचा व्यवस्थित कठडा तसेच सुरक्षेसाठी शीट-जाळी लावण्यात आली आहे. या कामास विंसी परेरा यांनी पाठपुरावा केल्याचे घोसाळकर यांनी सांगितले. आता याठिकाणी खराखुरा रहाट बांधण्यात आला असून प्रकाशझोत सोडण्यात आले आहेत.

नागरिकांमध्ये पाण्याचे महत्त्व लक्षात घेता जनजागृती व्हावी म्हणून हा उपक्रम राबवण्यात आला याची माहिती घोसाळकर यांनी दिली. या परिसराचे सौंदर्यीकरण व्हावे यासाठी तेथे भित्तीचित्र तसेच पाषणशिल्पेही उभारण्यात आली आहेत. पुरातन इस्ट इंडियन रहिवासी उंबराचं पाणी घेऊन विवाहविधी करीत असल्याचे शिल्प येथे लावण्यात आले आहे. आता विहीर पुन्हा सज्ज झाल्याचे पाहून येथे पुन्हा विवाहसोहळ्यातील उंबरा -विधीसाठी नोंदणी सुरू झाली आहे. याप्रसंगी विभागप्रमुख आमदार विलास पोतनीस, नगरसेविका माधुरी भोईर, अलबर्ट डिसूज़ा मैनेजिंग डायरेक्टर सेट. जॉर्ज कॉलेज, इग्नेशियस डिसूजा प्रेसिडेंट ईस्ट इंडियन असोसिएशन, लुइस रोड्रिक्स सेक्रेटरी ईस्ट इंडिया असोसिएशन स्थानिक नागररिक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी स्टार व क्रॅब स्पर्धेतील विजेत्यांना रोख रक्कम व प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले.

राज्य मराठी पत्रकार परिषद ची विदर्भ स्तरीय बैठक संपन्न

0

 

आज दी. 27/12/2020 रविवारी रोजी अमरावती येथील सिटी न्यूज चैनल च्या मुख्य कार्यालय येथे विदर्भ स्तरीय पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली या प्रसंगी विदर्भातील अमरावती, वर्धा, बुलढाणा, अकोला, यवतमाळ, वाशीम इत्यादी जिल्ह्यातील विविध ठिकाणी असलेले पदाधिकारी यांची पूर्णतह उपस्थिती होती
या प्रसंगी कार्यक्रम अध्यक्ष सिटी न्यूज चैनल चे प्रबंध संपादक व मालक डॉ. चंदूभाऊ सजोतीया , प्रमुख अतिथी मधुसूदन कुलथे (केंद्रीय अध्यक्ष ), पवन बैस, नीतेश किल्लेदार, मधुभाऊ कान्हेरकर,राजू भास्करे, सय्यद शकील, हर्षल काळे, दिलीपसिंग ठाकूर , अशोक राठी, राजलता ताई बागडी, चंद्रकांत पवार, तिवारीजी, राहुल बुंदीले,व समस्त पदाधिकारी(राज्य मराठी पत्रकार परिषद) उपस्थित होते कार्यक्रमा दरम्यान upsc बोर्ड च्या डायरेक्टर रोडे म्याडम यांचा सत्कार तसेच डॉ. चांदुभाऊ सजोतीया , दैनिक मंगल प्रहर ची संपूर्ण टीम या सर्वांचा सन्मान राज्य मराठी पत्रकार परिषद तर्फे करण्यात आला व अमरावती जिल्हाध्यक्ष पदावर नीतेश किल्लेदार यांची पुनर्नियुक्ती करण्यात आली तसेच संघाच्या पुढील कार्यक्रमा संबधित व संघटना वाढीकरिता , विविध उपक्रम राबविण्यासंबंधित चर्चा करण्यात आली व नंतर सर्वांसोबत स्नेहभोजन करून बैठक पूर्ण पार पडली।

गीता जयंती निमित्त श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालय ग्रंथ व पुस्तक प्रदर्शनी संपन्न….

0

 

