Home Blog Page 584

चुन भाकर आंदोलनाने तहसिल कार्यालय दणाणले

0

 

संग्रामपुर तालुक्यातील शेतकर्‍यांच्या खात्यात सरसकट शासनाने अनुदान द्यावे या मांगणी करीता शेतकर्यांना सोबत घेवुन भारतीय जनता पक्षाच्या वतीने तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. यावेळी शासन विरोधी घोषणा देत महाआघाडीच्या शासनाचे निषेध व्यक्त केला. तालुक्यात शेतकर्‍यांची परिस्थिती भयानक असतांना सुध्दा हे सरकार शेतकर्यांच्या पाठीशी उभे राहत नाही. मुंग, उडीद, सोयाबीन, कापूस ही सर्व पिके बाद झाली आहे. अस असताना शेतकरी मोठय़ा आशेने शासनाकडे पाहत होते पंरतु निराशाच हाती आली. या सर्व बाबींचा विचार करत भारतीय जनता पक्षाचे नेते कार्यकर्ते यांनी शेतकऱ्यांच्या सेमवेत भाकर चटणी खात या शासनाचे विरोध केले.
यावेळी श्री लोकेश राठी, तालुका अध्यक्ष भाजपा, पं स सभापती सौ नंदाताई पांडुरंगजी हागे,गजाननभाऊ दाणे, सभापती कृ उ बा समिती, जानरावजी देशमुख, जिल्हा उपाध्यक्ष भाजपा, राजुभाऊ ठाकरे, सहकार जिल्हा संयोजक, पांडुरंगजी हागे, डॉ. गणेशभाऊ दातिर, जिल्हा सदस्य भाजपा, ज्ञानदेवराव भारसाकळे, जि प सदस्य, प्रमोदभाऊ खोद्रे, जि प सदस्य, श्री अंबादासजी चव्हाण, उपसभापती, पं स संग्रामपुर, विलासभाऊ इंगळे, शहराध्यक्ष संग्रामपुर, सुभाषभाऊ हागे, प्रमोदभाऊ गोसावी, रामदास म्हसाळ, अविनाश धर्माळ, राजुभाऊ मुयांडे, श्रीकृष्ण भालतिडक, संजुभाऊ ठाकरे, गुणवंता खोडके, नारायण अवचार, संजुभाऊ उमाळे, शामभाऊ आकोटकार, यासह मोठ्या संख्येने शेतकरी व कार्यकर्ता उपस्थित होते

महावितरणा च्या भोंगळ कारभारामुळे आदिवासींची दिवाळी प्रकाशित होणार की नाही….?

0

 

 

सोनाळा (सूर्या मराठी न्युज) संग्रामपूर तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या पुनर्वसित आदिवासीबहुल भागांमधील गावांमध्ये स्वातंत्र्यपूर्व काळापासून अंधारमय असलेले लोक वस्ती प्रकाशित करण्याकरता महावितरणने मोठा गाजा वाजा करत रोहन खिडकी, नविन चुनखडी, शेंबा इत्यादी गावांमध्ये लाखो रुपये खर्चून विद्युत महावितरणने मोठ्या थाटात कामाला सुरुवात केली. पंधरा दिवसात काम पूर्ण करून गेल्या एक ते दीड महिन्यापासून महावितरणचे अधिकारी लाईट चालू करण्याकरता कशाची वाट बघत आहेत. महावितरण’च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपल्या कुंभकरण झोपेतून उठून आदिवासीबहुल भागातील लाईन चालू करावी अशी मागणी आदिवासी भागातील नागरिक करत आहे.
आदिवासीबहुल भागातील पुनर्वसित आदिवासी नागरिकांनी विद्युत महावितरणला आपण लाईन चालू करत नसाल तर आदिवासी बांधव विद्युत महावितरण कार्यालय सोनाळा या ठिकाणी तीव्र आंदोलन करतील हे त्यांनी आपल्या सूर्या मराठी न्यूज चॅनल च्या माध्यमातून शासनापुढे मांडले.

