Home Blog Page 572

देवरी तालुक्यातील मतदान केंद्र १७१ वर ७४.७७% व १७१A मध्ये ७१.९०% मतदान

0

 

भागवत चकोले
देवरी तालुका प्रतिनिधि

देवरी ०१: नागपूर पदवीधर मतदान संघ २०२० निवडणूक नुकाततीचा पार पडली असून तालुक्यात तहसील कार्यालय देवरी येथे सकाळी ८ ते ५ वाजे पर्यंत येथील दोन बूथ वर मतदान पार पडले असून तहसीलदार देवरी यांना दिलेल्या माहिती नुसार मतदान केंद्र १७१ वर एकूण मतदार पुरुष ४०३ व स्त्री १४८ एकूण ५५१ पैंकी ३१४ पुरुष व ९८ स्त्री एकूण ४१२ मतदान झाले असून पुरुष टक्केवारी ७७.९२ व स्त्री ६६.२२ असून एकूण ७४.८८% मतदान झाले . १७१A मध्ये एकूण मतदार पुरुष ३९४ व स्त्री १७९ एकूण ५७३ पैकी ३०१ पुरुष व १११ स्त्री एकूण ४१२ मतदान झाले असून पुरुष टक्केवारी ७६.४० व स्त्री ६२.०१ एकूण टक्केवारी ७१.९० असून ११२४ पैकी ८२४ मतदारांनी मतदानाचा अधिकार बजावला आहे .

सिंदखेड राजा तालुक्यात आजपासून क्षयरोग व कुष्ठरोग शोध मोहीम सुरू !लोकांनी आरोग्य विभागाला सहकार्य करावे तालुका वैद्यकीय अधिकारी …….डॉ . महेंद्र साळवे यांचे आव्हान !

0

 

सिंदखेड राजा ( सचिन खंडारे )

बहुप्रतिक्षित शयरोग व कुष्ठरोग शोध मोहीम आरोग्य विभागाची 1 डिसेंबर पासून सिंदखेडराजा तालुक्यामध्ये सुरु झाली आहे !तालुक्यातील चार पी एस सी केंद्रातील कर्मचारी या शोध मोहिमेमध्ये कार्यरत आहे !यामध्ये आडगाव राजा मलकापूर पांग्रा सिंदखेड राजा व साखरखेर्डा येथील पी एस सी केंद्राचा समावेश आहे !या मध्ये आशा स्वयंसेविका आरोग्य सेविका व आरोग्य सेवक सुपरवायझर म्हणून राहणार असून !आज पासून संपूर्ण तालुक्यामध्ये कुष्ठरोग व क्षयरोग शोध मोहीम घरोघरी जाऊन त्यांची तपासणी होणार आहे त्यांचा शोध आरोग्य कर्मचारी घेणार आहेत !यासाठी अगोदर तालुक्यातील चारही प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आशा स्वयंसेविका आरोग्य सेवक आरोग्य विभागातील सर्व कर्मचारी यांच्या बैठका घेऊन त्यांना आरोग्य तालुका अधिकारी डॉक्टर महेंद्र साळवे यांनी मार्गदर्शन केले आहे विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले आहे !आज जागतिक एडस् दिनानिमित्त सुद्धा सिंदखेडराजा येथील ग्रामीण रुग्णालयांमध्ये लोकांना किट व मार्गदर्शन करण्यात आले -तर क्षयरोग व कुष्ठरोग शोध मोहीम मध्ये लोकांनी आरोग्य कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे व स्वतःहून असलेल्या आजाराची माहिती न लपवता द्यावी असे आवाहनही सिंदखेडराजा तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर महेंद्र साळवे व ग्रामीण रुग्णालय सिंदखेडराजा च्या वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सुनीता बिराजदार यांनी केली आहे !

आमदार असावा तर असा ! गोरगरिबांच्या लग्नामध्ये हजेरी लावणारा आमदार लखनजी मलिक !

