Home Blog Page 577

खासदार प्रफुल्ल पटेल यांचा देवरी तालुक्यात जनसंपर्क दौरा

0

 

गोंदिया-शैलेश राजनकर

 

देवरी २५: आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बळकटीकरणाकरिता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी जिल्ह्यात पक्ष वाढीची कमान स्वत: स्विकारून झंझावाती दौरा कार्यक्रम सुरु केला आहे.
खासदार प्रफुल्ल पटेल यांचा देवरी तालुक्यात कार्यकर्ता जनसंपर्क दौरा २९ तारखेला असुन भर्रेगाव येथे दुपारी ११:३० वाजता, पिंडकेपार (गोटाबोडी) येथे दुपारी १:०० वाजता तर सावली येथे दुपारी २:०० वाजता कार्यक्रमात हजेरी लावणार आहेत.यावेळी आमदार मनोहर चंद्रिकापुरे, माजी आमदार राजेंद्र जैन, माजी म्हाडा सभापती नरेश माहेश्वरी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विजय शिवणकर व आमगाव विधानसभेचे शिलेदार व सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती रमेश ताराम हे उपस्थित राहणार आहेत.

रयत क्रांती संघटनेचे शिष्टमंडळ यांनी माजी कृषी राज्यमंत्री आमदार सदाभाऊ खोत यांच्या अध्यक्षतेखाली घेतली महामहिम राज्यपाल मा. भगतसिंग कोशारीजी यांची भेट

0

 

रयत क्रांती संघटनेचे सर्वेसर्वा माजी कृषी राज्यमंत्री आमदार सदाभाऊ खोत यांनी आज महामहिम राज्यपाल भगतसिंग कोशारीजी यांची राजभवन येथे भेट घेतली. भेटी दरम्यान मा. सदाभाऊ खोत यांनी शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा केली.

राज्यात लाॅकडाऊनच्या कालावधीमध्ये नागरिक व व्यापाऱ्यांना वाढीव रकमेची बिले देण्यात आली असून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 20 मार्चपासुन लाॅकडाऊन सुरू करण्यात आले व लगडून मुळे व्यापारी शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. असे असताना लाॅकडाऊनच्या काळातील तीन महिन्यांचे एकत्रित वीजबिल 300 युनिटचे देण्यात आले देण्यात आले. तरी वाढीव वीज बिल तात्काळ माफ करणे बाबत शासनाचे निर्देश द्यावेत अशी विनंती करण्यात आली.

राज्यातील शेतकऱ्यांना मागील काही वर्षापासून कधी कोरडा दुष्काळ तर कधी ओला दुष्काळ अतिवृष्टी गारपीट नैसर्गिक संकटांचा सामना करावा लागत आहे. यावर्षी खरीप हंगामात सुरुवातीपासुन पावसाने जोरदार हजेरी लावली शेतकऱ्यांनी कर्ज काढून पिकांची लागवड केली. मात्र या नुकसानीमुळे शेतीसाठी झालेला खर्च वसूल झालेला नाही. शेतकऱ्यांच्या डोक्यावर आधीच कर्जाचा डोंगर असताना अतिवृष्टीमुळे शेतकरी संकटात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक अडचणीतून बाहेर काढावे व राज्यातील शेतकऱ्यांची चालू पीक कर्ज माफ करून आर्थिक मदत देऊन दिलासा द्यावा अशी विनंती मा. सदाभाऊ खोत यांनी राज्यपाल महोदयांकडे केली.

तसेच केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी सुधारणा विधेयकाचे राज्यात तात्काळ अंमलबजावणी करण्याकरिता राज्य सरकारला सूचना देणेबाबत देखील विनंती केली.
तसेच महात्मा फुले कर्ज माफी योजना अंतर्गत नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना सरकारने जाहीर केलेले 50 हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान त्वरित देण्यात यावी, अशी विनंती केली.
तसेच कोरोनाच्या या महाभयंकर काळामध्ये जे आरोग्य कर्मचारी, पोलिस कर्मचारी, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, खाजगी डॉक्टर, तसेच राज्यभरातील अनेक पत्रकार कोरोनामुळे मृत्यु पावले अशा व्यक्तिंना शासनाकडून 50 लाख रुपये देणेबाबत शासनाने सांगितले होते. परंतु तसे होताना दिसत नाही. तरी याबाबत देखील आपण सूचना कराव्यात अशी विनंती करण्यात आली.

