Home Blog Page 591

सूनगाव येथील शेतकऱ्यांनी दिलेल्या तक्रारीवर राशी सिड्स 659 कंपनीच्या अधिकाऱ्यांनी केली शेताची पाहणी

0

 

गजानन सोनटक्के जळगाव जा

जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव येथील चार शेतकरी यांनी तक्रारीत म्हटले की त्यांनी उसरा बु शिवारात गट नं 75 13 14 व सूनगाव भाग 2 मधील 791 शेतात राशी कंपनीचे 659 हे कपाशीचे वाण पेरणी केली परंतु बियाणे पाहिजे त्या प्रमाणात यशस्वी नसल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले आहे आज रोजी कपाशीच्या झाडांना कमी प्रमाणात बोंडे लागली व काही झाडांना तर बोंडे लागलीच नाही व लागलेल्या बोडांना सुरवातीपासूनच कीड लागलेली आहे व मोठ्या प्रमाणात बोंड अळीचा प्रादुर्भाव झालेला आहे या वर्षी आधीच संकटात सापडलेल्या अवस्थेत शेतकरी असताना अशा परिस्थितीत राशी कंपनीचे 659 वान पेरून उत्पन्न न झाल्याने शेतकरी संकटात सापडलेला आहे व कंपनीने बोगस बियाणे विक्री करून शेतकऱ्याची फसवणूक केली आहे तरी आपण सदर शेताची पाहणी करून पंचनामा करून कंपनीवर कायदेशीर कारवाई ची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे शेतकऱ्यांचा झालेला खर्च व उत्पादन खर्च त्याल त्यानुसार मोबदला शेतकर्‍यांना देण्यात यावा अशी तक्रार 2 नोव्हेंबर रोजी दिली होती त्यानुसार कृषी अधिकारी वाकोडे साहेब व पंचयातसमिती कृषी विभागाचे नावकर साहेब यांनी शेताची पाहणी केली व पंचनामा केला त्यानंतर आज दि 9 नोव्हेंबर रोजी राशी सिड्सचे बुलडाणा झोनल अधिकारी राजेंद्र सोनूले व जळगाव जामोद तालुका फिल्ड प्रतिनिधी राजू साबे यांनी शेतांची पाहणी केली

बुलडाणा जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेच्या प्रमुखपदी पोलीस निरीक्षक बळीराम गीते.

0

 

अनिलसिंग चव्हाण/शिवदास जामोदे

बुलडाणा जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेचे
पोलिस निरीक्षक महेंद्र देशमुख यांची बदली अकोला येथे झाल्याने स्थनिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद रिक्त असल्याने बुलढाणा जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद चावरीया यांनी आज एक आदेश काढून
बुलडाणा स्थानिक गुन्हे शाखेच्या प्रमुखपदी पोलीस निरीक्षक पदावर बळीराम गीते यांची नियुक्ती केली आहे.त्यांनी आज (ता.9नोव्हेंबर) सोमवार रोजी बुलढाणा जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेच्या प्रमुख पदाचा कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक बळीराम गीते
यांनी पदभार स्वीकारला.पोलीस निरीक्षक बळिराम गीते यांनी यापूर्वी जिल्हा वाहतूक शाखा संभाळली. बुलढाणा जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेचा पोलीस निरीक्षक पदाचा बळीराम गीते यांनी पदभार स्वीकारताच त्यांचे पोलिस कर्मचाऱ्यांनी स्वागत केले.