वान चे पाणी आमच्या हक्काचे घोषणा देत तेल्हारा आडसुळ येथे भाजपाचे रास्तारोको

0

 

तेल्हारा —- तेल्हारा तालुक्यातील वारी भैरवगड गावा जवळ सातपुडा च्या पायथ्याशी वान नदी प्रकल्पांतर्गत वान धर्मातील जलसाठ्यांची उचल बाळापूर मतदार संघातल्या 69 खेडी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनासाठी वापरण्याचा घाट घातला जात असून सदर्हू पाण्याचा वापर व अकोट तालुक्यात साठीच व्हावा या मागणीसाठी तेल्हारा तालुका व शहर भाजपाच्यावतीने अडसूळ तेल्हारा शहर येथे 12 नोव्हेंबर रोजी वान चे पाणी आमच्या हक्काचे नाही अशा घोषणा देत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले
तेल्हारा शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानाजवळ आडसुळ फाट्या वरील टी पाँइंटवर भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रास्ता रोको करून दि 12 नोव्हेंबर रोजी दोन तास वाहतूक रोखून धरली तालुका भाजपाध्यक्ष गजानन उंबरकार यांच्या मार्गदर्शनात भाजपा शहराध्यक्ष महेंद्र गोयनका आडसुळ येथे भाजयुमो जिल्हा सरचिटणीस किरण अवताडे हिवरखेड येथे प्रवीण येऊन यांच्या नेतृत्वात पार्क पडलेल्या रास्ता रोको आंदोलनात भाजपा जिल्हा सरचिटणीस केशव ताथोड जिल्हा उपाध्यक्ष अनिल पोहणे शेतकरी आघाडी शहर अध्यक्ष संजय देशमुख सहकार आघाडी शहर अध्यक्ष अतूल विखे तालुका सरचिटणीस ज्ञानेश्वर सरफ प्रदेश महिला आघाडी उपाध्यक्षा नयनाताई मनतकार महिला आघाडी तालुका अध्यक्षा मोनिकाताई वाघ भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष लखन राजनकर शहर अध्यक्ष गणेश इंगोले यांच्या प्रमुख उपस्थितीत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले या रास्ता रोको आंदोलनात सरचिटणीस रवि गाडोदिया गजानन गायकवाड उपाध्यक्ष विजय देशमुख तालुका प्रसिद्धी प्रमुख रवि शर्मा न प गट नेते नरेश आप्पा गंभिरे गजानन नळकाडे नागोराव वानखडे गोपाल पाडिया राजेश बुरघाटे प्रविण बुरघाटे न्यानेश्वर वारूळकार अक्षय पदवाड मनोज पालिवाल श्याम वानखडे सुमित गंभिरे सदानंद नवलकार विशाल कोकाटे मोहिब ठेकेदार अर्जुन वाघ रोशन खोटरे राहुल मार्के धिरज नेमाडे शिवा खाडे राहुल भोम श्रीधर महाल्ले दिनेश काळपांडे शुभम चिंचोळकार अंकुश वाघ विठ्ठव खराडे गोपाल भाकरे सागर धोपाले सोमेश नेमाडे आशिष शेळके सुधिर दाते विठ्ठलराव भाकरे अनिल खारोडे सुधिर दाते विठ्ठल भाकरे अनिल खारोडे अतुल ताथोड दिगंबर पांडे धम्मपाल भटकर बाळासाहेब पाचपोर विजय माने शुभम ईसापुरे स्वप्निल भारसाकडे अनिल धरमकर गोपाल मोहोड यांच्यासह भाजपा शहर व तालुका चे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते

 

 

*तालुका प्रसिद्धीप्रमुख रवि शर्मा*

वारकरी संप्रदायाच्या परंपरेनुसार कोजागिरी पौर्णिमेपासून काकडा आरतीस प्रारंभ

0

 

