Home Blog Page 596

उमेद’ च्या महिलांची जळगाव जामोद तहसीलवर धडक.तहसीलदारांना दिले विविध मागण्यांसाठी निवेदन…

0

 

गजानन सोनटक्के
जळगाव जा.प्रतिनिधी:

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान उमेद अंतर्गत महिला कर्मचाऱ्यांनी जळगाव जामोद तहसील कार्यालयावर मूक मोर्चा काढतात या मोर्चामध्ये तालुका भरातून महिला कर्मचारी सहभागी झाल्या होत्या बाह्य संस्थेचा हस्तक्षेप टाळावा, कार्यरत कंत्राटी अधिकारी कर्मचाऱ्यांच्या पुनर्नियुक्ती थांबविण्याचा निर्णय मागे घेण्यात यावा गट ग्रामसंघ व प्रभाग संघांना दिला जाणारा निधी वाटप करावा उमेद अभियानातील बाह्य यंत्रणेच्या हालचाली थांबवाव्या कार्यरत संसाधन व्यक्ती चे मानधन त्वरित वितरित करावी

10 सप्टेंबर 2020 च्या अधिकारी-कर्मचारी सेवा खंडित करण्याबाबतचा निर्णय तात्काळ रद्द करावा अशा विविध मागण्यांचे निवेदन जळगाव जामोद तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे सादर करण्यात आली महिलांच्या सामाजिक व आर्थिक विकासाला दिशा देण्याचे काम उमेद च्या महिलांनी आतापर्यंत केले आहे. याशिवाय उच्चशिक्षित तरणांनी यामध्ये कत्राटि सेवा दिली. पुर्वनियुक्ती थांबवुन शासनाने अन्यायकारक निर्णय घेतला असे या निवेदनात म्हटले आहे

आवजीसिद्ध महाराज संस्थानने राबविला वृक्षारोपणाचा कार्यक्रम मंदिर रस्त्याच्या दुतर्फा लावली शोभिवंत वृक्षांची रोपे

0

 

गजानन सोनटक्के
जळगाव जा

जळगाव जामोद तालुक्यातील सूनगाव येथील श्री आवजी सिद्ध महाराज संस्थान मंडळाचा वृक्षलागवडीचा व संवर्धनाचा उस्फुर्त कार्यक्रम सूनगाव येथील श्री आवजी सिद्ध महाराज संचालक मंडळातर्फे आज आवजी सिद्ध महाराज मंदिर ते सुनगाव रोड पर्यंत दोन्ही रस्त्याच्या कडेला वृक्ष लागवडीचा कार्यक्रम पार पडला हा कार्यक्रम जिल्हा परिषद सदस्य सौ रूपालीताई काळपांडे व पंचायत समिती जळगाव जामोद उपसभापती महादेवराव धुर्डे गट विकास अधिकारी शिवशंकर भारसाकळे यांच्या हस्ते संपन्न झाला दिवसेंदिवस झाडाची होत असलेली कमतरता लक्षात घेऊन संस्थेने वृक्षलागवडीच्या कार्यक्रम हाती घेतला आज दिनांक 13 आक्टोबर रोजी 50 झाडे रस्त्याच्या दुतर्फा लावण्यात आली व त्यांना ट्री गार्ड कव्हर सुद्धा करण्यात आले पुढील काही दिवसात संस्थान मार्फत तीनशे झाडांचा उपक्रम राबवण्यात येणार आहे व सूनगाव येथील पत्रकार संघातर्फे सुद्धा वृक्ष लागवड करण्यात आली यावेळी पत्रकार राजकुमार भड , गजानन खिरोडकार, अश्विन राजपूत, गणेश भड, अनिल भगत, गजानन सोनटक्के यांनी वृक्षारोपन केले ,यावेळी पुंडलिकराव पाटील,मोहनसिंग राजपूत,सूनगाव ग्रामपंचायत प्रशासक पी एस राजपूत, ग्रामविकास अधिकारी चौधरी ,संस्थान अध्यक्ष सुरेश अंबडकार , उपाध्यक्ष पांडुरंग नानगदे, राजेश येउल, सचिव प्रवीण धर्मे ,सदस्य पांडुरंग फुसे, बळीराम वसुले,बळीराम वंडाळे, अरुण भाऊ धुळे ,शेषराव भगत मारुती गाडगे ,पुंडलिक पाटील, अनंत वंडाळे ,गजानन दातीर, सुनील भगत ,विष्णु राऊत ,शत्रुघ्न हिस्स्ल ,ग्रामपंचायत कर्मचारी सागर उमाळे, नितीन वसूलकार उपस्थित होते

वैजापूर तालुक्यातील रस्त्यांच्या दुरावस्थेच्या निषेधार्थ साखळी उपोषण- वैजापूर तालुका कृती समिती

0

 

ऋषी जुंधारे
तालुका प्रतिनिधी
वैजापूर

दि.१३- वैजापूर तालुक्यातील सर्वच वाहतूक रस्ते दुरवस्थेमुळे खिळखिळे झाले आहेत.दुरुस्तीसाठी वैजापूर तालुका कृती समितीचे वैजापूर तहसिल कार्यालय समोर साखळी उपोषण करण्यात आले आहेत. प्रशासकीय यंत्रणेला जागे करण्यासाठी नागरिक व तरूणांनी हा सनदशीर मार्ग अवलंबला असल्याची माहिती आंदोलक तरूणांनी दिली.त्या माध्यमातून वैजापूर तालुक्यात असलेले सर्वच रस्ते त्यात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, सार्वजनिक बांधकाम विभाग,जिल्हा परिषद औरंगाबाद, सर्व विभागाचे नियंत्रण व देखभालीची जबाबदारी असलेले रस्ते यावर कोट्यवधी रुपये खर्च होऊन ही रस्त्याची दुरवस्था झाली असून झोपेचे सोंग घेतलेल्या प्रशासकीय यंत्रणाच सर्वस्वी जबाबदार असल्याने त्यास जागी करण्यासाठी तरुणांनी एकत्रित येऊन वैजापूर तालुका कृती समिती तयार केली आहे.
निकृष्ट दर्जाच्या कामांना नियमित करणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करावे,आदी मागण्यांसाठी नारायण कवडे,दामोधर पारीक, प्रवीण सावंत, ज्ञानेश्वर आदमाणे, बिपीन साळे, लक्ष्मण काळे, आदींनी नायब तहसीलदार रमेश भालेराव, महेंद्र गिरगे यांना निवेदन देत उपोषण सुरू केले आहे.

नांदगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मा. ना.छगनरावजी भुजबळ साहेब व मा. खा. समीरभाऊ भुजबळ यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले

0

 

सचिन पगारे नांदगाव, नाशिक

दि. ९ आक्टोबर रोजी नांदगाव मार्कट मध्ये शेतकरी व कर्मचारी यांना मास्क सॅनिटाइजर वाटप करण्यात आले व नांदगाव ग्रामीण रुग्णालयात फ्रुट वाटप करण्यात आले व आज दी. ११ आक्टोबर रोजी दहेगांव येथे वृक्ष लागवड करण्यात आले आहे वृक्षारोपण प्रसंगी ता. अध्यक्ष विजय पाटील, यशवंतदादा बोराडे, रमेशआप्पा पगार, रामुदादा पवार,मा.नगरसेवक विश्वास अहिरे, बाळासाहेब देहडराय, सोपान बोराडे, सोपान पवार, अशोक पाटील, शिवा सोनवणे, संजय आहेर, मुकुंद खैरनार, अक्षय पवार,सुधीर पवार,विक्रम घुगे सर, प्रशांत खैरनार लहानु लोखंडे. आदींसह कार्यकर्ते हजर होते. शेवटी तालुका अध्यक्ष विजय पाटील यांनी मा. ना छगनरावजी भुजबळ साहेब व मा. खा. समीरभाऊ भुजबळ, यांना उपस्थितांच्या वतीने शुभेच्छा दिल्या व कार्यक्रमांसाठी उपस्थितांचे आभार मानले.

 

सॅटेलाईट सर्वे प्रणालीच्या च्या माध्यमातून शेतीपिकांच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा-राहुल बोडखे

0

 

अंकुश गिरी
ग्रामीण प्रतिनिधी सेनगाव

अतिवृष्टी व अवकाळी परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तरी प्रशासनाने व पीक विमा कंपन्यांनी पंचनामे हे व्यक्तिशः किंवा ग्राहक तक्रार क्रमांक किंवा अँप च्या माध्यमातून न करता अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सॅटेलाईट सर्वे च्या माध्यमातून नुकसानीचे पंचनामे करावेत,अशी मागणी पंचायत समिती सदस्य राहुल बोडखे यांनी प्रशासनाकडे केली आहे. सोयाबीन,मूग,उडीद आदी शेती पिकांचे नुकसान हे खूप मोठ्या प्रमाणावर झाले आहे व नुकसानग्रस्त क्षेत्र हे खूप मोठं आहे ८० टक्क्यांच्यावर सर्व पिकांचे नुकसान झाले आहे.त्यातच अजूनही नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे झाले नाहीत .शेतकऱ्यांना रब्बीसाठी शेती तयार करायची आहे पंचनामे लवकर झाले नाही तर नुकसान भरपाई लवकर मिळणार नाही . त्यातच व्यक्तिशः किंवा तक्रारींच्या हिशेबाने पंचनामे करण्यास बराच वेळ निघून जाईल व शासनाकडून नुकसान भरपाई मिळण्यास विलंब होईल.अलीकडे सर्वच गोष्टी ऑनलाईन करण्याचा सपाट सरकारने लावला आहे .तेव्हा पंचनामे का जुन्या पद्धतीने व्हावेत . सॅटेलाईट च्या माध्यमातून पंचनामे केल्यास प्रशासनाचा वेळहि वाचेल व शेतकऱ्यांना योग्य लाभ मिळेल. पीक विमा कंपन्यांचे प्रतिनिधी ग्राहक क्रमांकावर किंवा ऍप च्या माध्यमातून तक्रारी करण्यास शेतकऱ्यांना सांगत आहेत अनेक शेतकऱ्यांना मोबाईल मधले कळत नाही ,ग्राहक क्रमांकावर संपर्क न होऊ शकणे ,काही बँकांनी परस्पर पीक विम्याची रक्कम कपात केली असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांकडे पोलिसी क्रमांक नाहीत आदी कारणांमुळे शेतकरी पंचनाम्यापासून वंचित राहू नये व त्याला नुकसानभरपाई मिळन्यासाठी विलंब होऊ नये म्हणून सरसकट सॅटेलाईट च्या माध्यमातून प्रशासनाने व पीक विमा कंपन्यांनी तात्काळ पंचनामे करावेत अशी मागणी राहुल बोडखे यांनी प्रशासनाकडे केली आहे .

बुद्धीस्ट इंटर नॅशनल नेटवर्क 

0

 

संग्रामपूर तालुका /संग्रामपूर शहर /ग्राम शाखेचे पदाधिकारी यांनी
भोन स्तूप व बुद्ध लेणी जागतिक बौद्ध विरासत बचाओ आंदोलनाला चा दुसरा टप्पा दिनांक 12ऑक्टोबर 2020 रोजी संग्रामपूर सह 366 तहसील कार्यलयावर धरणे आंदोलन करून पुर्ण केला.
आपल्या  संग्रामपूर शहरात हा कार्यक्रम तहसील कार्यलयावर 11 ते 5 या वेळात करण्यात आला.
बुद्धाची जागतिक विरासत वाचविण्यासाठी, पुरातत्त्व विभाग,पालकमंत्री, मंत्री, शासन व प्रशासनाने आतापर्यंत फक्त कोरडी आश्वासने दिली परंतु अद्यापपर्यंत कोणत्याही प्रकारचे उत्खनन,संरक्षण व जतन केले गेलेले नाही जागतिक स्तरावर भोंन स्तूप व इतर बुद्धकालीन स्तूपे व लेण्या भारत देशाची गौरवाची बाब आहे यासाठी “जागतिक बौद्ध विरासत बचाव आंदोलन” बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क च्या वतीने महाराष्ट्रभर 366 तहसीलमध्ये एकाच वेळेस धरणे आंदोलन करण्यात यावेळीमान्यवरांनी विषयाला अनुसरुन सर्व पदाधिकार्याना मार्गदर्शन केले,
याप्रसंगी, आयु. वा.ता.भारसाकडे गुरुजी यांनी कार्यकर्त्यांना अभ्यासपुर्ण मार्गदर्शन केले.तर
सुत्र संचालन आयु. के.एम.तायडे सर यांनी केले.
शेवटी निवेदन देउन कार्यक्रम आभार मानून संपन्न झाला.
या कार्यक्रमास BIN जिल्हा सदस्य उदयभान दांडगे व तालुक्यातील कार्यकर्ते नामदेव तायडे,आनंदा बांगर, विलास तायडे, संगीताकांबळे , विजय अजने,धम्मपाल अजने,संतोष अजने,संतोष भारसाकळ , बळीराम उंबरकार,ऍड.विवेक वानखडे सर,अस्वजित भरसाकळे ,जगदीश कोकाटे, सुनील इंगळे,रामदास भारसाकडे, गुणवंत बांगर, रामा भारसाकडे, समाधान वानखडे, प्रकाश भिलंगे, संगीता अजने,जया ताई डोंगरे महादेव गाळे, संतोष दामोदर, विनोद अजने,संगीता अजने, आशाबाई ससाणे,कविता तायडे,नर्मदाबाई भारसाकडे, बेबीबाई तायडे, आशाबाई बांगर, सुनीताताई भारसाकडे,विजयाताई भारसाकळे, भीमराव अजने, अतुल बांगर, पंचफुल सरदार,कस्तुरबाई बांगर व यासह बहुजन व बौद्ध समाज बांधव बहुसंख्येने उपस्थीत होते.

झरी येथे सहा गाई बेवारस मिळाल्या

0

 

 

 

दिनांक 12 ऑक्टोबर रोजी पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल वाणी यांना गुप्त माहिती मिळाली की ग्राम दिवानझरी शिवारात अंगणवाडीचे बाजूला तीन गाई आणि तीन वासरू बेवारस अवस्थेत आहेत. मिळालेल्या माहितीवरून पीएसआय वाणी आणि त्यांच्या पथकाने दिवाण झरी येथे घटनास्थळावर पाहणी केली असता तीन मोठ्या गायी आणि तीन वासरी किंमत अंदाजे पंचेचाळीस हजार रुपये ह्या बेवारस अवस्थेत पोलिसांना मिळून आल्या. सदर गाईंना पोलिसांनी ताब्यात घेऊन देखभालीसाठी गोरक्षण संस्थान आकोट येथे पाठविल्या. सदर जनावरांचे मालकांचा शोध पोलीस विभाग घेत आहेत सदर गाई कोणाच्या मालकीची असल्यास त्यांनी योग्य कागदपत्रासह हिवरखेड पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे

 

सुर्या न्युज दिपक रेळे प्रतिनिधी आडगांव बु

सासऱ्यानेच झाडली सुनेवर गोळी

0

 

 

हिम्मतराव तायडे
महाराष्ट्र ब्युरो चीफ

बाळापूर तालुक्यातील बोरवाकडी येथील घटना
जखमींवर सर्वोपचार रूग्णालयात उपचार सुरू

पैश्याच्या देवान-घेवान वरून झालेल्या वादात सासऱ्याने चक्क सुनेवर बंदुकीची गोळी झाडल्याची घटना बाळापुर तालुक्यातील बोरवाकडी येथे शनिवार रात्री दरम्यान घडली. सुनेची प्रकृती गंभीर असून तिच्यावर सर्वोपचार रुग्नालयात अकोला येथे उपचार सुरू आहेत.
पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार सोनाली अक्षय क्षीरसागर हि विवाहीत महीला पतीसोबत बोरवाकडी येथे राहते. दरम्यान विवाहितेचा सासरा मोहन भाऊराव क्षीरसागर हे काही दिवसापासून भरतपूर येथे राहायला गेले होते.सोनाली व सासरे मोहन क्षीरसागर यांच्या मध्ये पैशाच्या देवाण घेवाण वरून वाद होते. मोहन क्षीरसागर हे भरतपूर येथून बोरवाकडी येथे आले असल्याची माहिती मिळतात झांगो पाटील यांचे घराच्या अंगणात माझ्या सासऱ्यांना तुम्ही का बोलावले अशी विचारणा सोनाली करीत असतांना मागाहून आलेल्या मोहन क्षीरसागर यांनी सोनाली हिच्यावर बंदुकीची गोळी झाडली त्यामध्ये पाठीवर गोळी लागल्याने जखमी झालेल्या सोनालीला नातेवाईकांनी तात्काळ सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठुन घटनेचा पंचनामा केला.तसेच सोनाली क्षीरसागर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बाळापुर पोलिसांनी मोहन क्षीरसागर यांचे विरुद्ध कलम ३०७, ३२६, शस्त्र कायदा कलम ३,२५ अन्वये गुन्हा नोंदविला आहे. या प्रकरणी पुढील तपास बाळापुर पोलीस करीत आहेत.

शेतकर्या ना सुरळीत वीजपुरवठा करा अन्यथा तीव्र आंदोलन

0

शेतकर्या च्या सन्मानात जन मंगल संघ मैदानात

सागर जैवाळ सिल्लोड तालुका प्रतिनीधी

सिल्लोड तालुका येथील गेवराई सेमी, बाभूळगाव ,बनकिन्होळा व भायगायब खेडी या गावातील शेतकऱ्यांना आपल्या अनियमित व सुरक्षित वीज पुरवठा वेळापत्रकामुळे पिकांना पाणी देताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
विज ये जा करत असल्यामुळे मोटर जळणे पिके वाळणे तसेच मोटार परत वारंवार चालू करण्यासाठी होणारी दमछाक मानसिक त्रास देणारी आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास महावितरणाच्या अशा अनियमित पुरवठ्यामुळे निघून जाताना दिसतोय.याची दखल जन मंगल संघाचे संस्थापक अध्यक्ष प्रा.राहुल ताठे सर यांनी घेऊन उपकार्यकारी अभियंता सिल्लोड येथे निवेदन देण्यात आले
निवेदनात त्यांनी असेही सांगितले की तात्काळ दखल घेऊन वीज पुरवठा सुरळीत चालू ठेवावा अन्यथा शेतकऱ्यांसह तीव्र आंदोलन जन मंगल संघाच्या पद्धतीने करण्यात येईल.
निवेदन देतांना जन मंगल संघाचे अध्यक्ष प्रा.राहुलकुमार ताठे,जन मंगल संघाचे तालुकाध्यक्ष जयराम जीवरग,महासचिव कृष्णा जैवाळ,प्रसिद्धी प्रमुख कृष्णा तोतरे ,अविनाश दांडगे,जफर शहा, आकाश शेजवळ,दादाराव गोडसे ,उत्तम ताठे आदींची उपस्थिती होती.

बौध्द समाज स्मशानभूमी दुरुस्तीसाठी संग्रामपुर नगर पंचायत विरोधात नागरिकांचे भिक मांगो आंदोलन

0

 

 

संग्रामपुर नगरपंचायतच्या गलथान कारभारामुळे बौद्ध समाज स्मशानभूमी दुरुस्तीसाठी आज नागरिकांनी नगर पंचायत विरोधात  भिक मांगो  आंदोलन छेडण्यात आले..

संग्रामपुर येथील बौध्द स्मशानभूमी च्या दुरुस्ती करण्यासाठी बौध्द समाज बांधवांनी वेळोवेळी निवेदन दिले. दि 4/09/2020 रोजी निवेदन देवुनही 09/10/2020 पर्यंत काम चालू झाले नाही त्यामुळे दि 12/10/2020 रोजी संग्रामपूर शहरात भिक मांगो आंदोलन करण्याचा इशारा दिला होता परंतु संग्रामपुर नगर पंचायत प्रशासनाने कोणत्याच प्रकारची दखल न घेतल्यामुळे आज दि 12/10/2020 रोजी संपूर्ण शहरात भिक मांगो अंदोलन करण्यात आले.. भिक मधे जमा झालेली 1920 रोख रुपयांची रक्कम नगरपंचायत कार्यलयात मुख्याधिकारी तसेच अध्यक्ष उपस्थित नसल्याने संग्रामपूर नगर पंचायत मुख्याधिकारी यांच्या खाली खुर्चीसमोरील टेबलवर ठेवून देण्यात आले..तरी नगर पंचायत प्रशासनाने जर दखल घेतली नाही तर संपुर्ण जिल्ह्य़ात संग्रामपुर नगर पंचायत च्या विरोधात भिक मांगो अंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे..