Home Blog Page 566

आकोला पोलिस दलाचा कौमिक एकता चषकास आजपासून सुरुवात

0

 

अकोला जिल्हा पतिनिधी

अतिशकुमार वानखडे

मा पोलिस अधिक्षक जी श्रीधर सर सर यांच्या संकल्पनेतून आकोला शहरात जातीय सलोखा कायम अबाधित राहावा शांतता सुव्यस्तता नादावी सामाजिक एकोपा कायम राहावा सर्व धर्मा धर्मा मध्ये बंधुभाव असावा पोलिस आणि जनता यामध्ये सुसंवाद असावा यासाठी मा पोलिस आधिक्षक जी श्रीधर सर यानी पोलिस आणि सर्व धर्मीय बाधव यांची क्रिकेट टीम बनवून प्रत्येक पोलिस स्टेशन ची एक क्रिकेट टीम बनविली त्यात पो सटे प्रभारी अधिकारी हे कैप्टन राहतील व 5 पोलिसअमलदार हे प्लेयर राहतील व इतर 06 प्लेयर मध्ये सर्व जाती धर्माचे बांधव हे राहतील या स्पर्धे मुले पोलिस जनता संबंध सदृढ़ होतील सामाजिक एकोपा कायम राहून आपसात बंधुभाव वाढेल या संकल्पनेतून आज या कौमिक एकता चषकास आज पासून शास्त्री स्टेडियम येथे सुरुवात झालेली आहे यामध्ये ऐकून 26 टीम ने सहभाग घेतलेला आहे प्रत्येक पोलिस स्टेशन ची एक टीम सहभागी आहे तसेच उपविभागांच्या मैचेस या अकोट बालापुर मुर्तिजपुर येथे होणार आहेत आणि सेमी फाइनल व फाइनल मैचेस या शास्त्री स्टेडियम येथे होणार आहेत, मा, पोलिस आधिक्षक जी श्रीधर सर हे सुधा आपल्या टीम चा उतसाह वाढविनेसाठी पोलिस मुख्यालय चे क्रिकेट टीम मधून सहभागी होणार आहेत तसेच SDPO श्री सचिन कदम सर सुधा त्यांच्या शहर विभागातील क्रिकेट टीम मध्ये सहभाग घेणार आहेत, तसेच पुढील आगामी सामान्या मध्ये पोलिस आणि पत्रकार बांधव यांच्या मध्ये ही क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात आलेले आहे, सर्वटीम व खेलाड़ू हे कोरोना आजाराच्या दृष्टिकोनातुन सर्व प्रकारे योग्य ति दक्षता घेतिल योग्य सुरक्षित आन्तर टेवतील बॉल बेट सर्व सेनेटाइजर केले जातील
सर्व खेलाड़ू व पोलिस बं।धव खेळाडू यांच्या चेहऱ्यावर आनंद उत्शाह चैतन्य दिसून येत होते प्रेक्षक व नागरिकांनी जी श्रीधर सर यांच्या या जातीय सलोखा अबाधित ठेवण्यासाठी कौमिक एकता चष्काचे आयोजना बददल कौतुक करून अभिनंदन केलेले आहे

आता धावत्या ‘मेट्रो’त करा वाढदिवसाचे आयोजन

0

 