*आमदार नियुक्तीसाठी राज्यपाल महोदयांना सुचवली नामवंत अन् योग्य अश्या 12 लोकांची यादी*

महाराष्ट्रामध्ये राज्यपाल आमदारकीच्या 12 जागा रिक्त झालेल्या आहेत. त्यामध्ये विज्ञान, साहित्य, कला, सहकार क्षेत्र, सामाजिक क्षेत्र अशा विविध क्षेत्रातील प्रसिद्ध लोकांना विधानपरिषदेवर संधी देण्याची परंपरा आहे. राज्यांमध्ये अनेक नामवंत आहेत की ज्यांना आजपर्यंत कुठे संधी मिळालेले नाही. अश्या व्यक्तिंचे गेले अनेक वर्ष आपआपल्या क्षेत्रात काम सुरू आहे. तरी अशाच काही वैशिष्टपुर्ण व्यक्तिंची नावे मा. राज्यपाल महोदयांना आ. सदाभाऊ खोत यांनी सादर केली.

🖊️नावे व कार्यक्षेत्र 🖊️
1) श्री. मकरंद अनासपुरे
(कला फौंडेशनच्या माध्यमातून सामाजिक कार्य )

2) श्री. विठ्ठल वाघ
(लेखन व साहित्यिक)

3) श्री विश्वास पाटील
(लेखन व साहित्यिक)

4) श्री जाहीरखान
(क्रीडा)

5) श्रीमती मंगलाताई बनसोडे
( कला )

6) श्री अमर हबीब
(सामाजिक कार्य व पत्रकार)

7) श्री निवृत्ती महाराज इंदुरीकर
( सामाजिक कार्य व प्रबोधन)

8) श्री पोपटराव पवार
(सामाजिक कार्य)

9) श्री डॉ. तात्याराव लहाने
( सामाजिक कार्य व आरोग्य सेवा)

10) श्री डॉ. प्रकाश आमटे (सामाजिक कार्य)

11) श्री सत्यपाल महाराज
(सामाजिक कार्य व प्रबोधन)

12) श्री बुधाजीराव मुळीक
(विज्ञान व शेती विषयाचे गाढे अभ्यासक)

या व्यक्तींचा सहानुभूतीपूर्वक विचार करून त्यांना राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून संधी द्यावी अशी विनंती करण्यात आली.

या शिष्टमंडळामध्ये रयत क्रांती संघटनेचे कार्याध्यक्ष मा. दिपक भोसले, राज्य कार्यकारणी सदस्य मा. सुहास पाटील, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष मा. दिपक पगार, राज्यप्रवक्ते मा. भानुदास शिंदे, राज्यप्रवक्ते मा. लालासो पाटील, राज्यप्रवक्ते मा. जितु आडिलकर, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे कार्यकारी परिषद सदस्य व कोल्हापुर संपर्कप्रमुख प्रा. एन. डी. चौगुले, महिला आघाडीच्या उपाध्यक्षा मा. निताताई खोत इ. उपस्थित होते.

रेखा जोरावल यांच्या ३० दिवसात ऑनलाईन मराठी वाचन व लेखन उपक्रमास विद्यार्थी व पालकांचा भरघोस प्रतिसाद !

0

 

सिंदखेड राजा (सचिन खंडारे )

देऊळगाव राजा येथील नगर परिषद मराठी प्राथमिक शाळा क्रमांक ४ च्या सहाय्यक शिक्षिका रेखा जोरावल यांनी कोरोना काळात शाळा बंद असल्या तरी शाळेत इयत्ता पहिलीत नव्याने दाखल झालेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून ३० दिवसात ऑनलाईन मराठी वाचन व लेखन उपक्रम राबवला आणि या उपक्रमास पालकांचा भरघोस प्रतिसात मिळाला आहे. या उपक्रमामुळे इयत्ता पहिलीत नव्याने दाखल झालेल्या विद्यार्थ्यांची वाचन व लेखन क्षमता विकसित झाल्याने पालकांनी समाधान व्यक्त केले आहे.

