Home Blog Page 594

बी टी कापसावर बोंड अळी चा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव

0

 

गजानन सोनटक्के जळगाव जा

जळगाव जामोद तालुक्यातील बहुतांश गावात कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्याने ऐन दिवाळीच्या तोंडावर शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
सध्यास्थितीत हवामानात बदल झाल्याने कापूस पिकावर बोंडअळींचा प्रादुर्भाव झाल्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहे . सुरूवातीला अतीपावसामुळे कपाशी बोंडे काळे पडून कापसाचे नुकसान झाले , कापूस वेचणी केल्यानंतर वेचणीची मजुरी अन व्यापाऱ्यांनी पडक्या भावात कापूस खरेदी केल्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे . सध्यास्थितीत कापूस पिकावर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे शेतकऱ्यांवर दुहेरी संकट आले आहे .

 

सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसारखी कापूस उत्पादक शेतकरीची स्थिती आहे . कपाशीवरील निम्यापेक्षा जास्त बोंडावर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पन्नात घट होण्याची शक्यता नाकारता येत नाही . त्यात अतिवृष्ठी होऊनही महसूल व कृषिविभानेचा अहवाल निरंक पाठविल्याने राज्य शासनाने देऊ केलेली शासकीय मदत तोडकी का असेना परंतु , संग्रामपुर तालुक्यातील शेतकऱ्यांनावर शासकीय मदती पासून वंचित ठेवल्याची ओरड होत आहे . कपाशिवर बोंडअळीचा वाढता प्रादुर्भाव पाहता दोन तिन वेचणीतच उलंगवाडी करण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे . बोंडअळी आल्याने कापसाचे बोंडे खुलुन येत नाही , त्यामुळे महिला मजुर वेचणी करण्यास येत नाही . बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कृषि संचालकांच्या व स्वताच्या अनुभवानुसार रासायनिक फवारणी करुनही बोंड अळी कपाशीवर कायम असल्याने बहुताश शेतकऱ्यांनी कपाशीवर तणनाशक रासायनिक फवारणी केली . त्यामुळे बोंडे सडत असल्याने कापूस उत्पन्नात घट होण्याची शक्यता नाकारता येत नाही . बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कृषिविभागाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन , शासनाकडून ठोस उपाय योजना व मदतीसह पीकविमा मदत देऊन दिलासा देणे गरजे आहे .

प्रेमीयुगुलाची एकाच झाडाला गळफास लावून आत्महत्या

0

 

सूर्या मराठी न्यूज स्पैसल रिपोर्ट

संपादक  अनिलसिंग चौहान

धानोरा (जि. गडचिरोली):- धानोरा पासून एक किलोमीटर अंतरावर चव्हेला रोड लगत कम्पार्टमेंट ५२० मध्ये रात्री प्रेमीयुगुलाने एकाच झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. विद्या सदाशिव उसेंडी (वय २२, रा. पवनी) व राजेश लालसाय पोटावी (वय २८, रा. दराची) अशी मृतांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत दोघेही धानोरा तालुक्यातील रहिवासी आहेत. कप्मार्टमेंट ५२० मध्ये झाडाच्या एकाच फांदीला विद्याने ओढणीने तर राजेशने दुप्पट्याने गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली. या आत्महत्या प्रेम प्रकरणातून घडल्याचे बोलले जात आहे. दोघेही रात्रीपासून बेपत्ता होते. घरच्यांनी शोध घेतला असता शुक्रवारी (ता. ३०) सकाळी ही घटना उघडकीस आली. या प्रकरणाचा तपास धानोरा पोलिस करीत आहे.

काही दिवसांपूर्वी गडचिरोली जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या प्रेमीयुगुलाने चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेवरून वाहणाऱ्या वैनगंगा नदीत उडी घेतली होती. प्रदीप राजू गिरडकर (वय २०) असे युवकाचे तर कांचन अरविंद नागोसे (वय १७) असे युवतीचे नाव आहे. गडचिरोली येथील रामनगर परिसरातील प्रदीप गिरडकर हा युवक बारावीचे शिक्षण घेत होता. प्रदीपचे फॉरेस्ट कॉलनी येथील कांचन नागोसे या दहावीत शिकणाऱ्या मुलीसोबत प्रेमसंबंध होते. एकमेकांच्या हाताला रुमाल बांधून नदीत उडी घेतली होती.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आंदोलनाला यश 2 नोव्हेंबर पासून मका खरेदी करिता नोंदणी सुरु होणार.

0

 

 

सुनील पवार नांदुरा

शेतकऱ्यांची मक्याची नोंदणी खरेदी विक्री संघ कार्यालय नांदुरा येथे 2 नोव्हेंबर सोमवार सकाळी १० वाजता पासून सुरु होणार आहे. तरीही शेतकरी बांधवांनी मका पेरणीची नोंद खरीप २०२०-२०२१ असलेला सातबारा, बँक पासबुक ची प्रत, आधार कार्ड ,अर्जाच्या दोन प्रती सोबत आणून जोडाव्या. व नोंदणी करावी अशी माहिती खरेदी विक्री संघ प्रशासक यांनी दिली आहे. मका सोंगणी सुरू असतानाच मनसेने मका खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी शेतकऱ्यांच्या हिताकरिता निवेदन दिले होते. पण तरीही यावर काही कारवाई झाली नव्हती नंतर काही दिवसांनी मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मक्याचे कणीस तहसीलदार यांना भेट दिली होती. परंतु काहीही दखल न घेतल्यामुळे जिल्हा पातळीवर मनसेने जिल्हाधिकारी कार्यालयावर डोळ्याला पट्टी बांधून धृतराष्ट्र आंदोलन केले होते. याचा धसका घेत प्रशासनाने 2 नोव्हेंबर पासून मका खरेदी केंद्र सुरू करण्याचे आदेश जाहीर केले आहे .तालुक्यातील बरेच शेतकरी बंधूनी मनसेच्या पदाधिकारी यांचे आभार सुद्धा व्यक्त केले आहे. जर मका खरेदी केंद्रावर कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार झाला तर संबंधित मनसे पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. भ्रष्टाचार करणाऱ्यांची गाठ मनसेशी आहे.तरीही जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लवकरात लवकर मका खरेदी करिता नोंदणी करावी असे आवाहन मनसे तालुका अध्यक्ष भागवत उगले यांनी केले आहे.अशी माहिती तालुका प्रसिद्धी प्रमुख योगेश अरुण सपकाळ यांनी प्रसिद्धीच्या माध्यमातून दिली आहे.

लांजीसह मंगळवारी मिरवणुकीत निघालेले वाहन पलटी 24 जण जखमी झाले

0

 

गोंदिया-शैलेश राजनकर

बालाघाट, Oct१ ऑक्टुबर- जिल्ह्यातील लांजि तहसील अंतर्गत चाम्हारबोडी येथून परत येत असलेल्या पीकअप वाहन क्रमांक एमपी २२ ई 72 3772२ हा विवाह सोहळा मिरवणूक घेऊन रस्त्यावर अनियंत्रित झाला. या अपघातात 24 जण जखमी झाले आहेत. जखमींना 108 रूग्णवाहिकांच्या मदतीने सिव्हिल हॉस्पिटल लांजी येथे दाखल करण्यात आले आहे. ही घटना लांजी तहसील मुख्य रस्ता ते दुर्ग छत्तीसगढ राज्य रस्ता चाम्हारबोडी रस्ता आहे. शुक्रवारी लांजी पोलिस ठाण्यातील खराडी गावचा मालक उरेडिंग उईके याच्या 22 वर्षीय वडिलांची मंगळवारी मिरवणूक सिररी गावच्या विवाह कार्यक्रमात गेली होती. जिथे पिक-अप वाहनचालक लग्नाच्या मिरवणुकीसाठी खराडी आणत होते. दरम्यान, सायंकाळी साडेसात वाजता चामरबोडीजवळील गोलाई येथे वाहन पलटले. घटनेची माहिती मिळताच पोलिस स्टेशन प्रभारी लांजी अरुण सोलंकी, एसआय राकेश बघेल घटनास्थळी दाखल झाले आणि जखमींना तातडीने उपचारासाठी दाखल करण्यात आले.
जखमी रविंद्र टेकाम, सूरज लाल मसराम यांनी सांगितले की, पिकअप चालक अतिशय कमी वेगाने वाहन चालवत होता. तेवढ्यातच वाहन चाम्हारबोडीजवळ पोहोचले की रस्त्याच्या कडेला मोठा खड्डा पडल्याने राउंडिंग पलटी झाली, परिणामी वाहनात 24 जण जखमी झाले. घटनेनंतर चालक घटनास्थळावरून फरार असल्याचे सांगण्यात येत आहे. जखमींमध्ये राजेश टेकाम, धुलीचंद मसराम, सावित्री पांड्रे, प्रमिला वरकडे, सुशीला मार्साकोले, भोजराज नामूर्ते, चुन्नीलाल मडावी, बिरजलाल सराटे, संदीप उईके, नीलकंठ जांगडे, कन्हैयालाल वरकडे, अनिल नामूर्ते, मनीत उइके, इतर समाविष्ट आहे. लांजी पोलिस स्टेशनचे प्रभारी अरुण सोलंकी यांनी सांगितले की जखमींना फारसे दुखापत झालेली नाही. चालकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यास सुरुवात केली आहे

विजेंच्या कडकडाट सह अचानक पडलेल्या जोरदार पावसामुळे गावातील बत्ती झाली गुळ, ग्रामस्थांचे झाले अंधारात आर्थिक हाल.

0

 

 

मुंबई प्रतिनिधी (महेश कदम)

 

ता. महाड, जि: रायगड हिथे गेल्या रविवारी अचानक पडलेल्या जोरदार पावसामुळे, शेतात असलेल्या मुख्य विधुत वाहिनीवर वीज कडाडली व गावातील वीज खंडीत झाले, गावच्या इलेक्ट्रिक डी.पी. वर वीज कोसळून डीपी जळली होती. त्यामुळे रविवार, सोमवार, मंगळवार या ३ दिवशी गावात लाईट नव्हती. ह्यात कोणते ही जीवितहानी नाही झाली परंतु ग्रामस्थ आर्थिक परिस्थितीचा सामना करावा लागला.

लाईट नसल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा फार मोठा नुकसान झाला व मोबाईल सुद्धा चार्ज नसल्यामुळे गावात कोणाचा फोन ही लागत नव्हता. अशा वेळेस गावातील शहाजी मोरे, बळीराम कदम यांच्याशी संपर्क साधल्यानंतर, श्री. विलास म्हामुणकर ह्यांनी माननीय आमदार श्री. भरतशेठ गोगावले ह्यांना ह्या संदर्भात सुचना दिल्या, साहेबांच्या मार्गदर्शनाखालील, श्री. विलास म्हामुणकर ह्यांनी
वीज अधिकाऱ्यास फोन करून त्यांना सर्व परिस्थितीची माहिती देऊन लवकरात लवकर डीपी बदलण्याची विनंति केली.

त्यामुळे मंगळवारी रात्री ८:३० वाजता, डीपी चे काम करण्यासाठी, विधुत पुरवठा सुरळीत करण्यासाठी कर्मचारी प्रयत्न करत होते, काम पूर्ण होऊन गावात लाईट आली.
तातडीने पाठपुरावा करून हे काम पूर्ण करण्यात आले, ह्यात श्री. पवन कुमार (वायरमन), श्री. बोराटे साहेब (सहाय्यक अभियंता) बिरवाडी, श्री. खांडेकर साहेब (कार्यकारी अभियंता), तसेच वी. वी. शिंदे, ए.जी. गावीत, के. एम. कदम, एन. एच. काशीद, पी. ए. खाजुरे, एस. के. सोनावले सह अन्य विधुत कर्मचारी उपस्थित होते, श्री. विलास म्हामुणकर यांच्या पाठपुरावा मुळे सर्व ग्रामस्थांनी आभार मानले व तसेच श्री. शहाजी मोरे, श्री. बळीराम कदम, श्री. मिलिंद मोरे ह्या सर्वांचे ही आभार हनुमान सेवा ग्रामविकास मंडळ (खरकवाडी) ह्या ग्रामस्थांनी केले.

तसेच थ्री फेस संदर्भात आपल्या खरकवाडी गावातील लाईट ही
सिंगल फेस वर असल्यामुळे,
सप्ताह काळात तसेच सोमजाई देवी पालखीच्या काळात डीपी वर लोड येतो, त्यामुळे गावातील लाईट डीम होते आणि गावातील पाण्याचे पंप चालवितांना सुद्धा हवा तसा फोर्स मिळत नाही.

त्यासाठी श्री. विलास म्हामुणकर यांनी गावातील सरपंच श्री. द्वारकानाथ जाधव सर यांच्याशी चर्चा केली, या संदर्भात गावाच्या वतीने, श्री. बळीराम कदम हे पत्र लिहिणार आहेत, त्यांच्या सोबत आंब्याचामाळ गावातील,
श्री. सुभाष मोरे यांच्यासह, ग्रामस्थांशी चर्चा करून, सोबत सरपंचांकडून ही एक पत्र घेऊन, अलिबाग (गोरेगाव) येथील इलेक्ट्रिक अधिकाऱ्यांकडे विनंती अर्ज करण्यात येणार आहे. अशी संपूर्ण माहिती आम्हाला श्री. विलास म्हामुणकर सह समस्त ग्रामस्थ ह्यांनी दिली आहे.

सरदार वल्लभभाई पटेल जयंती साजरी व इंदिरा गांधी पुण्यतिथी साजरी

0

 

गजानन सोनटक्के जळगाव जा

आज शनिवार 31 ऑक्टोबर रोजी जळगांव जामोद शहर व तालुका काँग्रेस कमिटी तर्फे भारताचे माजी गृहमंत्री लोहपुरुष स्व. सरदार पटेल यांचे जयंती व भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान आयरण लेडी स्व.इंदिरा जी गांधी यांचे पुण्यतिथी निमित्त अभिवादनाचा कार्यक्रम पुष्पहार व नमन करून संपन्न झाला. यावेळी तालुका काँग्रेस अध्यक्ष अविनाश उमरकर,शहराध्यक्ष अर्जुन घोलप ,डॉ संदीप जी वाकेकर, नंदुभाऊ पाटील,नगर सेवक कलीम खा हुसेन खा,ग्रामपंचायत सदस्य अनंत ढगे जामोद,सोशल मीडिया प्रमुख संतोष गावंडे,युवक काँग्रेस शहर अध्यक्ष राजीकभाई, सुरेश वानखडे,कृष्णा दामधर,इमरानभाई, दिनेश काटकर,जुनेद शेख, हरीश भाईजी,राजू मुल्लाजी,समीर शेख,अदनान भाई,गजानन ठाकूर व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

जिल्हा उपनिबंधकाचा आदेशाने शेगाव बाजार समिती बरखास्त ! सहकार क्षेत्रात खळबळ

0

 

आयुषी दुबे शेगाव

शेगाव (सूर्या मराठी न्यूज) ः शेगाव बाजार समितीवरील संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले आहे. सभापती श्रीधर उन्हाळे यांच्यासह 11 संचालकांना जिल्हा उपनिबंधकांनी अपात्र घोषित केले आहे. या कारवाईने सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे. याबाबद सविस्तर वृत्त असे की जिल्हा बँक अवसायनात निघाल्यानंतर ती सुरळीत करण्यासाठी काही उपाययोजना करण्यात आल्या आहेत. यात कर्जवसुलीसाठी मोहीम आखणे, कर्मचारी कपात, स्वेच्छानिवृत्ती योजना, सेवासंस्थांचे एकत्रिकरण आदी उपाययोजना करण्यात आल्या. तालुक्यात 32 सेवा संस्था होत्या. त्या एकत्रित करून 7 वर आणल्या गेल्या. त्यामुळे अनेक सदस्य कमी झाले. परिणामी या सेवा संस्थांमधून निवडून आलेले अनेक प्रतिनिधी अपात्र ठरले. दोन दिवसांपूर्वीच्या आदेशातील तांत्रिक प्रक्रियेमुळे शेगाव बाजार समितीचे 11 संचालकही अपात्र ठरले असून, यात सभापती श्रीधर उन्हाळे, पांडुरंग पाटील, शेषराव पहुरकर, पुंडलिक भिवटे, रामरतन पुंडकर, सौ. पंचफुलाबाई जवंजाळ, सौ. नंदाबाई उमाळे, विठ्ठल भांबेरे, आत्माराम महाले, देवेंद्र हेलगे, सौ. अनुपमा मिरगे अशा 11 संचालकांचा समावेश आहे. या संचालकांना अपात्र ठरविण्यासाठी पांडुरंग शेजोळे व शेख नजीर शेख खालिक यांनी तक्रार केली होती. त्यावर जिल्हा उपनिबंधक आर. एल. राठोड यांनी कारवाई केली आहे. सदर कारवाई मुळे सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

जातेगांव येथील खाटीक समाजाच्या विविध मागण्यांसाठी तहसीलदार व गटविकास अधिकारी यांना निवेदने सादर

0

 

सचीन  पगारे ,नांदगांव नाशिक

नांदगांव तालूक्यातील जातेगाव येथील अनुसूचीत जातीत असणार्‍या खाटीक समाजाच्या दलित वस्ती व रमाई आवास योजनासह विविध मागण्यांसंदर्भात खाटीक समाजातर्फे अखिल भारतीय खाटीक समाज युवा प्रकोष्ट संघटनेचे वरिष्ठ उपाध्यक्ष अमोल खिरडकर यांनी नांदगांव तहसीलदार व गटविकास अधिकाऱ्यांना निवेदने सादर केली .
जातेगांव येथील खाटीक समाजाच्या विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय खाटीक समाज युवा प्रकोष्ट संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अमोल खिरडकर यांनी खाटीक समाजातर्फे तहसीलदार उदय कुलकर्णी व गटविकास अधिकारी जी. पी. चौधरी यांना स्वतंत्र निवेदने सादर केली. सदर निवेदनात म्हटले आहे की, आम्ही जातेगाव येथील कायम रहिवाशी असून अनुसूचित जाती पैकी हिंदू खाटीक या जातीचे आहोत . आमची जातेगाव येथे १५० ते २०० लोकसंख्या असून आम्हाला बऱ्याच वर्षांपासून दलित वस्ती सुधार योजने अंतर्गत आमच्या वस्ती परिसरात कुठलीही विकासाची कामे ग्रामपंचायत व पंचायत समितीने केलेली नाही.सदर समाजाच्या प्रत्येक घरासमोर गटारी व्यवस्था नाही. दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत जातेगाव येथे पन्नास ते साठ लाखांची कामे झाली. परंतु सदर खाटीक समाजाला या योजनेचा एक रुपयाचाही लाभ दिलेला नाही.आम्हाला त्या लाभांपासून वंचित ठेवण्यात आले आहे. संपूर्ण गावात १४व्या वित्त आयोग योजने अंतर्गत नवीन पाईपलाईन बसवण्यात आली,परंतु आमच्या गल्लीत चाळीस वर्षापासून सिमेंटची जुनी पाईपलाईन असल्याने पाणी व्यवस्थित मिळत नाही. रमाई आवास योजनेअंतर्गत जे घरकुले अनुसूचित जातीला दिले जातात ते मात्र ग्रामसभेने सुचवलेल्या यादीप्रमाणे घेतले जात नाही. अनुक्रमांकाने घेण्याऐवजी पुढील नावे घेऊन त्यांची घरकुले मंजूर केली जातात व खाटीक समाजाच्या लाभार्थ्यांना डावलले जाते असे दिसून येते . या सर्व कारणांमुळे आमच्या हक्काचा निधी आम्हाला मिळत नाही. रमाई आवास घरकुल ग्रामसभेने मंजूर केलेल्या लाभार्थ्यांना ठरावानुसार यादीतील अनुक्रमांकानुसार आमच्या लाभार्थ्यांना डावलून पुढील लाभार्थी घेतले जातात हा आमच्यावर अन्याय होत आहे. आमच्या लाभार्थ्यांच्या पुढील जे लाभार्थी घेतले गेले आहे. त्यांना पण लाभ द्यावा ही आमची अपेक्षा आहे. परंतु यादीतील डावलले गेलेले आमच्या लाभार्थ्यांची घरकूले दिल्याशिवाय पुढील घरकूलांचे हप्ते टाकू नये. आमच्या खाटीक गल्लीची दलित वस्ती सुधार योजने अंतर्गत पाईप लाईन गटार व्यवस्था व रोड काँक्रिटीकरण किंवा गट्टू बसवणे हे तात्काळ झाले पाहिजे .आम्हाला या योजनेपासून वंचित ठेवण्यात आले तर संबंधित अधिकाऱ्यांवर आमच्या समाजावर अन्याय केल्यामुळे आम्ही अनुसूचित जाती-जमाती नुसार कारवाई व्हावी यासाठी आंदोलन करण्यात येईल.सदर निवेदनामार्फत ग्रामविकास अधिकारी, विस्तार अधिकारी व गटविकास अधिकारी यांना विनंती केली आहे.निवेदनाचा स्विकार तहसीलदार उदय कुलकर्णी व गटविकास अधिकारी गणेश पी. चौधरी यांनी केला. सदर निवेदनावर अखिल भारतीय खाटीक समाज युवा प्रकोष्टचे राष्ट्रीय वरिष्ठ उपाध्यक्ष अमोल खिरडकर,संजय खिरडकर,ध्रुवबाळ खिरडकर,शिवाजी खिरडकर,संतोष खिरडकर,सुनीता खिरडकर,भावलाल खिरडकर,नाना खिरडकर,आत्माराम खिरडकर आदींच्या सह्या आहेत.

अतिवृष्टीचा लाभ न मिळाल्यास रस्त्यावर उतरूj. जिल्हा परिषद सदस्य श्री..राजेंद्र लहाने

0

 

 

अजहर पठाण
सेलू/परभणी

” वालूर महसूल मंडळासह तालुक्यातील इतर गावातील शेतकर्यांना अतिवृष्टीचा लाभ मिळालाच पाहिजे,प्रशासनाने कोणत्या निकषांवर महसूल मंडळातील अतिवृष्टीची नोंद केली याचे सर्वांनाच आश्चर्य व्यक्त केले.वालूर महसूल मंडळ व इतर गावांना अतिवृष्टीच्या लाभापासून वंचित ठेवले तर शेतकर्यांना सोबत घेऊन रस्त्यावर उतरू असा इशारा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा वालूर जिल्हा परिषद गटाचे सदस्य राजेंद्र लहाने (काका)यांनी प्रशासनला दिला आहे.
सेलू तालुक्यात सर्वच पाचही महसूल मंडळात या वर्षी अतिवृष्टीने शेतीसह खरिपाच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.कापूस, तुर, सोयाबीन भाजी पाला,फळबागाचे प्रचंड नुकसान झाले आहे.शासनाने प्रत्यक्षात शेत शिवारातील पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी असताना काही महसूल मंडळ व गावे या अतिवृष्टी अनुदानाच्या लाभापासून वंचित ठेवण्याचा प्रकार सुरू केला आहे. तालूक्यातील पाचही महसूल मंडळातील गावातील शेतकर्यांना सरसरगट अतिवृष्टी अनुदानाचा लाभ मिळाला पाहिजे.शासनाने अतिवृष्टी लाभ देण्यासाठी दुजाभाव केल्यास शेतकर्यांना सोबत घेऊन रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करु असा इशारा वालूर (ता.सेलू) राजेंद्र लहाने यांनी दिला आहे. यावेळी सेलू पंचायत समितीचे उपसभापती श्री. गणेश मुंडे, नव युवक मित्र मंडळाचे श्री लिंबाजी कलाल, सतीश कलाल, अमोल काकडे कान्हेरवाडीकर, हारून सेठ अन्सारी, माणिक काजळे आदी मान्यवर उपस्थित होते

कुख्यात आरोपीची दगडाने ठेचून हत्या

0

 

अकोला – अकोला शहरातील न्यू तापडिया नगर येथे पुलाच्या जवळ कुख्यात आरोपीची दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली.मोनू काकड असे मृतकाचे नाव आहे.
शहरातील सिव्हील लाईन पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या न्यू तापडिया नगर येथे निर्माणाधीन पुलाजवळ अज्ञात हल्लेखोरांनी मोनू काकड याच्यावर प्राणघातक हल्ला केला.या हल्ल्यात त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.मृतक मोनू काकडे याची अपराधीक पार्श्वभूमी असून त्याच्यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत.पूर्व वैमानस्याहून ही हत्या झाली असावी असा अंदाज बांधण्यात येत आहे.घटनेची माहिती मिळताच अपर पोलिस अधिक्षक मोनिका राऊत,उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन कदम, स्थानिक गुन्हे शाखेचे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शैलेश सपकाळ, सिव्हिल लाइन्स पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भानुप्रताप मडावी यांनी ताफ्यासह तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.मृतकाच्या चेहऱ्यावर गंभीर घाव असून चेहरा दगडाने ठेचला असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. यावेळी पोलिसांनी घटनास्थळावरून परिस्थितीजन्य पुरावे गोळा केले असून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविला आहे. हत्या केल्याचे कारण अद्यापही समोर येऊ शकले नसले तरी सिव्हिल लाईन पोलिस अधिक तपास करीत आहेत.