0

सिंदखेड राजा (सचिन खंडारे )

काल दिनांक 30 नोव्हेंबर रोजी मा जिल्हा वाशिम ‘मालेगाव तालुक्यातील हनवतखेडा या गावांमध्ये चिरंजीव हर्षवर्धन व चि . रूपाली या नव दाम्पत्याचा विवाह सोहळा पार पडला !या विवाह सोहळ्याचे एक वेगळे वैशिष्ट्य म्हणजे !मंगरूळपीर . – वाशिम मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार लखनजी मलिक होय !एखादा आमदार फक्त पुढाऱ्यांच्या मुलींच्या – मुलांच्या लग्नांमध्ये आवर्जून हजेरी लावत असतो !मोजकेच आमदार याला अपवाद आहेत की जे गोरगरिबांच्या मुलांच्या \मुलींच्या लग्नाला आवर्जून पूर्णवेळ उपस्थित असतात !पंक्तीमध्ये लोकांच्या बरोबर जेवण करतात !असेच आमदार लखनजी मलिक आहेत ते कुठल्याही गोरगरिबांच्या लग्नामध्ये फोन आल्याबरोबर किंवा कळल्याबरोबर लग्नाला आवर्जून उपस्थित असतात लोकांमध्ये बसतात !एखादा व्यक्ती आमदार झाल्यानंतर तोर्यात मिरवत असतो परंतु लखन जी मलिक यांची अतिशय साधी राहणीमान आहे -कुठलाही बडेजाव नाही !सामान्य लोकांप्रमाणे ते लोंकांत मिसळतातम्हणूनच लखनजी मालिक हे गेल्या पंचवीस वर्षापासून आमदार आहेत ‘इतरही आमदारांना लखनजी मलिक यांचा आदर्श घेण्यासारखा आहे !

कारवरील नियंत्रण सुटून कार पलटी एकच मृत्यू तर तिघे जण गंभीर जखमी !लव्हाळा येथील उडान फुला जवळील घटना !

0

 

सिंदखेड राजा (सचिन खंडारे )

केंद्रीय मंत्रालयाने सिमेंट काँग्रेसचे चांगले रस्ते केले की जेणेकरून खड्डे असलेल्या रस्त्यावरून अपघात होणार नाहीत परंतु चांगले रस्ते झाल्यानंतर गाडीचा वेगही वाढला आहे याचा प्रत्यय होणाऱ्या अपघातातून दिसून येत आहे !दिनांक 30 नोव्हेंबर रोजी चिखली ते मेहकर मार्गावरील लव्हाळा येथील उड्डाणपुलाजवळ साखळी खुर्द येथील वाठोरे कुटुंबीय एम एच 24 व्ही 84 22 या क्रमांकाच्या कारणे काही कामानिमित्त पहाटे परभणी कडे जायला निघाले होते !सकाळी सहा वाजता लवळा जवळील उड्डाणपुलाजवळ आली असता चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कार पुलाजवळील रस्त्याच्या बाजूने असलेल्या एका शेतात उलटली ‘ज्या अपघातात सतपाल वाठोरे वय 46 वर्ष हे जागीच ठार झाले तर त्यांच्यासोबत असलेल्या त्यांच्या पत्नी लताबाई वाठोरे वय 36 वर्ष व त्यांची आई मालताबाई वाठोरे वय 65 वर्ष आणि कार चालक राजू काजणे हे तिघे जण गंभीर जखमी झाले !या या अपघाताची माहिती मिळताच साखरखेर्डा येथील आरोग्य केंद्रातील रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी पोहोचून जखमी वर प्राथमिक उपचार करून त्यांना बुलढाणा येथील सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले !या अपघातामुळे साखळी खुर्द येथील वाठोरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे व गावात हळहळ व्यक्त होत आहे !पुढील तपास साखरखेडा पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष ठाणेदार जितेंद्र आडोळे यांच्या मार्गदर्शनाखाली दिनेश चव्हाण करीत आहेत !तरी लोकांनी रस्ता चांगला आहे म्हणून गाडीचा वेग वाढू नये असे आव्हान जाणकार व्यक्त करत आहेत !

प्रिया चा आदर्श इतर मुलींनी घ्यावा !अपघातात हात गमावलेल्या च तरुणांशी केले प्रियांनी लग्न !एकमेकांचा आधार घेऊन संसार फुलवणार – ….!