बुलढाणा जिल्हातील जळगाव येथील हनुमान मंदिर वाडी खुर्द येथून पहाटे सकाळी 5 वाजता काकडा आरती निघून श्री संत सखाराम महाराज मंदिर पाटील नगर, आसरा माता मंदिर, देशमुख वाडी, विठ्ठल रुक्मिणी मंदिर, गंगा नगर मधून मार्गक्रमण करीत बोचरे नगर, रामनगर मधून हनुमान मंदिरात पोहोचते,दरम्यान भक्त रस्त्याने संतांचे अभंग, गवळणी गात टाळ, विणा मृदंगाच्या निनादात हरी नामाचा गजर करीत असल्याने पहाटेचे वातावरण प्रसन्न होऊन जाते. रस्त्याने माता-भगिनी घरासमोर सडा समार्जन करून रांगोळी काढून दिवे लावून आरतीचे स्वागत करीत असतात. या काकडा आरती मध्ये नंदकिशोर निमकर्डे, भगवान आतकरे, हरिभाऊ कंकाळे, दत्तात्रय ठाकुर, संजू गावंडे, अतकारे, मंगेश बावस्कारसह बालगोपाल अबालवृद्ध 25 ते 30 वारकरी सहभागी असतात

वान धरणातील पाणी पळवा पळवीप्रकरणी भाजपातर्फे आज ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन

0

 

तेल्हारा —— तेल्हारा व संग्रामपूर तालुक्यातील भूमिपुत्रांना वरदान ठरणारा नदी प्रकल्प धरणातील पाणी पळवापळवीचा घाट घातला जात असून बाळापुर करिता पाणी आरक्षणाचा प्रस्ताव शासनाकडे गेल्याने वान धरणातील पाणी तेल्हारा अकोट तालुक्यातील व्यतिरिक्त अन्यत्र आरक्षित करण्यात येऊ नये या भाजपाच्या मागणीवर कोणतीही कार्यवाही न झाल्याने तेल्हारा तालुका व शहर भाजपाच्यावतीने तालुका अध्यक्ष गजानन उंबरकार यांच्या नेतृत्वात तालुक्यातील आडसुळ, हिवरखेड, व तेल्हारा शहर येथे दि १२/११/२०२० रोजी सकाळी ९ वाजता पासुन रस्ता रोको आंदोलन आंदोलन छेडन्यात येणार आहे
या रास्ता रोको आंदोलन आंदोलनसंबंधा तेल्हारा तालुका अध्यक्ष गजानन उंबरकार यांच्या स्वाक्षरीनिशी तेल्हारा तहसीलदार यांना दि 10 नोव्हेंबर रोजी एका निवेदन सादर करून सूचित करण्यात आले आहे प्रतिलीपि सार्वजनिक बांधकाम विभाग तेल्हारा,पोलीस निरीक्षक तेल्हारा, पोलीस निरीक्षक हिवरखेड, यांना देण्यात आले आहे शासन केवळ सत्ताधारी लोकप्रतिनिधीचे कामे करीत असून आमचा घसा कोरडा ठेवून अन्याय अन्याय करीतआहे आज रास्ता रोको आंदोलनाचे तेल्हारा भाजपा शहर अध्यक्ष महेंद्र गोयनका जिल्हा उपाध्यक्ष अनिल पोहणे शेतकरि आघाडी जिल्हा उपाध्यक्ष किशोर भागवत न प अध्यक्षा जयश्रीताई पुंडकर भाजयुमो शहर अध्यक्ष गणेश इंगोले आडसुळ येथे महिला आघाडी प्रदेश उपाध्यक्ष नयनाताई मनतकार ,महिला आघाडी तालुका अध्यक्षा मोनिकाताई वाघ ,तालुका सरचीटनिस धर्मेश चौधरी, ज्ञानेश्वर सरफ, भाजयुमो जिल्हा सरचिटणीस किरण अवताडे हिवरखेड येथे शहराध्यक्ष प्रवीण येउल अपंग विकास आघाडी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नेरकर जिल्हा भाजपा सदस्य रमेश दूतोंडे ओबीसी जिल्हा ऊपाध्यक्ष कृष्णा तीडके शेतकरी आघाडीचे अनिल कराळे जील्हा सचिव डॉ संजय शर्मा तालुका सरचिटणीस पुंजाजी मानकर तालुका उपाध्यक्ष किरन सेदानी अनुसुचीत जाती जमाती मोर्चा सचिव अकुश हिवराळे शेतकरी आघाडी तालुका अध्यक्ष पद्माकर आखरे सुभाष गावंडे महेद्र भोपळे यूवामोर्चाचे रवी मानकर वीनोद ढबाले ईत्यादी यांच्या प्रमुख उपस्थितीत रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे

मिळाले केवळ आश्वासन ! लोकप्रतिनिधी मजे में??

