Home Blog Page 567

8 दारू अड्ड्यांवर धाड घालून 9.52 लाख

0

 

गोंदिया-शैलेश राजनकर

दि. 20शहरातील अवैध व्यवसायांवर आळा बसावा या उद्देशाने अवैध दारू अड्ड्यांवर धाड घालण्याचे सत्र तिरोडा पोलिसांनी सुरू केले आहे. शहरातील संत रविदास वॉर्डातील 8 अवैध दारू अड्ड्यांवर धाड घालून तब्बल 9 लाख 52 हजार 450 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई आज शनिवारी, 19 डिसेंबर रोजी करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील संत रविदास वॉर्ड येथे काही लोक अवैध दारू बाळगून, दारू गाळण्यासाठी सडवा रसायन भिजत घातलेला असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्या माहितीवरुन पोलिसांनी सकाळी 10 वाजताच्या सुमारास पोलिसांचे वेगवेगळे 8 पथक तयार केले व त्यानंतर 8 दारू अड्ड्यांवर धाड घातली. या कारवाईत मोहफुलापासून दारू गाळण्याच्या दोन भट्ट्या व साहित्य असा एकूण 9 लाख 52 हजार 450 रूपयांचा मुद्देमाल जप्त करून घटनास्थळी नष्ट केला. यात 2 हजार 450 रुपयांचे साहित्य, 10 हजार रुपये किमतीची मोहफुलांची 100 लिटर दारू, 1175 प्लास्टीक पोतींमध्ये प्रत्येकी 10 किलो याप्रमाणे 9 लाख 40 हजार रुपये किमतीचा 11 हजार 750 किलो दारू गाळण्याकरिता भिजत घातलेला रसायनयुक्त सडवा मोहफूल यांचा समावेश आहे.
आरोपींमध्ये मिलन कुवरदास , मनिषा धीरज बरियेकर, वनमाला भीमराव झाडे, कविता सेवकराम तांडेकर, माया शामराव झाडे, सूरज प्रकाश बरियेकर, रूपवंता ईश्वर बरियेकर, आशा राजेंद्र भोंडेकर सर्व रा. संत रविदास वॉर्ड तिरोडा यांचा समावेश आहे. या सर्व आरोपींवर दारूबंदी कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
कारवाई करणारे पथक
ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन यादव यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक योगेश पारधी, सहायक पोलीस निरीक्षक हनुवते, पोलीस उपनिरीक्षक अशोक केंद्रे, पोलीस हवालदार दामले, साठवणे, पोलीस नायक थेर, सव्वालाखे, बरवैया, बर्वे, श्रीरामे, बांते, मडावी, पोलीस शिपाई बिसेन, अंबादे, भांडारकर, लोंढे, महिला पोलीस नायक मडावी, तिरीले यांनी केली.

व्हॉट्सॲप पेमेंट्स आता उपलब्ध : UPI मार्फत व्हॉट्सॲपवरूनच पाठवा पैसे!

0

 

प्रथम ज्याला पैसे पाठवायचे आहेत त्याच्या चॅटवर जा.
आता आपण नेहमी फोटो पाठवत असताना जे अटॅच बटन (📎) टच करतो त्यावर स्पर्श करा.
आता तुम्हाला कॅमेरा, गॅलरी, ऑडिओ, डॉक्युमेंट, लोकेशन, कॉनटॅक्ट सोबत नवा Payment पर्याय आलेला दिसेल. (जर दिसत नसेल तर व्हॉट्सॲप प्ले स्टोअरवरून अपडेट करून घ्या)
त्यावर क्लिक करून ACCEPT AND CONTINUE वर स्पर्श करा.
आता तुमची बँक निवडा.
आता तुमचं बँक अकाऊंट आणि क्रमांक तपासण्यासाठी Verification SMS येईल. ही प्रक्रिया आपोआप पूर्ण होईल.
हे तुम्हाला तुम्ही पैसे पाठवत असणाऱ्या व्यक्तीला एकदाच करावं लागेल. हा सेटप तुम्ही दोघांनी केला असेल तरच ही सोय वापरता येईल.
जर समोरच्या व्यक्तीने सेटप केला नसेल तर Notify पर्याय दिसेल त्याद्वारे त्यांना सेटप करण्यास सांगू शकता.
आता तुम्ही Send Payment पर्याय वापरुन फोनपे गूगल पे प्रमाणेच रक्कम टाकून UPI पिन टाइप करून पैसे पाठवू शकता .
याद्वारे केलेले व्यवहार मेसेजेसमध्ये व एका यादीद्वारेही पाहू शकाल.