पत्रकार कु. किरण चौधरी यांना कोरोना प्रहार योद्धा म्हणून सन्मानित

0

 

तुळजापूर :- प्रतिनिधी
covid-19 कोरोना महामारी आपत्तीजन्य संकट काळात स्वतःचा जीव धोक्यात घालून जनतेच्या आरोग्यासाठी कोरोना विरुद्ध लढ्यात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने पत्रकार कु. किरण चौधरी यांना कोरोना प्रहार योद्धा म्हणून सन्मानित करून सन्मानपत्र देण्यात आले यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष जयराज कोळी, उपाध्यक्ष दगडू माने, युवक अध्यक्ष अनिस मुजावर, कार्याध्यक्ष अभिजित खोत, शहराध्यक्ष अजय डांगे यांनी चौधरी यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या तर अनेक मान्यवरांनी शुभेच्छांचा वर्षाव केला

रस्ते महामार्गाच्या कामांत हेल्पलाइन सेंटर सुरु करा–

0

 

मा.आमदार विजयराज शिंदे यांची केंद्रीय रस्ते विकास मंत्री ना.नितिनजी गडकरी यांच्या कड़े प्रत्यक्ष भेटून मागणी.

अजहर शाह मोताळा प्रतिनिधी

अजिंठा-बुलडाणा-बैतूल सह सर्वच भागात राष्ट्रीय महामार्गाच्या कामात सुरक्षिततेच्या विविध उपाययोजना करण्याची गरज निर्माण झालेली आहे.
या बाबत आपल्या सूचना व मागण्यासाठी आज दि.8 /11/2020 रोजी ना.नितिनजी गडकरी यांची सदिच्छा भेट घेऊन मागण्यांचे निवेदन सादर केले आहे.

निवेदनात नमूद आहे की,
अजिंठा-बुलडाणा-बैतूल या
महत्वाच्या व महत्वाकांक्षी असलेल्या राष्ट्रीय महामार्गाचे काम गेल्या दोन ते तीन वर्षभरापासून सुरु आहे.रस्त्याची लांबी रूंदी अत्यंत जास्त असल्याने या महामार्गाच्या कामात मोठ्या प्रमाणात खोलवर खोदकाम झालेले आहे.वाहतुकीच्या दृष्टिने एक बाजू वाहनांच्या वाहतुकीसाठी तर दूसरीबाजू ने खोलवर खोदकाम सुरु आहे सदर खोदकामामुळे वाहतूकची कोंडी होत आहे तर काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात अपघात होत आहे व अनेकांना आपले जीव गमवावे लागत आहे.
संबंधीत कंत्राटदार यांनी जीवितहानी व अपघाताच्या दृष्टिने आवश्यक असणाऱ्या सुरक्षिततेच्या कोणत्याही उपाययोजना मार्गाच्या कामात केलेल्या दिसून येत नाही. खोदकामाच्या कड़े लगत कोणतेही रेडियम लावलेली baaricades लावल्यात आलेले नसल्याने वाहने सरळ रस्ताच्या खाली खोलवर जाऊन पलटी होऊन भीषण अपघाताच्या घटना घडत आहे. अश्या रात्री अपरात्री झालेल्या अपघातातिल ज़ख्मीना साधी प्राथमिक उपचार सुद्धा मिळत नाही. जख्मी व त्यांची अस्ताव्यस्त स्थितीतील वाहने खोल खोदकामात पडल्यास रात्री दृष्टिक्षेपास न आल्याने लवकर उचलली सुद्धा जात नाही.खोदकाम ची लांबी ऊंची बरीच असल्याने होणारा अपघात हा भयावह असतो. अनेक ठिकाणी पुलांची कामे सुरु आहेत अश्या वळण रस्त्याच्या ठिकाणी (Divertion) रेडियमचे सुस्पष्ठ दिशादर्शक नसल्याने अशी ठिकाणे अपघातास निमंत्रण देणारी ठरत आहे. संबंधित कंत्राटदार यांनी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून कोणत्याही उपाययोजना प्रगती पथातिल महामार्गात केलेल्या दिसून येत नाही.सदर महामार्गाच्या कामांमुळे अपघाताचे प्रमाण वाढले असून त्या दृष्टिने सुरक्षिततेच्या उपाययोजना
करणे आवश्यक ठरले आहे.अनेक ठिकाणी कंत्राटदारांच्या चुकीच्या कार्य पद्धतिमुळे वाहतूक ठप्प होऊन तासनतास वाहनांच्या रांगा लागलेल्या असतात. बुलडाणा जिल्ह्यासह इतरही राष्ट्रीय महामार्गाच्या प्रगती पथा असलेल्या कामात पुढील उपाययोजना करणे गरजेचे आहे.

1)संबधित कंत्राटदार यांचे दर 25 कि.मि.आपातकालीन सेवा देणारे “हेल्पलाइन सेंटर” असावे सदर हेल्पलाइन सेंटरचे दूरध्वनी क्रमांक मार्गात ठिकठिकाणी ठळक अक्षरात नोंदवावे.

2) दर 25 कि.मि. अंतरावरील हेल्पलाइन सेंटर द्वारे एका रुग्णवाहीकेची विशेष सेवा उपलब्ध करून दयावी जेणेकरून जख्मी ना तातडीने आरोग्य सेवा पुरविता येईल व रुग्णालयात पर्यत नेता येईल.

3)खोदकामाच्या कड़े लागत रेडियम लावलेली barricades असावे जेणेकरून दिवसा व रात्री वाहणे खाली उतरून अपघात होनार नाही.

4)महामार्गाच्या कामात कंत्राटदार यांच्या चुकीच्या कार्य पद्धतिमुळे किंवा सुरक्षिततेचे उपाय न योजल्यास अपघात घडून मृत्यु गेलेल्यांच्या वारसास 50 लाख रु चे विमा संरक्षण देण्याची सक्ति कंत्राटदार यांना करावी.जेने करून रास्तकंत्राटदार सुरक्षिततेच्या उपाययोजना काळजीने करतील.

5) मुळ रस्त्यापासून नवीन होण्याऱ्या महामार्गाच्या कामाची ऊंची खुप जास्त असल्याने या कामांमुळे रस्त्यालगत शेती असणाऱ्या शेतकऱ्यांना शेतात ये-जा करण्यासाठी खुप त्रास होत आहे.शेतात बैलगाड़ी व वाहने जाऊ शक़त नाही .त्यामुळे शेत रस्त्याची योग्य व्यवस्था करावी.

6)पुल व वळण रस्त्याच्या ठिकाणी सुस्पष्ठ रेडियम लावलेली दिशादर्शक आवश्यक त्या ठिकाणी असावी.

अश्या प्रकारच्या सूचना व मागणी निवेदनात नमूद आहे.

बोथा घाटातील उड्डाणपुल व बुलडाणा बायपास साठी निधि उपलब्ध करून द्या–

0

 

अजहर शाह मोताळा प्रतिनिधी

भाजपा नेते मा.आमदार विजयराज शिंदे यांची ना.गडकरी यांच्या कड़े मागणी

बुलडाणा जिल्हा व शहराच्या विकासात भर टाकणाऱ्या ज्ञानगंगा अभ्यारण्य बोथा घाटातील उड्डाणपुल व बुलडाणा शहरासाठीचा बायपास या मागण्यासाठी मा.आमदार विजयराज शिंदे यांनी सातत्याने पाठपुरावा सुरु ठेवला आहे. या बाबत शासन दरबारी वरिष्ठ पातळीवर बैठका सुद्धा पार पडल्या आहेत.ना.गडकरी साहेब यानी बुलडान्यासाठीच्या बायपास ला तात्विक मान्यता दिल्या नंतर अंदाज पत्रकही तयार करण्यात आलेले आहे. पुढील केंद्र पातळी वरील मान्यतेसाठी व निधि उपलब्ध करून देण्यासाठी आज दि.08/11/2020 रोजी मा.आमदार विजयराज शिंदे यांनी केंद्रीय रस्ते विकास मंत्री ना.नितिनजी गडकरी यांची नागपुर येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेऊन बोथा घाटातील उड्डाणपुल व बुलडाणा शहरासाठीचा बायपास याबाबत सविस्तर माहिती दिली व राज्यशासनाकड़े प्रस्ताव प्रलंबित असल्याचे ना.गडकरींच्या लक्षात आणून दिले.

ना.गड़करी यांना दिलेल्या लेखी निवेदनात नमूद आहे की,
“आपण भारतीय जैन संघटनेच्या बुलडाणा जिल्ह्यातील कार्यक्रमासाठी आलेले असताना मी दि 3 मार्च 2018 रोजी बुलडाणा शहरातील बायबास किंवा उड्डाणपूल तसेच ज्ञानगंगा अभयारण्य बोथा घाटातील उड्डाणपूल पूलासाठी मान्यता देऊन काम सुरू करणेबाबत आपणास आणि तत्कालीन मुख्यमंत्री मा देवेंद्रजी फडणवीस यांना पत्र दिले होते .
सदर पत्रातील विनंती नुसार तत्कालीन मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव मा प्रवीण परदेशी यांनी त्यांच्या दालनात दि 22 मे 2018 रोजी उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची व्हीडीओ कॉन्फरन्सव्दारे मीटिंग घेतली होती .
सदर मीटिंगमध्ये ठरल्याप्रमाणे बुलडाणा शहरासाठीच्या बायपास आणि ज्ञानगंगा अभयारण्य यामधून जाणाऱ्या रस्त्यावर तारेचे कुंपण किंवा उड्डाणपूल बनविण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करण्याचे ठरले होते . तसेच अभयारण्य यातील उड्डाणपूल की तारेचे कुंपन यासाठी मुख्य वनसंरक्षक यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून समितीने सुचविल्या प्रमाणे कार्यवाही कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग यांच्यामार्फत प्रस्ताव केंद्राकडे सादर करण्याचे ही ठरले होते .
त्यानुसार दि 17/7/2018 रोजी मुख्य वनसंरक्षक वन्यजीव अमरावती यांच्या अध्यक्षतेखाली बुलडाणा येथे समितीची मीटिंग होऊन अभयारण्यांतून उड्डाण पूलाचे बांधकाम सर्व दृष्टीने सोईचे आणि फायद्याचे ठरेल असे सर्वानुमते ठरले होते .
उड्डाण पूल बनवल्यास वन्यजीवांचे अपघात होणार नाही ,वन्यजीवांचा मुक्त संचार होईल, वन संपदेची सुरक्षितता वाढेल .
उड्डाणपूलावरून येणाऱ्या जाणाऱ्या लोकाचे वन पर्यटन होईल .वाहतुकीसाठी रस्ता बंद करावा लागणार नाही .
उड्डाणपुलासाठी कोणतेही झाडे तुटणार नाही कारण अस्तित्वात असलेल्या रस्त्यावरच उड्डाणपुलाचे होणार आहे, उड्डाणपुल करताना वळणे कमी झाल्याने अंतर कमी होईल . पर्यायाने इंधनाची फार मोठी बचत होईल , वळणे कमी झाल्याने आणि उड्डाणपुलाचे काम सरळ होणार असल्याने आता असलेल्या वळणावरची जमीन वनविभागाला परत मिळेल, वनविभागाची जमीन केवळ उड्डाणपुलाचे पिलर साठीच लागणार असल्याने जमीनही वाचेल .

वरील मुद्दे विचारात घेता वन विभाग किंवा अभयारण्य यातून जाणाऱ्या रस्त्यावर उड्डाणपूल बनविणे सर्व दृष्टीने फायदेशीर ठरत असल्याने उड्डाणपुलच बनवावा असे ठरलेले आहे . तसेच हा पॅटर्न देशभरात वन विभागाच्या हद्दीत लागू केल्यास वन संपदेचे, पर्यावरण होणारे नुकसान टळेल तसेच वळणे कमी झाल्याने अंतर कमी होऊन इंधनाची बचतही होऊन राष्ट्रीय कार्यास हातभारही असेही समितीचे मत झालेले होते.
समितीच्या बैठकीनंतर कार्यकारी अभियंता , राष्ट्रीय महामार्ग यांनी ज्ञानगंगा अभयारण्य यातून जाणाऱ्या पुलाचे अंदाजपत्रकासह सविस्तर प्रस्ताव सादर करण्याचे ठरल्यानुसार कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग अकोला यांनी सदर उड्डाणपूलाचे अंदाजपत्रक जिल्हाधिकारी बुलडाणा यांच्या मार्फत राज्य शासनाकडे सादर केल्याची माहिती कार्यकारी अभियंता , राष्ट्रीय महामार्ग यांच्याकडून मिळालेली आहे.
सोबतच मलकापूर सोलापूर NH 753 A, अजिंठा _ बुलडाणा_ बैतुल 753 E , बुलडाणा _ धाड राज्यमार्ग 226 हे मार्ग बुलडाणा शहरातून जातात . त्यामुळे मोठ्या प्रमाणावर अपघात होऊन जीवित हानी होत आहे.अजिंठा बुलडाणा खामगाव शेगाव बैतुल या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे आणि ज्ञानगंगा अभयारण्य बोथा घाट तसेच बुलडाणा सुद्धा याच रस्त्यावर आहे.

अशी सर्व काही परिपूर्ण माहिती ना.गड़करींना देऊन राज्य शासनास सादर केलेल्या बोथा घाटातील उड्डाणपूलाचे व बुलडाणा
शहरासाठीचा बायपास रस्त्याचे अंदाजपत्रक केंद्रा कड़े बोलावून दोन्ही विकास कामांसाठी निधी उपलब्ध करुन द्यावा व काम तत्त्काळ सुरू करावे.
अशी आग्रही मागणी मा.आमदार विजयराज शिंदे यांनी ना.गड़करीं कड़े केली आहे.

पंचशील नगरात वीस वर्षीय युवतीची गळफास घेवून आत्महत्या

0

 

आयुषी दुबे शेगाव

:शेगाव: येथील पंचशील नगर मध्ये एका वीस वर्षे युवतीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना 7 नोव्हेंबर रोजी घडली याबाबत शहर पोलिस स्टेशन सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार निशा रमेश कराळे या वीस वर्षीय तरुणीने घरात कोणी नसताना ओढणीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज शनिवार 7 नोव्हेंबर दुपारी अडीच वाजेदरम्यान घडली याबाबत अंबादास विठ्ठल सहारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी आकस्मीत मृत्यूची नोंद केली आहे तपास पीएसआय इंगोले करीत आहेत

भाजप ओबीसी मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी दशरथ बनकर

0

 

ऋषी जुंधारे
जिल्हा प्रतिनिधी

वैजापूर । भाजप पक्षसंघटना विस्तारात नागरपालिकेतील भाजपचे गटनेते तथा नगरसेवक दशरथ बनकर यांची भाजप ओबीसी मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे.नगरपालिकेच्या राजकारणात मागील १५वर्षांपासून सक्रिय असलेल्या बनकर यांच्या माध्यमातून भाजपाने ओबीसी समूहाकडे लक्ष केंद्रित केले आहे.त्यांच्या निवडीचे पत्र ओबीसी मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र काळे यांनी दिले. त्यांचे खा. डॉ भागवत कराड, भाजपचे प्रदेश कार्यकारणी सदस्य एकनाथ जाधव,विजय औताडे,जिल्हा सरचिटणीस डॉ दिनेश परदेशी, तालुका अध्यक्ष कल्याण दांगोडे, डॉ हेडगेवार पतसंस्थेचे प्रशांत कंगले,जिल्हा कार्यकरणी सदस्य नबी पटेल, नगरसेवक राजेंद्र गायकवाड, दिनेश राजपूत, शैलेश चव्हाण,शहर अध्यक्ष भूषण निंबाळकर,युवा मोर्चाचे उपतालुका अध्यक्ष महेश भालेराव आदींनी अभिनंदन केले

कोरोनाच्या पार्श्वभुमीवर ग्रामीण भागात आगामी सण-उत्सव साजरे करत असताना शासनाने घालुन दिलेल्या नियम व अटींचे तंतोतंत पालन करावे असे आवाहन ठाणेदार माधवराव गरुड यांनी केले .

0

 

दिनांक ७ नोव्हेंबर ला पोलिस स्टेशन बोराखेडी येथे आयोजित पोलिस पाटील कार्यशाळेत ते बोलत होते .तज्ज्ञांच्या मते कोरोनाचे महाभयंकर संकट अद्यापही टळलेले नसून नागरिकांना तोंडाला मास्क लावण्याचे निर्बंध घालावे .वयोवृद्ध व लहान बालके यांना बाहेर न फिरण्याबाबत आश्वस्त करावे असेही त्यांनी सांगितले. जिल्ह्यात पुर्वमैनस्यातून सोयाबीन व तत्सम पिकांच्या सुडींना आगी लावण्याचे काम काही समाजकंटकांकडून होत आहे असे प्रकार आपल्या हद्दीत रोखण्यासाठी पोलिस पाटील बांधवांनी कसोशीने प्रयत्नरत राहून संशयितांची नावे पोलिस स्टेशनला कळवावीत. ग्रामीण भागात चोरीच्या घटना रोखण्यासाठी ग्रामपंचायत व तत्सम कार्यालयांसमोर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यासाठी संबंधितांना प्रेरित करावे असे आवाहन त्यांनी केले. कार्यशाळेस तालुक्यातील बहुसंख्य पोलीस पाटील यांची विशेष उपस्थिती होती .यावेळी पोलिस पाटीलांच्या अडी अडचणींसंदर्भात चर्चा होऊन त्यात मार्गदर्शन झाले .
ठाणेदार माधवराव गरुड यांच्या कारकिर्दीस आज
दोन वर्ष पूर्ण झाले. या कार्यकाळात पोलिस पाटील बांधवांना योग्य ते मार्गदर्शन व सहकार्य लाभले .याचे औचित्य साधून पोलीस पाटील संघटनेचे बुलडाणा
जिल्हाध्यक्ष विठ्ठल मनोहर पाटील यांनी ठाणेदार माधवराव गरुड यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला .
आज बोराखेडी पोलिस स्टेशनला नवीनच रुजू झालेले दुय्यम पोलिस निरीक्षक श्री भुसारी यांचा जिल्हा कार्यकारिणी सदस्य सुधाकर तायडे यांनी सत्कार केला .यावेऴी मोताळा तालुकाध्यक्ष संतोष ढोण पाटील गावकामगारचे जिल्हा कार्यकारी अध्यक्ष राजेंद्र भामद्रे तालुकाध्यक्ष बळीराम शेळके गजानन नारखेडे यांसह बहुसंख्य पोलीस पाटील उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचलन रामराव पंडीत पाटील यांनी केले.

आदर्श ग्राम वकाना ग्रामस्थांनी केला शंकर पुरोहित यांचा राज्यस्तरीय आरोग्य मित्र पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार

0

 

आदर्श ग्राम वकाना येथे माऊली सांप्रदायिक भजन मंडळाच्या वतीने संग्रामपूर मित्र परिवाराचे संस्थापक अध्यक्ष गोरगरिबांना अहोरात्र आरोग्य सेवा देणारे दानशूर व्यक्तिमत्त्व मा.शंकरभाऊ पुरोहित यांना राज्यस्तरीय आरोग्य मित्र पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.शंकरभाऊ पुरोहित यांच्या आंगमन प्रसंगी फटाके फोडन्यात आले आणि सांप्रदायिक पद्धतीने मिरवणूक काढून स्वागत करण्यात आले.गावातील प्रतिष्ठित व्यक्तींच्या हस्ते शंकरभाऊ पुरोहित यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी रामकृष्ण वानखडे होते तसेच सरपंच प्रशांत राऊत,उपसरपंच सुभाष उंबरकर,पोलीस पाटील भारत वेरुळकर,करुणाताई गावंडेउषाताई म्हसाळ, नलिनीताई उगले,वेरुळकर ताई तसेच संग्रामपूरहुन ह.भ.प.आंबलके महाराज,देविदास तायडे,डॉ.राजुभाऊ चोपडे,शालीग्राम घाटे,सारंगधर इंगळे व संग्रामपूर मित्रपरिवाराचे सदस्य यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.हरिभाऊ तायडे सर यांनी केले तर राहुल शिरसोले आणि हमीद पाशा यांनी शंकरभाऊ यांच्या सामाजिक कार्यावर प्रकाश टाकला आणि वकाना ग्रामस्थांचे आभार मानले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा.भाऊदेव म्हसाळ सर यांनी केले तर आभार शंकर बाजोळ यांनीं मानले.कार्यक्रमाला गावातील प्रतिष्ठित नागरिक,ज्येष्ठ व्यक्ती,पुरुष आणि महिला मंडळी तसेच संग्रामपूर मित्रपरिवाराचे सदस्य उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महादेव म्हसाळ, विश्वनाथ वेरुळकर, शाळीग्राम वेरुळकर, रामदास खोट्टे, शांताराम चिकटे, हरिभाऊ बोचरे,अंबादास गायकी,परमेश्वर निमकर्डे यांनी परिश्रम घेतले..!

चोरीच्या सात दुचाकी जप्त;गुन्हे शाखेची कामगिरी

0

 

गोंदिया-शैलेश राजनकर

तुमसर-पोलिस स्टेशन तुमसर व परिसरातून दुचाकी चोरीला जाण्याचे प्रमाण वाढल्याने पोलीस स्टेशन तुमसर येथील गुन्हे प्रकटीकरण शाखेने तपासाचे सुत्र हलवत अवघ्या दहा दिवसात सात चोरीच्या दुचाकी जप्त करुन आरोपींना जेरबंद केले.
मोहमद अनिस रईस (३0) रा. संघर्षनगर नागपूर, सुरज बलबिर सिंग (२0) रा. भवानी मंदिर संघर्ष नगर पारडी, दामोदर बाजिराव काटवले (३५) रा. तामसवाडी (तुमसर), नितीन कृष्णा गुर्वे (२४) रा. नवरगाव (तुमसर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींच्या ताब्यातून दुचाकी क्र. एम. एच ३१ व्ही. एस. ८३९२, एम. एच. ३१ सी. टी. ९६२८, एम. एच. ४९ ए. 0१४६, एम. एच. ४0 ए. ई. ५८६५, एम. एच. ३६ एम. ३६४७, एम. एच. ३१ डी. ई. ७६0८, एम. एच. ३६ एम. ६८२६ जप्त करण्यात आल्या आहेत. सदर दुचाकी या तुमसर व नागपूर येथून चोरी करण्यात आल्या होत्या. तसेच पोलीस स्टेशन तुमसर येथे चालू वर्षात एकुन तिन दुचाकी चोरीचे गुन्हे दाखल होते. त्या तिनही दुचाकी व नागपूर येथील चार दुचाकी चोरणार्‍यांना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. सदर कारवाई पोलिस निरीक्षक रामेश्‍वर पिपरेवार यांचे मार्गदर्शनात गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलिस उपनिरीक्षक संजयकुमार टेकाम, पोलिस हवालदार ओमप्रकाश चिचखेडे, संजय गर्जे, दिलीप धावडे, रितेश बर्वे, विनोद थोटे, बापुराव हुलगुंडे यांनी केली आहे.