Home Blog Page 563

आज के दिन 28 दिसंबर14 पौष समय – छोटे साहिबज़ादे और माता गुजर कौर जी का अंतिम संस्कार

0

 

सरहिंद के नवाब वजीर खान ने गुरु गोबिंद सिंह जी के साहिबजादों और उनकी माता गुजरी जी को ठंडे बुर्ज में तीन दिन और दो रातों तक जमीन पर रखा था। उस समय यह बुर्ज सबसे ठंडा हुआ करता था, जिसमें रहना काफी मुश्किल था। वजीर खान ने साहिबजादों पर इस्लाम कबूल करने के लिए कई बार दबाव बनाया, लेकिन दोनों साहिबजादों ने इस्लाम कबूल करने से मना कर दिया। इस पर वजीर खान ने दोनों को दीवार में चिनवा कर शहीद कर दिया। शहीदी प्राप्त करने के बाद साहिबजादों के अंतिम संस्कार के लिए दीवान टोडर मल ने जितनी जमीन चाहिए थी, उतनी जमीन पर सोने की मोहरें बिछाकर उसे खरीदा था। इसी जमीन पर साहिबजादों का अंतिम संस्कार किया गया। इस जगह गुरुद्वारा श्री ज्योति स्वरूप बनाया गया है।

वंचित बहुजन आघाडी चा,वतीने, नांदुरा, यथिल,माळी समाज मंगलभवन,येथे,कलावंताचा सतकार,समारंभ

0

 

सुनिल पवार नांदुरा

वंचित बहुजन आघाडी,महाराष्ट्र कलावंत न्याय हक्क समिती वतीने नांदुरा जी.बुलडाणा येथे आयोजित मनुस्मृती दहन दिन व कलावंत मेळावा प्रसंगी मार्गदर्शन करतांना जिल्हाध्यक्ष गणेशभाऊ चौकसे, जिल्हा महासचिव अतिशभाई खराटे, याप्रसंगी मंचावर उपस्थित महिला जिल्हाध्यक्षा विशाखाताई सावंग,चित्रपट निर्माते सुरेश गवई,गायक महेंद्र सावंग,जनार्दन सरदार,कलावंत समिती जिल्हाध्यक्ष गजानन मिसाळ,वं.आ.युवा तालुकाध्यक्ष धर्मेश तायडे,जेष्ट नेत्या सुमनताई थाटे, जिल्हा नेत्या ऍड.रागिणी तायडे,जिल्हा सदस्या अनिता गवई,कवी गायक भगवान शिरसाठ,हभप मधुकर साबे,रामरावजी देशमुख,मासुम शाह,रामचंद्र डोंगरदिवे,लहू ठाकरे,नितीन जाधव

विवाहितेचा विनयभंग तिघांविरुद्ध गुन्हा दाखल !

0

 

साखरखेर्डा (प्रतिनिधी )

सिंदखेड राजा तालुक्यातील जागदरी येथे 23 डिसेंबर च्या सकाळी एका पंचेचाळीस विवाहितेचा विनयभंग झाल्याची घटना घडली ‘गावाबाहेर एक 45 वर्ष विवाहिता शौचालयास गेली होती त्या महिलेच्या पाठीमागे गावातीलच गजानन अर्जुनराव डोईफोडे वय 48 या इसमाने तिच्या पाठीमागून जाऊन तिचे तोंड दाबून तू मला खूप आवडते असे म्हणत वाईट उद्देशाने जबरदस्ती करून विनयभंग केला ।या आशयाची माहिती विवाहितेने आपल्या पती व मुलांना घरी सांगितली ।यावरून तिचा पती व दोन मुले गजानन डोईफोडे ला समजावून सांगण्याकरता गेले असता गेले असता गजानन डोईफोडे व त्यांच्या दोन साथीदारांनी यांनी महिलेला तिच्या पतीला व तिच्या दोन मुलांना अश्लील पद्धतीने शिवीगाळ केली ‘व जीवे मारण्याची धमकी दिली याया प्रकरणी महिलेने साखरखेरडा पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली या महिलेच्या तक्रारीवरून साखरखेर्डा पोलिसांनी आरोपी गजानन डोईफोडे रामभाऊ अर्जुनराव डोईफोडे ‘राजू अर्जुनराव डोईफोडे राहणार जागदरी या तिघांविरुद्ध ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास ठाणेदार जितेंद्र आडोळे करीत आहे !

जात पडताळणीसाठी उमेदवाराची कागदपत्र जमा करण्यासाठी धावपळ ! महिलांच्या कागदासाठी अनेक जावई सासरवाडीत तळ ठोकून!

