Home Blog Page 60

प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना अंतर्गत विविध स्पर्धा संपन्न(Lonar)

0

 

प्रतिनिधी सय्यद जहीर

तालुक्यातील बिबि येथे पंतप्रधान कृषी सिंचन योजना pmksy 2.0 अंतर्गत विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी प्रामुख्याने वसंतराव नाईक कनिष्ठ महाविद्यालय बीबी येथील शाळेमध्ये निबंध स्पर्धा व चित्रकला स्पर्धा घेण्यात आले.

तर दिनांक 27 जानेवारी रोजी येथील संतोषी माता मंदिराच्या प्रांगणामध्ये रांगोळी स्पर्धा व वृक्षारोपण चा कार्यक्रम घेण्यात आला यावेळी गावातील महिलावर्ग मुलींनी मोठा सहभाग घेतला होता.

Lonar:या विविध स्पर्धेच्या वेळी विद्यार्थी व गावातील महिला पुरुष वर्गांना पंतप्रधान कृषी सिंचन योजनेची माहिती कृषी मंडळ अधिकारी अनिल सांगळे कृषी पर्यवेक्षक विलास जाधव साहेब यांनी मार्गदर्शन केले यावेळेस प्रामुख्याने सरपंच चंदाबाई गुलमोहर, रामराव इंगळे ,समूह संघटक रामेश्वर सोनकांबळे, सिविल इंजिनिअर श्रीकांत भुमरे, कृषी सहाय्यक कविता साखरे, सचिव प्रामुख्याने उपस्थित होते.

समाजाच्या दफन भूमी मधील अनधिकृत अतिक्रमण हटविण्यासाठी सुलतानपूर येथे आमरण उपोषण(Lonarnews )

0

 

प्रतिनिधि सय्यद जहीर

अज्ञात व्यक्तीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा बसविला…..

 

Lonarnews:दिनांक ४ जानेवारी २०२५ रोजी रात्रीच्या वेळेला सुलतानपूर येथील नाथबाबा(गार पगारी) समाजाच्या दफनभूमीमध्ये अज्ञात लोकांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा बसवून अतिक्रमण केले आहे. पुतळ्याला पर्यायी जागा देऊन अतिक्रमण हटविण्यासाठी नाथ बाबा (गारपगारी) समाज बांधवांच्या वतीने आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आलेली आहे.

सविस्तर वृत्त असे की, दिनांक ४ जानेवारी २०२५ रोजी रात्रीच्या वेळेला सुलतानपूर या ठिकाणी लोणार रोडला लागून असलेल्या नाथबाबा ( गारपगारी) समाजाच्या दफनभूमी मध्ये अज्ञात व्यक्तीने लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचा पुतळा बसवून अतिक्रमण केले आहे.

या विषयाची चाहूल नाथ बाबा (गारपगारी )समाजाचे व्यक्ती आणि अनिल ठाकरे यांना आल्यामुळे त्यांनी ३ जानेवारी २०२५ लोणार तहसिलदार यांना या विषयी निवेदन सादर केले होते. तसेच संबंधित पोलीस प्रशासन व महसुल विभाग वरिष्ठ अधिकारी यांना सुद्धा निवेदन देऊन हे अनधिकृत अतिक्रमण काढण्याच्या संदर्भात अनिल ठाकरे यांनी विनंती केलेली आहे. परंतु संबंधित अधिकारी यांनी निष्काळजी व हलगर्जीपणा केल्यामुळे या समाजाला नाईलाजास्तव दिनांक २० जानेवारीपासून आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागला आहे.

