Home Blog Page 588

तिरोडा मतदारसंघातील सिंचन प्रकल्प मार्गी लावून हरितक्रांती आणण्याचे प्रयत्न- खासदार प्रफुल पटेल

0

 

गोंदिया-शैलेश राजनकर

तिरोडा,01- शेतकरी समृद्ध आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा आपला मानस आहे. यासाठी आपण प्रयत्नरत आहो. जिल्ह्यातील सिंचन सुविधेत वाढ करण्याच्या दृष्टीकोनातून प्रलंबित प्रकरणांची कामे लावण्यात येत आहे. यासाठी बावनथडी, सोंड्याटोला, धापेवाडा हे प्रकल्प पूर्ण करण्यात आले असून धापेवाड्याचे उर्वरित काम आणि गोंदिया तालुक्यातील अनेक उपसा सिंचनाचा मार्ग मोकळा करुन हरितक्रांती परिसरात दिसून येणार असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादीचे नेते खासदार प्रफुल पटेल यांनी केले. तिरोडा येथील कुंभारे लाॅन येथे आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी-कार्यकर्ता बैठकीत ते शनिवारी बोलत होते. खासदार पटेल म्हणाले, शेतकऱ्यांना गतवर्षी प्रमाणे यंदाही धानाला ७०० रुपये बोनस देण्यात येईल. धानाचे विक्रमी उत्पादन यावर्षी झाले. त्यामुळे अधिकची मदत अंदाजे १४०० कोटी रूपये बोनस शेतकऱ्यांना मिळणार आहे. शेतकऱ्यांना सिंचनाची सोय व्हावी, यासाठी जिल्ह्यातील महत्वपूर्ण प्रकल्पांचे काम पूर्णत्वास आली आहे. याचा लाभ शेतकऱ्यांना निश्चितच होणार आहे, असे खासदार प्रफुल पटेल यांनी सांगितले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी जोमाने कामाला लागल्याचे आवाहन त्यांनी केले. याप्रसंगी शासनातर्फे धानाला २५८८ रुपये बोनससह भाव मिळवून दिल्याबद्दल शेतकऱ्यांकडून खासदार प्रफुल पटेल यांचे आभार मानण्यात आले.सभेचे प्रास्तविक जिल्हाध्यक्ष पंचम बिसेन यांनी केले.सभेला माजी खासदार डाॅ. खुशालचंद्र बोपचे,माजी आमदार राजेंद्र जैन, महिला जिल्हाध्यक्ष राजलक्ष्मी तुरकर,माजी सभापती निता रहागंडाले,रायुकाँ नेता रविकांत बोपचे,माजी नगराध्यक्ष अजय गौर,तालुकाध्यक्ष प्रेम रहागंडाले आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.

धानाला तुडतुडा रोगाची लागण, शेतकऱ्यांनी उभ्या पिकाला लावली आग

0

 

गोंदिया-शैलेश राजनकर

गोंदिया – जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे धानपिकाचे मोठे नुकसान झाले आहे. जे काही थोडे फार धानपीक वाचले तेही तुडतुडा रोगाच्या विळख्यात सापडले आहे. त्यामुळे, जिल्ह्यातील शेतकरी धानपिकाला आग लावत आहे.गोंदिया तालुक्यातील लोहारा येथील शेतकर्याने शेतातील उभे पिक जाळले असून नुकसान भरपाईची मागणी केली आहे.याची माहिती मिळताच काँग्रेस नेते अशोक(गप्पू)गुप्ता यांनी सदर शेतकर्याच्या शेतात जाऊन पाहणी केली. पूर्व विदर्भात धानपिकाची सर्वात जास्त लागवड ही गोंदिया जिल्ह्यात केली जाते. या वर्षी कोरोनामुळे शेतकरी आधीच संकटात सापडला होता. त्यात परतीच्या पवासाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आणि आता मावा, तुडतुडा रोगामुळे थोडेफार हाथी येणारे पीकही नष्ट झाले आहे. पेरणी, रोवणी, खते, बियाणे याला एकरी २० हजार रुपये खर्च येतो. मात्र, पीक नष्ट झाल्याने हा खर्चही निघेल की नाही, याची शाश्वती नाही. तसेच, जनावरांसाठी लागणाऱ्या चाऱ्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे, विवंचनेत असलेला शेतकरी धानपिकांना आग लावत आहे. शासनाने लवकरात लवकर मदत द्यावी, अशी मागणी जिल्ह्यातील शेतकरी करत आहेत.

