Home Blog Page 571

मिरवणूक काढल्या प्रकरणी गुन्हा दाखल

0

 

(सूर्या मराठी न्युज)

सोनाळा येथे श्री संत सोनाजी महाराज यात्रा कोरोना या वैश्विक महामारी मुळे रद्द असल्यामुळे मध्यरात्री काढली डोक्यावर छोट्या रथाची मिरवणूक ; अन् सोनाळा पोलिसांनी केला गुन्हा दाखल…!
अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक तसेच दंगा काबू पथक 5ते7 पोलीस उपनिरीक्षक अंदाजे 140 ते 150 पोलिसांचा तगडा बंदोबस्त असताना मिरवणूक निघाली तरी कशी सोळाना पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह???? संग्रामपुर ता प्र
– संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा येथे श्री संत सोनाजी महाराज यांची दरवर्षी भव्य यात्रा असते. विदर्भातील नावलौकिक व सर्वात मोठी यात्रा म्हणून प्रसिद्ध असलेली श्री संत सोनाजी महाराज यात्रा महोत्सव यंदा कोरोना महामारीमुळे रद्द करण्यात आली आहे . तसेच जिल्हाधिकारी यांचे आदेशानुसार यात्रा रद्द व कोणत्याही प्रकारची जमाव न करता 10 लोकांच्या उपस्थित मंदिरास परवानगी दिली होती तसेच रथाची गावातुन मिरवणूक काढण्यास परवानगी नसतांना सोनाळा गावातील काही भक्तांनी मोठ्या रथाची ओढून मिरवणूक न काढता प्रशासनाची कोणतीही परवानगी नसतांना मोठ्या प्रमाणात जमाव करून डोक्यावर लहान रथ ची प्रतिकृती घेवून रात्री 12 ते 1 वाजताच्या दरम्यान गावातुन मिरवणूक काढली त्यामुळे नियमांचे उल्लंघन केल्याने भक्तावर गुन्हा दाखल केले.सोनाळा पोलीस तर्फे मंगेश आनंद लेकुरवाळे पोलीस शिपाई बक्कल नंबर392 यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सोळा पोलिसांनी 27 लोकांवर व30ते 35 अनोळखी लोकांवर कलम 143,188,269,270,116,135,51ब11 भादवि नुसार , गुन्हा दाखल करण्यात आले आहे. सदर प्रकरणाचा पुढील तपास सोनाळा पोलिस स्टेशनचे ठाणेदार अमर चोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक

प्रकाश पवार हे करीत आहेत

राजेगांव येथे आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन इसमाची आत्महत्या !

0

 

साखरखेर्डा (प्रतिनिधी )

रमेश ऋदांजी जाधव (मुळ गांव रायपुर) ह.मु . पुणे हबेवाडी कात्रज येथील इसम बुलडाणा जिल्ह्यातील राजेगांव येथील मावसभाऊ नंदकिशोर भालेराव यांच्या घरी दिवाळी सणा निमित्त आले होते
परंतु दिनांक 2 /12/2020रोज बुधवार सकाळी लवकर उठून बाहेरून फेरफटका मारून येतो सांगून बाहेर पडले त्यानंतर गावातील शेकुटीवर शकत बसले त्यानंतर
गावालगतच असलेल्या मावसभावाच्या शेतात जाऊन शेतात असलेल्या आंब्याच्या झाडाला आपल्या जवळील पांढऱ्या कलरच्या दाेरीने गळफास घेऊन रमेश ऋंदाजी जाधव यांनी आपली जिवन यात्रा संपवली
सदर प्रकरणाची माहिती मिळताच गावातील कार्यकर्ते व नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली सदर प्रकरणाची माहिती मृतक इसमाचे मावसभाऊ नंदकिशोर भालेराव यांनी साखरखेर्डा पोलीस स्टेशनला कळवली असता
साखरखेर्डा पोलीस स्टेशन दंबग ठाणेदार श्री आडोळे साहेब
साहाय्यक फौजदार इंगळे साहेब पो.ह काॅ. सानप साहेब यांनी घटनास्थळी पोहचून पुढील वृत्तलिहिपर्यंत मृतक इसमाचे कारण स्पष्ट झाले नसून
रमेश जाधव यांनी आत्महत्या का केली
पुढील तपास साखरखेर्डा पोलीस स्टेशनचे दंबग पोलीस निरीक्षक श्री जितेंद्र आडोळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली
सहाय्यक फौजदार इंगळे साहेब पो. ह. काॅ. सानप साहेब करत आहे

