Home Blog Page 595

कोरोना चाचण्या वाढविण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम हाती घ्यावा पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे

0

 

कोविड संसर्ग आढावा बैठक

अजहर शाह मोताळा प्रतिनिधी

मोताळा:-दि.17: गत काही दिवसांमध्ये कोरोना बाधीतांची संख्या कमी झालेली दिसून आली. ही दिलासादायक बाब असली तरी कोरोना चाचण्यांची संख्या कमी झाल्यामुळे ही संख्या कमी तर आली नसेल, याबाबत पडताळणी करावी. पुढील काळात दररोज एक हजार चाचण्या झाल्या पाहिजे. प्रयोगशाळाही पुर्ण क्षमतेने सुरू झाली आहे. त्यामुळे प्रशासनाने दररोज एक हजार चाचण्यांचा टप्पा गाठला जाईल, अशा प्रकारे कालबद्ध कार्यक्रम हाती घ्यावा, अशा सूचना पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी आज दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयातील पालकमंत्री यांच्या दालनात कोविड संसर्ग विषयक आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी पालकमंत्री आढावा घेताना बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी एस राममूर्ती, जिल्हा पोलीस अधिक्षक अरविंद चावरीया, जि.प मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुखराजन एस, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ तडस, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश लोखंडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सांगळे, अप्पर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते आदी उपस्थित होते.
जिल्ह्यातील ग्राम स्तरावरील आरोग्य यंत्रणेला पुन्हा सक्रीय करून बाधीत रूग्णाच्या निकट संपर्कातील व्यक्ती शोधून त्यांच्या चाचण्या कराव्यात. चाचण्यांचा वेग वाढविण्यात यावा. उपजिल्हा रूग्णालय, ग्रामीण रूग्णालय व मोठ्या गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये कोविड चाचणीची व्यवस्था करण्यात यावी. नागरीकांना दूरवर जाता कामा नये. गावाजवळच कोविड चाचणीची व्यवस्था केल्यास चाचण्या वाढतील. चाचण्या वाढविण्यासाठी प्रशासनाने कार्यवाही करावी, असे निर्देशही पालकमंत्री डॉ. शिंगणे यांनी यावेळी दिले. याप्रसंगी संबंधित विभागाचे कर्मचारीही उपस्थित होते.
************
कोरोना अलर्ट : प्राप्त 414 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 121 पॉझिटिव्ह
42 रूग्णांना मिळाली सुट्टी
बुलडाणा,(जिमाका) दि.17: प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 535 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 414 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 121 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 117 व रॅपिड टेस्टमधील 4 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 203 तर रॅपिड टेस्टमधील 211 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 414 अहवाल निगेटीव्ह आहेत.
पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : शेगांव शहर : 7, शेगांव तालुका : गौलखेड 1, कायगांव 1,कठोरा 1, दहीगांव 1, बुलडाणा शहर : 4, बुलडाणा तालुका : साखळी बु 1, नांद्राकोळी 1,वालसावंगी 1, चौथा 1, धाड 1, चिखली शहर : 6, चिखली तालुका : हिवरा गडलिंग 1, हातणी 2, दे. राजा शहर : 14, दे. राजा तालुका : दे. मही 1, नागणगांव 1, पोखरी 1, पाडळी 1. मेहकर तालुका : हिवरा आश्रम 2, खंडाळा 1, उकळी 1, बाभुळखेड 2, लव्हाळा 1, आरेगांव 1, मेहकर शहर : 11, सिं. राजा तालुका : दुसरबीड 1, निमगांव वायाळ 7, शेलगांव राऊत 1, साखरखेर्डा 4, सिं. राजा शहर : 1, मलकापूर शहर : 8, मलकापूर तालुका : उमाळी 1, संग्रामपूर तालुका : एकलारा बानोदा 1, मोताळा तालुका : तळणी 2, बोराखेडी 2, लोणार शहर : 2, लोणार तालुका : सुलतानपूर 1, किन्ही 1, पिंपळखुटा 2, जळगांव जामोद शहर : 4, खामगांव शहर : 6, खामगांव तालुका : टेंभूर्णा 4, नांदुरा तालुका : पिंपळखुटा धांडे 2, घोटा 1, पोटळी 1, मूळ पत्ता विल्हे ता. चोपडा जि. जळगांव 1, काजेगांव ता. बाळापूर जि. अकोला 1, भोकरदन जि. जालना येथील 1 संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 121 रूग्ण आढळले आहे.
तसेच आज 42 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.
कोविड केअर सेंटर नुसार सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे : लोणार : 12, मलकापूर : 2, नांदुरा : 2, शेगांव : 1, दे. राजा : 1, बुलडाणा : आयुर्वेद महाविद्यालय 19, मोताळा : 1, चिखली : 4.
तसेच आजपर्यंत 36007 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 7865 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 7865 आहे.
आज रोजी 433 नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 36007 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 8424 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 7865 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 446 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 113 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

राष्ट्रीय महामार्ग -6 वर देवरीजवळ कार व ट्रकच्या धडकेत 1 ठार आणि 1 जखमी

0

 

गोंदिया-शैलेश राजनकर

गोंदिया जिल्ह्यातील देवरी अंतर्गत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर हॉटेल सुखसागरजवळील रस्त्यावर कार आणि ट्रकच्या भीषण धडकेत शनिवारी १ October ऑक्टोबर रोजी शनिवारी सकाळी नऊ वाजता एक गंभीर जखमी झाला. मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरहून रायपूरकडे जाणा MP्या एमपी CACA सीए 30०47 the कारच्या चालकास रस्त्याच्या दुभाजकाला धडक दिल्याने विपरीत दिशेने येणा the्या ट्रक (टँकर) क्रमांक एमएच Y० वाय २24२ with ला धडक दिली. या घटनेत मोहम्मद सिद्दीकी मोहम्मद मसूद (वय 40) हा जागीच ठार झाला, तर मोहम्मद हारुन मोहम्मद शब्बीर (वय 32) गंभीर जखमी झाला. ज्यास उपचारासाठी देवरीच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.पुढील तपास हेड कॉन्स्टेबल तिरपुडा करीत आहे, देवरी पोलिसांनी वरील प्रकरणात गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू आहे.

कृषिदूतांनी पटवले परसबागेतील कुक्कुटपालनाची संधी_

0

 

गजानन सोनटक्के
जळगाव जा

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ संलग्नित स्वा. विर गणपतराव इंगळे कृषी महाविद्यालय, जळगांव (जा.) येथील सातव्या सत्रातील प्रथमेश सुरेश काळपांडे, दीपाली जीवनलाल भिलावेकर, आचाल किशोरसिंग राजपूत या कृषिदूतांनी ‘ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रम’ अंतर्गत सुनगांव येथे परसबागेतील कुक्कुटपालन या विषयावर शेतकऱ्यांमध्ये जागृती केली.
“कृषिपुरक व्यवसायामध्ये परसबागेतील कुक्कुटपालन हा शेतकऱ्यांना आणि तुलनेने सोपा व्यवसाय ठरू शकतो”, हेच औचित्तसाधत कृषिदूतांनी परसबागेतील कुक्कुटपालन या विषयांवर चर्चा केली. यावेळी कृषिदूतांनी परसबागेतील कुक्कुटपालनाची गरज पटवून सांगतांना सर्वप्रथम पारंपरिक पद्धतीने पाळल्या जाणाऱ्या देशी जातींची चर्चा केली व सोबतच परसबागेतील कुक्कुटपालनासाठी उपयुक्त सुधारित जातींची माहिती व यांच्यातील साम्यता पटवून दिली. प्रामुख्याने देशी जातींच्या कोंबड्यांची अंडी (६०-७० नग प्रति वर्ष) व मांस उत्पन्न अत्यन्त कमी प्रमाणात असते, तसेच सुधारित जातींचा वापर करून सहजरित्या आपण हेच उत्पन्न (१६०-२००अंडी प्रति वर्ष) व मांसाचे उत्पन्न ही वाढवू शकतो हे पटवून दिले. याजातींना कुठल्याही प्रकारची आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर न करता पारंपरिक पद्धतीने आपण ह्यांचे उत्पन्न घेऊ शकतो. यावेळी आधुनिक जातींचे उदाहरण देताना गिरीराज, वनराज, सुवर्णधरा, इ. या जातीं ची माहिती दिली.
परसबागेतील कुक्कुटपालन या कृषिपुरक व्यवसायाचे अवलंब केल्यास कमी खर्चात जास्त उत्पन्न मिळू शकते, व त्याच अनुषंगाने सर्वसाधारण शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढीस मदत होऊ शकते. परसबागेतील कुक्कुटपालन याचा अवलंबकरता ग्रामीण भागात तरुण, शेतमजूर, स्त्रिया या सर्व उत्पादनासाठी नवीन संधी म्हणून बघू शकतात, असे आवर्जून पटवून सांगितले. यावेळी तुकाराम ढोले व इतर शेतकरी बंधू उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीयतेसाठी कृषिदूतांना कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य योगेश गवई सर, कार्यक्रम अधिकारी अविनाश आटोळे सर, कार्यक्रम समनव्यक व्ही. टी. कपले मॅडम व पशुसंवर्धन विषयतज्ञ महेश आखूड सरांचे मार्गदर्शन लाभले.

शेतकऱ्यांना शेतीविषयक माहिती देण्यासाठी कृषिदूत शेतकऱ्यांच्या बांधावर

0

 

गजानन सोनटक्के
जळगाव जा

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ संलग्नित स्वा. विर गणपतराव इंगळे कृषी महाविद्यालयात शिकत असलेल्या अंतिम वर्षाचे विद्यार्थ्यी वैष्णवी नानकदे, आचल राजपूत, दीपाली भिलावेकर व प्रथमेश काळपांडे यांनी ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत जळगांव जामोद येथे थेट शेतकऱ्यांच्या बांधावर प्रात्यक्षिक सादर केले.
यावेळी कृषिदूतांनी येत्या रब्बी हंगामाची चाहूल बघता शेतकऱ्यांना बीज प्रक्रिया व त्याचे फायदे समजून सांगितले. बीज प्रक्रिया करते वेळीच्या विविध उपाययोजनांचा समावेश करून घेण्यात आला. बीज प्रक्रिया करून आपण कितीतरी रोग व किडीचे नियंत्रण किफायतशीर पणे करू शकतो व तसेच बियाण्याची उगवण क्षमताही वाढण्यास मदत होते हे यावेळी शेतकऱ्यांना पटवून दिले. बीज प्रक्रियेसाठी बाजारात उपलब्ध रसायनांची माहिती यावेळी कृषिदूतांनी शेतकऱ्यांस दिली. सोबतच कृषिदूतांनी शेतकऱ्यांना उगवण चाचणी कशी करावी व त्याचे महत्व पटवून दिले. यासाठी असलेले विविध प्रकार व त्यांच्या शास्त्रशुद्ध पद्धतींचे प्रात्यक्षिक सादर केले. यामुळे भविष्यात शेतकऱ्यांचे बोगस बियाण्यातून होणारे नुकसान वेळीच ओळखून शेतकऱ्यांचे हित साधता येईल, असे शेतकऱ्यांनी मनोगत व्यक्त केले. सदर कार्यक्रमास अनिल नानकदे, गणेश नानकदे, दीपक नानकदे व नंदू काळपांडे उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी कृषिदूतांना महाविद्यालयाचे प्राचार्य योगेश गवई सर, कार्यक्रम अधिकारी व वनस्पतीशास्त्र विषयतज्ञ अविनाश आटोळे सर, कार्यक्रम समनवयक व्ही. टी. कपले मॅडम, व वनस्पती रोगनिदानशास्त्र विषयतज्ञ प्रमोद डव्हळे सर यांचे मार्गदर्शन लाभले.

राज्यपाल नियुक्त विधान परिषदेत काँग्रेस पक्ष तर्फे मुस्लिम समाजातून प्रतिनिधित्व देण्यात यावे.

0

 

कैसर आझाद यांची मागणी

सागर जैवाळ सिल्लोड तालुका

मूबंई तील प्रदेश काँग्रेस पक्ष चे टिळक भवन मध्ये अखिल भारतीय काँग्रेस पक्ष चे महाराष्ट्र राज्य चे प्रभारी मा. एच. के.पाटील जी व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा.बाळासाहेब थोरात जी यांची औरंगाबाद जिल्हा काँग्रेस पक्ष चे सरचिटणीस कैसर आझाद शेख यांनी भेट घेऊन मराठवाड्यातून राज्यपाल नियुक्त विधान परिषदेत काँग्रेस पक्ष तर्फे मुस्लिम समाजातून प्रतिनिधित्व देण्यात यावे या मागणीचे निवेदन दिले.

समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष ना.छगन भुजबळ यांच्या वाढदिवसानिमित्त औरंगाबाद येथे भव्य रक्तदान शिबिरचे आयोजन.

0

 

सागर जैवाळ फुलंब्री तालुका प्रतिनिधी

औरंगाबाद-आज दि.१४ ऑक्टोबर २०२० बुधवार रोजी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेतर्फे महाराष्ट्र राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष ना. छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद जिल्हाध्यक्ष मनोजभाऊ घोडके यांच्या संपर्क कार्यालयात झालेल्या या भव्य रक्तदान शिबीरात ५५ रक्तदात्यांनी रक्तदान करून या कोरोनाच्या काळात सामाजिक उपक्रमात मोलाचे योगदान दिले आहे.
या रक्तदान शिबीर निमित्ताने जिल्हाध्यक्ष मनोजभाऊ घोडके यांनी मोलाची भूमिका घेऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी प्रदेश प्रवक्ते प्रा. संतोष विरकर,जिल्हा उपाध्यक्ष सुरेश बनसोड,महानगरअध्यक्ष गजानन सोनवणे,कार्याध्यक्ष गणेश काळे,शहर संघटक योगेश हेकाडे, शहराध्यक्ष चंद्रकांत पेहरकर, शहर सचिव वामन भागवत, जिल्हा समन्वयक निशांत पवार,पैठण तालुकाध्यक्ष। देविदास सोनवणे, अनिल जाधव, लाला जाधव,युवक अध्यक्ष अजय भालेकर,अमोल तुपे,प्रकाश दिलवाले,सुनिल कातबने,औरंगाबाद तालुकाध्यक्ष अर्जुन गाडेकर,प्रसन्ना राऊत,मध्य शहराध्यक्ष चंदू नवपुते,राहुल निकम,बाळू सोनवणे, संजीवन घोडके,संतोष कुटे, विराज घोडके, किरण राऊत,माधव खलसे, संदीप पवार,आदिनाथ केजगिर,उमेश उबाळे,योगेश माळी, मिथुन ढंगारे,किशोर माळी, सुनिल राऊत,नागेश गारुडे, सतीश श्रीरामवार, विष्णू गुंठाळ, मनोज शिरसाठ, गणेश हिवाळे योगेश घोडके,,अर्जुन शेळके आदींनी रक्तदान शिबिरात मोलाची कामगिरी करून शिबीर यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले.

जामोद महसूल मंडळातील संत्रा पिकाच्या विम्यापासून व कर्जमाफी पासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांनसाठी लढा उभारणाऱ्याची गरज- प्रशांत डिक्कर…

0

 

गजानन सोनटक्के जळगाव जा

जळगाव सन 2019 _20 मध्ये जळगाव जामोद तालुक्यातील जामोद मंडळातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी संत्रा पिकाचा विमा काढलेला होता परंतु त्यांना या विम्याचा परतावा म्हणून विमा रक्कम मिळालेली नाही याउलट जळगाव जामोद तालुक्यात लगतच असलेल्या संग्रामपूर मध्ये संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 58 हजार रुपये विमा मिळालेला आहे, जामोद मंडळातील संत्रा उत्पादकांचे संत्रा पिकाची नुकसान झालेले असून सुद्धा त्यांना विमा कंपनीने कोणतीही नुकसान भरपाई दिलेली नव्हती ही बाब मंडळातील शेतकऱ्यांनी लोकप्रतिनीधी, तहसीलदार उपविभागीय अधिकारी व इतर प्रशासकीय अधिकारी तसेच जिल्हाधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिली परंतु आजपर्यंत त्यांच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही त्यामुळे ही कैफियत शेतकर्‍यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ प्रमुख प्रशांत डिक्कर यांच्याकडे कथन केली. दि. 13 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी सुनगाव येथील बालाजी मंदिरात शेतकऱ्यांनी प्रशांत डिक्कर यांच्याशी संत्रा पिकविमा प्रश्नावर व कर्ज माफि पासुन वंचित असलेल्या प्रश्नावर चर्चा केली प्रशांत डिक्कर यांनी या वेळी शेतकऱ्यांच्या संत्रा पीक विम्याच्या अडचणीवर न्यायालयीन पर्याय शोधता येईल व कर्ज माफिसाठी लवकरच लढा उभा करुण शेतक-यांना न्याय मिळवुन देणार असे आश्वासन या वेळी दिले या कार्यक्रमाच्या वेळी पंचायत समितीचे उपसभापती श्री महादेवराव धुर्डे यांनी श्री प्रशांत डिक्कर यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले, शेतक-यानसाठी लढाउ व्यक्तिमत्तव म्हणुन प्रशांत डिक्कर यांच्या पाठीशी शेतक-यांनी शेतकरी हिताच्या लढ्यसाठी उभे राहणे गरजेचे आहे. या बैठकित रामकृष्ण काळपांडे ,मंगेश धुर्डे, बळीराम धुळे, गजानन कपले, वसंत काळपांडे, सुरेश काळपांडे, वसंता वंडाळे ,सौ यशोदा काळपांडे ,तुळसाबाई धुर्डे, शांताबाई मिसाळ, विजय वंडाळे, आत्माराम अबडकार,गणेश वसूले, रमेश अबडकार ,पांडुरंग अबडकार ,निनाजी मिसाळ रमेश वंडाळे, श्रीराम राऊत ,वसंता धुळे वसंत ढगे, गजानन वंडाळे व इतर संत्रा उत्पादक शेतकरी हजर होते.

वाडेगांव जिल्हा परिषद आंतरराष्ट्रीय शाळेत शालेय पोषण आहाराचे वाटप

0

 

हिम्मतराव तायडे
महाराष्ट्र ब्युरो चीफ

बाळापुर तालुक्यातील वाडेगाव येथील जिल्हा परिषद आंतराष्ट्रीय शाळा (मुले) येथे इयत्ता १ ते ८ मधील विद्यार्थ्यांना जुनं, जुलै, ऑगस्ट महीनण्याचे शालेय पोषण आहाराचे वाटप करण्यात आले
बाळापुर तालुक्यातील वाडेगाव येथील जिल्हा परिषद आंतराष्ट्रीय शाळा (मुले) येथील इयत्ता १ ते ८ मधील विद्यार्थ्यांना जुनं, जुलै, ऑगस्ट महीण्याचे शालेय पोषण आहार अंतर्गत धान्याचे वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य चंद्रशेखर चिंचोलकर , पचायत समिती सदस्य अफसर खान इशा खान , पंचायत समिती सदस्या सौ रूपालीताई काळे, शाळा व्यवस्थापन समीतीचे अध्यक्ष संतोषभाऊ काळे, उपाध्यक्ष डॉ शेख चांद, उच्चश्रेणी मुख्याध्यापक समाधान सोर, ज्ञानेश्वर पुंडकर, मानिकराव मानकर, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य,शाळेतील शिक्षक, शिक्षीका, शिपाई इत्यादीची उपस्थिती होती. यावेळी सर्वांनी, मास्क, फिजिकल डिस्टंसिंग चे पालन करीत शालेय पोषण आहाराचे वाटप करण्यात आले आहे.

सरकारने सरसकट ओला दुष्काळ जाहीर करावा=गणेश सडतकार

0

 

 

 

गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने थैमान घातले आहे काही ठिकाणी ढगफुटी सारखी अतिवृष्टी झाली तर बहुतांश ठिकाणी रोगराईमुळे मुंग उडीद तीळ कमी दिवसात येणारे पीक त्यांचे अतोनात नुकसान झाले होते आता हातातोंडाशी आलेले सोयाबीन कापूस तुर ज्वारी पिकाचे 80 टक्के नुकसान झाले आहे काही भागात ढग फुटी सारखी अतिवृष्टी झाल्यामुळे जमिनी पाण्या खाली खरडून गेल्या शेतकऱ्यावर पुन्हा फार मोठे संकट आले आहे त्यामुळे शेतकरी आता देशोधडीला लागला आहे अगोदरच कारोना चे संकट हाताला काम नाही शेतीमध्ये पीक पेरणी केली खरी पण ती देखील निसर्गाच्या कोपामुळे निघून गेली आता या अति पावसामुळे शेतकर्‍यांच्या हातात एकही दाणा येणार नाही एवढे नुकसान शेतकऱ्याचे झाले आहे तरी सरकारने सार्वत्रिक नुकसान जाहीर करून हेक्‍टरी 50 हजार रुपये मदत व सरसकट ओला दुष्काळ जाहीर करावा मदत जर का लवकरात लवकर मिळाली नाही तर मात्र सत्याग्रह शेतकरी संघटना रस्त्यावर उतरून सर्व शेतकऱ्यांना सोबत घेऊन सरकारचा हिशोब घेतल्याशिवाय राहणार नाही असा इशारा सत्याग्रह शेतकरी संघटना युवा आघाडी गणेश सडत कार यानी दिला

सुशिक्षीत बेरोजगारांना मुकनायक फाउंडेशन चा आधार

0

 

अजहर शाह मोताळा प्रतिनिधी

व्यवसाय सुरू करण्यासाठी दिले बिन व्याजी कर्ज

बुलढाणा :- एकीकडे कोरोना आजराने मोठ्या प्रमाणात विस्कळीत झालेले जनजीवन व देशा सह राज्यात वाढलेली बेरोजगारी सुशिक्षित तरुणांचा हाताला नसलेले काम अनेकांनी आत्महत्या करण्याचा मार्ग निवडला असून सुशिक्षित तरुणांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी मुकनायक फाउंडेशन चे अध्यक्ष सतीश पवार यांनी पुढाकार घेतला असुन तरुणांनी व्यवसाय करून स्वता आत्मनिर्भर व्हावे या करीता मुकनायक फाउंडेशन च्या वतीने बिन व्याजी कर्ज देऊन आधार दिला आहे
मुकनायक फाउंडेशन च्या माध्यमातून भादोला येथील विजय भाऊराव गवई या तरुणाला कपड्याचा व्यवसाय करण्याकरिता 10000 रु चे बिन व्याजी कर्ज उपलब्ध करून देऊन तरुण पिढी ला आत्मनिर्भर करण्याचा मुकनायक फाउंडेशन ने एक छोटासा प्रयत्न केला अशी प्रतिक्रिया संस्थापक अध्यक्ष सतीश पवार यांनी दिली यावेळी फाउंडेशन चे मुख्य विधी सल्लागार अँड संतोष वानखेडे,सचिव अँड सुपडा सुरडकर,संचालक गुलाबराव गवई व फाउंडेशन चे पदाधिकारी उपस्थित होते