४ जानेवारी २०२५ ला ही बाब उघडकीस येताच सुलतानपूर ग्रामपंचायत विस्तार अधिकारी श्री गजानन कावरके यांनी मेहकर पोलीस स्टेशन यांना लेखी स्वरूपात माहिती दिली. या ठिकाणी नाथबाबा (गारपगारी) समाजाची पूर्वापारपासून दफन भूमी (स्मशानभूमी) असल्याबद्दलचे रेकॉर्ड महसूल विभागात उपलब्ध आहे. या विषयीचा असलेल्या सातबारावर ४०×७०ची नोंद आहे. परंतु गावात आणि समाजात कलह निर्माण होऊ नये म्हणून लोणार नायब तहसीलदार ईप्पर साहेब, मंडळ अधिकारी, तलाठी संतोष पनाड, हेडकॉन्स्टेबल केदार साहेब, ग्रामपंचायत विस्तार अधिकारी गजानन कावरके, हेड कॉन्स्टेबल राजेश जाधव, तसेच गावकरी संगपाल नागवंशी पनाड, शिवप्रसाद जोगदंड यांनी उपोषण करत्या सोबत चर्चा करून तडजोड करण्याचा प्रयत्न केला.

Lonarnews:परंतु अनिल ठाकरे उपोषण करते यांनी त्यांच्या निर्णयाला मान्य न करता आमची दफनभूमी (स्मशानभूमी) लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचा पुतळयाचे अतिक्रमण काढून आम्हाला जागा मोकळी करून वालकंपाऊंड करून देण्यात यावे असा निर्णय घेतल्यामुळे सर्वच हतबल होऊन परत गेले. दिनांक १६/०१/२०२५ रोजी सुलतानपूर ग्रामपंचायत विस्तार अधिकारी यांना लोणार तहसिलदार यांनी कोणतीही व्यक्ती ,संघटना, संस्था, शासकीय व निमशासकीय संस्थेच्या तसेच खाजगी मालकीच्या जागेवर मा. जिल्हाधिकारी यांच्या परवानगीशिवाय पुतळा बसविता येत नसताना सुद्धा सुलतानपूर येथे हा प्रकार घडत आहे आपण पुतळा धोरण व दिनांक ३ मे २०१७ चे शासन निर्णयानुसार कार्यवाही करत नसल्याचे दिसून येत आहे तरी सदर प्रकरणी कार्यवाही करून कार्यालयास कळवावे अशी सूचना दिली होती.आता प्रशासन लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचा पुतळा हविटणार की, वाटाघाटी करण्याची तडजोड करणार, कोणता निर्णय घेणार याकडे सर्व गावकऱ्यांचे लक्ष लागून आहे. गावकऱ्यांमध्ये उलट सुलट चर्चेला उधान आलेले आहे एवढे मात्र खरे

अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग ,तहसील कार्यालय शेगाव अंतर्गत 100 दिवसाचा कृती आराखडा राबविण्यात येत आहे. त्यामध्ये माननीय तहसीलदार दिपक बाजड साहेब यांच्या संकल्पनेतून(shegaonnews)

0

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

shegaonnews:आज 26 जानेवारी 2025 रोजी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून शेगाव तालुक्यातील रास्त भाव दुकानदार यांनी सन 2024 मध्ये Aepds प्रणाली अंतर्गत इ पॉस मशीन द्वारे लाभार्थ्यांना धान्य वाटपामध्ये जे उल्लेखनीय कार्य केले त्याबद्दल 28 रास्तभाव दुकानदार यांना शेगाव तहसीलचे कर्तव्यदक्ष माननीय तहसीलदार आदरणीय श्री दिपक बाजड साहेब यांच्या शुभहस्ते प्रशस्तीपत्र देवून गौरवण्यात आले.

सदर वेळी निवासी नायब तहसीलदार खेडकर साहेब, नायब तहसीलदार सातव साहेब, नायब तहसीलदार पारखे मॅडम, निरीक्षण अधिकारी शेगाव संतोष बावणे साहेब, पुरवठा निरीक्षक किसन केणे , गोदाम व्यवस्थापक श्रेणी -२ विष्णू अंभोरे , पी जी पवार साहेब, मिरगे साहेब, महातो साहेब, व इतर सर्व तहसील कार्यालयातील अधिकारी कर्मचारी व रास्त भाव दुकानदार तालुका शेगाव उपस्थित होते*.

