Home Blog Page 606

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शहापूर येथे शेत रस्त्या साठी जिल्हाध्यक्ष श्याम अवथळे यांच्या नेतृत्वाखाली अर्धनग्न तोरणा व मन नदी पात्रामध्ये आंदोलन सुरू..

0

 

 

बुलढाणा जिल्ह्यातील शहापूर,खेटरी, शिरपूर, पिंपळखुटा, चांगेफळ,चतारी, चांदणी या बुलढाणा व अकोला जिल्ह्यातील शेता साठी व गावासाठी गेल्या 2006 पासून रास्ता नसल्या कारणामुळे हजारो एकर शेती चे नुकसान होत आहे मजुराला व गावकरी लोकांना जाण्या साठी रास्ता नाही..
वारंवार गावाच्या वतीने निवेदन व ग्रामपंचायत च्या वतीने ठराव देऊन सुद्धा अद्याप पर्यंत मागणी पूर्ण झाली नाही

वन विभागाकडे मोठे आव्हान बिबट्या करतोय रोजच शिकार

0

 

दहीगाव परीसरातील नागरिक भयभीत

बिबट्या पकडण्यात वन विभागाच्या अधिकाऱ्यांना अपयश

तालुका प्रतिनीधी : (अमोल जवंजाळ  तेल्हारा

तालुक्यातील दहिगाव शिवारात गेल्या काही दिवसापासून बिबट्या मुक्त संचार करत आहे मागील दोन दिवसात बिबट्या ने दोन हरीण, ‌एका मोराची शिकार केली असून वन विभागाने बिबट्या च्या शोधार्थ CC TV कॅमेरे लावण्यात आले मात्र वन विभागाला तुरी देऊन बिबट्या आपले स्थळ बदलत आहे त्यामुळे बिबट्या नेमका कुठे आहे याची भीती परिसरात पसरली असून नागरिक कामाला सुद्धा जात नसल्याने शेतीची फार मोठी हानी होत आहे.वन विभागाने तात्काळ ड्रोन कॅमेरे बोलावून शोध मोहिमेस गती द्यावी नाहीतर मनुष्य हानी सुद्धा होण्याची शक्यता नाकारता येत नाही बिबट्या लोकेशन च्या काही अंतरावरच गाव वस्ती असल्याने नागरिक भयभीत झाले आहेत मात्र वन विभागा कडुन‌‌ अजुन ठोस कारवाई अजून केल्याचे दिसत नाही.
याआधी सुद्धा तेल्हारा तालुक्यातील चितलवाडी ह्या गावात बिबट्या ने थैमान घातले होते व बिबट्या कोरड्या विहिरीत पडला होता वन विभागाने रात्र भर प्रयत्न करून सुद्धा बिबट्या पिंजऱ्यात न येता वन अधिकाऱ्यांना चुना लावून गेला असल्याने नागरिकांमध्ये वन विभाग चर्चेचा विषय बनला आहे. तरी हा बिबट्या पकडण्यात वन विभागाच्या अधिकाऱ्यांना यश मिळेल का असा प्रश्न जनतेला उपस्थित होत आहे.

जनता जनतेची हाके कधी सरकार समजेल – माजी आमदार संजय पुरम

0

 

 

गोंदिया-शैलेश राजनकर

सालेकसा: कोरोनाव्हायरसमुळे शासनाच्या दुर्लक्षामुळे निष्पाप नागरिकांचा मृत्यू होत आहे. एकीकडे आदरणीय पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत घेण्यात आलेल्या बैठकीत आरोग्य विभागाच्या अधिका by्यांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयांमध्ये बरीच औषधे व ऑक्सिजन आहे. मग आवश्यक ऑक्सिजन पुरवठा रुग्णांना जाणूनबुजून दिला जात नाही. ज्यामुळे अनेक रूग्णांनाही आपला जीव गमवावा लागला. आरोग्य विभागाच्या अशा दुर्लक्षामुळे दररोज 2 ते 3 रुग्ण मरत आहेत. असे आरोप करत माजी आमदार संजय पुरम यांनी आरोग्य विभाग आणि सरकारला लक्ष्य केले. अधिक मृत्यू कोरोना रोगामुळे आणि प्रशासन आणि आरोग्य विभागाच्या दुर्लक्षामुळे होत आहेत. जनतेला सर्वोच्च आरोग्य सेवा देण्याचे आश्वासन सरकारने दिले आहे, परंतु सरकार कुठल्याही आश्वासनांचे पालन करत असल्याचे दिसत नाही, असे ते म्हणाले. सालेकसा तालुक्यातील सोनपुरी गावचे माजी सरपंच नेत्राम माछीर्के यांचेही अशाच परिस्थितीत निधन झाले, ज्यावर पुरम इनोहणे ठाकरे सरकारने त्यांचा तीव्र निषेध केला.
कोरोनावरील नियंत्रणासाठी कोणतेही योग्य नियोजन नसल्यामुळे कोरोना झपाट्याने पसरत आहे आणि सरकारला प्रश्न विचारण्यास आणि निरोगी आरोग्य सेवा देऊन कोरोना संक्रमणाचा प्रसार रोखण्याची तयारी दर्शविली जात आहे. त्यांनी माजी आमदार संजय पुरम यांनी सरकारकडे जाण्याची मागणी केली आहे.

सुनगाव ग्रामपंचायत प्रशासक व पोलीस प्रशासन यांची धडक कारवाई विना मास्क दंड

0

 

गजानन सोनटक्के
जळगाव जा

जळगाव जामोद तालुक्यामध्ये सध्या कोणाचा प्रभाव वाढत असून जळगाव जामोद तालुक्यामध्ये कोरोनाचे ऋग्न निघत आहेत त्या दृष्टीने जळगाव जामोद तालुक्यातील प्रशासन सतर्क झाले आहेत त्यामुळे त्यांनी धडक मोहीम राबविली आहे ती म्हणजे विना मास्क किंवा तोंडाला बांधणे व गर्दी करणे त्याकरिता गर्दी होऊ नये म्हणून आज दिनांक 27 सप्टेंबर रोजी पाच वाजताच्या सुमारास ग्रामपंचायत येथील प्रशासक श्री पी एस राजपूत व जळगाव जामोद पोलीस स्टेशनपोलीस उपनिरीक्षक सचिन वाकडे साहेब व पोलीस कर्मचारी आणि ग्रामपंचायत कर्मचारी यांनी सुनगाव बस स्टँड आवारात फिरणाऱ्यांना दंड ठोठावला आहे व त्यांच्याकडून 16 जणांवर कारवाई करून दंड वसूल केला आहे दंडाची पावती शंभर रुपये याप्रमाणे सुनगाव ग्रामपंचायत प्रशासन व पोलीस प्रशासन यांनी सुनगाव येथे धडक कारवाई केलेली आहे

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी सरकार कटिबद्ध; राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी जाऊन केली पाहणी.

0

 

 

 

सिल्लोड तालुका प्रतिनिधी सागर जैवाळ

सोयगाव तालुक्यात गेल्या दोन -तीन दिवसापूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी केली.कोरोनाचे संकट कायम असले तरी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी सरकार कटिबद्ध असून अतिवृष्टीमुळे झालेल्या संपूर्ण बाधित क्षेत्राचे तत्काळ पंचनामे पूर्ण करा,पंचनामे करीत असतांना एकही नुकसान ग्रस्त शेतकरी पंचनामा पासून वंचित राहता कामा नये असे निर्देश उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.

सोयगाव तालुक्यातील कंकराळा, माळेगाव, बहुलखेडा,जरंडी, निंबायती,बनोटी इत्यादी भागात अतिवृष्टी मुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याबाबत प्रारंभी सोयगाव येथे तहसिल कार्यालयात याबाबत आढावा बैठकित झालेल्या नुकसानीचा आढावा महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी प्रत्यक्ष नुकसान झालेल्या शेताच्या बांधावर जाऊन पाहणी करीत शेतकऱ्यांशी संवाद साधला.

यावेळी महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार,आमदार उदयसिंग राजपूत, शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजू राठोड, तालुकाप्रमुख प्रभाकर काळे, विधानसभा प्रमुख दिलीप मचे, जि.प.च्या महिला बालकल्याण सभापती मोनाली राठोड, डॉ. अस्मिता पाटील, शिवसेना महिला आघाडीच्या धृपताबाई सोनवणे,जि.प. सदस्य गोपी जाधव, शिवसेना शहर प्रमुख संतोष बोडखे,पंचायत समिती सभापती रुस्तुलबी उस्मान खाँ पठाण , उपनगराध्यक्षा मंगलाबाई राऊत, पंचायत समिती सदस्य धरमसिंग चव्हाण, निजाम पठाण, आर.एस.पवार,शिवसेना नगरसेवक विठ्ठल सपकाळ, शेख सलीम हुसेन,संजय मुटकुटे, यांच्यासह उपविभागीय अधिकारी ब्रिजेश पाटील, तहसीलदार प्रवीण पांडे, गटविकास अधिकारी सुदर्शन तुपे, कंकराळा सरपंच, चंदाबाई राजपूत, माळेगाव सरपंच दादाराव जाधव, बहुलखेडा सरपंच राजमल पवार, बनोटी वाडी सरपंच नितीन बोरसे, जामटी सरपंच राधेश्याम जाधव आदींसह महसूल ,कृषी व विविध
विभागातील अधिकारी उपस्थित होते.

संपूर्ण हिंगोली जिल्हा ओला दुष्काळ जाहीर करा:-आमदार संतोषराव बांगर

0

 

 

अंकुश गिरी
ग्रामीण प्रतिनिधी सेनगाव

महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री माननीय नामदार दादासाहेब भुसे पाटील यांचा आज हिंगोली जिल्ह्यांमध्ये पाहणी दौरा करून जिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली येथे आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीदरम्यान माननीय नामदार कृषिमंत्री दादासाहेब भुसे पाटील यांनी महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना, पंतप्रधान पिक विमा योजना, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना, नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना, इत्यादी योजनांचा आढावा घेण्यात आला.
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदार संघाचे आमदार संतोषराव बांगर‌ साहेब यांनी बैठकीमध्ये पिक विमा कंपन्यांच्या गलथान कारभाराबाबत तसेच राष्ट्रीयकृत बँका कडून शेतकरी बांधवांना देण्यात येणारी वागणूक व पिक कर्ज वाटपाबद्दल प्रश्न उपस्थित करण्यात आले.
यावेळी कृषिमंत्री दादासाहेब भुसे यांनी पिक विमा कंपनीच्या अधिकाऱ्याला फोन करून सध्या स्थिती चा सविस्तर अहवाल कंपन्यांकडे सादर करून पिक विमा मंजूर करण्याचे आदेश देण्यात आले. तसेच राष्ट्रीयकृत बँकेच्या अधिकाऱ्यांना पिक कर्ज वाटपाबद्दल धारेवर धरण्यात आले.सविस्तर परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर ‌कृषिमंत्री दादाजी भुसे साहेब यांनी शेतकरी बांधवांनी कुठेही घाबरून जाऊ नये व काळजी करू नये महाराष्ट्रातील शिवशाहीचे ठाकरे सरकार शेतकरी बांधवांच्या सोबत आहे अशा शब्दात शेतकरी बांधवांना धीर दिला. यावेळी हिंगोली जिल्ह्याचे खासदार हेमंत पाटील शिवसेनेचे जिल्हा प्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संतोषराव बांगर साहेब जिल्हा परिषदेचे अध्यक्ष गणाजी बेले आमदार तानाजीराव मुटकुळे आमदार राजू नवघरे जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती फकीरराव मुंडे उद्धवराव गायकवाड उपजिल्हाप्रमुख परमेश्वर मांडगे संदेश देशमुख जी डी मुळे सुनील काळे नगरसेवक रामभाऊ कदम अनिल देशमुख तालुकाप्रमुख सकाराम उबाळे साहेबराव देशमुख यांच्यासह जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी जिल्हा परिषद मुख्याधिकारी राधाविनोद शर्मा जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश कलासागर व कृषी विभागाचे सर्व संबंधित अधिकारी शिवसेना उपजिल्हाप्रमुख तालुकाप्रमुख शहर प्रमुख उपस्थित होते.

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महासचिव मुकुलजी वासनिक यांच्या वाढदिवसानिमित्त बुलढाणा जिल्हा काँग्रेसच्या वतीने करण्यात आला कोरोना योद्ध्यांचा सत्कार…

0

 

गजानन सोनटक्के
तालुका प्रतिनिधी:-
-जळगाव जा

कोरोना सारख्या जागतिक महामारीत मोलाचे योगदान देणाऱ्या कोरोना योद्ध्यांचा सत्कार आज दि. 27 सप्टेंबर रोजी अखिल भारतीय काँग्रेस कमिटी चे महासचिव मा. मुकुलजी वासनिक साहेब यांच्या वाढदिवसा निमित्ताने बुलढाणा जिल्हा काँग्रेस च्या वतीने संपूर्ण बुलढाणा जिल्हाभर आयोजित करण्यात आला.

याप्रसंगी जळगाव (जा) येथील बाबासाहेब आंबेडकर वस्तीगृहात असलेल्या कोविड केअर सेंटर येथे कार्यरत असलेले डॉक्टर मंडळी, नर्सिंग स्टाफ, सफाई कामगार, तथा इतर कर्मचारी यांचा आज जळगाव जामोद तालुका व शहर काँग्रेस कमिटी यांच्या हस्ते कोरोना योद्धा प्रमाणपत्र व बुके देऊन सत्कार करण्यात आला.

या कठीण प्रसंगी आपण सर्व जनतेला मोलाची सेवा देत आहात. आपल्या परिवारासोबत स्वतः जोखीम पत्करत सेवा देत आहे हे खरोखरच पुण्याचं काम आहे, असे गौरवोउदगार मान्यवर मंडळींनी काढले. तसेच याप्रसंगी जळगाव शहरात या संकट काळात रुग्णसेवा देणाऱ्या प्रायव्हेट डॉक्टर मंडळी तसेच पॅथॉलॉजी ची सेवा देणाऱ्या मंडळींचा सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रम हा तिन दिवस चालणार असून या कार्यक्रमाला जळगाव जामोद मतदार संघाच्या नेत्या डॉ.सौ. स्वातीताई वाकेकर, महिला जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षा सौ.ज्योतीताई ढोकणे, जळगांव जा काँग्रेस चे अध्यक्ष अविनाश भाऊ उमरकर, बु.जि. काँग्रेस चे सरचिटणीस राजुभाऊ पाटील, तसेच अमरभाऊ पाचपोर , शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अर्जुन भाऊ घोलप, नगरसेवक श्रीकृष्ण केदार, कलीम मिस्त्री, माजी प.स.सभापती प्रवीण भोपळे, युवक काँग्रेस चे शहराध्यक्ष राजीक , मंजुराबाई इंगळे, अंजनाबाई उंबरकार, अशोक साबे, महेंद्र बोडखे, राजू भाई, शे.जुनेद, विक्की उमरकर, गोपाल कोथळकार, सुरेश वानखडे, हुसेन भाई, हरीश भाईजी, अमोल हागे, कृष्णा खिरोडकार इ.उपस्थित होते.

अकोट-हिवरखेड खंडवा रेल्वेमार्गात सुवर्णमध्य साधा

0

 

 

हिवरखेड विकास मंच आणि अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे मोदींजींना साकडे

अडगांव बु प्रतिनिधी:- दिपक रेळे
उत्तर आणि दक्षिण भारताला जोडणारा सर्वात जवळचा आणि 2012 पासून मंजुरात असलेल्या अकोला इंदौर रतलाम ब्रॉडगेज प्रकल्पातील अकोट- आमला खुर्द या टप्प्याचे काम मेळघाट मधील जुन्या मार्गावरून करावे की प्रस्तावित नवीन मार्गावरून व्हावे याबाबत राजकारण प्रचंड तापले असून ह्या वादाला केंद्र सरकार विरुद्ध राज्य सरकार, भाजप विरुद्ध शिवसेना, पर्यावरणप्रेमी विरुद्ध विकास प्रेमी, अमरावती जिल्हा विरुद्ध बुलढाणा जिल्हा असे विविध द्वंदाचे स्वरूप मागील काही दिवसात प्राप्त झाले आहे. त्यामुळे ह्या मार्गाचे काम सुरू होण्याऐवजी हा विषय प्रचंड रेंगाळत असून गुंतागुंतीचा झाला आहे.
विशेष म्हणजे मेळघाट मधून ब्रॉडगेजचे काम सुरू करण्यास पूर्ण परवानगी नसतानाही जुनी मीटरगेज रेल्वे अकोट ते मध्यप्रदेश पर्यंत का सुरू ठेवण्यात आली नाही?? हा मोठा प्रश्न आहे. याउलट मीटरगेज रेल्वेचे रुळ सुद्धा जाणीवपूर्वक उखडून टाकण्यात आले. ज्यामुळे रेल्वे प्रवाशांचा महाराष्ट्र-मध्यप्रदेश हा सर्वात जवळचा रेल्वे संपर्क तुटला आहे. आणि वेळ श्रम पैसा वाया जात आहे. दुसरीकडे मध्य प्रदेशात ज्या मार्गावर ब्रॉडगेज परिवर्तन बाकी आहे अशा महु पातालपानी कालाकुंड ओंकारेश्वर ह्या मार्गावर तेथील लोकप्रतिनिधी आणि नागरिक जागृत असल्याने ब्रॉडगेज चे काम सुरू होईपर्यंत मिटरगेज रेल्वेलाच हॅरिटेज ट्रेन चा दर्जा देण्यात आला आणि रेल्वे सेवा सुरूच ठेवण्यात आली. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी ह्या मार्गाला आदिवासींच्या अस्मितेचा विषय बनवून संसदेत हुंकार दिली आणि रेल्वेमंत्र्यांना उत्तर देण्यास भाग पाडले.
आपापले तर्क देऊन मेळघाट मधूनच आणि मेळघाटच्या बाहेरून रेल्वेमार्ग करणेबाबत दोन्ही मार्गाच्या समर्थकांनी हा अस्मितेचा विषय बनविला आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे दोन्ही मार्गाच्या मागण्यांमध्ये तथ्य असून सर्वांचीच मागणी रास्त आहे. यामध्ये आता सामाजिक कार्यकर्ते धिरज बजाज यांच्या पुढाकारातून हिवरखेड विकास मंच आणि अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाने सुवर्णमध्य सुचविला आहे. यासंदर्भात पत्रकार भवन हिवरखेड येथे अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ आणि हिवरखेड विकास मंच यांची संयुक्त बैठक पार पडली ज्यामध्ये सामाजिक कार्यकर्ते धिरज बजाज, माजी सरपंच संदीप इंगळे, राजेश पांडव, अर्जुन खिरोडकार, जितेश कारिया, राहुल गिर्हे, सूरज चौबे, उमर बेग मिर्झा, जावेद खान, अनिल कवळकार, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
ह्यावेळी रेल्वे संबंधी सर्वंकष चर्चा पार पडली.
बिहार, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश या राज्यांच्या तुलनेत विदर्भ आणि मध्यप्रदेशातील रेल्वेमार्गाचे जाळे अत्यंत कमी असून रेल्वे मार्गाचे जाळे वाढविणे अत्यावश्यक आहे. त्यादृष्टीने खालील मागण्यांचा पाठपुरावा करण्याचे एकमताने ठरविण्यात आले.
हिवरखेड- वानरोड- धुळघाट- डाबका- तुकईथड (मध्य प्रदेश) ह्या मेळघाट मधून जाणाऱ्या जुन्या मार्गावर मिटरगेज रेल्वे पूर्ववत तात्काळ सुरू करावी. जेणेकरून महाराष्ट्र मध्य प्रदेश तात्काळ जोडले जाईल.

अकोला खंडवा इंदौर हा ब्रॉडगेज प्रकल्प हिवरखेड, सोनाळा, जामोद, उसरणी, खकनार, खिडकी, तुकईथड ह्या प्रस्तावित नवीन मार्गाने करण्यात यावा.
ज्यामुळे हा तेल्हारा, संग्रामपूर, जळगाव जामोद, या तालुक्यांना आणि लक्षावधी जनतेला प्रगतीपथावर नेणारा महत्त्वाकांक्षी प्रकल्प ठरेल. हिवरखेड आणि तुकईथड येथे जंक्शनचा दर्जा देण्यात यावा येथे ब्रॉडगेज आणि मिटरगेज रेल्वे सेवा एकत्रित येतील.आणि हिवरखेड चे नवीन रेल्वे स्टेशन हे गावानजीक व्हावे

उपरोक्त मागण्यांचे निवेदन मा. प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी, रेल्वेमंत्री पियुष गोयल, मुख्यमंत्री, रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, अमरावती, अकोला बुलढाणा, बुरहानपुर, खंडवा चे खासदार आणि सर्व संबंधित मान्यवरांना पाठविण्यात येणार आहेत.

अखिल भारतीय जिवा सेनेच्या तालुकाध्यक्षपदी नवनाथ वखरे यांची निवड

0

 

फुलंब्री प्रतिनिधी
सागर जैवाळ

अखिल भारतीय जिवा सेनेची फुलंब्री तालुका कार्यकारिणी नुकतीच जाहीर झाली. यात फुलंब्री तालुका अध्यक्षपदी नवनाथ वखरे यांची निवड करण्यात आली आहे. तर शहराध्यक्षपदी प्रविण नाईक,तालुका सचिवपदी संदीप दत्तू काळे ,तालुका उपाध्यक्ष पदी सुनील बिडवे , शहर उपाध्यक्षपदी पवन वाघ, शहर सचिवपदी किरण सुरडकर यांची निवड करण्यात आली आहे.
फुलंब्री येथे संत सेना भवन येथे पार पडलेल्या बैठकी दरम्यान मराठवाडा प्रवक्ता सुरेश बोर्डे,जिल्हाध्यक्ष मुंजाभाऊ भाले,संत सेना सेवा भावी संस्थेचे अध्यक्ष संजय पंडीत,शरद पंडीत,सोमीनाथ तावरे,आशोक नाईक,मन्साराम नाईक,शंकर बोर्डे,रूपेश नाईक, भैय्या पंडित , आकाश तावरे,कृष्णा बिडवे,भाऊसाहेब नाईक ,कैलास वखरे,संतोष वखरे हे उपस्थित होते.

आज २७ सप्टेंबर हा दिवस “जागतिक पर्यटन दिन” साजरा

0

 

सागर जैवाळ
फुलंब्री तालुका प्रतिनिधी

डिजिटलदृष्ट्या प्रगत होत जाणाऱ्या पर्यटन क्षेत्रासाठी, प्रत्येकास जागरूक करणे, डिजिटल व तंत्रज्ञानावर आधारित उद्योग-व्यवसायास चालना मिळावी, त्यामध्ये स्थानिकांचा समावेश व त्यांचे सशक्तीकरण करणे, पर्यटनासाठी माहितीचे आधुनिकीकरण करणे, कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून पर्यटनामध्ये सुलभता आणणे यासारखी अनेक उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून आजचा पर्यटन दिन साजरा करण्यात आला
पर्यटन दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!