दरवर्षी २६ जून ला शाळा विदर्भातील शाळा सुरु होतात मात्र या वर्षी कोरोना चा कहर सुरु असल्याने सर्वत्र शाळा बंद आहेत. अशा वेळी रेखा जोरावल यांनी अंगणवाडी ताईच्या मदतीने इयत्ता पहिलीत दाखलपात्र मुलांच्या घरी गृह भेटी देऊन पालकांना शाळेत मुले दाखल करण्यासंदर्भात मार्गदर्शन केले. इयत्ता पहिलीत एकूण १५ विद्यार्थी दाखल झाली. शाळा बंद असल्याने या नव्याने दाखल झालेल्या मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून प्रशासन अधिकारी जगन मुंढे साहेब व मुख्याध्यापक वामन वाडेकर यांचेशी चर्चा करून विद्यार्थ्यांना किमान मराठी वाचन व लेखन यावे म्हणून ३० दिवसात ऑनलाईन मराठी वाचन व लेखन उपक्रम राबवण्यास सुरुवात केली.

या उपक्रमामध्ये रेखा जोरावल यांनी स्वतःचे घरी शिकवण्याचे व्हीडीओ तयार केले व हे व्हीडीओ पालकांच्या व्हॉटसअप असलेल्या मोबाइल वर पाठवून मुलांच्या अभ्यासासंदर्भात मार्गदर्शन करत पालकांच्या मदतीने मुलांचा अभ्यास पूर्ण केला. मात्र व्हॉटसअप वर पाठवलेल्या व्हीडीओ ची साईज जास्त एम बी ची असल्याने पालकांच्या मोबाइल वर व्हीडीओ डाउनलोड होण्यास जास्त वेळ व इंटरनेट डेटा लागू लागला. याला पर्याय म्हणून रेखा जोरावल यांनी स्वतःचे घरी शिकवण्याचे व्हीडीओ तयार केलेले व्हीडीओ यु टयूब वर अपलोड केले आणि या व्हीडीओ ची लिंक पालकांच्या मोबाइल वर पाठवली सोबतच पालकांना फोनवर मुलांचा अभ्यास कसा करून घ्यायचा या संदर्भात मार्गदर्शन केले आणि एकाच वेळी सर्व पालकांना मुलांचा अभ्यास करून घेणे सोपे झाले.

मराठी मधील स्वर, व्यंजन, स्वरचिन्ह, पंधराखडी, शब्द, शब्दचक्र, वाक्य, जोडशब्द, मराठी वाचनपाठ, गोष्टीचे पुस्तक वाचन इत्यादी वाचन व लेखन सराव या उपक्रमा अंतर्गत व्हीडीओ या उपक्रमात घेतले आहेत. या उपक्रमाशी निगडीत सर्व व्हीडीओ रेखा जोरावल यांच्या मराठी भाषा गुरु या यु ट्यूब चंनल वर अपलोड केलेले आहेत. या उपक्रमात समाविष्ट विद्यार्थी त्यांच्या पालकांच्या मदतीने घरच्या घरी उपक्रमातील व्हीडीओंना पाहत घरचा अभ्यास करु लागले, अभ्यासाचे फोटो पालक रेखा जोरावल यांच्या मोबाईल वर पाठवू लागली आणि लगेच पालकांना अभ्यासातील काही दुरुस्ती असल्यास वेळीच दुरुस्ती सुचवली गेली. यामुळे इयत्ता पहिलीत दाखल झालेले विद्यार्थी चांगल्या प्रकारे मराठी पुस्तकातील वाचन व लेखन करू लागले. कोरोना काळात सुद्धा मुलांना योग्य मार्गदर्शन असले तर मुल शिक्षणापासून वंचित राहत नाहीत हा विश्वास पालकांमध्ये निर्माण झाला.

