Home Blog Page 569

बोअरवेल उत्खननात दलदलीचे कारण बनले; ग्राउंड फुगे

0

 

गोंदिया-शैलेश राजनकर

गोंदिया, December डिसेंबर :: शनिवारी December डिसेंबर रोजी रावणवाडी येथे बोअरवेल उत्खनन दरम्यान अनेक भागातून पाण्याचे बुडके बाहेर येताना मोठ्या संख्येने लोक पहायला आले आणि पथकाने मैदान बदलले. या घटनेमुळे कॅम्पसमधील नागरिकांनी शनिवारी रात्री भीतीने घाई केली.
शनिवारी रावणवाडी शेतकरी झाडूलाल आपल्या शेतात बोअरवेल खोदत होते की त्याच वेळी अरुण हरींखेडेच्या विहिरीपासून 30 फूट अंतरावर लावा सारखे पाणी शिरले आणि डझनभर ठिकाणाहून काही भाग व 30 फूट पाणी बाहेर आले. फाटणे. अरुण हरीनखेडे यांचे घरदेखील जमिनीतून पाण्यातून बाहेर येत होते. विहिरीतील पाणी एका लावासारखे बाहेर येत होते, जणू काय जणू पाणी बाहेर जात आहे, ते दृश्य भयभीत करीत होते. राजीनामा पाहून अरुणच्या कुटूंबियांना ही रात्री आपल्या गावातील नातेवाईकांकडून जावी लागली. ही घटना घडल्याचे पाहून शेतकरी बिसेन यांनी बोअरवेल खोदणे थांबविले. या घडामोडींकडे पाहता ही संकुल टीम असल्याने ही घटना घडल्याची भीती व्यक्त होत आहे.

7 /12 वाचायचा असेल तर 8/12 मध्ये सामील व्हा- बच्चू कडू

0

 

ना.बच्चू कडू यांच्यासह हजारो शेतकरी,दुचाकी,चारचारी,ट्रॅक्टरसह गुरूकूंज मोझरी येथुन दिल्ली कडे रवाना…!

अमरावती – केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्याविरोधात अनेक राज्य पेटून उठले आहे . तिथे आजही आंदोलन सुरु आहेत . केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात पंजाब,राजस्थान, हरियाणा सह आदी राज्यातील शेतकऱ्यांचे दिल्लीत तिरव आंदोलन सुरू आहे. शेतकरी आक्रमक होत दिल्ली येथे आंदोलन सुरू आहे. राज्याचे मंत्री आणि प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे . चलो दिल्लीचा नारा देत गुरूकूंज मोझरी येथुन हजारो दुचाकी,चारचारी,ट्रॅक्टरसह शेतकरी दिल्ली कडे रवाना झाले आहे ह्यावेळी चक्काजाम आंदोलन सुद्धा केले असता सर्व वाहन ठप्प झाले होते.

या प्रवासात ठिकठिकाणी शेतकरी भेटत आहे त्यांच्यासोबत चर्चा केली समस्या जाणुन घेतल्या. सर्व भारतातील शेतकर्यांची परिस्थीती समान आहे. लागत जास्त व भाव कमी आहे. यासाठीच उत्पादन खर्चाच्या ५०% नफा धरुन भाव देण्यात यावा ही मागणी अत्यावश्यक आहे. या ठिकाणी बच्चू कडू यांनी आवाहन केले आहे की 7 /12 वाचायचा असेल तर 8/12 मध्ये सामील व्हा

सुनगांव येथे महापरिनिर्वाणदिनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वाहिली आदरांजली…

0

 

