Home Blog Page 582

सिंदखेड राजा येथे आरोग्य विभागाची बैठक 

0

 

सिंदखेड राजा (सचिन खंडारे )

 

आज दि. 2 ६ नोव्हेंबर रोजी सिंदखेडराजा तालुका येथे प्रत्यक्ष कुष्ठरोग आणि क्षयरुग्ण 1 डिसेंबंर ते 31डिसेंबर राबविण्यात येत आहे त्यानिमित्ताने सभेचे आयोजन केले ,या मध्ये तालुका आरोग्य अधिकारी डॉ.महेंद्र साळवे यांनी मार्गदर्शन केले तसेच सर्व आरोग्य
साहाय्यक व आरोग्य साहाय्यीका,तसेच तालुका आरोग्य अधिकारी कार्यलायचे आरोग्य सा. अरुण तिडके, कुष्ठरोगच्या खिल्लारे मॅडम ,एस.टी.एस नितीन इंगळे इतर कर्मचारी हजर होते

उंद्री येथे संविधानाचे प्रास्ताविक वाचन करून संविधान दिन साजरा तसेच हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण !

0

 

सिंदखेड राजा ( सचिन खंडारे )

चिखली तालुक्यातील
उदय नगर उंद्रि येथे भाई प्रदीप अंभोरे सरपंच तथा प्रदेश समन्वयक काँग्रेस कमिटी अ जा विभाग यांचे अध्यक्षतेत संविधान दिन निमित्त आज 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिवस साजरा करण्यात आला प्रथम दीप प्रज्वलित करून मान्यवर उपस्थितीत डॉ बाबासाहेब आंबेडकरांना माल्यार्पण करण्यात आले संविधानामुळेच भारत एकसंघ आहे देशात संविधान संपऊ पाहा नारेच संपतील आपण संविधान रक्षे साठी संघटित राहून अशा प्रवृत्ती विरुद्ध जागे राहण्याची गरज असल्याचे आवाहन भाई प्रदीप अंभोरे यांनी केले प्रसंगी संविधान प्रस्ताविकेचे वाचन करण्यात आले कार्यक्रमात संजय महाले माजी प स सद्स्य रमेश पाटील सदस्य, आकाश राऊत स्वा शे संघटना युवा नेते रामभाऊ भोसले,महादेव बराटे,गजानन चिंचोले,विनोद निंबाळकर शे अन्वरभाई, रवि बोरकर ,गोपाल तोंडे मिलिंद अंभोरे,विनोद बोरकर आदींनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांना पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले शेवटी मुंबई 26/11 आतंकवादी हंल्यात शाहिदांना उदयनगर वासीयांचे वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करण्यात आली

खासदार प्रतापराव जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त सिंदखेडराजा नगर परिषदेतर्फे स्वच्छता महिला कर्मचाऱ्यांना साडीचोळी चे वाटप

0

 

सिंदखेड राजा (सचिन खंडारे )

भूमिपुत्र खासदार प्रतापराव जाधव साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आज 25 नोव्हेंबर रोजी सिंदखेड राजा येथे शिवसेना पक्षाच्या वतीने नगरपरिषद स्वछता महिला कर्मचाऱ्यांना साडी चोळी वाटप करण्यात आले ,कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित सिंदखेडराजा नगरपालिके चे नगराध्यक्ष सतीश भाऊ तायडे,शिवसेना तालुका प्रमुख शिवप्रसाद ठाकरे,शिवसेना गटनेते भिवसन ठाकरे,राजेंद्र आढाव आरोग्य व स्वच्छता सभापती न प,बालाजी मेहेत्रे नगरसेवक, गौतम खरात नगरसेवक, पत्रकार नंदू वाघमारे सर,रवी ढवळे, यावेळीं आरोग्य व स्वच्छता अधिकारी कर्मचारी उपस्थित होते

साखरखेर्डा येथे शिवसेना शाखेचे नामफलकाचे अनावरण ।

0

 

सिंदखेड राजा ( सचिन खंडारे)

