Home Blog Page 568

ऊकळी – सुकळी – येथे . डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना कॅन्डल मार्च काढून अभिवादन !

0

 

सिंदखेड राजा ( सचिन खंडारे )

ता.मेहकर ऊकळी सुकळी 06/12/20 रोजी तथागत युवा प्रतिष्ठान ग्रुप महाराष्ट्र राज्याच्या वतीने विश्वरत्न बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला..!

याप्रसंगी तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष मा.संदिप भाऊ गवई व अनिल भाऊ देबाजे ,प्रमोद भाऊ अंभोरे यांनी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करून आदरांजली वाहिली व भव्य कॕन्डल मार्च रॕली काढण्यात आली..

यावेळी मा.अनिल भाऊ देबाजे यांनी आपल्या मार्गदर्शनातून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकला

या अभिवादन कार्यक्रमास तथागत युवा प्रतिष्ठान ग्रुप महाराष्ट्र सचिव अनिल भाऊ देबाजे, सतीश शेटाने, आकाश तुरुकमाने, करण राऊत, सुरज शेटाने, प्राध्यापक विठ्ठल सावंत सर, विनायक तुरूकमाने, हर्षल राऊत, सतीश तुरुकमाने, राहुल साबळे, अमर अंभोरे, उमेश मोरे, राहुल तुरुकमाने, गुलाब तुरुकमाने, चेतन देबाजे, सचिन तुरूकमाने, भिमराव ठोके, शुभम शेटाने, रोहित झरे, पवन अंभोरे, अविनाश वाघमारे, रोहित तुरुकमाने, स्वप्नील मोरे, वैभव मोरे ,सुजित तुरुकमाने आदी उपस्थित होते

महापरिनिर्वाण दिना निमित्त सम्राट मित्र मंडळाच्या वतिने अंत्री खेडेकर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन !

0

 

सिंदखेड राजा ( सचिन खंडारे )

6 डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अंत्री खेडेकर येथील सम्राट मित्र मंडळाच्या वतिने अभिवादन करण्यात आले ! यावर्षी शासनाच्या आव्हानानुसार बौद्ध बांधवांनी चैत्य भूमिवर न जाता बाबासाहेबांना गावातुनच अभिवादन केले ! कोवीड 19 चा प्रादुर्भाव पाहता सुरक्षित अंतर ठेवण्यात आले होते ! अंत्री खेडेकर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतूळ्याजवळील प्रारंगणात त्रिसरण पंचाशिल ग्रहण करून अभिवादन करण्यात आले ! छोटेखानी झालेल्या कार्यक्रमाचे संचालन भास्कर मोरे यांनी केले । यावेळी संजय खेडेकर यानी थोडक्यात आपले विचार व्यक्त केले ‘ या कार्यक्रमाला भिमराव मोरे ‘ अमोल मोरे ‘ महेंद्र मोरे ‘ पवन मोरे ‘राजेश गवई ‘ भगवान मोरे रवि गवई ‘ अमोल पवार समाधान मोरे ‘ प्रकाश मोरे नितीन मोरे ‘ संतोष मोरे इंद्रजित खेडेकर ‘ विनायक खेडेकर गजानन खेडेकर ‘ वसंता मोरे ‘ रवि पवार ‘ विजू अहिले ‘ पवन समशेरे ‘ नंदु मोरे ‘ राजु मोरे ‘ अमोल भालेराव । धिरज मोरे । मनोज मोरे आदी उपस्थित होते !

शिंदी येथे महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन !

0

सिंदखेड राजा ( सचिन खंडारे )

सिंदखेड राजा तालुक्यातील शिंदी येथेसहा डिसेंबर रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले !सुरुवातीला माजी सरपंच अशोक खरात यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पन करण्यात आला !नंतर त्रिसरण पंचशील ग्रहण करण्यात आली !यावेळी ‘पत्रकार सचिन खंडारे सुनील खंडारे अरविंद खंडारे कडूबा खंडारे उकंडा खंडारे रमेश गवई पवन गवई ‘नरेश खंडारे शिक्षक )रमेश गवई शुभम खंडारे संतोष खंडारे गुलजागिर गिरी ‘प्रल्हाद मोरे अजय खंडागळे ‘आधी समाज बांधव उपस्थित होते ।

हतेडी बु येथे बाबासाहेबांना अभिवादन :

0

 

बुलढाणा : ( प्रतिनिधी )

हतेडी बु येथे भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आबेंडकर यांच्या 64 व्या महापरी निर्वाण दिनानिम्मीत्त त्यांना 6 डिसेंबर रोजी त्यांना विनम्र अभिवादन करण्यास आले यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला ज्ञानेश्वर जाधव यांनी पुष्पहार अर्पन केले. यावेळी प्रा.सचिन खरे ,यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेला मार्ग प्रत्येकाने अंगीकारावा व त्यांनी सांगितलेल्या मार्गावर आपण चालावे असे प्रतिपादन आपल्या भाषणातून केले . शेवटी बाबासाहेबाना आभिवादन करून त्रिशरण पंचशील घेवून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुनिल झिने यांनी तर आभार प्रदर्शन ज्ञानेश्वर जाधव यांनी केले . यावेळी बहुसंख्येने समाज बांधव उपस्थीत होते .

तथागत ग्रुपच्या वतीने मेहकर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन !

0

 

सचिन खंडारे ( सिंदखेड राजा प्रतिनिधी )

दिनांक 06 डिसेंबर रोजी मेहकर येथे विश्वरत्न, परमपूज्य, बोधिसत्व, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनीर्वान दिना निमित्त पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले !
तथागत फाऊंडेशन व तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष मा.संदिप भाऊ गवई यांच्या हस्ते विश्वरत्न,परमपूज्य, बोधिसत्व,भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार,भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले !यावेळी त्यांनी छोटेखानी भाषणामध्ये सांगितले की, ६ डिसेंबर १९५६
विषम समाज व्यवस्थेचे चटके सोसत तमाम वंचीताना मायेची सावली देवून, धरती वरील क्रांती सूर्य अस्तास गेला परंतु जाण्यापूर्वी त्यांनी सकल मानव जातीला त्यांचे नैसर्गिक हक्क, न्याय, समान अधिकार बहाल केले.
संपूर्ण जगात कुठल्याही देशात नसेल असे महान संविधान अर्पण करून, बलाढ्य अशी लोकशाही बहाल केली ते म्हणजेच विश्वरत्न, परमपूज्य, बोधिसत्व, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अशा महामानवास त्यांच्या महापरिनिर्वाण दिनी कोटी कोटी प्रणाम..

ज्ञानाच्या अथांग महासागरास विनम्र अभिवादन..!
यावेळी !
तथागत फाऊंडेशन व तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष मा.संदिप भाऊ गवई,मा.सुभाष भाऊ बैलके,अनिल भाऊ देबाजे,कुणाल भाऊ माने,कैलास भाऊ दुगाने,अख्तर भाई कुरेशी, आरीफ शहा असलम भाई गवळी,कपिल इंगळे,प्रमोद अंभोरे,सतीश शेटाणे,सचिन बनचरे,व समस्त मित्रपक्ष आदी उपस्थित होते,

साखरखेर्डा ग्राम पंचायत सर्वसाधारण , नागरिकांच्या प्रवर्गासाठी. राखीव , तर १८ अ . जा . व एक अ जा जमाती. तर 22 इमाव साठी !तहसीलदारांच्या उपस्थितीत आरक्षण सोडत !

