Home Blog Page 580

90 वर्षीय आजी वर अत्याचार करणाऱ्यास 34 वर्षीय नराधमाला अटक ,

0

 

माणुसकीला काळिमा फासणारी घटना ,

चंद्रपूर ,

भिसी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या महालगाव ( काळू ) या गावातील दिनांक २६/११/२०२० रोज गुरुवार ला या वृद्ध महिला च्या घराशेजारी राहत असलेल्या नरेंद संभाजी नन्नावारे या 34 वर्षीय नराधमांने त्या ९ ० वर्षीय वृद्ध महिलेल्या घरी झोपुन असलेल्या त्या वृद्ध महिलेवर घरी कोणी नसल्याच्या फायदा घेत त्या खोलीतील लाईट बंद करून त्या महिलेवर अतिप्रसंग केला . झालेल्या घटनेची हकीकत फिर्यादी तातोबाजी वाढरे यानी भिसी पोलीस स्टेशन ला तोंडी रिपोर्ट दाखल करून त्या आरोपी नरेंद संभाजी नन्नावरे वर कलम 376 , 450 , 323 , भादवी या अंतर्गत गुन्ह्याची नोंद करून पुढील तपास भिसी पोलीस स्टेशन करीत आहे .

हतेडी बु येथे संविधान दिन साजरा !

0

 

सिंदखेड राजा ( सचिन खंडारे )

बुलडाणा तालुक्यातील हतेडी बु येथे संविधान दिन मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी सुरवातीला भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विक्राम जाधव हे होते.तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. सचिनखरे , झिने सर हे होते. याने यावेळी बोलतांना प्रा. सचिन खरे यांनी संविधान निर्मिती मागील बाबासाहेबांची भूमिका व संविधान निर्माण करत असतांना बाबासाहेबांनी केलेल्या संघर्षाची व कष्टाची जाणीव करून देवून प्रत्येक नागरीकांनी संविधानीक मुल्यांची जोपासना करावी.व संविधानाचे पालन करावे असे प्रतिपादन केले.तर झिने सरांनी संविधानाचे महत्व विशद करुन संविधानाची प्रस्ताविका समजून सांगीतली .यावेळी ज्ञानेश्वर जाधव , साहिल जाधव यांनी सुद्धा आपले विचार मांडले . कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन सुनिल झिने यांनी केले . यावेळी कार्यक्रमाला बहुसंख्य महीलांची उपस्थीती होती.

तथागत फाऊंडेशन व तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्याच्या वतीने संविधान दिन साजरा..!

0

 

सिंदखेड राजा (सचिन खंडारे )

मेहकर येथे तथागत फाऊंडेशन व तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्याच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या वाटीकेमध्ये26 नोव्हेंबर रोजी संविधान दिन साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थापक अध्यक्ष मा.संदिप भाऊ गवई व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा.सुभाष भाऊ बैलके हे होते,तर प्रमुख उपस्थिती म्हणून मेहकर येथील तथागत ग्रुप महाराष्ट्र सचिव मा.अनिल भाऊ देबाजे बुलडाणा जिल्हा अध्यक्ष मा.अख्तर भाई कुरेशी आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.वरील सर्व मान्यवरांची भारतीय संविधानावर समायोचित भाषणं केले व कार्यक्रमाच्या सुरुवातीला तथागत फाऊंडेशन व तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष मा.संदिप भाऊ गवई व मान्यवरांनी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण केले व छोटेखानी भाषणामध्ये सांगितले की,भारतीय इतिहासातील संविधानच्या अंमलबजावणी 26 जानेवारी 1950 पासून करण्यात आली असली तरी जगातील सर्वश्रेष्ठ संविधान समजले जाणारे “भारतीय संविधान” 26 नोव्हेंबर 1949 रोजी घटना समितीने स्वीकारले होते. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २ वर्ष ११ महिने १८ दिवस,अहोरात्र मेहनत घेऊन या संविधानाची निर्मिती केली, या रोजी जगातील सर्वात मोठी लोकशाही असणार्‍या भारताने भारतीय संविधानाच्या अंमलबजावणीने खर्‍या अर्थाने लोकशाहीची प्रस्थापना झाली. म्हणून 26 नोव्हेंबरला हा दिवस ‘संविधान दिन’ म्हणून साजरा केला जातो. यावेळी सर्व कार्यकर्त्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो भारतीय संविधानांचा विजय असो आदी घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला.
या प्रसंगी मा.कुणाल भाऊ माने, कैलास भाऊ दुगाने,प्रमोद अंभोरे,राजकुमार ऊचित,विजय सरकटे,विजय कंकाळ,सतिष शेटाणे,असलम भाई गवळी,समाधान पवार,सचिन बनचरे,रवी जोरावर पंकज जाधव,योगेश अवसरमोल,सुनिल गवई यांचेसह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन व आभार मा.कपिल भाऊ इंगळे यांनी मानले.

ऊकळी -सुकळी येथे संविधान दिन साजरा !

0

सिंदखेड राजा ( सचिन खंडारे )

मेहकर तालुक्यातील ऊकळी सुकळी ता.मेहकरतेथे संविधान दिनानिमित्त 26 नोव्हेंबर रोजी येथील तथागत फाऊंडेशन व तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्यच्या वतीने संविधान दिन साजरा…! ऊकळी सुकळी ता.मेहकर येथील तथागत फाऊंडेशन व तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्यच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या वाटीकेमध्ये संविधान दिन साजरा करण्यात आला.आणी ऊकळी सुकळी येथे झालेल्या कार्यक्रमामध्ये तथागत ग्रुप महाराष्ट्राचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री संदिप भाऊ गवई यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालुन अभिवादन केले व त्यांनी छोटेखानी भाषणामध्ये सांगितले की,भारतीय इतिहासातील संविधानच्या अंमलबजावणी 26 जानेवारी 1950 पासून करण्यात आली असली तरी जगातील सर्वश्रेष्ठ संविधान समजले जाणारे “भारतीय संविधान” 26 नोव्हेंबर 1949 रोजी घटना समितीने स्वीकारले होते.भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २ वर्ष ११ महिने १८ दिवस,अहोरात्र मेहनत घेऊन या संविधानाची निर्मिती केली,या रोजी जगातील सर्वात मोठी लोकशाही असणार्‍या भारताने भारतीय संविधानाच्या अंमलबजावणीने खर्‍या अर्थाने लोकशाहीची प्रस्थापना झाली. म्हणून 26 नोव्हेंबरला हा दिवस ‘संविधान दिन’ म्हणून साजरा केला जातो.यावेळी सर्व कार्यकर्त्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो.भारतीय संविधानांचा विजय आसो आदी घोषंनी संपूर्ण परिसर दणाणुन सोडला.. या प्रसंगी तथागत फाउंडेशन व तथागत ग्रूप महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष मा,श्री.संदिप भाऊ गवई , मा.सुभाष भाऊ बैलके, मा.अनिल भाऊ देबाजे मा.अख्तर भाई कुरेशी,कुणाल भाऊ माने, कैलास दुगाने,सतीश शेटाने, प्रमोद अंभोरे, सुरज शेटाने, हर्षल राऊत शरद तुरूकमाने, विनायक तुरूकमाने,आवारे साहेब,शशिकांत धांडे ,करण राऊत, रोहित तुरूकमाने, आदित्य तुरूकमाने,सुमित झरे, अमर अंभोरे,यांची उपस्थित होती..!

हिवरा आश्रम येथे संविधान दिन साजरा

0

 

सिंदखेड राजा ( सचिन खंडारे )

तथागत फाऊंडेशन व तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष मा.संदिप भाऊ गवई यांच्या आदेशावरुन मेहकर तालुक्यातील हिवराआश्रम येथे संविधान दिन साजरा करण्यात आला.हिवरा आश्रम येथे झालेल्या कार्यक्रमामध्ये मा.राजुभाऊ उचित व विजय सरकटे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालुन अभिवादन केले व त्यांनी छोटेखानी भाषणामध्ये सांगितले की,२६ नोव्हेंबर
भारतीय “संविधान दिवस..”
“डॉ.बाबासाहेब आंबेडकर” यांनी आपल्या रक्ताची शाई करुन शरीराची पर्वा न करता “2 वर्ष 11 महिने 18 दिवस” एवढ्या कालावधीमध्ये “395 कलमे आणि 8 परिशिष्टे” लिहून जगातील सर्वात महान बलशाली राज्यघटना लिहिली.लेखणी तर सर्वांच्याच हातात होती.ताकत तर सर्वांच्याच मनगटात होती.पण,राज्यघटना लिहण्याची ताकत तर फक्त बाबासाहेबांच्याच रक्तात होती.26 नोव्हेंबरला हा दिवस संविधान दिन म्हणुन साजरा केला जातो.. यावेळी तथागत फाउंडेशन व तथागत ग्रूप महाराष्ट्र राज्य राजकुमार उचित बुलडाणा जिल्हा संघटक,विजय सरकटे बुलडाणा जिल्हा युवा अध्यक्ष,विजय कंकाळ हिवरा आश्रम शहर अध्यक्ष,युनुस भाई शहा,रवि जोरावर,सुमित मोरे,सुधीर बोरुडे,अरुन मगरे,अमिन शहा,अनीस शहा,विनोद वानखेडे,संदिप सोनुने आदी कार्यकर्ते उपस्थित होते..!

जिल्हा सांगली तथागत फाऊंडेशन व तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्याच्या वतिने संविधान दिन साजरा…!

0

 

 

ता.शिराळा येथे तथागत फाऊंडेशन व तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य चे संस्थापक अध्यक्ष मा.संदीप भाऊ गवई यांच्या आदेशावरुन तथागत फाऊंडेशन व तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्याच्यां अध्यक्षस्थानी महीला आघाडी सचिव निताताई बनसोडे ह्या होत्या तर प्रमुख उपस्थिती म्हणुन प.म.महीला आघाडी सौ.मंगलताई नांगरे व सांगली जिल्हा अध्यक्ष मा.तुषार शिदे शिराळा तालुका उपाध्यक्ष ज्ञानदेव कांबळे,सचिव बाळासाहेब कांबळे
महासचिव डॉ.विनोद झाडे आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. शिराळा येथे झालेल्या कार्यक्रमामध्ये तथागत फाऊंडेशन व तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य महीला आघाडीच्यां निताताई बनसोडे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालुन अभिवादन केले व त्यांनी छोटेखानी भाषणांमध्ये सांगितले की,भारतीय इतिहासातील संविधानच्या अंमलबजावणी 26 जानेवारी 1950 पासून करण्यात आली असली तरी जगातील सर्वश्रेष्ठ संविधान समजले जाणारे “भारतीय संविधान” 26 नोव्हेंबर 1949 रोजी घटना समितीने स्वीकारले होते. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २ वर्ष ११ महिने १८ दिवस,अहोरात्र मेहनत घेऊन या संविधानाची निर्मिती केली, या रोजी जगातील सर्वात मोठी लोकशाही असणार्‍या भारताने भारतीय संविधानाच्या अंमलबजावणीने खर्‍या अर्थाने लोकशाहीची प्रस्थापना झाली. म्हणून 26 नोव्हेंबरला हा दिवस ‘संविधान दिन’ म्हणून साजरा केला जातो. यावेळी तथागत फाऊंडेशन व तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्याच्या महीला आघाडी सचिव निताताई बनसोडे व जिल्हा अध्यक्ष मा.तुषार भाऊ शिंदे,मा. ज्ञानदेव कांबळे, मा.बाळासाहेब कांबळे,डॉ.विनोद झाडे,मा.अनिकेत पवार मा.ओंकार पाटील संजय माने विशाल खोत व महीला आघाडी कार्यकरत्या सौ.मंगलताई भीमराव नांगरे
सौ.ज्योतीताई अवघडे सौ.विद्याताई सोनवने सौ.प्रगतीताई घोलप सौ.सुनीताताई घोलप सौ.यशवंतीताई चांदणे आदी कार्यकर्ते उपस्थित होते..

शिंदी येथील शेत शिवारात रोह्याचा हैदोस ! शेतकरी त्रस्त वन विभागाने बंदोबस्त करण्याची शेतकऱ्यांची मागणी !

0

 

सिंदखेड राजा । (सचिन खंडारे)

अगोदरच शेतकरी अतिवृष्टीच्या संकटातून सावरत नाही तोच हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला होता !त्यामध्ये अनेक पिकांचे नुकसान होऊन शेतकरी आर्थिक संकटात सापडला होता !खरिपाच्या दुबार तिबार पेरणी करूनही हातात काहीच राहिले नव्हते !परंतु पाऊस जास्त पडल्यामुळे शेतकरी रब्बी हंगामाच्या पेरणी कडे वळला !यामध्ये गहू हरभरा मका ‘हायब्रीड मिरची शेतकरी रब्बी हंगामात घेऊ लागला !परंतु ही पिके ही जंगली प्राण्यांमुळे नेस्तनाबूत होऊ लागली आहे !शिंदी शिवारातील अनेक शेतांमध्ये दोनशे रोहींचा कळप असून शेतकऱ्यांचे हायब्रीड गहू व हरभरा अशा पिकांचे नुकसान करत आहे !अनेक शेतकऱ्यांची पिके फस्त केली आहे :त्यामुळे शेतकरी रडकुंडीला आला आहे !तरी वन विभागाने त्वरित यांचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकरी करत आहे ‘अन्यथा वन विभागाच्या कार्यालय मध्ये आम्ही ठाम मांडून बसू असा इशारा नुसकान ग्रस्त शेतकऱ्यांनी दिला आहे ‘बरोबर यामध्ये किशोर बंगाळे तेजराव खरात राजेश खंडारे भगवान गवई समाधान गवई असे 25 ते 30 शेतकऱ्यांनी यावेळी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे ।

महाराष्ट्र राज्या मध्ये संयुक्त कुष्ठरुग्ण व क्षयरुग्ण शोध मोहिम !आरोग्य विभागाची जय्यत तयारी !

0

 

सिंदखेड राजा ( सचिन खंदारे )

सिंदखेड राजा येथे दिनांक 26 नोव्हेंबर रोजी आरोग्य विभागाची बैठक घेण्यात आली यामध्ये
दिनांक:-1 डिसेंबंर ते 31डिसेंबर राबविण्यात येणार आहे, त्यानिमित्ताने त्यानिमित्ताने सिंदखेडराजा येथे आरोग्य विभागाने तालुका आरोग्य अधिकारी कार्यलया मध्ये सभेचे आयोजन केले ,या मध्ये तालुका आरोग्य अधिकारी डॉ.महेंद्र साळवे यांनी मार्गदर्शन केले तसेच सर्व प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य
साहाय्यक व आरोग्य साहाय्यीका,तसेच तालुका आरोग्य अधिकारी कार्यलायचे आरोग्य सा. अरुण तिडके,आतिष जाधव,परमेश्वर पराहड निवृत्ती रावते,आकाश गवई, कुष्ठरोगच्या खिल्लारे मॅडम ,टी. बी.चे गजानन चव्हाण,एस.टी.एस नितीन इंगळे इतर कर्मचारी हजर होते,यामध्ये मोहीम कश्या प्रकारे राबविण्यात यावी याविषयी चर्चा करण्यात आली

कालखेडजवळ भीषण अपघात चारचाकी दुधाचे वाहन व दुचाकीची आमोरासमोर धडक 5 वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू तर एक गंभीर

0

 

आयुषी दुबे शेगाव

शेगाव कालखेड रोडवर बुरूंगले चारचाकी दुधाचे वाहन व दुचाकीची अमोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात 37 वर्षीय दुचाकीचालक गंभीर जखमी झाला असून दुचाकीवर बसलेला त्यांचा 5 वर्षीय चिमुकला जागीच मृत पावला. ही घटना आज दुपारी 12.30 वाजता सुमारास कालखेड रोडवर बुरूंगले कॉन्व्हेंटच्या जवळपास घडली. अपघातानंतर चारचाकी वाहनाचा चालक तुरीच्या शेतात पळत जावून फरार झाला तर घटनास्थळाजवळ काही अंतरावर उपस्थित कालखेडच्या दोन युवकांनी जखमींना सईबाई मोटे रूग्णालयात पोहचविण्याचे मदतकार्य केले.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार पातुर्डा येथील दुधाची वाहतूक करणारे वाहन(एमएच28 एबी 5193) शेगाववरून पातुर्ड्याला परत जात असताना कालखेडरोडवरील बुरूंगले कॉन्व्हेंटच्या जवळपास विरूध्द दिशेने येत असलेल्या एका दुचाकीला धडकले. हा अपघात एवढा भयंकर झाला की, दुचाकीवर बसलेला 5 वर्षीय अभिजीत युवराज खोंड हा चिमुकला गंभीर जखमी होवून जागीच ठार झाला. तर दुचाकीचालक युवराज भिकाजी खोंड(37)रा.कुंदेगाव ता.संग्रामपूर हे या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. घटनेच्यावेळी घटनास्थळापासून काही अंतरावर उपस्थित असलेले कालखेड येथील विजय हेलोडे(25) व सुरज सरदार वय 28 यांनी वेळीच समयसुचकता ठेवून या घटनेतील जखमींना एका वाहनात टाकून सईबाई मोटे रूग्णालयात पोहचविले. मात्र तोपर्यंत अभिजीतची प्राणज्योत मालविली होती. तर युवराज खोंड यांच्या डोक्याला व पायाला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचेवर प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी अकोला येथे हलविण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. दुधाची वाहतूक करणारे वाहन पातुर्डा येथील वडे यांचे असल्याचे समजते.
घटनेची माहिती शहर पोलिसांना मिळाल्यानंतर एएसआय श्याम पवार, पोकॉ मंगेश सोळंके, अजय शिरसोले यांनी घटनास्थळी पोहोचून घटनास्थळाचा पंचनामा केला असून घटनेचा पुढील तपास करीत आहेत.

जळगाव ते जामोद रोडची दुरावस्था रोडवरील खड्डे ठरतायत जीवघेणे

0

 

गजानन सोनटक्के जळगाव जा

जळगाव ते जामोद रोड चे काम गेल्या सात ते आठ महिन्याअगोदर झाले होते परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षित पणामुळे रोडचे काम निकृष्ट दर्जाचे झालेले आहेत रोडला जागोजागी खड्डे पडलेले आहेत व ठिकठीकाणी रोड उखडत आहे त्या रोडवर निकृष्ठ दर्जाचे मटेरियल टाकल्याने रोडची पहिल्याच पावसात दुरावस्था झालेली आहे त्याबाबत सूनगाव येथील नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभाग यांना गेल्या दोन ते तीन महिन्याअगोदर लेखी तक्रार दिली होती परंतु सुस्तावलेल्या बांधकाम विभागाने त्यावर कोणतीच कार्यवाही केलेली नाही जळगाव ते जामोद या रोडला ठिकठीकाणी मोठे खड्डे पडलेले आहेत व खड्डे सात ते आठ इंच खोल खड्डे पडलेले आहेत त्यामुळे रोडवरून जात असताना वाहनाला मोठा हादरा बसतो व वाहन पडण्यास कारणीभूत हे मोठमोठे खड्डे ठरतात मोटरसायकल स्वारांना तर या खड्ड्यातून मोटर सायकल चालवता येत नाही परिणामी या खड्ड्यांमुळे बरेच अपघात घडलेले आहेत व या खड्ड्यांमुळे गेल्या सात ते आठ महिन्यात बरेच अपघात झालेले आहेत सार्वजनिक बांधकाम विभागाचे भ्रष्ट अधिकारी व संबंधित ठेकेदार यांनी संगनमत करून या रोडचे काम निकृष्ट दर्जाचे केलेले आहे तरी सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे लक्ष द्यावे