प्रणय साखरकर याची युवा आघाडी संघटक पदावर निवड(Hingnghat)

0

 

प्रतिनिधी सचिन वाघे

हिंगणघाट :- संताजी अखिल तेली समाज संघटन महाराष्ट्र राज्य अनिल बजाईत प्रदेश अध्यक्ष तथा संस्थापक यांच्या अध्यक्षतेखाली प्रणय अशोक साखरकर यांची युवा आघाडी संघटक हिंगणघाट ज़ि. वर्धा या पदावर निवड करण्यात आली..

समस्त पदाधिकारी तथा समाज बांधव यांच्या कडून भविष्यातील वाटचालीस पदाधिकारी मयुर पोहाणे हिंगणघाट तालूका उपाध्यक्ष सुनिल वांदीले, मनोज तराळे,हेमलता कोसूरकर, राहुल नांदुरकर, अतुल भेंडे, वैष्णवी तडस मोठ्या संख्येने पदाधिकारी व समाज बांधव यांनी शुभेच्छा दिल्या

एसटी भाडेविरोधात शिवसेने कडुन चक्काजाम(hingnghat)

0

 

प्रतिनिधी सचिन वाघे

हिंगणघाट :- शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने दिनांक:- २८ जानेवारी २०२५ रोज मंगळवारला पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री श्री.उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब, यांच्या आदेशाने तथा संपर्कप्रमुख श्री. रमेश जाधव साहेब यांच्या सूचनेनुसार हिंगणघाट येथे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, बस स्थानकावरील माजी राज्य मंत्री अशोक शिंदे, उपजिल्हाप्रमुख राजेंद्र खूपसरे तथा तालुकाप्रमुख सतीश धोबे यांच्या नेतृत्वात सर्वसामान्य जनते करिता एसटीची भाडेवाढ झाल्यामुळे , भाडे वाढ कमी करण्याकरिता तीव्र निदर्शने करण्यात आली .

सविस्तर वृत्त असे की, महाराष्ट्र सरकारच्या अखत्यारीत येणाऱ्या, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ हे देशातील सर्वात मोठे सार्वजनिक वाहतूक सेवे पैकी एक आहे .एस .टी .महामंडळाच्या ताब्यात जवळपास पंधरा हजार बसेस असून दररोज सुमारे ५५ लाख प्रवासी वाहतूक करतात.एसटी महामंडळाच्या राज्याच्या गृह ( वाहतूक ) विभागाचे मुख्य सचिव आणि एस टी महामंडळाचे अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. बैठकीतील अतिरिक्त पोलीस महासंचालक ( वाहतूक ) आणि परिवाहन आयुक्तांसह प्रमुख सदस्य उपस्थित होते.

आमदार समिर कुणावार यांना मंत्रिमंडळात स्थान मिळावे यासाठी मैहरच्या देवीला साकडे(Samirkunavar)

या बैठकीत अनेक निर्णय घेण्यात आले .त्यात एस टी महामंडळाच्या बसेसच्या प्रवासी भाड्यात वाढ करण्यात आली. नवीन भाडेवाढ हकीम समितीच्या शिफारशीच्या आधारे करण्यात आली. नवीन भाडेवाढ १४.९५% एवढी दिनांक:-२४ जानेवारी २०२५ मध्यरात्रीपासून लागू झाली आहे. सुधारित भाडेवाढ हि मानक बसेस, एक्सप्रेस, वातानुकूलित बसेस, तथा विविध प्रकारच्या सेवांना लागू झाली आहे.