0

 

गोंदिया-शैलेश राजनकर

 

४० वर्षांपासून बोदलबोडीच्या बाघ नदीवर पुलाची प्रतिक्षा : ३ महिन्या पासून बोदलबोडी रस्ता बंद

सालेकसा 11: देशाला स्वातंत्र्य मिळून आजघडीला ७३ वर्ष झाले़ मात्र, आजही अनेक गाव हे विकासापासून कोसो दूर आहेत़ काही गावात तर अद्याप रस्तेच नसल्याचे चित्र आहे़ तर काही गावांमध्ये नेमका विकास म्हणजे काय असा प्रश्न आजही कायम आहे़ सद्या असाच काहीसा प्रश्न सालेकसा तालुक्यातील नागरिकांना पडला आहे़ तालुक्यातील बोदलबोडी गावाला लागूनच बोदलबोडी ते भजेपार मार्गावर वाघ नादी वाहत असून या नदीवर अद्यापही पुलाची निर्मीती करण्यात आली नाही़ मागणील ४० वर्षांपासून येथील नागरिक पुलाची मागणी करीत असले तरी आतापर्यंत त्यांच्या पदरी केवळ आश्वासनच मिळाले आहे़ विशेष म्हणजे सद्यास्थितीत पुलाअभावी मागील ३ महिण्यांपासून हा मार्ग बंद पडला आहे़ असे असताना या गावाकडे एकाही लोकप्रतिनीधीचे लक्ष न जाणे ही त्या लोकप्रतिनीधीच्या कार्यशैलीचा परिचय देणारी बाब आहे़
जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर मध्यप्रदेश व छत्तीसगड राज्याच्या सिमेला लागून सालेकसा तालुका आहे़ आदिवासी बहूल व नक्षल दृष्ट्या अतिसंवेदनशील तालुका म्हणून सालेकसा तालुक्याची ओळख आहे़ आजही तालुक्यात नक्षल कारवाया घडत असतात अशात शासनाकडून नक्षलग्रस्त भागाचा विकास व्हावा यासाठी कोट्यावधी रुपयाचा निधी खर्च होत असताना एखाद्या नदीवरील पुलासाठी ४० वर्षांपासून प्रतिक्षा करावी लागणे हे पचणी पडण्यासारखे नाही़ देवरी आमगाव विधानसभा क्षेत्रात मोडत असलेला हा तालुका गडचिरोली /चिमूर लोकसभा क्षेत्रा येत असल्याने राजकीय अनास्था या तालुक्याच्या नशिबीच आल्याचे चित्र आहे़ स्वातंत्र्य प्राप्तीनंतर कितीतरी खासदार, आमदार लोकप्रतिनीधी या गावात निवडणूकीच्या काळात आले अन् आश्वासन देऊन पुन्हा न येण्याची शपथच घेऊन गेल्याची प्रचिती या परिसरात येताना येते, विशेषत: बोदलबोडी येथील पुलाच्या मागणीवरून तरी असेच म्हणता येईल़ तालुका मुख्यालयापासून अवघा काही अंतरावर बोदलबोडी हे गाव असून याच मार्गावर गिरोला, दरबडा, धानोली, गांधीटोला, साकरीटोला, दागुटोला, नदीटोला, गोविंदपुर, माताटोला, पानगाव आदी गावे येत असून तालुका मुख्यालयात ये-जा करण्यासाठी हा मार्ग येथील नागरिकांना सोयीस्कर आहे़ मात्र, पुलाअभावी या मार्गावरून पवासळ्याच्या दिवसात विशेष म्हणजे ३ ते ४ महिने वाहतूक बंद असते़ परिणामी या मार्गावरील नागरिकांना तालुका मुख्यालयी जाण्यासाठी १० ते १२ किमीचा अधिकचा प्रवास करावा लागत आहे़ त्यामुळे त्यांचा वेळ व पैसा दोन्ही वाया जाते़ त्यातच आता मागील ३ महिण्यांपासून हा मार्ग बंदावस्थेत असून नागरिकांना चांगलीच कसरत करावी लगात आहे़ तेव्हा लोकप्रतिनीधी, शासन, प्रशासनाने याकडे लक्ष देऊन लवकरात लवकर पुलाची निर्मीती करावी अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली अहे आहे़
बोदलबोडीवासी आरोग्य सेवेपासून वंचित-
बोदलबोडी येथील नागरिकांना आरोग्य सेवेचा लाभ मिळावा यासाठी जवळच्या सातगाव येथे प्राथमीक आरोग्य केंद्र देण्यात आले आहे़ मात्र, नदीवर पुल नसल्याने व सद्यास्थितीत मागील चार महिण्यांपासून मार्गावर पाणी साचून असल्याने येथील नागरिकांना हक्काची आरोग्य सेवा घेता येत नाही़ त्यातच आता कोरोना महामारीचा प्रकोप येथील नागरिकांच्या काळजीत भर टाकणारा आहे.