या उपक्रमासाठी रेखा जोरावल यांना नगर परिषद देऊळगाव राजा च्या मुख्याधिकारी निवेदिता घार्गे, प्रशासन अधिकारी जगन मुंढे, नगरध्यक्षा सुनिता रामदास शिंदे, शिक्षण सभापती नंदाताई संदीप कटारे, मुख्याध्यापक वामन वाडेकर यांचे मार्गदर्शन लाभले. आणि शाळेच्या सर्व पालकांनी उत्तम प्रतिसाद दिला. या उपक्रमात देऊळगाव राजा तालुक्यातील शाळांसह अकोला, यवतमाळ, अहमदनगर, कोल्हापूर, पालघर, नाशिक, जालना, जिल्ह्यातील शाळा सुद्धा मराठी भाषा गुरु या यु ट्यूब चंनल द्वारे सहभागी झाल्या आहेत.

मित्र असावे तर असे -व्हाट्सअप ग्रुप च्या माध्यमातून लोक वर्गणी जमा करून मित्रांनी अपंग मित्राला – दिली चक्की –

0

 

सिंदखेड राजा ( सचिन खंडारे )

रक्ताचे नाते पेक्षाही आपण मित्राची नाते श्रेष्ठ मानतो आपली खाजगी असो वैयक्तिक असो सुख-दुख असतो हे सर्व आपण फक्त आपल्या मित्र जवळच सांगतो व मन मोकळं करून घेतो ‘परंतु अशीही काही मित्र असतात किती मित्रत्वाचा मदत करतात अशीच एक अतूट मैत्रीचे नाते ची घटना सिंदखेड राजा तालुक्यातील साखरखेर्डा या गावात घडली ।साखरखेर्डा येथील वार्ड क्रमांक ६ मध्ये राहणारा गणेश बेहीरे हा युवक पायाने अपंग होता .पायाने त्याला स्टॅन्ड धरून चालता येत होते परंतु एक पाय पूर्णपणे अपंग असल्यामुळे तो कुठल्याही प्रकारची नोकरी करू शकत नव्हता किंवा उद्योग करू शकत नव्हता !परिस्थिती ही त्याची गरिबीची असल्यामुळे करावे तरी काय हा प्रश्न त्याच्या मनामध्ये उभा ठाकला !परंतु त्यांच्या मनामध्ये विचार येत असताना गणेश चे वर्गमित्र असलेले वीस ते पंचवीस मित्रांनी गणेश ला काहीतरी उद्योग उभारायचा म्हणून सर्व मित्र एकत्र येत एक जिवलग मित्र नावाचा व्हाट्सअप ग्रुप बनवला !या ग्रुपच्या माध्यमातून सर्व मित्रांनी गणेशला सहकार्य करण्याचे ठरवले व सर्वांनी आपापल्या परीने रक्कम जमा करण्याचे ठरले !2014 सली हा ग्रुप बनवला होता !असे म्हणतात थेंबे थेंबे तळे साचे !या म्हणी प्रमाणे प्रत्येक मित्र खारीचा वाटा उचलत होता व मदत करत होता !अशातच पिठाची गिरणी घेण्याचे ठरले व सर्व मित्रांनी पिठाची गिरणी घेण्याकरता ठरलेली रक्कम 60 ते 70 हजार रुपये जमा केले !यामध्ये भाऊराव मोरे ओंकार काळकर गणेश राजगुरू सचिन राजपूत संतोष मंडळकर सागर खरात जगदीश खरात प्रवीण अग्रवाल संदीप जगताप संदीप सपकाळ सचिन खरात गणेश नन्हई आनंद बेटवाल तुषार राजपूत अनिल मलये’मंदार देशपांडे संदेश ठाकूर गणेश खरात योगेश अवचार सुभाष अंभोरे व इतर गुप्त काही रुपये जमा झालेली होती !यायामध्ये विनोद भाऊ कोतवाल यांनी मीटर साठी लागणारे सर्व केबल म्हणून मदत दिली तर चेतन राजपूत यांनी स्वखर्चातून मीटर बसवले !अशा तऱ्हेने अपंग असलेल्या गणेशला सर्व मित्रांनी मदतीचा हात म्हणून पिठाची गिरणी टाकून दिली व असे एकूण सत्तर हजाराची पिठाची गिरणी गणेशला उभारून दिली म्हणून प्रत्येक मित्रांनी हा आदर्श डोळ्यासमोर ठेवला तर निश्चितच एक चांगला आदर्श समाजापुढे निर्माण होईल !

