Home Blog Page 59

शिक्षकांच्या संस्कारक्षम कार्यानेच विद्यार्थी उन्नत होतो:-आमदार डॉ मिलिंद नरोटे यांचे चामोर्शी येथील तालुकास्तरीय क्रीडा व कला संमेलनात प्रतिपादन.(Gadchirolinews)

0

 

Gadchirolinews:चामोर्शी:-पंचायत समिती मोर्शीच्या वतीने तालुकास्तरीय शालेय बाल क्रीडा व कला सांस्कृतिक संमेलनाचे आयोजन दिनांक 26 डिसेंबर ते 28 डिसेंबर या कालावधीत जयनगर विक्रमपूर यांच्या भव्य पटांगणावर आयोजित करण्यात आलेले आहे.

या कार्यक्रमाचे उद्घाटक गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय व धडाडीचे आमदार डॉ मिलिंद नरोटे हे होते तर अध्यक्षस्थानी पंचायत समिती चामोर्शीचे संवर्ग विकास अधिकारी सागर पाटील हे होते.

आमदार समिर कुणावार यांना मंत्रिमंडळात स्थान मिळावे यासाठी मैहरच्या देवीला साकडे(Samirkunavar)

विशेष अतिथी गावचे सरपंच प्रभाष सरकार,प्रमुख पाहुणे गटशिक्षणाधिकारी यशवंत टेंभुर्णे,गावचे उपसरपंच प्रतिमा सरकार, विक्रमपूर गावचे सरपंच विष्णू ढाली,केंद्र प्रमुख मानिक वरपडे,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुखदेव मंडल,जयनगर शाळेचे अध्यक्ष समिर विश्वास, शिक्षण विस्तार अधिकारी राजेश कोत्तावार, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष भांडेकर,तालुक्यातील सर्व केंद्रप्रमु, गट साधन केंद्र केंद्राचे गटसमन्वयक चांगदेव सोरते उपस्थित होते.

Gadchirolinews:क्रीडा संमेलनात तालुक्यातील चौदा केंद्रातील सहयोगी विद्यार्थी व शिक्षक-पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ओमप्रकाश साखरे व प्रदिप भुरसे यांनी केले तर आभार केंद्र प्रमुख मानिक वरपडे यांनी व्यक्त केले.

कर्मयोगी गाडगे महाराज पुण्यतिथी निमित्त महाआरोग्य शिबिर संम्पन्न(hingnghat)

0

 

प्रतिनिधी सचिन वाघे

hingnghat:हिंगणघाट :- कर्मयोगी गाडगे महाराज पुण्यतिथीनिमित्त विकी वाघमारे व मित्रपरिवार यांच्या वतीने दी. 24 /12/2024 मंगळवारी शिव मंदिर यशवंत नगर हिंगणघाट येथे निशुल्क महाआरोग्य शिबिर घेण्यात आले.

या शिबिरामध्ये ४९९ तपासण्या करण्यात आल्या या मध्ये मशीनद्वारे ईसीजी तपासणी,जनरल सर्जरी विभाग,हृदयरोग तपासणी,अस्थिरोग तपासणी, नेत्ररोग तपासणी, बीपी तपासणी,शुगर तपासणी, दंत तपासणी, श्रयरोग तपासणी, वातरोग तपासणी,रक्त तपासणी,टीबी तपासणी,एमडी मेडिसिन,जनरल फिजिशियन,जॉईंट रिप्लेसमेंट तपासणी व विविध तपासणी करण्यात आल्या व प्रधानमंत्री आयुष्यमान कार्ड काढण्यात आले.

आमदार समिर कुणावार यांना मंत्रिमंडळात स्थान मिळावे यासाठी मैहरच्या देवीला साकडे(Samirkunavar)

सामान्य नागरिकांना निशुल्क उपचार मिळाले यासाठी विकी वाघमारे व मित्रपरिवार तर्फे दरवर्षी महाआरोग्य शिबीर शहरात राबविण्यात येते.

हिंगणघाट येथील सार्वजनिक आरोग्य विभाग,उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट व मेडिट्रीना इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स यांच्या या विशेष प्रयत्नाने हे महाआरोग्य शिबिर यशस्वी झाले या शिबिराचे उद्घघाटक म्हणून हिंगणघाट येथील सुप्रसिद्ध डॉ.निर्मेश सुधीर कोठारी,तर प्रमुख अतिथी म्हणून
डॉ.विशाल भास्कर कलोडे,डॉ. सोनाली वाघमारे,डॉ. स्नेहल चौधरी,डॉ.अजय गिंदेवार,डॉ. अतुल वाघमारे,डॉ.गिरीश वरभे,डॉ.मनीषा भाईमारे,डॉ. श्रद्धा वाघमारे,डॉ.प्रियंका शेडांबे,डॉ.सोनल जुगणारी होते,पारडीचे सरपंच अलका दिनकरराव पवार व माजी नगरसेवक मनीष देवडे उपस्थित होते.

शिबिराचे उद्घघाटन कर्मयोगी गाडगेबाबा महाराज,छत्रपती शिवाजी महाराज,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्याअर्पण करीत महाआरोग्य शिबिराला सुरुवात करण्यात आले.

महाआरोग्य शिबिरामध्ये डॉक्टरांचा महाआरोग्य शिबिरामध्ये निशुल्क तपासणीचा लाभ घेणाऱ्यांच्या तपासणी केल्या.
महाआरोग्य शिबिरात विविध क्षेत्रातील सामाजिक,राजकीय,व पत्रकार बंधूंनी महाआरोग्य शिबिरात व मोठ्या प्रमाणात नागरिकांनि आपली उपस्थिती देत आयोजक विकी वाघमारे व मित्र परिवारांचे शिबिराबद्दल अभिनंदन केले.

hingnghat:यावेळी रितिक मोघे,प्रज्वल धाडसे,सुरज गावंडे,अभय दारोंडे,प्रतिक शंभरकर,किट्टू नाईक,सुबोध गायमुखे,कोमल वावरे, टिंकू ढेपे, अभिजित गावंडे,प्रतीक धाडसे,मंथन इंदूरकर, अनिकेत तेंबूरणे,शुभम सोरदे,कुणाल कळसकर,हिमांशू गावंडे,उद्देश कांबळे,नितीन इंदूरकर,अनिकेत अष्टेकर,प्रेम जवादे,पराग चंदनखेडे, उद्देश कांबळे उपस्तित होते.

4थ्या राज्यस्तरीयपॅरा ऍथिलिटिक्स स्पर्धात बुलढाणा जिल्यह्याची अभिमानास्पद कामगिरी(Shegaonnews)

0

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी शेगाव

बुलढाणा (काप्र)महाराष्ट्र राज्याची चौथी राज्यस्तरीय पॅरा ऍथलेटिक्स स्पर्धा कोल्हापूर येथे दिनांक 21 व 22 डिसेंबर 2024 रोजी पार पडल्या येथे संपुर्ण राज्यातून दिव्यांग खेळाडू या सपर्धेसाठी उपस्थित होते.

लोणार ग्रामीण रूग्णालयातील घटनेच्या चौकशीसाठी लवकरच समिती नेमून खऱ्या दोषींवर कडक कार्यवाही करणार : केंद्रीय आयुष्य व आरोग्य मंत्री नामदार प्रतापराव जाधव (Pratapraojadhav)

या मध्ये बुलढाणा जिल्ह्या च्या महाराष्ट्र शासनाच्या शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त २०२३ वर्ष च्या आंतरराष्ट्रीय खेळाडू अनुराधा सोळंकी यांच्या मार्गदर्शनाखाली 7 खेळाडू यांनी सहभाग घेतला त्यात बुलढाणा जिल्ह्याने भरघोस कामगिरी केली यात शुभम अवचार यांनी 2 सुवर्णपदक व 1 रोप्य पदक मिळवले , वैभव संबारे यांनी 2 रोप्य पदक , अलका चव्हाण यांनी 1 रोप्य व 2 कास्य पदक,किरण साळवे यांनी 2 कास्यपदक प्राप्त केले तसेच गणेश जाधव यांनी 1 कांस्य पदक मिळवले.

Shegaonnews :तर कृष्णा परिहार यांनी 2 कांस्यपदक मिळवले असे एकूण तेरा पदकांची कामगिरी बुलढाणा जिल्ह्याने 4 थ्या राज्यस्तरीय स्पर्धेत दिव्यांग खेळाडूंनी करून दाखविली आहे ही बाब बुलढाणा जिल्ह्यासाठी अभिमानास्पद आहे.

