Home Blog Page 581

दंड वसूल करुन आता बेजबाबदार नागरिकांना मनपा देईल मास्क

0

 

आतापर्यंत २१४७९ व्यक्तिं विरुध्द कारवाई
नागपूर, ता.२६ : मास्क शिवाय फिरणा-या बेजाबदार नागरिकांना नागपूर महानगरपालिका व्दारा ५०० रुपये दंड वसूल करुन मास्क देण्यात येत आहे. मनपा तर्फे या नागरिकांना निवेदन करण्यात येत आहे कि बाहेर फिरताना मास्क घाला आणि स्वत:चा व दूस-यांचा जीव धोक्यात घालू नका.
मनपा आयुक्त श्री. राधाकृष्णन बी यांनी नागरिकांच्या जीवन पध्दतीमध्ये सुधारणा करण्यासाठी दंड केल्यानंतर मास्क देण्याचे आदेश दिले आहे. या माध्यमातुन नागरिकांमध्ये मास्क लावण्याची वृत्ती निर्माण होईल. अति.आयुक्त श्री. राम जोशी यांनी सांगितले की मनपा तर्फे ही “गांधी गिरी” नागरिकांना चांगली सवय लावण्यासाठी सुरु करण्यात आली आहे. कोव्हीड ला नियंत्रणात ठेवण्यासाठी मास्कचा वापर करणे, सामाजिक अंतर ठेवणे आणि हात धुणे आवश्यक आहे. उपद्रव शोध पथकाचे जवान नागरिकांकडून दंड वसूल करुन मास्क देतील.
नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाचे जवानांनी गुरुवारी (२६ नोव्हेंबर) ला मास्क शिवाय फिरणा-या बेजबाबदार १५९ नागरिकांविरुध्द कारवाई केली असून त्यांच्याकडून प्रत्येकी रुपये ५०० प्रमाणे ७९ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला. या सर्व नागरिकांना मास्क सुध्दा देण्यात आले. मागील काही दिवसात शोध पथकांनी २१४७९ नागरिकांविरुध्द कारवाई करुन रु. ९०,९८,५००/- चा दंड वसूल केला आहे.
गुरुवारी मनपा उपद्रव शोध पथकाव्दारे लक्ष्मीनगर झोन अंतर्गत २५, धरमपेठ झोन अंतर्गत २१, हनुमाननगर झोन अंतर्गत २५, धंतोली झोन अंतर्गत ८, नेहरुनगर झोन अंतर्गत १२, गांधीबाग झोन अंतर्गत ९, सतरंजीपूरा झोन अंतर्गत ८, लकडगंज झोन अंतर्गत ७, आशीनगर झोन अंतर्गत १३, मंगळवारी झोन अंतर्गत २८ आणि मनपा मुख्यालयातील ३ जणांविरुध्द ही कारवाई शोध पथकाचे प्रमुख विरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. ५०० रुपये प्रमाणे आतापर्यंत १६००९ बेजबाबदार नागरिकांकडून रु ८० लक्ष ४ हजार ५०० वसूल करण्यात आले आहे.
नागपूरात रुग्णांची संख्या सतत वाढत चालली आहे यावर नियंत्रण करण्यासाठी महानगरपालिकेचे उपद्रव शोध पथक दररोज दहा ही झोनमधील मास्क शिवाय फिरणा-या बेजबाबदार नागरिकांविरुध्द कारवाई करीत आहे. नागरिकांना कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्क लावणे, सामाजिक अंतराचे पालन करणे, हात स्वच्छ धुणे इ. ची सूचना नागपूर मनपा व्दारे वारंवार केली जात आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता मास्क न वापणा-या नागारिकांना वचक बसावा व त्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यादृष्टीने ही दंडाची रक्कम १५ सप्टेंबर पासून ५०० रुपये करण्यात आली आहे. सुजाण व जबाबदार नागरिकांनी आता मास्क लावून आपली व आपल्या परिवाराची सुरक्षा करावी, असेही आवाहन म.न.पा.तर्फे करण्यात आले आहे.

सुनगाव येथे भारतीय संविधान गौरव दिन साजरा…

0

 

गजानन सोनटक्के
जळगांव जा.प्रतिनिधी

जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव येथे दिनांक 26 नोव्हेंबर रोजी भारतीय संविधान गौरव दिन साजरा करण्यात आला भारतीय संविधानाचे निर्माते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार तसेच अभिवादन करून भारतीय संविधान गौरव दिन साजरा करण्यात आला तसेच संविधाना बाबत संजय वानखडे यांनी सुनगाव येथील नागरिकांना संविधानाचे महत्त्व व संविधानाने दिलेले नागरिकांना अधिकार यांची माहिती दिली यावेळी कार्यक्रमाला सुनगाव येथील ज्ञानेश्वर तायडे संजय वानखडे प्रमोद भीमराव इंगळे अमोल तायडे संदेश वानखडे पवन जाधव राहुल इंगळे विनोद जाधव शरद हिवराळे सिद्धार्थ वानखडे आदेश वानखेडे सागर वाकोडे भारत हिवराळे यांच्यासह सुनगाव येथील बहुसंख्य नागरिक संविधान गौरव दिनाकरिता मिलिंद नगर येथे उपस्थित होते.

सेलू तालुका भाजप किसान मोर्चा अध्यक्षपदी श्री. दगडोबा जोगदंड पाटील यांची नियुक्ती

0

 

अजहर पठाण
सेलू/परभणी

सेलू तालुक्यातील शेतकरी चळवळीचे कार्यकर्ते आ. मेघना दिदी बोर्डीकर यांचे समर्थक श्री. दगडोबा जोगदंड पाटील यांची नियुक्ती सेलू तालुका अध्यक्ष किसान मोर्चा पदी करण्यात आली. त्यांच्या नियुक्तीचे पत्र माजी ग्राम विकास मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते देण्यात आले. जोगदंड पाटील यांच्या नियुक्तीचे अभिनंदन जिल्हाध्यक्ष श्री डॉ. सुभाष कदम , आ. मेघना दिदी बोर्डीकर, डॉ. लोंढे, उपसभापती श्री. सुंदर गाडेकर, महादेव गायके, ह. भ प. दत्तराव महाराज मगर,वाहेद पठाण, स्विय सहाय्यक श्री. शंकर भोंडवे यांनी शुभेच्छा
दिल्या

संविधानाचा कायदा यातच देशाचा फायदा -केंद्रप्रमुख दिलीप खंडारे

0

 

सिंदखेड राजा ( सचिन खंडारे )

आज सिंदखेड राजा तालुक्यातील जि. प केंद्र शाळा साखरखेर्डा येथेआज 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिन साजरा करण्यात आला
प्रथम संविधान निर्माते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन
शाळेचे हितचिंतक सामाजिक कार्यकर्ते
ग्रामपंचायत सदस्य
शे रफिक शे शफी यांच्या हस्ते करण्यात आले
संविधान देशाच्या साठी किती उपयोगाचे आहे हे शाळेचे मुख्याध्यापक दिलीप खंडारे यांनी
संविधानाचा कायदा यातच देशाचा फायदा या छोटे खानी सभेत बोलुन दाखवले
कार्यक्रमामध्ये श्री नागेश खरात श्री याकुब सर श्री प्रदिप मोरे सर कु चंचला मोरे कु चंद्रप्रभा खंडारे कु सुनंदा जाधव अदिची उपस्थिती होती

लोकशाहीचा डोलारा भारतीय संविधानावरच आधारित आहे : इंजि.डि.टि.शिपणे,

0

 

अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेच्या वतीने संविधान दिन संपन्न !

सिंदखेड राजा ( सचिन खंडारे )

लोकशाहीच्या पवित्र मंदिरात भिन्न विचारधारेचे सत्ताधारी येऊन सत्ता करुन जातात.मात्र लोकशाहीचा हा डोलारा हा सत्ताधाऱ्यांच्या वैचारिकतेवर अथवा मानसिकतेवर अवलंबून नसून तो भारतीय संविधानावरच आधारित आहे असे प्रतिपादन २६ नोव्हेंबर संविधान दिन सामाजिक न्याय दिनानिमित्त अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेचे प्रदेशाध्यक्ष इंजि.डि.टि.शिपणे यांनी केले,मच्छी ले आऊट येथे २६ नोव्हेंबर २०२० रोजी सामाजिक न्याय दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इंजि.डि.टि.शिपणे होते तर प्रमुख उपस्थिती म्हणून अशोक दुलिचंद शिंगणे, अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेचे युवा प्रदेशाध्यक्ष पुरुषोत्तम बोर्डे, राज्य उपाध्यक्ष इंजि.अशोक भोसले,सल्लागार डॉ बबन परमेश्वर,इंजि.शिवाजी जोहरे,जिल्हाध्यक्ष प्रकाश डोंगरे,देवसिंग शिराळे,चंदासिंग बिबे, डाॅ किशोर बिबे, समाधान चिंचोले, ॲड.बुर्जे,युवा नेते तुषार शिपणे,विनोद बिबे, श्री वरच्छाये,समाधान सरसरे यांची प्रमुख उपस्थिती होती.या वेळी प्रकाश डोंगरे म्हणाले की संविधानाच्या निर्मिती पुर्वी भारत देशामधे ओबीसी अनुसूचित जाती, जमाती व अठरा पगड जातीच्या व भारत देशातील सर्वच गोरगरीब लोकांना डाॅक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान निर्माण करण्यापुर्वी इंग्रजांच्या जुलमी राजवटीने व भारत देशातील जीर्ण रूढी परंपरांनी व खुळचट चालीरीतींना व भारत देशातील अठरा पगड जातींच्या लोकांवर चालणाऱ्या जुलमी शासन आणी शोषण प्रणालीने आपला माणूस म्हणून जगण्याचा हक्क हिरावून घेतला होता तो हक्क व प्रत्येकाला जगण्याचा समाण हक्क डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांनी लिखित भारतीय संविधानाने आपल्याला मिळवून दिला असेही डोंगरे म्हणाले, तर इंजि.अशोक भोसले,डाॅ बबन परमेश्वर,इंजि.शिवाजी जोहरे,शरद खरात, डाॅ.किशोर बिबे,पुरुषोत्तम बोर्डे,यांनीही आपले विचार मांडले, सदर कार्यक्रमाला अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेचे पदाधिकारी व चर्मकार समाज बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते,कार्यक्रमाचे संचलन डाॅ.किशोर बिबे तर आभार प्रदर्शन समाधान चिंचोले यांनी मानले यशस्वीतेसाठी नंदकिशोर माळी,राजू परमेश्वर,दिपक परमेश्वर

वीजबिल विरोधात जिल्ह्यात मनसेचे आंदोलन

0

 

गोंदिया-शैलेश राजनकर

गोंदिया,दि.26ः- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांच्या आव्हानाला साथ देत महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हा गोंदियाच्या वतीने वीज बिल माफ करण्याकरीता आज विश्रामगृह चौक परिसरात आंदोलन करण्यात आले. शासनाकडून जाहीररीत्या वाढीव वीज बिलावर कार्यवाही करून लवकरच वाढीव वीज बिल माफ करणार असल्याची घोषणाही केली गेली होती. परंतु त्यावर कोणत्याही प्रकारचे कार्यवाही महाराष्ट्र शासनाकडून केली गेली नसल्याने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संपूर्ण महाराष्ट्रभरातील जिल्ह्यात मोर्चाच्या माध्यमाने वाढीव वीज बिलाचा निषेध नोंदविण्याचे अल्टिमेटम दिले होते.परंतु शासनातर्फे कोणतेही कार्यवाही करण्यात आली नसल्याने मनसेने संपूर्ण राज्यभरात जिल्हा मुख्यालयात आंदोलन करण्याचे ठरवले. त्याच अनुषंगाने महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हा गोंदियाच्या वतीने या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. सदर आंदोलन कालेखा चौक येथून या मोर्चाला सुरुवात करण्यात आली. परंतु शासनाच्या निर्देशानुसार मोर्चा काढण्यासाठी शासकीय परवानगी नसल्याने पोलीस प्रशासनाने सदर मोर्चा काढण्यास निर्बंध लादले होते. त्यामुळे फक्त काही पदाधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ जिल्हाधिकारी कार्यालय येथे जाण्यास परवानगी देण्यात आली.यावेळी मनसेचे जिल्हा अध्यक्ष मनिष चौरागडे, जिल्हा अध्यक्ष हेमंत लिल्हारे, जिल्हा उपाध्यक्ष मुकेश मिश्रा, मिलन रामटेककर, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हा अध्यक्ष राहुल हटवार, गोंदिया तालुका अध्यक्ष सुरेश ठाकरे, गोंदिया शहर अध्यक्ष राजेश नागोसे, आमगाव तालुका अध्यक्ष मुन्ना गवळी, सालेकसा तालुका अध्यक्ष ब्रजभूषण बैस, देवरी तालुका अध्यक्ष शैलेश राजनकर, सडक-अर्जुनी तालुका अध्यक्ष अमोल लांजेवार, गोरेगाव तालुका अध्यक्ष शैलेश जांभुळकर, तिरोडा तालुका अध्यक्ष पप्पू ढबाले, गोंदिया शहर उपाध्यक्ष क्षितिज वैद्य, रजत बागडे, विविध ग्रामीण शाखांतील शाखा अध्यक्ष, यांच्यासह मनसेचे माजी पदाधिकारी, राजसाहेब ठाकरे यांचे प्रेमी, सामान्य नागरिक व मनसैनिक मोठ्या संख्येत उपस्थित होते.

डॉ.आण्णा भाऊ साठे नगर येथील सभागृहाचे त्वरित शुभारंभ करावे. मुख्याधिकाऱ्यांची घेतली भेट.

0

 

 

आयुषी दुबे शेगाव

डॉ. अण्णा भाऊ साठे नगर येथील सभागृहा चे बांधकाम पूर्ण झाले आहे. असे संकेत मिळत आहे. लग्न सराई समोर येऊन ठेपली आहे. लग्न समारंभ व विविध समारंभासाठी सभागृहाचा उपयोग होण्या करिता. सभागृहाचे रखळलेल्या कामाची लवकरात लवकर पूर्तता करून. सभागृहाचे शुभारंभ करावे.
असे मौखिक निवेदन स्वाभिमानी शहर अध्यक्ष गोपाल तायडे यांनी नगर परिषद शेगाव मुख्याधिकारी यांना दिले व बरेच विषयावर चर्चा या निमित्या ने करण्यात आली. आचार संहिता असल्याने सध्या सभागृहाचे शुभारंभ होऊ शकणार नाही.
परंतु तीन तारखी नंतर आचार सहिंता उठल्या नंतर शुभारंभ करण्याचे लवकरच ठरवू असे त्यांनी म्हटले आहे. या वेळेस स्वाभिमानी शहर गोपाल तायडे.पवन मानकर विवेक तायडे. गोपाल तायडे.कार्यकर्ते उपस्तित होते.

जिल्ह्यातील 870 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांचे आरक्षण सोडत जाहीर

0

 

7 डिसेंबर रोजी तालुकास्तरावर, तर 10 डिसेंबर रोजी जिल्हा स्तरावर आयोजन

अजहर शाह मोताळा प्रतिनिधी

बुलडाणा. दि.26 : ग्रामविकास व जलसंधारण विभागाच्या अधिसूचनेनुसार जिल्ह्यातील 870 ग्राम पंचायतींच्या सरपंच पदांची आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम चे कलम 30 अन्वये तसेच मुंबई ग्रामपंचायत (सरपंच व उपसरपंच) निवडणूक नियम 1964 मधील तरतुदीनुसार सन 2020 ते 2025 दरम्यान जिल्ह्यातील सार्वत्रिक निवडणूकीद्वारे गठीत होणाऱ्या सरपंच पदांचे आरक्षण 7 डिसेंबर 2020 रोजी तहसिल स्तरावर निवडणूक अधिकारी तथा तहसिलदार हे निश्चित करणार आहे.
तसेच अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग अंतर्गत स्त्रीयांकरीता व खुल्या प्रवर्गाअंतर्गत स्त्रीयांकरीता आरक्षणाची सोडत जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली 10 डिसेंबर रोजी स. 11 वाजता जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, बुलडाणा येथे आयोजित करण्यात आली आहे. तरी याबाबतची नोंद सर्व लोकप्रतिनिधी, राजकीय पक्षांचे पदाधिकारी तसेच नागरीकांनी घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी एस रामामूर्ती यांनी कळविले आहे.
********

छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक वाचनालयातर्फे संविधान दिन साजरा !

0

 

सिंदखेड राजा (सचिन खंडारे )

सिंदखेड राजा तालुक्यातील मोहाडी येथे दिनांक 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक वाचनालयातर्फे वाचनालयामध्ये संविधान दिन साजरा करण्यात आला ‘यावेळी सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालण्यात आला :त्यानंतर हॉटेल ताज वर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलिस व जवानांना या वेळी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली !यावेळी वाचनालयाचे अध्यक्ष कैलास रिंढे ‘ग्रंथपाल ऋषिकेश रिढे .संदीप इंगळे नितीन कंकाळ .नितीन इंगळे प्रमोद गवई ‘सुहास इंगळे करण इंगळे .दीपक इंगळे अजय इंगळे ‘आदी उपस्थित होते ‘

शिंदी येथील ग्रामपंचायत मध्ये संविधान दिन साजरा !

0

 

सिंदखेड राजा ( सचिन खंडारे )

सिंदखेड राजा तालुक्यातील शिंदी येथे आज 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिनाचे औचित्य साधून संविधान दिन ग्रामपंचायत भवनमध्ये साजरा करण्यात आला !यावेळी शिंदी चे सरपंच विनोद खरात यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून प्रतिमेचे पूजन केले ।त्यानंतर संविधानाचे प्रस्ताविक वाचन करण्यात आले ‘यावेळी पत्रकार सचिन खंडारे .माजी ग्रामपंचायत सदस्य सुनील खंडारे .प्रल्हाद मोरे ग्रामपंचायत शिपाई प्रकाश बंगाळे विशाल खंडागळे .रमेश गिरी ‘पंढरी खरात ‘अजय खंडागळे पवन गवई ‘आदी उपस्थित होते ‘