Home Blog Page 592

सोयाबीन-कापसाच्या नुकसान भरपाईसाठी ‘आर पार’ च्या लढाईसाठी सज्ज रहा – रविकांत तुपकर..

0

 

 

स्वाभिमानी’ची खामगाव-शेगाव तालुक्याची नवीन कार्याकरिणी गठीत..

खामगाव – स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या खामगाव व शेगाव तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक आज ( ता.24 ऑक्टो. 2020) खामगाव येथे पार पडली. या बैठकीत बोलतांना रविकांत तुपकर म्हणाले की, राज्य सरकारने जाहीर केलेली नुकसान भरपाई ही तोकडी आहे. ही नुकसान भरपाई म्हणजे शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार आहे. शेतकऱ्यांना आत्महत्येच्या दारातून बाहेर काढायचे असेल तर सरकारने उदार अंतकरणाने हेक्टर ची अट न घालता सरसकट भरीव मदत करणे गरजेचे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना जिरायती क्षेत्रासाठी हे.25 हजार बागायतीसाठी हे.50 हजार व फळबागांसाठी हे. 1.00 लाख रु नुकसान भरपाई मिळावी, पिक विमा कंपन्यांना शेतकऱ्यांना विमा देण्यासाठी सरकारने भाग पाडावे, कापसाचे केंद्राच्या हमीभावा प्रमाणे खरेदी केंद्र चालू करावे तसेच सोयाबीनचा भाव 6000 रु प्रति क्विं. स्थिर करण्यासाठी केंद्र सरकारने धोरण आखावे व कर्ज माफीचा लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांचा कर्जमाफी योजनेत समावेश करण्यात यावा. या मागण्यांसाठी येणाऱ्या आठ दिवसांत विदर्भ-मराठवाड्यात ‘स्वाभिमानी’चे वतीने तीव्र आंदोलन उभारण्यात येणार आहे. या आंदोलनात ताकदीने रस्त्यावर उतरून “आर या पार” च्या लढाईसाठी सज्ज राहण्याचे आवाहन यावेळी रविकांत तुपकरांनी कार्यकर्त्यांना केले.
या बैठकीत घाटाखालील नव्याने संघटना बांधनी बाबत चर्चा करण्यात आली व संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्यामभाऊ अवथळे यांच्या नेतृत्वाखाली खामगाव व शेगाव तालुक्यात नव्याने गाव तिथे शाखा निर्माण करण्याचा निर्धार करण्यात आला..तसेच यावेळी खामगाव व शेगाव तालुक्यातील कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. यामध्ये घाटाखालील स्वाभिमानी अल्पसंख्याक आघाडीच्या जिल्हाध्यक्ष पदी मासूम शहा,जिल्हा प्रसिध्द प्रमुख पदी सोपान खंडारे, खामगाव तालुका संपर्क प्रमुख पदी आतिष पळसकर,पक्षाच्या तालुकाध्यक्ष पदी गोपाल ताठे, स्वाभिमानी युवाआघाडीच्या तालुकाध्यक्ष पदी संदीप चव्हाण, स्वाभिमानी अल्पसंख्याक आघाडीच्या तालुकाध्यक्ष पदी शेख युनिस शेख युसुफ, स्वाभिमानी विद्यार्थी आघाडी च्या तालुकाध्यक्ष पदी निलेश देशमुख, तालुका प्रसिद्ध प्रमुख पदी निलेश गवळी व पि.राजा जि.प.सर्कल प्रमुख पदी विठ्ठल महाले तसेच शेगाव स्वाभिमानी पक्षाच्या तालुकाध्यक्ष पदी अनिल पा.मिरगे, संघटनेच्या तालुकाध्यक्ष पदी गजानन राऊत, युवा आघाडीच्या तालुकाध्यक्ष पदी शिवा म्हसणे यांच्या पुढील सहा महिन्यासाठी निवडी करण्यात आल्या या सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे रविकांत तुपकरांनी अभिनंदन करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या..
या बैठकीला युवा विदर्भ कार्याध्यक्ष राणा चंदन, संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्याम अवथळे,जालना जिल्ह्याचे नेते मयुर बोर्डे, राज्य कार्यकारिणी सदस्य गिरीधर देशमुख, समाधान भातुरकर,गजानन पटोकार, श्रीकृष्ण काकडे,आनंदा आटोळे,भैय्या वाघ, रमेश कलाम, सोनू इंगळे,यांच्यासह खामगाव व शेगाव तालुक्यातील सर्व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते..

ग्राम मालठाणा येथील विवाहिता बेपत्ता

0

 

गजानन सोनटक्के
जळगाव जामोद

मुलीचे पासपोर्ट फोटो काढण्यासाठी गेलेली विवाहिता मुलीसह गायब झाल्याची घटना जामोद (ता. जळगाव जामोद) येथे समोर आली आहे. मालठाणा (ता. जळगाव जामोद) येथील सौ. राधा अंजूर पवार (22) ही महिला 22 ऑक्टोबरला सकाळी साडेदहाच्या सुमारास तिच्या पतीसह जामोदला पासपोर्ट फोटो काढण्यासाठी व दळणाकरिता आले होते. तिचा पती दळण दळण्यासाठी गेला व राधा मुलीसह फोटो काढण्यासाठी गेली. त्यानंतर ती गायब झाल्याचे तिच्या पतीचे म्हणणे आहे. पूर्ण गावात तिचा शोध घेतला असता ती मिळून आली नाही. मुलीसह ती हरविल्याची तक्रार जळगाव जामोद पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

ओला दुष्काळ’ जाहीर करुन,शेतकऱ्यांना आर्थीक मदत करा ; वसंतराव वानखेडे वंचित बहुजन आघाडी

0

 

मेहकर.आॅगस्टपासुन सुरु असलेल्या पावसामुळे होत्याचे नव्हते केले आहे.पोटच्या पोराप्रमाणे शेतकऱ्यांनी पिकांची जोपसना केली; परंतु अवकाळी पावसाने पिकासह साऱ्या स्वप्नांवर पाणी फिरविले आहे.
अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करून शेतकरी राजाला आर्थीक नुकसान भरपाई द्यावी,व विजबिल माफ करावे या मागणीसाठी उपविभागीय अधिकारी मेहकर यांना वंचित बहुजन आघाडीचे नेते वसंतराव वानखेडे यांनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांच्या कडे केली आहे.
ऐन दिवाळीत बरसलेल्या अवकाळी शेतातील कापूस, सोयाबीन, धान, ज्वारीसारखे पीक हातातून गेले.जिल्हातील शेतकरी परत संकटात आला. पाऊस व ढगाळ वातावरणामुळे पिकांना कोंबदेखील फुटले आहेत. अतिवृष्टीमुळे कापसाच्या झाडाचे खराटे झाले. शेतीसाठी लागलेला खर्चही शेतक-याला निघाला नाही़ त्यामुळे शेतकरी राजा हा मोठ्या संकटात सापडला असून तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा,व विजबिल माफ करावे यासाठी
वंचित बहुजन आघाडीचे
उपविभागीय अधिकारी यांना निवेदनात नमुद केले की
गेल्या अनेक वर्षांपासून सतत नापिकी यावर्षी करोनामारीच्या पार्श्वभूमीवर मुळे शेतकरी हात लागून मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे आणि त्यातच निसर्गाच्या अवकृपेने नुकताच हातातोंडाशी असलेला घास हिरव्या गेल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहे त्यामुळे शेतकऱ्याचा जीवन-मरणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याने त्याच्यापुढे आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय उरला नाही
या संपूर्ण परिस्थितीचा शासनाने सहानुभूतीपूर्वक विचार करून शेतकऱ्यांना मदतीचा हात देत सरसगट हेक्टरी 50 हजार रुपये मदत करावी व तसेच विज बिल माफ करीत धीर देण्याचे काम करावे अन्यथा देशाच्या पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांचा न्याय हक्काच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडी मेहकर लोणार च्या वतीने तीव्र स्वरूपाचे आक्रोश आंदोलन छेडण्यात येईल याची शासनाने नोंद घ्यावी असे निवेदन वंचित बहुजन आघाडी च्या मार्फत देण्यात आले आहे
त्यावेळेस संघपाल पनाड, वसंतराव वानखेडे, डॉ राहुल दाभाडे, सिद्धार्थ अमोल, बाळासाहेब चव्हाण,संदीप थोरात, दत्ता राठोड,राहुल अवसरमोल,शालिक्रम मोरे, संदीप मोरे,गणेश नागरिक,विजय माने, गौतम सरकटे,अमित काकडे, सुनील मोरे,जिवन जाधव प्रभाकर इंगळे, समाधान मोरे, संतोष साळवे,आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत

सेन्ट्रल बँक शाखाधिकारी श्री धीरज पाटील यांना गावकऱ्यांनी दिला निरोप समारंभ

0

 

पातुर्डा येथील सेन्ट्रल बँक ला 3 वर्षांपूर्वी ग्रामीण भाग म्हणून बँक मॅनेजर पदावर श्री धीरज पाटील यांची नियुक्ती झाली होती आज त्याच्या कार्यकिर्द ला 3 वर्ष झाल्यामुळे त्याची बदली जळगाव खांदेश येथील रिजन मध्ये शहरी भागात होऊन पदोन्नती मिळाली आहे,त्यांना पातुर्डा येथील गावकरी मिळून निरोप समारंभ देण्यात आला
सेन्ट्रल बँक चे कर्मचारी श्री चौधरी साहेब,कृषी अधिकारी विलास टेभरे साहेब,उखळी ब्रांच चे शाखाव्यवस्थापक व उपशाखाव्यवस्थापक यांच्या वतीने त्यांना शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला,नेकनामपूर येथील पोलीस पाटील प्रशांत चोपडे,ता अध्यक्ष भाजप लोकेश राठी, माजी उपसरपंच निलेश चांडक, अविनाश धर्माळ, विनायक चोपडे, श्रीकृष्ण खोंड, सुखदेव बावस्कर,न्यानेश्वर तायडे,श्याम देशमुख, कृष्णा भुतडा,लतीश भूतडा, पवन खंडेराव,सचिन राहाटे, कैलास डबाळे, नितीन क्षीरसागर, गणेश राठी, घनश्याम चांडक,अमित भोंगळ,गणेश राहाटे, रवी दामधर,विलास इंगळे,सैय्यद लियाकत,उमेश सुरडकार,प्रमोद मावळे,दीपक बोचरे यांनी बँक मॅनेजर श्री धीरज पाटील यांचा शाल,श्रीफळ, भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व या नंतर साहेबांच्या पातुर्डा येथील 3 वर्षांच्या कार्यकिर्दीवर श्री प्रशांत चोपडे,श्री निलेश चांडक,श्री लोकेश राठी यांनी भाषण दिले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्यात.श्री धीरज पाटील यांनी 3 वर्षात या गावाला व परिसरातील गावाला आपले मानून काम केले जमे पर्यंत कोणाचेही काम रुकु नाही दिले आणि जास्तीत जास्त युवकांना मार्गदर्शन दिले व ज्यांना गरज आहे त्यांना प्रांतप्रधान यांची मुद्रा योजना देऊन सहकार्य केले

प्रधानमंत्री आवास योजनेचा पात्र लाभार्थ्यांना लाभ द्यावा खासदार प्रतापराव जाधव प्रधानमंत्री आवास योजना आढावा बैठक

0

 

नगरपालिकांनी घरकुलांचा डीपीआर मंजूर करवून घ्यावा
डीपीआरनुसार आलेला निधी त्याच उद्दिष्टासाठी खर्च करावा

अजहर शाह मोताळा प्रतिनिधी

दि. 23 : केंद्र शासनाने सर्वांसाठी घरे 2022 हे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यानुसार राज्य व केंद्र शासन समन्वयातून प्रधानमंत्री आवास योजना (नागरी) राबवित आहे. या योजनेनुसार बेघर, कच्चे घरामध्ये राहणाऱ्या प्रत्येक पात्र लाभार्थ्याला घरकूल मिळणार आहे. नगरपालिका नागरी भागातील अंमलबजावणी यंत्रणा आहे. तरी प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत पात्र लाभार्थ्यांना घरकूलांचा लाभ देण्यात यावा, अशा सूचना खासदार तथा केंद्रीय ग्रामविकास समितीचे अध्यक्ष प्रतापराव जाधव यांनी आज दिल्या आहेत.
प्रधानमंत्री आवास योजना (नागरी) अंतर्गत सर्वांसाठी घरे 2022 या उपक्रमाची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी आढावा घेताना खासदार बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आमदार संजय गायकवाड, जिल्हाधिकारी एस राममूर्ती, बुलडाणा कृउबासचे प्रशासक जालींधर बुधवत आदी उपस्थित होते.
नगरपालिकांनी पात्र लाभार्थ्यांच्या घरकुलांचा पाठविलेला डिपीआर (डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट) संबधीत वरिष्ठ स्तरावरून मंजूर करवून घेण्याचे सूचीत करीत खासदार श्री. जाधव म्हणाले, डीपीआर पाठविताना त्यामध्ये त्रुटी नसाव्यात. डीपीआर मंजूर झाल्यानंतर तातडीने नगर पालिकांनी संबंधीत लाभार्थ्यांच्या घरकुलांचे सर्वेक्षण करावे. सर्वे करणाऱ्या एजन्सीकडे यासाठी सातत्याने पाठपुरावा करावा. जर प्रतीसाद मिळत नसेल, तर नियमानुसार त्यांच्यावर कारवाई करावी. तसेच घरकुल जागेच्या मोजण्या पूर्ण कराव्यात. भूमि अभिलेख विभागाने यासाठी पुढाकार घेवून मोजण्या गतीने पुर्ण करून द्याव्यात. जेणेकरून लाभार्थी घरकुलाच्या कामाला सुरूवात करू शकेल. एका घरकुलासाठी 323 स्क्वेअर फुट जागा पाहिजे. त्यानुसार जागेची उपलब्‍ध्‍ाता करून घ्यावी.
ते पुढे म्हणाले, नगर पालिकांनी घरकुलांचे पात्र लाभार्थ्यांना पहिले इन्स्टॉलमेंट देवून प्राप्त झालेल्या रक्कमेतून दुसरे इस्टॉलमेंट देता येत असल्यास ते द्यावे. जेणेकरून लाभार्थ्याला घरकुलाचे बांधकाम पुर्ण करण्यास मदत होईल. घरकुलांचा पुर्ण निधी मिळण्यासाठी नगरपालिकांनी आपल्या स्तरावरून पाठपुरावा करावा. तसेच मंजूर डिपीआरनुसार प्राप्त झालेला निधी त्याच उद्देशासाठी खर्च करावा. पायाभूत सोयी सुविधांसाठीचा निधी अन्यत्र खर्च करू नये. नगर पालिकेतील अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधींच्या चांगल्या कामांना नियमानुसार नेहमी सहकार्य करावे.
मेहकर येथील आयएचडीपी (इंटीग्रीटेड हाऊसिंग डेव्हलपमेंट प्रोग्रॅम) अंतर्गत निर्माण करण्यात ओलल्या घरकुलांमधील अवैध लोकांना बाहेर काढून नियमानुसार घरकुले वाटप करण्याची कारवाई करावीर. या घरकुलांमध्ये पात्र लाभार्थी नाहीत. पात्र लाभार्थ्यांना नियमानुसार घरकुले द्यावीत. या घरकुलांचा वापर अवैध कामांसाठी होत आहे. त्यांच्यावर कारवाई करावी. अवैध रित्या राहत असलेल्या नागरीकांना बाहेर काढावे अन्यथा त्यांची दुसरीकडे राहत असलेली घरे जप्त करावी, असे निर्देशही खासदार श्री. जाधव यांनी दिले. बैठकीचे संचलन नागरी विकास यंत्रणेचे कार्यक्रम अधिकारी श्री. शेळके यांनी केले. बैठकीला सर्व नगरपालिकांचे मुख्याधिकारी, म्हाडाचे अधिकारी व संबंधीत यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.
मोठ्या रस्त्यांना जोडणाऱ्या ग्रामीण रस्त्यांचे जंक्शन अपघात प्रवण नसावे
– खासदार प्रतापराव जाधव
रस्ता सुरक्षा समिती बैठक
बुलडाणा (जिमाका), दि. 23 : सध्या जिल्ह्यात बऱ्याच रस्त्यांची कामे सुरू आहे. अनेक रस्त्यांची कामे पुर्ण झाली आहेत. राष्ट्रीय, राज्य, प्रमुख जिल्हा मार्ग आदी मोठ्या रस्त्यांना ग्रामीण भागातील गाव रस्ते जोडलेले असतात. जिल्ह्यात मात्र ग्रामीण रस्ते मोठ्या रस्त्यांना जोडणाऱ्या जंक्शनच्या ठिकाणी अपघात प्रवण स्थळ निर्माण झालेले आहे. कंत्राटदारांच्या चुकांमुळे अशा ठिकाणी अपघात घडत आहेत. त्यामुळे मोठ्या रस्त्यांना जोडणाऱ्या ग्रामीण रस्त्यांचे जंक्शन अपघात प्रवण नसावे, असे निर्देश खासदार तथा केंद्रीय ग्रामविकास समिती अध्यक्ष प्रतापराव जाधव यांनी दिले आहेत.
रस्ता सुरक्षा समितीच्या आढावा बैठकीचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात करण्यात आले. त्यावेळी आढावा घेताना खासदार बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जिल्हाधिकारी एस राममूर्ती, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे, निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते, बुलडाणा कृउबासचे प्रशासक जालींधर बुधवत आदी उपस्थित होते.
ते पुढे म्हणाले, सध्या जिल्ह्यात काही रस्त्यांची कामे सुरू असून अशा निर्माणाधीन रस्त्यांवर सुरक्षेचे सर्व नियम पाळल्या गेले पाहिजे. रस्ता काम सुरू असताना रस्ता सुरक्षेचे नियम व उपययोजना न केल्यामुळे अपघात होतात. त्यामध्ये नाहक जीव जातो. अशा परिस्थितीत संबंधीत कंत्राटदारांनी रस्ता सुरक्षेच्या उपाययोजना करण्यासाठी यंत्रणांनी लक्ष द्यावे. रस्ता निर्मिती सुरू असताना धुळ न उडण्यासाठी ठराविक कालावधीनंतर पाण्याचा वापर करावा.
रस्ता कामामुळे खराब झालेल्या ग्रामीण रस्त्यांची तातडीने संबंधीत यंत्रणांनी डागडुजी करून घ्यावी. संबंधीत यंत्रणांनी समितीला वेळोवेळी मागितलेले अहवाल उपलब्ध करून द्यावे. अपघात प्रवण स्थळांसाठी केलेल्या कार्यवाहीचा अहवाल द्यावा. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील खड्डे तातडीने बुजवून रस्ता वाहतुकयोग्य करावा, अशा सूचनाही खासदार यांनी याप्रसंगी दिल्या. बैठकीला उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे यांनी माहिती दिली. यावेळी संबंधीत यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.

संग्रामपूर मित्र परिवाराचे अध्यक्ष मा.शंकरभाऊ पुरोहित आरोग्य मित्र पुरस्काराने सन्मानित

0

 

 

सण 2020 चा आरोग्य मित्र पुरस्कार संग्रामपूर शहरातील जनसेवक संग्रामपूर मित्र परिवाराचे अध्यक्ष मा.शंकरभाऊ पुरोहित यांना जाहीर करण्यात आला आहे.बहुजन ग्रामीण विकास संस्था, जळगाव जा.वतीने दर 5 वर्षांतून एकदा समाजातील प्रतिभावंत,विचारवंत, सामाजिक,आरोग्य,उद्योग क्षेत्रात अलौकिक काम करणाऱ्या मान्यवरांना त्यांच्या कार्याचा गौरव, सन्मान व्हावा यासाठी बहुजन समाज भूषण,उद्योग मित्र,आरोग्य मित्र असे तीन पुरस्कार देण्यात येतात.संग्रामपूर आणि जळगांव जा.या आदिवासी बहुल भागात गोरगरीब, गरजु लोकांना अविरत आरोग्य सेवा रात्रंदिवस पुरविण्याचे काम शंकरभाऊ पुरोहित करत आहेत.त्यांच्या कार्याचा गौरव सन्मान करण्यासाठी मा.शंकरभाऊ पुरोहित यांना आरोग्य मित्र पुरस्कार देण्यात येत आहे.

संग्रामपूर मित्र परिवार

 

 

पोलीस उपनिरीक्षक श्री. एस. पी. चौरे यांचा वालुर येथील नागरिकांनी केला सत्कार

0

 

अजहर पठाण वालुरकर

सेलू पोलीस ठाणे अंतर्गत येत असलेल्या वालुर पोलीस दुरक्षेत्राचे प्रमुख सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्री. एस. पी. चौरे यांना पदोन्नती मिळाली असल्याने ते नांदेड येथील परिक्षेत्र येथे रुजू होतील वालुर येथील नागरिकांनी त्यांचा सत्कार केला
श्री. दगडोबा जोगदंड पाटील यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन त्यांना निरोप देण्यात आला. यावेळी पांडूरंग रोकडे, सुनील खपले, अजहर पठाण, बालाजी, शेख फेरोज, गोविंद शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते

रुग्ण कल्याण कार्यकारी समिती सदस्य पदि आरोग्यदुत पराग गवई यांची नियुक्ती.

0

 

 

 

अकोला :- जिल्ह्यातील आरोग्य क्षेत्रात समाजसेवेचे काम करणारे आरोग्य दुत व वंचित बहुजन आघाडीचे  सामाजिक कार्यकर्ते पराग गवई हे अनेक वर्षा पासून रूग्नसेवा व समाजसेवेचे कार्य करीत आहेत. अकोला जिल्ह्यातीलच नव्हे तर जिल्ह्याबाहेरिलही कुणाला अकोला जिल्ह्यात आरोग्य विषयक समस्या निर्माण झाल्यास  तात्काळ धावून जाणारे पराग गवई यांच्या कार्याची दखल घेउन वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आदरणीय ॲड. बाळासाहेब आंबेडकर व आदरणीय प्रा. अंजलीताई आंबेडकर यांच्या आदेशानुसार अकोला जिल्हा परिषद अध्यक्ष सौ प्रतिभाताई भोजने यांनी त्यांचा प्रतिनिधी म्हणून पराग गवई यांची अकोला जिल्हा स्त्री रुग्णालय रुग्ण कल्याण कार्यकारी समीतीच्या सदस्य पदी नियुक्ती केली. यावेळी पक्षाचे नेते मंडळीनी त्यांचे स्वागत केले तसेच अकोला जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षिका डॉ आरती कुलवाल यांनी त्यांचे स्वागत केले.

खंबाळे येथे झालेल्या अतिवृष्टीमूळे झालेल्या भात नुकसानीची पाहणी.

0

 

सागर जैवाळ फुलंब्री तालुका प्रतिनिधी.

इगतपुरी तालुक्यातील खंबाळे येथे अतिवृष्टीमुळे झालेल्या भात पिकाच्या नुकसानीच्या पाहणी दौरा आज पार पडला.यावेळी उपविभागीय अधिकारी तेजस चव्हाण, उपविभागीय कृषी अधिकारी एस. पी. सूर्यवंशी, तहसीलदार परमेश्वर कासुळे, तालुका कृषी अधिकारी एस. आर. तवर, मंडल अधिकारी आर.आर. पाटील आदी उपस्थित होते.
गेल्या दोन दिवसात नाशिक जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यासाठी राज्यशासन शेतकऱ्यांना सर्वोतोपरी मदत करणार असून शेतकऱ्यांना अधिकची मदत मिळावी, यासाठी केंद्र सरकारकडे राज्यशासनसमार्फत प्रस्ताव पाठविला जाईल
नाशिक जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्याअनुषंगाने झालेल्या पीक नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांना दिल्या आहेत. जिल्हा प्रशासनाने पंचनाम्याचा अहवाल लवकरात लवकर सादर करण्यात करावा, जेणे करून मंत्रीमंडळाच्या बैठकीत याबाबत निर्णय घेऊन लवकरच मदत जाहीर केली जाईल.
गेल्या आठ महिन्यांपासून कोरोनाच्या काळात सर्वत्र लॉकडाऊन असल्याने राज्यसह संपूर्ण देश आर्थिक संकटात आहे. अशाही परिस्थितीत महात्मा फुले कर्जमाफी योजनेच्या माध्यमातून साधारण 20 हजार कोटींची मदत शेतकऱ्यांना देण्यात आली आहे. आता उद्धभवलेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या अनुषंगाने आवश्यक ती सर्व मदत राज्य शासन करण्यास प्रयत्नशील आहे.

संपुर्ण राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. त्याची शासनामार्फत पाहणी करण्यात येत आहे. यापाहणी अंतर्गत कोणत्या पिकांचे व किती हेक्टरमध्ये नुकसान झाले आहे, याबाबत माहिती घेण्याचे काम सुरू असून राज्याचे मुख्यमंत्री देखील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करीत आहेत. आणि संबंधित विभागांना तात्काळ उपाययोजना करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत

Nationalist Congress Party – NCP
Igatpuri

सेलू तालुक्यातील शेतकऱ्यांचे विरोधी पक्ष नेते श्री. देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले. पिकांचे नुकसान भरपाई शासनाने त्वरीत द्यावी

0

 

अजहर पठाण
सेलू/परभणी

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्ष नेते श्री. देवेंद्र फडणवीस हे खरीप पिकांचे नुकसान अतिवृष्टी ग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी मराठवाडा दौऱ्यात सेलू तालुक्यातील देवगाव फाटा येथे आले असता सेलू तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती श्री. रवींद्र डासाळकर, भा ज पा किसान मोर्चाचे श्री. दगडोबा जोगदंड पाटील, चंद्रकांत चौधरी, गोविंद मगर, शिवाजी हिंगे, लक्ष्मण जाधव यांनी सेलू तालुका ओला दुष्काळ जाहीर करावा, सरसकट कर्ज माफी करावी या मागणीचे निवेदन विरोधी पक्ष नेते यांना देण्यात आले. यावेळी सेलू जिंतूर तालुक्याच्या आमदार सौ. मेघना दिदी बोर्डीकर उपस्थित होत्या.