0

 

सिंदखेडराजा ( तालुका प्रतिनिधी ) तालुक्यातील ८० ग्राम पंचायत सरपंच पदाचे आरक्षण आज तहसिलदार सुनिल सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आले असून सर्वसाधारण साठी. , मागास प्रवर्ग. आणि अनुसूचित जाती १८ तर एक अनुसूचित जाती जमाती तर सर्वसाधारण च्या 39 जागा ! राखीव काढण्यात आल्या आहेत .

साखरखेर्डा (प्रतिनिधी )
तालुक्यातील ८० पैकी ४३ ग्राम पंचायतीच्या निवडणूका जानेवारी २१ मध्ये होण्याची शक्यता आहे . त्या अनुषंगाने निवडणूक आयोगाने मतदार यादी प्रसिध्द करणे , सदस्यांचे वार्ड निहाय आरक्षण निश्चित करण्यात आले होते . राहीला तो सरपंच आरक्षण निश्चित करण्याचा प्रश्न आज निकाली काढण्यात आला आहे . ८० पैकी ४३ ग्राम पंचायतीचे आरक्षण सोडतीकडे कटाक्षाने लक्ष लागले होते . आज ७ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता तहसीलदार सुनील सावंत यांच्या उपस्थितीत आरक्षण काढण्यात आले . अनुसूचित जाती करीता रुम्हणा हे गाव सरपंच पदासाठी राखीव. असून अनुसूचित जाती करीता साठेगाव , धानोरा , सावखेड तेजन , खामगाव , कंडारी , पांग्री उगले , हिवरखेड , पिंपळखुटा , शिवणी टाका , उमरद , वर्दडी बु . , डोरवी , हनवतखेड ( म . पाग्रा ) , आंबेवाडी , पोफळ शिवणी , कुंभेफळ, गारखेडा , पिंपरखेड बु . , तर नागरिकांचा मागास प्रवर्गा साठी कोनाटी , वरुडी , आडगाव राजा , जळगाव , सवडद , पळसखेड चक्का , ताडशिवणी , बाळसमुद्र , सोनोशी , खैरव , महारखेड , मलकापूर पांग्रा , तढेगाव , दरेगाव , सुलजगाव , भोसा , केशवशिवणी , सायाळा , दुसरबीड , वाघाळा , झोटींगा , शेंदुर्जन आणि सर्वसाधारण साठी साखरखेर्डा , उमनगाव , राजेगाव , गोरेगाव , राताळी , सोमदेव , वाघोरा , लिंगा पांग्रीकाटे , धांदरवाडी , तांदुळवाडी , मोहाडी , पिंपळगाव सोनारा , जऊळका , वाघजाई , पिंपळगाव लेंडी , आगेफळ , राहेरी बु . , शिंदी , वडाळी , निमगाववायाळ , चिंचोली जहांगीर , पिंपळगाव कुडा , अंचली , डावरगाव , गुंज , देवखेड , विझोरा , देऊळगाव कोळ , सावरगाव माळा , जांभोरा , नशिराबाद , जागदरी , हनवतखेड ( सि ् राजा ) , हिवरागडलिंग , किनगाव राजा , भंडारी , नाईकनगर , वसंत नगर , दत्तापुर , या गावातील सरपंच पंदाचे आरक्षण निश्चित करण्यात आले आहे . यातील महिला राखीव साठी बुलडाणा येथे सोडत निघणार आहे . सरपंच पदाचे आरक्षण निश्चित होताच कही खुशी कही गम असे वातावरण निर्माण झाले असले तरी ४३ ग्राम पंचायत साठी होणारी निवडणूक चुरशीची ठरणार आहे . साखरखेर्डा ही सर्वांत मोठी ग्राम पंचायत असल्याने प्रत्येक निवडणुकीत विकासाला प्राधान्य मतदारांनी दिले आहे . यावेळी तहसीलदार सुनील सावंत , नायब तहसीलदार प्रविण लटके , नायब तहसीलदार पंकज मगर , कर्मचारी शिवाजी पापुलवाड , पुरुषोत्तम हाडे , जे . एच . शिपणे , ताठे यांनी. काम पाहिले . तर ईश्र्वरी निलेश राठोड या चिमुकल्या मुलीने आरक्षण सोडतीच्या चिठ्या काढल्या .