0

सिंदखेडराजा ( सचिन खंडारे )

सिंदखेडराजा तालुक्यातील 43 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरू आहे यामध्ये अतिशय संवेदनशील समजल्या जाणाऱ्या साखरखेर्डा ग्रामपंचायतीचा सुद्धा समावेश आहेसाखरखेर्डा येथे शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी आणि भाजप हे प्रमुख पक्ष आपापले उमेदवार मैदानात उतरणार असून यावर्षी साखरखेर्डा येथे नवीन सरपंच कोण होणार याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे !अनेक दिग्गज उमेदवार या वेळी मैदानात उतरल्यामुळे साखरखेर्डा येथील ग्रामपंचायत निवडणूक अतिशय चुरशीची व अतीतटीच्या होण्याची शक्यता आहे सर्व उमेदवार आपापल्या कामाला लागले असून कडक थंडीमध्ये उमेदवार घरोघरी प्रचार करत आहेत कडक थंडीमध्ये साखरखेर्डा येथील वातावरण गरम झाले असून राखीव प्रवर्गातील जागेसाठी जात पडताळणी करण्याकरता लागणाऱ्या कागदपत्रांसाठी प्रमुख उमेदवाराची सध्या धावपळ बघायला मिळत आहे ‘महिला उमेदवार असतील तर माहेर कडील लागणाऱ्या कागदपत्र आणण्यासाठी अनेक जावई सासुरवाडी तळ ठोकून बसले आहे !तर निवडणूक आयोगाने लावलेल्या जाचक अटीमुळे अनेक उमेदवारांची कागदपत्र काढण्यासाठी दमछाक होत आहे !सध्या जसजशी निवडणुकीची अर्ज भरण्याची तारीख जवळ येत आहे तस तसे उमेदवार कागदपत्र काढण्यासाठी धावपळ करताना सध्यातरी दिसत आहेत !

श्री शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ विद्यालय मेरा बुद्रुक येथे स्व. डॉ . पंजाबराव देशमुख यांची जयंती साजरी !

0

 

सिंदखेडराजा ( सचिन खंडारे )

आज दिनांक 27 डिसेंबर रोजी श्री शिवाजी हायस्कूल व क.म.विध्यालय मेरा बु.येथे मोठ्या उत्साहात शिक्षण महर्षी,स्वतंत्र भारताचे पहिले कृषी मंत्री स्व.डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांचा जंयती उत्सव सोहळा कोरोना विषाणू संदर्भात सर्व नियमाचे पालन करीत साजरा करण्यात आला,मुख्याध्यापक आर.एस.सुसर सर,पर्यवेक्षक एस.बी.सोळंकी सर व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते, मान्यवरांच्या हस्ते महामानवांच्या प्रतिमांचे पुजन करून अभिवादन करण्यात आले, शिक्षण महर्षी स्व.भाऊसाहेबांच्या महान कार्यावर पी.डी.खरात सर,पी.के.पडघान सर यांनी प्रकाश टाकला*

साखरखेर्डा येथील दीपक नागरे यांना दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर मराठी पत्रकारिता राज्य पुरस्कार जाहीर !

0

 

सिंदखेड राजा (सचिन खंडारे )

साखरखेर्डा येथील पत्रकार तथा सामाजिक शैक्षणिक कार्यात अग्रेसर असणारे दिव्य मराठी राज्याचे तालुका प्रतिनिधी दीपक सत्यभान नागरे यांना अतिशय प्रतिष्ठेचा दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर मराठी पत्रकारिता राज्य पुरस्कार जाहीर झाला आहे ‘ऑल जनरल लिस्ट अँड फ्रेंड्स सर्कलह्या राष्ट्रव्यापी पत्रकार संघटनेच्या वतीने हा मानाचा पुरस्कार दिला जातो ‘या पुरस्काराची घोषणा संस्थापक अध्यक्ष यासीन पटेल व प्रदेशाध्यक्ष अजिंक्य गोवेकर यांनी दिनांक 24 डिसेंबर रोजी केली आहेहा पुरस्कार जानेवारी महिन्यात अचलपूर येथे प्रदान केला जाणार असल्याचे समजते त्यामुळे सिंदखेड राजा व साखरखेर्डा परिसरातील लोकांनी आनंद व्यक्त केला आहे तसेच नागरी सर यांना शुभेच्छा सुद्धा दिले आहेत ।गेल्या पंचवीस वर्षापासून श्री नागरे सर हे पत्रकारीता करत आहेत शिवाय पेशाने शिक्षक असून सुद्धा सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत ।

अप्पू पॉईंट जवळ गिट्टी खदान व्यवसायिकाची गोळी झाडून हत्या.

0

 

अकोला : शहरातील एमआयडीसी परिसरात असलेल्या अप्पू टी पॉईंट जवळ गोपाल अग्रवाल नामक गिट्टी खदान व्यवसायिकाची गोळी झाडून हत्या झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली.

घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. हत्या आरोपी फरार झाले असून,हत्ये मागचे कारण सध्या अस्पष्ट आहे. व्यवसायातील स्पर्धेमुळे हत्या करण्यात आली असावी,असा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. घटनेचा पुढील तपास सुरू आहे. नारायण अग्रवाल यांच्याकडे मृतक कॅशीअर असल्याचे समजते.

तिहेरी तलाक चा पहिला गुन्हा.तीन तलाक कायद्याअंतर्गत 6 जणांविरुद्ध गुन्हे दाखल…

0

 

गजानन सोनटक्के जळगांव जा.प्रतिनिधी:-

जळगाव जामोद येथे तिहेरी तलाक चा प्रथम गुन्हा दाखल तर बुलढाणा जिल्ह्यातील तिहेरी तलाक ची ही चौथी घटना जळगांव जा.शहरातील सुलतानपुरा येथे घडली आहे .
सविस्तर असे की फिर्यादीचे लग्न आरोपी सलमान शेख रा.निभोरा रावेर यांच्यासोबत 25 एप्रिल 2014 ला वडोदा येथे झाले होते फिर्यादीस तीन अपत्य असून आरोपी एक ते सहा यांनी लग्न झाल्यापासूनच फिर्यादीस दोन ते तीन वर्षे चांगले वागविले व त्यानंतर आरोपींनी फिर्यादीस माहेरून पैसे आण असा नेहमी तगादा लावला. फिर्यादीने माहेरून पैसे न आणल्याने या सर्व आरोपींनी फिर्यादीस मारहाण करून अश्लील शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली
दिनांक 26 डिसेंबर रोजी सकाळी 10 ते 11 वाजेच्या दरम्यान जळगाव जामोद येथील सुलतानपुरा येथे फिर्यादीचे पती शेख सलमान याने शेख शाहरुख शेख कयूम व शेख भुरा शेख कयुम या दोघांना सोबत घेऊन सुलतानपूर येथे फिर्यादीच्या घरी दाखल झाले व फिर्यादीस म्हणाले मुझे 80 हजार रुपये अभी के अभी दो नही तो मै आपको तलाक दे दूंगा अशी धमकी दिली त्यानंतर सलमान शेख याने त्याच्या आईला फोन करून स्पीकर ऑन करून फिर्यादी सोबत बोलायला लावले फिर्यादी सोबत बोलत असता 80 हजार रुपये नाही दिले तर तू फिर्यादी सोबत तिथेच तलाक देऊन टाक असे म्हणाली त्यानंतर सलमान शेख यांनी फिर्यादीस त्या दोघांसमोर तलाक तलाक तलाक असे म्हणून तुझा व माझा पती-पत्नी म्हणून असलेला संबंध संपला असे म्हणून फिर्यादीस शिवीगाळ करून तिथून निघून गेला अशी लेखी तक्रार फिर्यादीने जळगाव जामोद पोलीस स्टेशनला दिली त्यावरून जळगाव जामोद पोलीस स्टेशनने आरोपीविरुद्ध अपराध नंबर 993/ 2020 कलम 498,294,323,504 506,34 भारतीय दंड विधान स ह कलम 4 मुस्लिम महिला विवाह संरक्षण कायदा सन दोन हजार एकोणवीस नुसार आरोपी शेख सलमान शेख कयुम वय 30 वर्ष, जमीला शेख कयुम फिर्यादी ची सासू, शेख कयुम शेख गणी फिर्यादी चा सासरा, शेख शाहरुख शेख कयूम, शेख भुरा शेख कयूम, शेख कुब्रा शेख गणी फिर्यादीची आत्या सासू, या सर्वांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री सुनील जाधव यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास हेडकॉन्स्टेबल दयाराम कुसुम्बे, योगेश निंबाळकर ,कॉस्टेबल अनिल भुले पाटील हे करीत आहे.तसेच जळगाव जामोद येथे तीन तलाक चे हे पहिलेच प्रकरण आहे.

दौंड तालुक्यातील प्रकल्पग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याकरिता शिवसेना उपजिल्हाप्रमुख महेश पासलकर यांचा पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांचेकडे पाठपुरावा !!

0

 

दौंड : दौंड तालुक्यातील पानशेत, वरसगाव, उजनी, नाझरे, वीर धरण प्रकल्पग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावणेकामी शिवसेना उपजिल्हाप्रमुख महेश पासलकर यांनी शिवसैनिक व पदाधिकाऱ्यांचे शिष्टमंडळासह दि.२५ रोजी पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांचे पुणे येथे भेट घेतली. यावेळी पासलकर यांनी प्रकल्पग्रस्तांचे शासन दरबारी प्रलंबित असलेल्या विविध प्रश्न मार्गी लावणेबाबत मंत्री महोदयांचे बैठकीत चर्चा केली.