गजानन सोनटक्के
जळगाव जामोद

जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव येथे दिनांक सहा डिसेंबर रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी सुनगाव येथील मिलिंद नगर स्थित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव विश्वरत्न भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 64 व्या महापरिनिर्वाणदिनी वाहण्यात आली आदरांजली. संविधानाचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या समस्त घटकांना विविध अधिकार बहाल केले या देशातील प्रत्येक घटकातील प्रत्येक व्यक्तीला न्याय स्वातंत्र्य समता बंधुता या आधारित अभिव्यक्ती स्वातंत्र्य बहाल केले प्रतिपादन अमोल तायडे यांनी केले यावेळी कार्यक्रमाला माजी उपसरपंच तुकाराम माजी नगरसेवक राजेंद्र वाघ शेगाव जाधव ज्ञानेश्वर तायडे बळीराम जाधव किसन अर्दळे,अमोल तायडे, संदेश वानखडे, लक्ष्मण अंदुरकार,दिपक इंगळे,गुणरतन दामोदर, प्रमोद इंगळे,अनिल सावळे,प्रल्हाद इंगळे,आदेश वानखडे यांच्यासह बहुसंख्य भिम अनुयायी उपस्थित होते.

मतदार संघातील शेत रस्ते प्राधान्याने करणार आमदार-राजेश एकडे

0

 

सुनील पवार, नांदुरा

अलमपूर येथील मोढा शिवार शेत रस्त्याचे रस्त्याचे भूमिपूजन मलकापूर विधानसभा मतदार संघाचे आमदार श्री.राजेश एकडे यांच्या हस्ते संपन्न झाले.व प्रत्यक्षात कमला सुरवात देखील झाली.मलकापूर विधानसभा मतदारसंघातील शेत रस्ते प्राधान्याने करणार व त्यासाठी निधी कमी पडू देणार नाही असे प्रतिपादन आमदार राजेश एकडे यांनी केले.या रस्त्याच्या भूमिपूजन समारंभास नांदुरा पंचायत समितीचे माजी सभापती श्री.महादेवभाऊ राऊत,श्री महादेव ठोबे ,श्री.ओकारभाऊ जवकार,श्री.यशवंतभाऊ बढे,श्री. शिवशंकरभाऊ ढोले जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस श्री.निलेश पाऊलझगडे,जिल्हा पुनर्वसन समितीचे सदस्य श्री.पुरुषोत्तम झाल्टे,मलकापूर विधानसभा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष श्री.राजू हाडे पाटील,श्री.नारायण झाल्टे,सर्वश्री प्रभाकर सुशीर,कृष्णकांत सुशीर, सुखदेव उगले,प्रकाश मांगटे ज्ञानेश्वर मागटे, गोपाल राऊत,राजू सुलतान,अनंता बढे,विकास फलके,प्रकाश हातळकर, तुकाराम साबे,बबलू मांजरे,अनंत महाले, नायब तहसीलदार संजय मार्कंड व ग्रामस्थ प्रामुख्याने उपस्थित होते.

शेतकरी आंदोलनावर तोडगा काढावा=गणेश सडत कार

0

 

 

=खामगाव=केंद्र सरकारच्या तीन नवीन कृषी कायद्याच्या विरोधात दिल्लीमध्ये मागील 26 नोव्हेंबर पासून शेतकऱ्यांचे धरणे आंदोलन सुरू आहे 8 दिवस उलटल्यानंतर शेतकऱ्यांच्या मागण्यांवर कोणताही तोडगा निघत नसल्याने दिसत आहे उलट शेतकरी दिल्लीत येत असताना पोलिसान द्वारे अमानवीय दुर्व्यवहार करण्यात आलेला आहे त्यामुळे देशातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणातअसंतोष आहे त्यामुळे शासनाने यावर त्वरित तोडगा काढावा संविधानात द्वारे प्रत्येक भारतीयाला शांततापूर्ण धरणे आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर सकाळी थंड पाण्याचे फवारे सोडणे हा अतिशय निंदनीय प्रकार आहे सरकारद्वारे शेतकऱ्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदर आणण्याच्या प्रकाराचा निषेध करण्यात येत असून शेतकऱ्यांच्या विधायक मागण्यांचे सत्याग्रह शेतकरी संघटने द्वारे समर्थन करण्यात येत आहे थंडीमध्ये कुडकुडणाऱ्या शेतकऱ्यांच्या आंदोलनावर त्वरित तोडगा काढावा अशी विनंती सत्याग्रह शेतकरी संघटना युवा आघाडी अध्यक्ष गणेश सडत कार यानी केली