भूलथापांचे भूमीपुजन
मागच्या वर्षी एका लोकप्रतिनीधीच्या नेतृत्वात या पुलाच्या निर्मीतीसाठी भूमीपुजन करण्यात आले होते़ तेव्हा येथील नागरिकांमध्ये चांगलेच आनंद निर्माण झाले होते़ तर वर्षापासूनची पुलाची प्रतिक्षा संपणार अशी आशा नागरिकांमध्ये पल्लवित झाली होत़ मात्र, सदर पुलाच्या बांधकामाला अद्याप प्रशासकिय मान्यताच मिळाली नसल्याचे कळले़ तेव्हा प्रशासकिय मान्यता नसताना पुलाच्या बांधकामाचे भुमीपुजन कसे झाले हा प्रश्न भेडसात असून ते भुमीपुजन केवळ भुलथापाचे होते काय असा प्रश्न नागरिक करू लागले आहेत़
कोरोनामुळे अडकला काम-
बोदलबोडी ते भजेपार बाघ नदी पुलाचा टेंडर झालेला नाही़ कोरोना संक्रमणाचे काळ आल्याने व सर्वत्र टाळेबंदी करण्यात आली असल्याने संबंधित फाईल मंत्रालयातच पडून आहेत़ तेव्हा लोकप्रतिनीधींनी लक्ष दिल्यास लवकरच कामाला सुरुवात होऊ शकते टी. आर. तुरकर उप विभागीय अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, गोंदिया

तेल्हारा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेले मनात्री खुर्द या गावी 24 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या

0

 

अतिशकुमार वानखडे अकोला

केल्याची घटना सकाळी 9 ते 10 च्या सुमारास घडली.या घटनेचे सविस्तार वृत असे की विजय प्रमोद गवरगुरु वय 24 असे युवक मृतकाचे नाव आहे. हा युवक पंचगव्हाण येथील रहिवासी असून तो काही दिवसापासून मनात्री येथे वीटभट्ट्यांवर कुटुंबासहित काम करीत होता. तो रविवारी सकाळी नऊ ते दहाच्या दरम्यान शौचालय गेला होता .बराच वेळ झाल्याने घरच्यांनी शोधाशोध घेतली असता सदर युवक गळफास घेऊन लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. वीटभट्टी मालकांना सदरची घटना पाहून पोलिस स्टेशनला खबर दिली .त्यानुसार तेल्हारा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक देशमुख साहेब व बीट जमदार रामेश्वर वाकोडे व त्यांचे सहकारी यांनी घटनेचा पंचनामा केला. व सदर मृतदेह तेल्हारा येथे शासकीय रुग्णालयात उत्तरनीह तपासणी करीता पाठवण्यात आला .तेल्हारा पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक देशमुख साहेब व रामेश्वर वाकोडे हे पुढील तपास करीत आहेत

मुर्तिजापुर तालुक्यातील लाखपुरी येथे २ बैल जोडया चोरीला , भुरटया चोरांचा लाखपुरीत धुमाकुळ …

0

 

२ बैल जोडया चोरीला बैलाची किमंत दिड लाख रुपये…
पोलिस प्रशासन देणार का लक्ष ……..

