Home Blog Page 579

भारतीय जनता युवा मोर्चाच्या सेलू तालुका अध्यक्ष श्री.शिवहरी शेवाळे पाटील यांची नियुक्ती

0

 

अजहर पठाण
सेलू/परभणी

सेलू तालुक्यातील राजवाडीं येथील युवा सरपंच शिवहरी शेवाळे यांची भा. ज. युवा मोर्चाच्या सेलू तालुका अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या नियुक्तीचे पत्र भाजपा युवा मोर्चाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष श्री. सुरेश भूमरे यांनी केंद्रीय मंत्री श्री. रावसाहेब दानवे, विरोधी पक्ष नेते श्री. प्रवीण दरेकर, आ. मेघना दिदी बोर्डीकर, माजी मंत्री श्री. संभाजी पाटील निलंगेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आले. शेवाळे यांच्या निवडीचे उपसभापती श्री. सुंदर गाडेकर, भागवत दळवे , अण्णा रोडगे, बाळासाहेब मते. स्व्हीय सहाय्यक श्री. शंकरअण्णा भोंडवे यांनी अभिनंदन केले आहे

जळगाव जामोद येथे भाजपाने केली विजबिलाची होळी

0

 

गजानन सोनटक्के जळगाव जा

महाविकास आघाडी सरकारने नागरिकांना अव्वाच्या सव्वा दिलेल्या वाढीव विजबिलाच्या विरोधात वीजबिला ची होळी करून आंदोलन करण्यात आले. स्थानिक तहसील कार्यालयासमोर तालुका व शहर भारतीय जनता पार्टी च्या वतीने आज दिनांक 23 नोव्हेंबर ला वीजबिल होळी करण्याचे आंदोलन पुकारण्यात आले होते त्यानुसार मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते व नागरिक याठिकाणी गोळा होऊन राज्य सरकारच्या निषेधार्थ घोषणाबाजी केली आणि वीज बिल पेटविण्यात आले. या प्रसंगी आ डॉ संजय कुटे यांनी नागरिकांना संबोधित करताना राज्य सरकार याविषयात पूर्णपणे अयशस्वी झाले असून जनतेचा छळ करण्याचा सपाटा च त्यांनी लावला असून हे सरकार प्रत्येक विषयात अपयशी ठरले आहे . याप्रसंगी महाविकास आघाडी सरकार चा निषेध असो, वीजबिल माफी झालीच पाहिजे अश्या घोषणा देण्यात आला.
महाविकास आघाडी सरकारने नागरिकांना अव्वाच्या सव्वा दिलेल्या वाढीव विजबिलाच्या
यावेळी माजी मंत्री आ डॉ संजय कुटे, नगराध्यक्ष सीमाताई कैलास डोबे, पंचायत समिती सभापती रंजनाताई ठाकरे, उपसभापती महादेवराव धुर्डे गुणवंतराव कपले जिल्हापरिषद सदस्य बंडू पाटील, राजेंद्र उमाळे,जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र ठाकरे, जिल्हा महामंत्री नंदकिशोर अग्रवाल, गुणवंत कपले, राजेंद्र गांधी, तालुका अध्यक्ष प्रकाश वाघ, शहर अध्यक्ष अभिमन्यू भगत, आरती पलन, नगरसेवक शैलेश बोराडे, निलेश शर्मा,रामदास बोंबटकार,युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख, संतोष ठाकरे, शाकिर खान,संतोष वसतकर, गजानन सरोदे, देवा भैय्या,कैलास पाटील,पांडुरंग मिसाळ, अजय वंडाळे, गोटु खत्ती, परीक्षित ठाकरे, लक्ष्मण पाटील, महादेव वानखडे,गणेश दांडगे, निलेश धुर्डे आदी कार्यकर्त्यां सह शेकडो नागरिक उपस्थित होते.

निर्णय शासनाचा असला तरी शाळा सुरु किंवा बंद करण्याचा अधिकार स्थानिक प्रशासनाला

0

शालेय शिक्षण राज्यमंत्री ना. बच्चू कडू यांची सूर्या मराठी न्युज ला दिली माहिती

शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय हा शासनाने 15 दिवसांपूर्वी घेतलेला आहे. तेव्हा अशी परिस्थिती नव्हती असे असले तरी राज्य शासन शाळा सुरू करण्याबाबत सर्व उपाययोजना करीत आहेत. सर्वात महत्वाचे म्हणजे शाळांनी पालकांनी संमती पत्र दिलेले आहे. असे असले तरी स्थानिक प्रशासनाला ‘शाळा सुरू ठेवावी की बंद करावी’ याचे अधिकार देण्यात आले असल्याची माहिती राज्याचे शालेय शिक्षण राज्यमंत्री नामदार बच्चू कडू यांनी सूर्या मराठी न्युज शी बोलताना दिली. बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे ना.कडू कार्यकर्त्यांच्या संवाद कार्यक्रमात सहभागी झाले असता बोलत होते.

प्रतिकिर्या ना. बच्चू कडू (शालेय शिक्षण राज्यमंत्री)

सोमवार पासून विदर्भातील इयत्ता ९ वी पासूनचा शाळा सुरु होत आहे. आरोग्य प्रशासनाकडून शिक्षक आणि शाळा कर्मचाऱ्यांची कोरोना तपासण्यासुरु आहे. बुलढाणा जिल्ह्यात आतापर्यंत 6085 शिक्षकांची कोरोना तापासणी करण्यात आली असून त्यापैकी जवळपास 3 हजार रिपोर्ट काल आले आहे. यामध्ये आतापर्यंत 21 शिक्षक कोरोना पोसिटिव्ह आहेत तर उर्वरित 3085 शिक्षकांचे रिपोर्ट प्रलंबित आहेत.

नवनियुक्त ठाणेदार जितेंद्र आडोळे यांची धडाकेबाज कामगिरी !कुरियर द्वारे गावठी कट्ट्याची तस्करीचा शोध ए टी एस . घेणार –

0

 

सिंदखेड राजा (सचिन खंडारे )

काल दिनांक 21 नोव्हेंबरला साखरखेर्डा बस स्थानकावर दुपारी तीन वाजता स्थानिक साखरखेर्डा पोलीस व अकोला येथील एटीएसच्या पथकाने एका युवकाला गावठी पिस्तूल कुरियर द्वारे द्वारे मागणी केल्याप्रकरणी रंगेहात पकडले !यामुळे संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यामध्ये एकच खळबळ उडाली होती !परंतु या संपूर्ण तपासाच्या केंद्रबिंदू राहिले ते साखर खेर्डा येथील कर्तव्यदक्ष नवनियुक्त ठाणेदार जितेंद्र आडोळे पूर्वीचे ठाणेदार संग्राम पाटील यांच्या जागी अतिशय संवेदनशील अशा साखरखेर्डा शहरांमध्ये श्री आटोळे यांची नियुक्ती झाली !
व एका महिन्याच्या आतच त्यांनी काल एका युवकाला गावठी पिस्तूल घेताना रंगेहात पकडून दिले !याबाबत ठाणेदार जितेंद्र डोळे यांची बातचीत करताना त्यांनी सांगितले की -गावठी पिस्तूल कुरियर व्दारे येणार हे अगोदर माहीत होते त्यामुळे एटीएम च्या मदतीने गुप्तपणे सापळा रचला व त्यात यशस्वी झालो !आणखीन एक त्यांनी खळबळजनक गोष्ट सांगितली कि -सध्या चा तपास एटीएसच्या ताब्यात असून .कसून चौकशी द्वारे सत्य बाहेर येईल !व व कुरियर द्वारे आणखी किती जण पिस्तूल ची मागणी करत असतील याचाही शोध एटीएसचे पथक घेणार असून कुरियर द्वारे अश्या घटनांना आळा कसा घातल्या जाईल याची सुद्धा चौकशी करण्यात येत आहे !कारण कुरियर द्वारे पिस्तुल ची मागणी असे अनेक जण करत असतील यात शंका नाही त्यामुळे या संपूर्ण चा तपास एटीएस पथक करणार आहे !मी माझे सर्वप्रथम कर्तव्य पार पाडत असतो त्यामुळे यशस्वी असतो !ठाणेदार आडोळे त्यांनी स्वतः पोलीस स्टेशनचा परिसर स्वच्छ केला तसेच पोलीस स्टेशनचा संपूर्ण चेहरामोहरा आपण बदलणार असून जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी आपण सदैव तप्तर राहू असेही श्री आडोळे यांनी बोलताना सांगितले !ठाणेदार श्री आडोळे यांच्या कामगिरीमुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे

साखरखेर्डा ते शिंदी रोडची चाळणी ! रस्ता करण्याची ग्रामस्थांची मागणी –

0

 

सिंदखेड राजा ( सचिन खंडारे )

शिंदी ते साखरखेडा या डांबर रस्त्यांची अतिशय दुरवस्था झाली आहे !या मुख्य रस्त्याची चाळणी झाली आहे ‘हा रस्ता करण्याची मागणी सातत्याने होत आहे परंतु या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात येत असून हा रस्ता त्वरित करण्यात यावे अशी मागणी येथील ग्रामस्थ करीत आहेत !या रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले असून वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे ! शिंदी ते साखरखेर्डा हा मुख्य रस्ता असून हा रस्ता मेहकर खामगाव तसेच जालना चिखली बुलढाणा या रोडला जोडणारा मुख्य रस्ता आहे ‘हा रस्ता करावा यासाठी आपण पाठपुरावा करणार असल्याचे शिंदी चे सरपंच विनोद खरात यांनी सांगितले आहे !

विष प्राशन करून शेतकऱ्यांची कर्जापायी आत्महत्या . ।सावखेड तेजन येथील हृदयद्रावक घटना –

0

 

सिंदखेड राजा ( सचिन खंडारे )

अतिवृष्टीमुळे ओल्या दुष्काळाची परिस्थिती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उद्भवली यामध्ये हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला त्यामुळे अनेक शेतकऱ्यांची पिकांची खूप मोठ्या प्रमाणामध्ये नासाडी झाली त्यांचे नुसकान झाले !अनेकांनी सोयाबीन कपाशी यांच्या पिकावर खाजगी सावकारांची असतील किंवा बँकेकडून कर्ज घेतले होते !व झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे झालेले नुसकान पाहून हे कर्ज कसे फेडायचे हाच विचार अनेक शेतकऱ्यांच्या मनात येत असतो !परंतु काही शेतकरी हे मनात भलताच विचार करून आत्महत्येचा मार्ग निवडतात अशीच एक घटना ‘सिंदखेड राजा तालुक्यातील सावखेड तेजन या गावात घडली !सावखेड तेजन येथील श्रीराम मांटे यांच्याकडे आठ एकर शेती आहे त्यांना दोन मुले व एक मुलगी असून तिघेही विवाहित आहे ‘त्यांचा मुलगा संजय मांडे याच्या नावावर अडीच एकर शेती असून त्याला 9 वर्षांचा लहान मुलगा आहे अडीच एकर शेतामध्ये संजय आपल्या परिवाराचा गाडा काबाडकष्ट करून ओढत होता !संजयने ग्रामीण बँकेत सिंदखेडराजा शाखेतून तीन लाख रुपये तर ‘बँक ऑफ महाराष्ट्र शाखेचे 70 हजार रुपये व महिंद्रा फायनान्स चे दीड लाख रुपये असे एकूण सुमारे पाच लाख 70 हजार रुपये कर्ज संजय वर झाले होते !कर्जाची परतफेड करायची म्हणून संजयने सोयाबीन व कपाशीची लागवड केली होती सुरवातीला पिकाची परिस्थिती चांगली होती मात्र अतिवृष्टीमुळे संजय च्या स्वप्नांचा चुराडा झाला मोठ्या प्रमाणात पिकांची नासाडी झाली त्यामुळे त्याच्या डोक्यावरील कर्जाचा डोंगर संजयला दिसू लागला .कर्ज फेडायचे कसे या विवंचनेत तो बेचैन राहायचा अशातच त्यांनी शुक्रवार 20 नोव्हेंबर रोजी विषारी कीटकनाशक औषध प्राशन केले संजय ला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले परिस्थिती हाताबाहेर जात असतांना पाहून संजयला तेथून जालना येथे दवाखान्यात नेण्यात आले परंतु उपचार सुरू असताना 21 नोव्हेंबर ला संजय चे निधन झालेशेव विच्छेदन केल्यानंतर संजय वर सावखेड तेजन येथे सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले ।संजय च्या पाठीमागे पत्नी मुलगा भाऊ आई-वडील असा बराच मोठा आप्तपरिवार आहे संजयच्या जाण्यामुळे परिसरांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे !

जिजाऊंच्या माहेरात मावळ्यांनी उभारलाय शिक्षणाचा गड!लोकसहभागातून साकारल्या बोलक्या भिंती.

0

 

एकीकडॆ कोविड19 मुळे जग थांबलं असतांना सर्वसामान्य माणूस हा पोटाची खळगी कशी भरल्या जाईल याच विवंचनेत होता. लॉकडाऊनच्या काळात काय करावं हे सुद्धा कुणालाच काही कळत न्हवत, मात्र दुसरीकडे याच लॉकडाऊनच्या काळात शहर आणि गावच्या गावं ओसाड होऊन थांबली होती. एका गावात मात्र शिक्षणाचं महत्त्व आणि गोडी वाढावी यासाठी गावकरी आणि गावातील तरुण अहोरात्र झटत होते. सोशल डिस्टन्ससिंगचा वापर करत लोकवर्गणीतून बोलक्या भिंतीचे काम यागावातील तरुणांनी हाती घेतलं आणि बघता बघता शिक्षणासाठी उभारलेली ही लोकचळवळ उदयास आली. तर चला मग पाहुयात शिक्षणाचा झरा घरा-घरात पोहचवणार्या या आदर्श गावाची कहाणी.
(Plz see the visuals – गावचे व जिल्हापरिषद शाळेचे शॉट्स )

महाराष्ट्रातील राष्ट्रमाता माँ साहेब जिजाऊंचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या मातृतिर्थ सिंदखेडराजा तालुक्यात ताडशिवणी नावाचं हे छोटसं गाव. आता या छोट्याश्या गावातील ही शाळा बघून तुम्हाला सुध्दा प्रश्न पडला असेल खरंच का ही जिल्हापरिषदची शाळा? पण ही दिसणारी दृश्य वास्तव दर्शवणारी आहेत. याच जिल्हापरिषदेच्या शाळेचा कायापालट करण्यासाठी गावकऱ्यांन सोबत याचं छोट्या शाळेत शिक्षण घेऊन आज मुंबई येथे मंत्रालयात वरिष्ठ अधिकारी म्हणून पोहचलेल्या एका व्यक्तिमत्वाचा सुद्धा तेवढाच मोठा सिंहाचा वाटा आहे. उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे सहसचिव म्हणून राज्यातील शिक्षणाचा कार्यभाळ सांभाळणारे सिद्धार्थ खरात या वरिष्ठ अधिकाऱ्याने आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गावकऱ्यांनी पुढाकार घेऊन राज्यसमोर शिक्षण क्षेत्रातील हा शैक्षणिक गड राष्ट्रमाता जिजाऊंच्या माहेरात या स्थानिक मावळ्यांनी रचलाय.

सिद्धार्थ खरात, सहसचिव,उच्च व तंत्र शिक्षण, मंत्रालय मुंबई.

प्रायव्हेट शाळांमध्ये आकर्षक इमारत, विविध रंगाने रंगलेल्या भिंती आणि अत्याधुनिक सुख सुविधा दिसून येतात. मात्र ग्रामीण भागात छोट्याशा खेड्यात कोण अशी शाळा उभारणार? आणि उभारली जरी, तरी सुद्धा एवढी फी सामान्य शेतकरी व मजुरांची मुलं भरू शकतील का? त्यामुळे आजही ग्रामीण भागात पडझड झालेल्या, जीर्ण इमारत असलेल्या, जिल्हापरिषदच्या शाळा दिसून येतात. पण आता ताडशिवणी गाव याला अपवाद ठरलंय. गावातील जिल्हापरिषदच्या शाळेचा कायापालट करून त्याचबरोबर गावातील विविध घरे,शौचालय, व इतर भिंतीवर देखील शिक्षणाशी संबंधित आकर्षक पेंटिंग व स्लोगन सुविचार विविध चित्र काढून नव्या पिढी समोर शिक्षणात रुची निर्माण व्हावी यासाठी या बोलक्या भिंती तयार करण्यात आल्या आहेत.

जितेंद्र भांबर्डे,- स्थानिक गावकरी
विठ्ठल चव्हाण – स्थानिक गावकरी

जिल्हापरिषदची शाळा म्हंटली म्हणजे निधी कोण देणार? कधी मंजूर होणार? यासर्व गोष्टी मध्ये न पडता गावकऱ्यांनी 50,100,500 रुपये आप आपल्या परीने जमा करून लोकवर्गणीच्या माध्यमातून शिक्षणाचं हे नंदनवन उभं केलंय. येणाऱ्या काळात राज्यातील प्रत्तेक गावांनी जर हा आदर्श घेतला तर नक्कीच ताडशिवणी पॅटर्न राज्यासाठी उपयुक्त ठरू शकतो. त्यामुळे शेतकरी मजूर व सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांन मध्ये गावा गावात शिक्षणाची गोडी निर्माण होण्याचं काम होईल. ओसाड आणि मृत पडलेल्या जिल्हापरिषदच्या शाळा मधून पुन्हा एकदा नवीन राष्ट्र निर्माण करणारे, मंत्रालयातील सिद्धार्थ खरात यांच्या सारखे वरिष्ठ अधिकाऱ्यांन सारखी उच्चशिक्षित अशी युवा साक्षर पिढी या बोलक्या भिंती बघून उदयास येत राहतील.

आज रात्री मुख्यमंत्री जनतेशी सवांद साधणार , करु शकतात मोठी घोषणा

0

 

मुंबई : विविध मांगणी साठी विरोधी पक्ष आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहे तर आज देशासह राज्यातील कोरोनाबाधितांच्या आकड्यात दिवाळीनंतर वाढ होत चालली आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज रात्री 8 वाजता जनतेशी संवाद साधणार आहे. त्यामुळे लॉकडाउन किंवा वीज बिल सवलतीबद्दल उद्धव ठाकरे यावेळी काय घोषणा करतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

आज रात्री 8 वाजता जनतेशी फेसबुक, युट्यूबवर लाईव्ह व्हिडीओच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे संवाद साधणार आहे. ते राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन काही महत्त्वाची घोषणा करण्याची शक्यता आहे.

गेल्या काही दिवसांपासून विरोधकांनी वाढीव वीज बिलाच्या मुद्यावरून आक्रमक पवित्रा घेतला आहे.
राज्यभरात सोमवारपासून आंदोलनाचा इशारा मनसेनेही दिला आहे. विशेष म्हणजे, ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी वाढीव वीज बिलाच्या दरात सवलत देण्यास नकार दिल्यामुळे राज्यभरात वीज ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वीज बिल सवलतीबद्दल काही घोषणा करणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दुसरीकडे राज्यातील शाळा 23 नोव्हेंबरपासून सुरू करण्याचे आदेश दिले आहे. पण, स्थानिक पातळीवर महापालिकांना परिस्थिती पाहून निर्णय घेण्याचे अधिकार दिले आहे. नागपूर, पुण्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्यामुळे शाळा सुरू न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी शाळा सुरू करण्याचा निर्णय मागे घेतात का, की काय हेही पाहणे पण खूप महत्वाचे ठरू शकते

माजरंम गावात साकारणार गाव जल सुरक्षा व शाश्वत आराखडा

0

 

नायगाव प्रतिनिधी: सेवावर्धिनी व संस्कृति संवर्धन मंडळ सगरोळी संस्थेच्या माध्यमातून साकारत आहे जलदुत प्रकल्प
सेवावर्धिनी व अॕटलास काॕपको संस्थेचा संयुक्त उपक्रम
मांजरम ता.नायगाव येथे संस्कृति संवर्धन मंडळ सगरोळी व सेवावर्धिनी संस्था पुणे यांच्या माध्यमातून महत्वकांक्षी जलदुत प्रकल्पाची अंमलबजावणी लोकसहभागाच्या माध्यमातून होत आहे.ग्रामस्तरावर पाणी वापर,पाण्याचे महत्व व व्यवस्थापन तसेच मृद व जलसंधारण कामाची शाश्वतता निर्माण करणे व गावात जलव्यवस्थापन समितीद्वारे पाणलोट प्रकल्पाची अंमलबजावणी करण्याचा उद्देश जलदुत प्रकल्पाचा आहे.सदरील प्रकल्पाच्या अनुषंगाने दि.20 नोव्हेंबर रोजी जल सुरक्षा व शाश्वत आराखडा संदर्भात प्रबोधनपर कार्यक्रम जेष्ठ नागरिक श्री गोपाळ पाटील शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आले.या प्रसंगी सेवावर्धिनी संस्था पुणे येथील अधिकारी श्री हर्षण पाटील यांनी गावक-यांना जल सुरक्षा व शाश्वतता आराखडा तयार करण्यासंदर्भात मार्गदर्शन केले. शिवारातील जमिन,जंगल ,पाणी तसेच खडकाचा अभ्यास यातुन पाण्याचा ताळेबंद मांडणे व मृद ,जलसंधारण उपक्रम प्रस्तावित करणे तसेच प्रकल्प अंमलबजावणीसाठी खाजगी कंपनी,संस्था व शासनस्तरावर जलव्यवस्थापन समितीद्वारे पाठपुरावा करणे व एकंदरीत गाव पाणीदार बनवून गावाचा सर्वांगिण विकास साधणे आदी बाबत गावक-यांना प्रेरित करुन गावात पाणलोट चळवुन तयार करण्याचे आवाहन केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्था जलदुत श्री गंगाधर कानगुलवार यांनी केले व आभार प्रदर्शन श्री शिवाजी गायकवाड यांनी केले. सदरील कार्यक्रमासाठी श्री भास्करराव गायकवाड,संभाजी पा. शिंदे,सुर्यकांत पा.शिंदे,बालाजी शिंदे,विश्वनाथ पा. शिंदे,व्यंकट शिंदे ,विद्याधर जांभळे,गंगामणी श्रीगिरे व ग्रामस्त उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री विश्वनाथ पाटील शिंदे,व्यंकटराव शिंदे व शिवाजी गायकवाड यांनी परिश्रम घेतले.
कोरोणाचे सर्व नियमांचे​ पालन करून सोशल डिसटंस राखुन हा क्रार्यक्रम पार पाडण्यात आला आहे.

ए टी एस आणि पोलीसांची सयुक्त कारवाई , दोन पितूलसह तीन काडतुस हस्तगत – -आरोपीस अटक

0

 

(सूर्य्या् मराठी न्युज )

साखरखैर्डा बसस्थानकावर साखरखेर्डा पोलीसांनी ए टी एस च्या मदतीने स्थानिक आरोपीस मुद्दैमालासह अटक केली आहे . उपरोक्त घटणेमुळे गावात खळबळ उडाली आहे .
साखरखेर्डा बसस्थानकावर एका कुरीयर वाल्याकडून एक पार्सल घेऊन जात असतांना साखरखेर्डा येथील गोपाल रामसिंग शिराळे या युवकाला ए टी एस पथकाने साखरखेर्डा पोलीसांच्या मदतीने पकडले . आज दुपारी तीन वाजता ही कारवाई करण्यात आली . पोलीसांना गुंगारा देऊन पळून जाण्याचा प्रयत्न त्याने केला असता , अगोदरच पोलीसांनी सापळा रचला असल्याने त्याला पकडले . साखरखेर्डा पोलीस स्टेशन मध्ये आणले असता शासकीय कर्मचारी पंचासमक्ष कुरियरने आलेला बाॅक्स उघडला असता , त्यामध्ये दोन पिस्तूल सह मॅगझीन आढळून आले . गोपाल शिराळे यांच्यावर या अगोदर अनेक गुन्हे दाखल आहेत . आजच्या या मोठ्या कारवाई मुळे साखरखेर्ड्यासह संपुर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे . या कुरिअर संबंधीत गावातील काही व्यक्तींचा संबंध असू शकतो का ? या दिशेने पोलीस आणि ए टी एस पथक तपास करणार असल्याचे समजते .दरम्यान अकोला येथील ए.टी .एस .च्यापथकाने केलेल्या कारवाईमुळे संपूर्ण साखरखेडा व परिसरामध्ये खळबळ माजली आहे !आता आणखी कोणकोण या प्रकरणाशी संबंधित आहे याची चौकशी आता पोलिस करत आहेत !ची माहिती साखरखेडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार जितेंद्र आडोळे यांनी दिली आहे ।