महामानवाला पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांचे दीक्षाभूमीवर अभिवादन

0

नागपूर दि.6: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज दिनांक 6 डिसेंबरला उर्जामंत्री तथा पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दीक्षाभूमीवर विनम्र अभिवादन केले.
मुंबई येथील चैत्यभूमीवर सकाळी मुख्यमंत्र्यासह अभिवादन केल्यानंतर ते नागपूरला आले. तेथून थेट दीक्षाभूमीवर आज दुपारी सव्वाबारा वाजता त्यांचे आगमन झाले. येथील बौध्द स्तूपाच्या आतील तथागत गौतम बुध्द यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन त्यांनी अभिवादन केले. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलशाला पुष्पार्पण व अभिवादन केले.
नवनिर्वाचीत आमदार अभिजीत वंजारी, विभागीय आयुक्त डॉ.संजीवकुमार,जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे,महानगरपालिका आयुक्त बी.राधाकृष्णन ,पोलीस उपायुक्त नरूल हसन यावेळी उपस्थित होते. यांनतर सामूहिकरित्या बौध्द वंदना घेण्यात आली.
यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष भंदत सुरई ससाई,सचिव सुधीर फुलझेले, विश्वस्त विलास गजघाटे, सदस्य एन.आर सुटे,आनंद फुलझेले, आंबेडकर महाविदयालयाच्या प्राचार्या श्रीमती बी.एन.मेहरे व विद्यार्थी उपस्थित होते.
दीक्षाभूमी येथून निघून पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी संविधान चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळयास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. त्यांचे समवेत विभागीय आयुक्त डॉ. संजय कुमार, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे तसेच पदाधिकारी उपस्थित होते.

एप्रिल २०२३ पर्यंत इंदूमिल येथील डॉ. बाबासाहेबांचे स्मारकाचे काम पूर्ण करू – धनंजय मुंडे

0

 

महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर केले अभिवादन

मुंबई (दि. ०६, डिसेंबर) —- : इंदूमिल येथील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकाचे काम एप्रिल २०२३ पर्यंत पूर्ण करण्यात येईल तसेच १४ एप्रिल २०२३ ला याचे लोकार्पण करण्याचा प्रयत्न करू असे विधान राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे. दादर येथील चैत्यभूमीवर आयोजित महापरिनिर्वाण दिनाच्या अभिवादन सभेत ना. मुंडे बोलत होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन सभा आयोजित करून बाबासाहेबांना शासकीय मानवंदना देण्यात आली. धनंजय मुंडे यांनी मंत्रिमंडळातील सदस्यांसमवेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्तुपाला पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी राज्यपाल भगतसिंह कोशयारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री संजय बनसोडे, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांसह मान्यवर उपस्थित होते.

०६ डिसेंबर १९५६ रोजी ज्ञानाचा अथांग सागर, ज्ञानसूर्य, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण झाले त्यावेळी जगभरातील त्यांच्या लाखो अनुयायांचा प्राण तळमळला, एवढेच नव्हे तर दादरच्या त्या सागराचा देखील प्राण तळमळला असेल. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार, त्यांच्या आयुष्यातील संघर्ष, त्यांनी समाजाला दिलेली शिकवण याबद्दल कृतज्ञता व्यक्त करू, आमच्या पुढील अनेक पिढ्यांना ही शिकवण प्रेरणा देत राहील; असेही यावेळी बोलताना ना. मुंडे म्हणाले.

राज्य शासन व बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्यावतीने यावर्षी कोरोनाच्या संकटामुळे महापरिनिर्वाण दिनाचा कार्यक्रम विविध माध्यमातून बाबासाहेबांच्या कोट्यावधी अनुयायांसाठी लाईव्ह दाखवत दादर येथील चैत्यभूमीवर गर्दी न करण्याचे आवाहन केले होते. देशभरातील लाखो अनुयायांनी शिस्त पाळत याला प्रतिसाद दिला, त्याबद्दल सर्व अनुयायांचे आभार यावेळी धनंजय मुंडे यांनी मानले.