बाबुल की दुवाँये लेती जा…. गृहमंत्री करणार मानस कन्येचे कन्यादान

0

 

रविवारी नागपुरात लग्नसोहळा

 

नागपूर, दि.१८ : बाबुल की दुवाँये लेती जा…. जा तुझको सुखी संसार मिले… असा आशीर्वाद एका मानस कन्येला गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कडून मिळत असेल तर..आणखी काय पाहिजे.!

हे काही चित्रपटाचे कथानक नसून वास्तव आहे. मतीमंद व मुकबधीर अनाथ मुलांच्या संगोपनासोबतच पुनर्वसनासाठी कार्य करणारे ज्येष्ठ समाजसेवी शंकरबाबा पापडकर यांची मानस कन्या कु. वर्षा शंकरबाबा पापडकर व अनाथालय बालगृहातील समीर यांचा विवाह संपन्न होत आहे. या विवाहात कु. वर्षा हिचे कन्यादान वधुपिता-माता म्हणून गृहमंत्री अनिल देशमुख व सौ. आरती देशमुख करणार आहेत.
अमरावती जिल्ह्यातील वझ्झर येथे स्व. अंबादासपंत वैद्य मतीमंद, मुकबधीर अनाथालय येथे 23 वर्षापूर्वी नागपूर रेल्वे स्टेशनवर बेवारस अवस्थेत पोलीसांना सापडलेल्या मुलीचे संगोपन करुन चिमुकलीचा तिचा आईवडीलाप्रमाणे सांभाळ करुन तिला वडीलाचे नाव दिले. ती सहा वर्षाची झाल्यानंतर शिक्षणाकरीता संत गाडगेबाबा निवासी मुकबधीर विद्यालय येथे चौथीपर्यंत शिक्षण देवून स्वत:च्या पायावर उभे केले. तर डोंबिवली येथे बेवारस स्थितीत सापडलेल्या दोन वर्षाच्या समीरचे सुध्दा वझ्झर येथील अनाथालयात शंकरबाबा पापडकरांनी स्वत:चे नाव देवून सांभाळ केला. सातव्या वर्गापर्यंत शिक्षण पूर्ण केल्यानंतर स्वावलंबी जीवन जगता यावे यासाठी नोकरी मिळवून दिली.
श्री. देशमुख यांच्या नागपूर निवासस्थानी त्यांच्या सुनबाई सौ. रिध्दी देशमुख यांनी नव वधु वरांचे स्वागत व औक्षण करुन लग्नसोहळयाच्या पूर्व विधींची सुरुवात केली.
जिल्हाधिकारी वरपिता
मुकबधीर असलेल्या समीर याच्या वरपित्याची जबाबदारी जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे व सौ. ज्योत्स्ना ठाकरे यांनी स्वीकारली आहे. रविंद्र ठाकरे व सौ. ज्योत्सना ठाकरे यांनी आज समीर व वर्षा यांना विशेष निमंत्रित केले.

बालगृहातील कु. वर्षा सोबत लग्न करण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर शंकरबाबांनी स्वतंत्र घर तसेच पुढील पुनर्वसनाच्या दृष्टीनेसुध्दा स्वावलंबी केले. त्यानंतरच दोघांच्या विवाहाला समंती दिली. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी बालगृहाला भेट दिली असता दोघांच्या विवाहाचा प्रस्ताव ठेवून संमती मिळाल्यानंतर कन्यादान करण्याचे त्यांनी मान्य केले. हा विवाह ‘सदभावना लॉन’ सीआयडी ऑफिस समोर पोलिस लाइन टाकळी नागपूर येथे दि. 20 डिसेंबर 2020 रोजी सायंकाळी 5.00 वाजता संपन्न होणार आहे. कोरोना संदर्भात राज्य सरकारने ज्या अटी घालून दिलेल्या आहेत त्या अटींना पाळून या विवाह सोहळ्यात नागरिकांनी उपस्थित राहून वधूवरांना शुभ आशीर्वाद द्यावेत असे आवाहन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले आहे. जर या मूकबधिर दांपत्यास संसारोपयोगी साहित्य दिले तर मला आनंदच होईल असे मत सुद्धा यावेळी अनिल देशमुख यांनी व्यक्त केले.

