Home Blog Page 615

निर्गुण नदीला खूप मोठा पूर नागरिकांना मध्ये भीतीचे वातावरण.

0

 

नासिर शहा
पातूर प्रतिनिधी

पातूर तालुक्यातील निर्गुण नदीला काल दी.१३ सप्टे.२०२० रोजी रात्री ९:३० ते १०:०० वाजता खूप मोठा पूर आला पुलावरून पाणी वाहत होते आणि आलेगाव येथील वाळकेश्र्वर मंदिराला पुराच्या पाण्याने वेढा घातला होता व गोठान वरील घरांमध्ये पाणी शिरले तसेच गुरांच्या गोठ्यांमध्ये सुध्दा पाणी भरले गेले गावातील लोक जागे होते म्हणून सुदैवाने नुकसान टळले. नाहीतर खूप मोठी हानी झाली असती. चोंढी येथील धरण १००%भरलेले आहे त्यामुळे केंव्हाही नदीला पूर येऊ शकतो व मोठी हानी सुद्धा होऊ शकते म्हणून नागरिकांनी सतर्क राहणे खूप गरजेचे आहे प्रशासनाने सुद्धा जनजागृती करून उपाय योजना करणे गरजेचे आहे असे सुज्ञ नागरिकांमध्ये बोलले जात आहे

0

 

वैजापूर तालुक्यातील वाकला येथे क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याचे अनावरण झाले त्या प्रसंगी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब शिंदे शहर अध्यक्ष पुंडलीक गायकवाड महेश भालेराव ता सचिव अशोक देवकर अक्षय पवार

ईसापूर धरणाच्या नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा: खासदार हेमंत पाटील

0

 

अंकुश गिरी
ग्रामीण प्रतिनिधी,सेनगाव

हिंगोली लोकसभा मतदार संघात असलेल्या पैनगंगा नदीवर ईसापुर धरण पूर्ण क्षमतेने भरले असून धरणाच्या पाणलोट क्षेत्रात आणखी पाऊस झाल्यास दरवाजे उघडावे लागणार आहे. यामुळे नदीकाठावर असलेल्या गावांना पूर परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो. यासाठी नदीकाठच्या गावातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी हिंगोली जिल्ह्यातील आपत्ती निवारण कक्षास सतर्क राहून परिस्थितीवर लक्ष देण्यास हिंगोली चे खासदार श्री.हेमंत पाटील यांनी सांगितले आहे.

जलालदाभा विद्युत उपकेंद्र मंजुरी मिळावी: विठ्ठलराव पोले

0

 

अंकुश गिरी
ग्रामीण प्रतिनिधी,सेनगाव

औंढा नागनाथ: शिवसेना जिल्हाप्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदार संघाचे आमदार श्री.संतोषराव बांगर हे औढा नागनाथ दौर्‍यावर गेले असता जलालदाभा विद्युत उपकेंद्र 33 केव्ही मंजुरी मिळवून देण्यात यावी असे निवेदन शिवसेना औंढानागनाथ उप तालुका प्रमुख तथा कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक श्री.विठ्ठलराव उत्तमराव पोले यांनी केले. यावेळी हिंगोली शिवसेनेचे नगरसेवक रामभाऊ कदम, गंगाधर पोले, शिवसेना तालुकाप्रमुख साहेबराव देशमुख, शहरप्रमुख अनिल देव, नगरसेवक कुरूवाडे सुदाम, किसन काशीदे, खोकले सर व अन्य गावकरी उपस्थित होते.

आमदार .संतोषराव बांगर यांच्या हस्ते विविध कामांचे उद्घाटन.

0

 

अंकुश गिरी
ग्रामीण प्रतिनिधी,सेनगाव

कळमनुरी विधानसभा मतदारसंघातील दुघाळा, सिद्धेश्वर तांडा, नंदगाव तांडा, घारेवाडी, ब्राह्मणवाडा चव्हाण तांडा, ब्राह्मणवाडा तांडा, माथा, तामटी तांडा, काकडदाभा, निशाणा, सुरेगाव येथे आमदार विकास निधीतून पाच लक्ष रुपयांच्या सीसी रोड आणि सभामंडप बांधकामांचे शिवसेना जिल्हा प्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदार संघाचे आमदार श्री.संतोषराव बांगर व तसेच गावातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्यांच्यासोबत शिवसेनेचे नगरसेवक रामभाऊ कदम, जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती फकीरराव मुंडे, अनिल देशमुख, तालुकाप्रमुख साहेबराव देशमुख, गंगाधर पोले, शहर प्रमुख अनिल देव, नगराध्यक्ष गणेश कुरवाडे यांच्यासह सर्व शिवसैनिक व युवासैनिक तसेच गावकऱ्यांची उपस्थिती होती.

 

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची पातूर तालुका कार्यकारिणीची अविरोध निवड

0

 

नासिर शहा
पातूर प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची निवडणूक संदर्भात पातूर येथील गणेश केबल नेटवर्क चे संभाजी महाराज चौक कार्यालयात महत्त्व पूर्ण बैठक संपन्न झाली
या मध्ये पातूर तालुका अध्यक्ष पदी देवानंद गहिले, तर सचिव म्हणून प्रा सि. पी. शेकूवाले उपाध्यक्ष पदी संतोषकुमार गवई, सहसचिव पदी राजाराम भाऊ देवकर कार्याध्यक्ष संजय गोतरकर संघटक श्रीकृष्ण शेंगोकार, सहसंघटक सुनील भाऊ गाडगे,कोषाध्यक्ष अजय शिंदे, जेष्ठ मार्गदर्शक तथा सल्लागार म्हणून जेष्ठ पत्रकार शंकरराव नाभरे, जेष्ठ पत्रकार प्रदीप भाऊ देशमुख तसेच तालुका प्रसिद्धी प्रमुख किरणकुमार निमकंडे,अविनाश पोहरे, सतिष कांबळे, राम वाडी आणि तालुका संपर्क प्रमुख पदी श्रीधर लाड,तर तालुका सदस्य पदी नय्यरखान, अब्दुल कदीर, रक्षण देशमुख, रामहरी पल्हाड, सुधाकर राऊत, राहूल सोनोने,
विजय सदार,दिलीप गीर्हे, नातिक शेख,गोपाल राठोड, प्रेमचंद शर्मा, राहुल धाडसे, राजू काळे,गणेश बळकार सैय्यद हसन बाबू,पंकज पोहरे, शेख असलम,मोहोम्मदशोएबोद्दीन,
राहुल शेंगोकार,मोहोम्मद फरहान अमिन,
माणिकराव ठाकरे,राजेश कीर्तने, मंगेश फाळके, नासिर शेख,
शेख मुक्तार, पंकज इंगळे, नंदू बोदडे,राजेश लखाडे, नितीन उजाडे, अमोल देवकते, गोपाल कोळसे, राहूल देशमुख
प्रमोद कढोने शैलेश जगदाडे प्रशांत गवई योगेश नागोलकर,नासिर शहा, राजेश मुके तोकिर अहेमद,अनिकेत राठोड सैय्यद जुबेर आदींची निवड करण्यात आली आहे
नवनियुक्त पदाधिकारी यांचे पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले आहे
नवनियुक्त पदाधिकारी यांनी निवडीचे श्रेय प्रदेश अध्यक्ष वसंतराव मुंढे,राज्य संघटक संजय भोकरे,प्रदेश सरचिटणीस विश्वास राव आरोटे,राज्य कार्याध्यक्ष किरण जोशी,विदर्भ अध्यक्ष बाळासाहेब देशमुख,उपाध्यक्ष संदीप पांडव,विभागीय अध्यक्ष सिद्धार्थ तायडे,जिल्हाअध्यक्ष गणेश सुरजूशे यांना दिले आहे
पत्रकार संघाचे संघटन ही आज काळाची गरज आहे कोरोना सारख्या महामारीत पत्रकार बांधवांनी प्रशासनाला मदत करीत प्रणाच्या आहुत्या दिल्या आहेत, मात्र पत्रकार बांधव विकासाच्या बाबतीत उपेक्षित राहिला आहे पत्रकार यांना सन्मानाची वागणूक आणि विकास करायचा असेल तर संघटनेशिवाय पर्याय नाही असे विचार पातूर तालुका अध्यक्ष देवानंद गहिले यांनी व्यक्त केले आहे
सभेचे सूत्रसंचालन प्रा.सि पी. शेकूवाले तर आभार प्रदर्शन संजय गोतरकर यांनी व्यक्त केले
निवडणूक शांततेत आणि खेळीमेळीचे वातावरणात पार पडली

अमरावती हुन किसान रेल साठी ची योजना बनली माननीय नितीन गडकरींच्या उपस्थितीत.

0

 

रेल्वे अधिकाऱ्यांच्या सोबत झालेल्या बैठकीत नियोजन. रेल्वे विभागाने दिली मान्यता. शेतकऱ्यांना त्यांचा शेतमालाचे बुकिंग करता यावे या साठी रेल्वे बनवणार वेगळी Dedicated वेबसाईट.

किसान रेल्वे अमरावती हुन तातडीने सुरू करणे व संत्र्या सहित केळी भाजीपाला, रानभाज्या सीता फळे दूध या पदार्थ या साठी पश्चिम विदर्भाच्या विविध केंद्रा वरून या शेतमालाचे बुकिंग सुरू करण्या साठी केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी यांनी आज मध्य रेल्वेचे डीआरएम श्री. सोमेश कुमार, डीसीएम श्री. कृष्णा पाटील आणि रेल्वेच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली. रेल्वे विभागाने या प्रस्तावाला मान्यता दर्शवली आहे.

यासाठी रेल्वे विभागाची केवळ शेतकऱ्यांचा माल देशातील विविध बाजार पेठा मध्ये पोहचविण्यासाठीची रेल्वेचे वेळापत्रकाची माहिती देणारी व त्यात्यावेळी उपलब्ध होणारा शेतमाल बुकिंग करण्यासाठी ची Dedicated वेबसाईट विकसित करणार असून या वेबसाईटवरून शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाचे बुकिंग करण्याची सोय असेल व या सर्व बाबींचे नियोजन ताबडतोब करण्यात येईल असे रेल्वे अधिकाऱ्यांनी माननीय नितीन गडकरींच्या समवेत आयोजित बैठकीत सांगितले.

तसेच संत्र्याचे पीक हाताशी आले असल्याने विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचा माल बांग्लादेशमध्ये कमी वेळ आणि कमी खर्चात निर्यात करण्यासाठी विशेष किसान रेल अमरावती जिल्ह्यातील विविध केंद्रावरून व विदर्भातील विविध केंद्रा वरून सुविधा ताबडतोब उपलब्ध होईल.

पश्चिम विदर्भ विकास परिषदेची अमरावतीतून किसान रेल सुरू करण्याची मागणीला माननीय नितीनजी यांनी केवळ ऐकली नाही तर या मागणीला नियोजनाची जोड देऊन निर्णय होण्यापर्यंत पोहचविले त्याबद्दल पश्चिम विदर्भातील करोडो शेतकरी, शेतमजूर महिला , बेरोजगार व्यापारी उद्योजक व नागरिकांच्या वतीने – दिनेश सूर्यवंशी, अध्यक्ष, पश्चिम विदर्भ विकास परिषद , संयोजक नितीन भुतडा, निमंत्रक गजानन कोल्हे तसेच बुलढाणा जिल्हा – संयोजक – सचिन देशमुख , सतीश गुप्ता , विजय कोठारी , मोहन शर्मा , प्रदिप सांगळे , शाम फापट , तसेच प्रसिद्ध प्रमुख – कैलास देशमुख , नानासाहेब काडलकर , अभिमन्यु भगत , नाना इंगोले तेल्हारा , संतोष जानवे अकोला यांनी आभार मानले आहे.

माजी आमदार अमर काळे कोरोना पॉझिटिव ,,संपर्कात आलेल्यांनी खबरदारी म्हणून कोरोना चाचणी करून घेण्याची केले आवाहन,,,

0

 

 

मुख्य संपादक

अनिलसिंग चव्हाण

मागील काही दिवसांपासून सातत्याने सुरु असलेल्या जनसंपर्कमुळे दोन दिवसापासून प्रकृतीत बदल जाणवत होता त्यामुळे स्वतःची चाचणी करून घ्यावी असा निर्णय घेऊन येथील उपजिल्हा रुग्णालयात आज कोरोना अँटिजिन ची चाचणी केली असता त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती माजी आमदार अमर काळे यांनी दिली

माझी तब्येत चांगली असून घाबरण्याचे काही कारण नाही, मात्र मागील काही दिवसांपासून जे माझ्या संपर्कात आले आहे त्यांनी त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने व कुटुंबाच्या दृष्टीने स्वतःची टेस्ट करून घ्यावी अशी नम्र विनंती माजी आमदार अमर काळे यांनी केली आहे
फोटो,, अमर काळे

जिथे अन्याय, तिथे छत्रपती सेना

0

 

 

दि. 12-०९-2020 रोजी खातखेड़, व पातुर्डा बु।। येथे “छत्रपति सेनेच्या” शाखा उघडण्यात आल्या. उटघाटन हे छत्रपति सेना संस्थापक अध्यक्ष :- पै. करणभाऊ साहू , यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख उपस्थिति म्हणून पै.नितिन भाऊ मानकर यांनी पातुर्डा बु ।। येथील शाखेचे उटघाटन केले.
यामधे शुभमभाऊ म्हसाळ यांच्या मार्गदर्शना खाली पातुर्डा बु।। येथील , शाखा अध्यक्ष :- पै. राहुलभाऊ बोदडे , शाखा उपाध्यक्ष :- वैभवभाऊ बेंदरकार, तर शाखा सचिव :- नयन भाऊ सुर्जे यांची नेमनुक करण्यात आली.
तसेच सोबतच खातखेड़ येथे शुभमम्हसाळ मित्रपरिवाराकडून “राजेशभाऊ जमाव” यांच्या नेतृत्वाखाली , शाखा अध्यक्ष :- राम देवचे, शाखा उपाध्यक्ष :- मंगेश तलवारे , यांची नेमनुक करण्यात आली.
यावेळी पै. करणभाऊ साहू यांनी सर्वांना मार्गदर्शन केले व “जिथे अन्याय, तिथे छत्रपति सेना” अशी ग्वाही देऊन आपले दोन शब्द संपवले.
यामध्ये छत्रपति सेना मडाखेड, चे प्रज्वल पाटिल , शेगांव चे , ज्ञानेश्वरभाऊ दाने , नागेश फासे, विवेक शिंदे, संकेत लांजुळकर, वैभव बावस्कार, तसेच संपूर्ण शेगांव, व संग्रामपुर तालुक्यामधील युवा मित्र वर्ग सहभागी होता.

0

गावठाण मध्ये विद्युत पुरवठा करणाऱा ट्रांसफार्मर जळाल्याने तो लवकरात लवकर बसवा अशी विनंती करण्यासाठी गेलेल्या लोकांवरच लीगल कनेक्शन असताना मोटारीचा विद्युत पुरवठा केला बंद.

 

 

ज्यु.ईजी.ची आकसापोटी कार्यवाही.

गावातील समस्या माडंणे झाला गुन्हा.

 

सोनोशी…………. चार दिवसांपुर्वी सोनोशी येथील मागास्वर्गिय लोक वस्तिला विद्युत पुरवठा करणारा ट्रांसफार्मर जळालेल्या होता. गावठाण फिडर चा ट्रांसफार्मर लवकरात लवकर बसवा व अवैध कनेक्शन काढण्याची मागणी केल्यामुळे ज्युनियर इंजिनिअर्स गायकवाड याचा राग अनावर झाला व दुस-या दिवशी आकसापोटी विनंती करण्यासाठी गेलेल्या लोकमत वृत्त पत्राचे पत्रकार महेंद्र मोरे व ग्राहकांच्या घरी नाहक धाडी टाकून कारवाईच्या धमक्या दिल्या व त्याची हरासमेट करण्याचा प्रयत्न केला. याच लोकांचे सर्व लीगल कनेक्शन असताना शेतीला पाणीपुरवठा करणाऱ्या मोटार पंपाचे कनेक्शन तोडले.त्यामुळे विद्युत वितरण कंपनीचे अधीकार्याची मुजोरी समोर आली आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्याशी काही कार्यकर्त्यांनी संपर्क करून ट्रांसफार्मर लवकरात लवकर मिळवण्याचा प्रयत्न केला व तो विद्युत विभागाच्या कर्मचाऱ्यांनी बसवला 4 घंटे चार्जझाल्यानंतरही गावामध्ये विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात आला नाही तसेच विद्युत पुरवठा कमी दाबाचा दिला गेला याबद्दल ग्राहकांनी जूनियर इंजीनियर गायकवाड यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी ग्राहकांना उडवाउडवीची उत्तरे दिली जर अधिकारी ग्राहकांशी उद्धटपणे वाजत असेल तर ग्राहकांनी दाद कोणाकडे मागायची हा प्रश्न आता निर्माण झाला आहे. अर्धवट माहितीच्या आधारे ग्राहकावर आकसापोटी महावितरणचे कर्मचारी व अधिकारी जर सुड बुद्धीने कारवाई करत असतील तर अशा अधिकाऱ्यांवर कार्यवाही होणे आता गरजेचे झाले आहे. सोनोशी मध्ये सतत विद्युत पुरवठा हा सुरळीत चालत नाही कमी दाबाची वीज दिल्या जाते लोड वितरण ही व्यवस्थित केल्या जात नाही रात्र-रात्र लाईट बंद असते डीपी चा साधा फ्यूज टाकण्यासाठी कर्मचारी हजर राहत नाही असा त्रास ग्राहकांना सहन करावा लागत आहे. अशावेळी गावातील ग्राहक जर वरिष्ठ अधिकाऱ्याकडे आपली मागणी मांडत असेल तर त्यांच्यावर कारवाईच्या नावाखाली नाहक त्रास दिला जात आहे. कोणतीही माहिती न घेता व सर्व काही लिगल असतानां विनंती करण्यासाठी गेलेल्या लोकांसह पत्रकारावर सुडबुध्दीने कनेक्शन कापणे हा कोणता न्याय.त्यामुळे अशा अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी आता होत आहे.

 

सोनोशी येथील मागासवर्गीय वस्तीत विद्युत पुरवठा करणारा ट्रांसफार्मर जळाला होता.तो ट्रा्सफारमर लवकर बसवा.व सुरू करा अशी विनंती मी गायकवाड साहेब यांच्या कडे केली .पण उलट त्यांनी मलाच दमदाटी केली गावचा प्रश्न तिकडे च सोडवा.अशी उत्तरे दिली .व दुसर्यादिवशी येवुन माझे लिगल असलेले शेतातील मोटारीचे कनेक्शन कट केले.

महेंद्र मोरे सोनोशी

गावात विद्युत पुरवठा हा खुप विस्कटलेला आहे लोकशाहीचा आधारस्तंभ असलेल्या पत्रकार व ग्राहकांना जर अशे अधीकारी मुस्खटदाबी करीत असेल तर यांची तक्रार मा.पालकमंत्री डॉ.शिगंणे साहेब व ऊर्जा मंत्री कडे करणार आहे.

पांडुरंग सोळुंके.
ता. उपाध्यक्ष राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस सिंदखेडराजा
संचालक खरेदी विक्री संघ सिंदखेडराजा.