खा. शरद पवार यांच्यासोबतही अभिवादनास उपस्थित

दरम्यान शासकीय कार्यक्रमानंतर लगेचच दादर येथील चैत्यभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खा. शरद पवार यांनीही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृती स्थळी अभिवादन केले, यावेळी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, राज्यमंत्री संजय बनसोडे हे सोबत उपस्थित होते. धनंजय मुंडे यांनी यावेळी खा. पवार यांना कार्यक्रमाबद्दल माहिती दिली.

हिंदुहृदयसम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाची मुख्यमंत्री मा.ना उद्धवजी ठाकरे साहेब यांनी केली पाहणी

0

 

 

 

औरंगाबाद जिल्हा प्रतिनिधी

ऋषी जुंधारे

आज गोळवाडी येथे महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री उद्धवजी_ठाकरे_साहेबयांनी हिंदुहृदयसम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाची पाहणी केली. यावेळी माननीय_मुख्यमंत्री_साहेब व सार्वजनिक बांधकाम मंत्री मा. एकनाथजी_शिंदे_साहेब यांचे स्वागत *आमदार_प्रा_रमेश_पा_बोरनारे_सरकेले. यावेळी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या प्रगती कामाचा आढावा घेत मा मुख्यमंत्री साहेब यांनी स्वतः गाडी चालवत समृद्धी महामार्गाच्या कामाची पाहणी केली. यावेळी *मा मुख्यमंत्री साहेब यांना आमदार_प्रा_रमेश_पा_बोरनारे_सर*यांनी शेतकर्यांच्या वतीने सर्वीस रस्त्यांसाठी निवेदन दिले.
.
.
या महामार्गाच्या आढावा वेळी #मा_मुख्यमंत्री_साहेब यांनी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ आणि एलअँडटी कंपनीच्यावतीने समृद्धी महामार्ग पॅकेज 10 या बाबत सविस्तर माहिती घेतली. यामध्ये समृद्धी महामार्गाचा पॅकेज 10 प्रकल्प, प्रकल्पाची 57.90 कि.मी धावपट्टी, सर्व्हिस रोड, छोटे पूल, मोठे पूल, आगामी नियोजन, पॅकेज अंतर्गत या भागातील हरणांना जाण्यासाठी रस्ता, मनुष्यबळ निर्मितीवर भर आदींची सविस्तर तपशीलवार माहिती सादरीकरणाद्वारे देण्यात आली.
.
यावेळी शिवसेना नेते चंद्रकांतजी खैरे साहेब,
रोहयो मंत्री संदीपान भूमरे साहेब, महसूल राज्यमंत्री अब्दुलजी सत्तार साहेब, आमदार अंबादास दादा दानवे, आ. उदयसिंह राजपूत, आ. संजयजी सिरसाठ, मुख्यमंत्री सचिव मिलिंदजी नार्वेकर साहेब, जिल्हाधिकारी सुनीलजी चव्हाण, विशेष पोलीस महानिरीक्षक मल्लिकार्जुन प्रसन्ना, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ मंगेश गोंदवले, पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील,अप्पर मुख्य सचिव मनोज सौनिक, महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार, उपनगराध्यक्ष साबेरभाई, उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब पा जगताप, शिक्षण व आरोग्य सभापती अविनाश पा गलांडे, तालुका प्रमुख सचिन वाणी, मा जि प सदस्य मनाजी पा मिसाळ, शहरप्रमुख राजेंद्र पा साळुंके,उपतालुका प्रमुख महेश पा बुनगे, रणजित पा चव्हाण, हरिभाऊ साळुंके, पारस घाटे, रियाज अकिल शेख, अमीर अली उपस्थित होते.

जागतिक मृदादिनी कृषीविभागाने मृदाआरोग्य विषयक केले मार्गदर्शन

0

 

प्रतिनिधी -सचिन पगारे मो.न८३२९४२९२२१
नांदगाव (नाशिक)

जागतिक मृदादिनाच्या निमित्ताने जातेगांव येथे कृषी विभागा मार्फत शिबीराचे आयोजन करण्यात आले. नांदगांवचे कृषी सहायक श्री. अविनाश पुराणे यांनी शेतकर्‍यांना मार्गदर्शन केले.
माती हा अत्यंत महत्त्वाचा पण नेहमी दुर्लक्षित राहिलेला घटक . संपूर्ण जीवसृष्टीसाठी माती ही महत्त्वपूर्ण समजली जाते. अन्नधान्याच्या ९० टक्के गरजा ह्या मातीमुळेच पूर्ण होतात.जर मातीची धूप झाली तर जमिनीतील लाखो टन अन्नद्रव्य ,जीवाणू व बुरशीचा नाश होतो. माती संवर्धनासाठी जनजागृती करण्यासाठी संयुक्त राष्ट्राच्या खाद्य व कृषी संस्थेने ५ डिसेंबर हा दिवस ‘जागतिक मृदादिन ‘ साजरी करण्याचे ठरविले. नांदगाव तालुक्यातील जातेगांव येथे गावातील श्री पिनाकेश्वर महादेव मंदिरात कृषी शिबिराचे आयोजन करण्यात आले. जागतिक मृदादिनाचे औचित्य साधून नांदगांव येथील कृषी विभागाचे कृषी सहायक श्री. अविनाश पुराणे यांनी या शिबीराचे आयोजन केले. श्री. पुराणे यांनी शेतकर्‍यांना मातीचे महत्त्व, मातीतील आवश्यक घटक, मातीतील पोषक घटकांसाठी उपाय योजना, गावनिहाय सूक्ष्म मूलद्रव्ये प्रमाण, खत व्यवस्थापन ,गावाचा सूपिकता निर्देशांक आदी विषयांवर मार्गदर्शन करून शेतकर्‍यांशी संवाद साधला व राष्ट्रीय कृषी योजने अंतर्गत जमिन आरोग्य पत्रिकेचे वितरण केले . या ठिकाणी श्री. विजय पाटील , रावसाहेब खिरडकर, संदिप पवार,आंबादास सोनवणे, तातेराव पगारे, कारभारी खिरडकर, दिलीप सोनवणे, वैभव शिंदे, ईश्वर जाधव,कैलास पवार, कैलास गायकवाड, दादासाहेब सोनवणे, आंबादास रवळे ,छबुजी लाठे, आदी शेतकरी उपस्थित होते .

शिंदी येथे जागतिक मृदा दिन साजरा !

0

 

सिंदखेडराजा ( सचिन खंडारे )

शिंदी येथे दिनांक 5 डिसेंबर रोजी जागतिक मृदा दिनानिमित्त ग्रामपंचायत भवनामध्ये जागतिक मृदा दिन साजरा करण्यात आलायावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून कृषी सहाय्यक शरद पवार कृषी पर्यवेक्षक गणेश बंगाळे सरपंच विनोद खरात माझी सरपंच अशोक खरात हे उपस्थित होते !यावेळी कृषी सहाय्यक शरद पवार यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की चार ते पाच वर्षांनी प्रत्येक शेतकऱ्यांनी आपल्या मातीचे परीक्षण हे केले पाहिजे !व प्रत्येकाने सेंद्रिय शेती करावी असे आवाहन यावेळी त्यांनी केले !त्यानंतर कृषी पर्यवेक्षक गणेश बंगाळे यांनी सांगितले की !प्रत्येक शेतकऱ्यासाठी मातीचे परीक्षण ही काळाची गरज असून प्रत्येक शेतकऱ्यांनी मातीचे परीक्षण करून घ्यावे !यावेळी सरपंच विनोद खरात तसेच अशोक खरात यांचेही थोडक्यात भाषणे झाली !यावेळी सुनील खंडारे ‘ पत्रकार सचिन खंडारे .उत्तम बंगाळे ‘ विष्णू बंगाळे ‘ वसंता बंगाळे ‘संतोष बाजीराव बंगाळे ‘गजानन भांड ‘ भगवान बरकूल ‘आधी शेतकरी या वेळी उपस्थित होते !