गजानन सोनटक्के
जळगाव जामोद प्रतिनिधी:-

जळगाव जामोद शहरातील स्थानिक श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालयाच्या ग्रंथालयांमध्ये दिनांक २५ डिसेंबर रोजी श्रीमद्भगवद्गीता जयंतीनिमित्त ग्रंथ प्रदर्शनी व पुस्तकांचे प्रदर्शन संपन्न झाले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.श्री.रा. देशमुख यांनी श्रीमद्भगवद्गीता ग्रंथाचे पूजन करून प्रदर्शनीचे उद्घाटन केले. श्रीमद्भगवद्गीतेशी संबंधित अन्य भाषेतील पुस्तके सुद्धा या प्रदर्शनात ठेवण्यात आली होती. विविध महानुभावांनी श्रीमद् भगवत गिते विषयी लिहिलेल्या विविध पुस्तकांचा सुद्धा या प्रदर्शनात समावेश होता. आप पेटीच्या आकाराची भगवद्गीता सुद्धा ह्या प्रदर्शनीमध्ये ठेवण्यात आली होती. श्रीमद्भागवत गीतेवर ह्यावेळी मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राम देशमुख, प्रा. चव्हाण, ग्रंथपाल संतोष कतोरे, ग्रंथालय विभागातील डाबेराव, समाधान यांचेसह महाविद्यालयातील प्राध्यापक विद्यार्थ्यांची या प्रदर्शनी मध्ये आपला सहभाग नोंदविला. ह्या ग्रंथप्रदर्शनाच्या आयोजनासाठी ग्रंथपाल संतोष कतोरे आणि ग्रंथालय कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.

या गावात सरपंच पदासाठी तब्बल 42 लाखांची बोली.

0

 

(सूर्या मराठी न्यूज़ ब्यूरो)

साधारणतः पाच हजार लोकसंख्या असलेल्या खोंडामोळी ग्रामपंचायतीत आगामी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी विकासाच्या नावाखाली गावातील वाघेश्वरी माता मंदिर उभारणीसाठी ज्या पक्षाकडून जास्त निधी दिला जाईल त्यांना ग्रामपंचायत बिनविरोध करून सरपंच पद देण्यात येईल यासाठी गावातील शिवाजी चौकात झालेल्या सभेत सर्वच पक्षांकडून सरपंच पदासाठी बोली लावण्यात आल्याची चर्चा आहे. 25 लाखांपासून तर 42 लाखांपर्यंत झालेल्या या बोलीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष प्रदीप वना पाटील यांनी बाजी मारली आहे. निवडणुकीसाठी होणारा खर्च टाळून गावाचा विकास व्हावा यासाठी झालेला प्रयत्न योग्य आहे, परंतु सरपंच पदासाठी झालेला लिलाव लोकशाहीसाठी घातक असल्याची खंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष अभिजित मोरे यांनी व्यक्त केली आहे. तर एकी कडे . तर खोंडामळी ग्रामपंचायत बिनविरोध निवडण्यासाठी भाजप पक्षाने समर्थन दिले आहे. गावाच्या विकासासाठी आणि हिंदू धर्माच्या मंदिर उभारणीसाठी भाजपच समर्थ असल्याची प्रतिक्रिया जिल्हा अध्यक्ष विजय चौधरी यांनी दिली आहे.
खोंडामळी ग्रामपंचायतीमध्ये गेल्या 72 वर्षात बिनविरोध निवडणूक झालेली नाही. गावातील वाघेश्वरी माता मंदिर उभारणीसाठी भाविकांनी अनेक वेळा प्रयत्न केले परंतु निधीअभावी मंदिराची स्थापना झाली नाही. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीत मंदिर उभारणीसाठी निधी उपलब्ध करण्यासाठी चक्क सरपंच पदाचा लिलाव केला आहे. यासाठी गावातील वाघेश्वरी माता श्रद्धाळूनीं मोठ्या प्रमाणावर पाठिंबा देऊन ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध या निर्णयाला पाठिंबा दिला आहे. खोंडामळी गावात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सरपंच पदाचा पैशांच्या जोरावर झालेला लिलाव लोकशाहीसाठी घातक असून अशा प्रकारचा निर्णय संविधानाच्या विरोधात आहे. गावातील सर्व नागरिकांना विश्वासात न घेता ग्रामपंचायत निवडणुकीतील सरपंच पदाचा झालेला लिलाव आम्हाला मान्य नाही. गेल्या अनेक वर्षापासून समाजमंदिर, पाण्याची टाकी, रस्ते या सुविधांपासून आम्ही वंचित आहोत, त्यामुळे आम्ही निवडणूक लढवणार असल्याचे अनुसूचित जमातीतील आंबेडकरवादी संघटनांनी निर्णय घेतला आहे.खोंडामळी ग्रामपंचायत मध्ये गावाचा विकास व वाघेश्वरी माता उभारणीसाठी सरपंच पदाचा केलेला लिलाव राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी कडून बिनविरोध करण्याचा प्रयत्न सुरू आहे, तर दुसरीकडे अनुसूचित जमातीतील नागरिकांना हा निर्णय मान्य नसून निवडणुकीसाठी अर्ज भरण्यासाठी कागदपत्रांची जुळवाजुळव सुरू आहे. त्यामुळे खोंडामळी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध होते की नाही हे तर येणारी वेळच सांगू शकेल परंतु सध्यातरी सरपंचपदासाठी 42 लाखाची लागलेली बोली चर्चेचा विषय ठरत आहे.