अखिल विश्व वारकरी महाराष्ट्र राज्य परिषदेच्या परभणी महीला आघाडी जिल्हा अध्यक्षपदी श्रीमती कमलताई राठोड

0

 

 

अजहर पठाण
पाथरी/परभणी

परभणी जिल्ह्यातील पाथ्री येथील सामाजिक कार्यकरत्या श्रीमती कमलताई राठोड यांची परभणी जिल्हा महिला शाखेच्या अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली.यावेळी वारकरी परिषदेचे महाराष्ट्र संघटक श्री.दगडोबा जोगदंड पाटील महाराज, प्रदेश चिटणीस श्री. ह. भ. प. दत्तराव महाराज मगर सोंनेकर, मराठवाडा अध्यक्ष श्री. महादेव महाराज ढवळे, संपर्क प्रमुख श्री. रामकृष्ण महाराज पारवेकर यांच्या उपस्थितीत निवडीचे पत्र देण्यात आले. श्रीमती कमलताई राठोड यांचे अभिनंदन अखिल विश्व वारकरी महाराष्ट्र राज्य परिषदेच्या वतीने प्रदेश अध्यक्ष श्री. नितिनदादा सातपुतेयांनी केले आहे

 

407 पलटी मध्ये  3 जण  ठार तर, 6 जखमी

0

 

 

हिम्मतराव तायडे

महाराष्ट्र ब्युरो चीफ

गंभीर जखमींवर अकोल्यात व तेल्हारा रुग्णालयात उपचार सुरू
बाळापूर तालुक्यातील अंधुरा येथुन कापूस घेऊन जाणारा 407 मिनी डोअर पलटी झाल्याने अपघातातील गंभीर जखमींना तेल्हारा व अकोला रुग्णालयात दाखल करण्यात आले . या अपघातामुळे अकोट – शेंगाव मार्गावरील वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती.
शेगाव – आकोट महामार्गावरील अंदुरा ते आडसूळ दरम्यान कापूस भरून घेऊन जाणारा 407 मिनी डोअर वरील चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने पलटी होऊन त्यामध्ये 3 जण जागीच ठार तर 6 जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज दिनांक 2 डिसेंबर रोजी दुपारी 12.30 दरम्यान घडली.

ग्राम हाता येथून कापूस भरून घेऊन जाणारा 407 मिनी डोअर क्रमांक MH04 GC 9420 क्रमांकाचा मिनी डोअर आकोट कडे जात असताना मिनी डोअर चालकाचे गाडीवरून नियंत्रण सुटल्याने परस्पर विरोधी दिशेने तळेगाव बाभूळगाव येथून कौटुंबिक कार्यक्रम पार पाडून शेगाव कडे जात असलेल्या MH28 AV 3288 क्रमांक असलेल्या दुचाकीला जबर धडक दिली. व मिनी डोअर बाजूला जाऊन पलटी झाले. यामध्ये दुचाकी वरील प्रल्हाद अडकणे रा. दसरा नगर शेगाव वय अंदाजे 60 वर्षे तर मिनीडोअर मधील 2 जणांचा जागीच मृत्यू झाला. तर दुचाकीवरील 2 व मिनीडोअर मधील 4 जण गंभीर जखमी झाले. त्यामुळे काही काळासाठी महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. परतू अंदुरा – आडसूळ ग्रामस्थांच्या सहकार्याने ते सुरळीत करण्यात आली.
या घटनेची माहिती मिळताच उरळ व तेल्हारा पोलीस स्टेशनचे ठाणेदार व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्वरित येऊन सदर घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी तेल्हारा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी घटनेची माहिती मिळताच अंदुरा सरपंच संजय वानखडे, आडसूळ सरपंच सदानंद नवलकार, पोलिस पाटील ज्ञानदेव रोहणकर, तलाठी सतीश कराड, तलाठी काकडे, कोतवाल राजु डाबेराव, शुभम नवल कार, शिव हरी बाहे, आदी ग्रामस्थांनी मदत करून मार्गावरील ठप्प असलेली वाहतुक सुरळीत केली.