मेट्रोची ‘सेलिब्रेशन ऑन व्हील’ संकल्पना जोमात

नागपूर , ता. १२ : धावत्या मेट्रोमध्ये वाढदिवसाचे किंवा अन्य कार्यक्रमांचे सेलिब्रेशन….ही संकल्पनाच धम्माल आहे ना….! तर मग सज्ज व्हा धम्माल करण्यासाठी….सेलिब्रेशन ऑन व्हील करण्यासाठी….नागपूर मेट्रोने यासाठी एक आगळीवेगळी संकल्पना मांडली आणि अल्पावधीतच या संकल्पनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळू लागला आहे.
मेट्रोने प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबविणे सुरू केले आहे. धावत्या गाडीत वाढदिवस साजरा करायचा असेल तर आता मेट्रो तुम्हाला भाड्याने मिळेल. त्यासाठी केवळ तीन हजार रुपये मोजावे लागतील. फक्त वाढदिवसच नव्हे तर इतरही उत्सवी कार्यक्रमासाठी ही योजना आहे. ‘सेलिब्रेशन ऑन व्हील’ असे त्याला नाव देण्यात आले आहे. नागपुरातील मेट्रो ही जागतिक दर्जाची असल्याचा दावा नेहमीच केला जातो. अतिशय विक्रमी वेळेत तिचे दोन टप्पे सुरू झाले. प्रवासी वाढावे म्हणून महामेट्रो अनेक उपक्रम राबवत आहे. नव्या योजनेनुसार, तुम्ही तुमचा वाढदिवस धावत्या मेट्रोत साजरा करू शकता. ३ कोचच्या मेट्रोमध्ये आयोजकांना १५० जणांना बोलवता येईल. मेट्रोची क्षमता जास्त असली तरी कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता एका वेळी केवळ १५० जणांना प्रवेश असेल.
सेलिब्रेशनसाठी तुम्हाला मेट्रोची बुकिंग करायची असेल तर एका तासाकरिता केवळ तीन हजार रुपये भाडे आकारले जाईल. अतिरिक्त वेळेकरिता दोन हजार प्रति तास द्यावे लागेल. विशेष म्हणजे कार्यक्रमासाठी महामेट्रो सजावट करून देणार आहे. केवळ नागपुरातीलच नव्हे तर वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा या पूर्व विदर्भातील जिल्ह्यांसह पश्चिम विदर्भातील नागरिकही या ‘सेलिब्रेशन’चा आनंद घेऊ शकतील. यासाठी सात दिवसअगोदर मेट्रोचे मुख्यालय असलेल्या दीक्षाभूमीसमोरील मेट्रो भवन येथे बुकिंग करावी लागेल. अधिक माहितीसाठी किंवा नोंदणीसाठी ०७१२-२५५४२१७, ७८२७५४१३१३, ८३०४१८०६५, ९३०७९०११८४ येथे संपर्क साधू शकता. akhilesh.halve@mahametro.org या मेलवरही आपण संपर्क साधू शकता. चला तर मग तयार व्हा….सेलिब्रेशनसाठी….!

पातुर शहरातील विविध विकास कामासंबधी नगरपरीषद बांधकाम सभापती सौ.तुळसाबाई गाडगे यांची मागणी…

0

 

जिल्हा प्रतिनिधी अतिशकुमार वानखडे

अकोला:- स्थानिक स्वराज्य संस्था नियुक्त

(विधानपरिषद) आमदार मा.गोपीकिशन बाजोरिया यांना पातुर नगरपरीषद बांधकाम सभापती सौ.तुळसाबाई गाडगे यांच्या शिष्ट मंडळाने भेट घेऊन पातुर शहरातील विविध विकास कामासंबधी त्यांच्या पत्राद्वारे मागण्या केल्या त्यामध्ये
१) पातुर ते भंडारज शेतरस्ता खडीकरण व डांबरीकरण
२) अती प्राचिन असे श्री खडकेश्वर मंदिर येथे सुरक्षा सिमा भिंत आणी सभामंडप
३) शहरासाठी कार्डियो रूग्णवाहीका इत्यादी कामांसाठी त्यांच्या आमदार निधितून निधी उपलब्ध करण्यात यावे यासाठी त्यांना निवेदन देण्यात आले.
याप्रसंगी पातुर नगरपरीषद बांधकाम सभापती सौ.तुळसाबाई गाडगे , युवा सेना शहर प्रमुख योगेश फुलारी , भाजपा शहर उपाध्यक्ष गणेश गाडगे , पातुर तालुका विकास मंचाचे संयोजक ठाकुर शिवकुमारसिंह बायस , राहुल अत्तरकार , रितेश सौंदळे गुरूजी व किरण कुमार निमकंडे आदी मान्यवर उपस्थीत होते.

जळगाव जामोद तहसील कार्यालयासमोर तालुका शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करीत रावसाहेब दानवे यांचा निषेध…

0

 

गजानन सोनटक्के
जळगांव जा.प्रतिनिधी

शिवसेनेच्यावतीने रावसाहेब दानवे यांचा निषेध दिल्लीतील शेतकरी आंदोलनाबद्दल बोलताना मंत्री दानवे यांनी या आंदोलनाला पाकिस्तान आणि चीनकडून मदत मिळत असल्याचे वक्तव्य केले आहे.शेतकरी स्वत:च्या हितासाठी लढत असताना त्यांना शत्रू राष्ट्रांकडून मदत मिळत असल्याचे म्हणणे म्हणजे आपल्या घाणेरड्या विचारसरणीचे प्रदर्शन आहे. दानवे यांनी यापूर्वीही शेतकऱ्यांबद्दल निंदनीय वक्तव्य केले होते. त्यावेळी त्यांचे शेतकऱ्यांबद्दल असलेले विचार लोकांना कळून चुकले होते. दानवे यांचे ते वक्तव्य शेतकरी अद्याप विसरलेले नाहीत. हेच दानवे जेव्हा आता पुन्हा शेतकऱ्यांच्या आंदोलनासंबंधी वक्तव्य करतात तेव्हा पुन्हा एकदा त्यांची तीच विचारसरणी पुढे येत आहे. यापुढे दानवे यांना आम्ही राजकीय विरोधक म्हणून काही उत्तर देण्यापेक्षा सर्वसामान्य लोकच त्यांना योग्य ते उत्तर देतील. अशा लोकांचे वक्तव्य जास्त कोणीही फारसे मनाला लावून घेऊ नये, असे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटते. मात्र ते असेच पुन्हा पुन्हा बोलत राहिले तर आम्ही सुद्धा शांत राहणार नाही.तसेच पंतप्रधान यांनी रावसाहेब दानवे यांचा राजीनामा मागावा कारण नेहमीच ते शेतकरी विरोधात वक्तव्य करत असतात.असे वक्तव्य करणाऱ्या दानवे यांचा निषेध करुन दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाविषयी ही वक्तव्य करणाऱ्या रावसाहेब दानवे चा निषेध करून रावसाहेब दानवे यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख गजानन वाघ यांनी केली गेल्या बारा महिन्यापासून पेट्रोल डिझेलची वाढ होत असून सामान्य जनता त्रस्त झालेली असून त्यात होरपळून निघत आहे प्रशासनाचा निषेध करून रावसाहेब दानवे यांचा त्वरित राजीनामा घ्यावा अन्यथा शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल.यावेळी गजानन वाघ तालुकाप्रमुख, नगरसेवक रमेश ताडे,पुंडलिक पाटील,देविदास घोपे,संजय भुजबळ, समाधान पाटील, संतोष बोरसे,राजेश पांधी, शुभम पाटील, विशाल पाटील, पुंडलिक धुळे, शिवाजी मेहसरे,चांद कुरेशी, पांडुरंग उगले, दिलीप आकोटकर, अक्षय भालतडक, ईश्वर वाघ, दीपक बावस्कार, सुनील खवले,गजानन धुळे, गणेश धुळे, मुन्ना रावनचवरे, प्रशांत ताडे, गजानन देशमुख, रमेश हागे, संकेत रहाटे, मधू धुर्डे, केशव काळपांडे,दिलीप सिंह ठाकुर, युवराज देशमुख, सुभाष माने, अनिल खरे, पंकज भगत, गुड्डू काजी, नवाब देशमुख, शेख रफीक यांच्यासह शेकडो कार्यकर्ते हे यावेळी उपस्थित होते.

