Home Blog Page 586

कोरोनाच्या पार्श्वभुमीवर ग्रामीण भागात आगामी सण-उत्सव साजरे करत असताना शासनाने घालुन दिलेल्या नियम व अटींचे तंतोतंत पालन करावे असे आवाहन ठाणेदार माधवराव गरुड यांनी केले .

0

 

दिनांक ७ नोव्हेंबर ला पोलिस स्टेशन बोराखेडी येथे आयोजित पोलिस पाटील कार्यशाळेत ते बोलत होते .तज्ज्ञांच्या मते कोरोनाचे महाभयंकर संकट अद्यापही टळलेले नसून नागरिकांना तोंडाला मास्क लावण्याचे निर्बंध घालावे .वयोवृद्ध व लहान बालके यांना बाहेर न फिरण्याबाबत आश्वस्त करावे असेही त्यांनी सांगितले. जिल्ह्यात पुर्वमैनस्यातून सोयाबीन व तत्सम पिकांच्या सुडींना आगी लावण्याचे काम काही समाजकंटकांकडून होत आहे असे प्रकार आपल्या हद्दीत रोखण्यासाठी पोलिस पाटील बांधवांनी कसोशीने प्रयत्नरत राहून संशयितांची नावे पोलिस स्टेशनला कळवावीत. ग्रामीण भागात चोरीच्या घटना रोखण्यासाठी ग्रामपंचायत व तत्सम कार्यालयांसमोर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यासाठी संबंधितांना प्रेरित करावे असे आवाहन त्यांनी केले. कार्यशाळेस तालुक्यातील बहुसंख्य पोलीस पाटील यांची विशेष उपस्थिती होती .यावेळी पोलिस पाटीलांच्या अडी अडचणींसंदर्भात चर्चा होऊन त्यात मार्गदर्शन झाले .
ठाणेदार माधवराव गरुड यांच्या कारकिर्दीस आज
दोन वर्ष पूर्ण झाले. या कार्यकाळात पोलिस पाटील बांधवांना योग्य ते मार्गदर्शन व सहकार्य लाभले .याचे औचित्य साधून पोलीस पाटील संघटनेचे बुलडाणा
जिल्हाध्यक्ष विठ्ठल मनोहर पाटील यांनी ठाणेदार माधवराव गरुड यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला .
आज बोराखेडी पोलिस स्टेशनला नवीनच रुजू झालेले दुय्यम पोलिस निरीक्षक श्री भुसारी यांचा जिल्हा कार्यकारिणी सदस्य सुधाकर तायडे यांनी सत्कार केला .यावेऴी मोताळा तालुकाध्यक्ष संतोष ढोण पाटील गावकामगारचे जिल्हा कार्यकारी अध्यक्ष राजेंद्र भामद्रे तालुकाध्यक्ष बळीराम शेळके गजानन नारखेडे यांसह बहुसंख्य पोलीस पाटील उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचलन रामराव पंडीत पाटील यांनी केले.

आदर्श ग्राम वकाना ग्रामस्थांनी केला शंकर पुरोहित यांचा राज्यस्तरीय आरोग्य मित्र पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार

0

 

आदर्श ग्राम वकाना येथे माऊली सांप्रदायिक भजन मंडळाच्या वतीने संग्रामपूर मित्र परिवाराचे संस्थापक अध्यक्ष गोरगरिबांना अहोरात्र आरोग्य सेवा देणारे दानशूर व्यक्तिमत्त्व मा.शंकरभाऊ पुरोहित यांना राज्यस्तरीय आरोग्य मित्र पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.शंकरभाऊ पुरोहित यांच्या आंगमन प्रसंगी फटाके फोडन्यात आले आणि सांप्रदायिक पद्धतीने मिरवणूक काढून स्वागत करण्यात आले.गावातील प्रतिष्ठित व्यक्तींच्या हस्ते शंकरभाऊ पुरोहित यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी रामकृष्ण वानखडे होते तसेच सरपंच प्रशांत राऊत,उपसरपंच सुभाष उंबरकर,पोलीस पाटील भारत वेरुळकर,करुणाताई गावंडेउषाताई म्हसाळ, नलिनीताई उगले,वेरुळकर ताई तसेच संग्रामपूरहुन ह.भ.प.आंबलके महाराज,देविदास तायडे,डॉ.राजुभाऊ चोपडे,शालीग्राम घाटे,सारंगधर इंगळे व संग्रामपूर मित्रपरिवाराचे सदस्य यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.हरिभाऊ तायडे सर यांनी केले तर राहुल शिरसोले आणि हमीद पाशा यांनी शंकरभाऊ यांच्या सामाजिक कार्यावर प्रकाश टाकला आणि वकाना ग्रामस्थांचे आभार मानले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा.भाऊदेव म्हसाळ सर यांनी केले तर आभार शंकर बाजोळ यांनीं मानले.कार्यक्रमाला गावातील प्रतिष्ठित नागरिक,ज्येष्ठ व्यक्ती,पुरुष आणि महिला मंडळी तसेच संग्रामपूर मित्रपरिवाराचे सदस्य उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महादेव म्हसाळ, विश्वनाथ वेरुळकर, शाळीग्राम वेरुळकर, रामदास खोट्टे, शांताराम चिकटे, हरिभाऊ बोचरे,अंबादास गायकी,परमेश्वर निमकर्डे यांनी परिश्रम घेतले..!

चोरीच्या सात दुचाकी जप्त;गुन्हे शाखेची कामगिरी

0

 

गोंदिया-शैलेश राजनकर

तुमसर-पोलिस स्टेशन तुमसर व परिसरातून दुचाकी चोरीला जाण्याचे प्रमाण वाढल्याने पोलीस स्टेशन तुमसर येथील गुन्हे प्रकटीकरण शाखेने तपासाचे सुत्र हलवत अवघ्या दहा दिवसात सात चोरीच्या दुचाकी जप्त करुन आरोपींना जेरबंद केले.
मोहमद अनिस रईस (३0) रा. संघर्षनगर नागपूर, सुरज बलबिर सिंग (२0) रा. भवानी मंदिर संघर्ष नगर पारडी, दामोदर बाजिराव काटवले (३५) रा. तामसवाडी (तुमसर), नितीन कृष्णा गुर्वे (२४) रा. नवरगाव (तुमसर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींच्या ताब्यातून दुचाकी क्र. एम. एच ३१ व्ही. एस. ८३९२, एम. एच. ३१ सी. टी. ९६२८, एम. एच. ४९ ए. 0१४६, एम. एच. ४0 ए. ई. ५८६५, एम. एच. ३६ एम. ३६४७, एम. एच. ३१ डी. ई. ७६0८, एम. एच. ३६ एम. ६८२६ जप्त करण्यात आल्या आहेत. सदर दुचाकी या तुमसर व नागपूर येथून चोरी करण्यात आल्या होत्या. तसेच पोलीस स्टेशन तुमसर येथे चालू वर्षात एकुन तिन दुचाकी चोरीचे गुन्हे दाखल होते. त्या तिनही दुचाकी व नागपूर येथील चार दुचाकी चोरणार्‍यांना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. सदर कारवाई पोलिस निरीक्षक रामेश्‍वर पिपरेवार यांचे मार्गदर्शनात गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलिस उपनिरीक्षक संजयकुमार टेकाम, पोलिस हवालदार ओमप्रकाश चिचखेडे, संजय गर्जे, दिलीप धावडे, रितेश बर्वे, विनोद थोटे, बापुराव हुलगुंडे यांनी केली आहे.

जळगाव न प चे मुख्य अधिकारी यांच्या मनमानी कारभारामुळे नगरसेवकांचा आत्महत्येचा प्रयत्न

0

 