काल दिनांक 25 नोव्हेंबर बुलढाणा जिल्ह्याचे खासदार प्रतापराव जाधव यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून !सिंदखेड राजा तालुक्यातील सर्वात मोठे गाव असलेल्या साखरखेर्डा येथे शिवसेना शाखेचे स्थापना करण्यात आली !यावेळी शिवसेना नाम फलकाचे अनावरण सिंदखेडराजा मतदारसंघाचे माजी आमदार डॉक्टर शशिकांत खेडेकर यांच्या हस्ते करण्यात आले !यावेळी त्यांच्यासोबत ‘जिल्हाप्रमुख भास्कर भाऊ मोरे श्रीनिवास खेडेकर ‘जिल्हा उपप्रमुख बाबुराव मोरे . तालुका उपप्रमुख सरपंच महेंद्र भाऊ पाटील ।युवा सेना तालुका प्रमुख संदीप मगर ‘शिवसेना तालुका प्रमुख शिवप्रसाद ठाकरे .श्री देशमुख . श्री साखरे ‘ग्रामपंचायत सदस्य रफिक तांबोळी .माजी उपसरपंच असलम अंजूम .शिंदी चे माजी सरपंच अशोक खरात प्रकाश खोसे ‘भागवत मंडळकर .दीपक गवळी .गोपाळ ठाकूर । चरण सिंग ठाकूर .सवडद चे सरपंच शिवा लहाने ‘उपतालुका अनंत शेळके ‘विभाग प्रमुख दिलीप सोभागे ‘बबन तुपकर गणेश तुपकर श्री काटे सर आदित्य काटे ‘सुमेध गवई .आधी शिंदी रताळी गुंज वरुडी येथील कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते .साखरखेर्डा येथील शाखा फलकाचे अनावरण झाल्यानंतर गोरेगाव येथे सुद्धा शाखा स्थापनेचा कार्यक्रम झाला !

ग्रामसेवकावर कारवाईची मागणी जामोद ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी गटविकास अधिकार्‍यांना दिले निवेदन…

0

 

गजानन सोनटक्के
जळगांव जा.प्रतिनिधी:-

बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील सर्वात मोठी गट ग्रामपंचायत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जामोद ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार सुरू असल्याने तसेच जामोद ग्रामपंचायतीमध्ये प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार फोफावला आहे यामुळे जामोद ग्रामपंचायतच्या अकरा सदस्यांनी गटविकास अधिकारी यांना निवेदन देऊन संबंधित जामोद ग्रामपंचायतचे ग्रामसेवक कैलास चव्‍हाण यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी सदर ग्रामसेवकावर आतापर्यंत विविध कलमान्वये गुन्हे दाखल आहेत 143 147 149 354 323 504 506 भादवि कलम असून 354 हे महिलांना छेडछाड करण्याचे कलम सुद्धा त्यांच्यावर आहेत वरिष्ठ अधिकारी हे ग्रामसेवक कैलास चव्‍हाण यांना पाठीशी घालून त्यांच्यावरील कारवाई करण्यास टाळाटाळ करीत आहे याकरिता दिनांक 26 नोव्हेंबर रोजी जामोद ग्रामपंचायतीच्या अकरा सदस्यांनी जळगाव जामोद येथे जाऊन पंचायत समिती ती गटविकास अधिकारी यांना निवेदन सादर करून संबंधित ग्रामसेवकावर त्वरित कारवाई करण्यात यावी असे नमूद केले आहे अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा पवित्रा सुद्धा त्यांनी बोलून दाखविला आहे

या निवेदनावर सौ. प्रमिला हागे, दुर्गा ढगे ,गीता धुर्डे,सविता ढगे ,शहाजानवी रशिद खा ,श्री संजय धुर्डे, श्री दीपक घाटे, सलाम खा जागीर खा,श्री मनोहर भगत, नासिरखा खा इत्यादी सदस्यांच्या निवेदनावर सह्या आहेत.

दहा वर्षा नंतरचे सर्व मित्र  वर्ग एकत्र —- आज दिनांक 23 नोव्हेंबर 2020 रोजी जी प विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय अडगाव बु

0

आठवण हेच साठवण

दिपक रेळे प्रतिनिधी आडगांव बु

  अडगांव बु जिल्हा परिषद कनिष्ठ महाविद्यालय  शाळा येथील 2009-2010 या शैक्षणिक नवर्षातील विद्यार्थी,विद्यार्थिनी दिवाळीचे ओचित्य साधून एकत्र येऊन नवीन एक उपक्रम केला.या मागे एकत्र येण्याचा उद्देश दोन वर्ग मित्र दिपक रेळे, दिपक घाईट,  शेख साबीर ,त्यावेळेचे वर्ग शिक्षक श्री इंगळे सर याना भेटले व 2009 -2010 चे सर्व मुले मुली एकत्र ग्रुप तयार केला .ग्रुप तयार करून लग्न झालेल्या मुला मुलीशी बोलून ग्रुप तयार करण्याचे कारण सांगितले.यामध्ये नौकरी करणारे मुले मुली समाविष्ट आहेत.ग्रुप तयार करण्याचा उद्देश ,या धक्काधकक्कीच्या जीवनात प्रत्येकाच्या आयुष्यात सुख दुःख येतात. या सुख दुखःत कोणी मदत करत नाही पण आम्ही ऐका वर्गातील मित्र मित्रीणि एकत्र येऊन वर्गातील एखादया मुला मुलीला अडचण आल्यास सर्व मिळून फुलनाही फुलाची पाकळीची मदत करण्याची शपथ घेतली ,की अडचणीत असलेली वर्ग मित्र मैत्रिण सर्व मिळून मदत करावी हे ठरविण्यात आले.या प्रसंगी वर्गातील  विद्यार्थी त्यावेळेचे सर्व जण उपस्थित होते.वैद्यकीय,लग्न,आजारात मदत,दवाखान्यात जेवण पोहचवणे,इतर अडचणीत मदत करण्याचे ठेवण्यात आले.या प्रसंगी या विद्यार्थ्यांना पाचवी पासून शिकवणारे शिक्षक हजर होते. या प्रसंगी कनिष्ठ महाविद्यालय चे प्राचार्य आर जी जाधव सर अध्यक्ष स्थानी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त शिक्षक पी आर आढाऊ सर होते.या प्रसंगी शिक्षकाची भाषणे झाली,सर्व विद्यार्थी आपापल्या आठवणी कथन केल्या.या वेळी वातावरण अति भाऊ क झाले होते.दहा वर्षा नंतर आपण एकत्रित येत आहो.एकमेकास सहकार्य करण्याचे हमी देत अहो
यावेळी त्यावेळचे वर्ग शिक्षक श्री इंगळे  सर विद्यार्थ्यांना कसे बोलत कसा मार मिळाला याचे वर्णन केले . ,विद्यार्थी यांनी सुद्धा शाळेच्या आठवणी भावुक होऊन सांगितल्या.आणि ग्रुप मध्ये राहून सर्वांचे सुखदुःख समजेल या प्रसंगी कार्यक्रमच संचलन रोशनी गाडगे व मनीषा धमके यांनी केले तर आभार नागेश तायडे याने मानले.कार्यक्रम  सर्व मित्र मैत्रीणी उपस्थित होते  कार्यक्रम झाल्यानंतर सर्वांनी एकत्रित भोजनाचा स्वाद घेतला व कार्यक्रमाची संपन्न झाला

मतदार यादी मध्ये चुकीचे नावे समाविष्ठ करणाऱ्यांवर कारवाई करा

0

 

