Home Blog Page 593

वाघाने घेतला बोकडाचा बळी

0

 

गोंदिया-शैलेश राजनकर

अर्जूनी/,मोर,दि.21ः-अर्जुनी-मोर वन विभागांतर्गत येणाऱ्या बोंडगाव देवी परिसरात वाघाची दहशत पसरली असून जनतेमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे .20 आँक्टोंबरच्या रात्री 11:30वाजता बोडंगाव देवी येथील यशवंत नेवारे यांच्या गोठ्यात शिरुन वाघाने बाधंलेल्या बोकडाला फस्त केल्याची घटना घडली. यशवंत नेवारे यांना जाग आल्याने त्यांनी वाघाला बघताच आरडाओरड केली असता परिसरातील नागरिक एकत्र येऊन ओरडू लागल्याने तिथून वाघाने पळ काढला.दोन दिवसाआधी रामकृष्ण झोळे यांच्या घरातील कोंबड्या वाघाने फस्त केल्या.गेल्या अनेक दिवसापासून या परिसरात वाघाची दहशत पसरली असून वनविभागाचे कर्मचारी व अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत आहेत. नेवारे यांच्या गोठ्यात बांधलेला बोकडाला वाघाने फस्त केल्याने वन अधिकाऱ्यांना माहिती देत आर्थिक नुकसान झाल्याने भरपाईची मागणी केली आहे. ज्या ज्या कुटुंबातील वाघाने कोंबड्या बकऱ्यांची नुकसान केली अशा सर्व कुटुंबांना वन विभागाकडून मदत द्यावी व दहशत असलेल्या वाघाचा पकडून बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी बोंडगाव देवी सर्व परिसरातील जनतेने केली आहे.

सावता परिषद कडून नवनिर्वाचित तहसीलदार यांचा सत्कार

0

 

सागर जैवाळ
तालुका प्रतिनिधी फुलंब्री

बीड चे नवीन तहसीलदार म्हणून सुशांत शिंदे साहेब यांनी पदभार स्वीकारला सावता परिषदेच्या वतीने सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी पोलीस उपनिरीक्षक हजारे साहेब ,सावता नागरी पतसंस्थेचे संचालक नामदेव दुधाळ,सावता परिषदेचे राज्य प्रवक्ते डॉ. राजीव काळे ,बीड जिल्हाध्यक्ष किशोर राऊत जिल्हाकार्यध्यक्ष सुनील शिंदे ,युवक आघाडी जिल्हाध्यक्ष नितीन शिंदे,बीड शहराध्यक्ष संग्राम शिंदे,बोरसे सर आदी उपस्थित होते.

नुकसान भरपाईसाठी रविकांत तुपकरांच्या नेतृत्वाखाली ‘स्वाभिमानी’चा जिल्हाधिकारी कार्यालयावर राडा..

0

 

नेते- मंत्र्यांचे फोटोसेशन नको तात्काळ नुकसान भरपाई द्या – रविकांत तुपकर..

रविकांत तुपकरांसह ‘स्वाभिमानी’च्या 200 पेक्षा जास्त कार्यकर्त्यांना पोलिसांकडून अटक..

नुकसान भरपाईचे आंदोलन अधिक तीव्र करणार – रविकांत तुपकर..

अजहर शाह मोताळा प्रतिनिधी

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची सोयाबीन-कापूस उत्पादक शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई मिळावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेश नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.
यावेळी ‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांनी सडलेले सोयाबीन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आणून टाकली..यावेळी पोलीस व ‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष निर्माण झाला व पोलिसांनी यावेळी रविकांत तुपकरांसह 200 पेक्षा जास्त कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले..
पोलिसांनी कितीही आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला तरी यानंतर नुकसानभरपाईसाठीचा लढा अधिक तीव्र करण्यात येईल तसेच नेत्यांच्या व मंत्र्यांच्या फोटोसेशन चा आम्हाला वीट आला आहे.आत्महत्या केल्यावरच मदत देणार का..? असा सवाल उपस्थित करत, शेतकऱ्यांना तात्काळ नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी यावेळी रविकांत तुपकरांनी केली..तसेच कापसाच्या हमीभावा पेक्षा कमी किमतीने कापूस खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करून कापसाची हमीभावाने खरेदी करावी व पिक विमा कंपन्यांना सरकारने निर्देश देवुन पिक विम्याची रक्कम जमा करावी,अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली..
या आंदोलनात ‘स्वाभिमानी’चे विदर्भ प्रमुख दामोदर इंगोले, युवा विदर्भ कार्याध्यक्ष राणा चंदन,संघटनेचे जिल्हाध्यक्ष शाम अवथळे (घाटाखालील) डॉ.ज्ञानेश्वर टाले (घाटावरील), पक्षाचे जिल्हाध्यक्ष बबनराव चेके (घाटावरील),अमोल राऊत (घाटाखालील) विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष पवन देशमुख,नितीन राजपूत,भारत वाघमारे,प्रदीप शेळके,सैय्यद वसीम,राजेश गवई,दत्ता जेऊघाले,मारोती मेढे,प्रफुल्ल देशमुख,आकाश माळोदे यांच्यासह ‘स्वाभिमानी’चे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते..तुपकरांसह सर्व कार्यकर्ते अद्यापही बुलडाणा पोलिसांच्या अटकेत आहेत..

जामोद महावितरण केंद्राचा भोंगळ कारभार सर्रास चालू आहे अवैधरित्या कनेक्शन स्थानिक कर्मचाऱ्यांचा काही साटंलोटं तर नाही ना असा सवाल

0

 

अनिलसिंग चव्हाण
मुख्य संपादक

जळगाव जामोद उपविभागातील जामोद वितरण केंद्र अंतर्गत येणाऱ्या करमोळा गावांमध्ये सर्रास वीजचोरी चालू आहे जामोद ते टुनकी रोड वरती तीन ढाब्यावरती सर्रासपणे अवैधरित्या विजेची चोरी होत आहे तरीपण महावितरणचे कर्मचारी अधिकारी कुंभकरण झोपी मध्ये आहे तसेच आजूबाजूच्या खेळामध्ये सुद्धा अवैधरित्या चोरीचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आहे या अवैध कनेक्शन मुळे बऱ्याच वेळा महावितरण चे तार तुटण्याच्य पण प्रकार वाढत आहे तसेच गावांमधील ट्रांसफार्मर वरील फ्युज जाण्याचे प्रकार होत आहे तसेच करमोळा भागांमध्ये लाईट जाण्याचे प्रमाण सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आहे तरी महावितरण वरिष्ठ अधिकारी याकडे लक्ष देतील का अशी मागणी येथील नागरिक करीत आहे

 

अमरावती विद्यापीठाच्या 21 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलल्या 22 ऑक्टोबर पासूनच्या परीक्षा वेळापत्रकानुसार होणार.

0

 

अकोला :-संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्यावतीने सर्व संबंधितांच्या माहितीकरीता कळविण्यात येते की, दि. 4 ऑक्टोबर व 15 ऑक्टोबर रोजी उन्हाळी 2020 परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले होते, त्यानुसार दि. 20 ऑक्टोबर, 2020 रोजी झालेल्या उन्हाळी 2020 परीक्षेमध्ये मोठ¬ा प्रमाणात तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यामुळे अनेक विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहिले आहेत. सदर बाब लक्षात घेता, ज्या विद्याथ्र्यांनी दि. 20 ऑक्टोबर, 2020 रोजी यशस्वीपणे ऑनलाईन व ऑफलाईन परीक्षा दिलेली आहे, त्यांची परीक्षा ग्राह्र समजण्यात येईल. तसेच जे विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहिले आहेत, त्यांची परीक्षा पुन्हा घेण्यात येणार असून दि. 20 ऑक्टोबर, 2020 रोजीच्या परीक्षांचे वेळापत्रक लवकरच विद्यापीठाकडून जाहीर करण्यात येईल. दि. 20 ऑक्टोबर, 2020 रोजी यशस्वीपणे परीक्षा दिलेल्या ज्या विद्याथ्र्यांना पुन्हा परीक्षा द्यावयाची असेल, अशा विद्याथ्र्यांना पुन्हा परीक्षा देता येईल, याची कृपया विद्याथ्र्यांनी नोंद घ्यावयाची आहे.

याशिवाय दि. 21 ऑक्टोबर, 2020 रोजी नियोजित असलेल्या सर्व परीक्षा स्थगित करण्यात आल्या असून त्या परीक्षा (21 ऑक्टोबर रोजीच्या) दि. 8 नोव्हेंबर, 2020 रोजी यापूर्वी जाहीर करण्यात आलेल्या वेळापत्रकातील वेळेतच घेण्यात येतील. दि. 22 ऑक्टोबर, 2020 पासून सुरु होणा­या सर्व परीक्षा प्रसिद्ध करण्यात वेळापत्रकानुसारच होतील. तरी संबंधित सर्व विद्यार्थी, पालक, अभ्यागत तसेच महाविद्यालयांनी याची नोंद घ्यावी, असे विद्यापीठाच्यावतीने परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. हेमंत देशमुख यांनी दि. 20 ऑक्टोबर, 2020 रोजी प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकानुसार कळविले आहे.

सोलापुर शहरातुन होणारी जडवाहतुक बंद करा व परतीचा पाऊसामुळे जिल्ह्यात शेतीचे आतोनात नुकसान झाले असुन शासनाने त्वरीत नुकसान भरपाई ची मागणी.

0

 

विश्वनाथ बिराजदार सोलापुर

सोलापुर शहरातुन बोरामणी नाका ते विजापुर रोड सफैल मार्गे होणारी जड वाहतुक त्वरीत बंद करावी व पर्यायी मार्ग म्हणुन बाहय वळणाने जड वाहतुक वळवावी तसेच सोलापुर जिल्ह्यात परतीचा पाऊसामुळे शेतीचे आतोनात नुकसान झाले असुन नुकसान ग्रस्त शेतकरी बांधवाना त्वरीत मदत महणुन हेकटरी 30,000/- रुपये जिल्हा प्रशासन व महाराष्ट्र शासनाने मदत म्हणुन त्वरीत दयावे अशी मागणी स्वराज्य माझा संघटनेचे संस्थापक तथा कॉग्रेसचे प्रवक्ते प्रा.डॉ.पंकज शरणार्थी यांनी सोलापूरचे निवासी जिलहाधिकारी अजित देशमुख यांचाकडे केली आहे

  • सोलापुर शहरातुन होणा-या जड वाहतुकीमुळे रस्ते खड्डेमय झाले असुन यामुळे वारंवार लहान-मोठे अपघात होत असुन स्थानिक प्रशासन व लोक प्रतिनिधि यांचे याकडे साफ दुर्लक्ष झाले आहे रस्त्यावरचे खड्डे त्वरीत बुझवुन शहरातुन जाणा-या जड वाहतुकीचा विषय कायमचा निकाली काढावा व बोरामणी नाका ते विजापुर रोड सैफुल रस्ता अरुंद असुन येथे सिमेंट रोड करुन मजबूत रस्ता तयार करावा अशी ही मागणी प्रा.डॉ.पंकज शरणार्थी यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांचाकडे केली आहे
    यावेळी प्रा.राहुल बोळकोटे, प्रा. प्रमोद मनुरे,स्वराज्य माझा संघटना दक्षिण सोलापुर तालुका अध्यक्ष सुनिल धानगोंडा ,तालुका युवक समन्वयक सागर म्हेत्रे,वी.डी.गायकवाड,महेश कुंभार, सिद्धार्थ कलशेटटी आदी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते

नवरात्री निमित्त नारी शक्तिंचा भाजपा नेते मा.आमदार विजयराज शिंदे यांच्या निवासस्थानी साडी चोळी देऊन सत्कार

0

 

आ_श्वेताताई_महाले यांच्या हस्ते सत्कार

अजहर शाह मोताळा प्रतिनिधी

आज दि.२०/१०/२०२० रोजी भाजपा नेते मा.आमदार विजयराज शिंदे व सौ.अर्पिताताई विजयराज शिंदे या दांम्पत्यांकडून राम नगर येथील निवासस्थानी नवरात्री निमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नारीशक्तिच्या सत्कार आमदार श्वेताताई महाले यांच्या शुभहस्ते पार पडला.
आमदार श्वेताताई महाले यांच्या संकल्पनेतुन नवरात्री उत्सवात विविध नारी शक्तिंचा सन्मान करण्याचा उपक्रम सुरु आहे.याच संकल्पनेस दुजोरा देत भाजपा नेते विजयराज शिंदे यांनी सपत्नीक नवरात्रीच्या पर्वावर नऊ नारिशक्तीचा सत्कार आ.श्वेताताई महाले यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित केला होता.
प्रथमतः आमदार श्वेताताई महाले यांचा जि.प.सदस्य ते एक आमदार तसेच समाजकारण व राजकारणातिल विशेष कामगिरी करून महिलांत आदर्श निर्माण केल्याबद्दल लोकनेते विजयराज शिंदे व सौ.अर्पिताताई विजयराज शिंदे यांच्या कडून नारिशक्ती म्हणून साडीचोळी देऊन स्वागत सत्कार करण्यात आला.
विविध मान्यवरांच्या उपस्थितीत ज्या नारिशक्तिंचा सत्कार करण्यात आला त्या मध्ये सेवा संकल्प परिवारात पालवे दांपत्यां समवेत निराधार,मानसिक रुग्ण,अपंग यांची सेवा करणाऱ्या करून, साहित्य क्षेत्रातील विशेष कामगिरी बद्दल प्रा.सौ वंदना निशिकांत ढवळे यांचा साड़ीचोळी देऊन स्वागत सत्कार करण्यात आला.
महिला व बाल गुन्हेगारी क्षेत्रात विधिज्ञ म्हणून विविध महत्वपूर्ण पदांवर जबाबदारी पार पाडणाऱ्या ऍड.सौ.किरणताई राठोड,
वन्यजीव सोयऱ्या म्हणून सतत सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या प्रा.वंदना काकड़े,बचत गटाच्या माध्यमातून महिला सशक्तिकरण करणाऱ्या प्रतिभा संजय आराख ,सौ.पांडेताई तसेच आयुर्वेद उत्पादन व महिला बचतगटात विशेष कार्य करणाऱ्या सौ रेणुका अनुराज भालेराव, विशेष सत्कार म्हणजे हतेडी गावच्या महिलेने श्रीमती पंचफूला छगन सुरभे या महिलेने स्वतः बारा वर्ष ऑटो रिक्शा चालून आपल्या तीन मुलींचे लग्न, मुलगा सैनिक म्हणून देशसेवेत व एका ठिकाणी आजारी असणाऱ्या पतिचा चार वर्ष वैद्यकीय इलाज करून नारीशक्तिचा विशेष परिचय पुरुष प्रधान संस्कृतिला करून दिला या महिलेचाही विशेष भावनिक सत्कार साड़ीचोळी देऊन करण्यात आला.
राजकारनात सातत्याने विविध पदांवर कार्य करणाऱ्या नगरसेविका सौ.सिंधुताई खेडेकर, तर या कार्यक्रमाचे सूत्र संचालन करणाऱ्या वृत्त निवेदिका, निर्भिड सामाजिक कार्यकर्त्या सौ.नंदिनीताई क्षिरसागर-साळवे यांचा ही स्वागत सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी “प्रत्येक नारीच्या विशेष कार्याचा सन्मान झाला पाहिजे व महिलांची शक्ति सुद्धा देशकार्यात व पक्ष कार्यात दिसून यावी यासाठी कुटुंब प्रमुख पुरुषांची साथ असली पाहिजे” असे प्रतिपादन करत या उपक्रमाचे विशेष कौतुक आमदार श्वेताताई महाले यांनी केले.
यावेळी महिलांमध्ये भाजपाच्या सौ.विजयाताई राठी, अल्काताई पाठक,सौ.स्मिताताई चेकेटकर,वर्षाताई पाथरकर,सरपंच सौ.कांताबाई राजगूरे,यांसह अनेक महिला उपस्थित होत्या.तर कार्यक्रमाला विशेष उपस्थिती म्हणून भाजपा नेते योगेंद्रजी गोड़े,प्रा.जगदेवराव बाहेकर,ऍड.व्ही.डी.पाटिल,तालुकाध्यक्ष सुनील देशमुख,मा नगराध्यक्ष विठ्ठलराव येवले,नगरसेवक अरविंद होंडे,मंदार बाहेकर,वैभव इंगळे,भाजयुमो तालुकाध्यक्ष संदीप उगले, भाजयुमो शहराध्यक्ष विनायक भाग्यवंत,दत्ताभाऊ पाटील,अर्जुन दांडगे,भगवान जाधव,पुरुषोत्तम लाखोटीया,अशोक उगले,ज्ञानेश्वर राजगुरे,राजेंद्र पवार, हरिभाऊ सिनकर,सुभाष कदम,मो.सोफियान,गौरव राठोड,बुधण चौधरी,आशिष व्यवहारे,जाहीर शेख,सचिन शेळके,संजय जुंबड,भगवान एकडे,दिलीप तोटे,सतिश हिंगणे,राजू सुरपाटने,सुभाष जगताप,प्रकाश आवटे,नितीन बेंडवाल,प्रकाश सुरडकर,सोहम झालटे, ई भाजपा पदाधिकारी ,कार्यकर्ते व मान्यवर उपस्थित होते.

काँग्रेस पक्ष श्रेष्ठीने मराठवाड्यातून राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून क्रियाशील नेत्यास संधी दयावी.

0

 

सागर जैवाळ सिल्लोड तालुका प्रतिनिधी

राज्यातील रिक्त असलेले राज्यपाल नियुक्त विधान परिषदे यांच्याकडून 12 जागेवर नविन सदस्या ची नियुक्ती करण्यात येत आहेत. यामध्ये महाविकास आघाडीतील शिवसेना 4, राष्ट्रवादी कांग्रेस 4 आणि अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षा च्या वाट्यावर 4 जागेवर पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्तेतून व शिक्षण, समाजिक, संस्कृतीक क्षेत्रातील कार्यकर्तेतून नियूक्ती होण्याची संभावना आहेत. या संदर्भात एका मुस्लिम शिष्टमंडळाने मूबंई के टिळक भवन काँग्रेस पक्ष टिळक भवन कार्यालय येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पार्टी के प्रदेश अध्यक्ष मा.बाळासाहेब थोरात और प्रभारी माजी मंत्री एच. के.पाटील यांची भेट घेऊन मराठवाडा विभागा तील मुस्लिम समाजातून काँग्रेस पक्षाचे एक ही विधान परिषद आणि विधान सभा मध्ये आमदार नाहीत म्हणून काँग्रेस पक्षाने काँग्रेस पक्ष वाढविण्यासाठी अहोरात्र काम करणारे व क्रियाशील नेत्यास सदरिल साठी पक्षश्रेष्टी कडे आणि राज्यपाल कडे शिफारस करावी अशी मागणी शिष्टमंडळाने राज्य चे जेष्ठ नेत्याकडे केली आहेत.
मराठवाड्यातील काँग्रेस पक्षाच्या विश्वसनीय सूत्रांकडून सांगण्यात येत की, महाराष्ट्र राज्य काँग्रेस पक्ष चे नवनियुक्त प्रभारी श्री एच.के.पाटील यांच्याकडून मराठवाड्यातून नेहमीच विरोध पक्षाशी संबंधित नेते ज्यांनी भाजप सरकार च्या सह्या ने महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्ड चे चेअरमन पद ग्रहण करणारे विधान परिषदेचे माजी आमदार एम.एम.शेख यांच्या नावा साठी अग्रही आहेत व त्यांची धनशक्ती च्या जोरावर राज्यपाल नियुक्त विधान परिषदेत काँग्रेस पक्षा कडून नियुक्तीस शिफारस होण्याची दाट शक्यता आहेत. या अगोदर सन 2007 मध्ये सूध्दा एम.एम.शेख ची अशाच धर्तीवर विधान परिषदेत सदस्य म्हणून काँग्रेस पक्षाकडून नियुक्ती झाली होती त्याकाळात त्यांनी मुस्लिम समाजा साठी महत्त्वपूर्ण कार्य केलेले नाहीत अता तर एम.एम. शेख यांची प्रकृती बरोबर नसल्याने ते तीन वर्षांत त्याची प्रकृतीत बरोबर नाही क्रियाशील सूध्दा नाहीत म्हणुन ते काँग्रेस पक्षाचे कोणतेच कार्यक्रमात दिसले नाहीत.दूसरी बाजू लोकसभा आणी विधान सभे च्या निवडणुकीत प्रचारात व भाग घेण्यास कोणीच मुस्लिम नेता तयार नव्हता अशा परिस्थितीत काँग्रेस पक्षात कैसर आझाद यांनी कोणताच दबावस बडी न पडता आपली क्रियाशीलता दाखवून पक्ष कार्य केले म्हणून शिक्षण, सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्रातील प्रसिद्ध समाजसेवक कैसर आझाद शेख यांचे नाव पूढे करून मुस्लिम समाजातून नविन चेहरा म्हणून नियुक्त करण्यात यावी याकडे काँग्रेसाचे जेष्ठ नेत्यानी लक्ष देण्याची गरज आहेत अशी मागणी सूद्धा मराठवाड्यातून मुस्लिम समाजातून होत आहेत .

नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने रस्ता बंद झाल्याने पर्यायी रस्ता उपलब्ध करून देण्यात यावा

0

 

 

शेगाव,=पहूर जीरा येथील रहिवासी अनेक वर्षापासून शेती व्यवसाय करतात शेतीची किस्त कारी करण्याकरिता शेतकरी व शेतमजूर यांची रस्त्याने येणे-जाणे करून पहूर जीरा भाग 2 मधील शेती वहिती व कामगिरी करतात दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील पावसाळ्याच्या दिवसात नदीला मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने रस्त्यावरील स्मशानभूमी जवळील नदीचे पात्रात खूप पाणी साचलेले आहे व त्यामुळे शेतीचा येण्याजाण्याचा हा रस्ता बंद पडलेला आहे या हंगामात या दिवसात कापूस वेचणी करण्यासाठी तसेच सोयाबीन काढण्यासाठी शेतकरी बांधवांना फार त्रास होत आहे या रस्त्यावरून आज रोजी गाडी बैल अथवा कुठलेही वाहन जात नसल्याने जीव मुठीत घेऊन शेतकरी बांधव व मजूर बांधव नदीच्या प्रवाहातून व पात्रातून ये-जा करून शेती कामे कसेतरी करीत आहेत मागील वर्षी देखील नदीच्या पात्रात बैलगाडी सहा मजूर वाहत जात असताना गावकऱ्यांच्या सतर्कतेमुळे त्यांनी पाण्यात ऊळ्या घेऊन मदत केल्याने मजुराचा जीव वाचला तरी पर्यायी रस्ता उपलब्ध करून देण्यात यावा नाहीतर सत्याग्रह शेतकरी संघटनेच्या वतीने बैलगाड्या सह त्याच नदीपात्रात आमरण उपोषण केले जाईलअसे निवेदन सत्याग्रह शेतकरी संघटनेतर्फे तहसील कार्यालय शेगाव यांना देण्यात आले सदर निवेदनात सत्याग्रह शेतकरी संघटना युवा आघाडी गणेश सडत कार शेख अयाज अनिल गव्हांदे शेख शब्बीर अमीर शाह संजय फाटे धीरज फाटे पवन चव्हाण निलेश उचाळे उखर्डा गायकवाड तसेच असंख्य कार्यकर्त्यांच्या व शेतकऱ्यांच्या सह्या आहेत

धार्मिक स्थळ उघडा सस्थान प्रमुखांची मुख्यमंत्र्याकडे मागणी

0

 

आयुषी दुबे शेगाव

शेगाव गेल्या सहा महिन्यापासून बंद असलेले शेगाव तालुक्यातील धार्मिक स्थळ सुरू करण्याची मागणी धार्मिक क्षेत्रातील विविध मान्यवरांकडून मुख्यमंत्र्याकडे करण्यात आली आहे याबाबत धर्मजागरण समन्वय समितीच्या वतीने मुख्यमंत्र्यांना शेगाव तहसीलदार यांच्या माध्यमातून पाठविण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये गेल्या सहा महिन्यापासून सर्व धर्मीयांचे श्रद्धास्थान असलेले मंदिरे देवस्थान बंद आहेत वास्तविक मंदिरे देवस्थाने ही मानसिक शांती व प्रेरणा देणाऱ्या असतात राज्य शासनाने धार्मिक स्थळे मंदिरे देवस्थाने सोडून इतर सर्वांना कोविड – १९ ची नियमावली लावून आपापली दुकाने प्रतिष्ठाने सुरू करण्याची परवानगी दिली आहे त्याच प्रमाणे नियमावली लावून राज्यभरातील मंदिरे देवस्थाने हिंदूंचे धार्मिक स्थळ उघडण्याची परवानगी द्यावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे निवेदनावर श्री संत गोमाजी महाराज संस्थान नागझरी अध्यक्ष धनंजय पाटील ह भ प बाबुरावजी लंके महाराज गुरुदेव सेवा मंडळाचे राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. सुशील महाराज वनवे शेखर भाऊ नागपाल यांच्यासह शेगाव तालुक्यातील व शहरातील विविध धार्मिक थऴे व मंदिरांचे व संस्थांचे प्रमुख आणि भाविक भक्तांच्या सह्या आहेत.