यात सर्वसाधारण प्रवाशांचा खिसा कापण्याचे काम या महाराष्ट्र सरकार ने केले आहे. त्याचा निषेध नोंदविण्या करिता शिवसैनिकांनी एकत्र येऊन सरकारविरोधी नारे देऊन निषेध व्यक्त केला. व झालेली प्रवासी भाडे वाढ त्वरित थांबवा. अशा घोषणा दिल्या. सर्व सामान्यांना दिलासा द्यावा ,असेच या ठिकाणी बाळासाहेबांच्या ब्रीदवाक्यनुसार ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण या धोरणानुसार समाजाच्या सेवेसाठी असलेली शिवसेनेने पुन्हा जनतेसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात आले. सदर आंदोलन करण्याकरिता उपतालुकाप्रमुख प्रकाश अनासाने, माजी नगरसेवक मनीष देवडे, भास्कर ठवरे, नितीन वैद्य, गजानन काटवले, श्रीधर कोटकर, शितल चौधरी, शंकर

hingnghat:मोहमारे,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते श्रीकांत भगत ,अनंता गलांडे ,प्रकाश घोडे, योगेश कामडी, गोवर्धन शाहू,हिरामण आवारी, नरेंद्र गुळकरी ,सुधाकर डंभारे, सुभाष काटकर, लक्ष्मण कापकर,जानू पडवे, गुणवंत वानखडे, दिलीप सुरजुसे ,पप्पू घवघवे, विनोद दारुंडे ,नथ्थु कुकडे, अमोल चिंचाळकर, हेमराज हरणे, दिलीप चौधरी, आशिष भांडे, प्रशांत कांबळे, मयूर ठाकरे ,प्रवीण राऊत, श्याम वाघमारे,विशाल माथनकर,बलराज डेकाटे,सतीश मसराम, गजानन ठाकरे, दिलीप वैद्य, अमोल वादाफळे, नईम शेख ,फिरोज खान , राजू तांबोळी, अशोक सोनटक्के, अशोक उमाटे, मंगेश गिरडे, सचिन मुळे, सुनील आष्टीकर ,मारोती अराडे ,रामाजी रहाटे,विनोद चाफले, राजू मंडलवार,विजय कोरडे, अनिल मानकर ,नरेश तामगाडगे, संजय कर्डिले, संदीप नरड, गिरधर कावळे, अनिल बलखंडे ,शंकर धोटे, महेंद्र कुमरे, गजानन डोंगरे,रवींद्र बागडे,नितीन कोल्हे, हनुमान जाधव, वासुदेव कांमडी,श्रीकृष्ण रामगडे, सुरेंद्र बोरुले, अश्विन गहूकर, शामरावजी ठाकरे,हिरामण आवारी, चंदू हुलके,धनु घाटे, विनोद मोहड ….. इत्यादी शिवसैनिक उपस्थित होते.

भाजपा महिला मोर्चाचा मकर संक्रांती मेळावा(bjpmorcha)

0

 

प्रतिनिधी गुड्डू कुरेशी

मकर संक्रांती भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेश सचिव सौ सरिता गाखरे
यांची होती उपस्थिती

सिंदी (रेल्वे ): भाजपा महिला मोर्चाच्या
वतीने स्थानिक शिवप्रेम सभागृहात मकर संक्रांत मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

आमदार समिर कुणावार यांना मंत्रिमंडळात स्थान मिळावे यासाठी मैहरच्या देवीला साकडे(Samirkunavar)

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून विधानसभा क्षेत्राचे आमदार समीर कुणावार, भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेश सचिव सौ सरिता गाखरे, भाजपा महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष वैशाली येरावार उपस्थित होत्या. यावेळी समीर कुणावार व त्याच्या पत्नी श्रद्धा कुणावार याच्या सत्कार करण्यात आला.असून यावेळी भाजपा उपाध्यक्षा छाया सातपुते, महिला मोर्चाच्या महामंत्री अनिता मावळे, विधानसभा प्रमुख नलिनी सयाम, माजी नगराध्यक्ष बाबीता तुमाने, शशीकला क्षीरसागर, उपस्थित होते