अंभोराजवळ अपघात,मोटारसायकलस्वार ठार

0

 

गोंदिया-शैलैश राजनकर

साखरीटोला : केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या बाबतीत केलेल्या जुलमी कायद्यांविरोधात देशभर असंतोषाचे वातावरण आहे. महाराष्ट्र प्रदेश किसान काँग्रेसने सर्वत्र गाव तिथे आंदोलन अभियानाला सुरुवात केली आहे. शनिवार दिनांक 31 ऑक्टोबरला गावागावात मशाल आंदोलन झाले. याचाच एक भाग म्हणून साखरीटोला येथे सायंकाळी 6 वाजता डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकापासून ते जगनाडे चौक मशाल रॅली आयोजित करण्यात आली.या रॅली मध्ये सुमारे ३१ मशाली पेटवून शेतकरीविरोधी कायद्यांचा निषेध करण्यात आले

या आंदोलनात काँग्रेसचे आमदार ना. सहसराम कोरॉटे गोंदिया जिल्हा कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष डॉ नामदेव किर्सान ,गोंदिया जिल्हा कॉंग्रेस किसान कमिटी चे अध्यक्ष जितेश राणे,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव अमर वराळे, जिल्हा कॉंग्रेस ओबीसी आघाडी चे अध्यक्ष जितेंद्र कटरे ,जिल्हा किसान काँग्रेस कमिटी चे उपाध्यक्ष राजीव ठाकरे, जिल्हा किसान काँग्रेस समन्वयक हल्मारेजी,जिल्हा सचिव राजू काळे,जिल्हा कॉंग्रेस महिला प्रतिनिधी वंदना ताई काळे,माजी जिल्हा परिषद सभापती लता ताई दोनोडे ,सालेकसा तालुका अनु जाती अध्यक्ष मिलिंद गजभिये, सरपंच संगीता ताई कुसरम, वरिष्ठ काँग्रेस नेते डॉ संजय देशमुख,डॉ,अजय उमाते, उमेश दोनोडे, शैलेस दोनोडे , तंटा मुक्ती अध्यक्ष संतोष देशमुख, माजी सरपंच,संतोष बोहरें,अशोक मेहर, कोरेजी,तालुका किसान काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष प्रशांत लील्हारे,आमगाव तालुका किसान काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष गणेश हुकरे, आमगाव तालुका काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष संजय बहेकर, सालेकसा तालुका किसान काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष मनोज गजभिये,सालेकसा तालुका किसान काँग्रेस कमिटी चे उपाध्यक्ष संजय बागडे,सालेकसा तालुका किसान काँग्रेस कमिटी चे महासचिव देवराज खोटले, व जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते, पदाधिकारी उपस्थित होते.

एक देश एक बाजारपेठ, करार शेती व जीवनावश्यक वस्तू सुधारणा कायद्यातील तरतुदी शेतकऱ्यांच्या भविष्यासाठी प्रचंड घातक ठरणार आहेत. त्यामुळेच या विरोधात देशभर प्रचंड असंतोषाचे वातावरण आहे. काही ठिकाणी शेतकऱ्यांनी विजयादशमीला रावणाच्या पुतळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांच्या सरकारमधील मंत्र्यांचे फोटो लावून त्याचे दहन करून आपला रोष व्यक्त केला. देशात प्रथमच शेतकऱ्यांमध्ये एवढी चीड दिसून येत आहे.
या प्रसंगी नरेंद्र मोदींचा चे शेतकरी विरोधी काळे कायदे यांची मुठ माती देण्यात आली आणि या ३ कायदा ना प्रखर विरोध करून या ५ दिवसाची आंदोलनाला सांगता. करण्यात आली.. या प्रसंगी या कार्यक्रमाचे संचालन किसान काँग्रेस कमिटी चे महासचिव देवराज खोटेलें, आणि आभार प्रदर्शन किसान काँग्रेस कमिटी चे आमगाव तालुका किसान काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष गणेश हुकारे यांनी केले..शेतकऱ्यांनी कोणत्याही भूलथापांना बळी न पडता या कायद्यांचा विरोध करावा व आंदोलनात सहभागी व्हावे. हे कायदे रद्द होई पर्यंत किसान काँग्रेसचा संघर्ष सुरूच राहील. शेतकऱ्यांनी आंदोलनाच्या माध्यमातून आपला आवाज बुलंद करावा असे आवाहन गोंदिया जिल्हा किसान काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष जितेश राणे यांनी केले आहे..