अतिशकुमार वानखडे(अकोला)

लाखपुरी : – , मुर्तिजापुर तालुक्यातील लाखपुरी येथील दि. १०-११-२०२० रोजी पहाटे सकाळी ५ च्या सुमारास लाखपुरी येथील २ बैल जोड्या चोरीला गेल्या सदर बैल जोड्याची किमत अंदाजे एक लाख पन्नास हजार रुपये किंमतीची असुन यामध्ये वासुदेव दौलत घन याचे बैलाची जोडी लाल रंगाची व रामदास बिसन चव्हाण यांच्या बैलाची जोडी पांढ-या रंगाची सदर २ जोड्या त्यांच्या घरातील कोट्यातुन चोरी गेल्या. चोरट्यांनी सदर बैलाचे घंट्या कोट्यात कापुन टाकल्या त्यामुळे घंट्याचा आवाज न आल्यामुळे वासुदेव दौलत घन व रामदास बिसन हे सकाळी कोट्यात जोडी पाहायला गेले असता त्यांना बैल जोड्या कोट्यात न दिसल्यामुळे त्यांनी सदर घटनेची तक्रार सुभाष चव्हाण व वासुदेव घन यांनी मुर्तिजापुर ग्रामिण पोलिस स्टेशन मध्ये दिली आहे .सदर घटनेचा पुढील तपास मुर्तिजापुर ग्रामिण पोलिस स्टेशन करीत आहे. लाखपुरी येथे या आधी सुध्दा गावातील नरेंद्र अवघड व कमलाकर नवघरे याच्या गाई व इतर काही काही लोकांनच्या जनावरांचा अद्याप पत्ता लागला नाही . अज्ञात भुरटया चोरांनवर वेळेवर आळा न घातल्यास त्यांची हिम्मत वाढेल त्यामुळे पोलिस प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे. अशी मागणी लाखपुरी येथील ग्रामस्थान कडुन होत आहे. सद्या जनावरे चोरीचे प्रमाण वाढल्यामुळे सर्वत्र गावात भितीचे वातावरण निर्माण झालेले आहे . पोलिस प्रशासन या भुरटया चोरानवर कधी कारवाई होणार याकडे गावातील ग्रामस्थानचे लक्ष लागले आहे.

माझी जोडी लाल रंगाची होती . सदर माझ्या जोडीची किंमत ९० हजार रुपये आहे. माझी परिस्थीती हालाकीची असुन मी मोलमंजुरी करुन माझा प्रपंच चालवतो दिनांक- ६-११-२०२० रोजी माझ्या कोट्यातुन माझी बैल जोडी नेली . तरी पोलिस प्रशासनाने भुरट्या चोराचा शोध लावुन त्यांना बंदीस्त करावे व प्रशासनाकडुन मला आर्थिक मदत मिळावी हि अपेक्षा….
लाखपुरी येथे या आधी सुध्दा जनावरे चोरीला गेले त्यांचा अद्याप पत्ता लागला नाही . दिनांक – ६ ला साकळी माझे बैल जोडी चोरीला गेले आहे व चोरट्यांनी लाखपुरी मध्ये चोरीचा धुमाकुळ घातला आहे. तरि प्रशासनान चोरट्यांनवर कारवाई करुन आम्हाला न्याय द्यावी आथिक मदत मिळवुन द्यावी …
सदर लाखपुरी येथील बरेच गाई, बैल , बक-या चोरीला जाण्याचे प्रमाण वाढत चालले असुन त्यातच दिनांक ०६-११-२०२० रोजी वासुदेव घन व रामदास चव्हाण याच्या २ जोड्या चोरीला गेल्या यावर पोलिस प्रशासनाकडुन या अज्ञात चोरानंवर कठोर कारवाई करण्याची अपेक्षा आहे.