मोताळा शहर भारतीय जनता पक्षाची मागणी

अजहर शाह मोताळा प्रतिनिधी

मोताळा :- नोव्हेंबर महिन्यात मुदत संपणाऱ्या मोताळा नगरपंचायत च्या निवडणूकीचा बिहुल वाजला असुन शहरातील 17 प्रभागा साठी आरक्षण जाहीर झाले असुन मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्याच्या भेटी-गाठी सोबतच आपल्या प्रभागातील मतदारांची जुळवाजुळव केल्या जात आहे अश्यातच निवडणूकी च्या अनुषंगाने मोताळा शहरात चुकीच्या पद्धतीने खेड्या पाड्यातील मतदान मोताळा शहरात टाकल्या जात असुन चुकीच्या पद्धतीने नाव समाविष्ठ करणाऱ्यांवर कारवाई करावी या करिता आज 25 नोव्हेंबर रोजी भारतीय जनता पक्ष मोताळा शहराच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले
निवेदनात नमूद आहे की आगामी काळात मोताळा नगरपंचायत च्या निवडणुका होणार आहे तसेच निवडणूक आयोगाने दिलेल्या कार्यक्रमा नुसार मतदार यादी मध्ये नावे नोंदविण्या बाबत कार्यक्रम जाहीर झाला आहे या अनुषंगाने मोताळा शहरातील काही राजकीय व्यक्ती व विशिष्ट पक्षाच्या नेत्यांनी खेड्या-पाड्यातील तसेच इतर मतदारसंघातील नावे मोताळा शहराच्या मतदान यादी मध्ये समाविष्ठ करण्याचा सपाटा लावला आहे या मध्ये येणाऱ्या मोताळा नगरपंचायत च्या निवडणुकी मध्ये ग्रामीण भागातील प्रत्येक प्रभागा मध्ये दोनशे ते तीनशे नावे समाविष्ठ करण्यासाठी कार्यक्रम गुप्त पणे आखला असुन या मध्ये काही कर्मचारी व BLO यांच्या समावेश आहे शासनाने दिलेल्या नियमानुसार ज्या यादी भागामध्ये ज्याचे वय 18 वर्ष पुर्ण झाले असेल त्यांची च नावे समाविष्ठ झाली पाहिजे
त्यासाठी नमुना 6 भरून देने बंधनकारक आहे व नमुना नंबर 8 मध्ये ट्रान्स्फर बाबत नियमावली तयार करण्यात आली आहे परंतु येणाऱ्या नगरपंचायत च्या निवडणुका लक्ष्यात घेता ग्रामीण भागातील मतदाराकडून नमुना 8 सुद्धा भरून घेण्यात येत आहे फक्त आणि फक्त येणाऱ्या नगरपंचायत निवडणुकी साठी सदर चुकीचे काम होत असुन हे अन्याय कारक आहे व राजकीय फायद्यासाठी सदरचे बेकायदेशीर कृत्य हे करण्यात येत आहे सदरच्या विषयांवर गंभीर दखल घेऊन मतदारांवर/कर्मचारी/BLO यांच्या वर गुन्हे दाखल करण्यात यावे नवीन नाव समाविष्ठ करताना त्याची संपूर्ण चौकशी करण्यात यावी सदरचे व्यक्तीचे वास्तव हे शहरात व त्या यादी भागामध्ये आहे काय ? त्याचा सबळ पुरावा शासकीय असणे बंधनकारक ठेवण्यात यावा त्यामध्ये त्याच्या परिवारातील व्यक्तीचे आधारकार्ड, मतदान कार्ड,नगरपंचायत ची टॅक्स पावती,पॅनकार्ड, हा पुरावा असल्याशिवाय नवीन नावाची नोंदणी करण्यात येऊ नये किंवा 18 वर्षावरील नाव नोंदण्यासाठी त्याच्या परिवारातील ठोस पुरावा सादर करणे बंधनकारक करावे सदरच्या प्रकरणाची आपण गांभीर्याने नोंद न घेतल्यास आम्हाला आपल्या कार्यालया समोर लोकशाही मार्गाने आंदोलन करावे लागेल असा गंभीर इशारा निवेदना च्या माध्यमातून देण्यात आला असुन निवेदनाच्या प्रतिलिपी मुख्याधिकारी नगरपंचायत मोताळा याना देण्यात आलं असुन निवेदनावर तालुका अध्यक्ष यशवंत पाटील,मोताळा शहर अध्यक्ष गजानन मातळे,अमोल रुमाले,हसन शाह,नंदकिशोर कुकडे,प्रल्हाद लवगे,किशोर भगत,अशोक खर्चे, वासुदेव दसरकर,धनराज सोळंके,पवन सुरगडे यांच्या सह अन्य कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत

खासदार प्रफुल्ल पटेल यांचा देवरी तालुक्यात जनसंपर्क दौरा

0

 

गोंदिया-शैलेश राजनकर

 