0

 

सिंदखेड राजा (सचिन खंडारे )

हिंदी चित्रपट घेऊन गेला होता ” विवाह ” यामध्ये शाहिद कपूर आणि एका मुलीशी लग्न ठरलेले असते आणि तीचे अपघातांमध्ये संपूर्ण शरीरा जळालेली असते !तरीही शाहिद कपूर तिच्याशी च लग्न करतो !अगदी असंच हुबेहूब चित्रण चिखली तालुक्यातील चांधई या गावांमध्ये घडली तर कुतूहल वाटू नये …..सध्या सोशल मीडियावर या वैशिष्ट्यपूर्ण विवाहाची चर्चा सुरू आहे .कारण ही तसेच आहे .चिखली तालुक्यातील चांद ही येथील विशाल दिनकर इंगळे आणि मंगरूळ नवघरे येथील प्रियंका अंकुश घेवंदे यांचे तीन महिन्यापूर्वी लग्न पक्के ठरलेले होते .एक नवीन सुखी संसाराची सुरुवात आपण करणार आहोत असे दोघांचाही मनी रुतले होते ‘विशाल हा प्रवर चालक म्हणून काम करत होता दोघ ही सुखी संसाराची स्वप्न फुलवत होते .दोन्हीकडे मंडळीसुद्धा लग्नाच्या तयारीच्या कामाला लागली होती ‘परंतु लग्नाच्या अगोदरच एका महिन्यात विशाल यांचा देऊळगाव मही जवळ भीषण अपघात झाला ‘व त्यात त्याचा डावा हात ट्रकच्या चाकाखाली चिरडला गेला त्याच्यावर औरंगाबाद येथील रुग्णालयात उपचार करण्यात आली मात्र हात पूर्णता निकामी झाल्याने त्याचा डावा हात कापावा लागला ।विशाल हा वाहनचालक असल्यामुळे दोन्ही हाताने स्टेरिंग पकडावी लागत असते ‘शिवाय हातावर पोट होते तोच हात आता राहिला नसल्याने पुढे करावे तरी काय हा प्रश्न त्याच्या मनात निर्माण झाला ‘विशाल आणि प्रिया दोघेही अधून-मधून एकमेकांना सुखी स्वप्न संसाराची कशी रंगणार या वरून फोनवर . दोघे ही चर्चा करायचे ‘तब्येतीची विचारपूस करायचे ‘अशातच प्रीया ला विशालने सर्व खरे सांगून टाकले : !अशातच पर्यायाच्या घरच्या मंडळींनी थोडीफार कुजबूज करण्यास सुरुवात केली !आता विशाल एका हाताने कशी काम करणार ? कसा संसाराचा गाडी पुढे नेणार प्रश्न त्यांच्या मनामध्ये दाटू लागला ! प्रियाने तिच्या मनामध्ये फक्त आणि फक्त विशाललाच शेवटपर्यंत साथ देण्याचा मनामध्ये ठाम निर्णय घेतला ।संसार थाटील तर विशाल संगेच !असा ठाम निश्चय प्रियाने केला होता !लग्न झाल्यानंतर जर विशालचा हात तुटला असता तर तुम्ही तो स्वीकारला असता ना ?तीन हातांनीच संसार आम्ही आयुष्यभर फुलवू !असे प्रियाने घरच्यांना समजावून सांगितले !घरच्यांनाही प्रियाचे म्हणणे पटले व 27 नोव्हेंबरला मोजकेच नातेवाईक यांच्या उपस्थितीत येथे दोघांचाही विवाह पार पडला !समाजामध्ये प्रियाने दिलेली ही चपराक म्हणावी लागेल !कारण अनेक मुली ह्या छोट्या छोट्या कारणावरून मुलांना नाकारत असतात !डोळ्यावरून कानावरून रूपावरून अपंगत्ववरून अनेक संसार हे माना पानावरून सुद्धा मोडले आहे !परंतु !परंतु निश्चितच समाजातील लोकांनी खास करून तरुण तरुणींनी यातून बोध घेणे गरजेचे आहे !विशाल व प्रियांच्या सुखी आयुष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा !

जिल्ह्यात घातक शस्त्रे येतात कुठून? मॅक्झिन असलेली पिस्टल, जिवंत काडतूस जप्त… एलसीबीची कारवाई..