नऊ वर्षीय चिमुकल्याला सावत्र आईने गरम तव्यावर उभे करून चटके दिल्याची धक्कादायक घटना

0

 

सुनील पवार नांदुरा

बुलढाणा : नऊ वर्षीय चिमुकल्याला सावत्र आईने गरम तव्यावर उभे करून चटके दिल्याची धक्कादायक घटना नांदुरा तालुक्यातील जवळा बाजार येथे समोर आली आहे. आर्यन सचिन शिंगोटे असे चिमुकल्याचे नाव आहे त्याला उपचारासाठी अकोला हलवण्यात आले आहे.

आर्यन सचिन शिंगोटे याच्या आईने आत्महत्या केल्याने मुलांचा सांभाळ करण्यासाठी सचिन शिंगोटे ह्याने दुसरे लग्न केले होते.पंरतु मुलांचा सांभाळ करण्याऐवजी सावत्र मुलाचा छळ करण्यात येत होता. चार दिवसांपूर्वी आर्यनची सावत्र आई शारदा हिने आर्यनचे हातपाय पकडून त्याला गरम तव्यावर उभे देऊन चटके दिले. त्याने आरडाओरड करू नये म्हणून त्यांचे तोंडही दाबून ठेवण्यात आले होते. तीन दिवसांपासून आर्यन घराच्या बाहेर येत नाही असे दिसल्याने शेजाऱ्यांनी घरात जाऊन बघितल्यावर हा धक्कादायक प्रकार शेजारच्यांच्या लक्षात आला.

शेजारच्यांनी त्याला त्वरित खामगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. परंतु प्रकुती चिंताजनक असल्याने त्याला अकोला येथे दाखल करण्यात आले आहे. विशेष म्हणजे आर्यनचे वडील सचिन शिंगोटे हा प्रकार डोळ्याने बघत असूनही त्याने मध्यस्थी केली नाही. याप्रकरणी बोरोखेडी पोलिसांनी नोंद घेतली असून पुढील करवाईसाठी पोलिस पथक अकोला येथे गेले आहे.

विद्यार्थ्यांना लवकरात लवकर मार्कशीट उपलब्ध करून घा _ कुणाल ढेपे

0

 

नुकत्याच ऑनलाईन पद्धतीने संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षा पार पडल्या ऑनलाईन पद्धतीने झालेल्या परीक्षांचे निकाल लागले असून समोरील अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्याकरता विद्यार्थ्यांना मार्कशीट मिळवण्यासाठी मात्र विद्यापीठात पायपीट करावी लागत आहे, बहुतांश विद्यार्थ्यांचे निकाल रोखल्या गेले असून मार्कशीट मध्ये चुकांचे प्रमाण सुद्धा प्रचंड आहे मार्कशीट मधील चुका दुरुस्त करण्यासाठी विद्यापीठांतर्गत येणाऱ्या पाचही जिल्ह्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना कोरोनाच्या काळात विद्यापीठत चकरा माराव्या लागत आहेत त्यामुळे जत्रेचे स्वरूप विद्यापिठात आले असून विद्यार्थ्यांना प्रचंड आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहेत, विद्यार्थ्यांना होत असलेल्या त्रासाबदल आज अमरावती जिल्हा अध्यक्ष कुणाल भाऊ ढेपे यांनी हेमंत सर देशमुख संचालक , परीक्षा मंडळ ,परीक्षा मुल्यमापन संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ यांना निवेदन सादर करत विद्यार्थ्यांना होत असलेल्या त्रासाची जाणीव करून दिली, सोमोरील अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यावाचून कुढलही विद्यार्थी वंचित राहू नये याकरिता विद्यार्थ्यांच्या मार्कशीट शक्य होते लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यात याव्यात अशी नम्र विनंती

पोलिसाचा महिलेवर अत्याचार,गुन्हा दाखल 

0

 

(सूर्या मराठी न्युज ब्युरो)

अहमदनगर,दि.19 : सोलापूर जिल्ह्यात राहणार्‍या घटस्फोटीत महिलेशी लग्नगाठी जुळविणार्‍या संकेतस्थळावरुन लग्नाची मागणी घालीत तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. लैंगिक अत्याचार, तिच्या दहा वर्षीय मुलीला मारहाण, दमदाटी करणे व बेकायदा गर्भपात केल्याप्रकरणी घारगाव पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस शिपाई सुनील रत्नपारखी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच आळेफाटा येथील डॉक्टर आणि अकोल्यातील एका महिलेसह दोघांवर अत्याचार, अ‍ॅट्रोसीटी, बेकायदा गर्भपात व पॉस्कोतंर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने पोलीस वर्तुळासह वैद्यकीय व्यावसायिकांमध्येही खळबळ उडाली आहे.

सोलापूर जिल्ह्यात राहणार्‍या एका 33 वर्षीय घटस्फोटीत तरुणीने आपल्या पुनर्विवाहासाठी ऑनलाईन लग्नगाठी जुळविणार्‍या संकेतस्थळावर आपल्या नावाची नोंद केली होती. याचवर्षी 11 जानेवारी रोजी घारगाव पोलीस ठाण्यात शिपाई म्हणून कार्यरत असलेल्या सुनील रत्नपारखी या कर्मचार्‍याची संकेतस्थळावरील नोंदीवरुन महिलेशी ओळख झाली. संबंधित पोलीस शिपायाने आपणही घटस्फोटीत असून आपणास दोन मुली आहेत व त्या दोघीही आपल्यासोबतच राहतात असे त्या महिलेला सांगीतले. त्यावरुन त्या दोघांचीही लग्नावरुन परस्पर सहमती झाल्यानंतर जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात लग्न करण्याचा निर्णय घेतला.

त्यानंतर त्या कर्मचार्‍याने थेट त्या महिलेचे सोलापूर जिल्ह्यातील गाव गाठले. त्यावेळी त्याने सदर महिलेच्या आई व भावांशी चर्चा करुन लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. 17 फेब्रुवारी रोजी सदर महिला सोलापूरहून शिर्डीत आली. संबंधित कर्मचार्‍याने तिला शिर्डीतून थेट घारगावला आणले. त्या दिवशी त्या कर्मचार्‍याला रात्रपाळी असल्याने त्याने त्या महिलेला तिच्या व स्वतःच्या मुलीसह आपल्या घरी ठेवले. त्या संधीचा फायदा घेवून त्याने त्या महिलेच्या इच्छेविरुद्ध तिच्यावर अत्याचार केल्याची फिर्यादीत नोंद करण्यात आली आहे.

त्या दरम्यान त्याने वेळोवेळी लग्नाचे अमिष दाखवित तिच्यावर अत्याचाराचा सिलसिला सुरुच ठेवला. त्यातून तिला गर्भधारणा झाली अखेर त्या पोलीस कर्मचार्‍याचे नातेवाईक असलेले अकोले तालुक्यातील अमोल कर्जुले व त्याची आई यांनी घारगावात येवून गर्भपातासाठी तिच्यावर दबाव आणला. यातून त्या महिलेच्या दहा वर्षीय मुलीलाही मारहाण, शिवीगाळ व दमदाटी करण्यात आली असल्याचा फिर्यादीत उल्लेख आहे. दरम्यान या फिर्यादीवरून घारगाब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सर्व आरोपी फरार झाले असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहे.

आरोपी पोलीस शिपाई सुनील रत्नपारखी, आळे येथील निरामय रुग्णालयाचे डॉक्टर व्ही.जी.मेहेर, त्या पोलीस शिपायाचे नातेवाईक अमोल कर्जुले व त्याची आई अशा चौघांवर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह भा.द.वी 376, 376(2)(एन), 313, 354, 354 (ए), 323, 504, 506, 34 प्रमाणे व बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण करणार्‍या कायद्याचे कलम 10 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

वंचित बहुजन आघाडी मराठवाडा विभागीय प्रवक्ता डॉक्टर धर्मराज चव्हाण सर यांच्या उपस्थितीमध्ये शिकलगार समाज बांधवांनी वंचित बहुजन आघाडी आघाडी मध्ये पक्ष प्रवेश केला .