देवरी २५: आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बळकटीकरणाकरिता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी जिल्ह्यात पक्ष वाढीची कमान स्वत: स्विकारून झंझावाती दौरा कार्यक्रम सुरु केला आहे.
खासदार प्रफुल्ल पटेल यांचा देवरी तालुक्यात कार्यकर्ता जनसंपर्क दौरा २९ तारखेला असुन भर्रेगाव येथे दुपारी ११:३० वाजता, पिंडकेपार (गोटाबोडी) येथे दुपारी १:०० वाजता तर सावली येथे दुपारी २:०० वाजता कार्यक्रमात हजेरी लावणार आहेत.यावेळी आमदार मनोहर चंद्रिकापुरे, माजी आमदार राजेंद्र जैन, माजी म्हाडा सभापती नरेश माहेश्वरी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विजय शिवणकर व आमगाव विधानसभेचे शिलेदार व सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती रमेश ताराम हे उपस्थित राहणार आहेत.

रयत क्रांती संघटनेचे शिष्टमंडळ यांनी माजी कृषी राज्यमंत्री आमदार सदाभाऊ खोत यांच्या अध्यक्षतेखाली घेतली महामहिम राज्यपाल मा. भगतसिंग कोशारीजी यांची भेट

0

 

रयत क्रांती संघटनेचे सर्वेसर्वा माजी कृषी राज्यमंत्री आमदार सदाभाऊ खोत यांनी आज महामहिम राज्यपाल भगतसिंग कोशारीजी यांची राजभवन येथे भेट घेतली. भेटी दरम्यान मा. सदाभाऊ खोत यांनी शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा केली.

राज्यात लाॅकडाऊनच्या कालावधीमध्ये नागरिक व व्यापाऱ्यांना वाढीव रकमेची बिले देण्यात आली असून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 20 मार्चपासुन लाॅकडाऊन सुरू करण्यात आले व लगडून मुळे व्यापारी शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. असे असताना लाॅकडाऊनच्या काळातील तीन महिन्यांचे एकत्रित वीजबिल 300 युनिटचे देण्यात आले देण्यात आले. तरी वाढीव वीज बिल तात्काळ माफ करणे बाबत शासनाचे निर्देश द्यावेत अशी विनंती करण्यात आली.

राज्यातील शेतकऱ्यांना मागील काही वर्षापासून कधी कोरडा दुष्काळ तर कधी ओला दुष्काळ अतिवृष्टी गारपीट नैसर्गिक संकटांचा सामना करावा लागत आहे. यावर्षी खरीप हंगामात सुरुवातीपासुन पावसाने जोरदार हजेरी लावली शेतकऱ्यांनी कर्ज काढून पिकांची लागवड केली. मात्र या नुकसानीमुळे शेतीसाठी झालेला खर्च वसूल झालेला नाही. शेतकऱ्यांच्या डोक्यावर आधीच कर्जाचा डोंगर असताना अतिवृष्टीमुळे शेतकरी संकटात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक अडचणीतून बाहेर काढावे व राज्यातील शेतकऱ्यांची चालू पीक कर्ज माफ करून आर्थिक मदत देऊन दिलासा द्यावा अशी विनंती मा. सदाभाऊ खोत यांनी राज्यपाल महोदयांकडे केली.

तसेच केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी सुधारणा विधेयकाचे राज्यात तात्काळ अंमलबजावणी करण्याकरिता राज्य सरकारला सूचना देणेबाबत देखील विनंती केली.
तसेच महात्मा फुले कर्ज माफी योजना अंतर्गत नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना सरकारने जाहीर केलेले 50 हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान त्वरित देण्यात यावी, अशी विनंती केली.
तसेच कोरोनाच्या या महाभयंकर काळामध्ये जे आरोग्य कर्मचारी, पोलिस कर्मचारी, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, खाजगी डॉक्टर, तसेच राज्यभरातील अनेक पत्रकार कोरोनामुळे मृत्यु पावले अशा व्यक्तिंना शासनाकडून 50 लाख रुपये देणेबाबत शासनाने सांगितले होते. परंतु तसे होताना दिसत नाही. तरी याबाबत देखील आपण सूचना कराव्यात अशी विनंती करण्यात आली.