समाजवादी पार्टी बुलढाणाच्या वतीने जळगांव जामोद तहसिलवर शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी दिले निवेदन…

0

 

गजानन सोनटक्के
जळगांव जा.प्रतिनिधी:-

दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात सरकारच्या दडपशाहीला न जुमानता लाखो शेतकरी दिल्लीला घेऊन दहा दिवस झाले आहेत शेतकर्‍यांचे आंदोलन सर्व राज्यांमध्ये आणखी तीव्र होत आहे त्याचे कारण की केंद्र सरकारने केलेले शेतकरी विरोधी कायदे त्याच्यामुळे संपूर्ण देशामध्ये आज शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजीचा सूर असून शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला सर्व स्तरांमधून पाठिंबा मिळत असून समाजवादी पार्टी बुलढाणा जिल्हा सुद्धा शेतकऱ्यांच्या साठी मैदानात उतरली आहे समाजवादी पार्टी बुलढाणा जिल्ह्याचे हाकेला प्रतिसाद देत जळगाव जामोद जिल्हा बुलढाणा येथे समाजवादी पार्टी अजहर उल्लाखान अमानउल्ला खान समाजवादी पार्टीचे जिल्हाध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली जळगाव जामोद तहसील कार्यालय येथे आज दिनांक सात डिसेंबर रोजी शेतकऱ्यांच्या रास्त मागण्यांसाठी भव्य निषेध तसेच शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कासाठी जळगाव जामोद येथे 1.किसान विरोधी कायदे मागे घ्या 2. कामगार विरोधी कायद्यातील दुरुस्त्या रद्द करा.3. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला दीडपट भाव व आधार भावाचे रास्त संरक्षण द्या.4. पिक विमा कंपन्यांवर दबाव आणून शासनाने त्वरित यावर्षीचा पिक विमा शेतकऱ्यांना मिळवून द्यावा यासारख्या अनेक मागण्यांसाठी समाजवादी पार्टी ने दिले तहसीलदारांना निवेदन. निवेदनावर डॉ. मो.जावेद सिद्दिक, जिल्हा उपाध्यक्ष समाजवादी पार्टी लियाकत खान जिल्हा सचिव शेख नफिस,शेख रफिक, मनोज ठाकुर, संजय राजपुत,शकुर खान,सचिन राजपुत,अक्षय राजपुत, दरिया सिंग राजपूत यांच्यासह बहुसंख्य कार्यकर्त्यांच्या सह्या होत्या.

जळगाव जामोद तालुक्यातील ४७ ग्रामपंचायतीचे सरपंच पदाचे आरक्षण जाहीर

0

 

गजानन सोनटक्के
जळगाव जामोद

जळगाव जामोद तालुक्यातील एकूण ४७ ग्रामपंचायत आज दिनांक ७ डिसेंबर २०२० रोजी तहसील कार्यालय जळगाव जामोद येथे सकाळी 10 वाजता सभेस सुरुवात करण्यासाठी प्रथम विद्यमान जिल्हाधिकारी बुलढाणा यांनी त्याची अधिसूचना प्रमाणे जळगाव जामोद तालुक्यातील ठरवून दिलेले 47 ग्रामपंचायत मधील सरपंच पदाचे आरक्षण बाबत सभेमध्ये माहिती सांगण्यात आली आरक्षण काढताना अनुसूचित जाती साठी ७ जागा अनुसूचित जमातीसाठी ८ जागा व नागरिकांचा मागास प्रवर्ग म्हणजे ओबीसीसाठी १३ जागा अशा २८ ग्रामपंचायत मध्ये आरक्षण काढण्यात आला आरक्षण पुढील प्रमाणे
अनुसूचित जाती साठी राखीव
ग्रा प
1,पळशी वैद्य
2,कुरणगाड बु
3,कुरणगाड खु
4,चावरा
5,मडाखेड खु
6,दादूलगाव
7,गोळेगाव खु
अनुसूचित जमातीसाठी राखीव ग्रा प
1,पळसखेड
2,आडोळ बु
3,भेंडवळ खु
4,निंभोरा बु
5,वडशिंगी
6,गाडेगाव बु
7,खेर्डा खु
8,मडाखेड बु
ना.मा.प्र साठी राखीव ग्रा प
1, खांडवी
2,सावरगाव
3,बोराळा खु
4,गाडेगाव खु
5,अकोला खु
6,काजेगाव
7,सातळी
8,उमापूर
9,मानेगाव
10,मांडवा
11,वडगाव गड
12,पिंपळगाव काळे
13,भिंगारा
सर्वसाधारण साठी म्हणजे ओपन या ग्रामपंचायती आहे त्यांचे नाव पिंप्री खोद्री,
भेंडवळ बु,
आसलगाव
धानोरा
पळशी सुपो
रसूलपूर,
खेर्डा बु,
सुलज,
बोराळा बु,
टाकळी परस्कार,
माहुली,
झाडेगाव,
हिंगणा बाळापूर,
जामोद,
तीवडी अजमपूर,
कुवरदेव,
सूनगाव,
वडगाव पाटण,
गोळेगाव बु
असे आरक्षण काढण्यात आले आरक्षण काढण्यासाठी महेश प्रवेश सातव वय ९ वर्ष राहणार जळगाव जामोद या लहान मुलाने आरक्षण काढले यावेळेस उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर तहसीलदार डॉक्टर शिवाजीराव मगर नायब तहसीलदार सूर्यवंशी साहेब व तसेच निवडणूक विभागातील सत्यविजय जाधव व व तालुक्यातील नागरिक बहुसंख्यात उपस्थित होते
वरीलपैकी महिलांच्या राखीव ग्रा प चे आरक्षण 10 तारखेला बुलडाणा येथे निघेल

ग्रा.प.सरपंच पदाचे आरक्षण जाहीर …. “कही खुशी , कही गम”

0

 

संग्रामपूर – तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या आरक्षण जाहीर झाले आहे . यामध्ये आजी माजी सरपंचसह राजकीय पुढाकार्यांमध्ये ‘ कही खुशी कही गम ‘ असे चित्र पहावयास मिळाले आले. तालुक्यातील ५० ग्रामपंचायतीमधील २०२० ते २०२५ या कालावधीत सरपंचपदाच्या आरक्षणाची सोडत तहसील कार्यालयात आज दिनांक ७ डिसेंम्बर रोजी पार पडली . यात अनेक ठिकाणी फेरबदल झाल्याने ‘ कही खुशी कही गम ‘ असे चित्र पाहायला मिळाले .

 

सार्वत्रिक निवडणुकीद्ववारे गठीत होणा – या ग्राम पंचायातीच्या सरंपच पदाचे आरक्षण दि .०७ डिसेंबर रोजी.तसेच अनूसुचीत जाती , अनुसुचीत जमाती , नागरीकांचा मागासवर्ग प्रवर्ग आरक्षण सोडत काढण्यात आले आहे . त्यामध्ये १. अनुसूचीत जाती चे सरपंच पदाचे आरक्षण – १ दुर्गादत्य २ काकोडा ३ बोडखा ४ चांगेफळ खु .५ काकणवाडा बु . ६ वरवट बकाल ७ कवठळ ८ पातुर्डी बु . २. अनुसुचीत जमाती सरपंच पदाचे आरक्षण – १ जस्तगांव २ रुधाना ३ तामगांव ४ चौढी ५ काटेल ६ वरवट खंडेराव ७ सावळी ८ पातुर्डी खु . ३. नागरिकांचा मागास प्रवर्ग -१ कोद्री २ मारोउ ३ रिंगणवाडी ४ टाकळी पंचगव्हाण ५ वानखेड ६ पिंप्री अडगांव ७ एकलारा बानोदा ८ आलेवाडी ९ सायखेड १० खिरोडा ११ मनार्डी १२ भोन १३ पळसोडा

 

तसेच उर्वरित ग्राम पंचायत सर्व साधारण प्रमाणे १.कळमखेड २ पिप्री काथरगांव ३ उकळी बु .४ निरोड ५ आकोली बु . ६ कोलद ७ आवार ८ वकाणा ९ पळशी झाशी १० वडगांव अडगांव ११ पेसोडा १२ उमरा १३ धामगांव १४ टूनकी बु .१५ सगोडा १६ सोनाळा १७ बावणबीर १८ लाडणापूर १ ९ काकणवाडा खु . २० करमोडा २१ वसाडी ह्यामधील महिला आरक्षण जिल्हाधिकारी कार्यालयात १० डिसेंबर रोजी जाहीर होणार आहे.
आज तहसिल कार्यलयात कु.वैशाली देवकर , उपविभागीय अधिकारी , जळगांव जामोद , यांच्या अध्यक्षते खाली व मा.व्हि.एस.चव्हाण तहसिलदार संग्रामपूर तथा निवडणुक अधिकारी म्हणून सरपंच पदाचे आरक्षण सोडत यांनी पारपाडले तसेच या कामाकरिता श्री.एस.ए.दाभाडे कनिष्ठ लिपीक निवडणुक विभाग , तसेच श्री.एस.एम.शेगोकार अ.का. श्री.ए.एस.सरवदे कनिष्ठ लिपीक यांनी काम पाहिले .

अपघातग्रस्त कुटूंबास मिळाली आर्थिक मदत

0

 

प्रतिनिधी-सचिन पगारे
मो.८३२९४२९२२१
नांदगांव नाशिक

नांदगाव तालुक्यातील ढेकू तांडा येथील अपघाती निधन झालेले ऊसतोड कामगार प्रल्हाद चव्हाण यांच्या कुटूंबास गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजने अंतर्गत दोन लाख रुपयांची आर्थिक मदत मिळाली.
दि.२९ नोव्हेंबर २०१९ रोजी दिंडोरी तालुक्यातील कादवा सहकारी साखर कारखाना येथे ऊसतोड कामगार प्रल्हाद फौजमल चव्हाण हे आपली बैलगाडी घेऊन ट्रकने जात असतांना नांदगांव तालुक्यातील कासारी जवळील चांदेश्वरी घाटातील अवघड वळणावर झालेल्या भीषण अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला होता.त्यांच्या पश्चात पत्नी अक्काबाई ह्या अशिक्षित असल्याने ११ व १२ वर्षांच्या दोन मुली व ९ वर्षाचा एक मुलगा यांचे पालन पोषण करून शिक्षणाची जबाबदारी त्यांच्यावर पडली. त्या अशिक्षित असल्याने त्यांच्या भावाने नांदगांव प्रहार शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष श्री. संदीप सुर्यवंशी यांचे मार्गदर्शन घेतले. तालुका कृषी विभागाकडे गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेच्या माध्यमातून अर्थ सहाय्य मिळावे यासाठी प्रकरण दाखल केले होते. अर्थसहाय्य मिळताच त्यांनी प्रहार संघटनेचे नेते राज्यमंत्री ना. बच्चु कडु , नांदगाव तालूका प्रहार शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष संदिप सुर्यवंशी , सर्व पदाधिकाऱ्यांचे आणि तालुका कृषी अधिकारी जगदीश पाटील, मंडळाधिकारी संकेत कराळे व सुरेश पाढेकर यांचेही आभार व्यक्त केले.