बी टी कापसावर बोंड अळी चा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव

0

 

गजानन सोनटक्के जळगाव जा

जळगाव जामोद तालुक्यातील बहुतांश गावात कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्याने ऐन दिवाळीच्या तोंडावर शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
सध्यास्थितीत हवामानात बदल झाल्याने कापूस पिकावर बोंडअळींचा प्रादुर्भाव झाल्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहे . सुरूवातीला अतीपावसामुळे कपाशी बोंडे काळे पडून कापसाचे नुकसान झाले , कापूस वेचणी केल्यानंतर वेचणीची मजुरी अन व्यापाऱ्यांनी पडक्या भावात कापूस खरेदी केल्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे . सध्यास्थितीत कापूस पिकावर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे शेतकऱ्यांवर दुहेरी संकट आले आहे .

 

सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसारखी कापूस उत्पादक शेतकरीची स्थिती आहे . कपाशीवरील निम्यापेक्षा जास्त बोंडावर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पन्नात घट होण्याची शक्यता नाकारता येत नाही . त्यात अतिवृष्ठी होऊनही महसूल व कृषिविभानेचा अहवाल निरंक पाठविल्याने राज्य शासनाने देऊ केलेली शासकीय मदत तोडकी का असेना परंतु , संग्रामपुर तालुक्यातील शेतकऱ्यांनावर शासकीय मदती पासून वंचित ठेवल्याची ओरड होत आहे . कपाशिवर बोंडअळीचा वाढता प्रादुर्भाव पाहता दोन तिन वेचणीतच उलंगवाडी करण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे . बोंडअळी आल्याने कापसाचे बोंडे खुलुन येत नाही , त्यामुळे महिला मजुर वेचणी करण्यास येत नाही . बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कृषि संचालकांच्या व स्वताच्या अनुभवानुसार रासायनिक फवारणी करुनही बोंड अळी कपाशीवर कायम असल्याने बहुताश शेतकऱ्यांनी कपाशीवर तणनाशक रासायनिक फवारणी केली . त्यामुळे बोंडे सडत असल्याने कापूस उत्पन्नात घट होण्याची शक्यता नाकारता येत नाही . बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कृषिविभागाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन , शासनाकडून ठोस उपाय योजना व मदतीसह पीकविमा मदत देऊन दिलासा देणे गरजे आहे .

प्रेमीयुगुलाची एकाच झाडाला गळफास लावून आत्महत्या

0

 

सूर्या मराठी न्यूज स्पैसल रिपोर्ट

संपादक  अनिलसिंग चौहान

धानोरा (जि. गडचिरोली):- धानोरा पासून एक किलोमीटर अंतरावर चव्हेला रोड लगत कम्पार्टमेंट ५२० मध्ये रात्री प्रेमीयुगुलाने एकाच झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. विद्या सदाशिव उसेंडी (वय २२, रा. पवनी) व राजेश लालसाय पोटावी (वय २८, रा. दराची) अशी मृतांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत दोघेही धानोरा तालुक्यातील रहिवासी आहेत. कप्मार्टमेंट ५२० मध्ये झाडाच्या एकाच फांदीला विद्याने ओढणीने तर राजेशने दुप्पट्याने गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली. या आत्महत्या प्रेम प्रकरणातून घडल्याचे बोलले जात आहे. दोघेही रात्रीपासून बेपत्ता होते. घरच्यांनी शोध घेतला असता शुक्रवारी (ता. ३०) सकाळी ही घटना उघडकीस आली. या प्रकरणाचा तपास धानोरा पोलिस करीत आहे.

काही दिवसांपूर्वी गडचिरोली जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या प्रेमीयुगुलाने चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेवरून वाहणाऱ्या वैनगंगा नदीत उडी घेतली होती. प्रदीप राजू गिरडकर (वय २०) असे युवकाचे तर कांचन अरविंद नागोसे (वय १७) असे युवतीचे नाव आहे. गडचिरोली येथील रामनगर परिसरातील प्रदीप गिरडकर हा युवक बारावीचे शिक्षण घेत होता. प्रदीपचे फॉरेस्ट कॉलनी येथील कांचन नागोसे या दहावीत शिकणाऱ्या मुलीसोबत प्रेमसंबंध होते. एकमेकांच्या हाताला रुमाल बांधून नदीत उडी घेतली होती.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आंदोलनाला यश 2 नोव्हेंबर पासून मका खरेदी करिता नोंदणी सुरु होणार.