ओव्हर लोड असलेल्या गाड्यांची बेताल वाहतुक
मागील काही दिवसांपासून अंदुरा परिसरातून ओव्हर लोड असलेल्या गाड्यांची बेताल वाहतुक सुरू असून या बेताल वाहतुकीमुळे आजचा अपघात झाला असावा असे ग्रामस्थांकडून बोलल्या जात असून या बेताल असलेल्या वाहतुकीला आला घालावा अशी मागणी करण्यात

पंजाब -हरियाणा शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ नांदगाव प्रहार संघटनेकडून रास्तारोको आंदोलनाचे तहसीलदारांना निवेदन

0

प्रतिनिधी- सचिन पगारे
नांदगांव नाशिक

दिल्ली येथील शेतकर्‍यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ केंद्र सरकारचा निषेध व्यक्त करण्यासाठी प्रहार शेतकरी संघटना व प्रहार जनशक्तीमार्फत नांदगांव येथे रास्ता रोको आंदोलना बाबत तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले.
कृषी कायद्या विरोधात दिल्ली येथे सुरु असलेल्या पंजाब -हरियाणा येथील शेतकर्‍यांसह देशातील लाखो शेतकरी सहभागी झाले असून केंद्र सरकारने या शेतकर्‍यांसोबत अजूनही चर्चा केलेली नाही. याउलट या आंदोलनकर्त्या शेतकर्‍यांवर हिंसाचार करत हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत आहे.सदर शेतकर्‍यांच्या समर्थनार्थ व शासनाच्या कृषी कायद्याच्या विरोधात दि.४ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता नांदगांव येथे रस्तारोको आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे .नांदगांव तालूका प्रहार शेतकरी संघटना व प्रहार जनशक्ती पक्षामार्फत तहसीलदार उदय कुलकर्णी यांना निवेदन देण्यात आले. याठिकाणी नांदगाव प्रहार शेतकरी संघटनेचे तालूका अध्यक्ष संदीप सूर्यवंशी, तालूका प्रहार जनशक्ती पक्षाचे तालूका अध्यक्ष डॉ.जनार्दन पगार, तालूका उपाध्यक्ष नंदलाल इप्पर , उप तालुकाध्यक्ष राहूल आहेर ,नांदगाव उपतालूका प्रमुख गोकुळ थोडे, मनमाड प्रहार जनशक्ती पक्षाचे शहराध्यक्ष दत्तू कांतीलाल कातकडे, अतुल इप्पर, राहुल आहेर, प्रदिप आहेर, गणेश इप्पर, जातेगांव शाखा संघटक ईश्वर जाधव, शाखाध्यक्ष जनार्दन भागवत, उपाध्यक्ष चंद्रभान झोडगे,नारायणशेठ सोनवणे, निवृत्ती सोनवणे,राहूल पवार रविकांत भागवत, वैभव शिंदे, नंदू खिरडकर, सद्दाम शेख , किरण पवार आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

तळेगाव  पोलिस स्टेशनच्या हाकेवरच्या अंतरावर सुरु आहे खुलेआम मटका.

0

 

– तळेगाव पोलिस स्टेशनच्या कार्यप्रणाली वर प्रश्नचिन्ह.

वर्धा जिल्हा आष्टि तालुका तळेगाव शामजी पंत येथे अवैध धनद्याला उधान आले आले याचे नेमके एक उदाहरण म्हणजे पोलिस स्टेशनच्या हाकेचदया अंतरावर मोठ्या प्रमाणात सुरु असलेला मटक्याचा धंदा राजरोसपणे खुले आम सुरु आहे.

नुकतेच रुजु झालेले नविन ठाणेदार यांना हे अवैद धंधे दिसत नाहि का असा प्रश्न सामान्य नागरिकांकळुन विचारल्याजात आहे.

राष्ट्रिय महामार्ग क्र. ६ वर स्थित असलेले हे तळेगाव शामजी पंत गाव येथे दारु, सट्टा, जुगार व अनेक अवैध व्यवसाय कोनाच्या आशिर्वादान चालते हा एक मोठा प्रश्न सामान्य जनतेला पडला आहे मागिल ठाणेदार यांनी या अवैध धंनद्यावर रोख ल‍वन्याचे बरेच प्रयत्न केले व बर्याच पैकी त्याना यात याश सुस्धा आले.

पण अाज तळेग‍व येथिल उडान पुला खाली अनैक अवैध धंदे हे सुरु आहे व हे कोनाला दिसत नाहि का व हे धंदे कोनाच्या आशिर्वादाने चालते अश्या चर्चेला उदान आले आहे.

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन मुंबईतच, ‘या’ दिवशी होण्याची शक्यता

0

 

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ७ ते ९ डिसेंबर या कालावधीत मुंबईतच होण्याची शक्यता आहे. ७, ८ आणि ९ डिसेंबर असे तीन दिवस अधिवेशन होण्याची शक्यता आहे. कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त केली गेल्याने अधिवेशन पुढे ढकलण्याचा विचार होता. पण रुग्णसंख्या आटोक्यात असल्यामुळे ठरलेल्या तारखेनुसार अधिवेशन होण्याची शक्यता आहे.

उद्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे. हिवाळी अधिवेशन नागपूर ऐवजी मुंबईतच होणार आहे. कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता. पण आता कोरोनाच्या संकटामुळे अधिवेशन होणार की नाही याबाबत प्रश्नचिन्ह होती.

राज्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे शासनाकडून खबरदारीच्या उपाययोजना केल्या जात आहेत. दुसरीकडे राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागणार का अशी चर्चा ही जनतेमध्ये सुरु झाली आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये कोरोनाची नवी लाट आल्याने काही ठिकाणी रात्री कर्फ्यू लागू करण्यात आला आहे.

मोठ्या प्रमाणात लोकं बाहेर पडत असल्याने कोरोनाचा संसर्ग वाढल्याची भीती व्यक्त होत आहे. दिवाळीनंतर कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात होती. त्यामुळे येणारे काही दिवस महत्त्वाचे आहेत…!

ढगाळ वातावरणामुळे तूर पिकावर अळीचा प्रादुर्भाव वाढला !फवारणी हाच एकमेव पर्याय -कृषी विभागाचे मत : !

0

 

सिंदखेड राजा ( सचिन खंडारे)

सध्या गेल्या आठवडा भरा पासून वातावरणामध्ये बदल झाला आहे ढगाळ वातावरण काही ठिकाणी निर्माण झाली आहे !याचाच परिणाम तूर पिकावर वाढला आहे तुरीच्या झाडाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये फुले आले असून ढगाळ वातावरणामुळे फुले गळून पडू लागली आहे !तर काही ठिकाणी तुरीच्या झाडावरती आळ्यांचा प्रादुर्भाव वाढला आहे !
तर तूरीच्या झाडावरती फवारणी हाच एकमेव पर्याय असल्याचे मत कृषी अधिकारी यांनी व्यक्त केला आहे अगोदरच शेतकरी यावर्षी अतिवृष्टीमुळे हवालदिल झाला आहे आणि अशातच या हंगामामध्ये शेतकरी तुरीचे उत्पन्न घेत असतो :अगोदरच अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे आणि आता वातावरणामध्ये बदल झाल्यामुळे तुरीवर अळीचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे शेतकरी चिंतेत आहे !सोयाबीन नाही झाली तरी चालेल परंतु तुरीच्या उत्पन्नावर आपण घर गाडा चालू अशी शेतकऱ्यांची इच्छा असते !शिवाय तुरीला बाजार भाव सुद्धा जास्त असतो !परंतु तुरीवर अळीचा प्रादुर्भाव वाढल्याने तुरीवर औषधांची फवारणी हाच एकमेव पर्याय असल्याचे मत कृषी पर्यवेक्षक गणेश बंगाळे यांनी व्यक्त केले आहे ।

उंद्री येथे उद्योजक विकास व प्रशिक्षण कार्यक्रमाचा समारोप !प्रमाणपत्र वाटप !

0

 

साखरखेर्डा (प्रतिनिधी )

चिखली तालुक्यातील उंद्री येथेसेंट्रल बँक ऑफ इंडिया व भारत सरकारच्या वतीने ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था व ग्रामपंचायत उंद्री यांच्या सहकार्यातून उंद्री गावातील 25 ते 45 वयोगटातील महिला बचत गटांच्या ३५ महिलांना दि . 1डिसेंबर रोजी गावातील जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ मराठी शाळेच्या प्रांगणामध्ये ‘विविध विषयांमध्ये सहा दिवस प्रशिक्षण देण्यात आले !या प्रशिक्षणामध्ये चहापान भोजन साहित्य व व्यवसाय उद्योग यासह बँकिंग योगासने खेळ आधीचे नि: शुक्ल पणे प्रशिक्षण दिल्या गेले ।तसेच महिलांना उंद्री गावचे सरपंच भाई प्रदीप अंभोरे यांच्या हस्ते प्रशिक्षित महिलांना प्रमाणपत्र चे वितरण करण्यात आले ‘यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून . आर सेट आय चे संचालक दिलीप ठाकूर हे उपस्थित होते .या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठीप्रशिक्षक अमोल गवळी ग्राम विकास अधिकारी दीपक गिऱ्हे सी आर पी ) ज्ञानेश्वरी जगताप यांनी अथक परिश्रम घेतले !

पर्यटकाच्या वाहनाला अपघात होऊन 2 ठार

0

 

गोंदिया-शैलेश राजनकर

ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्पालगत असलेल्या चिमूर ते कोलारा मार्गावर तुकूम फाट्याजवळ मंगळवारी दुपारी 12 वाजताच्या सुमारास पर्यटकाच्या वाहनाला अपघात होऊन एक मुलगी व तिचे काका ठार झाल्याचे वृत्त आहे. या अपघातात 4 पर्यटक जखमी झाले आहेत. सना गोयल (13) असे मृतकाचे नाव आहे. जखमीपैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना चिमूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार करून नागपूरला हलविले. दोघांवर चिमूर येथेच उपचार सुरू आहे. फोर्ड कार क्रमांक MH49 2489 ला अपघात झाला आहे. या कार मध्ये चालक ज्ञानेश्वर वसंता नरड वय ३८ वर्षे , मिनू अमिनेश अग्रवाल ३२ वर्षे , नेहा आशिष अग्रवाल वय ३६ वर्षे , ईशु अनिमेश अग्रवाल वय १७ वर्षे असे एकूण ६ जण होते.या सहा पैकी २ चे मृत्यू झाले असून ४ जणांवर उप जिल्हा रुग्णालय चिमूर येथे उपचारासाठी दाखल करून पुढील उपचारासाठी नागपूर येथे रेफर करण्यात आले आहे.पुढील तपास चिमूर पोलीस स्टेशन करीत आहे.