यावेळी पानशेत धरण व वरसगाव धरण प्रकल्पग्रस्तांना शासन परिपत्रक क्र.आरपीए १०७१/४१/५८३/र-१ दि.०९/०५/१९७३ परिपत्रकामधील तरतुदीनुसार प्रकल्पग्रस्तांस जमीन वाटप करण्याचे निर्देशाची प्रशासनाकडून अंमल बजावणी होत नसलेबाबत. पानशेत व वरसगाव धरण प्रकल्पामुळे विस्थापित प्रकल्पग्रस्तांना दौंड तालुक्यात वाटप जमिनी व भूखंडाचे ७/१२ वरील इतर हक्कातील नवीन शर्त शेरे कमी करणेबाबत. पुनर्वसित गावठाणात वाटप रहीवासी भुखंडामध्ये पायाभुत सुविधा उपलब्ध करुन देणेबाबत. दौंड तालुक्यातील मा. जिल्हाधिकारी तथा उपसंचालक पुनर्वसन (जमीन) पुणे यांचे नावे असलेल्या जमिनीवरील अतिक्रमण काढणेबाबत.

दौंड तालुक्यातील राजेगाव, मलठण, लोणारवाडी, दौंड, लिंगाळी, गोपाळवाडी, या महसुली गावात उजनी प्रकल्पग्रस्तांना पूर्वी पर्यायी जमीन व भूखंड वाटप केलेले असताना तालुक्यातील उजनी प्रकल्पग्रस्तांना संपादित जमिनीचे बदल्यात सोलापूर येथे पर्यायी जमीन व भूखंड मागणी करणेस कळविले जात असल्याची बाब यावेळी पुनर्वसन मंत्री यांचे निदर्शनास आणून दिली. तालुक्यातील उजनी प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन दौंड तालुक्यातच प्राधान्याने करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात यावे अशी मागणी ही पासलकर यांनी यावेळी केली.

********************

यावेळी शिवसेना युवा सेना प्रमुख समिर भोईटे ,उपतालुका प्रमुख विजयसिंह चव्हाण ,शाखा प्रमुख दिपक भंडलकर आदि उपस्थित होते.

खोपटा ते कोप्रोली चौक रस्त्याच्या निकृष्ट कामाची चौकशी करण्याची मागणी !!

0

 

मनसेचे सत्यवान भगत यांची सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रार !!!

उरण – रायगड जिल्हा: उरण तालुक्यातील खोपटे ते कोप्रोली गावांदरम्यान असलेल्या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे करण्यात आले शिवाय रस्त्यात खूप मोठे खड्डे पडले असून हे खड्डे डांबरीकरण करण्याऐवजी खड्डे मातीने भरून बुजविले जात आहेत. त्यामुळे या गैरकारभारा विषयी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालूका उपाध्यक्ष सत्यवान भगत यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी सार्वजनिक बांधकाम विभाग पनवेल यांच्याकडे तक्रार केली असून या कामाचे बिल थांबविण्यात यावे अशी मागणी केली आहे.

खोपटे गाव ते कोप्रोली गाव रस्त्यावर खड्यांच्या संदर्भात गेली 2 वर्षे त्या रस्त्याची देखभाल दुरुस्ती निकृष्ट दर्जाची झाली आहे. ह्याच रस्त्याच्या दुरुस्तीसाठी NHAI ने अंदाजे 30 ते 40 लाखाचा निधी पावसाळी पडलेले खड्डे आणि दुरुस्तीसाठी मंजूर करून ते सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात आले आहे. परंतु सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी जे. ई. बांगर हे ठेकेदाराला पाठीशी घालून निकृष्ट दर्जाच्या कामांना सहकार्य करून जनतेच्या आणि शासनाच्या पैश्याची लूट करण्याचे काम करत आहेत. सदर रस्त्याचे नव्याने डांबरीकरण झाले तरी रस्त्यावर मोठे मोठे खड्डे पडणार आहेत. कारण ह्या रस्त्यात पडलेल्या खड्यात मातीचा भराव टाकून खड्डे बुजविण्यात आले आहेत. खड्ड्यात डांबर न टाकता केवळ खडी पसरवून नंतर माती वरवर डांबर टाकली जात आहे. त्यामुळे ह्या रस्त्यावर पुन्हा खड्डे पडू लागले आहेत. सदर विषयाचे गांभीर्य लक्षात घेता निकृष्ट दर्जाच्या रस्त्याच्या कामाची चौकशी करून अधिकारी जे.ई.बांगर आणि ठेकेदार यांच्यावर कारवाई करून कामाचे बिल त्वरित थांबविण्यात यावे अशी मागणी पत्रव्यवहारा द्वारे मनसेचे तालूका उपाध्यक्ष सत्यवान भगत यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे.