Home Blog Page 587

विजबिल सवलतीसाठी सोमवारी भाजपाचे विजबिल होळी आंदोलन, नागरिकांनी सहभागी व्हावे – आ. डॉ. संजय कुटे यांचे आवाहन

0

 

गजानन सोनटक्के जळगाव जा

आमदार डॉ. संजय कुटे
जळगावजामोद
राज्यातील शिवसेना – काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारला विजबिलात सवलत देण्यास भाग पाडण्यासाठी सोमवार दि. २३ नोव्हेंबर रोजी भारतीय जनता पार्टीतर्फे राज्यव्यापी विजबिल होळी आंदोलन करण्यात येणार असून नागरिकांनी त्यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष आ. डॉ. संजय कुटे यांनी गुरुवारी केले.
यावेळी बोलताना डॉ कुटे म्हणाले की, लॉकडाऊनच्या काळात राज्यातील नागरिकांना भरमसाठ विजबिले आली. याबाबत सवलत देण्याचे महाविकास आघाडी सरकारने जाहीर केले होते. पण आता या सरकारच्या ऊर्जामत्र्यांनीच स्वतः विजबिलाबाबत दिलासा देता येणार नाही व नागरिकांना ती भरावी लागतील, असे स्पष्ट सांगितले आहे. दुसरीकडे महावितरण सक्तीने विजबिले वसूल करण्याच्या प्रयत्नात आहे. महाविकास आघाडी सरकारने जनतेचा विश्वासघात केला आहे. या सरकारला सत्तेच्या धुंदीतून जागे करण्यासाठी भाजपा विजबिलांच्या होळीचे आंदोलन राज्यात सर्वत्र करणार आहे.
ते म्हणाले की, लॉकडाऊनच्या काळात आर्थिक व्यवहार ठप्प होऊन नागरिकांना फार मोठा आर्थिक ताण सहन करावा लागला. अशा परिस्थितीत राज्यातील महाविकास आघाडी सरकारने इतर राज्यांप्रमाणे हातावर पोट असणारे श्रमिक, रस्त्यावरील व्यावसायिक, बारा बलुतेदार, शेतकरी, रिक्षाचालक, टॅक्सीचालक इत्यादींना स्वतःहून पॅकेज द्यायला हवे होते. या सरकारने अजूनही जनतेला पॅकेज दिलेले नाही. उलट वीज कंपन्यांच्या भोंगळ कारभारामुळे भरमसाठ विजबिले आली. त्याबाबत रास्त सवलत देण्यासही सरकार तयार नाही. त्यामुळे भाजपाने या प्रश्नावर जनहितासाठी रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे. ठिकठिकाणी भाजपाचे कार्यकर्ते सोमवारी विजबिलांची होळी करून सरकारचे लक्ष वेधतील. जनतेने या आंदोलनाला पाठिंबा द्यावा असे आवाहन आमदार डॉ. संजय कुटे यांनी केले

लोकजागर ओबीसी जनगणना सिल्लोड तालुका समन्वयक पदी प्रा.सागर जैवाळ यांची निवड.

0

 

सूर्या मराठी न्युज प्रतिनिधी.

आमची जनगणना आम्हीच करणार या ऐतिहासिक सत्याग्रहात सहभागी धुरा सांभाळणाऱ्या जिल्हा व तालुका समन्वयक यांची अधिकृत यादी लोकजागर चे अध्यक्ष ज्ञानेश वाकुडकर यांनी जाहीर केली
लोकजागर अभियान तर्फे संपूर्ण महाराष्ट्रात 18 ऑक्टोबर 2020 पासून  आमची जनगणना आम्हीच करणार या ओबीसी जनगणना सत्याग्रहाची सुरवात झालेली आहे.त्यानिमित्त गाव वार्ड समन्वयक ,तालुका समन्वयक आणि जिल्हा समन्वयक यांची नेमणूक सुरू आहे.
प्रा.सागर जैवाळ यांची सिल्लोड तालुका समन्वयक पदी निवड करण्यात आली.
केंद्र सरकार गेल्या नव्वद वर्षा पासून टाळाटाळ करीत असल्यामुळे
आमची जनगणना आम्हीच करणार ही भूमिका घेऊन लोकजागर चे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.ज्ञानेश वाकुडकर यांनी ओबीसी बांधवांनी मानसिक गुलामगिरी झुगारून जाती निहाय जनगणना सत्याग्रहात सहभागी व्हावे असे ते म्हणाले.

सासरच्या छळाला कंटाळून 22 वर्षीय नवतरुणीची दुहेरीहत्या की आत्महत्या

0

 

 

अकोला निंबा येथील सुबोध तायडे याच्या सोबत पूनम भारत वाकोडे रा भेंडवळ या मुलीचे लग्न निंबा तालुका बाळापूर येथील सुबोध सुरेश तायडे यांच्या सोबत 4 मे 2020 ला बौध्द पद्धतीने संपन्न झाले होते
पूनमचे लग्न होऊन 15 दिवसातच मुलाने मोबाईल वर पाहून आपल्या पत्नी सोबत वाईट कृत्य करीत होता व पत्नीला शारीरिक त्रास होत असल्याने ती विरोध करीत होती पण त्या नाराधमाला काहीच फरक पडत नव्हता ती त्या कृत्याला मान्य नाही झाली तर लातंबूक्यांनी मारझोड करीत होता या गोष्टीची कोणाकडे वाच्यफोडलीस तर जिवंत मारून टाकीन अश्या प्रकारच्या धमक्या देत होता पुनमची तब्येत या मुळे खूपच खराब झाली होती त्या करिता पूनम ला संग्रामपूर ला पुनमच्या मामा कडे आणून सोडले होते व पूनम सोबत होत असलेला प्रकार हा पूनमने आपल्या आई वळीलांना सांगितलं व म्हणत होती की मी आता जात नाही पण आई वळीलांनी पुनमची व पुनमच्या सासर मंडळींची भेट घेऊन सर्व प्रकार सांगितला पण त्या नराधम पतीला त्या सांगण्याचा काहीच फरक पडला नाही उलट तूला पूजा करण्याकरिता लग्न केले का तू का माझी बदनामी केली याचा राग मनामध्ये घेऊन 18/11/2020 ला सासर मंडळींनी पुनमची हत्या माझी मुलगी ही 6 महिन्याची गर्भवती होती केली असा आरोप पुनमच्या वळीलांनी सूर्या मराठी न्युज    सोबत बोलतांना केला आहे

प्रेम प्रकरणातुन तरुणीने केली आत्महत्या

0

 

(सूर्या मराठी न्युज)

आत्महत्याच प्रकरण वाढती वर असून औरंगाबाद येथे ही घटना घडली एका 22 वर्षीय तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. औरंगाबादमधील क्रांतीचौक परिसरात ही घटना घडली आहे. मयत तरुणीला तिच्या प्रियकराच्या आईने वाममार्गाला लावेन अशी धमकी दिल्यामुळे तीने आत्महत्या केल्याचा आरोप तरुणीच्या नातेवाईकांनी केला आहे.

नमिता इंगोले (वय 22, रा. क्रांतीचौक परिसर) असे आत्महत्या केलल्या तरुणीचे नाव आहे. या प्रकरणी विनोद खेत्रे, अनिता खेत्रे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या दोन वर्षापासून विनोद खेत्रे नावाच्या तरुणासोबत मयत तरुणीचे प्रेमप्रकरण सुरु होते.
याची कुणकुण विनोदच्या आईला लागल्यानंतर तीने शिवीगाळ करून तूला वाममार्गाला लावेन, अशी धमकी दिली होती. या प्रकरणी मयत तरुणीच्या नातेवाईकांनी दिलेल्या फिर्य़ादीवरून विनोद व त्याच्या आईवर तीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. उपनिरीक्षक गजानन सोनटक्के या प्रकारणाचे बारकीने तपास करत आहेत.

सख्ख्या 3 भावांचा विहिरीत बुडून मृत्यू

0

 

 

विहीर दुर्घटनेप्रकरणी वीज वितरण कंपनीचा दोष; नातेवाईकांचा आरोप

भोकरदन तालुक्यातील पळसखेडा पिंपळे येथे ते काल रात्री तीन सख्ख्या भावांचा विहिरीत बुडून मृत्यू झाला होता. याला कारणीभूत वीज वितरण कंपनी असल्याचा आरोप मृताच्या नातेवाईकांनी केला आहे.

जालना – भोकरदन तालुक्यातील पळसखेडा पिंपळे येथे ते काल रात्री तीन सख्ख्या भावांचा विहिरीत बुडून मृत्यू झाला होता. याला कारणीभूत वीज वितरण कंपनी असल्याचा आरोप मृताच्या नातेवाईकांनी केला आहे.

विहीर दुर्घटनेप्रकरणी वीज वितरण कंपनीचा दोष; नातेवाईकांचा आरोपज्ञानेश्वर (वय- 24) परमेश्वर(वय – 20) आणि सुनील(वय – 18) अशा तीन सख्ख्या भावांचा एकाच विहिरीत पडल्याने मृत्यू झाला. पहाटेपासूनच पळसखेडा पिंपळे या गावाकडे ग्रामस्थांनी धाव घेतली. या भावांचा मृत्यू विहिरीत पडून झाला असला, तरीही हा घातपात असल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे. तसेच या घातपाताला कारणीभूत वीज वितरण कंपनीच आहे, असा दावा नातेवाईकांनी केलाय. वीज वितरण कंपनी दिवसा वीज न देता रात्री पुरवठा करते. यामुळे शेतकऱ्यांना रात्री-बेरात्री शेतामध्ये फिरावे लागते. काल देखील अशाच प्रकारे या मुलांना विजेचा झटका लागून ते विहिरीत पडल्याची शंका मृतांचे नातेवाईक ज्ञानेश्वर जाधव यांनी केला आहे. रात्री ही दुर्घटना घडल्यानंतर आज सकाळी 11 वाजता पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. तसेच मृतदेह शवविच्छेदनासाठी प्राथमिक रुग्णालयाकडे पाठवले आहेत. ज्या विहिरीत या तिघांचा मृत्यू झाला, त्या ठिकाणाहून एक किलोमीटर अंतरावर जाधव परिवाराचे घर आहे.

दहा हजाराची लाच पोलिस कर्मचारी ला पडले महागात

0

 

येवला : सूर्या मराठी न्युज – या लाच प्रकरणात पोलिसांची यापूर्वीच निलंबनाची कारवाई करण्यात आलेल्या शहर पोलीस ठाण्यातील शिपायाने लाच मागितल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या पोलीस शिपायाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अतुल सुधाकर फलके असे या पोलीस शिपायाचे नाव आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, बाभूळगाव येथे झालेल्या दोन गटांतील वादाच्या घटनेत फलके यांनी तक्रारदार आणि त्याच्या वडिलांवर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या तक्रारींवर कायदेशीर कारवाई न करण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच मागिलती. यासंदर्भात तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे माहिती दिली. त्यावरून लाचलुचपत विभागाने २७ ऑक्टोबरला पडताळणी केली असता, लाच मागितल्याचे समोर आले.
त्याच पार्श्वभूमीवर बुधवारी (दि.१८) शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.

लागोपाठ करण्यात आलेल्या कारवाईमुळे पोलीस दलात खळबळ

तत्पूर्वी, दुसऱ्या एका चौकशीत फलके दोषी आढळून आले होते. चौकशीत समोर आलेल्या अहवालानुसार जिल्हा पोलीस प्रमुख सचिन पाटील यांनी फलके यांच्यावर गेल्या आठवड्यात निलंबनाची कारवाई केली होती. दरम्यान, लागोपाठ करण्यात आलेल्या या कारवायांमुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. या लाच प्रकरणी पोलिसांनी छव्वी वर प्रश्न चिन्ह निर्माण होतांना दिसत आहे

कुसुमतेल येथे झापास लागलेल्या आगीत वृद्धाचा होरपळून मृत्यू सुमारे दिड लाखाचे नुकसान

