Home Blog Page 568

मातोश्री नथियाबाई विद्यालय सुनगाव येथे देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचा वाढदिवस साजरा

0

 

गजानन सोनटक्के
जळगाव जा

आज दिनांक 19 डिसेंबर रोजी सुनगाव येथे विद्याभारती शैक्षणिक मंडळ अमरावती यांच्याद्वारे कार्यरत असलेल्या मातोश्री नाथीयाबाई विद्यालय सूनगाव येथे देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचा 84 वा वाढदिवस साजरा करण्यात आला प्रतिभाताई पाटील यांचा राजकीय प्रवास थक्क करणारा आहे कॉलेज क्विंन यशस्वी वकील राजकारणी राजस्थानच्या राज्यपाल व देशाच्या राष्ट्रपती अशा विविध पदांची जबाबदारी सांभाळत प्रतिभाताईंनी आपल्या कर्तुत्वाचा ठसा हे भारतीय राजकारणावर 1985 ते 1990 पर्यंत त्यांनी राज्यसभेच्या सदस्य म्हणून काम पाहिलं 2004 मध्ये त्यांची राजस्थानच्या राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली व 25 जुलै 2007 मध्ये त्या राष्ट्रपती म्हणून निवडून आल्या असा त्यांचा राजकीय प्रवास आहे त्यातच आज त्यांचा 84 वा वाढदिवस सुनगाव येथील मातोश्री नाथीयाबाई विद्यालय येथे मुलांना फळे वाटून साजरा करण्यात आला यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री संजय इंगळे सर यांनी ताईंचा राजकीय प्रवास याबद्दल माहिती दिली यावेळी शाळेचे ज्येष्ठ शिक्षक श्री कोकाटे सर पत्रकार अनिल भगत पत्रकार शिवदास सोनवणे पत्रकार गजानन सोनटक्के व शाळेचे इतर कर्मचारी उपस्थित होते

लक्ष्य करिअर अकॅडमी तर्फे उद्या दीडशे विद्यार्थी देणार शहीद प्रदीप मांदळे यांना मानवंदना 

0

 

सिंदखेडराजा (सचिन खंडारे )

सिंदखेड राजा तालुक्यातील
सर्व तरुणाना सुचित करन्यात येते कि नुकतेच पळसखेड चक्का येथिल नायक प्रदिप मांदळे हे भारत देशाच्या रक्षणार्थ जम्मू काश्मिर येथे आपले कर्तव्य पार पाडत असताना शहीद झाले असून त्यांच्या अंत्यसंस्काराचा कार्यक्रम दि.20/ डिसेंबर 20
ला सकाळी दहा वाजता पळसखेड चक्का येथे होईल…
परंतु या ठिकाणी आपल्याला परिसरातील स्वयमसेवकांची अवश्यकता भासणार असल्याने शांतता राखन्यासाठी अनेक तरुणांची गरज आहे..या साठि लक्ष्य करिअर अकॅडमी दुसरबिड व साखरखेर्डा येथिल सैनिक व पोलीस भरती चि तयारी करणारे विद्यार्थी या ठिकाणी मानवंदना देण्यासाठी व पोलीस यांच्या मदतिस आपले 150विद्यार्थि सज्ज झाले आहेत.
तरी आपल्या परिसरातील तरुणानी ..19 डिसेंबर पर्यंत लक्ष्य करिअर अकॅडमी साखर खेर्डा अर्जूनभाऊ गवई (माजी सैनिक )व संदीप इंगळे यांच्याशी खालील नंबरवर संपर्क साधावा.. 7875535410, 8237372626

राजेगाव येथील शिव व्याख्याते सचिन खंडागळे यांचा आदर्श विवाह

0

 

सिंदखेड राजा ( सचिन खंडारे )

सिंदखेडराजा तालुक्यातील राजेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते तथा शिवाजी महाराज यांच्या चरित्रावर व्याख्यान करणारे शिवव्याख्याते प्राध्यापक सचिन खंडागळे यांचा पंधरा लोकांच्या उपस्थितीमध्ये एक आगळा वेगळा आदर्श विवाह दिनांक 17 – 12 – – 2020 ला आजेगाव तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली येथे पार पडला ! आजेगाव येथोल मनोज काकडे यांची मुलगी . ची सौ . का . नीताव राजेगाव येथील विष्णू खंडागळे यांचा मुलगा सचिन या नवदांपत्यांना पंधरा लोकांच्या उपस्थितीमध्ये कोरोना च्या पार्श्वभूमीवर एक आगळा-वेगळा विवाह पार पडला यावेळी कुठलाही बँडबाजा नाही कुठल्याही प्रकारचे मोठा गाजावाजा न करता अगदी साध्या पद्धतीने विवाह पार पडला !तसेच यावेळी न व दाम्पत्याची हस्ते वृक्षारोपण सुद्धा करण्यात आले !या आगळ्यावेगळ्या विवाह आदर्श इतर लोकांनी घ्यावा हीच अपेक्षा !

अंत्रि खेडेकर येथे पिसाळलेल्या कुत्र्यांचा पाच जणांना चावा !

0

 

 

सिंदखेडराजा ( सचिन खंडारे )

चिखली तालुक्यातील अंत्रि खेडेकर येथे एका पिसाळलेल्या भटक्या कुत्र्याने पाच जणांना चावा घेतल्याची घटना दिनांकदिनांक 19 डिसेंबर रोजी सकाळी 8.30मिनिटांनी घडली यामुळे अचानक आलेल्या भटक्या पिसाळलेल्या कुत्र्याने पाच जणांना चावा घेतल्याची घटना घडली !सकाळी विजय अश्रुबा मोरे हे शाळेवरती जात असताना समोरून आलेल्या कुत्र्याने त्यांच्या हाताला चावा घेतला ।यानंतर पिसाळलेल्या कुत्र्याने रवी गवई । साहिल खेडेकर तसेच श्री कंकाळ यांच्या घरी आलेल्या पाहुण्याला सुद्धा चावा घेतला व बाहेर बांधल्या बकरीला सुद्धा पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतला ‘यामुळे संपूर्ण अंत्रि खेडेकर गावामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते ‘जखमी झालेल्या लोकांना तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्र अंत्रि खेडेकर येथे नेण्यात आले व त्यांना रेबीज चे इंजेक्शन देण्यात आले !पुढील उपचाराकरिता त्यांना बुलढाणा येथील सरकारी दवाखान्या मध्ये पाठवण्यात आल्याचे समजते ‘नंतर पिसाळलेल्या कुत्र्याला ठार मारण्यात आले ।त्यामुळे लोकांनी व लहान लहान मुलांनी सुटकेचा निश्वास टाकला तरी भटक्या कुत्र्याला आवर घालण्याची गरज यानिमित्ताने निर्माण झाली आहे !

शहीद जवान वीर पुत्र प्रदीप मांदळे यांच्यावर उद्या मूळगावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार ! पालकमंत्री यांच्याकडून जागेची पाहणी !

0

 

सिंदखेड राजा ( सचिन खंडारे )

मातृतीर्थ सिंदखेडराजा तालुक्यातील वीर पुत्र शहीद प्रदीप माळंदेहे जम्मू काश्मीर येथील द्रास सेक्टर मध्ये 15 डिसेंबर रोजी मोठा बर्फाचा गोळा अंगावर पडून शहीद झाले होते !उद्या दिनांक 20 डिसेंबर रोजी त्यांचे मूळगावी पळसखेड चक्का येथे सकाळी 9.30 वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे ।या संदर्भामध्ये दिनांक 18 डिसेंबर रोजी बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सिंदखेडराजा मतदारसंघाचे आमदारडॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी ज्या ठिकाणी शहीद वीरपुत्र प्रदीप मांदळे यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहे त्या ठिकाणची पाहणी केली तसेच वीर पुत्र प्रदीप मांदळे यांच्या घरी त्यांच्या निवासस्थानी जाऊन कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली !पळसखेड चक्का येथील प्रदीप साहेबराव मांदळे हे भारतीय सैन्याच्या महार रेजिमेंट मध्ये 2009 ला दाखल झाले होते !त्यांच्या जाण्यामुळे संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यामध्ये हळहळ व्यक्त होत आहे !

कुणाल ढेपे यांच्या बॅकलॉग परीक्षा संदभातील मागणीला यश.

0

 

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ च्या नॉन फायनल इअर इतर बॅकलॉग च्या परीक्षा च्या
सारख्याच पद्धती घ्याव्यात यासाठी नोव्हेंबर महिन्यात युवा नेते कुणाल ढेपे यांचा वतीने मा.प्रा.राजेश सर जयपूर
सर यांना निवेदन सादर केले होते कुणाल ढेपे यांच्या निवेदन दाखल घेउन विद्यापीठ परिषेदच्या बैठकीत या निवेदनावर सखोल चर्चा करून नॉन फायनल इअर सारख्याच घ्याव्यात या वरती शिक्कामोर्तब करण्यात आला असून दि.11 /12/2020 ला विद्यापीठादारे Assignment पद्धतीने नॉन फायनल इअर बॅकलॉग परीक्षा घेण्याचा परिपत्रक काढण्यात आला आहे काढण्यात आल आहे .कुणाल ढेपे यांच्या मागणीला यश प्राप्त झाले आहे या निर्णय मुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदच वातावरण निर्माण झाले आहेत बॅकलॉग परीक्षा संदर्भात अमरावती विद्यापीठ ने घेतलेल्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदच वातावरण निर्माण झालं असून विद्यार्थ्यांनी कुलगुरू प्रा.राजेश सर जयपूर सराचे आभार मानले असून विद्यार्थ्यांची अडचण समजून घेऊन त्यावरती लवकर त लवकर कश्या प्रकारे तोहगा निघेल यासाठी प्रा.कुलगुरू राजेश सर जयपूरकर नेहमी च तत्पर असतात कुणाल ढेपे यांच्या निवेदनाची दखल घेत प्रा.राजेश सर जयपूर यांनी विद्यार्थ्यांचा लगेच प्रश्न मार्गी लावला असून 15 डिसेंबर पासून प्रत्यक्षिक परिक्षेला सुरूवात होणार आहे विद्यापीठने काढलेल्या परिपत्रका मध्ये कोरोना आजाराचे गांभीर्य लक्षात घेऊन परीक्षा संदर्भात योग्य त्या उपयोजना करण्या संदर्भात सूचना करण्यात आल्या आहे.

 

कराडजवळील सैदापुरात तीन सख्ख्या बहिणीचा मृत्यू…अन्नातून विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज….

0

 

साताऱ्यातील कराड तालुक्यातील सैदापूर गावातील सासवे कुटुंबातील तीन सख्ख्या बहिणींचाअन्नातून विषबाधा झाल्याने मृत्यू झाला आहे…

या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे..आयुषी शिवानंद सासवे (वय 3 ), आस्था शिवानंद सासवे (वय 9), आरुषी शिवानंद सासवे (वय 8) अशी मृत्यू झालेल्या मुलींची नावे आहेत…

गुरुवारी रात्री सर्वांनी एकत्रित जेवण केल त्यानंतर आईसह या तीन मुलींना उलट्या आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला. यामध्ये तीन मुलींना जास्त त्रास झाल्याने कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

या घटनेनंतर सासवे कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.मृत्यू झालेल्या मुलींचा व्हिसेरा राखून ठेवण्यात आला असून तो पुण्यातील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहे.

घटनेचा पोलीस तपास करीत आहेत…

भेंडवळ येथे दोन मावस भावांनी केला जावयाचा खुन तपासात निष्पन्न, दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल

0

 

 

BREKING NEWS

गजानन सोनटक्के जळगाव जामोद

जळगाव जामोदः-तालुक्यातील भेंडवळ बुद्रुक येथील मगर नाल्याजवळ बाभूळ वनात एका इसम कुजलेल्या स्थितीत 31ऑक्टोबर रोजीआढळ आला होता. प्रकरणी स्थानिक
पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून चौकशीला सुरुवात केली असता एक मोठे प्रकरण
समोर आले आहे. दोन मावस भावांनी आपल्या सख्या
जावयाचा मारहाण करून खून केल्याचे पोलिस तपासात
निष्पन्न झाले आहे. मृतदेह हा दगडी पाटे बनवणारा मोताळा येथील रहिवाशी राजीव शामराव मिरटकर, वय २८ वर्ष याचा आहे. मृतकाला पत्नी विमलबाई व तीन मुले होती. गेल्या काही महिन्यांपूर्वी राजू व त्याची पत्नी विमल व रोशननावाचा मुलगा असे तिघे जण दुचाकीने बाशिम येथे जात होते. तर त्याची इतर दोन मुले
घरीच होती. बाशिम येथे जात असताना अचानक त्याचा
अपघात झाला.या अपघातात त्याची पत्नी आणि मुलाचा
मृत्यू झाला हाता. या घटनेनंतर राजूने आपली दोन्ही मुले
नांदुरा येथील आपला साळा सुनील गायकवाड यांच्याकडे
सांभाळण्यासाठी दिले होते. अपघातानंतर राजू मिरटकर हा काही प्रमाणात सावरला होता. त्याने दुसरे लग्न करण्याची विचार केला होता. परंतु याची
भनक राजूचा साळा सुनील गायकवाड यास लागली.
सुनीलची बहिण विमल व तिच्या एका मुलाचे अपघाती
निधन झाल्यानंतर अजून काहीमहिने झाले होते. अशा
परिस्थितीत जावाई राजू दुसरे लग्न करणार असल्याचे
समजतात साळा सुनील गायकवाड याला राजच्या
वागण्याबद्दल शंका येऊ लागली. त्याने दुसरे लग्न
करण्यासाठी पत्नी व मुलाला मारले तर नाही ना, अशी शंका त्याच्या मनात आली. त्यानंतर सुनील याने ही सर्व हकीकत भुसावळ तालुक्यातील कंडारी
येथील आपला मावस भाऊ रमेश रामदास पवार यास
सांगितली. दोघे मावस भाऊ एकत्र आल्यावर त्यांनी संशयातून राजू मिरटकर याचा कायमचा काटा काढल्याचे निष्पन्न झाले पोलिस चौकशीत व तपासात रमेशने त्याचा मावसभाऊ सुनिल गायकवाड याचे नाव पुढे आणले. त्यामुळे त्याला देखील ताब्यात घेत अटक करण्यात आली. त्याने देखील आपला गुन्हा कबुल केला. 9 ऑक्टोबर रोजी सदर घटना बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद शिवारातील भेंडवळ गावाच्या जंगलात घडली होती. त्यानंतर 31 ऑक्टोबर रोजी राजुच्या मृतदेहाचा सांगाडा आढळून आल्यामुळे अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली. 20 नोव्हेंबर रोजी भुसावळ शहर पोलिस स्टेशनला दाखल झालेल्या या गुन्ह्याचा पुढील तपास पो.नि. बाबासाहेब ठोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. संदिप दुनगहू व त्यांचे सहकारी समाधान पाटील यांनी सुरु केला.

सुरुवातीला या गुन्ह्यात रमेश पवार याच्या विरुद्ध बोराखेडी पोलिस स्टेशनला भा.द.वि.365 (अपहरण) नुसार गुन्हा दाखल होता. त्यानंतर तपासात झालेल्या प्रगतीनुसार रमेश पवार आणि सुनिल गायकवाड यांच्याविरुद्ध भा.द.वि.302 (खून), 120 (ब) (कट रचणे), 364 (जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने अपहरण) अशी कलमे वाढवण्यात आली. या गुन्ह्याचा तपास पो.नि. बाबासाहेब ठोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि.संदिप दुनगहु व पो.कॉ.समाधान पाटील यांनी पुर्ण केला. तपासकामी हवालदार मोहम्मद अली सैय्यद, पो.कॉ. मोहन पाटील, जितू सोनवणे यांचे सहकार्य लाभले. सध्या या गुन्ह्याचा तपास जळगाव जामोद (जिल्हा बुलढाणा) यांचेकडे वर्ग करण्यात आला असून तपास पोलिस उप निरिक्षक रमेश धामोळे करत आहेत

सूनगाव येथे ग्रामपंचायत निवडणुकांचे वाजले बिगुल… पदाधिकारी कार्यकर्ते लागले कामाला…

0

 

गजानन सोनटक्के जळगाव जा

तालुका जळगाव जामोद येथील सूनगाव ग्रामपंचायत मोठी आहे येथे सदस्य संख्या 17 आहे ग्रामपंचायतीचा निवडणुकीचा कालावधी संपल्याने नव्याने होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवार व त्याचे सहकारी पदाधिकारी कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहे. येत्या जानेवारी 2021 मध्ये तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीचा निवडणुकीचा कार्यक्रम निर्वाचन विभागाने जाहीर केला असून आता निवडणुकीला वेग आला आहे. त्याकरिता नामनिर्देशन अर्ज दाखल 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर तर अर्ज छाननी 31 डिसेंबर व 4 जानेवारी रोजी अर्ज मागे घेणे व त्याच दिवशी कायम उमेदवार यांना चिन्ह वाटप करण्यात येणार आहे. इच्छुक निवडणूक लढणाऱ्याची यादी प्रसिद्ध करणे तर 15 जानेवारी रोजी मतदान घेण्यात येणार आहे. मतमोजणी 18 जानेवारी 2021 रोजी होणार आहे. ग्राम तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम घोषित झाल्यामुळे सूनगाव येथील इच्छुक उमेदवार पदाधिकारी. कार्यकर्ते कामाला लागले असून गावांत बैठका घेणे सुरू केले आहे. निवडणुकीसाठी सदस्य पदाकरिता योग्य उमेदवाराची चाचपणी करीत आहेत. सूनगाव येथे महाविकास आघाडी व भाजप यांच्या पुढे एकमेकांचं आव्हान आहे पदाधिकारी आपल्यालाच बहुमत कसे मिळेल ह्यासाठी प्रयत्न करीत असून कामाला लागले आहेत. निवडणूक जसजशी जवळ येणार तसे सर्व उमेदवार लोकांना रामराम ठोकणार व मला निवडून द्या व निवडून आल्यावर वार्ड मधले मी कामे करणार असे आश्वासन देणार उमेदवाराचे मुख्य बोल. नाल्या दुरुस्त करणार. पाणी देणार. रस्ते देणार. खरी हकीकत बघितली तर सूनगाव येथील हे सर्व कामे अजून पण झालेले नाहीत. सूनगाव येथील सर्व जनतेची अपेक्षा आहे की. या निवडणुकीत कोणत्याही पक्षाचा सरपंच व सदस्य झाल्यावर सूनगाव गावाचा विकास झाला पाहिजे हे लोकांचे मत आहे…

दुचाकी मध्ये पदर अडकून महिलेचा मृत्यू

0

 

गजानन सोनटक्के

जळगाव जामोद साडीचा पदर दुचाकीच्या मागील चाकात अडकून पडल्याने विवाहितेचा मृत्यू झाल्याची घटना निमखेडी (ता. जळगाव जामोद) फाट्याजवळ आज, 17 डिसेंबरला दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली.

सूत्रांच्या माहितीनुसार, जळगाव जामोद तालुक्यातील मेंढामारी येथील संतोष रमेश चव्हाण (23) याचे लग्न मागील वर्षी तालुक्यातील भिंगारा येथील राणीबाई हिच्याशी झाले होते. दोघे पती-पत्नी दोन दिवसांपूर्वी नातेवाईकाकडे एका कौटुंबिक कार्यक्रमासाठी भिंगारा येथे गेले होते. कार्यक्रम आटोपल्यानंतर ते आज परत येत असताना निमखेडी फाट्याजवळ राणीबाईच्या साडीचा पदर मोटरसायकलच्या मागील चाकात अडकला. त्यामुळे राणीबाईचा तोल जाऊन ती जमिनीवर पडली. यात तिच्या डोक्याला मार लागला. गंभीर जखमी अवस्थेत तिला जळगाव जामोद ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले. प्राथमिक तपास पीएसआय सचिन वाकडे, पोलीस कॉन्स्टेबल सचिन राजपूत यांनी केला. पुढील तपास जळगाव जामोद पोलीस स्टेशन करत आहेत.