*आमदार नियुक्तीसाठी राज्यपाल महोदयांना सुचवली नामवंत अन् योग्य अश्या 12 लोकांची यादी*

महाराष्ट्रामध्ये राज्यपाल आमदारकीच्या 12 जागा रिक्त झालेल्या आहेत. त्यामध्ये विज्ञान, साहित्य, कला, सहकार क्षेत्र, सामाजिक क्षेत्र अशा विविध क्षेत्रातील प्रसिद्ध लोकांना विधानपरिषदेवर संधी देण्याची परंपरा आहे. राज्यांमध्ये अनेक नामवंत आहेत की ज्यांना आजपर्यंत कुठे संधी मिळालेले नाही. अश्या व्यक्तिंचे गेले अनेक वर्ष आपआपल्या क्षेत्रात काम सुरू आहे. तरी अशाच काही वैशिष्टपुर्ण व्यक्तिंची नावे मा. राज्यपाल महोदयांना आ. सदाभाऊ खोत यांनी सादर केली.

🖊️नावे व कार्यक्षेत्र 🖊️
1) श्री. मकरंद अनासपुरे
(कला फौंडेशनच्या माध्यमातून सामाजिक कार्य )

2) श्री. विठ्ठल वाघ
(लेखन व साहित्यिक)

3) श्री विश्वास पाटील
(लेखन व साहित्यिक)

4) श्री जाहीरखान
(क्रीडा)

5) श्रीमती मंगलाताई बनसोडे
( कला )

6) श्री अमर हबीब
(सामाजिक कार्य व पत्रकार)

7) श्री निवृत्ती महाराज इंदुरीकर
( सामाजिक कार्य व प्रबोधन)

8) श्री पोपटराव पवार
(सामाजिक कार्य)

9) श्री डॉ. तात्याराव लहाने
( सामाजिक कार्य व आरोग्य सेवा)

10) श्री डॉ. प्रकाश आमटे (सामाजिक कार्य)

11) श्री सत्यपाल महाराज
(सामाजिक कार्य व प्रबोधन)

12) श्री बुधाजीराव मुळीक
(विज्ञान व शेती विषयाचे गाढे अभ्यासक)

या व्यक्तींचा सहानुभूतीपूर्वक विचार करून त्यांना राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून संधी द्यावी अशी विनंती करण्यात आली.

या शिष्टमंडळामध्ये रयत क्रांती संघटनेचे कार्याध्यक्ष मा. दिपक भोसले, राज्य कार्यकारणी सदस्य मा. सुहास पाटील, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष मा. दिपक पगार, राज्यप्रवक्ते मा. भानुदास शिंदे, राज्यप्रवक्ते मा. लालासो पाटील, राज्यप्रवक्ते मा. जितु आडिलकर, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे कार्यकारी परिषद सदस्य व कोल्हापुर संपर्कप्रमुख प्रा. एन. डी. चौगुले, महिला आघाडीच्या उपाध्यक्षा मा. निताताई खोत इ. उपस्थित होते.

रेखा जोरावल यांच्या ३० दिवसात ऑनलाईन मराठी वाचन व लेखन उपक्रमास विद्यार्थी व पालकांचा भरघोस प्रतिसाद !

0

 

सिंदखेड राजा (सचिन खंडारे )

देऊळगाव राजा येथील नगर परिषद मराठी प्राथमिक शाळा क्रमांक ४ च्या सहाय्यक शिक्षिका रेखा जोरावल यांनी कोरोना काळात शाळा बंद असल्या तरी शाळेत इयत्ता पहिलीत नव्याने दाखल झालेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून ३० दिवसात ऑनलाईन मराठी वाचन व लेखन उपक्रम राबवला आणि या उपक्रमास पालकांचा भरघोस प्रतिसात मिळाला आहे. या उपक्रमामुळे इयत्ता पहिलीत नव्याने दाखल झालेल्या विद्यार्थ्यांची वाचन व लेखन क्षमता विकसित झाल्याने पालकांनी समाधान व्यक्त केले आहे.