सूनगाव परिसरात बी टी कापसावर बोंड अळीचे थैमान

0

 

गजानन सोनटक्के जळगाव जा

तालुक्यात शेतकऱ्याची परिस्थिती अतिशय बिकट होत चालली असून हळूहळू सर्वच पिके हातातून गेली असून एकमेव कपाशी पिकाच्या भरवशावर दिवाळी साजरी करण्याचे स्वप्न पहात असतानाच अचानक बोंड अळी चा जोरदार अटॅक कपाशीवर आला आणि शेतकऱ्याचे एकरी सुमारे २५ हजाराचे नुकसान झाले असून त्यामुळे बळीराजाची दिवाळी अंधारात जाणार आहे. शासना कडून मात्र कोणत्याच प्रकारची मदत मिळाली नाही.
तालुक्यातील सूनगाव परिसरात बोंड अळी आल्यामुळे हिरवीगार कपाशी उपटण्याचा सपाटा शेतकऱ्यांनी लावला आहे. यावर्षी पाऊस चांगला झाल्याने हंगाम बरा होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. त्यामुळे सर्वांनी शेती पिकावर भरपूर खर्च केला. सुरुवातीला मुग, उडीद गेले. त्यानंतर तीळ, आणि सोयाबीन वर रोटावेटर मारले आता कापूस किमान एकरी १० क्विंटल होईल असा अंदाज बांधून अतिशय महागडी औषधे फवारून कपाशी बहरली परंतु बी टी कापसावर बोंड अळी आल्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचा घास पळविण्यात आला . हताश झालेला शेतकरी आणेवारी च्या कचाट्यात सापडला आणि शासन मदती पासून सुध्दा वंचित राहिला. कोणत्याच पिकाचा आधार राहिला नसल्याने ( ऊपट पऱ्हाटी अन् पेर गहु) अशा नादाला आता शेतकरी लागला असून आपला देश कृषी प्रधान असल्याचा विश्वास उडाला आहे. सर्व मार्गांनी शेतकऱ्यांची गोची होत असल्याने

मृग बहार न बहरल्याने संत्रा उत्पादकांची दिवाळी अंधारात

0

 

गजानन सोनटक्के
जळगाव जामोद

जळगाव जामोद तालुक्यातील सूनगाव व जामोद या परिसरातील यावर्षी संत्र्यावर मृग बहार येईल व यातून चांगले पैसे मिळतील, अशी शेतकऱ्यांची
अपेक्षा होती. परंतु ही आशा निसगार्ने फोल ठरवली. मृग नक्षत्रात पाऊस, कधी ऊन तर कधी ढगाळ हवामान
तसेच सतत पावसाची रिमझिम सुरू नसल्यामुळे या बदलत्या आणि प्रतिकूल हवामानाचा फटका संत्राच्या
बागेला बसला असून पूर्ण हंगाम वाया गेला आहे. त्यामुळे संत्रा बागा न बहरल्याने काहीच उत्पादन झाले नाही.
त्यातच शासनाकडून परंतु जामोद मंडळातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना संत्रा पीकविमा मिळाला नाही त्यातच दिवाळीपूर्वी शासनाची मदतीची आशा होती ती सुध्दा फोल ठरली. त्यामुळे संत्रा उत्पादक शेतकयाची
दिवाळी अंधारात जाण्याच चिन्हे दिसू लागली आहेत. पारंपरिक पिकाला फाटा देत अनेक शेतकरी फळबागाकडे
वळले आहेत. त्यामुळे तालुक्यात संत्रा उत्पादक शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे. मागील वर्षी कवडीमोल
भावाने संत्र्याची विक्री करावी लागली तर तर यावर्षी बहर न आल्याने संत्रा बागा फुटल्याच नाही.