0

 

अनिलसिंग चव्हाण
मुख्य संपादक

वंचितांच्या न्यायहक्कासाठी सदैव व वंचित बहुजन आघाडी लढा देत आहे व लढा देत राहणार या सर्व कार्याची पोचपावती पाहता भटक्या इतर समाजातील बांधवांचा वंचित बहुजन आघाडी पक्ष प्रवेश धडाडीने होत आहे सदरील पक्ष प्रवेश कार्यक्रम प्रसंगी उपस्थित परभणी जिल्ह्याचे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष चंद्रसिंग बावरी परभणी जिल्हा महासचिव प्राध्यापक सुभाष सोनवणे परभणी भारिप शहराध्यक्ष बी आर आव्हाड सर, सम्यक विद्यार्थी आंदोलन महाराष्ट्र सदस्य डॉक्टर अविनाश सावंत आधी
यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला. पक्षप्रवेश सदरील बांधव रूकमा सिंग बावरी झरी , किरण सिंग जुनी , अंगद सिंग जुनी ,मंगल सिंग जुनी

रामाळा तलाव खोलीकरण-सौदर्यीकरण करीता इको-प्रो ची मुक निदर्शने

0

 

महाराष्ट्र शासनाच्या ‘माझी वसुंधरा अभियान’ अंतर्गत व्हावे रामाळा तलावाचे संवर्धन

ऐतीहासीक रामाळा तलाव वाचविण्याकरीता इको-प्रो व चंद्रपूरकरांचा आंदोलनास सुरूवात

चंद्रपूर: शहरातील एकमेव ऐतिहासिक गोंडकालीन मात्र
आज प्रदुषीत झालेल्या रामाळा तलावाचे खोलीकरण व सौदर्यीकरणाच्या मागणीकरीता इको-प्रो च्या सदस्यांनी रामाला तलावाच्या काठावर एकत्रीत येत ‘मुक निदर्शने’ केलीत.
इको-प्रो संस्थेच्या पर्यावरण विभागतर्फे आज रामाळा तलाव काठावर तलावाचे खोलीकरण-सोंदर्यीकरणाच्या मागणी करीता संस्थेचे सदस्य व तलावात नियीमत पोहायला येणारे नागरीक व स्थानीकांनी या मुक निदर्शने मध्ये सहभाग घेत ऐतिहासीक रामाळा तलाव संवर्धनाची मागणी केली आहे.इको-प्रो संस्थेचे अध्यक्ष बंडु धोतरे व इको-प्रो पर्यावरण विभागाचे प्रमुख नितीन रामटेके यांच्या नेतृत्वात आज मुक निदर्शने करण्यात आली. यावेळी मुक निदर्शने मध्ये सहभागी झालेल्या सदस्यांनी हातात विवीध मागण्यांचे बॅनर फलक घेउन तलावाच्या काठावर उभे राहुन नागरीकांचे लक्ष वेधुन घेत होते.
यावेळी सहभागी सदस्य व चंद्रपूरकरांनी हातात विवीध मागण्यांचे फलक घेउन जवळपास दोन तास निदर्शने करण्यात आली. यात मुख्य फलकातुन वसंुधरा अभियान अंतर्गत रामाळा तलावाचे संवर्धन करा, रामाळा तलाव प्रदुषणमुक्त करा, रामाळा तलावाचे खोलीकरण करा, तलाव सभोवतालचे किल्लाच्या भिंतीतील वृक्ष वेली काढुन सुरक्षीत करा, वेकोलीचे वाया जाणारे पाणी तलावात सोडा, तलावात येणारे नागरीकांचे सांडपाणी थांबवा, रामाळा तलावात येणारे मच्छीनाला वळती करा, जलनगरच्या बाजुने सुरक्षा भिंतीचे बांधकाम करा, रामाळा तलावाच्या उत्तरेकडे सांडपाणी शुध्दीकरण संयत्र उभारा, किल्ल्याच्या भिंतीचे बांधकाम करा, सेव रामाळा सेव चंद्रपूर, सेव रामाळा सेव इन्व्हारमेंट, सेव रामाळा सेव हेरीटेज आदी फलक हातात घेउन निदर्शने करण्यात आली.
या सर्व समस्या सोडविण्याच्या दृष्टीने, आपला ऐतिहासिक वारसा संरक्षणाच्या दृष्टीने तसेच शहरातील अत्यंत महत्वाचे विस्तीर्ण असे जलस्त्रोत कायमस्वरूपी संवर्धन करण्याच्या दृष्टीने व्यापकपणे कार्य करण्याची गरज आहे. तसेच या रामाळा तलावाचे सोंदर्यीकरण करून पर्यटन दृष्टया विकसीत करण्याची इको-प्रोची मागणी आहे. त्यासंदर्भात लगेच पावले उचलुन सध्या योग्य वेळ असल्याने लगेच तलावाचे पाणी सोडुन तलाव लवकर सुकविण्यात आल्यास खोलीकरणाच्या कामास यंदा सुरूवात होऊ शकते. यासोबत तलावाचे सौदर्यीकरणास सुध्दा मोठी संधी निर्माण होऊ शकते अशी आशा इको-प्रो चे बंडु धोतरे यांनी व्यक्त केली आहे.

आज करण्यात आलेल्या मुक निदर्शने मध्ये चंद्रपूरकर रमेश बोथरा, अॅड रविंद्र वर्मा, मजहर अली, राखी बोराडे, अरूण गोवारदिपे, दत्ता सरोदे, अनिल अडगुरवार, सुरज गंुडावार तसेच इको-प्रो सदस्य जितेंद्र वाळके, सुधीर देव, सुनिल लिपटे, धर्मेेद्र लुनावात, सौरभ शेटे, राजु काहीलकर, अमोल उटटलवार, किनारा खोब्रागडे, सचिन धोतरे, राजेश व्यास, संजय सब्बनवार, सुनिल पाटील, अमित आवारी, अभय अमृतकर, प्रमोद मलीक, गौरव वाघाडे, आकाश घोडमारे आदी सहभागी झाले होते.
यापुर्वी सुध्दा रामाळा तलाव खोलीकरणाबाबत प्रशासनाकडे निवेदन देण्यात आलेले आहे. यातुन खालील मुदयाकडे प्रशासनाचे लक्ष वेळोवेळी वेधण्याचे प्रयत्न करण्यात आलेले आहे.
1. शहरातील मुख्य मच्छीनाल्याच्या एक भाग जो झरपट नदीस मिळतो तो सरळ तलावात येतो.
2. यामुळे तलावातील या घाण पाण्यावर जगणारी अनेक जलीय वनस्पती वाढत असते.
3. सोबत तलावानजीक राहणाÚया नागरीकांना या पाण्याच्या दुर्गधी आणी आजांराचा सामना करावा लागतो. मागील हप्ताभरापासुन या दुर्गधीची तिव्रता अधिक झालेली दिसुन येते.
4. यावर ‘वाॅटर ट्रिटमेंट प्लाॅन्ट’ बसविण्याची गरज असतांना अदयापही व्यवस्था करण्यात आलेली नाही.
5. स्थानीक नागरीकांचे सांडपाणी सुध्दा सरळ तलावात जात असते. वस्तीतील सांडपाणी वाहुन जाणारी व्यवस्था योग्य करण्याची गरज आहे.
6. लगतच्या रेल्वे मालधक्कावरून रासायनीक खते चढ-उतार होत असल्याने जमीनीवर पडणारे युरीया, सल्फेट सारखी खते पावसाच्या पाण्यासोबत वाहुन तलावात येत असतात.
7. तलावाच्या पच्छिम दिशेस अतिक्रमणाची समस्या कायम असुन त्या बाजुस संरक्षण भिंतीचे बांधकाम अदयापही झालेले नाही.
8. गेल्या शेकडो वर्षातील वाहुन आलेला गाळ, आणि लोकवस्ती झाल्यानंतर नाल्यातुन सांडपाणी सोबतचा नालीचा गाळ कधीच काढण्यात आलेला नाही.
9. सातत्याने दरवर्षी होणारे गणेश व दुर्गा मुर्ती विसर्जन यामुळे जमा होणारी माती याचा थर वाढतच चालला आहे.
10. खोलीकरणानंतर पावसाचे पाण्याने तलाव भरणे शक्य नसल्यास वेकोली चे सातत्याने भुगर्भातील फेकण्यात येत असलेले पाणी तलावाकडे वळविणे सहज शक्य आहे.
11. ‘स्वच्छ भारत अभियानास’ साथ म्हणुन ‘स्वच्छ चंद्रपूर-सुंदर चंद्रपूर’ करीता या तलावाचे खोलीकरण अगत्याचे झालेले आहे.

ट्रक व रुग्णवाहिकेची अमोरा – समोर धडक – १ठार, १गंभीर जखमी

0

 

BIG BREKING

नांदुरा / प्रतिनिधी

राष्ट्रीय महामार्गावरील आंबोडा फाट्यानजीक ट्रक व रुग्णवाहिकेच्या अमोरा समोर झालेल्या भीषण अपघातात रुग्णवाहिकेचा चालक जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना १९ डिसेंबर च्या दुपारी २.३०वाजेदम्यान घडली
याबाबत अधिक वृत्त असे की बऱ्हाणपूर येथील ऑल इज वेल रुग्णालयाची रुग्णवाहिका नागपूर ला पेशंट सोडून परतत असतांना आंबोडा फाट्यानजीक विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रक ने जबर धडक दिली या अपघातात रुग्णवाहिकेचे चालक गजानन राजेंद्र पाटील वय २५ वर्षे रा लालबाग, बऱ्हाणपूर हे जागीच ठार झाले तर रवींद्रसिंह बहाद्दरसिंह ठाकूर वय २४ रा वडनेर जोहरी, तालुका आस्था , जिल्हा सिहोर (म प्र ) हे गंभीररित्या जखमी झाले सदर अपघाताची माहिती मिळताच १०८ चे डॉ शेख , चालक गणेश वनारे यांनी घटनास्थळी धाव घेत गंभीर जखमीला येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले यावेळी डॉ जैस्वाल , डॉ बेंडे यांनी तातडीने उपचार केले मात्र प्रकृती गंभीर असल्याने जखमीला अधिक उपचाराकरीता मलकापूर येथे हलवीण्यात आले यावेळी पत्रकार प्रवीण डवंगे , शिवा घाटे,सोहेल भाई यांनी मदतकार्य केले

महाराष्ट्र एक्स्प्रेस न्यूज टीमकडून कर्तव्यदक्ष पाेलिसांचा सन्मान

0

 

 

महाराष्ट्र एक्स्प्रेस न्यूज टीमकडून कर्तव्यदक्ष पाेलिसांचा सन्मान .ठाणे शहर पोलीस आयुक्त अंतर्गत येणार्या गुन्हे शाखा प्रकटीकरण क्रमांक पाच मधील तीन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा सन्मान महाराष्ट्र एक्स्प्रेस न्यूज कडून करण्यात आला .
:महाराष्ट्र एक्स्प्रेस न्यूज नेहमीच विविध क्षेत्रांतील कर्तव्यदक्ष लोकांचा सन्मान करत असतात.

ठाणे शहरातील ठाणे पोलीस आयुक्त यांच्या अंतर्गत येणार्या गुन्हे प्रकटीकरण शाखा क्रमांक पाच मधील .वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री विकास शिवाजी घोडके यांचा सन्मान महाराष्ट्र एक्स्प्रेस न्यूजचे मुख्य संपादक .श्री माननीय संतोषकुमार शिवाजी पाटील यांनी केला . सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रशांत जगन्नाथ पवार यांचा सन्मान महाराष्ट्र एक्स्प्रेस न्यूज चॅनलचे .मुंबई ब्यूरो चीफ शीतल माने यांनी केला .
तर व पोलिस निरीक्षक अरुण महादेव क्षीरसागर यांचा सन्मान महाराष्ट्र एक्स्प्रेस न्यूजचे ब्युरोचीफ ठाणे जिल्हा माननीय राकेश शेळके यांनी केला.
या तिन्हीही कर्तव्यदक्ष अधिका यांनी ठाणे शहर परिसरात अनेक गुन्ह्यांची उकल केली असून ,
अनेक सराईत गुन्हेगारांना अटक करून कोर्टात सादर केले आहे .म्हणूनच महाराष्ट्र एक्स्प्रेस न्यूज चॅनेलकडून यांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला .
या वेळी महाराष्ट्र एक्स्प्रेस न्यूज चे मुख्य संपादक संतोष कुमार पाटील महाराष्ट्र एक्स्प्रेस न्यूजचे ब्युरोचीफ मुंबई विभाग सौ शीतल माने व महाराष्ट्र एक्स्प्रेस न्यूजचे ब्युरोचीफ ठाणे विभाग राकेश शेळके आणि इतर पोलिस कर्मचारी उपस्थित होते
राकेश शेळके सोबत शीतल माने ब्युरो रिपोर्ट