4थ्या राज्यस्तरीयपॅरा ऍथिलिटिक्स स्पर्धात बुलढाणा जिल्यह्याची अभिमानास्पद कामगिरी(Shegaonnews)

खेळाडूंची स्वागत पॅरा ऑलम्पिक असोसिएशन बुलढाणा तर्फे श्री गणेश जाधव सर व शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त अनुराधा सोळंकी यांनी केले.अशीच कामगिरी पुढील काळातही हे खेळाडू करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला यातूनच लवकरच खेळाडूची राष्ट्रीय पातळीवर निवड करण्यात येणार आहे

लोणार ग्रामीण रूग्णालयातील घटनेच्या चौकशीसाठी लवकरच समिती नेमून खऱ्या दोषींवर कडक कार्यवाही करणार : केंद्रीय आयुष्य व आरोग्य मंत्री नामदार प्रतापराव जाधव (Pratapraojadhav)

0

 

प्रतिनिधि सय्यद जहीर

Pratapraojadhav:केंद्रीय आयुष्य व आरोग्य मंत्रालयातून तात्काळ घेण्यात आली घटनेची दखल

दिनांक २३ डिसेंबर च्या सकाळी ३.३० वाजेदरम्यान लोणार ग्रामीण रुग्णालयाच्या वॉर्ड मध्ये कर्तव्यावर असलेल्या सुरक्षा रक्षक यांना धूर दिसून आला असता त्यांनी लगेच वॉर्ड बॉय यांना या बाबत माहिती दिली.

आमदार समिर कुणावार यांना मंत्रिमंडळात स्थान मिळावे यासाठी मैहरच्या देवीला साकडे(Samirkunavar)

वॉर्ड बॉय बळीराम खरात ह्यांनी वॉर्डात जाऊन पहिले असता त्यांना आग लागल्याचे व खूप धूर असल्याचे दिसून आले.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी तातडीने लगेच फायर सिलेंडर घेऊन आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयन्त केले. आग विझवण्याचा प्रयत्न करतांना त्यांनी ६ सिलेंडर वापरले.

परंतु आग आटोक्यात येईपर्यंत वॉर्डात ऍडमिट असलेले पैठण येथील हरिभाऊ बापूजी लोकडे अंदाजे वय ६५ वर्ष यांचा जळून मृत्यू झाला होता. या आगीचे कारण अद्यापही समजले नाही.

Pratapraojadhav:या घटनेची माहिती केंद्रीय आयुष्य व आरोग्य मंत्री नामदार प्रतापराव जाधव यांना मिळताच त्यांनी याबाबत गंभीर दखल घेतली आहे. या सर्व प्रकरणाच्या चौकशी साठी एक समिती नेमण्यात येणार आहे. जे कोणी या घटनेसाठी जबाबदार असतील अश्या दोषींवर कडक कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय मंत्री नामदार प्रतापराव जाधव यांचे स्वीय सहाय्यक राजु भोर यांनी बोलतांना दिली.

महाराष्ट्राचे कामगार मंत्री नामदार अॅड. आकाश दादा फुंडकर यांनी घेतले श्रींच्या समाधीचे आई व पत्नीसह घेतले दर्शन(shegaonnews)

0

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी शेगाव

shegaonnews:शेगाव, दि. २२ डिसेंबर : महाराष्ट्राचे कामगार मंत्री अॅडव्होकेट आकाश दादा फुंडकर यांनी मंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतर प्रथमच संत नगरी शेगावला भेट दिली.

आमदार समिर कुणावार यांना मंत्रिमंडळात स्थान मिळावे यासाठी मैहरच्या देवीला साकडे(Samirkunavar)

या निमित्ताने त्यांनी त्यांच्या मातोश्री आणि पत्नी यांच्यासह श्री संत गजानन महाराजांच्या पवित्र मंदिरात जाऊन दर्शन घेतले. त्यांच्या या आगमनामुळे संत नगरीत भक्तांमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

नामदार आकाश दादा फुंडकर मंदिरात पोहोचल्यावर श्री संत गजानन महाराज संस्थानच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. संस्थानचे विश्वस्त आणि अधिकाऱ्यांनी मंत्रिमहोदयांचा सत्कार केला.

shegaonnews:त्यांनी मंदिराच्या पवित्र वातावरणात सपरिवार श्रींना वंदन केले आणि राज्यातील जनतेच्या सुख-समृद्धीच्या प्रार्थना केल्या.

भाजपा नेते देवानंद सानप यांचा त्यांच्या चाहत्यांकडून गरजवंत महिलांना किराणा किट व साडी चोळी वाटुन वाढदिवस साजरा( Lonar)

0

 

प्रतिनिधि सय्यद जहीर

 

वाढदिवसाच्या निमित्त हृदय सत्कार व वाढदिवस साजरा

Lonar:पत्रकार,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष देवानंद सानप यांचा आज दि २२ डिसेंबर रोजी ठिक ठिकाणी वाढदिवस साजरा करण्यात आला. सामाजिक संघटनेच्या व पत्रकार संघटनेच्या वतीने सिंदखेडराजा मतदार संघात दुसरबीड तढेगाव बीबी भुमराळा किनगाव जट्ट चिखला देऊळगाव कोळ झोटींगा खंडाळा लोणार मांडवा विरपांगरा सह इतर ठिकाणी त्यांच्या चाहत्यांनी व मित्र मंडळींनी त्याचा शाल श्रीफळ देवून हृद्य सत्कार करण्यात आला तद् नंतर बिबी येथील गरजवंत महिलांना वाढदिवसानिमित्त किराणा किट व साडी चोळी चे वाटप देवानंद सानप यांच्या चाहत्यांकडून वाटप करण्यात आले.

वयाच्या १५ वर्षापासून सामाजिक कार्यातून राजकारणात आले आणि राजकारणात आल्यानंतर सर्वसामान्यांय विषयी असलेली तळमळ या कार्यातून लोकप्रियता वाढत गेली आणि अंदोलनाच्या माध्यमातून जिल्हाभर कार्यकर्ते व मित्र परिवार वाढतच गेला यातून शेतकरी कष्टकरी मजूर अनाथ अपंगांच्या समस्या निवारण्याचे काम करून शासन दरबारी न्याय मिळवून दिला आजही ते कार्य चालू असून भविष्यात गोरगरिबांवरील अन्याय अत्याचाराच्या लढून त्यांना न्याय मिळवून देण्याचे कार्य चालूच ठेवणार असे देवानंद सानप यांनी सांगितले.

लोणारमधून विकल्या जात होती कामवासना वाढवणारी औषधी; बिनधास्त विकायचा गर्भपाताची औषधे ; अन्न व औषध प्रशासनाच्या धाडीत २५ लाखांचा माल जप्त…(brekingnews)

यावेळी पत्रकार भगवान नागरे काशिनाथ राऊत,दिनकर काकड, अशोक मुंडे,मधुकर मोहीते, रमेश खंडागळे ,भागवत आटोळे, रामप्रसाद जाधव ,रोशन चव्हाण, ऋषी दंदाले , कृष्णा पंधे,जहीर भाई,भाजपा युवा ता अध्यक्ष राम डुकरे, ता.सचिव प्रविण धाईत, व्यापारी आघाडी जि. उपाध्यक्ष गोपाल काबरा, वंचित ता. अध्यक्ष दिलीप राठोड,धनंजय कायंदे,सागर मुर्तडकर ,रंजीत सानप , आशिष अग्रवाल ,भागवत मुळे, विशाल मुर्तडकर ,

ऋषिकेश धाईत, मंगेश बोबडे , बाबू सिंग जोरावर सरपंच गणेश काकड ,शाम इंदोरिया, सुनिल मुंढे, गजानन मुर्तडकर , अमोल गावडे , राहुल वानखेडे, कैलास तांदुळे, प्रसाद कुलकर्णी, रामेश्वर काळुसे, विलास दराडे, गणेश डुकरे, गजानन गायकवाड,
असंख्य चाहते व मित्र मंडळी हजर होती.
———————————–
Lonar :आमदार मनोज कायंदे, प्रदेश प्रवक्ते विनोद वाघ, माजी आमदार तोताराम कायदे,भाजपा नेते प्रभाकर ताठे,सह अनेक पक्षातील नेत्यांनी व सामाजिक संघनटनेतील कार्यकर्त्यांनी सानप यांना शुभेच्छा दिल्या

लोणारमधून विकल्या जात होती कामवासना वाढवणारी औषधी; बिनधास्त विकायचा गर्भपाताची औषधे ; अन्न व औषध प्रशासनाच्या धाडीत २५ लाखांचा माल जप्त…(brekingnews)

0

 

अनेक वर्षा पासुन विकण्याचा अंदाज

 

प्रतिनिधि सैय्यद जहीर

brekingnews:राज्यातील शासकीय रुग्णालयाना झालेल्या औषध पुरवठा वरून खळबळ उडाली असतानाच बुलढाणा जिल्ह्यात अवैध औषधांचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. यामुळे आरोग्य आणि अन्न औषध विभाग सतर्क झाले आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील लोणार हे गाव जगप्रसिध्द लोणार या खाऱ्या पाण्याच्या सरोवर मुळे प्रसिद्ध आहे.मात्र याच जगप्रसिद्ध सरोवर नगरीत अवैध औषधाचा मोठा साठा आढळून आला आहे.

आमदार समिर कुणावार यांना मंत्रिमंडळात स्थान मिळावे यासाठी मैहरच्या देवीला साकडे(Samirkunavar)

या कारवाई बाबत काटेकोर गुप्तता बाळगण्यात आली. त्यामुळे कारवाईचा विस्तृत तपशील कळू शकला नाही.प्राप्त प्राथमिक माहितीनुसार सुमारे पंचवीस लाख रुपयांचा हा औषधी साठा जप्त करण्यात आला आहे. राज्य साशनाच्या अखत्यारीतील अन्न व औषध प्रशासन विभागाचे वतीने ही कारवाई करण्यात आली आहे. बुलढाणा जिल्हा आणि वाशीम जिल्ह्यातील अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तरित्या ही धडाकेबाज कारवाई केली आहे.

सहायक आयुक्त अन्न व औषध प्रशासन कार्यालयातील औषध निरीक्षक गजानन प्रल्हाद घिरके यांना लोणार येथे अवैधपणे औषध साठवणूक केल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाली होती. त्या आधारे त्यांनी वाशीम जिल्ह्यातील अन्न औषध प्रशासन विभागाचे औषध निरीक्षक एम.व्ही. गोतमारे यांच्या समवेत लोणार येथील चंदन मेडीकोजचे मागे रुम क्रमांक १, बस स्थानक जवळ, लोणार येथे छापा घालून चौकशी केली.

यावेळी करण्यात आलेल्या तपासणी व कारवाईत सदर जागेत विनापरवाना औषधी साठवणूक केल्याचे आढळून आले. मेडिकल वर उपस्थित व्यक्ती सुशिल पुनमचंद दरोगा यांच्या कडून नमूना सोळा व पंचनामा अंतर्गत एकूण चोवीस लाख तेहतीस हजार रुपयांचा साठा जप्त करण्यात आला आहे. सदर साठयातून औषध नमूना विश्लेषणासाठी घेण्यात आला आहे. पुढील तपास सुरु आहे.

चंदन मेडीकल स्टोअर्स, लोणार येथे तपासणीस्तव भेट दिली असता त्यांच्याकडे कामोत्तेजक औषधी (Vigrox-100) आढळून आला. या उत्तेजक औषधींचा साठा नमूना 15 प्रतिबंधीत करण्यात आला आहे.

brekingnews:झोपेच्या गोळया, गर्भपाताची औषधे तसेच नशा येणारी औषधे व सर्व ॲलोपॅथीक औषधे त्यांनी कोणत्याही परीस्थितीत डॉक्टरांच्या चिठ्ठी शिवाय ग्राहकांना देवू नयेत, तसेच प्रत्येक औषधाचे औषध विक्री बिल ग्राहकांना देण्यात यावे अशा प्रकारचे उल्लघंन केल्याचे आढळून आल्यास औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा 1940 व त्या अंतर्गत नियमांतर्गत कठोर कारवाई करण्यात येनार आहे. जिल्हयातील सर्व मेडीकलधारकांना सहायक आयुक्त (औषधे) गजानन प्रल्हाद घिरके, अन्न व औषध प्रशासन, बुलढाणा यांनी हा इशारा दिला आहे.

समृध्दी महामार्गावर डिझेल चोरी करनारे टोळीला बिबी पोलीसांनी ठोकल्या बेडया. -04 आरोपींसह स्कॉर्पीओ, स्विप्ट डिझायर कार जप्त.(Brekingnews)

0

 

Brekingnews:दिनांक 13/11/2024 रोजी फिर्यादी नामेकिरणकुमार लिंगया कनुकुंटला वय ३८ वर्ष रा.कल्यानी टावर जवळ चद्रपुर ता.जि.चद्रपुर यांनी पो स्टे बिबी येथे रिपोर्ट दिला समृध्दी महामार्गाने मुंबई ते नागपुर रोडने ट्रक घेवुन नागपुर कडे जात असतांना दुसरबिड टोलनाका जवळ रस्त्यावर वाहन थांबवुन आराम करत असतांना दिनांक १३/११/२०२४ रोजी रात्रीचे ०३/०० वा चे सुमारास ट्रकच्या डिझेल टाकीतील अंदाजे ८० लिटर डिझेल कि. ७०००/- रुपयेचे चोरुन नेले व ट्रकचे काचाला दगड मारुन समोरील काच फोडुन अंदाजे ५०००/- रुपयाचे नुकसान केले होते.

पो स्टे बिबी अप नं.२४४/२०२४ कलम ३०३(२), ३२४ (४) भारतीय न्याय संहीता प्रमाणे दाखल करुन तपासात घेतला. सदर गुन्हयाचे तपासत गोपनिय बातमीदारांकडुन मिळालेल्या खबर प्रमाणे तसेच तांत्रीक सांधनांचा वापर करुन कसोशीने तपास करुन आरोपी निष्पन्न करुन दिनांक 20/12/2024 रोत्री पो स्टे बिबी चे ठाणेदार सपोनि संदिप पाटील सह सफौ परमेश्वर शिंदे, नापाकॉ अरुण सानप, पोकॉ रविंद्र बोरे यांनी पो स्टे चिखली हददीत गजानन नगर चौफुलीवर गोपनिय बातमीच्या आधारे छापा टाकुन आरोपी नामे १. लक्ष्मण ऊर्फ संतोष गुलाबराव लहाणे वय २७ वर्ष, रा.खंडाळा मकरध्वज ता. चिखली २. निलेश संतोष भारुडकर वय ३२ वर्ष, रा. सातगाव भुसारी ता.चिखली ३. देविदास प्रकाश दसरे वय २८ वर्ष, रा. साखरखेर्डा ता. सिंदखेड राजा यांना पकडले त्यांचे कब्जातुन 1. स्कॉर्पीओ वाहन क्रमांक एम एच 28 व्हि 8409 किंमती 350000/रुपये 2. एक स्विप्ट डिझायर कार क्रमांक एम एच 12 एच झेड 5575 किंमती अंदाजे 3,00,000/रुपयेचे वाहन तसेच त्यातील 35 लिटर क्षमतेच्या रिकाम्या 4 कॅन असे साहीत्य जप्त करण्यात आले तसेच नमुद आरोपीतांनी गुन्हयातील डिझेल सचिन परसराम घुबे रा देऊळगाव घुबे याला विक्री केले आहे.

आमदार समिर कुणावार यांना मंत्रिमंडळात स्थान मिळावे यासाठी मैहरच्या देवीला साकडे(Samirkunavar)

वरुन त्याला ताब्यात घेवुन विचारपसु केली असता त्याने डिझेल विकत घेतल्याची कबुली दिल्याने नमुद आरोपी नामे १. लक्ष्मण ऊर्फ संतोष गुलाबराव लहाणे वय २७ वर्ष, रा. खंडाळा मकरध्वज ता.चिखली २. निलेश संतोष भारुडकर वय ३२ वर्ष, रा. सातगाव भुसारी ता.चिखली ३. देविदास प्रकाश दसरे वय २८ वर्ष, रा. साखरखेर्डा ता. सिंदखेड राजा 4. सचिन परसराम घुबे वय 27 वर्ष रा देऊळगाव घुबे ता चिखली यांना दिनांक 21/12/2024 रोजी अटक करुन न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयाने दि 23/12/2024 पावेतो पोलीस कोठडी सुनावली असुन पुढील तपास ठाणेदार संदिप पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोहेकॉ मोहीते, जैवळ हे करीत आहे.

पो.स्टे बिबी कडील स्टाफ नमुद सदर कारवाई करुन येत असतांना एक संशयीत स्कॉर्पीओ वाहन दिसुन आल्याने सदर वाहन थांबविले असता त्यातील इसम पळुन गेले वाहनाची तपासणी केली असता त्यात डिझेल चोरीकरीता 18 प्लास्टीक खाली कॅन ठेवल्याचे दिसुन आले त्यावरुन सदर संशयीत वाहन आणण्यात देखील डिटेन करण्यात आले आहे.

पो. स्टे बिबी कडील पोलीस पथकाने समृध्दी महामार्गावर घडलेल्या डिझेल चोरीच्या गुन्हयाचा छडा लावुन आरोपी व वाहने असा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

 

Brekingnews :सदर कामगीरी मा. पोलीस अधिक्षक बुलढाणा श्री. विश्व पानसरे साहेब, मा. अपर पोलीस अधिक्षक बुलढाणा श्री. बि. बी. महामुणी साहेब, अपर पोलीस अधिक्षक खामगाव श्री अशोक थोरात साहेब, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी मेहकर श्री प्रदिप पाटील, पोनि स्थागुशा श्री अशोक लांडे साहेबयांचे मार्गदर्शनात पोलीस स्टेशन बिबी चे ठाणेदार सपोनि संदिप पाटील, सफौ परमेश्वर शिंदे, नापोकॉ अरुण सानप, पोकॉ रविंद्र बोरे, यांनी केली.

हिंगणघाट नंदोरी रस्त्या बांधकामाचे नियोजन नसल्याने अशोक बोरकर यांच्या अपघाताने मृत्यू, कंत्राटदारावर गुन्हा दाखल करा अन्यथा आंदोलन ..(Hingnghat)

0

 

प्रतिनिधी सचिन वाघे

हिंगणघाट:-राष्ट्रीय महामार्ग ३२२ हिंगणघाट – नंदोरी रोडवरिल भाकऱ्या नाल्यालगत अशोक बोरकर यांच्या अपघात होऊन जागीच मृत्यू झाला.या रस्त्याच्या कंत्राटदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले व मुलगा विनोद बोरकर यांनी केली आहे.

राष्ट्रीय महामार्ग ३२२ हिंगणघाट- नंदोरी रोड व्यवस्थित नसल्यामुळे अशोक बोरकर यांचा अपघात झाला व यांच्या जागीच मृत्यू झाला. राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले व त्यांच्या मुलांनी पोलीस स्टेशन हिंगणघाट येथे तक्रार केली असून या रोड च्या कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी केली आहे. कंत्राटदाराचे नियोजन बरोबर नसल्यामुळे अशोक बोरकर यांच्या मृत्यू झाला. या आधीपन असे अनेक अपघात याच ठिकाणी झाले आहे. व त्यात त्यांच्या मृत्यू देखील झाला आहे.

आमदार समिर कुणावार यांना मंत्रिमंडळात स्थान मिळावे यासाठी मैहरच्या देवीला साकडे(Samirkunavar)

हिंगणघाट नंदोरी रोडचे काम निकृष्ठ दर्जाचे असून त्या कामाचे नियोजन सुद्धा बरोबर नाही. या भागातील जनतेला या रस्त्यांचा मोठ्या प्रमाणात त्रास होत असून नागरिक संतापले आहे.

Hingnghat :राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी पुढाकार घेऊन हिंगणघाट पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली. जर जनतेला त्रास होत आहे. व कामाचे नियोजन नाही आहे.म्हणून या रस्त्यांच्या कंत्राटदारावर गुन्हा दाखल करा अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येईल अशा ईशारा प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी दिला आहे.

भाजप अल्पसंख्याक तालुकाध्यक्षा कडुन दि.24.1.2025 पासुन आमरण उपोषन(Lonarnews)

0

 

प्रतिनिधि सैय्यद जहीर

Lonarnews:लोणार तालुक्यातील भाजप अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष शेख जावेद शेख यासीन यांचे दि.24.1.2025 पासुन सामुहिक आमरण उपोषणाचे निवेदन कार्यकारी अभियंता प्रधानमंत्री ग्राम सड़क योजना महाराष्ट्र ग्रामीण यांना दिले

नीवेदनात मुख्यमंत्री ग्राम सड़क योजनेतील एम.डी.आर 44 ते पहुर रस्त्याच्या निष्कृष्ट कामाबाबत तक्रार अर्ज सादर करण्यात आले.एम.डी.आर 44 ते पहुर रस्त्याच्या कामाबाबत बर्याच वेळेस तक्रारी करूनही रोडचे काम जैसेच तसे आहे.कार्यालया कडुन में नळगे इन्फ्रा प्रोजेक्ट प्राली परतुर जिल्हा जालना यांना चार ते पाच वेळेस पत्र व्यावहार सुध्दा झाले आहे.

आमदार समिर कुणावार यांना मंत्रिमंडळात स्थान मिळावे यासाठी मैहरच्या देवीला साकडे(Samirkunavar)

पण तरीही आज पर्यत या रोडची कामे पुर्ण झालेली नाही एम.डी.आर 44 ते पहुर रस्त्याच्या निष्कृष्ट काम रोड ची साईट पट्टी कुठेच भरलेली नाही.ग्रेडेशन कोनत्याच लेयर वर झालेली नाही.त्याच बरोबर G.1,G.2,MPM.00 ते 4/400 पर्यंत झालेला नाही.डे्न नालीचे काम पुर्ण झालेले नाही.डे्न नालीचे काम पुर्ण झालेले नाही.शेत पांदी रस्त्यावर कुठेच पाईप टाकलेले नाही.

दि.2.12.2024 रोजी एम.क्यु.एम अधिकारी यांच्या कडुन 04/400 ते पहुर या रोडची चौकशी होणार अशी माहिती मिळाली त्यामुळे आरडव,दाभा,पहुर येथील गावकर्यांना विचारना केली मेन अधिकारी कुठे आहे.तर त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली.

अश्या निष्कृष्ट रोडच्या कामामुळे शासनाच्या तिजोरीतला व जनतेचा पैसा खर्च करुनही शासनाची व जनतेची लुट केली जात आहे.

जिल्हा बाहीरील कॉलेटी कंट्रोल चौकशी अधिकारी नेमुन अमच्या समक्ष इन कॅमेरा चौकशी करण्यात यावी.एम .डी.आर 44 ते पहुर रस्त्याच्या प्रेत्यक 200 मिटर वर ट्रायलपिट घेण्यात यावी.रस्त्याची सखोल चौकशी करण्यात यावी.या पुर्ण रोडची चौकशी करुन एम.डी.आर 44 ते पहुर रोडचे काम पुर्ण झाले असे प्रमाणिकरण कार्यवाही करण्यात यावी.एम.डी.आर 44 ते पहुर रोडची पुर्ण चौकशी होई पर्यंत राहीलेले बिल काढण्यात येऊनये याची सर्व जबाबदिरी आपली राहील असे निष्कृट दर्जच्या काम करणार्या ठेकेदारांचे परवाना रद्द करण्यात यावा दि.15.1.2025 पर्यंत चौकशी करून आम्हाला अहवाल देन्यात यावा अन्यथा दि.24.1.2025 पासुन मी व आरडव,दाभा,पहुर गावकरी मिळुन आपल्या बुलढाणा येथील कार्यालया समोर सामुहिक आमरण उपोषणाला बसणार आहोत.याची संपुर्ण जबाबदारी अपली राहील.

Lonarnews:आज पर्यंत आपल्या कार्याल्या कडुन जोकाही में.नळगे इन्फ्रा प्रोजेक्ट प्राली परतुर जिल्हा जालना यांना पत्र व्यावहार करण्यात आले आहे.त्याच्या प्रति सोबत जोडले आहे.ग्राम विकास विभागातर्गत काम करनार्या कंत्राटदारांवर करावयाच्या कार्यवाबाबत मार्गदर्शन सुचना G.R निवेदन तक्रार करता भाजप अल्पसंख्याक लोणार तालुकाध्यक्ष शेख जावेद शेख यासीन व आरडव, दाभा, पहुर गावकरी यांनी दिले आहे.