एअरटेल जिओचे नेटवर्क नाही जिओचा जातोय जीव . ‘अनेकांचे ऑनलाईन कामे खोळंबली –

0

 

सिंदखेड राजा ( सचिन खंडारे )

जी ओ जी भरके ‘ कर लो दुनिया मुठ्ठी मे असे म्हणतातजिओच्या माध्यमातून संपूर्ण भारत देशामध्ये मोबाईल नेटवर्क जावून खोऱ्याने पैसे कमावणाऱ्या या जिओ नेटवर्क कंपनीने लोकांना सेवा तरी चांगली द्यावी अशी अपेक्षा लोक व्यक्त करीत आहे ।25 नोव्हेंबरला सकाळी सहा वाजेपासून जिओ नेटवर्क व एअरटेल कंपनीची कुठल्याही प्रकारची रेंज मोबाईल ला लागत नव्हती !त्यामुळे ऑनलाईन कामे लोकांची खोळंबली आहे ‘तलाठी ऑफिस मध्ये सुद्धा नेटवर्क चा प्रॉब्लेम असल्यामुळे शेतकऱ्यांना कामासाठी लागणारा सातबारा मिळेना झाला आहे ।तर काही ठिकाणी धान्य वितरित करतांना सुद्धा अडचणी निर्माण झाल्या !तर काहींना ऑनलाइन कृषी योजनेचा लाभ घेताना अर्ज भरताना अडचणी जाणवत आहे -तसेच काहींना फोन पे वरून पैसे ट्रान्सफर करताना अडचणी येत आहेत ‘त्यामुळे आज दिवसभर एरटेल व जिओची नेटवर्क नसल्यामुळे अनेक लोकांची कामे खोळंबली आहे -तरी जिओ व एअरटेल कंपनीने नेटवर्कची समस्या उद्भवणार नाही यासाठी उपाययोजना करावी अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा स्वस्त धान्य दुकानदार अशोक खरात यांनी दिला आहे –

मास्क न घातल्यास आता एक हजार रुपये दंड…

0

 

रविंद्र ठाकरे – जिल्हाधिकारी नागपुर

¤ मास्क न घालणाऱ्या १७ व्यक्ती विरुद्ध गुन्हे दाखल

¤ ४ लाख ३३ हजार रुपयाचा दंड वसुल
नागपूर :- मास्क व सोशल डी स्ट सिंग चे पालन न करणाऱ्या विरुद्ध राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमे अंतर्गत ८०६ व्यक्तीकडून ४ लाख ३३ हजार ५०० रुपयाचा दंड वसुल केला आहे, दंडाची रक्कम ५०० रुपया वरून एक हजार रुपये करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी आज दिली.

कोरोनाचा प्रादुर्भाव सातत्याने वाढत आहे, जनतेने नियमाचे कठोर पालन करणे अपेक्षित आहे, दिवाळी नंतर कोरोना रुग्ण वाढत आल्यामुळे जनतेनी सामाजिक अंतर व मास्क वापरण्या सोबत दिलेल्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी केले आहे.

 

नक्षलांनी पेरून ठेवलेला डम्प शोधण्यास गोंदिया राजनांदगाव पोलिसांना यश

0

 

गोंदीया-शैलेश राजनकर

गोंदिया 24: कर्तव्यदक्ष अप्पर पोलीस अधिकारी अतुल कुलकर्णी यांना बतमीदारांकडून विश्वसनीय माहिती प्राप्त झाली होती. पोलीस स्टेशन गातापार राजनांदगाव अंतर्गत मौजा कहुआभरा जंगल परिसरात घातपात घडवून आणण्याच्या व पोलिसांना जीवे मारण्याच्या उद्देशाने नक्षलवाद्यांनी स्फोटक साहित्य ठेवलेली होती अशी माहिती मिळताच पोलिस अधीक्षक गोंदिया विश्व पानसरे , पोलीस अधीक्षक राजनंदगाव डी. श्रवण आणि अप्पर पोलीस अधिकारी अतुल कुलकर्णी गोंदिया यांच्या मार्गदर्शनाखाली नक्षल सेल देवरी आणि राजनांदगाव पोलीस यांनी काहुआभरा जंगलात नक्षल विरोधी अभियान राबविण्यात आले सर्च ऑपरेशन राबवित असतांना जंगल परिसरात संशयास्पद वस्तू आढळून आल्यामुळे राजनांदगाव येथील बी डी डी एस पथकाच्या साहाय्याने खबरदारीच्या उपाययोजना करून पाहणी केली असता नक्षलवाद्यांनी लपवून ठेवलेली बंदुकीची बॅरल, हँड हेल्ड ग्रॅनाइट आऊटर कव्हर, इलेक्ट्रॉनिक वायर, टेप रोल, स्वीचेस, नक्षल पुस्तके, निळ्या रंगाचा मोठा ड्रम, बॅटरी, सोलर प्लेट, इत्यादी साहित्य जप्त करण्यात आले असून पुढील कारवाई राजनांदगाव पोलीस करीत आहेत.

सदर कारवाई विश्व पानसरे पोलीस अधीक्षक गोंदिया, डी श्रवण पोलीस अधीक्षक राजनांदगाव, अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधिकारी गोंदिया, यांच्या मार्गदर्शनात पार पडली असून नक्षल सेल देवरी, राजनांदगाव पोलीस, अधिकारी व कर्मचारी यांनी महत्वाची भूमिका बजावली.

धानाला बोनस जाहिर – खा. प्रफुल पटेल यांच्या आश्वानाची पुर्तता प्रति क्विंटल 700 रुपये मिळणार बोनस

0

 

गोंदिया-शैलेश राजनकर

गोंदिया / भंडारा: धान उत्पादक शेतकऱ्यांना मागील वर्षा प्रमाणे यंदा ही खरीप हंगामात धानाला प्रति क्विंटल 700/- रुपये बोनस देऊ अशी ग्वाही खासदार प्रफुल पटेल यांनी दोन्ही जिल्हयातील शेतकऱ्यांना दिली होती. त्याच आश्वानाची पूर्तता त्यांनी केली. राज्यातील महाविकास आघाडी सरकार ने धानाला 700/- रुपये बोनस देण्याचे राज्य मंत्री मंडळाच्या बैठकीत जाहीर केले. याचा गोंदिया भंडारा जिल्हया सह पूर्व विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांना लाभ होणार आहे.
पूर्व विदर्भात सर्वाधिक धानाची लागवण केली जाते.त्यातच गोंदिया आणि भंडारा हे दोन्ही जिल्हे केवळ धान उत्पादक जिल्हे आहे. या दोन्ही जिल्हयाची अर्थ व्यवस्था प्रामुख्याने शेतीवरच अवलंबून आहे. मागील 3 – 4 वर्षा पासून धानाचा लागवड खर्चात मोठया प्रमाणात वाढ झाली आहे. मात्र त्या तुलनेत धानाला हमी भाव मिळत नसल्याने शेतकरी कर्जबाजारी होत चालला
याचीच दखल घेत लगतचा मध्यप्रदेश आणि छत्तीसगढ राज्याचा धर्तीवर पूर्व विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांना 2500/- प्रतिक्विंटल दर मिळवून देण्याची घोषणा मागली वर्षा विधानसभा निवडणूकीच्या दरम्यान राष्ट्रवादी काॅंग्रेस चे राष्ट्रीय अध्यक्ष शरदराव पवार यांच्या उपस्थितीत गोंदिया येथे खासदार प्रफुल पटेल यांनी केली होती. या नंतर महाराष्ट्रात महाविकास आघाडी चे सरकार आल्या नंतर धानाला 700/- रुपये प्रति क्विंटल प्रथमच बोनस जाहिर करण्यात आला त्यामुळे शेतकऱ्यांना प्रति क्विंटल 2500/- रुपये हमी भाव मिळाला. मात्र यंदा कोरोना मुळे सरकारच्या तिजोरीत ठनठनात असल्याने आणि बोनस जाहिर केल्यास सरकारच्या तिजोरी वर 1400 कोटी रुपयांचा भार येणार होता. त्यामुळे यंदा बोनस मिळणार की नाही याची शंका होती, मात्र खासदार प्रफुल पटेल यांनी धान उत्पादक शेतकऱ्यांना मागील वर्षा प्रमाणे यंदाही धानाला बोनस जाहिर केला जाईल अशी ग्वाही खासदार प्रफुल पटेल यांनी दिली होती.

बाप नंबरी तो बेटा दस नंबरी ??? अजब चोरांची गजब कहाणी ,

0

 

(सूर्या मराठी न्युज ब्युरो)

बापानेच पोरांना चोरीची तालिम दिली अन् त्यांनी मग स्विफ्ट कार चोरी करण्याचा सपाटाच लावला होता राज्यातील अनेक जिल्ह्यात त्यांनी कार चोरी केल्या ते चोरी केलेल्या कार बुलडाणा जिल्ह्यात आणायचे . या कारच्या नंबरप्लेट बदलायचे आणि मग या कार परराज्यांत विकायचे असा त्यांचा उधोग गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होता मात्र देऊळगाव राजाचे महेश भोसले कन्नड ( औरंगाबाद ) येथे मावशीकडे गेले होते . तिथे त्यांची व त्यांच्या मावसभावाची कार चोरीला गेली व त्यांनी याची तक्रार दाखल केली अन् आपल्याच जिल्ह्यातल्या माणसाने या भामट्यांची आजवरची कारकीर्द संपवली . त्यांच्या चोऱ्यांचा पर्दाफाश झाला ते अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकले ,

या संदर्भात मिळालेल्या माहिती नुसार कन्नडमध्ये दोन कार चोरीच्या गुन्ह्याची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व अंमलदारांनी घटनास्थळास भेट देली . घटनास्थळाचे आसपासचे सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली . त्यांना त्यांच्या गुप्त बातमीदाराकडून खात्रीलायक माहिती मिळाली की , हा गुन्हा शेख दाऊद शेख मंजूर ( रा . धाड , जि . बुलडाणा ) याने त्याच्या मुलांच्या मदतीने केला आहे . त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वेळ न दवडता तातडीने चिखली ( जि . बुलडाणा ) गाठले . चोरटे बापलेक रोहिदासनगर ( चिखली ) येथे असल्याची माहिती मिळाल्याने त्या भागात छापा मारला आणि शेख दाऊद शेख मंजूर ( 55 , रा . धाड जि.बुलढाणा ) , त्यांचा मुलगा शेख नदीम शेख दाऊद ( 22 , रा . धाड , ह.मु. देऊळगावराजा जि . बुलडाणा ) , दुसरा मुलगा शेख जिशान शेख दाऊद ( 28 , रा . धाड , ह.मु. घाटनांद्रा ता . जि . बुलडाणा यांना ताब्यात घेतले . या बापलेकांचे साथीदारही इथेच मिळून आले . सखाराम भानुदास मोरे ( 31 ) व दीपक दिगंबर मोरे ( 20 , दोघे रा . निरखेडा , ता.जि.जालना ) यांनाही ताब्यात घेण्यात आले . त्यांच्या कसून चौकशीत त्यांनी कन्नड येथून दोन्ही स्विफ्ट कार चोरल्याची कबुली दिली . नंबर प्लेट बदलल्याची कबुलीही त्यांनी दिली मराठवाडा सेलू ( जि . परभणी ) येथून एक स्विफ्ट कार ऑक्टोबरमध्ये चोरून आणल्याची कबुलीही बापलेकांनी दिली आहे . याशिवाय कन्नड येथून चोरलेली एक स्विफ्ट कार त्यांनी बनावट नंबर प्लेट लावून कुंभारवाडा ( चिखली ता . चिखली ) येथे लावून ठेवली होती . त्यांच्या ताब्यातून 3 स्विफ्ट कार , एक होंडा शाईन मोटार सायकल , 7 मोबाईल हॅन्डसेट असा एकूण 19 लाख 24 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे . ताब्यात घेतलेल्या सर्वांच्या चौकशीत एकापेक्षा एक आश्चर्य चकित करणाऱ्या बाबी समोर आल्या . बापलेकांसह साथीदारांनी जालना , परभणी , जळगाव व अहमदनगर जिल्ह्यात स्विफ्ट कार चोरलेल्या असून या गुन्ह्यांत चोरलेल्या स्विफ्ट कार या बाहेर राज्यांत त्यांच्या इतर साथीदारांच्या मदतीने विक्री केल्याचे सांगितले आहे . त्यांच्याकडून आणखीही स्विफ्ट कार चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची दाट शक्यता आहे . ही कामगिरी औरंगाबाद चे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक भागवत कुंदे , पोलीस उपनिरिक्षक संदीप सोळंके , जमादार संजय काळे , दीपेश नागझरे , श्रीमंत भालेराव , धीरज जाधव , पोलीस नाईक संजय भोसले , नरेंद्र खंदारे , पोलीस कॉन्स्टेबल रामेश्वर धापसे , योगेश तरमाळे , जीवन घोलप यांनी केली .

शे. महेबुब यांचे किडनी आजाराने निधन. ( संग्रामपुरात किडनी आजाराने मृत्यूचे तांडव सुरूच, एका महिन्यात 4 मृत्यू, मतदारसंघातील लोकप्रतिनी व आरोग्य विभाग उपाययोजना करण्यात अपयशी )

0

 

मागील काही वर्षांपासून खारपान पट्ट्याचा शाप लागलेल्या संग्रामपूर तालुक्यात आतापर्यंत किडनीच्या आजाराने शेकडो बळी गेले असून शेकडो रुग्णांना किडनी आजाराने ग्रासले आहे. व कित्त्येक रुग्णांना मुतखड्याचा सुद्धा त्रास निर्माण झाला आहे.
मतदारसंघातील लोकप्रतिनिधी सह आरोग्य विभाग किडनी रोगासाठी उपाययोजना करण्यात अपयशी ठरत आहेत. शासनाने तालुक्यातील जनतेला शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे त्यासाठी 140 गाव पाणी पुरवठा योजना सुरू केली मतदारसंघातील लोकप्रतिनिधींनी या योजनेचा गाजावाजा करत मोठमोठे फ्लेक्स लावून फक्त फोटो शेसन केले. आजही मतदारसंघातील कित्त्येक गावात 140 गाव पाणी पोहचले नाही. आणि ज्या गावात पाणी पोहचले त्या गावात 10-10 दिवस पाणी सोडल्या जात नसल्याची ओरड गावातील नागरिक करत आहेत. संग्रामपूर तालुक्यात सर्वात जास्त किडनी आजाराने बळी गेले असून आजसुद्धा शेकडो रुग्णांना किडनी रोगाची लागण आहे. आरोग्य विभाग व मतदारसंघातील लिकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे ही गत झाली असल्याची चर्चा परिसरात आहे.
25 नोव्हेंबर रोजी तालुक्यातील वरवट बकाल येथील शे. महेबूब शे. बशीर यांचे किडनी आजाराने मृत्यू झाला असून शेगाव, अकोला येथील खाजगी रुग्णालयात त्यांचा उपचार सुरू होता. त्यांच्या पश्चात पत्नी, 3 मुले, 3 मुली, नातवंड असा आप्त परिवार आहे.

संग्रामपूरात मृत्यूचे तांडव सुरूच
(22 दिवसात 4 मृत्यू )
3 नोव्हेंबर रोजी संग्रामपूर येथील सचिन सोनोने, 4 नोव्हेंबर रोजी येथीलच पांडुरंग सटोटे, 5 नोव्हेंबर रोजी वानखेड येथील सुनील येणकर व आज 25 नोव्हेंबर रोजी वरवट बकाल येथील शे. महेबूब शे. बशीर या चारही रुग्णांचा मृत्यू झाला असून संग्रामपुरात मृत्यूचे तांडव सुरूच आहेत.