गजानन सोनटक्के
जळगाव जामोद प्रतिनिधी :-

जळगाव जामोद नगरपरिषद चे वादग्रस्त अधिकारी आशिष बोबडे हे नेहमीच वादात रहात असून विरोधी पक्षाचे नगरसेवकांना विश्वासात न घेता नगरपरिषद चा कारभार करत आहे. याच प्रमाणे जळगाव शहराच्या मध्यभागी असलेले दुर्गा चौकातील व्यापारी संकुल मधील गाळेलिलावाची कोणालाच माहीत नसताना ती ई निविदा काढली व आपल्याजवळील ठेकेदारांना व लोकांना त्याच्यामध्ये हर्रासी साठी निविदा भरायला सुरुवात केली होती वास्तविक पाहता शहरांमध्ये लाऊड स्पिकर फिरून शहरांमध्ये माहीती देणे बंधनकारक असल्यावरही मुख्याधिकारी यांनी तसं न करता आपली मनमानी केली याचाच जाब विचारला व जळगाव नगरपरिषद मध्ये होत असलेल्या भ्रष्टाचाराबाबत तसेच व्यापारी गाळेलिलावाची मुदत वाढून व्यापारी गाळे गरजूंना मिळावीत यासाठी महाविकास आघाडीच्या नगरसेवकांनी मुख्याधिकारी यांच्या कार्यालयात जाऊन जाब विचारला असता त्यांनी समाधान कारक उत्तर न दिल्याने त्या ठिकाणी वातावरण तापले म्हणून नगरसेवक गजानन वाघ, रमेश ताडे यांनी अंगावर पेट्रोल घेऊन आत्महत्या करण्या चा प्रयत्न याठिकाणी केला शिवसेनेचे नगरसेवक गजानन वाघ व रमेश ताडे हे अंगावर पेट्रोल घेत असताना त्या ठिकाणी पोलीस कर्मचारी उपस्थित होते म्हणून एक मोठा अनर्थ त्या ठिकाणी टडला हे सगळं पाहून मुख्याधिकारी यांनी माघार घेत व्यापारी गाळे लिलावाची मुदतवाढ करण्याचा लेखी आश्वासन नगरसेवक गजानन वाघ ,रमेश ताडे , अर्जुन घोलप कृष्ण केदार, संदीप मानकर यांना दिला. त्यानंतर त्याठिकाणी तापलेला वातावरण शांत झाल्याचे दिसून आले मुख्यधिकारी यांच्या ह्या मनमानी कारभाराला पाहून शहरातील जनता रोष व्यक्त करत आहे.

काळे हास्पिटलवर महिलांचा हल्ला दवाखान्याची तोडफोड, डॉक्टर कुटूंबियांना मारहाण

0

 

अनिलसिंग चव्हाण

बुलडाणा – साखर खेर्डा पोलीस ठाण्याअंतर्गत येत असलेल्या मौजे शेंदुर्जन येथील डॉ शिवकुमार काळे यांच्या दवाखान्यावर आज दि 6 नोव्हेंबरचे दुपारी संतप्त महिलांनी हल्ला करुन दवाखान्याची तोडफोड करीत डॉक्टरसह कुटूंबियाला मारहाण केल्याची घटना घडली आहे.
प्राप्त माहितीनुसार असे समजते की, पंधरा दिवसांपुर्वी येथील शिक्षक यांच्या बारा वर्षीय मुलाचा बुलडाणा येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला तत्पूर्वी सदर मुलावर शेंदुर्जन येथे डॉक्टर काळे यांनी प्रथमोपचार केले होते मात्र डॉक्टर काळे यांनी चुकीचे उपचार केल्याने आमच्या मुलाचा मृत्यू झाल्याची तक्रार मृताच्या कुटुंबियांनी सबंधीतांकडे केली होती यामध्ये डॉ काळे यांना अटक करण्याची मागणी करण्यात आली होती. पंधरा दिवसानंतर मृतक कुटुंबातील विस ते तिस महिला अचानक डॉक्टर काळे यांच्या दवाखान्यावर धडकल्या व त्यांनी डॉक्टरची कार, दवाखान्याची तोडफोड करायला सुरुवात केली आत घुसून डॉ काळे, पत्नी, मुलगा, मुलगी यांना लाठ्याकांठ्यांनी मारहाण करायला सुरुवात केली दरम्यान डॉक्टर काळे यांनी घराचे दरवाजे बंद करून आत जीव मुठीत धरून वाचवा वाचवा ची विनवणी करीत होते दरम्यान साखरखेर्डा पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाल्यानंतर सदर महिलांना पोलीस ठाण्यात घेऊन गेले असून वृत्त लिहीपर्यंत कोणतीही कारवाई झालेली नव्हती.

सूनगाव येथील शेतकऱ्यांनी दिलेल्या राशी 659 कंपनीच्या विरोधातील तक्रारीवर कृषी अधिकारी यांनी केली शेताची पाहणी

0

 

गजानन सोनटक्के जळगाव जा

जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव येथील चार शेतकरी यांनी तक्रारीत म्हटले की त्यांनी उसरा बु शिवारात गट नं 75 13 14 व सूनगाव भाग 2 मधील 791 शेतात राशी कंपनीचे 659 हे कपाशीचे वाण पेरणी केली परंतु बियाणे पाहिजे त्या प्रमाणात यशस्वी नसल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले आहे आज रोजी कपाशीच्या झाडांना कमी प्रमाणात बोंडे लागली व काही झाडांना तर बोंडे लागलीच नाही व लागलेल्या बोडांना सुरवातीपासूनच कीड लागलेली आहे व मोठ्या प्रमाणात बोंड अळीचा प्रादुर्भाव झालेला आहे या वर्षी आधीच संकटात सापडलेल्या अवस्थेत शेतकरी असताना अशा परिस्थितीत राशी कंपनीचे 659 वान पेरून उत्पन्न न झाल्याने शेतकरी संकटात सापडलेला आहे व कंपनीने बोगस बियाणे विक्री करून शेतकऱ्याची फसवणूक केली आहे तरी आपण सदर शेताची पाहणी करून पंचनामा करून कंपनीवर कायदेशीर कारवाई ची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे शेतकऱ्यांचा झालेला खर्च व उत्पादन खर्च त्याल त्यानुसार मोबदला शेतकर्‍यांना देण्यात यावा अशी तक्रार 2 नोव्हेंबर रोजी दिली होती त्यानुसार आज कृषी अधिकारी वाकोडे साहेब व पंचयातसमिती कृषी विभागाचे नावकर साहेब यांनी शेताची पाहणी केली व पंचनामा केला तक्रारदार शेतकरी यांनी राशी सिड्स कंपनीवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी कृषी अधिकारी यांचेकडे केली आहे

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शेगाव मध्ये रास्ता रोको आंदोलन

0

शेगाव :- प्रतिनिधी

स्वाभिमानी शेतकरी संघटना शेगाव शहर वतीने दि.5/11/2020 रोजी शेगाव तहसील चोक येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले असून.
शेतकरी विरोधी कृषी विधेयक सरकारने रद्द करावे.
तालुक्यातील शेतकऱ्यांना किमान पंचवीस हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी.
तालुक्यातील आनेवारी वस्तुनिष्ठ 50% च्या आत घोषित करावी.
पिक विमा कंपन्यांना सरसकट 100% पिकांना विमा देण्याची सक्ती करावी.
कापसाची हमी भावाने खरेदी करण्यासाठी तात्काळ सीसीआयची खरेदी केंद्र चालू करण्यात यावे. या सर्व मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना रास्ता रोको करून शेतकऱ्यांकडून सरकारचा निषेध करण्यात आला. मागण्या पूर्ण झाल्यास याही पेक्षा तीव्र आंदोलन करण्यात येईल.असा इशारा या वेळी देण्यात आला असून स्वाभिमानि शहर अध्यक्ष गोपाल तायडे, सागर महेंगे, अतुल तायडे, सागर भगेवर,
ऋषीं बघे, संकेत मुंडे, विशाल पाखरे, यदी कार्यकर्ते उपस्तित होते.

धनगर समाजावर अत्याचाराचे सत्र थांबता थांबेना अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्ट चा गैर फायदा घेऊन सरपंच आणि त्यांचे सर्व कुटुंब धनगर समाजाला शिवीगाळ करून खोटे गुन्हे दाखल करण्याची देत आहेत धमकी

0

 

सविस्तर विषय माहिती महाराष्ट्रामध्ये महा आघाडीचे सरकार स्थापन झाले तेव्हापासून धनगर समाजावर अत्याचाराचे प्रमाण खूप वाढले त्याचाच एक भाग
ग्राम कोल्हाडी तालुका बोदवड जिल्हा जळगाव येथील काही दिवसापूर्वी गावातील अस्वच्छ गटारींची बातमी स्थानिक मीडिया वर आल्यामुळे येथील सरपंच पती सोपान सुरळकर आणि त्याचा भाऊ ज्ञानेश्वर सुरळकर यांच्या जिव्हारी लागली आणि लागताच त्याच दिवशी आणि लगातार रोज दारू पिऊन सर्व स्थानिक मीडिया ना शिवीगाळ करत त्यातील कोतवाल ज्ञानेश्वर सुरळकर हा बनावट पत्रकार आहे असे सांगत तेथील स्थानिक नागरिक आणि धनगर समाजाच्या वस्तीत जाऊन तेथील सर्व धनगर समाजाला शिवीगाळ करू लागला आणि धमकी देत सर्व समाजाला खालच्या पातळीवरील शिवीगाळ करू लागला त्यामुळे तेथील सर्व धनगर समाज यांनी दिनांक 04,11,2020
पोलिस तक्रार करत स्थानिक आमदार श्री चंद्रकांत पाटील,बिजेपी नेते गोपीचंद पडळकर,राज्य मंत्री दत्तात्रय भरणे साहेब,माजी मंत्री राम शिंदे साहेब यांच्या महितिस्तव सर्व धनगर समाज च्या सहिनिशी निवेदन सादर करण्यात आले यामुळे कोल्हाडी गावात वातावरण खूप नाजूक आहे त्यामुळे अश्या कायद्याचा गैर वापर करणाऱ्यांवर कारवाई होणे गरजेचे आहे नाही तर अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही

अभिनेता विजय राजला महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी गोंदियात अटक

0

 

गोंदिया-शैलेश राजनकर

रन चित्रपटातील कौवा बिरयानी फ़ेम अभिनेता विजय राज

गोंदिया ३ : मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र येथे शेरनी चित्रपटाचे चित्रिकरन सुरु असुन चित्रपटाच्या शूटिंग क्रूमधील महिलेची छेडछाड केल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला असून विजय राजला महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी गोंदियाच्या रामनगर पोलीस यांनी अटक केली आहे.
अभिनेत्री विद्या बालनची प्रमुख भूमिका असलेल्या शेरनी या चित्रपटाचे शूटिंग गोंदिया शहरापासून जवळ असलेल्या मध्य प्रदेशातील बालाघाट येथे सुरू आहे. यासाठी चित्रपटाचा क्रू गोंदियातील हॉटेल गेटवेमध्ये गेल्या १५ दिवसांपासून मुक्कामास आहे. यावेळी शूटिंग क्रूमधील ३० वर्षीय महिलेची विजय राजने छेडछाडकेल्याची तक्रार पोलिसात दाखल झाली होती.
शूटिंग क्रूमधील महिलेने दिलेल्या विनयभंगाच्या तक्रारीवरुन रामनगर पोलिसांनी कलम ३५४ (अ,ड) अन्वये गुन्हा दाखल करुन विजय राज याला अटक करण्यात आली आहे.

महावितरणने पंधरा दिवसात आदिवासी भागांमध्ये लाईन चालू करण्याचे स्वप्न दाखवून … कुंभकर्णा सारखे झोपले

0

 

आदिवासी भागांमध्ये राजकीय लोकांच्या ढवळाढवळी मुळे आदिवासी विद्युत लाईन पासून वंचित…

बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या आदिवासी गावांचे पुनर्वसन 2017 ला झाले.
सोनाळा ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या पिंगळी बु जवळ असलेल्या एक किलोमीटर अंतरावर रोहन खिडकी गाव बसले त्या ठिकाणी तीन वर्षे होऊन सुद्धा कुठल्याही उपाययोजना झाल्या नव्हत्या पण सोनाळा येथील महावितरण अधिकारी श्रीराम बोदळे यांच्या पाठपुराव्याने त्याठिकाणी विद्युत लाईन जी मंजुरात देण्यात आली. मंजुरात देऊन बोदडे यांनी आपल्या कार्य पंधरा दिवसात पूर्ण केले. काम पूर्ण होऊन दोन महिने झाले. पण पण वरिष्ठ महावितरणचे अधिकारी त्या ठिकाणी परवानगी देण्याकरता टाळाटाळ का करत आहेत. महावितरणचे यामध्ये काही काळा घोर तर नाही ना असा प्रश्न असल्याने त्या ठिकाणी लाईन सुरू होत नसल्याची चर्चा परिसरात जोर धरत आहे.
महावितरणला आदिवासी भागांत लाईन द्यायचं नव्हती तर रिकामा तमाशा आदिवासी बांधवांना का दाखवला. व त्यांना आठ दिवसात लाईन चालू करण्याचे स्वप्न का दाखवले असा प्रश्न आदिवासी बांधव करत आहेत.

(1)प्रतिक्रिया / सतीश कुमार वानखडे
संभाजी बिग्रेड जिल्हा उपाध्यक्ष बुलढाणा

आदिवासींना पंधरा दिवसात लाईन देण्याचे स्वप्न दाखवून राजकीय नेत्या सारखे भरोशावर बसवले…