0

 

सुनिल पवार नांदुरा

(सूर्या मराठी न्युज)

नांदूरा- खामगाव हायवेवरून जिवंत काडतूस, मॅक्झिन व पिस्टलसह एका आरोपीला एलसीबीने जेरबंद केले आहे.तत्पूर्वीही तलवारी, पिस्टल अशी घातक शस्त्रे जप्त करण्यात आली आहे. मात्र ऐवढी घातक शस्त्रे बुलडाणा जिल्ह्यात येतात तरी कुठुन? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

जलंब पोलिस स्टेशन हद्दीत नांदुरा- खामगाव हायवेवर आरोपी अब्दुल मोबीन अब्दुल समद रा. नांदूरा जि. बुलडाणा व एक फरार आरोपी याच्याकडून १ मॅक्झिन असलेली पिस्टल, १ जिवंत काडतूस, १ रिकामी काडतूस, ३ मोबाईल, १ झायलो कार असा ५ लाख ६१ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपी विरुद्ध ३ / २५ शस्त्र अधिनियमानुसार गून्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, अप्पर पोलीस अधीक्षक हेमराज सिंग राजपूत, अप्पर पोलीस अधीक्षक, बजरंग बनसोडे यांचे मार्गदर्शनाखाली स्थागुशाचे पोलीस निरीक्षक बळीराम गीते यांचे आदेशाने
पोउपनि निलेश शेळके,
श्रीकांत जिंदमवार,गजानन आहेर,युवराज शिंदे,सतीश जाधव,सरिता वाकोडे,सचिन जाधव यांनी केली.गेल्या महिन्याभरात जिल्ह्यात बेकायदा शस्त्र बाळगणाऱ्या गुन्हेगारांवर लगाम लावण्यात एलसीबीला यश येत असले तरी, घातक शस्त्रे येतात कुठून ? याची पाळेमूळे शोधण्याची गरज निर्माण झाली आहे.

सोशल मीडियातून जवळीक साधून मुलीवर अत्याचार ,गुन्हा दाखल

0

 

फेसबुक माध्यमातून जवलीकब साधत अकोला येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी वानखेड तालुका संग्रामपूर येथील युवका विरुद्ध तामगाव पोलीसांनी गुन्हा दाखल केला. अकोला येथील अल्पवयीन मुलीशी संग्रामपूर ब तालुक्यातील वानखेड येथील रवी मेहंगे वय 23 वर्ष याने फेसबुक च्या माध्यमातून मैत्री केली प्रेम संबंध निर्माण केले लग्नाचे आमिष देउन घरी बोलावत वेळावेळी अत्याचार केला व वारंवार भेटण्याचा तगादा लावुन बदनामी करण्याची धमकी दिली अशी ब तक्रार अल्पवयीन मुलीने तामगाव पोलीस स्टेशन ला दिली या वरून रवी मेहंगे विरुद्ध भादवीच्या कलम 376(1) 376(2)(ख)376(2)(ठ) तसेच बाल लेंगिक ब अधिनियम 2012 अनयवे गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास ठाणेदार भूषण गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विखे पाटील करीत आहेत

पोलीस उपनिरीक्षकाला 50 हजारांची लाच घेताना रंगेहात पकडले

0

 

 

(सूर्या मराठी न्युज)

महाराष्ट्र ब्युरो चीफ

हिम्मतराव तायडे

पुणे:- पुणे जिल्ह्यातील चाकणमध्ये लाच मागितल्याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. म्हाळुंगे पोलीस ठाण्यात दाखल चौकशी अर्जातील तक्रारदार यांच्याकडे गुन्हा दाखल न करण्यासाठी 50 हजारांची लाच मागणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला.

पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विरोधी पथकाने ही कारवाई केली आहे. राहुल शालिग्राम भदाणे, असं गुन्हा दाखल झालेल्या पोलीस उपनिरीक्षकाचं नाव आहे. याप्रकरणी 32 वर्षीय पुरुषाने तक्रार दिली आहे.

म्हाळुंगे पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या पैशासंबधित चौकशीमध्ये तक्रारदार यांच्यावर गुन्हा दाखल न करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक राहुल भदाणे यांनी तक्रारदार यांच्याकडे 50 हजार रुपयांची लाच मागितली. त्यावर तक्रारदार यांनी संबंधित माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विरोधी पथकाला दिली. त्यानुसार या पथकाने सापळा रचून राहुल भदाणे यांच्यावर कारवाई केली.
दरम्यान, या कारवाईनंतर पोलीस दलात चांगलीच खळबळ उडाली आहे.

ट्रॉफीक हवालदारावर कार चढवण्याचा प्रयत्न

0

 

सूर्या मराठी न्युज

धक्कादायक घटना सीसीटीव्ही मध्ये कैद

नागपूर, सक्करदरा चौकवरची
धक्कादायक घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे सक्करदरा चौकावर एका ट्रॉफीक हवालदाराने कार ला थांबवण्याचे प्रयत्न केले असता कार चालकाने चक्क कारची गती वाढूवून पळून जाण्याचा प्रयत्न केले त्यात ट्रॉफीक हवालदार कारचे बोनट वर चढला सुमारे अर्धा की मीटर प्रयत्न घेउन गेला, या धावपळीत कार चालकाने रस्त्यावर वरील काही इतर वाहनाना ही धडक दिली पोलिसांनी कार चालक ला अटक केली आहे

प्रसेनजीत पाटिल यांचा एल्गार गुंजनार. जळगाव जामोद येथे एल्गार संघटनेची स्थापना

0

 

गजानन सोनटक्के
जळगांव जा.प्रतिनिधी:-

१५ ऑगस्ट २०२० रोजी अजहर देशमुख यांच्या नेतृत्वात प्रसेनजीतदादा विचारमंच ची स्थापना करण्यात आली होती. तब्बल १०० दिवसाच्या कालावधीत संघटनेने अनेक आंदोलन करीत शेतकरी,शेतमजूर,आदिवासी,अल्पसंख्यांक यांच्या प्रश्नांसाठी आंदोलने संघटनेने केली.. प्रसेनजीत पाटिल यांना अभिप्रेत शाहू, फुले, आंबेडकर,भगतसिंग, गाडगेबाबा, ए.पी.जे अब्दुल कलाम यांची विचारधारा अधिक प्रभावीप्रणे जनतेपर्यंत पोहचवन्यासाठी दिनांक २९ नोव्हेबर २०२० रोजी गिता भवन जळगाव जामोद येथे जळगाव जामोद तालुक्यातील महत्वपूर्ण कार्यकर्त्यांची बैठक झाली..बैठकीच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक रमेशभाऊ घुले हे होते. या बैठकीत शोषित,पीड़ित,वंचित यांच्यावर होणाऱ्या अन्यायाविरोधात लढन्यासाठी एल्गार संघटनेची स्थापना करण्यात आली व प्रसेनजीतदादा विचारमंच या संघटनेत विलीन करण्याची घोषणा यावेळी विचारमंचचे संस्थापक अध्यक्ष अजहर देशमुख यांनी केली.. एल्गार ही संघटना अराजकीय असेल तसेच संघटनेच्या माध्यमातून सुशिक्षीत युवकांना रोजगार उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करने,त्यासाठी प्रशिक्षण वर्ग ठेवणे,महिलांना रोजगारासोबतच सक्षम करने, महिलांना सुरक्षा प्रदान करने, विद्यार्थ्यांच्या शालेय तसेच महाविद्यालयीन समस्या सोड़वने,जातिपातीवीरहीत संघटन व जातिविरहित काम या विषयावर काम करणारी ही संघटना असेल असे कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रसेनजीत पाटिल यांनी भाषनात सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अँड.करिम खान यांनी केले तसेच विजय पोहनकार यांनी प्रास्ताविकामध्ये संघटनेची नियमावली,पुढील दिशा,उद्देश व संघटनेचा त्रिसूत्री कार्यक्रम याविषयी विस्तृत माहिती दिली. एल्गार संघटनेच्या संस्थापक अध्यक्षासाठी चर्चा सत्रामध्ये प्रसेनजीत पाटिल यांची निवड करावी अशी आग्रही मागणी यावेळी उपस्थितांनी केल्यामुळे मा. प्रसेनजीत पाटिल यांची एल्गार संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झाली. यावेळी संतोष गवई सर, आसिफ इकबाल, अजहर देशमुख,भिमराव पाटिल,रवि धुळे,गौरव अवचार यांनी चर्चासत्रात सहभागी होऊन आपली मते मांडली. आभार प्रदर्शन अँड.मोहसीन खान यांनी केले.