या प्रसंगी बोलताना समीर कुणावार मन्हाले की महिलांच्या सक्षमीकरणाला बळ देण्यासाठी आयोजित हळदी-कुंकू सत्कार समारंभाला महिलांनी दिलेल्या उत्स्फूर्त आणि प्रचंड प्रतिसादाबद्दल मी मनःपूर्वक आभार व्यक्त करतो. या दिवसाने माझ्या जीवनात एक संस्मरणीय क्षण जोडला, कारण इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित झालेल्या माझ्या लाडक्या बहिणींनी हा कार्यक्रम यशस्वी केला.
महिलांच्या सन्मानासाठी आणि सक्षमीकरणासाठी आम्ही नेहमीच कटिबद्ध आहोत. मी आणि आपले सरकार नेहमीच माझ्या लाडक्या बहिणींच्या पाठीशी ठामपणे उभे राहिलो आहोत आणि भविष्यातही त्यांच्या हक्कांसाठी व कल्याणासाठी काम करत राहू, याची मी ग्वाही देतो.
असे मत कुणावार यांनी व्यक्त केले.

संचालन पुष्पलता वडाद्रे , प्रस्तावना रोशणा पेटकर,यांनी केले. आभार भाजपा जिल्हा सचिव स्नेहल कलोडे यांनी मानले.

bjpmorcha:कार्यक्रमाचे आयोजन राजू गधारे, अमोल सोनटक्के, स्नेहल कलोडे, आरती अंतुलकर, रंजना शेंद्रे, अर्चना झाडे, माधुरी काटोले, आरती ताई वैशाली ताई वाघमारे यांनी केले असून कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता सुधाकर वलके प्रभाकर तडस, रामेश्वर घंगारे, जगदीश बोरकुटे रामभाऊ सोनटक्के,पंकज पराते, मिलिंद पेटकर, तेजस सोनटक्के, राकेश श्रीवास, गुल्लू भसाली, अमोल बोगाडे, विपिन पेटकर या कार्यक्रमाला गोडव्याचे स्वरूप रविभाऊ वाघमारे यांनी दिले

26 जानेवारी 2025 रोजी शेगाव येथील पवनपुत्र सेमी मराठी शाळेमध्ये ध्वजारोहणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहामध्ये साजरा झाला(shegaonnews)

0

 

shegaonnews:कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय मानव अधिकार महाराष्ट्र महिला अध्यक्ष विदर्भ पर्यावरण सेक्रेटरी शितलताई शेगोकार यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले संस्थेचे अध्यक्ष श्री बीडी झाडोकार सर व मुख्याध्यापक डिगोळे सर व सर्व शिक्षक वृंद व कर्मचारी उपस्थित होते.

आमदार समिर कुणावार यांना मंत्रिमंडळात स्थान मिळावे यासाठी मैहरच्या देवीला साकडे(Samirkunavar)

ध्वजारोहणानंतर सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमांमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला छोट्या मुलांनी सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये खूप छान आपापले नेतृत्व दाखवले आणि 26 जानेवारी हा कार्यक्रम खूप छान होत आहे पार पडला.

भुमराळा – किनगाव जट्टु मार्गाची पालकमंत्र्यासमोर मांडली व्यथा आमदार मनोज कायंदे ही होते उपस्थित(Lonarnews )

0

प्रतिनिधि सैय्यद जहीर

Lonarnews:सामाजिक कार्यकर्ते देवानंद सानप यांच निवेदन असो किंवा आंदोलनाचा इशारा याची प्रशासनाला दखल घ्यावीच लागते हा परीसरातील नागरीकांना अनुभव आहे आणि देवानंदजी सानप यांनी निवेदन दिले म्हणजे आमच्या रस्त्याचे काम मार्गी लागणार अशा आशा परीसरातील शेकडो नागरीकांना लागुन राहतात हे विशेष