0

 

 

सुनील पवार नांदुरा

शेतकऱ्यांची मक्याची नोंदणी खरेदी विक्री संघ कार्यालय नांदुरा येथे 2 नोव्हेंबर सोमवार सकाळी १० वाजता पासून सुरु होणार आहे. तरीही शेतकरी बांधवांनी मका पेरणीची नोंद खरीप २०२०-२०२१ असलेला सातबारा, बँक पासबुक ची प्रत, आधार कार्ड ,अर्जाच्या दोन प्रती सोबत आणून जोडाव्या. व नोंदणी करावी अशी माहिती खरेदी विक्री संघ प्रशासक यांनी दिली आहे. मका सोंगणी सुरू असतानाच मनसेने मका खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी शेतकऱ्यांच्या हिताकरिता निवेदन दिले होते. पण तरीही यावर काही कारवाई झाली नव्हती नंतर काही दिवसांनी मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मक्याचे कणीस तहसीलदार यांना भेट दिली होती. परंतु काहीही दखल न घेतल्यामुळे जिल्हा पातळीवर मनसेने जिल्हाधिकारी कार्यालयावर डोळ्याला पट्टी बांधून धृतराष्ट्र आंदोलन केले होते. याचा धसका घेत प्रशासनाने 2 नोव्हेंबर पासून मका खरेदी केंद्र सुरू करण्याचे आदेश जाहीर केले आहे .तालुक्यातील बरेच शेतकरी बंधूनी मनसेच्या पदाधिकारी यांचे आभार सुद्धा व्यक्त केले आहे. जर मका खरेदी केंद्रावर कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार झाला तर संबंधित मनसे पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. भ्रष्टाचार करणाऱ्यांची गाठ मनसेशी आहे.तरीही जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लवकरात लवकर मका खरेदी करिता नोंदणी करावी असे आवाहन मनसे तालुका अध्यक्ष भागवत उगले यांनी केले आहे.अशी माहिती तालुका प्रसिद्धी प्रमुख योगेश अरुण सपकाळ यांनी प्रसिद्धीच्या माध्यमातून दिली आहे.

लांजीसह मंगळवारी मिरवणुकीत निघालेले वाहन पलटी 24 जण जखमी झाले

0

 

गोंदिया-शैलेश राजनकर

बालाघाट, Oct१ ऑक्टुबर- जिल्ह्यातील लांजि तहसील अंतर्गत चाम्हारबोडी येथून परत येत असलेल्या पीकअप वाहन क्रमांक एमपी २२ ई 72 3772२ हा विवाह सोहळा मिरवणूक घेऊन रस्त्यावर अनियंत्रित झाला. या अपघातात 24 जण जखमी झाले आहेत. जखमींना 108 रूग्णवाहिकांच्या मदतीने सिव्हिल हॉस्पिटल लांजी येथे दाखल करण्यात आले आहे. ही घटना लांजी तहसील मुख्य रस्ता ते दुर्ग छत्तीसगढ राज्य रस्ता चाम्हारबोडी रस्ता आहे. शुक्रवारी लांजी पोलिस ठाण्यातील खराडी गावचा मालक उरेडिंग उईके याच्या 22 वर्षीय वडिलांची मंगळवारी मिरवणूक सिररी गावच्या विवाह कार्यक्रमात गेली होती. जिथे पिक-अप वाहनचालक लग्नाच्या मिरवणुकीसाठी खराडी आणत होते. दरम्यान, सायंकाळी साडेसात वाजता चामरबोडीजवळील गोलाई येथे वाहन पलटले. घटनेची माहिती मिळताच पोलिस स्टेशन प्रभारी लांजी अरुण सोलंकी, एसआय राकेश बघेल घटनास्थळी दाखल झाले आणि जखमींना तातडीने उपचारासाठी दाखल करण्यात आले.
जखमी रविंद्र टेकाम, सूरज लाल मसराम यांनी सांगितले की, पिकअप चालक अतिशय कमी वेगाने वाहन चालवत होता. तेवढ्यातच वाहन चाम्हारबोडीजवळ पोहोचले की रस्त्याच्या कडेला मोठा खड्डा पडल्याने राउंडिंग पलटी झाली, परिणामी वाहनात 24 जण जखमी झाले. घटनेनंतर चालक घटनास्थळावरून फरार असल्याचे सांगण्यात येत आहे. जखमींमध्ये राजेश टेकाम, धुलीचंद मसराम, सावित्री पांड्रे, प्रमिला वरकडे, सुशीला मार्साकोले, भोजराज नामूर्ते, चुन्नीलाल मडावी, बिरजलाल सराटे, संदीप उईके, नीलकंठ जांगडे, कन्हैयालाल वरकडे, अनिल नामूर्ते, मनीत उइके, इतर समाविष्ट आहे. लांजी पोलिस स्टेशनचे प्रभारी अरुण सोलंकी यांनी सांगितले की जखमींना फारसे दुखापत झालेली नाही. चालकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यास सुरुवात केली आहे

विजेंच्या कडकडाट सह अचानक पडलेल्या जोरदार पावसामुळे गावातील बत्ती झाली गुळ, ग्रामस्थांचे झाले अंधारात आर्थिक हाल.

0

 

 

मुंबई प्रतिनिधी (महेश कदम)

 

ता. महाड, जि: रायगड हिथे गेल्या रविवारी अचानक पडलेल्या जोरदार पावसामुळे, शेतात असलेल्या मुख्य विधुत वाहिनीवर वीज कडाडली व गावातील वीज खंडीत झाले, गावच्या इलेक्ट्रिक डी.पी. वर वीज कोसळून डीपी जळली होती. त्यामुळे रविवार, सोमवार, मंगळवार या ३ दिवशी गावात लाईट नव्हती. ह्यात कोणते ही जीवितहानी नाही झाली परंतु ग्रामस्थ आर्थिक परिस्थितीचा सामना करावा लागला.

लाईट नसल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा फार मोठा नुकसान झाला व मोबाईल सुद्धा चार्ज नसल्यामुळे गावात कोणाचा फोन ही लागत नव्हता. अशा वेळेस गावातील शहाजी मोरे, बळीराम कदम यांच्याशी संपर्क साधल्यानंतर, श्री. विलास म्हामुणकर ह्यांनी माननीय आमदार श्री. भरतशेठ गोगावले ह्यांना ह्या संदर्भात सुचना दिल्या, साहेबांच्या मार्गदर्शनाखालील, श्री. विलास म्हामुणकर ह्यांनी
वीज अधिकाऱ्यास फोन करून त्यांना सर्व परिस्थितीची माहिती देऊन लवकरात लवकर डीपी बदलण्याची विनंति केली.

त्यामुळे मंगळवारी रात्री ८:३० वाजता, डीपी चे काम करण्यासाठी, विधुत पुरवठा सुरळीत करण्यासाठी कर्मचारी प्रयत्न करत होते, काम पूर्ण होऊन गावात लाईट आली.
तातडीने पाठपुरावा करून हे काम पूर्ण करण्यात आले, ह्यात श्री. पवन कुमार (वायरमन), श्री. बोराटे साहेब (सहाय्यक अभियंता) बिरवाडी, श्री. खांडेकर साहेब (कार्यकारी अभियंता), तसेच वी. वी. शिंदे, ए.जी. गावीत, के. एम. कदम, एन. एच. काशीद, पी. ए. खाजुरे, एस. के. सोनावले सह अन्य विधुत कर्मचारी उपस्थित होते, श्री. विलास म्हामुणकर यांच्या पाठपुरावा मुळे सर्व ग्रामस्थांनी आभार मानले व तसेच श्री. शहाजी मोरे, श्री. बळीराम कदम, श्री. मिलिंद मोरे ह्या सर्वांचे ही आभार हनुमान सेवा ग्रामविकास मंडळ (खरकवाडी) ह्या ग्रामस्थांनी केले.

तसेच थ्री फेस संदर्भात आपल्या खरकवाडी गावातील लाईट ही
सिंगल फेस वर असल्यामुळे,
सप्ताह काळात तसेच सोमजाई देवी पालखीच्या काळात डीपी वर लोड येतो, त्यामुळे गावातील लाईट डीम होते आणि गावातील पाण्याचे पंप चालवितांना सुद्धा हवा तसा फोर्स मिळत नाही.

त्यासाठी श्री. विलास म्हामुणकर यांनी गावातील सरपंच श्री. द्वारकानाथ जाधव सर यांच्याशी चर्चा केली, या संदर्भात गावाच्या वतीने, श्री. बळीराम कदम हे पत्र लिहिणार आहेत, त्यांच्या सोबत आंब्याचामाळ गावातील,
श्री. सुभाष मोरे यांच्यासह, ग्रामस्थांशी चर्चा करून, सोबत सरपंचांकडून ही एक पत्र घेऊन, अलिबाग (गोरेगाव) येथील इलेक्ट्रिक अधिकाऱ्यांकडे विनंती अर्ज करण्यात येणार आहे. अशी संपूर्ण माहिती आम्हाला श्री. विलास म्हामुणकर सह समस्त ग्रामस्थ ह्यांनी दिली आहे.

सरदार वल्लभभाई पटेल जयंती साजरी व इंदिरा गांधी पुण्यतिथी साजरी

0

 

गजानन सोनटक्के जळगाव जा

आज शनिवार 31 ऑक्टोबर रोजी जळगांव जामोद शहर व तालुका काँग्रेस कमिटी तर्फे भारताचे माजी गृहमंत्री लोहपुरुष स्व. सरदार पटेल यांचे जयंती व भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान आयरण लेडी स्व.इंदिरा जी गांधी यांचे पुण्यतिथी निमित्त अभिवादनाचा कार्यक्रम पुष्पहार व नमन करून संपन्न झाला. यावेळी तालुका काँग्रेस अध्यक्ष अविनाश उमरकर,शहराध्यक्ष अर्जुन घोलप ,डॉ संदीप जी वाकेकर, नंदुभाऊ पाटील,नगर सेवक कलीम खा हुसेन खा,ग्रामपंचायत सदस्य अनंत ढगे जामोद,सोशल मीडिया प्रमुख संतोष गावंडे,युवक काँग्रेस शहर अध्यक्ष राजीकभाई, सुरेश वानखडे,कृष्णा दामधर,इमरानभाई, दिनेश काटकर,जुनेद शेख, हरीश भाईजी,राजू मुल्लाजी,समीर शेख,अदनान भाई,गजानन ठाकूर व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

जिल्हा उपनिबंधकाचा आदेशाने शेगाव बाजार समिती बरखास्त ! सहकार क्षेत्रात खळबळ

0

 

आयुषी दुबे शेगाव

शेगाव (सूर्या मराठी न्यूज) ः शेगाव बाजार समितीवरील संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले आहे. सभापती श्रीधर उन्हाळे यांच्यासह 11 संचालकांना जिल्हा उपनिबंधकांनी अपात्र घोषित केले आहे. या कारवाईने सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे. याबाबद सविस्तर वृत्त असे की जिल्हा बँक अवसायनात निघाल्यानंतर ती सुरळीत करण्यासाठी काही उपाययोजना करण्यात आल्या आहेत. यात कर्जवसुलीसाठी मोहीम आखणे, कर्मचारी कपात, स्वेच्छानिवृत्ती योजना, सेवासंस्थांचे एकत्रिकरण आदी उपाययोजना करण्यात आल्या. तालुक्यात 32 सेवा संस्था होत्या. त्या एकत्रित करून 7 वर आणल्या गेल्या. त्यामुळे अनेक सदस्य कमी झाले. परिणामी या सेवा संस्थांमधून निवडून आलेले अनेक प्रतिनिधी अपात्र ठरले. दोन दिवसांपूर्वीच्या आदेशातील तांत्रिक प्रक्रियेमुळे शेगाव बाजार समितीचे 11 संचालकही अपात्र ठरले असून, यात सभापती श्रीधर उन्हाळे, पांडुरंग पाटील, शेषराव पहुरकर, पुंडलिक भिवटे, रामरतन पुंडकर, सौ. पंचफुलाबाई जवंजाळ, सौ. नंदाबाई उमाळे, विठ्ठल भांबेरे, आत्माराम महाले, देवेंद्र हेलगे, सौ. अनुपमा मिरगे अशा 11 संचालकांचा समावेश आहे. या संचालकांना अपात्र ठरविण्यासाठी पांडुरंग शेजोळे व शेख नजीर शेख खालिक यांनी तक्रार केली होती. त्यावर जिल्हा उपनिबंधक आर. एल. राठोड यांनी कारवाई केली आहे. सदर कारवाई मुळे सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे.