Home Blog Page 595

येत्या 2 नोव्हेंबर ला सत्याग्रह शेतकरी संघटनेचा अकाल मोर्चा जास्तीत जास्त शेतकऱ्यांना उपस्थित राहण्याचे केले आवाहन= गणेश सडत कार

0

 

 

शेगाव=जळगाव जामोद संग्रामपूर शेगाव तालुक्यात बहरत असलेल्या पीक परतीच्या पावसाने मूग उडीद मका सोयाबीन हा हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला तिन्ही तालुक्यात मुंग उडीद मक्का सोयाबीन कापूस उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने त्यात शासन दप्तरी आनेवारी 70 टक्के ची नोंद असल्याने वस्तुनिष्ठ सुधारित आणेवारी जाहीर करून सरसकट शेतकऱ्यांना हेक्‍टरी 30.000 रू करण्यात यावी करिता येत्या 2 नोव्हेंबर सोमवार रोजी युवा नेते शेख आयाज यांच्या नेतृत्वात सत्याग्रह शेतकरी संघटनेच्या वतीने निवेदन सह अकाल मोर्चाचे आयोजन शेगाव येथील तहसील कार्यालयावर केली आहे प्रमुख मागण्या. ओला दुष्काळ जाहीर करा. वस्तुस्थिती प्रमाणे 30 पैशाच्या आत आणेवारी जाहीर करा. पीक विम्याचा पूर्ण मोबदला द्या. दुष्काळी अनुदान किमान हेक्टरी 30 हजार विनाअट सरसकट द्या. कोरोना काळातील विद्युत बिल रद्द करा. सीसीआयची कापूस खरेदीव नाफेडची मका ज्वारी सोयाबीन खरेदी तात्काळ सुरू करा या मागण्यांसह येत्या सोमवारी अकाल मोर्चाचे आयोजन केले आहे तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन सत्याग्रह शेतकरी संघटना युवा आघाडी गणेश सडत कार यांनी केले

सेलू, जिंतुर तालुक्यात राष्ट्रवादी युवक, युवती यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पक्ष बळकट करण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन राष्ट्रवादी युवती जिल्हाध्यक्ष कु. प्रेक्षा भांबळे यांनी केले आहे

0

 

 

अजहर पठाण
सेलू/परभणी

सेलू तालुक्यातील विविध योजनांची माहिती, शेतकऱ्याचे प्रश्न सोडवण्यासाठी मी सदैव तत्पर असून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पक्ष बळकट करण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन त्यांनी केले. यावेळी सेलू तालुका अध्यक्ष श्री. माऊली ताठे, महीला तालुका अध्यक्ष सौ. निर्मलाताई लीपने, जिंतूर तालुका अध्यक्ष सौ. मनीषा ताई केंद्रे, युवक तालुका अध्यक्ष श्री. अजय डासालकर पाटील, शिवराम कदम, अमोल गाडेकर, बालाजी हारकळ, अन्वर शेख, इरफान लाला, आकाश चव्हाण, आनंद मुळे आदी मान्यवर उपस्थित होते

न भूतो न भविष्यती असा इतिहास घडवला- सिद्धार्थ त्रिभुवन

0

 

ऋषी जुंधारे
औरंगाबाद जिल्हा प्रतिनिधी
वैजापूर

वैजापूर तालुक्यातील नगिना पिंपळगाव चे भूमी पूत्र गावाच्या मातीशी ज्यांनी नाळ जोडलेली आहे असे व्यक्तीमत्व श्री सिद्धार्थ भाऊ त्रिभुवन यांनी त्यांच्या गावात नविन आरोग्य उपकेंद्र मंजूर करून घेऊन तसा शासकीय निर्णय हि पारीत करून घेतला..या कामासाठी त्यांनी व्ययक्तिक 2015 पासून पाठपुरावा करत होते..या कामामुळे त्यांचे तालुक्यातील सर्व राजकीय नेत्यांकडून कौतुक करून अभिनंदन व्यक्त करण्यात आले🙏 नगिना पिंपळगाव चे उपसरपंच शिरीष त्रिभुवन यांचे लहान बंधू आहेत 🙏

