Home Blog Page 619

आसलगाव ग्रामपंचायत प्रशासकपदी मोरे रुजू

0

 

जळगांव जा.प्रतिनिधी

जळगाव जामोद तालुक्यातील ग्रामपंचायत आसलगाव च्या ग्रामपंचायत प्रशासक पदी विस्तार अधिकारी श्री संदीप मोरे रुजू झाले असून जळगाव जामोद तालुक्यातील आसलगाव ग्रामपंचायत सर्वात मोठी असून सदस्यसंख्या 17 आहे ग्रामपंचायत सरपंच व सदस्य यांचा कार्यकाल आज दिनांक 9 सप्टेंबर 2020 रोजी संपुष्टात येऊन पंचायत समिती जळगाव जामोद चे विस्तार अधिकारी श्री संदीप मोरे हे आज रुजू झाले त्यांचा सत्कार सरपंच वैशालिताई येनकर यांनी शाल व श्रीफळ देऊन केला तसेच गावातील समाजसेवक प्रकाश ढोकने यांनी सुद्धा गावक-यांच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला यावेळेस ग्रामसेवक धीरज मारोडे विजय तिवारी, सुनील येनकर, अरविंद भारसाकडे, श्रीकृष्ण भेलके, लहू भारसाकडे, राधेश्याम केला, गजानन येनकर, महादेव श्रीनाथ, सुनील दांडगे, श्याम देवताळू,

ग्राम पंचायत कर्मचारी मधू इंगळे, श्रीकांत पाठक, मंगेश बोराखडे,

तसेच गावातील पत्रकार गणेश गि-हे सुद्धा उपस्तीत होते

कार्यक्रम प्रसंगी प्रशासक संदीप मोरे म्हणाले की गावाचा विकास करणयासाठी मला गावकऱ्यांची साथ म्हणजे तुमची साथ लागेल आणि आपण जिल्हा परिषद मधून जेवढा निधी गावातील विकासा साठी आणता येईल तेवढा विकास निधी आणून आपण गावाचा विकास करू असे त्यांनी गावातील नागरिकांशी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या.

अल्पवयीन प्रेयसीला पळून नेले, गुन्हा दाखल

0

 

नागपूर : अल्पवयीन प्रेयसीला पळून नेले, ही घटना घडली गुन्हा दाखल प्रियकराने दोन वर्षांच्या प्रेम प्रकरणानंतर प्रेयसीला पळवून नेले. कपिलनगर पोलिसांनी युवकाविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला. विक्की शेंडे (२३, निर्मल कॉलनी, कपिलनगर) असे आरोपीचे नाव आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, म्हाडा कॉलनीत रिया (बदललेले नाव) ही आई, मोठी बहीण आणि लहान भावासह राहते. रियाने नुकतीच बारावी पास केली आहे. तिच्या घराच्या बाजूला विक्कीची आजी राहते. विक्कीचे आजीच्या घरी नेहमीच येणे-जाणे होते. दोघांचे दोन वर्षांपूर्वी सूत जुळले. दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला. परंतु, रियाच्या आईचा लग्नाला विरोध होता. आज गुरुवारी दुपारी बारा वाजता त्याने रियाला पळवून नेले.
पोलिसांनी विक्कीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.

यापूर्वीही काढला होता पळ
रियाची दहावीची परीक्षा होताच दोघांनी घरातून पळ काढला होता. तेव्हा तिच्या आईने जरीपटका पोलिस ठाण्यात विक्कीविरुद्ध तक्रार केली होती. दहा दिवस बाहेर मुक्काम केल्यानंतर विक्कीने रियाला घरी आणून सोडले होते, हे विशेष.

धनगर समाज युवा मल्हार सेना मराठवाडा अध्यक्ष वैजनाथ पावडे यांचा रिसोड येथे सत्कार करण्यात आला

0

 

अंकुश गिरी
ग्रामीण प्रतिनिधी सेनगाव

धनगर समाज युवा मल्हार सेना मराठवाडा अध्यक्ष वैजीनाथ पावडे यांना यशवंत समाज भूषण पुरस्कार मिळाल्यानंतर त्यांचा विदर्भ दौरा चालू असताना रिसोड येथे त्यांचा सत्कार करण्यात आला . वैजीनाथ पावडे हे अनेक वर्षापासून समाजाची सेवा चांगल्या पद्धतीने करत असून त्यांचा कामाची दखल विदर्भातील सर्व धनगर समाज बांधवांनी घेऊन त्यांचा प्रत्येक खेड्यात सत्कार करण्यात आला व यावेळी उपस्थित हिंगोली जिल्हा उपाध्यक्ष यशवंत पाबळे, विलास मस्के , शंकर आळसे व आदी धनगर समाज बांधव उपस्थित होते

डॉ . अविनाश पाटील यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सेशन कोर्टाने फेटाळला ……

0

 

जळगाव जामोदः- डॉ . अविनाश पाटील समाधान हॉस्पीटल जळगाव जामोद यांच्या विरुध्द पोलीस स्टेशन जळगाव जामोद येथे संजय भोंगाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन दाखल झालेल्या गुन्ह्यामध्ये डॉ . अविनाश पाटील यांचे विरुध्द जळगाव जामोद कोर्टाने गुन्हे दाखल करण्याचा आदेश दिला होता त्यानुसार पो.स्टे.जळगाव जामोद येथे डॉ.अविनाश पाटील समाधान हॉस्पीटल यांचे विरुध्द भा.दं.वि.चे कलम ३०४ , ३१६ , ३१८ , ३३६ , ३३८ , २ ९ ४ , ५०४ व ५०६ नुसार गुन्हा नोंदविण्यात आला होता . त्याकारणाने डॉ . अविनाश पाटील यांनी वि . अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय खामगाव येथे अटकपूर्व जामीन मिळण्याकरीता अर्ज दाखल केला होता . परंतु सदरचा अटकपूर्व जामीन अर्ज वि . अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय खामगाव कोर्टाने फेटाळला असुन सरकारी पक्षाच्या वतीने अॅड . उदयजी आपटे सरकारी वकील खामगाव व फिर्यादीच्या वतीने अॅड . रुपेश विश्वेकर , ॲड पी.एस.मनसुटे व अॅड . अभिमन्यु वाघ ( पाटील ) यांनी बाजु मांडली .

अडगाव येथील गुटखा माफियावर धाडसी कारवाई पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने टाकलेल्या धाडीत लक्षावधी रुपयांचा गुटखा जप्त

0

 

अडगांव बु प्रतिनिधी: दिपक रेळे

हिवरखेड पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या संवेदनशील अडगाव बु. येथे सर्व प्रकारचे अवैध धंदे खुलेआम जोमात सुरू असतात. यापूर्वीसुद्धा हिवरखेड पोलीस स्टेशन अंतर्गत विविध अवैध धंद्यांवर पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाने यशस्वी आणि मोठमोठ्या कारवाया केलेल्या आहेत. दि 10 सप्टेंबर रोजी भल्या पहाटे पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांच्या विशेष पथकाला खात्रीलायक माहिती मिळाली की अडगाव बु. येथील अक्रम खा हशमत खा वय 28 हा अवैधरित्या विनापरवाना महाराष्ट्रात प्रतिबंधित गुटखा पान मसाला बाळगून विक्री करीत आहे अशा स्वरूपाच्या मिळालेल्या माहितीवरून विशेष पथकाने आरोपीच्या घरी छापा टाकला. आणि त्याच्या घरातून विमल, वाह, पान बहार, दबंग इत्यादी अनेक कंपन्यांचे विविध प्रकारचे गुटखा, पानमसाला सुगंधित तंबाखू, इत्यादीचा मोठा साठा जप्त करण्यात आला. जप्त केलेला गुटख्याची आणि प्रतिबंधक साहित्याची एकूण किंमत तब्बल (2,17,550) दोन लक्ष सतरा हजार पाचशे पन्नास रुपये इतकी आहे. आरोपी अक्रम खा हशमत खा वय 28 याला पथकाने रंगेहाथ अटक केली आणि हिवरखेड पोलीस स्टेशन येथे त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
उपरोक्त धाडसी कारवाई अकोल्याचे पोलीस अधीक्षक जी. श्रीधर आणि अपर पोलीस अधीक्षक प्रशांत वाघुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मिलिंद कुमार बहाकर अकोला आणि त्यांच्या पथकाने केली आहे.

*वेगळा बॉक्स*
अडगाव बु. येथे एक कुख्यात गुटखा माफिया असून संपूर्ण अकोट आणि तेल्हारा तालुक्यात त्याची दहशत असून तो अत्यंत दादागिरीने गुटख्याच्या ठोक धंदा करतो. एव्हढेच नव्हे तर सामान्य नागरिकांना धमकावणे, मारहाण करणे, दादागिरी करणे, हे त्याचे नित्याचेच प्रताप आहेत. दोन दिवसांपूर्वीच एका छोट्या गावातील युवकाला त्या गुटखा माफियाने आपल्या साथीदारांसह अत्यन्त क्रूरतेने मारहाण केली आणि पोलिसात तक्रार केल्यास परिणाम भोगण्याची धमकी दिल्याने त्या युवकाने भीतीपोटी तक्रार देण्याचे टाळले असल्याची सुद्धा चर्चा आहे. ही माहिती गुप्त सूत्रांकडून विशेष पथकाला मिळाली असल्याचे बोलले जात आहे. आजची कार्यवाही त्याच्याशी निगडित असल्याची चर्चा आहे. परंतु अडगावच्या त्या “मुख्य माफिया” ची दादागिरी आणि माज उतरविल्या शिवाय आता विशेष पथक आणि पोलीस विभाग स्वस्थ बसणार नसल्याची माहिती अंतर्गत सूत्रांकडून मिळाली आहे.

सुनगाव येथील महाजल योजनेच्या पाणीपुरवठा करणाऱ्या टाकीला गळती

0

 

गजानन सोनटक्के

जळगाव जा

जळगाव जामोद तालुक्यातील सूनगाव येथील मोठी योजना असणारी महाजल योजना पाणी पुरवठा योजना कार्यान्वित आहे सदर टाकीला तीन ते चार ठिकाणी पाण्याची गळती सुरू आहे टाकी भोवताली राहणाऱ्या नागरिकांनी आज दिनांक 10 सप्टेंबर रोजी ग्रामपंचायत येथे तक्रार दाखल केलेली आहे सदर टाकीची गळती थांबवावी व तीन ते चार महिन्यापासून होत असलेले गळती प्रमाण वाढत आहे व ते पाणी प्लॉटमध्ये येऊ नये म्हणून ग्रामपंचायतीने टाकीखाली खड्डा खोदलेला आहे व टाकीतून होणारे पाणी त्या खड्ड्यात मुरत आहे त्यामुळे ते पाणी टाकीच्या पायथ्याशी मुरून भविष्यात टाकी पडण्याची शक्यता आहे व गळतीचे प्रमाण जास्त असल्यामुळे टाकी फुटण्याची शक्यता आहे अशी तक्रार ग्रामपंचायतला दिली आहे त्याच्या प्रतिलीपी उपविभागीय अधिकारी व तहसीलदार व गटविकास अधिकारी पंचायत समिती व ठाणेदार जळगाव जामोद यांना दिल्या आहेत तरी ग्रामपंचायतीने सदर टाकीची दुरुस्ती त्वरित करावी व टाकीची होणारी पाण्याची गळती थांबवावी अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे या तक्रारीवर हरी नारायण हागे शंकर गोविंदा नानगदे अशोक काशिराम धागे विष्णू अंबडकार यांच्या सह्या आहेत

ग्रामीण कुटा नव्या दिशा अंतर्गत पळशी सुपो येथे कोविड 19 जनजागृती

0

गजानन सोनटक्के जळगाव जामोद

जळगाव जा आज दिनांक 10 सप्टेंबर रोजी ग्रामीण कुटा नव्या दिशा संस्थे (क्रेडिट एक्सेस ग्रामीण लिमिटेड )अंतर्गत ग्रामपंचायत कार्यालय येथे कोरणा covid-19 जनजागृती करण्यात आली प्रथम पळशी सुपो येथील पोलीस पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले व त्यानंतर सुपडा बोचरे विकास अधिकारी नव्या दिशा संस्था बेंगलोर यांनी कोरोना जागतिक महामारी बद्दल महत्त्व समजून सांगितले आणि आपण जीवनात रोजच्या जेवणामध्ये हे जीवनसत्त्व के जीवनसत्त्व के जीवनसत्त्व यांचा आपल्याला भरपूर प्रमाणात शरीराला साठा मिळावा याकरिता आपण काय पदार्थ जेवणात घ्यावे ही माहिती समजून सांगितली व नव्या दिशा संस्था आपल्या संस्थेमार्फत कोणकोणते कार्यक्रम प्रकल्प राबवित असते याची माहिती दिली यावेळी पळशी सुपो येथील नागरिक व बचत गटाच्या महिला व अन्य नागरिक उपस्थित होते

रफाल विमानांचा आज भारतीय ताफ्यात समावेश

0

 

मुख्य संपादक

अनिलसिंग चव्हाण

मुंबई:- भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर आज हवाई दलाच्या अंबाला येथील तळावर पाच रफाल विमाने भारतीय सैन्यदलांत अधिकृतरित्या सामील केली जात आहेत या कार्यक्रमास संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, फ्रान्सच्या संरक्षणमंत्री फ्लोरेन्स पार्ली, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपिन रावत, एअर चीफ मार्शल आर.के. भदोरिया यांनीही हजेरी लावली आहे हवाई दलाच्या प्रवक्त्याने सांगितले की, “या कार्यक्रमादरम्यान राफेल विमानाचे औपचारिक अनावरण केले जाईल. त्यानंतर ‘सर्व धर्म पूजा’ केल्यावर रफाल आणि तेजस परिक्रमा करतील रफाल हे दोन इंजिन असलेलं अनेक कामं करू शकणारं मध्यम आकाराचं लढाऊ विमान आहे. हवेतून मारा करणं, हवेतल्या हवेत इंधन भरणं, अण्वस्त्राचा हल्ला झाल्यावर संरक्षण, लक्ष्याच्या हालचाली टिपणं त्यांच्यावर अचूक मारा करण्याची क्षमता ही राफेलची वैशिष्ट्यं आहे

0

 

 

दोन ट्रकच्या अपघातात मानि्ंगवाकला गेलेला एक युवक ठार, एक जखमी
देवरी,दि.10ः-येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील आमगावकडे जाणार्या चौकात आज सकाळी सहाच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात मार्निगवाँकला गेलेल्या युवकाचा मृत्यू तर एक जखमी झाल्याची दुर्देवी घटना घडली.सविस्तर असे की नागपूरवरून रायपूरकडे (सीजी 04,जेई0359)भाजीपाला घेऊन जाणार्या ट्रकने आमगावकडून नागपूरकडे जनावरे घेऊन जाणार्या ट्रकला आमाेरासमोर धडक दिल्याने हा अपघात घडला.हा अपघात एवढा मोठा होता की मार्निगवाँककरीता निघालेला एक युवक भाजीपाला असलेल्या ट्रकच्या चाकात आल्याने त्याचा घटनास्थळावरच मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी झाल्याने त्यास ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले.

जनविकास संघटना महाराष्ट्र राज्य हिंगोली जिल्हाध्यक्ष तथा पार्थ पवार फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य हिंगोली जिल्हा प्रमुख साईनाथ गिरी आणि राष्ट्रवादी वसमथ विधानसभेचे आमदार राजू भैया नवघरे यांचा वतीने हयातनगर चे भावी सरपंच काशिनाथ पाटील सारंग यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला

0

 

अंकुश गिरी
ग्रामीण प्रतिनिधी सेनगाव

जनविकास संघटनेचे हिंगोली जिल्हाध्यक्ष तथा पार्थ पवार फाऊंडेशन चे हिंगोली जिल्ह्याचे प्रमुख साईनाथ गिरी तसेच वसमत विधानसभा मतदार संघाचे आमदार राजू भैया नवघरे यांचा वतीने हयातनगर चे भावी सरपंच तथा वसमत तालुक्याचे पुण्यनगरी चे प्रतिनिधी काशिनाथ पाटील सारंग यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या त्यावेळेस जिल्हाध्यक्ष साईनाथ गिरी, मन्मथ बावगे, संतोष राऊत,दशरथ सारंग,गोविंद सारंग,गजानन रहतीकर,किशन गिरी,द्यानेश सोळंके,गजानन देशखरे, दत्ता कदम,योगेश सोळंके आदी उपस्थित होते