Home Blog Page 6

Hingnghatnews /रक्तदानाचा महासागर : हिंगणघाटात रोटरीचे भव्य शिबिर

0

 

प्रतिनिधी – सचिन वाघे

हिंगणघाट : रोटरी डिस्ट्रिक्ट ३०३० आणि मिशन लाइफ उपक्रमांतर्गत, रोटरी क्लब ऑफ हिंगणघाटतर्फे सोमवारी (८ डिसेंबर २०२५) भव्य रक्तदान शिबिर उत्साहात पार पडले. शहरातील विविध ठिकाणी आयोजित या शिबिराला युवक, महिला आणि नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला.

या उपक्रमासाठी एच.डी.एफ.सी. (जीवन ज्योती ब्लड बँक), गिमाटेक्स इंडस्ट्रीज प्रा. लि., श्रीमती आशाताई कुणावर कला, वाणिज्य व विज्ञान संस्था तसेच अनेक सामाजिक संस्थांचे सक्रिय सहकार्य लाभले.

शिबिरादरम्यान एकूण 123 पिशव्या रक्ताचे संकलन करण्यात आले. रक्तदात्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे शहरात समाजसेवेची भावना पुन्हा दृढ होताना दिसली.
रोटरी क्लबचे अध्यक्ष रोटेरियन पितांबर चंदानी, सचिव रोटेरियन मंजुषा मुळे, मितेश जोशी, तसेच प्रकल्प संचालक रोटेरियन शाकीरखान पठाण, जितेंद्र वर्मा, उदय भोकरे, पुंडलिक बकाने आणि सर्व रोटेरियन सदस्यांनी रक्तदाते, स्वयंसेवक व सहकार्य करणाऱ्या संस्थांचे मनःपूर्वक आभार मानले.

Wardhanews /“तुमच्या थोड्याशा रक्ताने कोणाचे तरी जीवन वाचू शकते,” असे आवाहन आयोजकांनी केले.

Congress news/काँग्रेसच्या फलकाला काळे फासले..

0

 

प्रचाराच्या अंतिम टप्प्यात राजकीय संघर्ष उफाळण्याची शक्यता!

बुलढाणा : बुलढाणा पालिका निवडणुकीच्या मतदानासाठी अवघे काही तास शिल्लक असताना कुणालातरी पराभव पाण्यात दिसतोय का?

असा प्रश्न उपस्थित झाला आहे. कारण, घटनाच तशी घडली, शहरातील मुस्लिम बहुल भागात काँग्रेस पक्षाच्या फलकाला काळे फासण्यात आल्याचे सोमवारी सकाळी निदर्शनास आले.

Congress news/तेलगू नगर चौकातील एका घरावर रीतसर परवानगी घेऊन लावण्यात आलेल्या फलकावर काळे ऑइल टाकून विटंबना करण्यात आली असून, विरोधकांना आपला पराभव पाण्यात दिसत असल्याची चर्चा काँग्रेस मधील कार्यकर्त्यांमधून होत आहे.

Nagarparishadnews /हिंगणघाटमध्ये उद्या महासंग्राम! नगराध्यक्षपदासाठी चौरंगी लढत; वीस प्रभागात बहुकोनी टक्कर

0

 

प्रतिनिधी सचिन वाघे

हिंगणघाट : शहरातील राजकीय पारडं कोणत्या दिशेने झुकेल याकडे राज्याचे लक्ष लागले असताना, उद्या २ तारखेला नगराध्यक्ष व नगरसेवक निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. या निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी चौरंगी लढत रंगली असून, वीसही प्रभागांत अत्यंत चुरशीची, बहुकोनी टक्कर पाहायला मिळत आहे.

नगरसेवक निवडणुकीत काही प्रभागात कमळ विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आमने-सामने उभे ठाकले आहेत, तर अन्य प्रभागांत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट), काँग्रेस, शिवसेना (शिंदे गट) तसेच अपक्ष उमेदवार मैदानात असून मतदारांना विविध पर्याय उपलब्ध झाले आहेत.

या बहुकोनी लढतीमुळे हिंगणघाट शहरातील सर्वच राजकीय पक्षांचे तसेच स्थानिक नेत्यांच्या राजकीय भवितव्याची परीक्षा होणार आहे. निवडणुकीचे वातावरण तापले असून शहरात नेत्यांची धावपळ, कार्यकर्त्यांची गर्दी आणि मतदारांशी संपर्क मोहीम जोरात सुरू आहे.

Nagarparishadnews /राजकारणात या निवडणुकीनंतर मोठे फेरबदल दिसण्याची चिन्हे दिसत असून, उद्याच्या मतदानाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. मतदारांचा कौल कोणा पक्षाच्या पारड्यात वजन टाकतो, हे निकालानंतर स्पष्ट होणार आहे.

Yavalnews /मशाल” चिन्हासाठी मंगलमय वातावरण निर्मिती झाली असल्याची चर्चा यावल शहरातील मतदारांमध्ये सुरू झाली आहे.

0

 

यावल ( प्रतिनिधी) विकी वानखेडे

यावल नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक.

यावल दि.३०यावल नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासाठी शिवसेना ( उभाठा ) व महाविकास आघाडीचे उमेदवार सौ.छाया अतुल पाटील, आहेत ११ प्रभागातील राजकीय व अपक्ष उमेदवारांच्या प्रचार तोफांचा प्रभाव वाढला असला तरी मंगळवार दि. २ डिसेंबर २०२५ रोजी म्हणजे मतदानाच्या दिवशी “मशाल” चिन्हासाठी मंगलमय वातावरण निर्मिती झाली असल्याची चर्चा यावल शहरातील मतदारांमध्ये सुरू झाली आहे.

Sivshenanews /शिवसेना ( उभाठा ) व महाविकास आघाडी तर्फे अनुभवी असलेले तसेच विकासाचा चेहरा आणि सर्वसामान्यांच्या विश्वासास पात्र ठरलेले आणि सर्व स्तरातील नागरिकांच्या सतत संपर्कात राहून अडीअडचणी सोडवणारे प्रभाग क्र.११ ‘ ब ‘ मधील महाविकास आघाडी तथा उभाठाचे उमेदवार अतुल पाटील व लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासाठी उभाठाचे उमेदवार सौ.छाया ताई अतुल पाटील यांनी गेल्या २० ते २५ दिवसात ” होम टू होम “प्रचार केला व त्यानंतर महाविकास आघाडीचे बहुसंख्य पदाधिकारी,कार्यकर्ते,समाजसेवक, हितचिंतक तरुणांसह प्रचार केला.

त्यात त्यांना यावल शहरातील विविध विकास कामांसाठी आणि उज्वल भविष्यासाठी सर्व स्तरातील मतदारांकडून उस्फुर्त असा प्रतिसाद मिळाला आहे.त्यामुळे मंगळवार दि.२ डिसेंबर २०२५ हा मतदानाचा संपूर्ण दिवस त्यांच्यासाठी मंगलमय ठरणार असल्याने मतदार त्यांना प्रचंड मतांनी निवडून देणार असल्याची संपूर्ण ११ प्रभागातील मतदारांमध्ये सार्वजनिकरित्या चर्चा आहे.

Umrganews /नवीन आमदारांना लोक आमदार म्हणत नाहीत यात आमची चूक काय – माजी आमदार ज्ञानराज चौगुले

0

शिवसेना- काँग्रेस पक्षाचा वचन नामा जाहीर करत पत्रकार परिषद

सूर्या मराठी न्यूज ऋषिकेश सुरवसे उमरगा

उमरगा /प्रतिनिधी – नवीन आमदारांना लोक आमदार म्हणत नाहीत अजूनही मलाच आमदार म्हणतात कारण आम्ही जनतेची तेवढी कामे केली आहेत. आम्ही स्वतःला आमदार म्हणू नका भाषणामध्ये सांगतो तरी लोक प्रेमाने आमदार म्हणतात.

नवीन आमदारांनी एक वर्षात किती निधी आणला व काय कामे केली हे जनतेला सांगावे. अशी टीका उमरग्याचे आमदार प्रवीण स्वामी यांच्या उमरगा नगर परिषदेच्या सभेतील भाषणाचा समाचार घेताना माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी पत्रकार परिषदेत केली.

शिवसेना, काँग्रेस लहुजी शक्ती सेना, रयत क्रांती व मित्रपक्ष शहर विकास पॅनलच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या “वचननामा” प्रकाशन व पत्रकार परिषदे दरम्यान पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी सांगितले.

यावेळी माजी खासदार रवी गायकवाड, शिवसेना नगराध्यक्ष पदाचे उमेदवार किरण गायकवाड, माजी कृषी सभापती जितेंद्र शिंदे, काँग्रेसचे विजय दळगडे, शिवसेना जिल्हाप्रमुख मोहन पनोरे, काँग्रेसचे तालुकाप्रमुख अर्जुन बिराजदार, नानाराव भोसले, शिवसेना तालुकाप्रमुख बळीमामा सुरवसे, सुप्रिया घोडके, राहुल शिंदे, स्वाती स्वामी, सचिन जाधव , अश्विनी सोनकांबळे, धनंजय मुसांडे, यल्लमा विभूते, बशीर शेख, शबाना लदाफ, पंढरीनाथ कोणे, अनिल सूर्यवंशी, सुषमा पाचंगे, जानवी कोथिंबीर, ज्ञानेश्वर पाटील, विशाल कानेकर, फातिमा औवटी, विजय वाघमारे जमशादबी शेख, प्रिया पवार, मुस्तफा चौधरी, मुजावर फरहीन, बाबा मस्के, अभिजीत मोरे, रेखा सूर्यवंशी, आरती शिंदे आदी उपस्थित होते.

Umrganews /शिवसेना काँग्रेस व मित्र पक्षाच्या उमेदवारांच्या शहर विकास पॅनलचा प्रचार फेरीचा पहिला टप्पा पूर्ण झाल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

Ladkibahinyojna/हिंगणघाटात विकासकामांचा वर्षाव; ‘लाडकी बहिण’ अबाधित, ‘लखपती दीदी’ लवकरच – फडणवीस

0

 

प्रतिनिधी सचिन वाघे हिंगणघाट,

दि. २८ नोव्हेंबर :भाजपा–रिपाई (आ.) युतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ गोकुलधाम येथे आयोजित सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंगणघाट शहरासह परिसरातील सुरू असलेल्या विकासकामांचा सविस्तर आढावा घेतला.

‘लाडकी बहिण योजना बंद होणार’ या चर्चांना त्यांनी स्पष्ट शब्दात फेटाळून लावत, “योजना अबाधित सुरू राहणार आहे,” असा विश्वास दिला. याचबरोबर राज्यात ‘लखपती दीदी’ ही नवी योजना लवकरच राबविण्यात येणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, ग्रामीण आणि छोट्या शहरांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य सरकार कटिबद्ध असून ४०० छोट्या शहरांत घनकचरा व्यवस्थापनासाठी तज्ज्ञ नियुक्त केले जाणार आहेत.

सभेला पालकमंत्री पंकज भोयर, माजी खासदार रामदास तडस, आमदार समीर कुणावार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. हिंगणघाटातील महत्त्वाच्या चालू आणि आगामी प्रकल्पांचा आढावा पालकमंत्री आणि आमदारांनी सभेत मांडला.

यामध्ये समृद्धी महामार्गाचे चंद्रपूरशी जोडणीकरण, अमृत योजनेतील १२ जलकुंभ, ४०० बेडचे उपजिल्हा रुग्णालय, वणा नदीवरील ६० कोटींचा बंधारा, १७ कोटींचे नाट्यगृह व सांस्कृतिक भवन, नवीन बसस्थानक, उड्डाणपूल, जिल्हा सत्र न्यायालयाची इमारत, नगरपरिषद व एसटी महामंडळाच्या इमारती अशा प्रकल्पांचा समावेश आहे.

नगराध्यक्षा पदाच्या उमेदवार डॉ. नयना तुळसकर यांचा उल्लेख करताना त्यांच्या घनकचरा व्यवस्थापनातील डॉक्टरेटमुळे शहरात आदर्श निर्माण होईल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.

हिंगणघाटला वैद्यकीय महाविद्यालय मिळवून देण्यात यशस्वी ठरलेले आमदार समीर कुणावार यांनी कॅन्सर हॉस्पिटलची मागणी मांडली असून यावर सकारात्मक विचार केला जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री यांनी दिले. शेतकऱ्यांसाठी दिल्या गेलेल्या ३२ हजार कोटींच्या मदतीचा उल्लेख करून “२ डिसेंबरला भरभरून मते द्या; सरकार तुमची काळजी घेत राहील,” असे आवाहन त्यांनी केले.lakhpatididi

यावेळी २४ गंभीर आजारांवर ५ लाखांपर्यंत मोफत उपचार देणारी नवी आरोग्य योजना लवकरच लागू होणार असल्याची माहितीसुद्धा त्यांनी दिली.
गोकुलधाम परिसरातील सभा उत्साहात पार पडली. महिलांची उपस्थिती विशेषत्वाने लक्षणीय होती. दुपारी दीडची वेळ देण्यात आली असतानाही मुख्यमंत्री फडणवीस हे हेलिकॉप्टरने हिंगणघाटच्या बिडकर महाविद्यालयात उतरून तब्बल ४.२२ वाजता सभास्थळी दाखल झाले.

Devendrafadnsvis /सभा समाप्तीला हिंगणघाट व सिंदी (रेल्वे) नगरपालिकेतील भाजपा–रिपाई (आ.) युतीच्या सर्व उमेदवारांना विजय मिळवून देण्याचे आवाहन पालकमंत्री पंकज भोयर यांनी केले.

Umrganews /महात्मा फुले ग्रामीण पत्रकारीता पुरस्कार अमोल पाटील यांना जाहीर

0

कार्य गौरव पुरस्कार ह.भ.प.शामसुंदर महाराज , प्रा.डाॅ.संजय अस्वले, अधिकारी गौरव पुरस्कार सीईओ मैनाक घोष यांना जाहीर
– – – – – – – –
सूर्या मराठी न्यूज ऋषिकेश सुरवसे उमरगा

Dharashivnews /उमरगा – स्मृतीशेष रामलिंगप्पा वैरागकर सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने दिल्या जाणाऱ्या महात्मा जोतिबा फुले पुरस्कारांची घोषणा महात्मा फुले स्मृतीदिनी करण्यात आली असून यात महात्मा जोतिबा फुले स्मृती कार्य गौरव पुरस्कार सुप्रसिद्ध विचारवंत ह.भ.प.शामसुंदर महाराज सोन्नर आणि प्रा.डाॅ.संजय अस्वले, महात्मा जोतिबा फुले स्मृती अधिकारी गौरव पुरस्कार मुख्य कार्यकारी अधिकारी

(धाराशिव)श्री.मैनाक घोष, महात्मा जोतिबा फुले स्मृती साहित्य पुरस्कार श्री.सुरेंद्र पाटील, महात्मा जोतिबा फुले स्मृती ग्रामीण पत्रकारीता पुरस्कार श्री.अमोल पाटील , महात्मा जोतिबा फुले स्मृती सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार श्री.अमर बिराजदार, महात्मा जोतिबा फुले

स्मृती उद्योजक पुरस्कार श्री.स्वामी ॲग्रो इंजिनिअरींग प्रा.लि.,महात्मा जोतिबा फुले स्मृती शेतकरी पुरस्कार श्री.मनोहर हराळकर, महात्मा जोतिबा फुले स्मृती सरपंच पुरस्कार श्रीम सरोजा बिराजदार ,महात्मा जोतिबा फुले स्मृती शिक्षक पुरस्कार सर्वश्री श्री.अनिल श्रीरसागर ,श्री.लिंबराज कोरे,श्री.प्रविण अगंबरे, श्री.महादेव शिंदे, श्रीम.वनमाला लोखंडे,श्रीम.भावना चौधरी, श्रीम.सुनिता खंडागळे.आदींना जाहीर झाले

असून सदर पुरस्कार प्रदान कार्यक्रम स्मृतीशेष रामलिंगप्पा वैरागकर स्मृतीदिनी अठ्ठावीस डिसेंबर रोजी करण्यात येणार आहे.

Dharashivnews /त्याचबरोबर याप्रसंगी श्री.शामसुंदर महाराज सोन्नर यांचे ‘ संत विचार आणि भारतीय संविधानातील मुल्य ‘ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले असल्याची माहिती प्रतिष्ठानचे श्री.संजय वैरागकर,श्री.सुर्यकांत वैरागकर,श्री.रघुवीर अरणे,श्री.दयानंद पाटील, श्री.गिरीजाकांत वैरागकर , श्रीशैल्य बिराजदार यांनी दिली आहेत.

Hingnghatnews /हिंगणघाटमध्ये आज भव्य सभा; फडणवीसांच्या भाषणात कोणती आश्वासने? नागरिकांमध्ये उत्सुकतेचा माहोल

0

 

प्रतिनिधी सचिन वाघे

हिंगणघाट, २८ नोव्हेंबर २०२५ भाजपा – आर.पी.आय. (आ) युतीच्या नगराध्यक्ष व नगरसेवक / नगरसेविका पदाच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री मा. देवेन्द्रजी फडणवीस यांच्या जाहीर सभेची आज दुपारी १:३० वाजता गोकुलधाम मैदानावर आयोजन करण्यात आले आहे.

नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही सभा अत्यंत महत्त्वाची मानली जात असून, हिंगणघाट शहरासाठी कोणती नवीन विकासात्मक आश्वासने जाहीर होणार याबाबत नागरिकांमध्ये चांगलीच चर्चा रंगली आहे.

स्थानिक पातळीवर वाढत चाललेले पाणीपुरवठा प्रश्न, रस्ते-विकास, स्वच्छता मोहीम, औद्योगिक संधी, आरोग्य सुविधा या मुद्यांवर फडणवीस काय भूमिका मांडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. युतीचे सर्व उमेदवार, पदाधिकारी व कार्यकर्ते सभा यशस्वी करण्यासाठी सज्ज झाले आहेत.

गोकुलधाम मैदान परिसरात सुरक्षा व्यवस्था, वाहतूक नियोजन आणि सभेसाठी आवश्यक सुविधा यांची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे.

Wardhanews /नगरपालिका निवडणुकीस काहीच दिवस उरले असताना, ही सभा निवडणुकीच्या वातावरणात अतिरिक्त ऊर्जाभर घालणारी ठरण्याची शक्यता राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत.

Umrganews /भुसणी केंद्रिय प्राथमिक शाळेत क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचा स्मृतीदिन संपन्न….

0

 

सूर्या मराठी न्यूज ऋषिकेश सुरवसे उमरगा

Dharashivnews /उमरगा: तालुक्यातील भुसणी जिल्हा परिषद केंद्रिय प्राथमिक शाळेत क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचा स्मृतीदिन संपन्न झाला.

प्रथमतः भुसणी केंद्राचे केंद्रप्रमुख लक्ष्मण बनसोडे आणि शाळेचे मु.अ.गोविंद सोमवंशी यांच्या हस्ते क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्तविकपर कु.आर्या हिरमुखे याने क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवन कार्याविषयी माहिती विद्यार्थ्यांना सांगितले.

शाळेतील उपक्रमशील शिक्षक अनिल जाधव, मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी रोहित गायकवाड यांनी थोर समाजसुधारक महात्मा फुले यांच्या जीवन कार्याविषयी सविस्तर माहिती सांगून प्रश्न मंजुषा हा उपक्रम घेतले.

इयत्ता पहिली ते सातवी सातवी वर्गातील निवडक विद्यार्थीनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या ऊल्लेखनीय जीवन कार्याविषयी भाषण केले.

बालसभा उपक्रमातंर्गत इयत्ता सहावी वर्गाच्यावतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष कु. समिक्षा बनसोडे, प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याध्यापक आणि शिक्षक वृंद उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचलन कु.श्रद्धा गावडे आणि आभार प्रदर्शन कु.भुमिका पवार यांनी केले. बालसभा उपक्रमातंर्गत विद्यार्थ्यांना सहावी वर्गशिक्षक अनिल जाधव यांचे मार्गदर्शन लाभले.

Umrganews /यावेळी शाळेचे मुख्याद्यापक गोविंद सोमवंशी,अनिल जाधव, संभाजी माळी,व्यंकट कांबळे, विजय धोत्रेकर,परमेश्वर साखरे, श्रीम.अनिता रांजणकर, मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी रोहित गायकवाड आदि सर्व शिक्षक वृंद आणि विद्यार्थी उपस्थित होते.

Punenews/पुणे गृहरक्षक दलाच्या जवानच्या सतर्कतेमुळे वाचले नवजात श्वान आणि नागरिकांचे चे प्राण

0

 

Punenews/पुणे गृहरक्षक दलाच्या जवानच्या सतर्कतेमुळे वाचले नवजात श्वान आणि नागरिकांचे चे प्राण

Punenews/पुणे शहर गृहरक्षक दलाचे विभाग नाईक श्री उमेश लोंढे यांच्या सतर्कतेमुळे आज दिनांक 26 नोव्हेंबर 2025 रोजी रुपीनगर निगडी येथे समर्थ हाऊसिंग सोसायटी येथील रहिवासी परिसरात अज्ञात व्यक्तीने लावलेल्या आगीचे भयंकर रूप वेळीच लक्षात घेऊन श्री उमेश लोंढे यांनी त्वरित आग आटोक्यात आणण्यासाठी चे प्रयत्न केले तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागास तसे कळवून आग विझवण्यासाठी चे प्रयत्न केले . आगीचे भयंकर रूप पाहून नागरिक भयभीत झाले होते,

Punenews/प्रथमदर्शनी त्यांना आगीचे भयान रूप पाहून त्या ठिकाणी नवजात श्वान (कुत्र्यांचे पिल्ल) आवाजामुळे लक्षात घेऊन त्यांनी तेथील पिल्लांना आगीपासून दूर करत त्यांचे प्राण वाचवले व अग्निशमन दलाच्या मदत येईपर्यंत तेथील आग आटोक्यात आणली.

उमेश लोंढे, विभाग नाईक 5220 पुणे शहर,गृह रक्षक दल.