दरवर्षी २६ जून ला शाळा विदर्भातील शाळा सुरु होतात मात्र या वर्षी कोरोना चा कहर सुरु असल्याने सर्वत्र शाळा बंद आहेत. अशा वेळी रेखा जोरावल यांनी अंगणवाडी ताईच्या मदतीने इयत्ता पहिलीत दाखलपात्र मुलांच्या घरी गृह भेटी देऊन पालकांना शाळेत मुले दाखल करण्यासंदर्भात मार्गदर्शन केले. इयत्ता पहिलीत एकूण १५ विद्यार्थी दाखल झाली. शाळा बंद असल्याने या नव्याने दाखल झालेल्या मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून प्रशासन अधिकारी जगन मुंढे साहेब व मुख्याध्यापक वामन वाडेकर यांचेशी चर्चा करून विद्यार्थ्यांना किमान मराठी वाचन व लेखन यावे म्हणून ३० दिवसात ऑनलाईन मराठी वाचन व लेखन उपक्रम राबवण्यास सुरुवात केली.

या उपक्रमामध्ये रेखा जोरावल यांनी स्वतःचे घरी शिकवण्याचे व्हीडीओ तयार केले व हे व्हीडीओ पालकांच्या व्हॉटसअप असलेल्या मोबाइल वर पाठवून मुलांच्या अभ्यासासंदर्भात मार्गदर्शन करत पालकांच्या मदतीने मुलांचा अभ्यास पूर्ण केला. मात्र व्हॉटसअप वर पाठवलेल्या व्हीडीओ ची साईज जास्त एम बी ची असल्याने पालकांच्या मोबाइल वर व्हीडीओ डाउनलोड होण्यास जास्त वेळ व इंटरनेट डेटा लागू लागला. याला पर्याय म्हणून रेखा जोरावल यांनी स्वतःचे घरी शिकवण्याचे व्हीडीओ तयार केलेले व्हीडीओ यु टयूब वर अपलोड केले आणि या व्हीडीओ ची लिंक पालकांच्या मोबाइल वर पाठवली सोबतच पालकांना फोनवर मुलांचा अभ्यास कसा करून घ्यायचा या संदर्भात मार्गदर्शन केले आणि एकाच वेळी सर्व पालकांना मुलांचा अभ्यास करून घेणे सोपे झाले.

मराठी मधील स्वर, व्यंजन, स्वरचिन्ह, पंधराखडी, शब्द, शब्दचक्र, वाक्य, जोडशब्द, मराठी वाचनपाठ, गोष्टीचे पुस्तक वाचन इत्यादी वाचन व लेखन सराव या उपक्रमा अंतर्गत व्हीडीओ या उपक्रमात घेतले आहेत. या उपक्रमाशी निगडीत सर्व व्हीडीओ रेखा जोरावल यांच्या मराठी भाषा गुरु या यु ट्यूब चंनल वर अपलोड केलेले आहेत. या उपक्रमात समाविष्ट विद्यार्थी त्यांच्या पालकांच्या मदतीने घरच्या घरी उपक्रमातील व्हीडीओंना पाहत घरचा अभ्यास करु लागले, अभ्यासाचे फोटो पालक रेखा जोरावल यांच्या मोबाईल वर पाठवू लागली आणि लगेच पालकांना अभ्यासातील काही दुरुस्ती असल्यास वेळीच दुरुस्ती सुचवली गेली. यामुळे इयत्ता पहिलीत दाखल झालेले विद्यार्थी चांगल्या प्रकारे मराठी पुस्तकातील वाचन व लेखन करू लागले. कोरोना काळात सुद्धा मुलांना योग्य मार्गदर्शन असले तर मुल शिक्षणापासून वंचित राहत नाहीत हा विश्वास पालकांमध्ये निर्माण झाला.

या उपक्रमासाठी रेखा जोरावल यांना नगर परिषद देऊळगाव राजा च्या मुख्याधिकारी निवेदिता घार्गे, प्रशासन अधिकारी जगन मुंढे, नगरध्यक्षा सुनिता रामदास शिंदे, शिक्षण सभापती नंदाताई संदीप कटारे, मुख्याध्यापक वामन वाडेकर यांचे मार्गदर्शन लाभले. आणि शाळेच्या सर्व पालकांनी उत्तम प्रतिसाद दिला. या उपक्रमात देऊळगाव राजा तालुक्यातील शाळांसह अकोला, यवतमाळ, अहमदनगर, कोल्हापूर, पालघर, नाशिक, जालना, जिल्ह्यातील शाळा सुद्धा मराठी भाषा गुरु या यु ट्यूब चंनल द्वारे सहभागी झाल्या आहेत.