बी पी एल चा दाखला ग्रामपंचायत स्तरावर मिळणार

0

 

 

(सूर्या मराठी न्युज ब्युरो)

आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या पाठपुराव्याची ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी घेतली दखल

चंद्रपूर : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दारिद्रय रेषेखालील कुटुंब आहेत. यापूर्वी तालुका स्तरावरील पंचायत समिती मधून मिळत होते. त्यामुळे दारिद्रय रेषेखालील कुटुंबाना आर्थिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागत होता. समाजातील बी. पी. एल मध्ये असणाऱ्या घटकाला होणार त्रास अधिक होत होता. छोट्या कागदपत्रांच्या पूर्ततेकरिता त्यांना तालुक्यातील पंचायत समिती मधील अधिकाऱ्याच्या मागे चकरा माराव्या लागत होत्या. हि पायपीट बंद करून बी. पी. एल चा दाखला ग्रामपंचायत स्तरातून देण्याची लोकहितकारी मागणी आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे केली होती. त्यांनी या मागणीची दखल घेत ७ डिसेंबर २०२० रोजी अधिसूचना काढून हि मागणी मान्य केली.
दारिद्र्य रेषेखालील लोकांना उदरनिर्वाह हा त्यांच्या दैनंदिन रोजगारावर अवलंबून असतो. हातावर आणून पानावर खाणारा हा वर्ग आहे.बी. पी. एल चा दाखल मिळविण्याकरिता रोजगार बुडवून ग्रामीण भागातून तालुक्यातील पंचायत समिती येथे जावे लागते. पंचायत समिती येथे अधिकारी, कर्मचारी उपस्थित नसल्यास त्याला बी. पी. एल चा दाखला मिळविण्याकरिता वारंवार चकरा माराव्या लागतात. यामध्ये त्यांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे बी. पी. येत चा दाखल हा पंचायत समिती मार्फत न देता ग्रामपंचायत मार्फत दिल्यास बी. पी. एल चा धारकांना होणार त्रास बंद होईल.
त्यामुळे पूर्वी प्रमाणे बी. पी. एल चा दाखला ग्रामपंचायत स्तरातून देण्याची लोकहितकारी मागणी आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे केली होती. त्याची दखल घेत हा निर्णय हा निर्णय घेण्यात आला.
समाजाच्या शेवटच्या घटकाला त्रास होऊ नये. महिलांवर होणारे अत्याचार बंद करण्याकरिता कडक कायदे, शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला योग्य भाव मिळावा. याकरिता आमदार प्रतिभाताई धानोरकर नेहमी आग्रही राहिल्या आहेत. या त्यांच्या पाठपुराव्यामुळे आता बी. पी. एल धारकांची पायपीट बंद होणार आहे. समोर देखील अविरत समाजाच्या शेवटच्या वर्गासाठी काम करत राहू अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. या निर्णयाचे सर्वच स्थरातून स्वागत करण्यात येत आहे.

बालाघाट पोलिसांच्या चकमकीत दोन महिला नक्षलवादी ठार

0

 

गोंदिया-शैलेश राजनकर

गोंदिया (बालाघाट). बालाघाट पोलिसांनी नक्षलवाद्यांविरूद्ध चालवलेली मोहीम मोठं यश होतं. किरणपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत बोरवण वन कॉम्प्लेक्समध्ये बालाघाट पोलिस आणि नक्षलवाद्यांच्या चकमकीत दोन महिला नक्षलवाद्यांचा मृत्यू झाला. नक्षलवाद्यांमधील शोभे आणि भादो या माजी नक्षलवादी कमांडर राकेशची पत्नी यांच्याकडून माहिती मिळाली आहे. वरील मोहिमेचे नेतृत्व बालाघाटचे पोलिस अधीक्षक अभिषेक तिवारी यांनी केले. गुप्त माहिती मिळाल्यावर वरच्या भागात मोठ्या संख्येने नक्षलवादी आले आहेत. त्यानंतर त्यांना सुरक्षा दलांनी शरण जाण्यास सांगितले परंतु त्यांना नक्षलवाद्यांनी गोळ्या घातल्या, त्यानंतर प्रतिक्रियेत एका महिला नक्षलवाद्याला ठार मारण्यात आले, विशेषत: November नोव्हेंबर रोजी बालाघाट पोलिसांनी कान्हा राष्ट्रीय उद्यानाजवळील मलखेडी जंगलातील एक महिला नक्षलवादी ढेर केले होते आणि पोलिसांकडून शोधमोहीम सुरू आहे. आणि आता चकमक सुरू होण्याविषयी माहिती प्राप्त झाली आहे.

पालकमंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांची शिंदी येथे सांत्वनपर भेट !

0

 

सिंदखेडराजा (सचिन खंडारे )

बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ . राजेंद्र शिंगणे यांनी सिदखेडराजा तालुक्यातील शिंदी येथे आज दिनांक 12 डिसेंबर रोजी दुपारी चार वाजता सांत्वनपर भेट दिली ‘यामध्ये शिंदी येथील माजी उपसरपंच सुभाष वायाळ तसेच दशरथ बंगाळे व किशोर गंभीरराव बंगाळे – कमळाबाई बरकूल .या मयत झालेल्या व्यक्तींच्या घरी डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी सांत्वनपर भेट देऊन त्यांच्या परिवाराचे सांत्वन केले ‘यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष एडवोकेट नाझेर काझी ‘ शिंदी येथील सरपंच विनोद खरात ‘संतोष खरात ‘भगवान पाटील ‘पंजाबराव हाडे ‘ शिवदास खरात ‘निवृत्ती खरात बागायतदार । सुनील खंडारे ‘ सचिन खंडारे ।माझी हा जिल्हा परिषद उपाध्यक्ष रामभाऊ जाधव साखरखेडा चे माजी सरपंच कमलाकर गवई पत्रकार सय्यद रफिक सुनील जगताप दाऊद सेट कुरेशी नितीन डाखोरे आदी यावेळी उपस्थित होते ‘

मांडवा येथील जिल्हा परिषद मराठी शाळेच्या परिसरात घाणीचे साम्राज्य

0

 

पुसद पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या जिल्हा परिषद मराठी शाळा मांडवा शाळेसमोरील नाल्यावरील धाबा (रपटा) साप न केल्यामुळे नालीचे पाणी शाळेच्या आवारात जात होते .

ही तक्रार ग्रामसेवकांकडे नागरिकांनी केल्यानंतर ग्रामसेवकांनी नालीवरील धाबा (रपटा) साफ न करताच शाळेच्या गेटसमोर सिमेंट काँग्रेटचा बांध टाकून या नवीन लढविलेल्या शकलीमुळे शाळेच्या गेटसमोरील नालीचे पाणी नालीत न जाता रोडवरून वाहत आहे .

त्यामुळे वार्ड क्रमांक ३ कडे जाणाऱ्या रस्त्यावरून ये – जा करताना नागरिकांना चिखलातून मार्ग शोधावा लागत आहे . तसेच शाळेच्या गेटसमोर पाणी साचल्यामुळे दुर्गंधी पसरत आहे. व बाजूलाच अंगणवाडी क्रमांक २ आहे. या नालीवरील धाबा (रपटा ) तो फोडून नवीन धाबा नालीपेक्षा उंच करावा जेणेकरून नाली मधील कचरा साफ करता येणे शक्य होईल. असे समस्त नागरिक मागणी करत आहे.

त्याचबरोबर ही बाब शाळा सुधार समिती अध्यक्ष विष्णू ईखार यांनी ग्रामसेवक मंगेश देशमुख यांना अनेक वेळा सांगून सुद्धा ग्रामसेवकांचे
या बाबीकडे पूर्णपणे दुर्लक्ष दिसत आहे.

वंचित बहुजन आघाडीचा सत्कार समारंभ व पक्षप्रवेश कार्यक्रम हा जेतवन बुद्ध विहार वरवट बकाल येथे संपन्न झाला

0

 

उदेभान दांडगे
विदर्भ प्रतिनिधी

या कार्यक्रमात प्रमुख उपस्तीत जिल्हाचे जिल्हा अध्यक्ष आयु. गणेश भाई चौकसे उपाध्यक्ष आयु.विजय हागे तर महिला जिल्हाअध्यक्षा आयुष्यमती विशाखा ताई सावंग व आयुष्यमती प्रीतिताई शेंगोकार जिल्हा उपाध्यक्षा तथा शेगाव नगर सेविका,चेतन घिवे, दशरथ सुरळकर,देविदास दामोदर,उत्तम उमाडे व इतर जिल्ह्यातील तालुक्यातील पदाधिकारी या सत्कार समारंभात हजर होते या कार्यक्रमाचे आयोजन आयु.संजीव इंगळे जिल्हा सचिव वरवट बकाल यांनी केले तर सुत्र संचालन आयु.विजय भाऊ पाहुरकर तालुका महासचिव यांनी केले
या कार्यकर्माचे वैशिष्ट्य म्हणजे वंचित बहुजन आघाडी नव्याने गावं तेथे शाखा कश्याप्रकारे उभी होऊन व सर्व सोशीत पिळीत वंचित बहुजन समाजातील विविध समाजातील लोकांना कसा न्याय मिळेल असा पक्ष आपणाला या जिल्हात उभा करायचा आहे

शेगावात तिहेरी तलाकची तक्रार, चिखलीच्या शे. मोहसीन विरुद्ध नव्या कायद्यानुसार गुन्हा दाखल अनैतिक संबंधाला विरोध केला म्हणून दिली तलाक

0

 

आयुषी दुबे शेगाव

शेगाव (प्रतिनिधी) दि १० तिहेरी तलाक देणे हा कायद्याने आता गुन्हा ठरला असला तरी, अशा पद्धतीने तोंडी तलाक देण्याचे प्रकार काही थांबलेले नाहीत. चिखली येथील एका महिलेने शेगाव पोलिस ठाण्यात पती विरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनीही त्याची दखल घेतली आहे. पतीने तिला माहेरात येऊन शिवीगाळ करीत तीन वेळा तलाक म्हटल्याचे संबंधित महिलेने पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत म्हटले आहे. याचबरोबर सासरच्या मंडळींनी त्रास दिल्याचेहि तक्रारीत नमूद केल्याने पोलिसांनी पती सह 3 जणांविरुद्ध विविध गुन्हे दाखल केले आहे.
चिखली येथील शे.मोहसीन अ.कादर या युवकाचे शेगाव येथील एका युवतीसोबत दिड वर्षांपूर्वी मुस्लिम रितीरिवाजाप्रमाणे लग्न पार पडले होते. लग्नानंतर मात्र आपल्यापतीचे एका महिलेशी अनैतिक संबंध असलयाचे समजल्यावरून अनेकवेळा पतीला समजावण्याचा प्रयत्न केले असता पती सह सासरकडील मंडळींनी शारीरिक व मानसिक छळ करण्यास सुरुवात केली. दरम्यान पत्नी आपल्या अनॆतिक संबंधाला विरोध करीत आहे म्हणून २२ नोव्हेंबर रोजी या मुलीला बेदम मारहाण करून घरातून हाकलून देण्यात आले. यानंतर ७ डिसेंबर रोजी पती शे. मोहसीन, सासरा अ. कादर, सासू मालन या 3 जण यांनी शेगावात येऊन मुलीकडील मंडळींना अश्लील शिवीगाळ केली. आणि पती शेख मोहसीन याने आपल्या पत्नीला सांगितले कि, मी एक महिला नाही दहा महिला सोबत अनैतिक संबंध ठेवेल तुझ्याने जे होत असेल ते कर असे म्हणून “मै तुझे अभि तलाक देता हु तलाक, तलाक , तलाक म्हणून शिवीगाळ करत निघून गेले. या प्रकरणी ८ डिसेंबर रोजी पीडित विवाहितेने शेगाव शहर पो. स्टे. ला तक्रार दाखल केल्यावरून पती शेख मोहसीन सह सासू, सासरा अशा 3 जणांविरुद्ध मुस्लिम महिला विवाह अधिकार संरक्षण कायद्याअंतर्गत कलम 498, 323, 504, 34 भादवी मुस्लीम महिला विवाह संरक्षण अधिनियम 18 कलम 4 नुसार शे. मोहसीन अ. कादर वय 28 वर्ष, अ. कादर अ. रज्जाक वय 50 वर्ष व मालन बी अ. कादर वय 45 वर्ष या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सध्या सर्व आरोपी फरार आहेत.