0

सचिन पगारे नांदगांव नाशिक

नांदगाव तालुक्यात कुसूमतेल येथे मंगळवारी दि.१७ नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास झापेस आग लागल्याने हरी रामा वाजे (वय ७२ वर्ष) या वृद्धाचा होरपळून मृत्यू झाला, या आगीमुळे सुमारे दिडलाखाचे नुकसान झाले. सदर घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.
नांदगाव तालुक्यातील कुसुमतेल येथील मयत हरी वाजे गट नंबर ९१ या शेतातील राहण्यासाठी बनविलेल्या झापेस मंगळवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास अचानक आग लागली असताना त्यांना वृध्दपकाळाच्या अशक्तपणामुळे खाटेवरुन उठता आले नसल्याने त्यांचा होरपळून मृत्यू झाला. तर त्यांच्या शेतातील साठवलेला ३० क्विंटल कापूस,१० बाजरीची पोते आणि संसारोपयोगी वस्तू असे एकूण १ लाख ५३ हजार रुपयांची नुकसान झाली असल्याचा येथील तलाठी भेंडाळे यांनी केलेल्या पंचनाम्यात नमूद करण्यात आले. सदर घटना घडली त्यावेळी मयत वाजे यांच्या पत्नी सकुबाई आणि मुलाची पंधरा वर्षाची मुलगी दिड किलोमीटर अंतरावर शेतात कापूस वेचनीसाठी गेलेल्या होत्या तर मुलगा भावडू आणि सुन इंदूबाई हे दोन मुलांना घेऊन दौंड सहकारी साखर कारखाना येथे उस तोडनीसाठी गेलेले होते.सदर आग लागलेल्या झापेने सोबतच शेजारी असलेल्या बाळू महादू मधे यांच्या झापालाही आगीचे भक्ष बनवले त्यात धान्याचे पूर्ण नुकसान झाले.
सदर अग्नितांडवाची माहिती समजताच येथील पोलीस पाटील अशोक पाटील,भय्यासाहेब धिवर, संजय गवांडे, अक्षय धिवर,गोकुळ चव्हाण यांच्यासह नागरिकांनी तात्काळ शेजारील शेतातील विहिरीवरुन पाईपलाईन करुन पाणी आणून आग विझवली .सदर दुर्घटनेची माहिती समजताच सहाय्यक पोलीस निरीक्षक डी.डी. सुरवडकर, पोलीस हवालदार रमेश पवार, पोलीस नाईक अनिल गांगुर्डे, वाय एस.भेंडाळे, ग्रामसेवक पुरानीक यांनी पंचनामा करुन नागरिकांच्या सहकार्याने वाजे यांचे शव उत्तरीय तपासणी करुन आणले त्यानंतर वाजे कुटुंबियांकडून मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.नांदगांव तालूका प्रहार शेतकरी संघटनेचे अध्यक्ष संदीप सूर्यवंशी यांनी वाजे कुटुंबियांचे सांत्वन करत त्यांना मदतीचे आश्‍वासन दिले आहे.

धानाच्या पूजण्याला आग 3 एकराचे पूंजणे जळून खाक

0

 

गोंदिया-शैलेश राजनकर

सडक अर्जुनी तालुक्यातील डुग्गीपार पोलीस ठाणेंतर्गत येत असलेल्या सौंदड येथील शेतकर्याचे शेतात असलेल्या धानाच्या पुंजण्याला अज्ञात व्यक्तीने आग लावून जाळल्याची घडना 17 नोव्हेंबरच्या रात्री 12 वाजेदरम्यान घडली. शेतकरी अशोक बनकर यांची शेती राका ते सौन्दड गावच्या मुख्य मार्गावर आहे.त्यातच बनकर यांनी धनाची कापणी करून गंजी तयार करुन ठेवली होती.दिवाळी झाल्यानंतर मशीन द्वारे मळणी करणार होते, मात्र अज्ञात इसमाने 17 नोव्हेंबरच्या रात्रीलाच धानाच्या गंजीला आग लावल्याने बनकर यांचे तब्बल 3 एकराचे पूजंणे जळून खाक झाले. यात अंदाजे शेतकर्यांचे 80 हजार रुपयांचे नुकसान झाले असुन शासनाने भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी बनकर यांनी केली आहे. 4 दिवसा अगोदर तिलक चांदेवार यांचे दिड एकराचे पूजंणे जाळण्यात आले तर अमृत पाखमोडे यांच्या सुद्धा धानाच्या पूजण्याला आग लावून पूजणे जळण्याचे प्रयत्न करण्यात आले होते.त्यांचे 2019 मध्ये सुद्धा तब्बल 5 एकर धानाचे पूजने जाळण्यात आले होते, एकंदरीत सौन्दड परिसरात हा पूंजणे जाळ्या आहे तरी कोण त्याचा शोध चालू आहे.

भारताच्या प्रथम महिला पंतप्रधान स्व.इंदिराजी गांधी यांच्या जयंती निमित्त

0

 

सुनिल,पवार, नादुरा

मलकापूर विधानसभा मतदार संघाचे आमदार श्री राजेश एकडे यांच्या जनसंपर्क कार्यालयात पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस श्री.निलेश पाऊलझगडे,जिल्हा पुनर्वसन समितीचे सदस्य श्री.पुरुषोत्तम झाल्टे,मलकापूर विधानसभा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष श्री.राजू हाडे पाटील,तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष श्री.ज्ञानेश्वर डांमरे,तालुका काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष श्री. आकाश वतपाळ,तालुका युवक काँग्रेसचे सरचिटणीस श्री.संदीप देशमुख,श्री.रामदास तायडे,श्री.पिंटू काळे प्रामुख्याने उपस्थित होते.

मोठी ब्रेकिंग न्यूज़ दंगल प्रकरणी नगराध्यक्ष अॅड.हरीश रावळांसह सहा जणांना अटक

0

 

सुनील पवार नांदुरा

नगराध्यक्ष हरीश रावळांसह इतर पंचवीस लोकांवर दंगलीचे गुन्हे दाखल प्रकरण,

बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर येथील एका व्यक्तीस , त्याने दारू पिऊन अश्लील शिवीगाळ करून घरात घुसण्याचा प्रयत्न केल्यामुळे त्यास नगराध्यक्ष अॅड.हरीश रावळ यांचेसह पंचवीस लोकांनी त्यास बेदम मारहाण केली होती व बेकायदेशिर मंडळी जमा करून पोलिसांचा आदेश धुडकाविल्या प्रकरणी मलकापूर शहर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला होता, शिवाजी नगर येथील किरण साळुंके हा दि . १७.११.२०२० रोजी रात्री ९ .०० वाजता दारूचे नशेत हरीश रावळ यांच्या घरी आला व अश्लील घाणेरडी शिवीगाळ करू लागला असता , त्यास समजाविण्याचा प्रयत्न केला तरी सुध्दा तो शिवीगाळ करून , धमक्या देवून घरात घुसण्याचा प्रयत्न करीत असल्यामुळे त्याला हरीश रावळ , प्रमोद उज्जैनकर , निरंजन लेले , संतोष उज्जैनकर यांचेसह पंचविस लोकांनी लाठया काठयांनी बेदम मारहाण केली त्यावेळी पोलिस उभे असताना पोलिसांचेही काही न ऐकता बेकायदेशिर मंडळी जमवुन हा प्रकार चालुच असल्याने , किरण साळुंके हे जखमी झाले व त्यांनी शहर पोलिस स्टेशन मध्ये रिपोर्ट दिल्यावरून पोलिस स्टेशन , मलकापूर शहर यांनी गुन्हा रजिनं . ६२ ९ / २०२० कलम ३२४ , ३२३ , १४३ , १४७ , १४ ९ , २६ ९ , २७० , १८८ , ५०४ , ५०६ भा.दं.वि तसेच कलम १३५ मु पो का . अन्वयज हरीश रावळ यांचेसह इतर पंचविस लोकांवर दंगल करून बेकायदेशिर मंडळी जमवुन मारहाण केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला होता, सदर गुन्ह्यांच्या आधारे नगराध्यक्ष हरीश रावळांसह सहा जणांना आज सकाळी 11 वाजता अटक करण्यात आली आहे, पुढील तपास शहर पोलीस निरीक्षक कैलास नागरे करीत आहे.