मदत पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री व सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार मनोज कायदे यांनी दिले सानप यांना रस्त्याचे काम पूर्ण करण्याचे आश्वासन

आमदार समिर कुणावार यांना मंत्रिमंडळात स्थान मिळावे यासाठी मैहरच्या देवीला साकडे(Samirkunavar)

सिंदखेडराजा मतदार संघातील शेवटच्या टोकावर असलेल्या व लोणार तालुक्यातील भुमराळा ते किनगाव जटटू या मुख्य भागातील रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झाली आहे गेल्या तीन वर्षांपासून भुमराळा किनगाव जटटू मार्गावर खड्ड्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे त्यामुळे ग्रामस्थांच्या नशिबी अजूनही भोग सुरुच आहे या मार्गावर ये जा करणारे वाहन चालक,शेतकरी, विद्यार्थी, अक्षरशा त्रस्त झाले आहे आज घडीला हा मार्ग विद्यार्थ्यांसाठी व वाहनधारकांसाठी जीवघेणा ठरत आहे.

भुमराळा येथुन हा मार्ग मुख्य मार्ग व जागतिक लोणार सरोवर ते संभाजीनगर मार्गाला जोडल्या गेला असुन या मार्गाने गावकरी, शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थांची मोठी वर्दळ असते परंतु मार्गावर जागोजागी मोठ मोठे खड्डे पडले असून गिट्टी उघडली असल्याने मार्गाची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे रात्री खड्डे चुकवण्याच्या नादात वाहनधारकांचे अनेक अपघात होतात.

पावसाळ्यात तर जिवघेणी कसरत करावी लागते व अशा आशयाचे निवेदन सामाजिक कार्यकर्ते तथा भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष देवानंद सानप यांनी जिल्ह्यचे पालकमंत्री ना.मंकरद पाटील यांना सिंदखेडराजा येथे भेटुन दिले भुमराळा किनगाव जट्टु परीसरातील शेकडो नागरिक उपस्थित होते

Lonarnews:निवेदन देतेवेळेच राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तसेच बुलढाणा पालकमंत्री मा.ना.श्री. मकरंद जाधव पाटील तथा मतदार संघाची जाणीव असलेले आमदार श्री. मनोज भाऊ कायंदे यांच्या उपस्थितीत भुमराळा ते किनगाव जटटू रस्त्याच्या कामा संदर्भात स्वतः भेट घेऊन रस्त्यांची परिस्थिती समजावून सांगत निवेदन दिले निवेदन दिल्यानंतर पालकमंत्री व आमदार महोदय यांनी शब्द दिला की लवकरच डांबरीकरण कामाला सुरुवात करु असे आश्वासन पालकमंत्री यांनी दिले
————————–

लफडेबाज प्रियकराने प्रेयसीला ११ कॉल केले अन् खुनाचा उलगडा झाला..! लोणार तालुक्यातील तिघे पोलिसांच्या जाळ्यात;(Lonarnews)

0

 

प्रतिनिधि सैय्यद जहीर

Lonarnews:कर्जबाजारी असल्याने ट्रक लुटण्याच्या उद्देशाने त्याने ट्रक चालकाचा खून केला. ट्रकचालकाचा मृतदेह ट्रक मधील टूल बॉक्स मध्ये टाकला. अन् ट्रक घेऊन ट्रकमधील सामान विकण्याच्या उद्देशाने तो सुसाट निघाला.. मात्र एवढ्या धावपळीत देखील त्याचे प्रेयसी सोबत बोलणे सुरू होते. अशातच त्याचा मोबाईल स्विच ऑफ झाला..

म्हणून त्याने खून केलेल्या ट्रक चालकाच्या फोनवरून प्रेयसी सोबत गप्पा मारल्या.. आता प्रेयसी सोबत मारलेल्या गप्पांवरूनच छत्रपती संभाजीनगरात या बड्या हत्याकांडाचा उलगडा झाला आहे… ट्रक चालकाचा खून करणारा हा तरुण लोणार तालुक्यातील सुलतानपूरचा राहणार असून त्याचे नाव गणेश वसंता पवार असे आहे.

माॅयल लिमिटेड मुंबईच्या वतीने सामाजिक उत्तरदायित्व उपक्रमांतर्गत दिव्यांगांसाठी सहाय्यक उपकरणे व मोफत वाटपासाठी पंचायत समिती चामोर्शी येथे शिबिर संपन्न.(Gadchirolinews)

छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी त्याचे दोन साथीदार गणेश गजानन कुटे (सुलतानपुर) आणि ज्ञानेश्वर गणेश घायाळ (रा. गायखेडा, ता.लोणार) यांना देखील अटक केली आहे…

विजय मुरलीधर राऊत (५२, रा. केडगांव, अहिल्यानगर) असे खून झालेल्या ट्रक चालकाचे नाव आहे. छत्रपती संभाजी नगर मधील आडगांव बुद्रूक मध्ये सोलापूर धुळे महामार्गावर एक ट्रक बेवारस अवस्थेमध्ये आढळला होता. पोलिसांनी तपासणी केली असता ट्रकच्या टूल बॉक्समध्ये राऊत यांचा मृतदेह आढळला. मृतदेहावर गंभीर मारहाणीच्या खुणा होत्या.

त्यामुळे ट्रकचालकाचा खून झाल्याचा निष्कर्ष पोलिसांनी काढला. ट्रक मध्येच पोलिसांना राऊत यांचा मोबाईल देखील सापडला. या मोबाईल वरून एकाच व्यक्तीला ११ कॉल गेल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्याच्या खोलात गेल्यानंतर पोलिसांनी सुलतानपूरच्या गणेश पवार याला अटक केली. आधी उडवा उडवी ची उत्तरे देणाऱ्या गणेशने नंतर मात्र खुनाची कबुली दिली…

नेमके काय घडले…

छत्तीसगडमधील रायपूर मध्ये विजय राऊत यांनी ट्रक मध्ये अडीच हजार लोखंड भरले. ते घेऊन ते अहिल्यानगरला येणार होते. रायपूरमध्येच बदली चालक म्हणून काम करणाऱ्या गणेश पवारने विजय राऊत यांना मेहकर पर्यंत सोडण्याची विनंती केली.

१९ जानेवारीला ते रायपूर मधून निघाले. सोमवारी सकाळी १० वाजता विजय राऊत आणि गणेश पवार यांनी कारंजा मध्ये नाष्टा केला. त्यानंतर स्वतः गणेश पवारने ट्रकचे स्टेरिंग हाती घेत विजय राऊत यांना आराम करायला सांगितले. विजय राऊत झोपेत असतानाच गणेश पवारने टॉमी ने डोके ठेचून राऊत यांची हत्या केली. गणेश ट्रक घेऊन मेहकर जवळ आला, तिथे त्याचे मित्र घायाळ आणि कुटे त्याला मिळाले. मेहकरमध्येच त्यांनी ३० हजारात ३० क्विंटल सळ्या विकल्या. त्यानंतर तिघेही ट्रक घेऊन जालन्याच्या दिशेने निघाले. जालन्यात त्यांना खरेदीदार मिळाला नाही. म्हणून ते छत्रपती संभाजी नगरच्या दिशेने निघाली..

ट्रक मध्ये सुटली दुर्गंधी…

दरम्यान तोपर्यंत विजय राऊत यांची हत्या करून बराच काळ झाल्यामुळे ट्रक मध्ये दुर्गंधी सुटली. ट्रक मध्ये रूम फ्रेशनर मारत ते संभाजीनगर कडे निघाले. मात्र ट्रक मधील मालाला खरेदीदार मिळत नसल्याने ट्रक रस्त्यात सोडून तिघेही गावाकडे निघून गेले…
: असा अडकला जाळ्यात…

विजय राऊत यांची हत्या करणारा गणेश पवार हा ट्रकवर बदली चालक म्हणून काम करतो. तो कर्जबाजारी आहे. राऊत आणि गणेश पवार यांची कामानिमित्ताने अनेकदा भेट होत असते. १९ जानेवारीला रायपूरमध्ये दोघांची भेट झाली. राऊत यांना अडीच हजार किलो लोखंडाच्या ट्रान्सपोर्ट चे काम मिळाल्याचे गणेशने पाहिले.

Lonarnews:तेव्हाच त्यांनी या लोखंडावर डल्ला मारण्याचा कट रचला. त्यासाठीच त्याने राऊत यांची हत्या केली.. मात्र गणेश पवार हा त्याच्या लफडेबाज स्वभावामुळेच अडकला.. प्रवासात गणेश पवार चा मोबाईल स्विच ऑफ झाला होता. त्यामुळे त्याने राऊत यांच्या फोनवरून प्रेयसीला ११ कॉल केले. पोलीस तपासात ही बाब समोर आल्यानंतर गणेशचा कारनामा समोर आला. शिवाय टोल नाक्यावरील सीसीटीव्ही फुटेज मध्ये देखील गणेश हा राऊत यांच्यासोबत असल्याचे कैद झाले होते..

माॅयल लिमिटेड मुंबईच्या वतीने सामाजिक उत्तरदायित्व उपक्रमांतर्गत दिव्यांगांसाठी सहाय्यक उपकरणे व मोफत वाटपासाठी पंचायत समिती चामोर्शी येथे शिबिर संपन्न.(Gadchirolinews)

0

 

अनिल सिंग चव्हाण मुख्य संपादक.

चामोर्शी: पंचायत समितीचा चामोर्शीच्या पटांगणात मायल लिमिटेड मुंबई च्या वतीने सामाजिक उत्तरदायित्व उपक्रमांतर्गत दिव्यांगासाठी सहाय्यक उपकरणे मोफत वाटपासाठी शिबिर आज दिनांक 24 जानेवारी 2025 रोजी घेण्यात आला.

प्रसंगी शिबिराचे अध्यक्ष संवर्ग विकास अधिकारी सागर पाटील हे होते तर विशेष अतिथी म्हणून विनयकुमार व्यवस्थापक माॅयल लिमिटेड कंपनी मुंबई, प्रशांत खुरसुंगे संचालक माॅयल लिमिटेड कंपनी मुंबई,कमलेश यादव कार्यक्रम अधिकारी हे होते.

आमदार समिर कुणावार यांना मंत्रिमंडळात स्थान मिळावे यासाठी मैहरच्या देवीला साकडे(Samirkunavar)

दिव्यांगासाठी आयोजित अस्थिव्यंग,दृष्टीदोष,कर्णदोष या प्रवर्गातील वयोगट तीन ते जवळपास 75 वर्षातील चामोर्शी तालुक्यातील 240 लाभार्थ्यांना साहित्याचे वितरण करण्यात आले.

तसेच दृष्टीदोष,कर्णदोष यांची मोफ तपासणी करण्यात आली.कार्यक्रमाचे मुख्य आयोजक भारतीय कृत्रिम अपंग निर्माण मुंबई,तर सहकार्यासाठी जिल्हा प्रशासन,जिल्हा समाज कल्याण विभाग गडचिरोली व पंचायत समितीचा चामोर्शी यांनी यांनी केले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी विनीत पेंदोर,गोपीनाथ बोरकुटे,गट साधन केंद्राचे विशेषतज्ञ सुशील गजघाटे,विशेष शिक्षक रवी खेवले,जीवन शेट्टे,हिमदेव पिपरे,कु मेघा कोहपरे,कु रिता चव्हाण व उमेश पोहाणे यांनी सहकार्य केले.

Gadchirolinews:कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चांगदेव सोरते यांनी केले. दिव्यांग लाभार्थ्यांना नाश्ता व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती.