Home Blog Page 602

2 ऑक्टोबर गांधी जयंती निमित्त तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

0

 

त्याच बरोबर केंद्र सरकारने शेतकरी संदर्भात आवाजी मतदानाने कोणालाही, कोणत्याही घटक पक्षांना अथवा विरोधी पक्षांच्या खासदारांना विश्वासात न घेता बिल संमत केले सदरहू बिल हे शेतकरी विरोधी असून यामुळे भारतातील शेतकरी एक कामगार म्हणून राहील शेतीव्यवसाय पूर्णता कंपनीच्या ताब्यात जाऊन शेतकऱ्यांना शेतीमालाला हमीभाव मिळणार नाही .कारण सदर बिल अंतर्गत बाजार समिती बरखास्त करण्याचा डाव केंद्रशासनाने केला आहे भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असलेला शेती व्यवसाय व त्यावर निर्भर असणारे शेतकरी हे पूर्णतः वेठबिगारी सारखे जीवन झाल्याशिवाय राहणार नाही. सदर बिल केंद्र शासनाने त्वरित मागे घ्यावे त्याचबरोबर उत्तर प्रदेशामध्ये मनीषा वाल्मिकी या तरुणीवर अत्याचार करून तिचा अमानुष हत्या करण्यात आली. उत्तर प्रदेश पोलिसांनी अत्याचारित तरुणीचा मृतदेह त्यांना त्यांच्या नातेवाईकांना न देता परस्पर अंतिम संस्कार तेही रात्री अडीच- तीनच्या दरम्यान करून घेतले ही बाब निंदनीय असून असंतोष पसरवणारी आहे या घटनेचा आम्ही तीव्र निषेध नोंदवित आहोत. अत्याचारीत तरुणीच्या कुटुंबाला भेटण्यासाठी निघालेल्या काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांना अडवून त्यांच्यावर पोलिसांनी हल्ला केला सदर बाब ही भारतीय नागरिकांची स्वतंत्रता हिरावून घेण्यासारखी आहे उत्तर प्रदेश सरकारचा तथा पोलीस प्रशासनाचा आम्ही तीव्र निषेध नोंदवित आहोत वरील तीन बाबीसाठी तालुका व शहर काँग्रेस कमिटी संग्रामपूर च्या वतीने संग्रामपूर येथे धरणे आंदोलन आयोजित केले होते यासाठी पक्षनेत्या स्वातीताई वाकेकर मुख्य समन्वयक अशोक ब्राह्मणे पक्ष निरीक्षक कैलास देशमुख शैलेंद्र पाटील राजेंद्र वानखडे सय्यद आसिफ तेजराव मारोडे मनोहर बोराखडे संतोष राजनकर संजय ढगे अभय मारणे हरिभाऊ राजनकर सुरेश आगे आगे मिर्झा सतीश पाटील बबलू पाटील श्रीकृष्ण दातार राजेश्वर देशमुख विनायक ठाकरे राजू राठोड संतोष टाकळकर सिद्धी कुरेशी जावेद अली यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते

जळगाव काँग्रेस च्या वतीने धरणे आंदोलन

0

 

गजानन सोनटक्के
जळगाव जा जा

आज राष्ट्रपिता महात्मा गांधी तथा दिवंगत पंतप्रधान लाल बहादूर शास्त्रीजी यांच्या जयंतीच्या पर्वावर.
जळगांव जा तालुका व शहर काँग्रेसच्या वतीने, शेतकरी व कामगार बचाव दिवस म्हणून केंद्र सरकारने पारित केलेले शेतकरी विरोधी काळे कायदे मागे घेण्यासंदर्भात संपूर्ण जिल्ह्यात धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.

आज महामानवांच्या प्रतिमांना अभिवादन करून छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून, विविध मुद्यांवर प्रकाश टाकणाऱ्या फलकांसह जळगांव जामोद तहसिल कार्यालय समोर तालुका व शहर काँग्रेसच्या धरणे आंदोलनाला सुरुवात झाली आहे.यावेळी जळगांव जामोद मतदार संघातील बहुसंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते….

०२ ऑक्टोबर २०२० आपले सर्वांचे लाडके बापू राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची १५१ वी जयंती.

0

 

 

मुंबई प्रतिनिधी (महेश कदम)

बेबी राठोड, किसन नगर स्कूल, ठाणे, इयत्ता:- नववी, हिने लिहिलेली महात्मा गांधी संदर्भात माहिती व भैरवी गडगे, साधना विद्यालय हिने काढलेले महात्मा गांधी चे छायाचित्र. जाणुन घेऊ त्या विषयी.

मला कळलेले गांधी….

आजवर भारतात अनेक नेते मंडळी होऊन गेली आहेत पण मला जर कोणी प्रश्न विचारला तुझे आवडते नेते कोण ? तर एका क्षणाचा विचार न करता माझं उत्तर असेल ते म्हणजे महात्मा गांधी.

गांधीजींना ‘महात्मा’, ‘राष्ट्रपिता’, आणि ‘साबरमतीचे संत’ म्हणून सुद्धा ओळखले जाते. स्वातंत्र्यप्राप्तीसाठी त्यांनी देशाच्या नागरिकांना प्रेरणा देण्याचे खूप काम केले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली देशाला स्वातंत्र्य मिळाले असे म्हंटले तरी कधीच वावगं ठरू शकत नाही.

बापूंना संपूर्ण जग ओळखते. त्यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी होते. त्यांचा जन्म गुजरात येथील पोरबंदर नगरात ०२ ऑक्टोबर, १८६९ मध्ये झाला. भारतात शिक्षण पूर्ण झाल्यावर पुढील शिक्षण पूर्ण करण्यासाठी ते इंग्लंडला गेले आणि बॅरिस्टर बनून भारतात आले. पुढे ते दक्षिण आफ्रिकेत गेले आणि तिथून समाजाची सेवा करण्यास सुरुवात केले परत भारतात आल्यावर देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याचा त्यांनी निर्णय घेतला. अखेर १५ ऑगस्ट, १९४७ रोजी आपल्याला स्वातंत्र्य मिळाले. ३० जानेवारी, १९४८ रोजी गांधीजींची हत्या करण्यात आली. त्यावेळी संपूर्ण देश शोकाकुल वातावरणातून जात होता.

बापूंनी समाजाला तीन तत्वे सांगितली एक म्हणजे सत्य , दुसरे म्हणजे अहिंसा आणि तिसरे म्हणजे सत्याग्रह. महान उद्देश प्राप्त करायचे असेल तर पवित्र साधनांचा वापर करावा अशी त्यांची शिकवण आहे.

लेखाच्या शेवटी एवढंच म्हणेल कि

दे दी हमें आज़ादी बिना खड्ग बिना ढाल साबरमती के संत तूने कर दिया कमाल.

जयंती निमित्त विनम्र अभिवादन

मोताळा तालुका काँग्रेसच्या वतीने उत्तर प्रदेशातील हाथरस येथील मनिषा वाल्मिकी तरुणीवर बलात्कार करणाऱ्यांना फाशीची शिक्षा होण्यासंदर्भात

0

 

व उत्तर प्रदेशातील सरकार बरखास्त करा व शेतकरी व कामगार विरोधी काळे कायदे मागे घेण्यासाठी मोताळा तालुका व शहर कॉग्रेस कमिटीच्या वतीने भव्य धरणे आंदोलन करण्यात आले.

अजहर शाह मोताळा प्रतिनिधी

मोताळा:- तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने दिनांक 1ऑक्टोबर 2020 रोजी तहसीलदार यांचे मार्फत मा. महामहीम राष्ट्रपती साहेबांना उत्तर प्रदेशातील हाथरस येथील मनीषा वाल्मीक या तरुणीवर बलात्कार करून तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या गुन्हेगारांविरुद्ध तात्काळ कारवाई करणे व उत्तर प्रदेश मधील सरकार बरखास्त करण्याचा संदर्भात निवेदन देण्यात आलेले आहे उत्तर प्रदेश मध्ये 19 वर्षीय तरुणीवर सामूहिक अत्याचार करून तिच्या बर्र्बर्र्तापुर्वक तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या तसेच केरळच्या धर्तीवर पोलीस एन्काऊंटर करणारा अथवा सदर प्रकरणाची चौकशी करून गुन्हेगारांविरुद्ध कठोर कारवाई करण्याची उत्तर लोकशाही देशात पंतप्रधान व संबंधित राज्याचे मुख्यमंत्री देत नाही म्हणून राष्ट्रपती महोदयांनी यामध्ये लक्ष घालून तात्काळ पीडितांना न्याय मिळवून द्यावा व अत्याचारग्रस्त दलित चळवळीचा जीवनमरणाचा संघर्ष संपल्यानंतर तिच्या निधनाचे वृत्त देखील तिच्या कुटुंबीयांपासून लपवणार्या व तिच्या कुटुंबियांच्या अनुपस्थितीत परस्पर अंत्यसंस्कार करणाऱ्या संबंधित पोलिस अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे व कायदा व सुव्यवस्थेची राजरोसपणे होत असलेल्या त्या उत्तर प्रदेशातील सरकार या सर्व गोष्टींमध्ये कमकुवत ठरत असल्यामुळे उत्तर प्रदेश सरकार बरखास्त करण्यात यावे यासंदर्भात उत्तर प्रदेशातील माणुसकीला काळिमा फासणाऱ्या घटनेचा मोताळा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तीव्र शब्दात धिक्कार करत व उत्तरप्रदेशात सरकार राष्ट्रपती महोदयांनी तात्काळ बरखास्त करीत सर्व संबंधित पोलिस अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्याचे आदेश संबंधितांना द्यावेत या तरुणीवर अत्याचार करून तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या गुन्हेगारांना फासावर लटकवण्याची कायदेशीर प्रक्रिया फास्ट ट्रॅक वर चालवण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी मोताळा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात येत आहे .तसेच मृतकांच्या घरच्या मंडळींचे सांत्वन करण्यासाठी मा राहुलजी गांधी आणि प्रियंका जी गांधी जात असताना त्यांना धक्काबुक्की करण्यात आली त्यांचा सुद्धा निषेध मोताळा तालुका काँग्रेस नोंदवीत आहे आज दिनांक २/१०/२०२० रोजी शेतकरी व कामगार बचाव दिवस विरोधि काळे कायदे मागे घेण्याच्या मागणीसाठी भव्य धरणे आंदोलन मोताळा व शहर कॉग्रेस कमिटी चा वतीने करण्यात आले व तहशिलदार साहेब यांना निवेदन देण्यात आले व निवेदन व धरणे आंदोलन देण्यासाठी मा.आ. हर्षवर्धनजी सपकाळ व पक्षनेते मुकत्यारसिंहकाका राजपुत व मोताळा तालुक्यातील पदाधिकारी,कार्यकर्त,नेते मंडळी उपस्थित होते

त्या दलीत युवतीला न्याय मिळण्यासाठी सोमवारी आक्रोष मोर्चाचे आयोजन

0

 

चिखलीः उत्तर प्रदेश येथील हाथरस,(युपी) येथील दलीत मुलीवर झालेल्या अन्याच्या निषेधार्थ मोर्चा काढणे बाबत. नम्र निवेदन सादर देण्यात आले. निवेदनात नमुद उत्तर प्रदेशातील हाथरस येथील दलीत तरुणीवर अमानुष अन्याय अत्याचार करुन निघृण हत्या करण्यात आली व तिचे प्रेत सुध्दा तिच्या घरच्यांना देण्यात आले नाही. उलट स्थानिक प्रशासन हे उडवाउडवीचे उत्तरे देऊन दिशाभुल करीत आहे त्या निषेधार्थ चिखली शहर व तालुक्यातील सर्व आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते व समस्त अनुसुचीत जाती जमातीच्या (दलीत) नागरीकांच्या वतीने दि. 5 आक्टों 2020 दुपारी 12.00 वाजता फुले आंबेडकर वाटीके पासुन सिमेंट रोड ने बैल जोडी समोरुन बागवान गल्ली तसेच नगर परीषद समोरुन मा. तहसिलदार साहेब यांच्या कार्यालयावर धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चात जास्तित जास्त संखेने उपस्थीत राहण्याचे व सर्वांनी तोंडाला मास लाऊन व सामाजिक अंतर ठेऊन मोर्चात सहभागी होण्याचे आवाहण करण्यात आले आहे.
यावेळी प्रशांतभैया डोंगरदिवे बुलडाणा जिल्हा अध्यक्ष मानवाधिकार संघटन, भाई सिध्दार्थ पैठणे जिल्हा अध्यक्ष स्वारीप, किशोर कदम काॅग्रेस नेते, भाई विजय गवई दलीत मुक्ती सेना, प्रा. राजु गवई नगरसेवक, हिम्मत जाधव आरपीआय, प्रशांत ढोरे पाटील विदर्भ प्रदेश अध्यक्ष रयतक्रांती संघटना, आनंद गैची प्रदेश अध्यक्ष यूवा वाल्मीकी समाज, अनिल वाकोडे शेतकरी संघटना, विजय खरे, विजय नकवाल नगर सेवक, मनिष मोरे सामाजीक कार्यकर्ते, समाधान भटकर, नंदु कर्‍हाडे यूवा सेना, प्रितम गैची शिवसेना, प्रकाश बनकर, बाळु भिसे वंचीत आघाडी, भाई विजयकांत गवई, विजय सोनवाल, रवि मगर बामसेफ, सुरज अवसरमोल बसपा, विनोद कळसकर वंचीत नेते गजानन पवार शिवसेना, नितीन फुलझाडे संपादक वृत्त धर्म, छोटु कांबळे संपादक आम्हीचिखलीकर, विनोद खरे पत्रकार सकाळ, रविंद्र वानखडे हे उपस्थित होते.

वंचित बहुजन आघाडी संग्रामपूर तालुका जिल्हा बुलढाणा चे वतीने आज दिनांक 1-10-2020 ला माहामहीम राष्टपति महोदय यांना मार्फत मा तहसीलदार साहेब तहसील कार्यालय संग्रामपूर येथे निवेदन देण्यात आले आहे.

0

 

:ग्राम हातरस उत्तरप्रदेश येथील बलात्कार पिडीतेच्या गुन्हेगारांना फाशीची शिक्षा करणे बाबत
1 4 – सप्टेंबर 2020 रोजी 19 वयाच्या तरूण कु मनिषा वाल्मिकी हिच्या वर 4 नराधम गुन्हेगारांनी सामुहिक बलात्कार केला आणि तिच्या शरीराची अवहेलना केली या निंदनीय कूतयात पिडीत तरुणीचा मृत्यू झाला.
सदर घटना हि अतिशय कुरू आणिअमानविय निंदनीय असुन आम्ही या घटनेचा तीव्र जाहीर निषेध करतो.
या प्रकरणी संबंधीत गुन्हेगारांना त्वरित फाशीची शिक्षा व्हावी ही वंचित बहुजन आघाडी संग्रामपूर तालुका चे वतीने मागणी करतो आहे.
अन्यथा लोक शाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल याची सर्वस्वी जबाबदारी शासनाची राहील.
निवेदन कर्ते. मा :उत्तमराव उमाळे अध्यक्ष भारिप बहुजन महासंघ तालुका संग्रामपूर
मा भगत सिंग पवार जिल्हा परिषद सदस्य पळशि झाशी
मा सौ रूपाली ताई रामेश्वर तायडे नगरसेविका संग्रामपूर
मा देविदास दामोदर जेष्ठ नेते
मा रत्नाकर भिलंगे जेष्ठ नेते
मा संदीप भाउ अवचार ता संघटक
मा शत्रुघ्न बाजोडे जेष्ठ नेते
मा विजय भारसाकळे कार्यकर्ते
मा अँड नितीन गवांदे साहेब
मा पुंडलिक तळोकार
मा दत्ता भाउ कुकडे
मा राहूल नितोने सह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
दिनांक 1-10-2020 गुरुवार /वेळ :12 वाजता दुपारी.

आज ग्रामपंचायत कार्यालय पातुर्डा बु येथे संपूर्ण जगाला सत्य, अहिंसा, राजधर्म, सत्याग्रह यांची शिकवण देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी व ‘जय जवान जय किसान’

0

 

 

घोषणेने देशाच्या इतिहासात कर्तृत्वाचा ठसा उमटवणारे भारताचे दुसरे पंतप्रधान स्व. लाल बहादूर शास्त्री या दोन्ही महापुरुषांच्या जयंतीनिमित्त पातुर्डा गावचे लोकनियुक्त सरपंच श्रीमती शैलजाताई भोंगळ यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले जयंतीनिमित्त ग्रापं सदस्य दिनकर इंगळे,सिद्धार्थ गाड़े,पप्पू पठाण,नीलेश चांडक, विनायक चोपडे,भास्कर अढाव,सूनील इंगळे,राजू मांडवगडे हे ग्रा प सदस्य तसेच,ग्रामपंचायत कर्मचारी विलास इंगळे,संजीव सातव,विठ्ठल इंगळे श्रीकृष्ण आमझरे,ज्ञानेश्वर पवार, सय्यद लियाकत,सुधाकर इंगळे उपस्थित होते

रविकांत तुपकरांच्या उपस्थितीत ‘स्वाभिमानी’त दणक्यात प्रवेश..

0

 

अजहर शाह मोताळा तालुका प्रतिनिधी

(मोताळा) – स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते मा.रविकांतजी तुपकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मोताळा तालुक्यातील युवक कॉग्रेसचे मा.तालुकाध्यक्ष श्री.राजेश गवई व श्री.मारोती मेढे यांच्यासह 50 पेक्षा जास्त तरुण कार्यकर्त्यांनी आज (दि.1 ऑक्टोबर) स्वाभिमानी शेतकरी संघटनेत प्रवेश केला. यासर्व तरुण कार्यकर्त्यांचे रविकांतभाऊंनी स्वागत केले. तसेच नवीन कार्यकर्त्यांच्या प्रवेशाने तालुक्यात चळवळीला नवी बळकटी मिळणार असल्याचे ते यावेळी म्हणाले..
यावेळी राजेश गवई व मारोती मेढे यांच्यासोबत धम्मदीप वानखेडे,भागवत धोरण,मनोज पाटील,रविकिरण जुणारे,सुदर्शन खराटे, मनोहर उमाळे,मनोज पाटील,सुशांत इंगळे,पंकज दाभाडे, संघपाल गायकवाड, शेख अफसर, फारूक शहा इब्राहीम शहा,उबेद खान,मकसूद शहा,तौसिफ शेख,मनोज मेढे, सागर पुरभे,योगेश मिरगे, चरणसिंग राजपूत,सुशील अग्रवाल, नावेद खान, मोहम्मद दानिश,सैय्यय मुजम्मीर,सैय्यय जमीर,तस्लिम शहा, शे.अफसर, योगेश राजपूत, केवलसिंग राजपूत,वासुदेव मेढे,दीपक मेढे,शुभम इंगळे,अजय गाडेकर,वासुदेव चव्हाण,रंगनाथ चव्हाण,निंबाजी मेढे,शुभम मेढे, प्रल्हाद मेढे, देविदास मेढे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी प्रवेश केला.
यावेळी ‘स्वाभिमानी’चे पवन देशमुख, शे.रफिक शे.करीम,प्रदीप शेळके,महेंद्र जाधव,सैय्यद वसीम,रशिद पटेल,दत्ता पाटील, विजय बोराडे,उमेश राजपूत,चंदू गवळी,रमेश जोशी,संतोष गवळी,गोपल शिप्पलकर,जुबेर पटेल,सादिक खान,दिपक जाधव,सतीश नवले,संदीप गोरे,समाधान महाले,नितीन पुरभे यांच्यासह कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते..

हाथरस घटनेतील आरोपींना फाशी देऊन पिडीतेला न्याय द्या :- ॲड.जयश्रीताई शेळके

0

 

उत्तरप्रदेशमधील हाथरस येथील एका मुलीवर सामुहिक बलात्कार करण्याची अमानवीय घटना घडली. पंधरा दिवस दवाखान्यामध्ये मृत्यूशी झुंज देत पिडीत मुलीने शेवटी आपली जीवन यात्रा संपवली. यादरम्यान पोलिस प्रशासन तसेच उत्तरप्रदेश सरकारकडून पिडीतेला न्याय देण्यासाठी आरोपींवर कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही. याउलट आरोपींना शोधून त्यांना जेरबंद करण्याऐवजी स्थानिक प्रशासनाकडून पिडीत मुलीच्या कुटुंबावर दबाव टाकण्यात आला आणि काल मध्यरात्री त्या मुलीवर कुटुंबियांना विश्वासात न घेता अंत्यसंस्कार करण्यात आल्याची अजून एक निंदनिय घटना समोर आली आहे. या अत्यंत दुर्दैवी घटनेचा सरचिटणीस, महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटी तथा सदस्य,जिल्हा परिषद ॲड.जयश्रीताई शेळके यांच्यावतीने निषेध नोंदविण्यात आला.

देशभरामध्ये महिलांवर तसेच लहान मुलींवर अत्याचार होण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. मग यामध्ये दिल्लीतील निर्भया, तसेच कोपर्डी, कठुआ, उन्नाव, हैद्राबाद, हिंगणघाट आणि आता उत्तरप्रदेशमधील हाथरस येथील घटनेची दुर्दैवी भर पडली. 2018 च्या आकडेवारीनुसार भारतामध्ये दररोज 150 पेक्षा जास्त बलात्कार होतात. देशभरात महिलांवरील अशा अत्याचाराच्या घटना वारंवार घडत असताना आरोपींच्या शिक्षेस होणारा विलंब हि अतिशय गंभीर बाब आहे. त्यामुळेच असे कृत्य करण्याऱ्या विकृत मनोवृत्तीच्या लोकांना कायद्याची भिती वाटत नसावी. परंतु या घटनेमुळे जनसामान्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात असंतोषाचे वातावरण आहे. मात्र वेळोवेळी फक्त निषेध नोंदवून किंवा ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ यांसरख्या पोकळ घोषणा देवून ह्या घटना थांबणार नाहीत. महिला सुरक्षेच्या प्रश्नांवर सुस्त पडणे आणि बलात्कारासारख्या घटना घडल्यानंतर कायम झोपेचं सोंग घेणे बंद व्हायला हवे. हाथरस येथील घटनेमध्ये आरोपींनी पिडीतेसोबत केलेले कृत्य हे क्रौर्याचा कळस गाठणारे आहे. पिडीतेच्या मृत्युनंतर तिच्या मृतदेहाचे शवविच्छेदन न करता तसेच कुटुंबियांना न कळवता मध्यरात्री तिचा मृतदेह जाळून टाकणे हे अमानवीय आहे.
भविष्यात अशा प्रकारचे अमानवीय, हिंसक, आणि लाजिरवाणे कृत्य करण्याची कुणाची हिंमत होता कामा नये, यासाठी उत्तरप्रदेशमधील हाथरस येथील मुलीवर झालेल्या अत्याचाराचा गांभिर्याने विचार करुन मानवतेला काळीमा फासणारे कृत्य करणाऱ्या नराधमांना फाशीचीच शिक्षा द्यावी अशी मागणी सरचिटणीस, महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटी तथा सदस्य,जिल्हा परिषद ॲड.जयश्रीताई शेळके यांनी मा. केंद्रीय गृहमंत्री यांच्याकडे मा.जिल्हाधिकारी तसेच मा.जिल्हा पोलिस अधिक्षक यांच्या मार्फत निवेदन देवुन केली.
यावेळी निवेदन देतांना सौ.नंदीनी टारपे, सौ.अर्चना राजेंद्र शेळके, सौ.अर्चना अरुण शेळके, सौ.अनिता गजानन गायकवाड, सौ.अलका विष्णू धंदर, सौ.वर्षा दिलीप खरात, सौ.भारती देवानंद ताठे, सौ.लता गणेश बाहेकर, सौ.सुनिता संदीप सावळे, सौ.स्मिता किरण वराडे, सौ.सोनाली अनिल वाघ, सौ.दिपाली सतिष राजपूत, सौ.मिनाक्षी संजय देशमुख, स्वाती मधुकर साबळे, उषा समाधान डोंगरे, सौ.रंजना गजानन कुसळकर, पुजा घाडगे, संगीता सोनुने, शितल सावळे यांच्यासह अनेक महिला उपस्थित होत्या.

 

पोलीस प्रशासन व नगरपालिका यांची कारवाई विना मास्क दंड

0

 

गजानन सोनटक्के
जळगांव जा.प्रतिनिधी:-

कोरोना महामारीचा वाढता पादुर्भाव लक्षात घेता माननीय जिल्हाधिकारी साहेब आणि एसपी साहेब यांच्या आदेशानुसार जळगाव जामोद पोलीस स्टेशन अंतर्गत करण्यात आली मास्क न वापरणाऱ्या व्यक्तींवर दंडात्मक कारवाई या कारवाईदरम्यान जळगाव जामोद पोलीस स्टेशन च्या अंतर्गत ह्या संयुक्त कारवाई दरम्यान मास्क न वापरणाऱ्या व्यक्तींकडून पोलीस प्रशासन व नगरपालिका प्रशासन यांनी कारवाई दरम्यान दंड वसूल केला. याचे कारण की कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव जास्त होत असल्यामुळे ह्या कारवाया अश्याच चालू राहतील त्यामुळे सर्व नागरिकांनी तोंडाला मास्क किंवा रुमाल बांधणे अति आवश्यकच आहे. तसेच नागरिकांनी कोठेही गर्दी करू नये असे आवाहन कारवाई दरम्यान करण्यात आले. ही कारवाई जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुनील जाधव यांचे मार्गदर्शनात पोलीस प्रशासन व नगरपालिका प्रशासनाने केली ही कारवाई करताना जळगाव जामोद पोलीस स्टेशनची टिम व नगरपालिकेची टिम यांनी विना मास्क नागरीकांवर हि कारवाई करण्यात आली.