चिचारी गावामध्ये रेशन दुकानदाराची मनमानी

0

 

निलेश चिपडे
संपादक

संग्रामपूर तालुक्यातील चिचारी या गावाला उपलब्ध असलेल्या रेशन दुकानातील माल येवून ४ दिवस झाले असून गावातील दुकानात माल आलेला नसल्याने अद्यापही बंद आहे.

रेशन दुकान हे चिचारी गावाच्या नावाने अाहे, त्यामुळे गावातील रेशन दुकानात लोक रेशन घेण्यासाठी गर्दी करत आहे,परंतु दुकान मालक निमखेङी येथील असल्याने माझ्याच गावी रेशन घेण्यासाठी यावे, अशी मनमानी करत असल्याने गावातील रेशन घेण्यासाठी आलेल्या लोकांना रेशन न मिळाल्याने निराश होऊन माघार घ्यावी लागत आहे.

त्यामुळे या माहमारीच्या काळात रोजगार नसतांना स्वस्त धान्यही मिळत नसल्याने उपासमारीची वेळ आली आहे..

तसेच संपूर्ण वस्ती आदिवासी असल्याने कंत्राटदार आपला दबाव टाकत आहे,कि रेशन पाहिजे असेल तर माझ्याच गावी यावे लागेल,

*गावात वृद्ध,महिला तसेच घरचे आजारी असताना लहान मुलांना रेशन आणण्यासाठी बाहेर गावात जावे लागत असल्याने आकस्मिक घटना घडत असतात याची प्रशासकीय अन्न पुरवठा अधिकारी यांनी जाणीव करून घ्यावी व तातडीने कारवाई करण्यात यावी.

 

वैजापूर तालुक्यातील २२.६८ कि. मी लांबीच्या रस्त्यांना मंजुरी

0

 

ऋषी जुंधारे
तालुका प्रतिनिधी
वैजापूर

प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत वैजापूर तालुक्यातील ग्रामीण भागात २२.६८ कि. मी लांबीच्या रस्त्यांना मंजुरी मिळाली असून,ही कामे लवकरच सुरू होणार आहेत,अशी माहिती भाजपचे जिल्हा सरचिटणीस व माजी नगराध्यक्ष डॉ दिनेश परदेशी यांनी दिली.
प्रशासकीय स्तरावर या रस्त्यांच्या कामकाजाबाबत कार्यवाही सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.केंद्र सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयातर्फे मागील आठवड्यात प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून सन २०२०-२१च्या तिसऱ्या टप्प्यातील वैजापूर तालुक्यातील विविध रस्त्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे त्यानुसार तालुक्यातील१४गावांतील जवळपास२३कि. मी लांबीच्या रस्त्यांचे काम लवकरच हाती घेण्यात येणार आहे. या रस्त्यांची कामे करतांना यादी क्रमांकनुसारच प्राधान्य दिले जाणार असल्याचे डॉ दिनेश परदेशी यांनी सांगितले. या रस्त्यांमुळे तालुक्याच्या विकास कामास मोठा हातभार लागणार असल्याने परदेशी यांनी केंद्र सरकारला धन्यवाद दिले.

स्कार्पिओ ची धडक दुचाकीस्वार पिता-पुत्र ठार.. स्कार्पियो चालक फरार शेगाव खामगाव रोडवरील माऊली कॉलेज जवळ मध्यरात्रीची घटना

0

 

आयुषी दुबे शेगाव

शेगाव: काल मध्यरात्री खामगाव कडून शेगाव कडे येणाऱ्या दुचाकीला स्कार्पियो ची धडक लागून दुचाकीस्वार पिता-पुत्र ठार झाल्याची घटना 28 ऑक्टोंबर रोजी रात्री घडली याबाबत शेगाव ग्रामीण पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शेगाव येथील शिवाजीनगर परिसरात राहणाऱ्या मरी भान हिरामण बावणे लखन मरी भान बावणे व शेख रज्जाक शेख रहमान हे तिघे दुचाकी क्रमांक एम एच 28 AU 72 65 ने 28 ऑक्टोंबर च्या रात्री खामगाव कडून शेगाव कडे येत होते कनारखेड जवळील माऊली कॉलेज जवळ विरुद्ध बाजूने येणाऱ्या स्कार्पिओ क्रमांक mh-15bn 33 49 ची जोरदार धडक लागली या धडकेत मरीभान हिरामण बावणे व लखन मरीभान बावणे राहणार शिवाजी नगर शेगाव हे दोघे ठार झाले तर शेख रज्जाक शेख रहमान वय 55 राहनार बालाजी फैल शेगाव हे गंभीर रित्या जखमी झाले सदर अपघाताची माहिती खामगाव शेगाव रोडवर पेट्रोलिंग करीत असलेल्या ग्रामीण पोलिसांना मिळाल्यावर त्यांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन त्यांनी ॲम्बुलन्स मध्ये स्थानिक सईबाई मोटे रुग्णालयात आणले असता तेथे ड्युटीवरील डॉक्टरांनी दोघांना मृत घोषित केले तर या घटनेत गंभीर जखमी झालेल्या शेख रज्जाक याला पुढील उपचारासाठी अकोला येथे रेफर करण्यात आले अपघाताची माहिती मिळताच खामगाव येथील पोलिस उपविभागीय अधिकारी व शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार सूर्यवंशी यांनी घटनास्थळी भेट दिली अपघातानंतर स्कार्पिओ चालक घटनेवरून घटनास्थळावरून फरार झाला.

स्वस्थ धान्य दुकानामध्ये सडक्या मक्याचे वितरण पुरवठा विभागाचा भोंगळ कारभार …

0

 

गजानन सोनटक्के
जळगांव जा.प्रतिनिधी:-

जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव येथील स्वस्त धान्य दुकानांमध्ये निकृष्ट दर्जाच्या मक्याचे वितरण करण्यात येत असल्याचे निदर्शनास आल्याने विचारणा केली असता जळगाव जामोद येथील पुरवठा विभागाने शेगाव तालुक्यातून खरेदी करण्यात आलेल्याचे समजते.तसेच हा सडका मका गरिबांना वितरण करण्यात येत असुन या मक्यामध्ये मोठ्या प्रमाणात पिठ तसेच किटक,अळ्या मोठ्या प्रमाणात आहेत. तसेच हा मका जर जनावरांना टाकला असता जनावरे सुध्दा ह्या दर्जाचा मका खात नाहीत परंतु जळगांव जामोद येथील पुरवठा विभाग हे सडके धान्य गोरगरिबांना खाण्यास देत आहे.तसेच राशन कार्ड धारक हा मका घेण्यास नकार देत आहेत. या मंक्यामुळे राशन कार्ड धारकांना विविध आजार होण्याची शक्यता जास्त आहे.या आजारांना कारणीभूत फक्त पुरवठा विभाग तसेच संबंधित तहसीलदार जबाबदार राहतील. हा सडक्या स्वरपाच्या मक्याची शेगाव येथून आयात केला आहे असे जळगांव जा.येथील पुरवठा अधिकारी सुर्यवंशी यांनी सांगितले. परंतु सदर मका शेगाव येथून जळगाव जामोद ला आला असताना त्याची पुरवठा विभाग कोणत्याच प्रकारची शहानिशा व पाहणी न करताच जळगाव जामोद तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांना वितरित करण्यात येतो हे म्हणजे असे झाले की कान धरुन आणणे आणि शेपूट धरून हाकलून देणे अशा प्रकारचे जळगाव जामोद येथील पुरवठा विभागाचा भोंगळ कारभार चालू आहे यावर जळगाव जामोद उपविभागीय अधिकारी तसेच तहसीलदारांनी याकडे लक्ष देवुन संबंधित पुरवठा अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी समस्त गोरगरीब राशन कार्ड धारक नागरिकांनी केली आहे.

रविकांत तुपकरांनी केला मोताळा तालुक्याचा दौरा.. विविध ठिकाणी दिल्या भेटी..

0

 

अजहर शाह मोताळा प्रतिनिधी

*मोताळा*:-स्वाभिमानी’चे नेते रविकांत तुपकरांनी आज (दि.28 ऑक्टो. 2020) मोताळा तालुक्याचा दौरा करून तालुक्यात विविध ठिकाणी भेटी दिल्या..
यामध्ये त्यांनी मूर्ती येथे सतीश खराटे यांच्या निवासस्थानी सांत्वन भेट दिली..सतीश खराटे यांच्या आईंचे काही दिवसांपूर्वी निधन झाले होते. तर मोताळा येथे कवी स्व.सैय्यद अहमद व स्व.नीलकंठ जैस्वाल यांच्या निवासस्थानी सांत्वन भेटी देवून दोन्ही कुटूंबाचे सांत्वन केले..तसेच डिडोळा खु. येथे स्व.महादेव शिंबरे यांच्या कुटुंबाची सांत्वन भेट घेतली व कैलास माने यांच्या निवासस्थानी सांत्वन भेट देवून त्यांचे सांत्वन केले..
वडगाव (ता.मोताळा) येथे रमेश काळे यांच्या निवासस्थानी रविकांतभाऊंनी सांत्वन भेट दिली..तर परडा येथे स्व.विश्र्वनाथ शिंबरे यांच्या कुटुंबाची सांत्वन भेट घेतली..तसेच तरोडा व शिरवा येथे त्यांनी स्व.ज्ञानदेव नारखेडे, स्व.शिवाजी भालेकर व स्व.निनाजी दिवाने यांच्या निवासस्थानी भेटी देवून कुटुंबियांचे सांत्वन केले..
तसेच रविकांत तुपकरांनी मोताळा तालुक्यात विविध ठिकाणी सदिच्छा व शुभेच्छा भेटीही दिल्या..यामध्ये त्यांनी मोताळा येथे डॉ.रवींद्र महाजन यांची वाढदिवसांनिमित्त शुभेच्छा भेट घेतली व नानाभाऊ देशमुख,सोपानभाऊ धोरण यांच्या सदिच्छा भेटी घेतल्या..तर कोथळी,मुर्ती व डिडोळा येथे नारायण तायडे, श्रीकृष्ण खराटे व जगन्नाथ चोपडे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेटी दिल्या व श्रीकृष्ण शेलकर यांच्या शेतात पाहणी केली…
यावेळी ‘स्वाभिमानी’चे सैय्यद वसीम,प्रदीप शेळके,महेंद्र जाधव,राजेश गवई, विजय बोराडे, मारोती मेढे, गजानन गवळी, भागवत धोरण,संतोष गवळी,सागर पुरभे, निलेश पुरभे,गंगाधर तायडे,निखिल शिंबरे, शेख जाबिर, सैय्यद इम्रान,संदीप नवले, शुभम इंगळे, अजय गाडेकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते..

अखेर सारशिव ग्रामपंचायतचा भ्रष्टाचार उघडकीस आला

0

 

मेहकर ता, प्रतीनिधी
मनीष जाधव

चौकशीदरम्यान , मेहकर तालुक्यातील सारशिव ग्रामपंचायत प्रशासक मा. परिहार साहेब, ग्रामसेवक बि.के.आंभोर. गैरहजर होते. आज स्पॉर्ट पंचनामा करण्यात आला. या पंचनाम यामध्ये असे निर्देशनास आले 1) आरो प्लांट फिटर मशीन माजी सरपंच ज्योती अरुण ढोणे यांच्या घरामध्ये बंद अवस्थेत पडून आढळली. आरो प्लांट फिल्टर मशीन सार्वजनिक ठिकाणी अध्याप का ? बसवलेले नाही. . आरो प्लांट मशीन दीड वर्षापासून का बसवले नाही असा प्रश्न चिन्ह गावकर्‍यांच्या मनामध्ये निर्माण होत आहे.
चौकशीदरम्यान सभामंडपाचे इतर काम अर्धवट अवस्थेत निदर्शनात आले. व्हीलचेअर फर्निचर अर्धवट अवस्थेत सापडले.
म प मा शाळा सारशिव मध्ये संगणक एलईडी टीव्ही अध्याय पर्यंत मिळाली नाही. मात्र त्याची बिले काढण्यात आले असे निर्देशनास आले आहे.
सारशिव ग्रामपंचायतचे प्रशासक श्री परिहार साहेब
ग्रामसेवक बीके अंभोरे हे गैरहजर असल्यामुळे संपूर्ण चौकशी होऊ शकली नाही
चौकशी अर्धवटच राहिली आहे. पुढील तपास विस्तार अधिकारी सोनवणे साहेब. पंचायत समितीचे अभियंता पवार साहेब, ग्राम विकास अधिकारी पंचायत समिती जे.जे. आरो साहेब करीत आहे…..

पातुर्डा गावात डेंग्युसदुष्य रोग प्रतिबंधक उपाय योजना म्हणुन माजी जि प उपाध्यक्ष भोंगळ यांनी स्वता केली धुळफवारणी जनता हक्का बक्का अचंबीत !

0

 

संग्रामपुर : वातावरणाच्या बदलामुळे कधी ढगाळ वातावरण त्यात दिवसा कडक ऊन रात्री थंडीला सुरवात झाली अश्या दमट थंड वातावरण त्यामुळे डासांची उत्पत्ती मध्ये वाढ झालेली आहे त्यात मलेरिया डेंग्युसदुष्य आजाराचे रुग्ण दिवसेन दिवस वाढत आहेत खाजगी रुग्णालयात गर्दी होत आहे त्यामुळे आरोग्य विभागाचे अधिकारी रात्री माजी जि प उपाध्यक्ष संगितराव भोंगळ यांना दुरध्वनी व्दारे गावातील आजारवर चर्चा करित असतांना धुरफवारणी करण्याचा सल्ला देतात अन सकाळी ६ वाजता माजी जि प उपाध्यक्ष संगितराव भोंगळ यांनी डेंग्य सदुष्य व मलेरिया रोगावर प्रतिबंधक उपाय योजना म्हणुन स्वता हातात धुळ फवारणी यंत्र घेऊन गावात सकाळी ६ वाजता धुळ फवारणी करीत असतांना नागरिक अचंबीत आश्चर्य चकित झाले नेता म्हटल कि घरात बसुनच कोणतेही काम करणे मात्र सर्व सामान्यसाठी झटणारे माजी जि प उपाध्यक्ष भोंगळ हे अपवाद आहेत भोंगळ यांनी कोरोना लाकडाऊन काळातही सर्व सामान्याची आस्थेने विचारपुस करुन गरजुना जिवनाआवश्यक किराणा किटची मदत केली तसेच मोफत आयुवैदिक औषध वितरण केले सदैव जनतेसाठी आरोग्यहितासाठी जनसेवक भोंगळ यांच्या वतीने पातुर्डा गावात डेंग्यू मलेरिया सारख्या रोगांना प्रतिबंध करण्याकरिता परिसरात धूरफवारणी केली
धुरफवारणी यंत्राचा आवाज येकुन नागरिक जागी झाले व धुरफवारणी करतांना माजी जि प उपाध्यक्ष भोंगळ यांना पाहताच हक्का बक्का झाले आर्श्चचकित झाले अन कौतुकही केले